दृष्ट कशी काढावी?
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )
संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.
दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.
दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का?
प्रतिक्रिया
23 Sep 2011 - 4:02 pm | शाहिर
दृष्ट काढण्याचा स्मायली तयार करावा , जेणेकरुन ऑन लाइन दृष्ट काढता येइल
23 Sep 2011 - 4:07 pm | गवि
दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का?
हेही ठीक.. म्हणजे रास्त शंका आहेत..
पण
यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय?
हे काय आहे?
23 Sep 2011 - 4:12 pm | स्पा
हे काय आहे?
अहो गवि, नवीन आहे काय तुम्हास हे..
आता इथे अशा वाक्याने वादावादी सुरु करून द्यायची,,,
म्हणजे मिपाकर भांडत बसतील, आणि जा मो प्या .. परत गायब...
23 Sep 2011 - 4:15 pm | अमोल केळकर
ह्म्म छान विषय
आमच्या पंतानी याविषयी इथे खुप चांगले लिहिले आहे
गरजुंनी अवश्य लाभ घ्यावा
अमोल केळकर
23 Sep 2011 - 4:16 pm | JAGOMOHANPYARE
यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय?
हे काय आहे?
अशा गोष्टीना दोन बाजू असतात.. दोन्ही समोर येतील तर बरे म्हणून लिहिले आहे. नंतर बुप्रावाले अंनिसवाले यानी असं म्हणायला नको की आम्हाला आमंत्रण नव्हते म्हणून .. :)
23 Sep 2011 - 4:25 pm | पिलीयन रायडर
http://dhondopant.blogspot.com/2011/08/blog-post_11.html
धोंडोपंतांचा हा लेख वाचा....
23 Sep 2011 - 4:29 pm | JAGOMOHANPYARE
तो लेख वाचला. छान आहे.
23 Sep 2011 - 5:44 pm | विजुभाऊ
Submitted by पिलीयन रायडर on Fri, 23/09/2011 - 16:25.
http://dhondopant.blogspot.com/2011/08/blog-post_11.html
धोंडोपंतांचा हा लेख वाचा....
==)) =)) =)) =)) =))
एका अत्यंत फालतु गोष्टीवर तितकाच फालतु लेख.
मुळात दृष्ट लागणे हाच प्रकार इतका भोंगळ आणि ओंगळ आहे .
आणि दृष्ट काढणे ही त्यावर आधारीत अंधश्रद्ध अगतिकता आहे.
मुम्बैत लोकल मध्ये बंगाली बाबाच्या झैराती दिसतात. त्यात " किसीने कुछ खिलायापिलाया जो " वगैरे वगैरे विनोदी प्रकार वाचायला मिळतो. मीठ मोहरी ने दृष्ट काढणे हा त्यातलाच प्रकार.
त्याचे पुढचे प्रकार म्हणजे दही भात गुलाल ओवाळून टाकणे वगैरे.
लिंबू फेकून मारणे . लिंबू उतरून टाकणे हे सुद्धा त्यातलेच.
23 Sep 2011 - 4:33 pm | ५० फक्त
हल्लीच मिपाच्या सर्वरला नजरसुरक्षाकवच बांधले आहे असे ऐकण्यात आले आहे, खरे खोटे माहित नाही.
23 Sep 2011 - 4:54 pm | शाहिर
खंग्री प्रतिक्रिया
23 Sep 2011 - 4:59 pm | पुष्करिणी
>> स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का?
हा पर्याय कधी डोक्यात आला नव्हता ...:)
23 Sep 2011 - 7:15 pm | प्रियाली
दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल.
23 Sep 2011 - 7:38 pm | मन१
>> दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल.
म्हणजे आपण ज्यास सांगतो आहोत त्याला डोके आहे हे पहिले गृहितक.
दृष्त लागणे व काढता येणे ह्यापैकी दोन्ही गोष्टी एकाच वेळी काढून टाकता येतील हे दुसरे गृहितक.
समजा नेमके "दृष्ट लागते" हे एवढेच डोक्यात राहिले पण "दृष्ट काढता येते" हे डोक्यातून काढून टाकले तर???
पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल
म्हणजे सध्या त्यांच्या पुढे अडचणी आहेत, मनात भीती आहे हे अजून एक गृहितक.
सध्यातरी त्यांनी केवळ एक प्रश्न विचारला आहे, तो भीतीपोटी विचारला आहे, की औत्सुक्यापोटी हे आपण कसे सांगणार?
23 Sep 2011 - 7:48 pm | प्रियाली
हेहेहे! नो कमेन्ट्स. ;)
केवळ औत्सुक्य असते तर दृष्ट कशी काढावी असा प्रश्न न येता! वाक्यरचना वेगळी असती पण असो माझा गैरसमज असेल आणि त्यांना औत्सुक्य असेल तर माझ्या विधानाला फारसा अर्थ उरत नाही.
23 Sep 2011 - 7:59 pm | जाई.
+१
प्रियालीताईशी सहमत
23 Sep 2011 - 10:08 pm | राजेश घासकडवी
प्रियालीताईंकडून अशी विज्ञानवादी प्रतिक्रिया आलेली पाहून आश्चर्य वाटलं. देवाचे अवतार ही खरोखरच खरी गोष्ट आहे की नाही यापलिकडे जाऊनही अवतार ही संकल्पना काय आहे, लोकांचे त्याबाबत विश्वास काय आहेत याचा अभ्यास करता येतो. तसंच दृष्ट लागण्याच्या बाबतीतही ती काढण्याची पद्धत काय, लोकांचे त्याबाबतीतले समज काय, त्या प्रथेत समाजानुसार फरक काय आहेत, साम्यं काय आहेत याचा अभ्यास करता येतो.
23 Sep 2011 - 10:14 pm | प्रियाली
त्यांना अभ्यास करायचा असेल तर माझं म्हणणं काहीच नाही. मीही आनंदाने अभ्यास वाचेन पण लेख वाचून माझा असा समज झाला की ते उपाय शोधताहेत. औत्सुक्य नाही पण माझा गैरसमज असेल तर मी विधान मागे घेते. :)
लोकांनी अवश्य समजूतींवर अभ्यास करावा.
25 Sep 2011 - 2:18 pm | नंदन
"...विशेषी लोकी इयें । दृष्टादृष्टविजये । होआवे जी ॥"
ह्या ओळींचा अर्थ आज समजल्यासारखा वाटला ब्वॉ आज ;)
25 Sep 2011 - 3:21 pm | Nile
घासू गूर्जींशी पण सहमत.
"..इश्वर निष्ठांची मांदियाळी"
ह्या ओळींचा अर्थ समजतो आणि मग, "जो जे वांच्छिल.." ह्या ओळींना अनुसरून आम्हाला त्या मांदियाळीला आमच्या आवडत्या विशेषणांनी सन्मानित करता येते! ;-)
23 Sep 2011 - 7:23 pm | रेवती
दृष्ट लागणे वगैरे माझ्यातरी लक्षात रहात नाही.
त्यावर विश्वास वगैरे ठेवायचा की नाही हेही लक्षात रहात नाही.
पण दोन्ही आज्ज्या आल्या की येताजाता सगळ्यांची दृष्ट काढत असतात.
आम्ही काढून घेतो........त्यांना बरे वाटते.
बाळांची दृष्ट फुलांनी काढली जाते. टोणग्यांची दृष्ट मीठ मोहोरीने काढली जाते.
सगळ्या गोष्टीत हे असे का? तसे का? प्रश्न विचारणारी घरातली लहान मुले मजा वाटते म्हणून आज्जीकडून फू फू करून घेतात्........एकही प्रश्न न विचारता!;)
25 Sep 2011 - 10:42 am | नितिन थत्ते
>>टोणग्यांची दृष्ट मीठ मोहोरीने काढली जाते.
म्हैशींची दृष्ट कश्याने काढली जाते? की म्हयशींचीच दृष्ट लागत असावी?
(पळतो आता)
.
.
.
.
.
