साहित्यः
१. छोलें साठी साहित्यः
छोले - १ वाटी
कांदे - ३
टोमॅटो - ३
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
मिरे - २-३
लवंगा - २-३
दालचिनी - १ इंच तुकडा
चहाची पावडर - १ चमचा
आवळा सुपारी - २-३
जिरे - १ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १/२ चमचा
रेडिमेड छोले मसाला - २ चमचे
आमचुर पावडर - २ चमचे
आले - लांब चिरुन १/२ चमचा
हिरवी मिरची - १ लांब चिरुन
तुप - २ चमचे
कोथिंबीर सजावटी साठी
मिठ चवीनुसार
२. लछ्छा पराठा साठी साहित्यः
मैदा - १ वाटी
बटर - १/२ वाटी
अंडे - १
दुध - १/४ वाटी
मिठ चवीनुसार
कृती:
१. छोले करण्याच्या आदल्या रात्री भिजत टाकावेत.
२. दुसर्या दिवशी छोले शिजवताना आधी एका कापडा मधे मिरे, लवंग, दालचिनी, चहाची पावडर, आवळा सुपारी घेउन त्याची एक पोटली बांधावी व छोल्यां मधे टाकावी. छोले बोटचेपे होइ पर्यंत कुकर मधे शिजवुन घ्यावेत.
३. छोले शिजवल्यावर कापडाची पोटली टाकुन द्यावी. ह्या पोटली मुळे छोलेंना काळसर रंग येतो व आवळा सुपारी मुळे आंबटसर चव येते.
३. कांद्यांची व टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकुन परतावे. जिरे थोडे परतल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकावी.
५. पेस्ट बदामी रंगाची होइ पर्यंत परतावी. त्या नंतर त्यात आले-लसुण पेस्ट टाकुन २ मिनिटे परतावे.
६. आता त्यात टोमॅटोची पेस्ट टाकावी. टोमॅटोची पेस्ट चांगली परतल्यावर त्यातुन तेल सुटायला लागेल.
७. मग त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, छोले मसाला व आमचुर पावडर टाकुन चांगले परतावे.
८. ह्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात शिजवलेले छोले टाकुन निट मिक्स करावे. ते मिक्स झाल्यावर त्यात छोले शिजवतानाचे उरलेले पाणी व चवीनुसार मिठ टाकावे. एकदम जास्त पाणी टाकु नये. नाहितर छोले पुर्ण mash होतील.
९. सगळ्यात शेवटी एका दुसर्या छोट्या कढई मधे तुप गरम करावे. त्यात लांब चिरलेले आले व मिरची परतुन घ्यावी. ह्याचा छोलेंना वरतुन तडका द्यावा. आवडत असल्यास वरतुन थोडे लिंबु पिळावे. गरम छोले तयार आहेत.
१०. पराठ्यां साठी मैदा चाळुन घ्यावा. त्यात चवीनुसार मिठ , १ चमचा बटर, १ फेटलेले अंडे व दुध टाकुन त्याची कणिक मळुन घ्यावी. १/२ तास हि कणिक झाकुन ठेवावी.
११. पोळी साठे जेवढा कणकेचा गोळा घेतो, तेवढा घेउन त्याची पोळी लाटुन घ्यावी.
१२. त्यावर हातानेच पुर्ण पोळीला बटर लावावे व त्यावर थोडा मैदा भुरभुरावा.
१३. आता त्याचा आपण कागदाचा fan करतो, त्या प्रमाणे fan करुन घ्यावा.
१४. ह्या fan चा आता गोल करुन घ्यावा व ह्याचा हलक्या हाताने पराठा लाटावा.
१५. तव्यावर नेहमी प्रमाणे पराठा भाजुन घ्यावा व शेवटी वरतुन बटर सोडावे.
१६. गरम पराठा तयार आहे. हा पराठा वाढताना आधी हातात थोडा press करुन घ्यावा. त्यामुळे त्याचे सगळे layers वेगळे होतात.
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 3:04 am | सानिकास्वप्निल
अहाहा!!
लच्छा पराठा बघून तर लगेच छोल्यासोबत खावासा वाटतोय :)
5 Sep 2011 - 5:08 pm | निवेदिता-ताई
:p
5 Sep 2011 - 3:06 am | Mrunalini
:) धन्यवाद. ;)
5 Sep 2011 - 4:05 am | पाषाणभेद
अशा भुकेच्या वेळी फक्त वाचून जीव उडाला
5 Sep 2011 - 5:21 am | आत्मशून्य
.
5 Sep 2011 - 7:22 am | सूड
मस्त !!
5 Sep 2011 - 9:35 am | सुहास झेले
अहाहाहाहाहा.... मेलो ठार मेलो !! :)
सकाळी सकाळी हा धागा बघितला, आज निदान हॉटेलातून तरी मागवावे लागणार छोले-पराठा... :D
5 Sep 2011 - 10:29 am | मृत्युन्जय
आता किमान ६ महिने तरी पाकृ सेक्शन बघणार नाही. सालं असलं काहितरी बघतो आणि आमच्या डायटच्या प्लॅनची वाट लागते
5 Sep 2011 - 11:43 am | ५० फक्त
लई भारी आणि लई धन्यवाद,
मधे गोल करुन ठेवलेला गोळा माडर्न आर्ट म्हणुन बिनधास्त खपेल. आणि शेवटच्या फोटोतले दोन झुट्टु असलेला लिंबु तर लैच भारी.
बटर बटर आणि बटर, प्रत्येक पायरीला बटर, मला वपाडावची आठवण झाली , आठवण झाली म्हंजे हाय अजुन आयडि, उडालेला नाही.
