मासे ३२) पापलेट

जागु's picture
जागु in पाककृती
30 Aug 2011 - 11:49 am

साहित्यः

पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

पाककृती:
ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत. पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.

हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.

आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.

२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्‍या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

30 Aug 2011 - 11:53 am | स्पंदना

ए जागु ए !
का रडवते ग! गणपती झाल्या शिवाय एकतर काही खाय्च नाही आणि वर इथ मला अजुन तरी पाप्लेट दिसला नाही.
असु दे बाई खा! निदान तुला मिळतय अन खाताना आमची आठवण येते हेच खुप नाही का?

अपर्णा अग आता ५-६ दिवसांतच खातील ना म्हणून ही पुर्वतयारी.

सुनील's picture

30 Aug 2011 - 11:59 am | सुनील

मस्त!

पापलेट विकत घेताना त्याच्या खवल्यांतून दाबल्यावर पांढरे पाणी येते का नाही ते पाहिले जाते.

हे नवीन आहे. अर्थात तेवढी जाणकारी नसल्याने माहीत नव्हते साहजिकच.

पांढरे पाणी यावे की न यावे. . काय चांगले? त्याने काय समजते ? (ताजा / शिळा /सुका/ रसदार इ)

सुनील's picture

30 Aug 2011 - 12:18 pm | सुनील

पांढरे पाणी = ताजे पापलेट

मस्त गो जागु तै. :)

पापलेट विकत घेताना त्याच्या खवल्यांतून दाबल्यावर पांढरे पाणी येते का नाही ते पाहिले जाते.
बरोब्बर...;)
ही लाईन वाचल्यावर मला खालचा सीन आठवला...

http://www.youtube.com/watch?v=dC2pdJzHwdU (पूर्ण सीन नाय गावला मला, आणि हल्ली embeded कोड देउन सुद्धा मला व्हिडीयो इथे डकवता येत नाहीये ! कारण काय असेल बरं ?)

जाता जाता :--- आम्ही पोर कट्ट्यावर बसलेलो असताना एखादी टच्च पोरगी जाताना दिसली की म्हणायचो, च्यामारी हल्ली पापलेट लयं फडफडायला लागलं आहे. ;)

(शुद्ध शाकाहारी) ;)

नरेश_'s picture

30 Aug 2011 - 3:57 pm | नरेश_

आता जागुतैकडे चक्कर टाकणे आले ;)

आहा.. आहा..

क्या बात आहे. सुरमईखालोखाल किंवा तितकाच जबरदस्त आवडता मासा.. आंब्यात हापूस असावा तसा.

इतक्या मुख्य माशाची कृती तेहतिसाव्या नंबरवर का यावी बरे? पापलेटराजाचा नंबर मांदेलीबिंदेलीनंतर?

:)

तुझी पाकृ झक्कास.. नेहमीप्रमाणे.

मी स्वतः हा पदार्थ करु शकतो म्हणून तो जास्त आवडता आहे. साधा सोपा सरळ. मात्र मी डोळे डोके असा पूर्ण पापलेट न फ्राय करता त्याचे काप करुन शॅलो फ्राय करतो. यात बेडेकर लोणच्याचा मसाला लावून परतूनही मस्त लागते. आधी मसाला लावून फ्रीजमधे ठेवायचे.

जागु's picture

30 Aug 2011 - 12:49 pm | जागु

सुनिल, गवी, धन्यवाद.

गवी बेडेकर लोणच्याचा मसाला तिखट लागत असेल ना ?

नाही. ट्राय करुन बघ.

तेलात मसाला मिसळून घेतला की त्यात तुकडे बुडवायचे आणि फ्रीजमधे अर्धातास ठेवून मग बाहेर काढून परतायचे.

मसाल्याचं प्रमाण अगदी लडबडेल इतकं जास्त असू नये अर्थात. नाहीतर मग तिखट होईल.

आवडत असेल तर रवा/मैदा वगैरेत घोळवून मग परतले तरी छान लागतात.

