न्याय दर्शन आणि बिग बॅंग

शरद's picture
शरद in काथ्याकूट
15 Oct 2011 - 6:45 pm
गाभा: 

न्यायदर्शन आणि बिग बॅंग

न्याय दर्शनात अणुवादाचा (दार्शनिक विवेचनाचा) उगम दिसतो. प्रत्येक प्राकृत पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो, हा सिद्धांत. " अंत्यावयवत्वम् अणुत्वम् " (ज्या पदार्थाचे पुढे आणखी अवयव पाडता येत नाहीत),त्याला अणु म्हणावे अशी अणूची व्याख्या आहे. सृष्टीच्या आरंभी चार प्रकारचे अणु असतात. परमेश्वराच्या इच्छेने त्यांच्यात हालचाल उत्पन्न होते व मग दोन अणूंच्या एकत्रीकरणाने द्व्यणुक, मग त्यणुक व नंतर चतुर्णुक उत्पन्न होतात. अशा रीतीने स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल तेज व स्थूल वायू ही द्रव्ये अस्तित्वात येतात. जेव्हा सृष्टीचा प्रलय व्हावयाचा असतो तेव्हा द्व्यणुकाचे दोन अणु एकमेकापासून विभक्त होतात व द्य्वणूकाचा नाश होतो व मग याच क्रमाने त्र्यणुक व चतुर्णुक यांचाही नाश होतो व सृष्टीतील सर्व पदार्थांचा विनाश होतो.

बिग बॅंग ची प्राथमिक माहिती असलेल्यांनाही आठवण होईल की प्रथम फिरणारे एलेक्ट्रॉन्स वगैरे काहीच नव्हते. जे काही होते त्यात हालचाल सुरू झाली. प्रथम एक एलेक्ट्रॉन फिरणारा हायड्रोजन तयार झाला, मग हेलिअम व मग मोठे अणु.

प्राचिन काळी संशोधन केंद्रे नव्हती हे मान्य करूनही साम्य विस्मयकारक आहे की नाही ?

(आमचे पूर्वज महान होते ... नक्कीच. त्यांच्याकडे असलेल्या कित्येक गोष्टी आज आमच्याकडे नाहीत, उदा. शेपूट.)

शरद

प्रतिक्रिया

शाहिर's picture

15 Oct 2011 - 8:26 pm | शाहिर

आमच्या कडे हे पूर्वी होता असा म्हणणार्‍या लोकांना अर्धसनातनी असे म्हणतात..
ज्या मधे कल्पना विलास असतो पण त्याच्या पुष्ठ्यर्थ सिद्धांत नसतात..
उदा > पुष्पक विमान,

ज्या मधे कल्पना विलास असतो पण त्याच्या पुष्ठ्यर्थ सिद्धांत नसतात..
उदा > पुष्पक विमान,

ह्म्म्म... राईट बंधूंच्या आधी एक हिंदुस्थानी माणसाने जगाला याचे प्रात्यक्षित करुन दाखवले होते.त्या महान व्यक्तीचे नाव होते शिवकर बापूजी तळपदे.
संस्कॄत साहित्यात असलेल्या "मरूत् सखा " या जातीच्या विमानावर त्यांचा प्रयोग होता. :)

अधिक माहिती साठी खालील दुव्यावर टिचकी मारण्याचे कष्ट घ्यावेत...

http://suyogkeluskar.blogspot.com/2011_08_01_archive.html

https://plus.google.com/106411115051795399550/posts/Rve1zQueaob

http://goo.gl/NXdkn

प्रास's picture

15 Oct 2011 - 8:46 pm | प्रास

तुम्ही म्हणत असलेल्या साम्यस्थळाबदल काही अडचण नाही पण एक चूक दर्शवू इच्छितो आहे. विचार करावा.

तुम्ही जो अणुवाद सांगताय तो न्याय दर्शनाचा नाही आहे. अणुवाद हा वैशेषिकांचा.

वैशेषिक दर्शनाचा प्रणेता कणाद ऋषी. त्यांनी प्रत्येक पदार्थ अतिसूक्ष्म कणांनी निर्माण झाल्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडल्याचं मानलं जातं. या पुढे विभाजित होऊ न शकणार्‍या अतिसूक्ष्म कणांना त्यांनी 'अणु' असं संबोधलं.

न्यायदर्शन, ज्याचा प्रणेता गौतम मानला जातो, त्यांनी प्रत्येक पदार्थ पांचभौतिक असल्याचं प्रतिपादन केलेलं आहे. पंच महाभूतं - पृथ्वि, आप, तेज, वायु आणि आकाश.

