तंदूरी तंगडी / विंग्स

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
26 Sep 2011 - 8:29 pm

रामराम मंडळी,

परवा मित्राकडे गेलो होतो. शनिवारी क्रिकेट खेळून आणी दंगा घालून झाल्यावर रविवारी चिकन बनवायचं ठरवलं. मी तंदूर तर मित्र रस्सा बनवणार. हे आपलं ब्याचलरी (अनिवासी) घरात असणारं साहित्य घेऊन बनवलं आहे बरंका. :)

नुसतं तंदूर खाणार असाल तर हे खालचं साहित्य एका माणसासाठी....रस्स्यासोबत तोंडी लावायला घेणार असाल तर दोघांसाठी ;)

साहित्य :
१. ७-८ चिकन ड्रमस्टीक्स/विंग्स
२. २ चमचे मीठ
३. १-२ चमचे तिखट
४. १ चमचा काळीमिरी पूड
५. १-२ चमचे तंदूर मसाला/चिकन मसाला
६. २ चमचे आलं-लसूण पेस्ट
७. ४ चमचे दही
८. १ चमचा बटर/लोणी/तूप

कृती:
१. चिकन धुऊन , तसेच स्कीन नको असल्यास स्कीन काढून घ्या.
२. एका भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट्,तंदूर मसाला, काळीमिरी पूड,मीठ, तिखट एकत्र करून घ्या.
३. ह्यात चिकन घोसळून मॅरिनेट करा.
४. भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मधे ठेवा.
५. दुसर्‍या दिवशी दुपारी तंदूर करायच्या आधी अर्धा तास आधी फ्रीज बाहेर काढून चिकन रूम टेंपरेचरला आणा.
६. ओव्हन मधे अ‍ॅल्युमिनियम चा पत्रा (फॉईल) पसरून घ्या.
७. ओव्हन ४०० F/२००C प्रिहीट करून घ्या.
८. फॉईल वर चिकन पसरून ३० मिनीटे बेक करा.
९. ३० मि. नंतर चिकन वर बटर लाऊन १० मिनीटे बेक करा.
१०. १० मि. नंतर चिकन पलटून दुसरी बाजू १५ मिनीटे बेक करा.

तयार आहे चिकन तंदूरी...

प्रतिक्रिया

फोटुतल चिकन एकदम टेंप्टिंग आहे रे.
आख्खी डिश पळवावीशी वाटतेय. :)

Mrunalini's picture

26 Sep 2011 - 9:11 pm | Mrunalini

तोंपासु.. :)

पैसा's picture

26 Sep 2011 - 9:12 pm | पैसा

पण खाता येणार नाय! :( कारण आम्ही 'गवत आणि पाला' खातो.

(रेवती ऐक: प्रभोसाठी वधूसंशोधन जोरात सुरू करायला पाहिजे आता!)

निवेदिता-ताई's picture

26 Sep 2011 - 9:13 pm | निवेदिता-ताई

का??????????

पैसा's picture

26 Sep 2011 - 9:15 pm | पैसा

कोंबड्या खाणारे आम्हाला म्हणतात.

प्रभो खातय शिव्या....असे छान फोटू दिल्याबद्दल!;)
पैसाताई मी कध्धीची म्हणतिये त्याला........माझ्या वधू वर संशोधन केंद्रात नाव नोंदव म्हणून!
त्याच्या अटी बर्‍याच आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.;)

>>> ४. भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मधे ठेवा.

प्रभो, रात्रभर क्रिकेट खेळत होता की काय... :D

बाकी तंदूरी तंगडी झकास..

- (व्हेगन) पिंगू

राजेश घासकडवी's picture

26 Sep 2011 - 10:03 pm | राजेश घासकडवी

वा वा. आता तुमच्याकडे यायलाच हवं.

मेघवेडा's picture

26 Sep 2011 - 10:06 pm | मेघवेडा

ही पाकृ चिकन न घालता कशी करता येईल द्येवानुं?

रमताराम's picture

26 Sep 2011 - 10:47 pm | रमताराम

छान प्रश्न विचारलास. चिकन ऐवजी 'डॉग्मॅटिक्स*' च्या आवडीचे वाईल्ड बोऽर् (boar) ची तंगडी वापरली तरी हा पदार्थ चांगला होतो बर्का. चिकनच हवे असे नाही. मुख्य म्हणजे दोघांऐवजी चार जणाना ताव मारता येईल. (त्या चारात एक तू असशील तर तीन जणांना अशी दुरुस्ती वाचावी.)

