गाभा:
अमावास्या , नारळ आणि मनोविकार
अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?
तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे. ती कशासाठी?
अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?
अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?
( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 9:56 pm | निवेदिता-ताई
.
26 Sep 2011 - 10:02 pm | JAGOMOHANPYARE
जिवंत व्यक्तीनी त्यांच्याशी संबंधित मृत व्यक्तींचे योग्य ते विधी करावेत यासाठी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत.
26 Sep 2011 - 10:13 pm | प्रियाली
अमावास्या आणि पौर्णिमेसंबंधी सर्व प्रश्न कृपया युयुत्सुंना विचारावे. त्यांची या विषयात मास्टरी आहे.
26 Sep 2011 - 10:56 pm | Nile
पाचशे रुपड्यांत ते सेवा पुरवतात ना, मग कशाला उगाच त्यांना इथे कॉलिंग? जामोप्यांनी युयुत्सुंना संपर्क परस्पर करणे आणी हो एखाद्या डोस्क्याच्या डागदरालाही दाखवून घेणे. आजकाल कधी कोणाला काय झपाटेल सांगता येत नाही हो!
26 Sep 2011 - 11:58 pm | आत्मशून्य
:)
27 Sep 2011 - 12:04 am | आत्मशून्य
त्याचा पण उल्लेख धाग्यात कराकी राव.... रेव(RADICAL AUDIO VISUAL EXPERIENCE) पार्टी म्हनून तर पोर्नीमेच्या रात्री घन्या जंगलात केली जाते....
27 Sep 2011 - 11:07 am | नरेश_
>>>अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?
आम्ही दररोजच फोडतो,त्यात अमावास्याही आलीच. धार्मिक कारण नसावे.
>>>>तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.
भ्रामक समजूत. तसे असते तर सरकारला लष्करावर इतका खर्च करायची पाळी आलीच नसती ;)
>>>>>अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का?
आम्ही करतो. गेल्याच वर्षी नवी चारचाकी अगदी अवसेच्या सुमुहूर्तावर आणली :)
आणि हो.. दिवाळीत लक्ष्मीपूजनही आम्ही शक्यतो अमावास्येच्या दिवशी करतो ;)
>>>>>> काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात.
यामागे सर्व दिवस शुभ असतात अशी धारणा असावी.
>>>>>>>अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खर का?
संबंधित लोक सांगतीलच ;) ;) ;)
27 Sep 2011 - 6:34 pm | तिमा
अमावास्येला लग्न करायचे असल्यास मुंडावळीं ऐवजी डोक्याला लिंबु - मिरचीच बांधावे.' वधु' नामक हडळ व 'वर' नामक मुंजापासून आयुष्यभर संरक्षण होते म्हणे.