बाकी असले पराठे पुण्याला रेल्वेस्टेशनच्या समोर एका टपरी छाप हाटेलात मिळ्तात, घरी जमले तर ठिक नाही तर तिथुन आणुन खाल्ले जातील.
आणि सानिकातैच्या चमच्यावर जसा डोळा ठेवला आहे ना तसा तुमच्या माश्यासारख्या दिसणा-या सर्विंग बाउलवर डोळा ठेवावा लागेल असं दिसतंय.(चिनी मातीचं आहे का प्लॅस्टिकचं ?)
5 Sep 2011 - 3:02 pm | Mrunalini
हा हा हा.... खुपच छान.. धन्यवाद. :)
आहो आणि तो बाउल प्लॅस्टिकचा आहे. तुम्हाला हवा असल्यास, भारतात आल्यावर घरपोच करण्यात येइल. :)
6 Sep 2011 - 11:35 am | ५० फक्त
नही$$$$, प्लॅस्टिकची भांडी हा माझा आणि बायकोचा आवडता वादाचा मुद्दा आहे, असो तुम्हाला एक ऑप्शन देतो, मी गेली बरेच वर्षे काचेचे, चिनी मातीचे नव्हे, काचेचे पारदर्शक चमचे हुडकतोय, तुम्हाला मिळु शकतील अशी आशा आहे. मिळत असतील तर किंमत काय असेल जरा सांगाल काय ?
5 Sep 2011 - 2:58 pm | ज्योति प्रकाश
अप्रतिम.
5 Sep 2011 - 3:05 pm | स्पा
तुफान फोटो आलेत...
झकास.....
5 Sep 2011 - 3:11 pm | गणपा
शेवटचा फोटु कातील आहे.
घरच्या घरी लछ्छा पराठा पण छान. :)
6 Sep 2011 - 1:04 am | चिंतामणी
असेच म्हणतो. मार डाला.
5 Sep 2011 - 3:39 pm | स्मिता.
कसले भारी फोटो आहेत... आणि अर्थातच पाकृसुद्धा! :)
शेवटचा फोटो बघून तर राहवत नाहीये. ती प्लेट उचलून खायला सुरूवात करावी म्हणते.
5 Sep 2011 - 3:59 pm | Mrunalini
सगळ्यांना धन्यवाद. :)
5 Sep 2011 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार
5 Sep 2011 - 7:30 pm | स्वाती२
मस्त! लच्छा पराठा लवकरच करुन बघेन.
5 Sep 2011 - 10:07 pm | चित्रा
मस्त. छान दिसतो आहे पराठा.
करून पहावासा वाटला. बघू कधी वेळ येते.
5 Sep 2011 - 9:23 pm | जाई.
उत्तम पाककृती
दिल्लीत असताना लच्छा पराठा चटणी व पंजाबी लोणच्याबरोबर खाल्ला होता
अप्रतिम लागतो
5 Sep 2011 - 10:36 pm | दीपा माने
लच्छा पराठ्याची कृती सोप्या रीतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद!
6 Sep 2011 - 12:25 am | रेवती
फोटू मस्तच!
आजकाल सानिका आणि मृणालिनी यांच्या पदार्थांचे फोटू कॅटरिनाच्या फोटूपेक्षा भारी वाटतायत.
6 Sep 2011 - 2:07 am | Mrunalini
हा हा हा हा... धन्यवाद :) मंडळ आपले आभारी आहे. ;)
6 Sep 2011 - 12:29 pm | स्पंदना
सहमत !
तसे मला सलमान अन जॉन् भाउजींच्या फोटो पेक्षा ही भारी वाटतात. ( द्राक्ष आंबट?????????)
रेसिपी आवडलेली आहे, करण्यात येइल, पण माझे छोले या पेक्षा भारी होतात. पराठा मात्र ट्राय केला जाइल.
10 Sep 2011 - 8:51 am | चिंतामणी
हे नुसते बघुन कसे समजले??????? :~ :-~ :puzzled:
11 Sep 2011 - 7:41 am | रेवती
माझे छोले या पेक्षा भारी होतात
नुसती बोलबच्चनगिरी नको.........पाकृ चढवा......फोटूसकट!
14 Sep 2011 - 5:56 am | स्पंदना
पराठा अतिशय सोपा पडला करायला इतक्या इनस्ट्रकश्न्स डिटेल मध्ये होत्या, अन छान झाला. धन्स !
14 Sep 2011 - 10:33 am | Mrunalini
धन्यवाद. :)
6 Sep 2011 - 1:35 pm | jaypal
रेसीपी आणि लाजवाब फोटो. मान गये उस्ताद :-)
6 Sep 2011 - 5:26 pm | JAGOMOHANPYARE
छान
10 Sep 2011 - 3:59 am | नव-वधू
गणपती असे पर्यन्त शाकाहारी राहणार असल्याने ह्या पा. क्रु ने विकान्त वाचवला म्हणायचा!!
पराठा तर अगदी killing दिसतोय!!
10 Sep 2011 - 3:09 pm | कच्ची कैरी
कातील फोटो आणि मस्त पाककृती !!!
10 Sep 2011 - 4:53 pm | अविनाशकुलकर्णी
अंड्या ऐवजी दुसरा पर्याय आहे का?
का अंडे मस्ट आहे???
10 Sep 2011 - 6:53 pm | Mrunalini
अंडे नाही टाकले तरी चालेल. तुम्ही फक्त दुधामधे सुद्धा कणीक मळु शकता.
10 Sep 2011 - 10:13 pm | अविनाशकुलकर्णी
धन्यवाद..
12 Sep 2011 - 4:06 pm | पियुशा
यम्मी ग :)
13 Sep 2011 - 7:25 am | प्राजु
आहा!! आहाहा!! आहाहा!!
काय तुफान आहे रेसिपी आणि फोटो.
विकेंडचा मेनू फिक्स!!