साहित्यः- अंडी, आले, लसुण, कांदे, कोथींबिर, खोबरे,मिरि, लवंग, दालचिनि, मिट, तिखट , तयार चिकन मसाला
क्रुती:- कांदा आणि खोबरे थोड्या तेलात ख्ररपुस परतुन घ्यावे. नंतर मिक्सर वर मिरि, लवंग, दालचिनि सर्व वाटुन घ्यावे. नंतर त्यात
आले, लसुण,कोथींबिर व परतलेला कांदा व् खोबरे टाकावे व वाटुन घ्यावे.
तेल गरम करुन त्यावर वरिल वाटण टाकावे. मिट, तिखट टाकुन परतुन घ्यावे. तयार चिकन मसाला टाकावा. नंतर थोडे गरम पाणि टाकावे व नंतर कच्ची
अंडी हळुच फोडुन टाकावी झाकण थेउन वाफ आणावि. अंडी उक्डून वर येतात.
मि प्रमाण दिले नाहिये कारण थोडे पुढे मागे झाले तरिहि छान लागते. तर्रि हावि असल्यास तेल जास्त टाका.
प्रतिक्रिया
10 Jul 2008 - 5:06 pm | टारझन
चिटी,
अंडाकरी बद्दल धन्यवाद. फार भारी लागत असावी. डायरेक्ट कच्ची अंडी सोडण्याचा प्रकार करावा लागेल एकदा.
अंडी आणि कोंबडी प्रेमी) कु. ख.
http://picasaweb.google.com/prashants.space
10 Jul 2008 - 5:13 pm | शिप्रा
नक्कि कर रे मित्रा आणि मला पण बोलव. :P
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
10 Jul 2008 - 6:09 pm | आंबोळी
सोपी , सुटसुटीत पाककृती. आवडली.
पण तुझ्याविषयी काय म्हणू? मघाशीच तू सामंतांना शाकाहारावर पाठिंबा जाहीर केलास आणि लगेच इकडे येउन तर्रीदार अंडाकरीची पा़कृ देतेस. तुझ्या पाठिंब्यावर ते बाकिच्याना पारशी म्हणून रिकामे झाले.....
तुझ्या इतकी मोठी पारशीण मी बघीतली नव्हती... ;) (ह.घ्या.)
अश्याच झणझणीत पाकृ येउदेत.
(मांसात लाल-पांढर न करणारा)आंबोळी
10 Jul 2008 - 6:28 pm | शिप्रा
मैत्रिणी थांब लगेच पार्शी म्हणुन मोकळि झालिस्..किति घाइ...
मि शाकाहारि आहे म्हणुनच शाकाहारावर पाठिंबा जाहीर केला पण त्याचा अथ्र मि मांसाहारि लोकांना रेसीपी सांगु नये असे नाहि. कारण इतर प्रतिक्रिया बघुन मला खात्रि पटली कि मि कितिहि पाठिंबे जाहिर केले (आणि अजुनहि जाहिर पाठिंबा आहे) तरिहि माझे मांसाहारि मित्र खाणारच...आणि तसे पण अंडे हे हल्ली
शाकाहारात मोडते म्हणे......(वादासाथि नविन मुद्दा देत आहे :P )
तर माझ्या मांसाहारि /शाकाहारि मित्रां साथि हि स्पेशल रेसिपि....
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
10 Jul 2008 - 6:33 pm | शिप्रा
आंबोळी हा आहे ...त्यामुळे मित्रा म्हणायला हवे....क्षमस्व ;)
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
11 Jul 2008 - 2:48 am | llपुण्याचे पेशवेll
आंबोळ्या काही अगदीच हा नाहीये... ;) (ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
11 Jul 2008 - 2:55 am | ब्रिटिश टिंग्या
>>आंबोळ्या काही अगदीच हा नाहीये...
हे हे हे ;)
11 Jul 2008 - 3:17 am | टारझन
>>आंबोळ्या काही अगदीच हा नाहीये...
आंबोळ्या काही अगदीच हा नाहीये... तर हा हा हा आहे ...
(तु ही .. तर मी तुझा हा , नुसता हाच नाही तरं हा हा हा - तरूण तुर्क म्हातारे अर्क)
देशपांडे बांईंच्या प्रेमात पडलेला बारटक्का ) कु. ख
http://picasaweb.google.com/prashants.space
11 Jul 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
धन्यवाद चिंटी!
छान पाकृ दिली आहे! ही आमची आवडती पाकृ! :)
अजूनही येऊ द्या!
तात्या.
17 Jul 2008 - 7:27 pm | pooja kulkarni
वा फारच छान. मी नक्की करेन.
अजून येउद्या.
18 Jul 2008 - 9:18 am | सुचेल तसं
वा!!!!!
अंड्याचे सगळे प्रकार आवडतात.
जर तुम्हाला (अथवा इतर कोणाला) अंड्याच्या इतर काही पाकृ (हाफ-फ्राय, अंडा खिमा, फ्रेंच टोस्ट, भुर्जी) माहिती असतील तर कृपया आम्हाला सांगाव्यात.
http://sucheltas.blogspot.com
18 Jul 2008 - 9:58 am | शिप्रा
नक्की ...मि वेळ मिळाला कि हे प्रकार पण टाकीन...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
18 Jul 2008 - 11:36 am | छोट्या
रेसीपी वाचुन तोंडला पाणी सुटलय...
20 Aug 2008 - 2:54 pm | परीसा
मी सुद्धा अशीच अंडाकरी बनवते. पण जर वाटणामधे टोमॉटो टाकले कि ते वाटण खुप छान होते. आणि लवंग, मिरी, दालचिनी चा तिखट जाळ सुद्धा मारत नाही. आणि खायाला पण छान लागते.