हा सिद्धांत कणादांनाही मान्य होता म्हणून (तुम्ही नमूद करत असलेला) द्व्यणुक-त्र्यणुक सिद्धांत ते असा मांडतात. प्रत्येक महाभूताच्या दोन स्वतंत्र अणुंच्या एकत्रिकरणातून एक द्व्यणुक बनतो. तीन द्व्यणुक एकत्र आले की एक त्रसरेणु बनतो आणि याच क्रमाने मूळ महाभूतांची निर्मिती होते.

(न्याय आणि वैशेषिकांचं साम्य पांचभौतिकत्व मानण्याइतकंच आहे कारण मूळ महाभूतांच्या उत्पत्ती ते वेगवेगळी सांगतात.)

त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की कणाद ज्याला अणु म्हणतात तो आणि तुम्ही ज्याला अणु म्हणत आहात तो, हे दोन्ही एक नक्कीच नाहीत. कदाचित पुढे विभाजित न होणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांना अणु म्हणता येईल कारण कणादांचा अणु पुढे विभाजित होणारा नाही.

बाकी बिग बँग आणि कणादांचा अणुवाद यांच्यातले साम्यभेद कुणी सांगणार असतील तर जाणून घ्यायला नक्की आवडेल.

आत्मशून्य's picture

15 Oct 2011 - 10:47 pm | आत्मशून्य

असयं का ? बरं.

lakhu risbud's picture

16 Oct 2011 - 12:15 am | lakhu risbud

आमाला तर बाबा हीच (http://www.imdb.com/title/tt0898266/) बिग बँग थियरी म्हायीत हाय,दर शुक्रवारी पघतो,झ्याक हाय.

राजेश घासकडवी's picture

16 Oct 2011 - 4:36 am | राजेश घासकडवी

पदार्थाच्या बाबतीत दोनच सिद्धांत शक्य आहेत.
१. कुठचाही पदार्थ कितीही बारीक केला तरी अजून बारीक करता येतो.
२. प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बारीक केला की त्याच्या पुढे बारीक करता येत नाही.

या दोनपैकी कशावर विश्वास ठेवायचा हे आधुनिक प्रयोगांशिवाय ओळखणं शक्य नाही. त्यामुळे विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला या दोन विधानांपैकी ५०% शक्यतेने कुठचं तरी गृहित धरावंच लागेल.

आता २. सत्य आहे असं धरलं, तर मग शेवटी हे कण कसले हा प्रश्न येतोच. प्रत्येक पदार्थाचे स्वतंत्र कण आहेत असं मानलं तर मग उत्तरात काहीच विशेष अर्थ रहात नाही. म्हणजे लाकडाचा अणू, पानाचा अणू वगैरे सगळ्याचेच अब्जावधी प्रकारचे अणू आहेत असं म्हणावं लागतं. मग जर त्या कणातदेखील लाकडाचं लाकूडत्व शिल्लक असेल तर तो अविभाज्य कुठच्या जोरावर म्हणायचा? जर कुठले तरी मूलभूत प्रकारचे अणू आहेत आणि ते जोडून नवीन पदार्थ आहेत असं म्हटलं तरच या थिअरीतून नवीन काही शिकता येतं. त्यामुळे एकदा विधान २. मान्य केलं की काही मर्यादित संख्येत मूलभूत अणू आहेत असं म्हणणं भाग पडतं. बुद्धीबळाच्या भाषेत, ही फोर्स्ड मूव्ह आहे.

हे कुठचे तरी पाच अणू मानून त्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म वगैरे काही निश्चित करता आले तर त्या थिअरीला अर्थ प्राप्त होतं. नाहीतर मग या साम्याला काही विशेष अर्थ रहात नाही.

धनंजय's picture

16 Oct 2011 - 4:09 am | धनंजय

साम्य विस्मयकारक नाही.

नैयायिकांच्या अणुवादाचे खंडन शंकराने (आदिशंकराचार्यांनी) केले, आणि त्यातील काही मुद्द्यांचे प्रतिखंडन म्हणा, मंडन म्हणा, नैयायिकांनी केले, त्याबद्दल एक लेखमाला या दुव्यावर बघावी : अणू आहेत की नाहीत? अणुवादाचे प्राचीन खंडन-मंडन

आणि या गमतीदार स्फुटात तरी साम्य काय आहे, ते कळून येत नाही :

(अ) सृष्टीच्या आरंभी चार प्रकारचे अणु असतात.
(आ) प्रथम फिरणारे एलेक्ट्रॉन्स वगैरे काहीच नव्हते.

उद्धृत वाक्यांतील परस्पर-साम्य मला दिसत नाही.

प्रथम एक एलेक्ट्रॉन फिरणारा हायड्रोजन तयार झाला, मग हेलिअम व मग मोठे अणु.