(*डॉग्मॅटिक्स कोण हो? असा प्रश्न विचारणार्‍यांना (परंपरेनुसार प्रथम फाट्यावर मारून मग) सास-बहूच्या मालिका वा अर्धनग्न हिरोंचे चित्रपट न पाहता जरा कार्टून्स वगैरे सुसंस्कृत करमणुकीकडे वळावे असा आगाऊ (दोन्ही अर्थाने) सल्ला देण्यात येतो आहे.

रमताराम's picture

26 Sep 2011 - 10:44 pm | रमताराम

प्रभ्या लेका तू पण नळी फोडणार्‍यापैकी आहेस? शिव शिव.
(बाकी चिकण आपला वुईक प्वाईंट असल्याने फुडल्या येळेला पेश्शल आमच्या हातचे चिकण खायला घालण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. ही कॉम्प्लिमेंट आहे की शिक्षा असा प्रश्न विचारशील तर प्रसिद्ध 'ज्याची त्याची समज...' हे उत्तर मिळेल.

श्रावण मोडक's picture

27 Sep 2011 - 7:58 pm | श्रावण मोडक

बाकी चिकण आपला वुईक प्वाईंट असल्याने फुडल्या येळेला पेश्शल आमच्या हातचे चिकण खायला घालण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

हं.

कॉकटेल लाउंज, तंदूरी तंगडी / विंग्स, ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन, मासे ३४) टोळ , शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स, जवसाची खमंग चटणी, ............................................................

एक नम्र विनंती- एकदा एकत्र सप्रात्यक्षीक रसस्वादाचा अनुभव द्या. म्हणजे सगळेजण पोट(भरल्यावर)भरून दुवा देतील. (ह्या विनंतीस अनेक जण अनुमोदन देतील ही खात्री आहे.):party:

:beer:

मराठमोळा's picture

27 Sep 2011 - 5:14 am | मराठमोळा

वा रे मेरे शेर..
:)

जरा कांदा, चटणी, उत्तेजक पेय यांची पण सोय करा.. ;)

क्रेमर's picture

27 Sep 2011 - 5:34 am | क्रेमर

करण्याचे ठरवले आहे. पहिल्यांदा अनेकदा केलेले असूनही केवळ चित्र पाहून इच्छा होत आहे. पोष्टाने आलेले जंक पसरवून फोटो घेण्याचे काय कारण असावे बरे?

डिशच्या मधोमध असणारे दोन तुकडे माझे आधीच सांगून ठेवतो.मग मारामारी नको काय ?
बाकी मस्त बनवलेय हो.

जागु's picture

27 Sep 2011 - 1:09 pm | जागु

भन्नाट.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2011 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

गवताळ असल्याने फक्त फटू बघितल्या गेले.

बरे आले आहेत.

श्रावण मोडक's picture

27 Sep 2011 - 11:14 pm | श्रावण मोडक

मेल्या, तू इथं कसा? इतकी घाई करू नये. तुझा प्रतिसाद सगळ्यात खाली हवा होता. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

अनिवासींना धाग्याच्या खफ करायच्या आत प्रतिसाद द्यावा असा विचार केला मी ;)

मेल्या घरी येणार होतास ना रे, प्रभो!!
आता येच रे.. हे चिकन तुला करावं लागेल.
अथर्व ला दाखवला हा फोटो मी, तर म्हणतो 'प्रतिक मामाला करायला सांगेन मी." आता बोल!

रेवती's picture

27 Sep 2011 - 7:53 pm | रेवती

अगं तो पुढच्या रयवारी माझ्याकडे येणार म्हणालाय.
आधीही त्याने येतो म्हणून टांग मारली होती.
आता कारणं पुढे करेल आणि न आल्याचं समर्थन करेल.

पैसा's picture

27 Sep 2011 - 7:55 pm | पैसा

तुला मदत करायला येणार होता ना तो?

रेवती's picture

27 Sep 2011 - 7:58 pm | रेवती

अगं, कुठली आलिये मदत?
आता निदान नुसता तरी ये, भेटायला असे म्हटल्याबरोबर तिकिटाचे पैसे न मागता येतोय.
खरा प्रकट होइल तेंव्हा आला असं म्हणायचं.
तोपर्यंत नुसत्याच बाता!

पैसा's picture

27 Sep 2011 - 8:00 pm | पैसा

म्हणजे तुझा हात बरा झाला तर! नसला तर प्रभोकडून निदान लाडू तरी करून घे.

वाट बघ पैसाताई!
त्याची मदत दुसर्‍याप्रकारची असते.;)
काहीही लुडबूड न करता!
प्राजुकडे प्रभो आणि लंबूटांग घरात फूट्बॉल खेळत होते.
मला विचार ना!

