शिस्तभंग - कारवाई

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
7 Oct 2011 - 12:16 pm

नमस्कार,

गेल्या काही दिवसांत मिसळपाववर अत्यंत घाण प्रकारे लिखाण झालेलं आहे. मिसळपाववर अश्या प्रकारे लेखन केल्या जाऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. तरी सुध्दा काही लोकांनी स्वत:ला आवर घातला नाही.
एखाद्या विषयावर कुणी संवेदनशील होऊ शकतं हे मान्य मात्र त्यासाठी मिपावरील स्त्री सदस्यांना लाजीरवाणे लेखन कुणी करेल तर ते कुठल्याही सबबीखाली वैध मानता येणार नाही. सबब अश्या प्रकारे खरड लिहीणार्‍या स्त्री सदस्यावर १५ दिवसांची बंदी घालण्यात येत आहे.

अश्या प्रकारचे लेखन हे प्रतिक्रियात्मक आहे असे प्रथमदर्शनी लक्षात येते. त्यामुळे सदर प्रकारात आणि माहिती घेतली असता अन्य स्त्री सदस्याने खोडी काढल्याचे लक्षात येते. असे प्रकार अन्य सदस्यांनी करू नये यासाठी त्या सदस्यावर सुध्दा ८ दिवसांची बंदी घालण्यात येत आहे.

खरडवही व खरडफळ्याच्या लेखावर झालेल्या घाण प्रकाराचे समर्थन करण्यासाठी अन्य एका सदस्यावर ८ दिवसांची बंदी घालण्यात येत आहे.

अन्य कुणा सदस्याला सदर प्रकारात काही चर्चा करायची असल्यास कृपया मला व्य.नि. करावा. जाहीर धागे काढू नयेत.

येथेच एक अन्य महत्वाची सुचना - यापुढे संपादकीय व व्यवस्थापकीय धाग्यांवर चेष्टा किंवा अवांतर कारवाईस पात्र असेल.

- नीलकांत

प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे's picture

7 Oct 2011 - 1:06 pm | चेतन सुभाष गुगळे

अशा प्रकारच्या शिस्तभंग कारवाईचे स्वागतच आहे. अर्थात अशा प्रकारे एका सदस्याकडून दुसर्‍या सदस्याला दुखविण्याचे अनेक प्रकार यापुर्वीही धाग्यांमधून व प्रतिक्रियांमधून घडले आहेत व असे धागे / प्रतिक्रिया अजुनही या संकेतस्थळावर दिमाखाने वावरत आहेत. अशा धाग्यांच्या / प्रतिक्रियांच्या links इथेच post केल्या तर आपण त्यांचेवरही कारवाई करणार का?

अर्थात व्यक्तिगत संदेश पाठविण्याची आपली सूचनाही मला मान्य आहेच. परंतू अशा प्रकारे आपणांस सूचना पाठविली असता आपण त्यावरील खोडसाळ प्रतिक्रिया काढून टाकण्याऐवजी सदर धागाच वाचनमात्र करून टाकलात आणि प्रतिक्रिया अजुनही तशाच आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2011 - 1:14 pm | अप्पा जोगळेकर

नविनच प्रकार कळत आहे.

शाहिर's picture

7 Oct 2011 - 2:10 pm | शाहिर

अशेच कडक धोरण राहिल्यास मि पा वर चांगल्या लेखांना सुगीचे दिवस येतिल

धन्यवाद मालक आभारी आहोत आणी +१०० टु शाहिर

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2011 - 12:23 am | मुक्तसुनीत

.

आत्मशून्य's picture

7 Oct 2011 - 6:06 pm | आत्मशून्य

खरोखर मस्त, खोडी काढण्याचे साहस जास्त शिक्षेस पात्र ठरले असते तर दूधात साखर....

तसच स्त्री अथवा पूरूष सदस्यांना लाजीरवाणे लेखन कुणी करेल तर ते कुठल्याही सबबीखाली वैध मानता येणार नाही. अशी दूरूस्ती केली तर विधान जास्त संयत वाटेल.

निर्णयाचे मनापासून स्वागत.

आण्णा चिंबोरी's picture

7 Oct 2011 - 6:17 pm | आण्णा चिंबोरी

आपली श्रद्धास्थाने वारंवार जाहीर करत राहिल्यास त्यांची टिंगळटवाळी सहन करण्याची सहनशक्ती असणे आवश्यक आहे. मात्र ज्या स्वरुपाची प्रतिक्रियात्मक खरड टाकली गेली ती निःसंशय निषेधार्ह आहे.

स्वागतार्ह कारवाई केल्याबद्दल धन्यवाद.

एकदा सर्व मामला शांत झाल्यावर पॅरोडी स्वरूपाचे लेखन मिपावर चालावे की नाही याबाबत वेगळी चर्चा करता येईल. मात्र तूर्तास एवढे पुरे.

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2011 - 12:23 am | मुक्तसुनीत

.