द्व्यणुक, त्र्यणुक यांना समांतर आहे? ???

(१) श्री. प्रास यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. अणुवाद वैशेषिक दर्शनातला आहे. पण माझ्या वाचनात आले की "बौद्ध काळात ह्या दोन दर्शनांचा इतका घनिष्ठ संबंध आला की न्यायसूत्रे ही वैशेषिक दर्शनाची सूत्रे म्हणूनही उल्लेखली जाऊ लागली ". आजही न्याय-वैशेषिच दर्शने जोडीनेच येतात.
असो. चूक दुरुस्त करून घ्यावी.
(२) मला अणुवाद मांडावयाचा नव्हता. त्यातील एक छोटा भाग दाखववयाचा होता.. दर्शनातील अणु व आज आपण म्हणतो तो अणु एक नव्हेत हे उघड आहे.म्हणूनच त्या काळी आजच्या सारखी संशोधन केंद्रे नव्हती असे लिहले. आता मला साम्य काय दिसले ते परत एकदा लिहतो :
(अ) ज्याचे विभाजन करता येत नाही असा एक पदार्थ आहे..
(ब) प्रथम स्थिरता होती , हालचाल नंतर सुरू झाली.
(क) प्रथम लहान अणु होते व नंतर मोठे अणु तयार झाले.
एकात चिंतनाने स्फुरलेले अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आहेत व दुसर्‍यात वैज्ञानिक संशोधनानंतरचे आजचे विचार आहेत. या दोनातील हे एवढेच साम्य मला विस्मयकारक वाटले. श्री. धनंजय यांना तसे वाटावे का ? काहीच कारण नाही.
(३) श्री. राजेश तर लईच सिद्धांतिक चिरफाड करायला निघाले. अहो, श्री. धनंजय म्हणतात त्याप्रमाणे "गमतीदार" एवढीच अशा लेखांची सीमा. काय ?

शरद

धनंजय's picture

16 Oct 2011 - 9:16 pm | धनंजय

(अ) ज्याचे विभाजन करता येत नाही असा एक पदार्थ आहे..

बिगबँगवाल्यांचा असा कुठला पदार्थ नाही. प्राचीन अणुवाद्यांचा असा कुठला पदार्थ आहे. साम्य कुठले आहे?

(ब) प्रथम स्थिरता होती , हालचाल नंतर सुरू झाली.

बिगबँगवाल्यांच्या मते आधी "स्थिरता" होती असे कुठलेच मत मला माहीत नाही. (नैयायिकांचे "अदृष्ट" हालचालीबाबत मतही वेगळेच काहीतरी आहे.) काही का असेना साम्य काय आहे?

(क) प्रथम लहान अणु होते व नंतर मोठे अणु तयार झाले.

वैशेषिक नैयायिकांप्रमाणे आधी आणि नंतर "अणूं"चे आकारमान तेच राहिले. द्वणुके, त्रसरेणू वगैरे म्हणजे अणू नव्हेत. "ज्याचे विभाजन करता येत नाही" असे काही बिगबँगवाल्यांच्या विचारसरणीतच नाही, तर मग साम्य किंवा फरक शोधणेच शक्य नाही.

थोडीशी गंमत म्हणून आहे, ते आधीही समजले होते. पण कुठल्याही दोन कथा* घेतल्या आणि त्यांत काहीतरी साम्ये शोधायचा प्रयत्न केला तर कुठलेतरी शब्द थोडेसे तुलनीय सापडतील. गंमत वाटण्यासाठी अशा कुठल्याही यादृच्छिक जोडीपेक्षा अधिक साम्ये दिसली तर अधिक आवडते.

*उदाहरणार्थ : (कथा १) अर्जुनाने चित्त एकाग्र केल्यामुळे पक्ष्याच्या डोळ्यात बाण अचूक मारला. (कथा २) स्वित्झरलँडमधील लोककथा आहे, की विल्यम टेल याने चित्त एकाग्र करून आपल्या पुत्राच्या मस्तकावर ठेवलेल्या सफरचंदावर अचूक बाण मारला.
कथांचे संदर्भ अतिशय वेगवेगळे आहेत, वगैरे सगळे बाजूला ठेवून "चित्त एकाग्र" आणि "अचूक बाण मारणे" ही साम्ये गंमत म्हणून शोधता येतील. पण तितकीशी गंमत वाटत नाही.

न्याय दर्शन आणि बिग बॅंग या विषयक जालावर वाचन करताना एक धागा दिसला,वाचकांसाठी तो इथे देत आहे.
SCIENCE IN THE VEDAS
http://home.ica.net/~roymanju/Rajaram.htm
अजुन काही मिळाल्यास भर घालीन.