मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.
काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया
उदा...
मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक
आपल्याला आठवणार्या शब्दांची आपण भर घालावी
---
<< लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. >>
कदाचित त्यांना माझे लेख चांगले वाटत नसतील.
तुमचा जैन समाजाविषयीचा दुसरा लेख बहुतेक सर्वांनी उचलून धरला आहे आणि थट्टा मस्करी केलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी.
कळले तुमचे मित्र कोण ते... त्यांना नाही उद्योग! ;)
(खुलासा: हा टोमणा तुमच्या त्या मित्रांना आहे, तुम्हाला नाही. कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!) ;)
हा टोमणा तुमच्या त्या मित्रांना आहे, तुम्हाला नाही. कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!
अधोरेखित शब्दाच्या जागी तुम्हाला 'प्रतिसादखेटर' म्हणायचंय का हो श्री. बिपिन कार्यकर्ते*? खेटर फेकून मारल्याचं ऐकलं होतं पण खेचर फेकून मारणं जरा नवीनच वाटतंय :P
*वर एका प्रतिसादात तुम्हाला मिळालेले बिका नाव आवडत नाही असे लिहिले असल्याने त्याची नोंद घेवून येथे संपूर्ण नाव लिहिले आहे ;)
स्मिता.जी, सर्वप्रथम आपण माझा इतका आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे मी पाणावलो! आय मीन माझे डोळे पाणावले. त्यामुळे मी आपले आभार मानतो.
आणि तो शब्द खेचर असाच आहे. खरडखेचर / प्रतिसादखेचर असे शब्द या या मिसळीनेच मराठी भाषेला दिले आहेत. अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो.
;)
आ. श्री. बिपिन कर्यकर्ते,
"तो शब्द खेचर असाच आहे. खरडखेचर / प्रतिसादखेचर असे शब्द या या मिसळीनेच मराठी भाषेला दिले आहेत. अभ्यास वाढवा असे नम्रपणे सुचवतो."
या आपल्या नम्र सुचवणीबद्दल शतशः आभार! 'प्रतिसादखेचर मारून फेकणे' हा वाक्प्रयोग आम्हाला नवीनच असल्याने वरील प्रतिक्रिया देण्याचा क्षुद्र प्रयोग आम्ही केला.
एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप लिहिताना पहिले अक्षर आणि पुढे टिंब चालते म्हणून आम्ही 'आ.' असे लिहिले. तसे करून तुम्हाला प्रश्नात टाकण्याचा आमचा उद्देश नव्हता. तरी आ. म्हणजे आदरणीय हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवावे ही नम्र विनंती.
आमचे मित्र श्री. बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांचा असा नावाने उल्लेख करून तुम्ही आमच्या मित्राचा अपमान केला आहात. असं करण्याचं काही कारण असल्यास तीन दिवस १४ तासांच्या आत ते कळवावे नाहीतर कारवाईस सामोरे जावे.
<< कृपया हलकेच घ्या आणि प्रतिसादखेचर फेकून मारू नये ही विनंती!) >>
ह्या तुमच्या विनंतीला मान देऊन मी गप्प बसलो होतो. पण काय झालं शेवटी? मी नाही पण दुसर्या कोणीतरी मारलीच ना प्रतिसादखेचरं? शिवाय त्यांना खेचराऐवजी खेटरं अभिप्रेत होती. घ्या म्हणजे काय अपेक्षा होती आणि काय झालं? अर्थात तुम्हाला जेन्ट्स खेटरांऐवजी लेडीज खेटरं बहुधा कमी तीव्रतेने लागली असतील हाच काय तो त्यातल्या त्यात दिलासा.
श्री. चेतन सुभाष गुगळे साहेब, लेडीज खेटरांचं भय कधीच वाटलं नाही! जेन्ट्स खेटरं मात्र कधीच हवीशी वाटली नाहीत! ;)
एक (खरंच) निरागस प्रश्न : तुम्ही कधी हसता का? तुमचा चेपुवरचा फोटोपण अगदीच गंभीर आहे हो!
<< काय सांगता? जरा नावं द्या बरं त्यांची.. >>
ज्यांना स्वत:ची नावे उघड झालेली चालतात ते खरडवहीतून माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही तिथे ती वाचू शकता.
ज्यांना स्वत:ची नावे उघड होऊ द्यायची नसतात (तसा त्यांचा स्पष्ट आग्रह असतो) ते इतर माध्यमातून (व्य.नि., इमेल, भ्रमणध्वनी, इत्यादी) संपर्क साधतात. त्यांची नावे मी इथे उघड करणे हा औचित्यभंग ठरेल.