(भयभीत) नितिन थत्ते
25 Sep 2011 - 9:58 pm | रेवती
म्हशी काळ्या असल्याने त्यांना दृष्ट लागण्याचा संभव नाही.
25 Sep 2011 - 10:35 pm | शहराजाद
अहो पण टोणगे देखील म्हशींएवढेच काळे असतात की.
23 Sep 2011 - 8:05 pm | मराठे
हा धागा वाचता वाचताच मिपा गंडलं... मिपाची दृष्ट काढा रे कोणीतरी!!
23 Sep 2011 - 8:14 pm | यकु
मी असल्या गोष्टी मानत नाही.
पण नवे कपडे घातले की, अनोळखी व्यक्तीने टक लाऊन बघितले की मला हमखास त्या रात्री ताप येतो असे निरिक्षण आहे.
आजी होती तेव्हा आजी आणि नंतर कधी कधी आई दृष्ट काढत असे.
पण दृष्ट लागण्याचा प्रकार फार शिरेस मामला नसावा... सकाळी क्लिअर होते सगळे.
मी मागे उगाच सर्किट्पणा म्हणून एक भगवी शाल अंगावर घालत असे.. भडक रंगामुळे लोकांचे *अवधान * त्या कपड्याकडे खेचले जाई आणि नजरा नजर झाली की प्रत्येकवेळी स्वतःचेच किंचीत भान येत असे... या गोष्टीचा ध्यानात फायदा झाला...
संन्याशांनी भगवे कपडे का घालावेत याचे खरे कारणही उमजले.
पण यामुळे ताप येत नसे.
24 Sep 2011 - 7:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पण नवे कपडे घातले की, अनोळखी व्यक्तीने टक लाऊन बघितले की मला हमखास त्या रात्री ताप येतो असे निरिक्षण आहे
एक शंका :- काही मुलींकडे अनेक जण रोज टक लावून बघतात. त्यांना रोज ताप येत असेल का ?
उपशंका :- म्हणूनच अशा मुलींना (काही जण) हॉट म्हणतात का ?
24 Sep 2011 - 10:59 pm | यकु
इथे आसपास असतील तर हे मुलींनीच सांगावे .. :)
प्रश्न रोचक आहे. ;-)
23 Sep 2011 - 8:31 pm | शुचि
बरेच लोक चांगले काही सांगावयास धजावत नाही. माझी मैत्रिण घरातईल चांगल्या गोष्टी सांगत नसे आणि मी सांगत असे तेव्हा मला सल्ला देत असे "ऐसा सब्को नही बताते नजर लगती है"
23 Sep 2011 - 10:26 pm | Nile
काकू बिघडल्या वाटतं परतं! ;-)
23 Sep 2011 - 10:55 pm | शुचि
हाहा ;)
24 Sep 2011 - 12:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं झालं प्रियालीचा यावर विश्वास नाहीये ते, ती चांगलं सांगते बिनदिक्कत. हे पहा.
24 Sep 2011 - 1:06 am | साती
माझा अर्धवट विश्वास आहे, म्हणजे दृष्ट लागण्यावर आहे पण काढण्यावर नाही. :)
24 Sep 2011 - 1:22 am | प्रियाली
माझा पाव विश्वास आहे, म्हणजे उचकी लागण्यावर आहे पण काढण्यावर नाही. ;)
24 Sep 2011 - 1:24 am | साती
आता एक अष्टमांश विश्वास आहे असं सांगणार्या/सांगणारणीची मीच दृष्ट काढेन.
24 Sep 2011 - 1:43 am | Nile
जामोप्यांच्या धाग्याला दोन 'षोडषांश' दृष्ट लावलेली दिसते!! ;-)
24 Sep 2011 - 1:51 am | साती
निळे भाऊंचं गणित कच्चं असून त्यांनी अपूर्णांकाना दृष्ट लावलीय असं निरीक्षण नोंदवते.
24 Sep 2011 - 2:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
निळ्या ना, मेला तसलाच आहे तो! अपूर्णांक म्हटल्यावर आलेच मी धावत धावत तर हा निळ्या दिसला मेला!!
