"पेरेण्टस का इन-लॉज"

मी ऋचा's picture
मी ऋचा in काथ्याकूट
23 Sep 2011 - 1:52 pm
गाभा: 

कंपनीत आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक चांगली बातमी मिळाली. आत्तापर्यन्त आम्हाला ग्रूप मेडिक्लेम पॉलिसी मधे फक्त जोडीदार आणि मुले यांचाच अंतर्भाव करता यायचा मात्र त्यात आता पालकांचाही समावेश करता येईल. ही बातमी ऐकल्या ऐकल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे "पेरेण्टस का इन-लॉज".

माझे आई-वडिल आणि सासरे (सासूबाई नाहियेत) तिघेही स्वावलंबी आहेत. दोन्ही "पालक संचांना" समाविष्ट करता येणार नाहीए त्यामुळे आता मला या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत ना॑हिए.

म्हणून मी आपल्या सूज्ञ मिपाकरांना मदत मागावी असा विचार केला. आता तुम्ही सांगा मी कुणाला समाविष्ट करावे? पालक तर माझ्यासाठी दोघेही (तिघेही) आहेत पण टेक्निकली नाव तर एकाच संचाचं टाकता येईल? माझ्यावर अवलंबून असं दोघांपैकी कुणीही नाही! मला एक मोठा (वेल सेटल्ड, अविवाहित) भाऊ पण आहे. पण मला वाटतं त्या गोष्टीचा इथे काही संबन्ध नाही. भावाचा उल्लेख अशासाठी की ऑफिसमधे एकाशी ही गोष्ट शेअर केल्यावर त्याने मला " ह्म्म. आई वडिलांचा विचार करायला तुझा भाऊ आहे ना" असं मत दिलं.

पण मला ईथे नक्की समाधानकारक उत्तर मिळेल अशी खात्री आहे.

प्लीझ सांगा मी काय करू?

प्रतिक्रिया

ज्याना काही आजार आहे, बीपी, मधुमेह इ . त्याना पोलिसी द्या.

ज्याना इतर कुणी पॉलिसी दिलेली नाही, त्याना द्या.

सासर्‍यांना मधुमेह आहे तर आई कॅन्सर सर्व्हाईव्हर आहे.

नितिन थत्ते's picture

23 Sep 2011 - 2:09 pm | नितिन थत्ते

मला वाटते पेरेंट्सच असू शकतात.

इनलॉज हे तुमच्या स्पाऊसच्या कंपनीत पॉलिसी मिळत असेल तर कव्हर होतील.

daredevils99's picture

23 Sep 2011 - 2:26 pm | daredevils99

<< इनलॉज हे तुमच्या स्पाऊसच्या कंपनीत पॉलिसी मिळत असेल तर कव्हर होतील
११ पैकी ६ शब्द म्हणजे ५०% पेक्षा जास्त शब्द मराठी असल्यामुळे हे वाक्य मराठी आहे.

नितिन थत्ते's picture

23 Sep 2011 - 2:28 pm | नितिन थत्ते

माझ्या वरील प्रतिसादात इनलॉज आणि स्पाऊस हे दोनच शब्द इंग्रजी आहेत. :)

कंपनी, पॉलिसी आणि कव्हर हे इंग्रजी वाटणारे शब्द शुद्ध मराठी आहेत. ;)

daredevils99's picture

23 Sep 2011 - 2:34 pm | daredevils99

<< कंपनी, पॉलिसी आणि कव्हर हे इंग्रजी वाटणारे शब्द शुद्ध मराठी आहेत

गप्प बसायचे ठरवले आहे.

नावातकायआहे's picture

23 Sep 2011 - 2:46 pm | नावातकायआहे

<< इनलॉज हे तुमच्या स्पाऊसच्या कंपनीत पॉलिसी मिळत असेल तर कव्हर होतील
११ पैकी शब्द म्हणजे ५०% पेक्षा जास्त शब्द मराठी असल्यामुळे हे वाक्य मराठी आहे

आधी (बोट घालुन) मोजायला शिका.

daredevils99's picture

23 Sep 2011 - 2:56 pm | daredevils99

<< आधी (बोट घालुन) मोजायला शिका.

