साहित्यः
१ कॅन कंडेन्सड मिल्क
१ डबा रिकोटा चीज
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक)
सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप
नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे.
पाकृ:
एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे.
मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ५ मिनिटे ठेवणे.(मधे-मधे लक्ष देणे, मिश्रण ऊतु जाऊ देऊ नये.)
५ मिनिटांनी मिश्रण चमच्याने हलवून परत हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे.(सतत लक्ष देणे)
आता मिश्रण साधारण घट्ट झालेले असेल, परत मायक्रोवेव्ह मधे हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे. ( मायक्रोवेव्ह चे टाईमिंग मधे फरक असू शकतो...मला जेवढा वेळ लागला बनवायला तसे सांगितले आहे)
आता मिश्रण कलाकंदाला लागेल असे घट्ट झालेले असेल. त्यात वेलचीपूड व रोज वॉटर / इसेन्स घालून एकत्र करणे.
तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे ओतून पसरवणे व त्यावर पिस्ता-बदामाचे काप पेरावे.
सेट झाले की वड्या पाडाव्यात.
प्रतिक्रिया
10 Sep 2011 - 5:34 am | नव-वधू
छनच आहे पाक्रु!! आहे फोटोज तर एक्दम बेस्ट!! नक्की करुन बघेन!
बाकि रिकोटा चिज मुळे कलाकन्द थोडा कमी sinful होइल नै? :)
10 Sep 2011 - 5:44 am | पाषाणभेद
एकतर रात्री जेवण करून काम करणे अन त्यात भुक लागणे अन मग पहाटे पहाटे असल्या पाकृ पाहणे म्हणजे एक शिक्षा आहे आम्हा नाईट शिप्ट करणार्या मंडळींना.
10 Sep 2011 - 9:11 am | जाई.
उत्तम पाकृ
मस्तच
10 Sep 2011 - 9:58 am | विलासराव
खायला बोलावलं तरी चालेल.
10 Sep 2011 - 11:00 am | आत्मशून्य
असचं म्हणतो :)
12 Sep 2011 - 6:10 pm | निवेदिता-ताई
असेच म्हणते.!!!!!!!
10 Sep 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार
काय कातिल दिसतो आहे तो कलाकंद. पटकन उचलुन तोंडात टाकावासा वाटतो आहे.
बादवे रिकोटा चीज हे काही वेगळ्या प्रकारचे चीज असते का? त्याला काही पर्याय आहे का?
चला आता संध्याकाळी रिकोटा चीज शोधणे आले. मध्ये आईने भारतातून दोन पूर्णांक सहा सप्तमांश अमूलचे चीज पाठवून दिले होते, इतके दिवस तेच वापरत होतो.
10 Sep 2011 - 12:24 pm | शाहिर
अनिवासि भारतिय परा
10 Sep 2011 - 3:04 pm | नावातकायआहे
>>चला आता संध्याकाळी रिकोटा चीज शोधणे आले.
लवकर नीघा नाही तर वाहतुकीत अडकाल.
'यादी'त दिलेत तर घरपोच पण मिळेल.
11 Sep 2011 - 12:06 am | दिपाली पाटिल
पराभाऊ, पणिर वापरा रिकोटा चीझ ऐवजी... तेही शोधणे आले तर घरी बनवा...पण तुम्हाला ते कार्ड्बोर्ड का थर्माकोलसारखे लागते, असे कुठेतरी वाचले होते.
12 Sep 2011 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार
नको ... नको...
त्यापेक्षा मी विमान पाठवून रिकोटा चीज मागवून घेतो.
10 Sep 2011 - 12:30 pm | शाहिर
मस्त जमला आहे
10 Sep 2011 - 1:16 pm | सुहास झेले
वाह ... जबरी पाककृती !!
तोंडाला पाणी सुटले !! :) :)
10 Sep 2011 - 3:19 pm | कच्ची कैरी
व्वा मस्त्!!!नविन पाकृ. आणि फोटो बघुन तर तोंडाला पाणीच सुटले .
10 Sep 2011 - 5:18 pm | स्वाती२
मस्त पाकृ.
10 Sep 2011 - 10:37 pm | ५० फक्त
मस्त पर्यात दुध आटवणे ह्या प्रकाराला, फक्त जरा थोडा अगदी थोडासाच करपायला हवा होता, एक बाजु काळपट चाकलेटी असली ना का जाम भारी लागतो हा प्रकार,
याचा पुढचा टप्पा म्हणजे कुंदा, तो देखिल सोलापुरच्या नामदेव चिवडेवाल्याकडचा किंवा अप्पा हलवाई, टिळक चौकातला, जाम भारी प्रकार आहे, आता गेलो की घेउन येतो सगळ्यांचा नावचा
..
..
..
.अन खातो मीच,
11 Sep 2011 - 10:30 am | मदनबाण
वा... मस्तच ! :)
(मिठाई प्रेमी) :)
12 Sep 2011 - 8:50 am | स्पंदना
सुरेख !
17 Sep 2011 - 1:45 am | प्रभाकर पेठकर
नुसतं पाहिलं तरी काही ग्रॅम वजन वाढलं आहे.