माझा या आठवड्यात प्रकाशित झालेला लेख श्री. सागर बोरकर (वल्ली) यांच्या आग्रहावरून या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचा उल्लेख मी त्या धाग्यावर केलेला आहेच.
ओ चेगु, तुम्हाला तुमच्या नावाचा संक्षेप केलेला आवडत नाही म्हणून इतरांनी तो करू नये असे वाटते. मग इतरांना न आवडणाऱ्या गोष्टी (आयडी ऐवजी खऱ्या नावाने उल्लेख करणे) मुद्दाम कशाला करता.
आजपासून माझ्यासाठी तुम्ही "चेगु"च..
विमे
विश्वनाथ मेहेंदळे,
होय, तुमचा हा असाच उल्लेख करतो मी. तुम्हाला यावर काही आक्षेप आहे का? मग इतरांची बाजू घेऊन तुम्ही कशाला माझ्याशी वाद घालताय आणि मला न आवडणार्या पद्धतीने माझा उल्लेख करताय?
उत्तर द्या.
काय भावा भांडत बसलैस? सोडुन दे की. बारका* हैस काय आता?
---------------------------------------------
धागा कसला? काय चाल्लय??
---------------------------------------------
संपादक मंडळास विनंती:- यांना १ शेप्रेट धागा काढुन द्याल काय?
---------------------------------------------
(* बारका:- नन्हा/लहान्/छोटा/पिल्लु/कुक्कुलं बाळ)
किती कीस ( बटाट्याचा , रताळ्याचा पाडतात तो) पाडता हो एखाद्या गोष्टीचा?
मला जेवढे माहित आहे तुम्ही फक्त इथेच नाही बझ इतर बर्याच ठिकाणी अॅक्टिव आहात... मी पण आहे आणि अशा सगळ्या ठिकाणी नावाचे/धारण केलेल्या नावाचे असे संक्षिप्त रूप केलेले मी पाहिले आहे. आश्चर्य आहे तुम्ही कसे नाही पाहीले?
तुम्ही ना लोकांना फुल्टॉस चेंडू देता आणि मग त्यांनी सीमेपार भिरकावला की त्याबद्दल नापसंती व्यक्त करता..
ऐसन कैसन चलेगा बबुवा?
अहो त्यांना असं सर्वनामाने संबोधू नका हो, नाहीतर लगेच एक लंबाचौडा प्रतिसाद येईल. तेव्हढं संपादकांना सांगून ते तुम्हीचं संपुर्ण चेसुगु करून घ्या पाहू. (संपादकांपैकी कोणीतरी माझा प्रतिसाद उडवायला येईलच, फार शोधावं लागणार नाही. ;-) )
तुम्ही ना लोकांना फुल्टॉस चेंडू देता आणि मग त्यांनी सीमेपार भिरकावला की त्याबद्दल नापसंती व्यक्त करता..
फुल्टॉस तर देतातच अन ओउट्साइड ऑफ स्टंप पण देत्तात....
अन तोच मग यांना यॉर्कर मारतो अन यांची दांडी गुल होते.....
बाकी सविता, आपलं निरीक्षण का काय ते ज्याम भारी आहे हो !!!
आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे.
श्री. गुगळे, तुमचा अभ्यास कमी पडतोय का? शिवाय तुम्हाला माहित आहे तेवढेच अंतिम आहे का? पहिले नाव आणि त्या नंतर मधल्या नावाचे आणि अंतिम नावाचे केवळ अद्याक्षर, टिंबासहित, असे संपूर्ण नाव लिहिणारे बरेच आहेत. माझ्या माहितीतही आहेत. प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्या सुनीती सु. र. हे एक ठळक उदाहरण.
हे तर काहीच नाही. शाळा कॉलेजात आम्ही मुले एकमेकांना परस्परांच्या बापाच्या नावाने हाका मारत असू.
एकदा तर माझा मित्र दुसर्या मित्राच्या घरी गेला. (मोबाईलपुर्व कालखंड) त्याचे वडील दारात होते. ह्याने विचारले, "रमेश आहे का?" ते म्हणाले आहे. हा म्हणाला "पाठवा त्याला." मित्राचे वडील गोंधळल्यासारखे झाले. इकडे भेटायला गेलेल्या मित्राच्या हा गोंधळ लक्षात आला. नंतर त्याने बाजू सावरली अन मग त्याने मित्राचे नाव घेतले.