कृपया तुम्ही आधी बाराखडी शिका.

कारण मी मराठी शब्दांचा हिशेब दिला होता इंग्रजी नव्हे.

चिरोटा's picture

23 Sep 2011 - 2:43 pm | चिरोटा

भावाने दिलेले मत योग्य आहे.काही वर्षांनी समजा तुझ्यात आणि भावात कलह झाला तर तू "आई वडिलांची काळजी मी घेतलीय. तू काय केले आहेस?" असे भावाला विचारणार नाहीस ह्याची खात्री आहे?

ते मत भावाचे नाही माझ्या एक सहकार्‍याचे आहे. मी वरील प्रश्न कधीही विचारणार नाही याची मला खात्री आहे. कारण माझा भाऊ त्याचे कर्तव्य पूर्ण करण्यात कधीच जाणून बुजून कुचराई करणार नाही.

ऋषिकेश's picture

23 Sep 2011 - 3:00 pm | ऋषिकेश

एका संचासाठी हप्ता असेल तर माझ्यामते आई-वडीलांची घ्यावी. जास्त फायदा वाटतो.
कारण ते दोघे एकाच पॉलिसीत कव्हर होतील. दुर्दैवाने सासुबाई नसल्याने तितकाच हप्ता भरून फक्त एकट्या सासर्‍यांना कव्हरेज मिळेल.

आणि जास्त विचार करू नका (विचारतही बसु नका) नाहितर वर्ष संपेल पण पॉलिसी घेणे होणार नाही ;)

ह्म्म.. पॉईण्ट आहे आणि अजून एक आठवडा पण आहे उत्तर द्यायला ;)

उत्सुकता म्हणून.. तुमच्या कंपनीत, एखाद्या मुलाला (त्याचे आई-वडिल असले वा नसले) तरी सासू सासर्‍यांना कव्हर करायचा ऑप्शन आहे का..? :)
तुमचा हा निर्णय पूर्णत: व्यक्तिगत आहे, तुमचे त्यांच्या प्रति संबंध कसे आहेत त्यावर अवलंबून! त्यामुळे प्रत्येकाचे उत्तर वेगळे.. एकच बरोबर आणि दुसरे चूक असं म्हणण्याचा हट्ट चुकीचाच.. धन्यवाद!

सविता's picture

23 Sep 2011 - 4:03 pm | सविता

अय्या.. कुठली कंपनी.. रेझ्युमे पाठवु का?

आमच्या आणि मला माहित असलेल्या बहुसंख्य आयटी कंपन्यांनी मागच्या वर्षीपर्यंत असलेले पॅरेन्ट्स/ इन लॉज कव्हर काधून टाकले ...

एकतर कंपनी च्या मेडिक्लेम मधून केलेला क्लेम बहुसंख्य वेळेला मिळण्याची शक्यता जास्त असते शिवाय सगळे पुर्वीचे आजार कव्हर होतात, जे पन्नाशी पर्यंत खाजगी मेडिक्लेम न काढणार्‍या बहुसंख्य पॅरेन्ट्स/ इन लॉज साठी फारच उपयोगी पडते.

वरच्याच कारणाने क्लेम जास्त होतात म्हणून सर्व मेडिक्लेम कंपन्यांनी या वर्षी प्रिमियम भरमसाठ वाढवले ( साधारण तिपटी पेक्षा जास्त), आणि अर्थात मग कंपन्यांनी ही सुविधा काढून टाकली.

ज्या उरल्या सुरल्या कंपन्या या वर्षी हे कव्हर देत आहेत त्या पण पुढील वर्षीपासून ते बंद करण्याची दाट शक्यता आहे.