प्रभो's picture

27 Sep 2011 - 8:01 pm | प्रभो

लिस्ट तयार करतोय मी.... काय काय बनवायला लावणारे तूला त्याची .. ;)

रेवती's picture

27 Sep 2011 - 8:04 pm | रेवती

वेळेत सांग म्हणजे झालं.

आणखी एक लिस्ट कर.
इथे आल्यावर काय काय तू करणार आहेस त्याचीही. :)

हॅहॅहॅ....मी माझ्या भाच्याला देईन चिकन बनवून... ;)

जाई.'s picture

27 Sep 2011 - 7:38 pm | जाई.

मस्तच तोँपासु

jaypal's picture

27 Sep 2011 - 8:30 pm | jaypal

उमेद्वारी जाहीर केलीस की काय? नेट प्रेक्टीस जोरात चालु आहे ती.
चिकन एकदम टेंप्टिंग आहे हे मात्र खर

प्रभो's picture

27 Sep 2011 - 10:59 pm | प्रभो

धन्यवाद मंडळी...

>>बाकी चिकण आपला वुईक प्वाईंट असल्याने फुडल्या येळेला पेश्शल आमच्या हातचे चिकण खायला घालण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
धन्यवाद... पण या वयात ही सगळी धावपळ सोसेल का? ;)

>>पोष्टाने आलेले जंक पसरवून फोटो घेण्याचे काय कारण असावे बरे?
टेरेस वर खात असल्याने खाली उष्टे सांडल्यास कष्ट कमी व्हावेत म्हणून. :)

चित्रा's picture

27 Sep 2011 - 11:03 pm | चित्रा

प्रभोला एक मुलगी शोधून द्यारे कोणीतरी (त्याने आधीच शोधली नसल्यास).

रेवती's picture

28 Sep 2011 - 12:28 am | रेवती

दिली असती मी.......पण याच्या अटीच फार!

चित्रा's picture

28 Sep 2011 - 3:08 am | चित्रा

कसल्या गं अटी? कळू तरी देत.

रेवती's picture

28 Sep 2011 - 3:30 am | रेवती

तसं मी कुण्णाला सांगणार नव्हते पण आता तू इतका आग्रह करतियेस तर सांगते.;)
१)त्याला आयटीवाली मुलगीच बायको म्हणून हवी आहे.
२)लग्नानंतर तो जॉब करणार नाही. घर सांभाळणार.
३)लग्नानंतर तो शाकाहारी, अल्पोपहारावर राहणार असल्याने बायकोनेही तसेच रहावे म्हणजे जास्त स्वयंपाक करावा लागणार नाही.
४)दाखवण्याच्या/बघण्याच्या कार्यक्रमाला मुला चालून दाखव, गाणं म्हण असले प्रकार चालणार नाहीत. पुरुषमुक्ती संघटनेचा आजिवन कार्यकर्ता आहे ना तो!
५)एकतारी पाक, दोन तारी, पक्का पाक शिकल्याशिवाय लग्नाला उभा राहणार नाही.
६) सुधांशु, स्पा यांना करता येणार्‍या पदार्थांशी तुलना केलेली चालणार नाही.
अजूनही अटी आहेत पण त्या नंतर सांगीन.

काय जीवावर उठल्यात ह्या काकवा!! मरतंय प्रभ्या लवकरच.. ;-)

बाकी चिकन भारी रे.. ते काकवांपासून सुटका हवी असेल तर ये तडक इकडं वेस्ट कोस्टावर. ;-)

ही प्रभोबद्दल वाटणारी काळजी म्हणावी की आपणही उपवधू झाल्याची घोषणा?;)

चित्रा's picture

28 Sep 2011 - 6:25 am | चित्रा

बरोबर. वरील वाक्य 'ओ काकू, मी पण, मी पण!' असेही वाचता येईल.

प्रभो- वेस्ट कोस्टाला गेलास तर दुसर्‍या काकवा मागे लागतील. त्यापेक्षा पहिल्याच बर्‍या म्हणण्याची वेळ येईल. म्हणून निळेंचा सल्ला जरा बेतानेच घे.

@ रेवती - अरेच्चा. प्रभोला अशी मुलगी बहुदा पसंत व्हावी. काळीसावळीच आहे, पण स्मार्ट आणि कर्तबगार आहे. शिवाय अलिकडे सिंगल आहे असे ऐकते आहे.