(तीनाच्या अपूर्णांकातली) अदिती
24 Sep 2011 - 3:44 am | अनामिक
>>निळ्या दिसला मेला!!
म्हणजे निळ्याला दृष्ट लागल्या गेलीय असे निरिक्षण नोंदवतो!
24 Sep 2011 - 4:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग काढ बाहेर त्याला!
25 Sep 2011 - 10:39 pm | शहराजाद
माझाही अर्धवट विश्वास आहे, म्हणजे दृष्ट लागण्यावर नाही पण काढण्यावर आहे. :)
24 Sep 2011 - 9:04 am | शैलेन्द्र
दृष्ट हा प्रकार साधारण सेल्फ ऑब्सेस्ड लोकांना त्रास देतो असा अनुभव आहे.. कधी कधी एखद्या समारंभात आपण दिवसभर खुप एंजॉय करतो, खुप लोकांशी बोलतो, धावपळ करतो आणी त्याचा शारीरीक- मानसीक शिन संध्याकाळी जाणवतो. माणुस कोमेजुन जातो.. यालाच दॄष्ट लागणे असं म्हणतात.. जे मोठ्यांच्या बाबत होतं तेच लहान मुलांच्या बाबत.. थकले की ते कीर्कीर करतात, इतर काहीही स्पष्टीकरण नसल्याने दॄष्ट लागली म्हणुन लोकांवर खापर फोडल जातं
पण खर सांगायच तर मला आवडायच दॄष्ट काढुन घ्यायला.. त्या उपचारांपेक्षा त्यामागचे प्रेम फार सुखावुन जायचे, पण ती काढावी तर आज्ज्जीनेच..
त्यातही दोन तीन प्रकार होते..
१) मीठ मोहर्यांनी-- बंद मुठींत मीठ मोहर्या घेवुन आजी समोर उभी रहायची, देवाला निरांजन ओवाळाव तस हात माझ्यासमोर फिरवायची.. तोंडाने पुटपुटत ज्यांची दॄष्ट लागलीय असा तिला संशय आहे त्यांना मनोसोक्त शिव्या घालायची.. नंतर ते जिन्नस बाहेर नेवुन फुकुन द्यायची
२)चपलेले-- एखादी काळी जुनी चामडी चप्पल उलटी करायची, ती माझ्या तोंडासमोरुन ओवाळायची मनोसोक्त शिव्या देवुन झाल्या की तिच चप्पल कोपर्यात रागाने फेकुन द्यायची.. (बाहेर नाही.. परवडायच नाही)
३)काकडा-- जरा जास्तच दॄष्ट झालीय अस आज्जीला वाटल की हा जालीम उपाय केला जायचा, एक काळ कापड वळायंच, तेलात बुडवायच. भिजलं की चिमट्यात पकडुन पेटवुन द्यायच.. निरंजन ओवाळावी तस माझ्यासमोर ओवाळल जायच.. आज्जी शिव्या द्यायची अन मला त्या जळत्या काकड्यावर थुंकायला सांगायची, थूंकल की मस्त तड तड आवाज यायचा.. जितका आवाज जास्त तितकी जास्त दॄष्ट झालेली.. सगळं झाल की ती काकड्याची राख, पिंपळाखाली टाकुन द्यायची..
उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, दिवसभर हुंदडुन दमल्यावर, तिन्हीसांजेला हे सोपस्कार करुन घेण्यात जे सुख होत ते शब्दात नाही सांगता येणार. आता आज्जीही राहीली नाही, अन ते सुख भोगता येइल इतका मी निरागसही राहीलो नाही.
बाकी जगातल्या अर्ध्या लोकसंखेला, टेक्नीकली, दॄष्ट लागुच शकत नाही असं जानकारांच म्हणंन आहे..
24 Sep 2011 - 9:30 pm | सुधीर
दृष्ट काढण्यासाठी, लहानपणी आजी मीठ आणि मि-या ओवाळून विस्तवावर टाकताना "आल्यागेल्याची ....." असंकाही तरी म्हणायची.. कोणाला हे पूर्ण आठवतयं का?