मिसळपाववर प्रचलित झालेले मजेदार शब्द संकलित करण्याचा गंमतीदार उद्देश आहे की त्या निमित्ताने मिसळपावची कसलीशी वृत्ती आहे ती कशी उघड पडेल बघा आता गंमत..किंवा मिपावरील काही लोकांविषयी आणि प्रवृत्तींविषयी ग्रिव्हियन्स फ़ोरम असा काही उपहेतू आहे?
काय आहे गविभौ, धाग्यांचे अवांतर करण्याचीही मिपा(करां)ची वृत्ती आहे.
आता धाग्याकर्त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रतिसादामध्ये या वा अशा मिपा(करां)च्या वृत्तीचा उल्लेख केलाय आणि सदस्य ती दाखवतीलच असा विश्वासही व्यक्त केलाय तेव्हा जे इथे चालू आहे ते कुणाला (विशेषतः धागाकर्त्यांना) अनपेक्षित असे नाहीच आहे.
तेव्हा सध्या आपण तरी, "उगी रहावे नि जे जे होईल ते ते पहावे" ही (ही आणखी एक मिपा) 'वृत्ती' दाखवावी असा विचार करतोय.....
:-)
धाग्याचे काश्मीर करणे हाही एक शब्द प्रयोग मिपावर प्रचलित आहे. त्याचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे:
श्री चेतन सुभाष गुगळे यांनी अरे सॉरी सॉरी टिंब राहिलं वाटतं श्री. चेतन सुभाष गुगळे यांनी धाग्याचे यशस्वीपणे काश्मीर केल्याबद्दल समस्त मिपाकरांतर्फे त्यांना एक फायर एक्स्टिंग्वीशर भेट देण्यात येत आहे.
मी धाग्याचं काश्मीर केलंय की नाही हे धागाकर्ताच ठरवेल. इतरांनी चोंबडपणा करायचं कारण नाही. त्यामुळे आपला फायर एक्स्टिंग्विशर आपल्याकडेच ठेवावा. मला त्याची गरज नाही. तसंही इथे आभासी जगतात प्रत्यक्ष वस्तु दिली जातच नसल्यामुळे कुणी कुणाला फायर एक्स्टिंग्विशरच काय पण अगदी रणगाडाही भेट देत असल्याचं जाहीर करू शकतं, त्यात काय मोठंसं? शब्द टंकायला प्रत्यक्ष वस्तू विकत घेण्याएवढा खर्च थोडाच येतो?
प्रतिक्रिया
समजले.
<< लेख चांगला असेल तर इथे लोक
कळले तुमचे मित्र कोण ते...
एक प्रश्न
स्मिता.जी, सर्वप्रथम आपण माझा
आ. श्री. बिपिन कर्यकर्ते,
क्षमा केल्या गेली आहे. आ.
आभारी आहे
मान्नीय स्मिता. ताई,
विनंतीचा काही उपयोग झाला का?
वारलो !!
मी पण रे!!! =))
एकच तिरडी पुरेल ना दोघांना?
घ्या!
श्री. चेतन सुभाष गुगळे साहेब,
विधायक करा काहीतरी!
हे निळ्या बोलतोय. काय पण ...
श्री. बिपिन कार्यकर्ते
<<<ज्यांना माझे लेखन आवडते ते
<< काय सांगता? जरा नावं द्या
ओ चेगु, तुम्हाला तुमच्या
विमे यांच्या आक्षेपाशी सहमत
ओ बिका, तुम्हाला खेचरांचं
असं काय करता हो ननि! कधी
विश्वनाथ मेहेंदळे, होय, तुमचा
काय भावा भांडत बसलैस? सोडुन
किती कीस ( बटाट्याचा ,
अरे काय करताय!
तुम्ही ना लोकांना फुल्टॉस
आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर
काय हो कार्यकर्ते, टोपणनावावर
हे तर काहीच नाही. शाळा
हा हा हा .........
वाचतोय... वाचतोय.... !!
मिसळपाववर प्रचलित झालेले
हॅ! हॅ! हॅ!
किल्ला लढवायचा दुसरं काय
उद्देश काहीही असो, मज्जा येते
अय्या!
प्र का टा आ
भाषा
तुमचा 'चित्रकला' हा एकच शब्द
बाडिस आहे.
धाग्याचे काश्मीर करणे हाही एक
मी धाग्याचं काश्मीर केलंय की
गुगळे साहेबांनी ह्या मी.पा.
तिखट
प्रत्येकच ठिकाणी भुंकू नये
यिप्पी...चेसुगु ऑन फायर!! (पण
...
Pagination