अलिकडे सिंगल आहे असे ऐकते आहे

अलिकडे? अग्ग्ग्ग्ग्ग्ग!
बघा ब्वॉ! मला चालेल अशी नातसून.
हिला निदान कॉर्पोरेट की कुठल्याश्या शिनेमात काम केल्याचा अनुभव आहे.
पण मिपावरील जॉनच्या फ्यान बघता हिचे कसे होणार?
जुन्या आठवणी येत रहाणार की काय अशी एक आपली शंका!;)
कोंबडीच्या तंगडीच्या धाग्यावर अवांतर चर्चा चाललिये की काय असे वाटून घेवू नये.
प्रभोचे पाय ओढणंच चालू आहे.;)

Nile's picture

28 Sep 2011 - 9:35 am | Nile

संभाव्य नवर्‍यामुलापेक्षा (म्हणजे अर्थातच प्रभ्या!) त्याच्या काकवांनाच जास्त घाई अन हौस दिसतीए! चांगलं आहे, पण घाईत घोटाळे करू नका हो! नाही, तुमच्याच वयाची सून* गप्पा टप्पा करायला मिळाली तर तुम्हाला आवडेल हे माहित आहे, पण प्रभ्याला ती म्हातारी नाय होणार? जरा त्याचा विचार पण करा!! ;-)

आणि हो, एकवेळ प्रभ्याचा बळी दिला तरी चालेल पण आमच्यावर दया करा! :P

(* सर्व काकवांना मी बिपाशा बासू इतक्या तरण्या असे म्हणालो आहे याची नोंद घेणे. इतर वाक्यांचा विपर्यास करू नये! ;-) )

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 11:41 am | श्रावण मोडक

प्रभ्या नायल्यापासून सावध रे.
"तुमच्याच वयाची सून* गप्पा टप्पा करायला मिळाली तर तुम्हाला आवडेल हे माहित आहे. पण प्रभ्याला ती म्हातारी नाय होणार?" हे वाक्य "* सर्व काकवांना मी बिपाशा बासू इतक्या तरण्या असे म्हणालो आहे याची नोंद घेणे" या स्पष्टीकरणासोबत वाच. 'म्हातारी' आणि 'तरण्या' या शब्दांवर अशी कसरत मुरलेली आणि स्वहितप्रधान मंडळीच करू शकतात. तो तुलाही चुचकारतोय (बियर वगैरेची सोय) आणि त्या काकवांनाही (नंतरच्या चिकनची सोय) खुश ठेवतोय. ;)

प्रभो's picture

28 Sep 2011 - 8:21 pm | प्रभो

मग काय तर, तेज्यायचं (का तेज्याकाकवांचं ;) ) सर्वद्वेष्टं निळं..

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 11:32 am | श्रावण मोडक

प्रभोला अशी मुलगी बहुदा पसंत व्हावी. काळीसावळीच आहे, पण स्मार्ट आणि कर्तबगार आहे. शिवाय अलिकडे सिंगल आहे असे ऐकते आहे.

अलिकडे सिंगल आहे हे ठीक. पलिकडे? ;)

चित्रा's picture

28 Sep 2011 - 6:41 pm | चित्रा

माहिती काढू पलिकडली. नीट माहिती काढल्याशिवाय लग्न नाही करून द्यायचं.

बाकी निळेला इस्ट कोस्टाच्या काकवांच्या वयाची का उठाठेव? जब मियां बिवी राजी तो क्या करेगा काजी.

सानिकास्वप्निल's picture

27 Sep 2011 - 11:08 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं :)
आत्ताच चिकनची तंगडी उचलून खावीशी वाटत आहे :)

सोना-शार्वील's picture

28 Sep 2011 - 9:58 am | सोना-शार्वील

झकास! पण नवरात्र चालु झाले ना, दसरा झाल्यावर नककी करेन.

ते त्या चिकन ला जरा सुरी ने चिरा दिल्या असत्या तर मॅरिनेट कमी वेळात आणि अजून जास्त चांगले मुरेल असे वाटते.

काहीसे असे

बाकी पाकॄ मस्त!

फोटो जालावरून साभार!

रेवती's picture

28 Sep 2011 - 7:23 pm | रेवती

तुमचं बरोबर आहे तै!
आमचं पोरगं जरा नवीन आणि लहान आहे अजून्.........तेवढं सांभाळून घ्या!;)
पुढच्यावेळी तो सुरीने चिरा देईल्........चिकनला..........देशील ना रे प्रभो?
असंच वागत राहिलास तर माहेरी काही शिकवलय की नाही असं वाटायचं!

झाली का रे हाफ शेंचुरी? ;)

विसोबा खेचर's picture

4 Oct 2011 - 3:16 pm | विसोबा खेचर

छान..!