वरील माहिती मी एचआर शी या विषयावर भरपूर वाद घातल्यावर तसेच बाकीच्या कंपनी मध्ये माझ्या ओळखीत एचआर मध्ये असलेल्या स्त्रोतांकडून खात्री लायकरित्या मिळाली आहे.

आम्ही आयटी वाले नाही त्यामुळे आमच्याकडे तर असं काही ऐकीवात नाही. उलट अ‍ॅडिशनचं बोलताएत. द्या पाठऊन रेझ्युमे ;)

पिलीयन रायडर's picture

23 Sep 2011 - 4:32 pm | पिलीयन रायडर

नवर्‍याने त्याच्या आणि मी माझ्या आई वडीलांना कव्हर करायचं असे ठरले आहे...

पण आमच्याकडे नवर्‍याच्या कंपनीत अशी कही सोयच नाही :(

तिमा's picture

23 Sep 2011 - 6:59 pm | तिमा

दोन्ही "पालक संचांना"

माणसांना 'संच' हा शब्द वापरलेला पाहून मौज वाटली. 'पालक' या शब्दाच्या जागी 'जनित्र' हा शब्द कसा वाटेल ?

ऋषीकेष यांच्याशी सहमत.

खरंतर तिघाही ज्येष्ठ लोकांना सुदैवाने कसलीच गरज नाहीये, तरी अविवाहित भाऊ आईवडीलांची काळजी घेऊ शकेल.
सासर्‍यांना तसाही भावनिक एकटेपणा आलेला असणार्......त्यांची काळजी घेतली गेली आहे असे दिसल्यावर बरे वाटेल. इथे आर्थिक गरज कोणालाही नाही पण मानसिक गरज अधोरेखित करते आहे.
अवांतर: असं अगदी दुसर्‍यांच्या घरातल्या गोष्टीवर लिहिताना फार अवघड वाटलं.

माझीही शॅम्पेन's picture

23 Sep 2011 - 9:14 pm | माझीही शॅम्पेन

मला अस वाटत तुम्ही सर्व पर्यायआवर अगोदर पूर्ण रिसर्च करा
काही मुद्दे

  • आमच्या हमाली कंपनीत कुठल्याही दोघांना कवरेज मध्ये आणता येत. तस असेल तर आईला आणि सासर्यांना कवरेज द्या. (सम-समान न्याय)
  • तुमच्या म्हणण्या नुसार आईला कॅन्सर झाला होता तर कदाचित आईला जास्त गरज असू शकते. तसेच कॅन्सर होवून गेल्याने (सुज्ञ) सासू-सासरे आक्षेप घेणार नाही अस वाटतंय. (माझ्या मते योग्य पर्याय, एक सून म्हणून मोठी जबाबदारी असली तर आईचे पांग आपण कधीच फेडू शकत नाही)
  • तुमची / तुमच्या भावाची सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर सासू-सासर्यांना कवरेज द्या. जेणे करून जेव्हा आईला आर्थिक मदत लागेल तेव्हा करू शकाल.
  • पुढे मागे आईला आर्थिक मदत लागू शकते हि अट स्पष्ट करून स्वत:हून सासू सासर्यांना कवरेज द्या.

तीनही पालकान साठी फॉर्म घेवून यावेत मिळाली तिघांना तर उत्तम
नाहीतर फक्त आई वडिलांची घ्यावी सासर्यांसाठी प्र्यायव्हेट कंपनी ची घ्यावी
अंजली गद्रे .

५० फक्त's picture

24 Sep 2011 - 7:38 am | ५० फक्त

एक स्पष्ट मत मांडतो, हेच जर तुम्हाला बाजारभावानं पॉलिसि घेण्यासाठी करावं लागलं असतं तर काय केलं असतं याचा विचार करा, अर्थात तुमची कंपनी ह्या पॉलिसि स्वस्तात, बाजारभावापेक्षा देत आहे हे ग्रुहित धरुन सांगतोय.