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2011 - 10:30 pm | राजेश घासकडवी

झाल्या प्रकाराच्या निषेधार्थ मी आत्मशुद्धी व संस्थळशुद्धीसाठी पुढचे आठ दिवस मिसळपाववर मौन पाळायचे ठरवले आहे. इतरांनाही या मौनात सहभागी होण्याची विनंती करतो.

:O :-O :shock: जरा ते विस्ताराने सांगा गुरूजी.

कारण पटल्यास मी सुध्दा या Eमौनात सक्रीय सहभागी होईन.

ऋषिकेश's picture

8 Oct 2011 - 9:14 am | ऋषिकेश

वाचनमात्र रहायचे ठरवले होतेच. तसा होतोही. आत केवळ या मौनाला पाठींबा देण्यासाठी हा प्रतिसाद देत आहे. पुढील ८ दिवसांमधे माझ्याकडून हा शेवटचा प्रतिसाद असेल.

मी मौनात सहभागी आहे...... तुम्ही?

आत्मशुद्धी व संस्थळशुद्धीसाठी आपण मौन जेव्हडे दिवस ठरवले आहे त्यापेक्षाही बरेच जास्त दिवस पाळावे अशी विनंती करतो.... तरच आपली उदिश्टे साध्य होऊ शकतील असे वाटते.

- देल्हिबेलीशून्य

चित्तरंजन भट's picture

8 Oct 2011 - 3:49 am | चित्तरंजन भट

ह्याबाबत मौन राहणे योग्य ठरणार नाही.प्रियाली आणि अदिती ह्यांच्याबाबत , केलेली अथवा न केलेली खोडी/खोड्या लक्षात घेऊन देखील, केलेल्या टिप्पण्या असमर्थनीय आणि अतिशय अश्लाघ्य आहेत.अदिती ह्यांच्यावर केलेली कारवाई पटत नाही.

मिसळपावला शुभेच्छा. सगळ्यांना सद्बुद्धी मिळो. सगळ्यांचे भले होवो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2011 - 6:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ह्याबाबत मौन राहणे योग्य ठरणार नाही.
हाहाहा. सहमत आहे. मिपा सदस्यांनी बोलले पाहिजे. दोन तीन वर्षात कधी प्रतिसादात-लेखनात मिपा सदस्य बोलले नाही तरी चालतील पण, ऐन मोक्याच्या प्रसंगी कोण चूक कोण बरोबर यासाठी तरी सन्माननीय सदस्य बोलले पाहिजेत. च्यायला, लैच कमाल आहे. (डोळे पाणावले) :)

>>>> सगळ्यांना सद्बुद्धी मिळो. सगळ्यांचे भले होवो.
सहमत आहे. परमेश्वर सर्वांना सुबुद्धी देवो.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

8 Oct 2011 - 7:09 am | चतुरंग

अहो असं नसतं करायचं, तुम्ही बॉ फारच डायरेक्ट बोलता!
अशा मोक्याच्या प्रसंगीच शहाणे लोक बोलतात, एरवी आहेतच की आमच्यासारखे फुटकळ.

दिले नसतील धाग्यांना अम्ही प्रतिसाद सोनेरी
मिपा येता तिथे सल्ले फुकटचे वाटतो आम्ही

-रंगा

सुहास..'s picture

8 Oct 2011 - 11:40 am | सुहास..

लेल्या टिप्पण्या असमर्थनीय आणि अतिशय अश्लाघ्य आहेत >>>

माझ्या मते भाषा सौम्य वापरल्याने ' मतितार्थ ' बदलत नाही , एखाद्या व्यक्तीला
" मेक-अप' वाल्या बायका जास्त कमवितात' वगैरै म्हटल्याने आणि एखाद्या व्यक्तीची डुकरांशी तुलना केल्याने मतितार्थ तोच रहातो ...मग चुक खोडी काढणार्‍याची नाही असे म्हणणार्‍यांच्या तीव्र निषेध...

असो ...आज बड्डे आहे रंजनदा, जरा यन्जॉय करा, कुठे ह्या फंदात उगाच ;)

अवांतर : वाढदिवसाच्या शुभेच्छा

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2011 - 9:26 am | llपुण्याचे पेशवेll

अदिती यांच्यावर कारवाई झाली का? बरं बरं. अजून कवडीबुवा सुटे आहेत ? अजून छान.
सदर आक्षेपार्ह लेखन वाचावयास कोठे मिळेल? म्हणजे एक प्रामाणिक मत नोंदवता येईल. नाहीतर तसेही दिग्गजांप्रमाणे आम्हीही म्हणू शकतोच ना! अमक्याढमक्यावर झालेली कारवाई योग्य आहे किंवा योग्य नाही. असो.

सिद्धार्थ ४'s picture

8 Oct 2011 - 9:56 am | सिद्धार्थ ४

u know I somehow lost interest interest in mi. paa. इतके चांगले संस्थळ पण सगळी वाट लागली.

नितिन थत्ते's picture

8 Oct 2011 - 10:42 am | नितिन थत्ते

माझा 'एक प्रतिसाद' या सगळ्याला कारणीभूत ठरला त्याबद्दल दु:ख होत आहे. :(

मी ही काही काळ संन्यस्त रहायला हवे.