माझ्या बाबतीत, मी कंपनीची पॉलिसि फक्त आईसाठीच वापरतो, माझि आणि बायकोची एक जॉइंट पॉलिसि आहे ज्यात पोरगं फुकट कव्हर होतं.

आणि अजुन एक महत्वाचं, पॉलिसि कोणत्या कंपनीची आहे त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे सिनियर सिटिझनच्या बाबतीत हे तपासा, कारण या पॉलिसी ग्रुप पॉलिसि असतात, त्यामु़ळे यांचे बारीक अक्षरातले नियम वैयक्तिक पॉलिसिपेक्षा बरेच वेग़ळे असतात हे लक्षात घ्या.

इंड्स हेल्थ चेकअप पॉलिसिचा सध्या अभ्यास करतो आहे, आईसाठी यात दोन्हि कडचे पालक समाविष्ट करता येतात.

मी ऋचा's picture

24 Sep 2011 - 11:32 am | मी ऋचा

@ उपास- नाही हा ऑप्शन फक्त विवाहित महिला एंप्लोईजला आहे. माझे माझ्या आई वडिलांशी जसे संबन्ध आहेत तसेच माझ्या सासर्‍यांशी आहेत.

@ ति. मा. - :) तुम्हीच सुचवा एखादा चांगला पर्यायी शब्द.

@ रेवती ताई- एग्झॅक्टली माझा हाच प्रॉब्लेम झालाय. कारण ऋषिकेश म्हणतोय तसं ईकडे दोघं जण कव्हर होताएत पण तिकडे भावनेचा प्रश्न उभा आहे. आणि हेही मला माहिती आहे की मी आईबाबांना याबाबत विचारलं तर ते सासर्यांच्या नावे घे म्हण्तील आणि सासरे आई बाबांच्या नावे घे म्हण्तील. अतिसौजन्य हा एक आम्च्याकडे प्रॉबलेमच आहे ;)

@ माझीही शॅम्पेन- एक ईकडचा एक तिकडचा असं नाही घेता येत. वर सांगितल्या प्रमाणे आक्षेप कुणाचाच कशावरच नाही. द डिसिजन इज टोटली माईन. सांपत्तिक स्थिती दोन्हीकडे सारखीच आहे.

@ ५० फक्त - बाजारभावाने घ्यायची असती तर तिघांसाठीही घेतली असती.इथे प्रिमीयम कंपनी भरणार आहे जी पॉलिसीमधे आम्हा दोघांना तर इन्क्लुड करतेच पोरं होतिल तेव्हा त्यांनाही करेल प्लस पालकांना करणार आहे. फ्युचर जनराली ची पॉलिस्सी आहे. जुलैमधे नवर्‍याचे किडनी स्टोनचे ऑपरेशन झालं तेव्हा फ्युचरनी सुपर्ब सर्व्हिस दिली जेव्ह्ढा काही औषधांचा खर्च झाला तो देखील १५व्या दिवशी कॅशमधे रिफण्ड झाला.

पण आताही प्रश्न हा आहेच की दोघं जण कव्हर करायचे की सासर्‍यांच्या भावनांचा विचार करायचा? बाकी प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार!

तिमा's picture

26 Sep 2011 - 5:13 pm | तिमा

संचाला पर्याय शोधणे अवघड आहे. पण 'दोन्ही बाजूच्या पालकांना' असे म्हणता येईल. असो. पण ते महत्वाचे नाही.
एकापेक्षा दोघांना कव्हर केले तर आर्थिक फायदा जास्त होईल. पण भावनेचा प्रश्न येत असेल तर मिस्टरांशी सल्लामसलत करुन निर्णय योग्य ठरेल असे वाटते. माझा पहिला प्रतिसाद 'हलके'च घेतल्याबद्दल धन्यवाद.