प्राजु's picture

30 Aug 2011 - 6:18 pm | प्राजु

अगं गवि लोणचं घालतात त्या पापलेट चं. ;)
:)

ठिक आहे करुन बघते. पण रवा वगैरे लावला की माश्याची ओरिजनल चव कमी येते अस मला वाटत.

म्हणूनच "आवडत असेल तर" असं मुद्दाम म्हटलं.

माझ्याही मते रवा वगैरेचे थर चढवले की नुसतं कटलेट / भजं तयार होतं. मूळ खमंगपणा आणि स्वाद जातो.

साती's picture

31 Aug 2011 - 1:19 am | साती

माझ्याही मते रवा वगैरेचे थर चढवले की नुसतं कटलेट / भजं तयार होतं. मूळ खमंगपणा आणि स्वाद जातो.

ह्या अशा प्रकारांनी केलेले मासे रँपवर चालणार्‍या मॉडेलप्रमाणे सब घोडे बारा टक्के लागतात.
जागूताई तू दिलेल्या रेसीपीने खरी चव कळते माशांची.

गवि,रत्नागिरीला आलात की नाही बर्‍याच दिवसांत,मी मस्त मासे हादडून आले मागच्या आठवड्यात.

मे महिन्यात आलो होतो मोठा कोकणदौरा काढून. कारवार गोवा मार्गे कोकणातला समुद्री रस्ता घेऊन ड्राईव्ह करत आलो. रत्नागिरीसाठी एक दिवस ठेवला होता पण वेळेचा अंदाज चुकून रत्नागिरीत पोचेस्तोवर रात्रच झाली. त्यातही पावसच्या साईडने आलो असल्याने वाटेत गणेशगुळ्याचा मोह टाळता आला नाही. त्यामुळे रात्रीचे दहा वाजले.
मग अतिशय थकल्याने भाट्याच्या सुरुबागेत कसलासा रिसॉर्ट झाला आहे तिथे वळकटी टाकली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबई गाठण्याच्या प्रेशरने लवकर निघालो. तिथे रिसॉर्टमधे अत्यंत बेचव अन्न होते हे सांगणे न लगे.

:)

भाट्याच्या किनार्‍यावर मैलोगणती मनुष्याचे नख दिसत नाही अशा सुनसान अवस्थेत सायकलींवरुन लहानपणी फिरलेले आठवले आणि आता रिसॉर्ट्स आणि बीचवर सकाळीही असलेली गर्दी बघून वेगळ्या जगात आल्याचा भास झाला.

असो. लांबड लागली. रत्नागिरीचं नाव घेतलंस म्हणून असं झालं.

केळकर कविता इथे कधी येणार सर्वांसाठी? मागणी पेंडिंग आहे अजून.

नि३सोलपुरकर's picture

30 Aug 2011 - 1:30 pm | नि३सोलपुरकर

वाह !!! जागु ताई

एकदम बेस्ट,
सरळ सोपी आणी खमंग रेसीपी.

विशाखा राऊत's picture

30 Aug 2011 - 1:42 pm | विशाखा राऊत

काय ग जागुताई.. श्रावण चालु आहे ना .. मग एक के बाद एक मस्त मस्त मासे :)

मस्त आहेत पापलेट..

Mrunalini's picture

30 Aug 2011 - 2:06 pm | Mrunalini

आई गं... खरच मेले मी ते पापलेट बघुन.... प्रचंड आवडतात पापलेट. इथे तर काय मिळत नाही. खुप miss करतो पापलेट. :(

जगात कुठेशी पापलेट मिळत नाही बुवा.

हिंदी, पॅसिफिक आणि अटलांटिक अशा तिन्ही महासागरांत मुबलक मिळणारा पापलेट हा मासा कोण्या देशात मिळत नाही?

Mrunalini's picture

30 Aug 2011 - 4:36 pm | Mrunalini

मी Slovakia मधे आहे. इथे फ्रेश फिश मधे फक्त Macarel मिळतो. बाकी सगळे frozen. त्यामुळे पापलेट तर खुप दुरची गोष्ट झाली. इथे नाही मिळत.

सहज's picture

31 Aug 2011 - 6:30 am | सहज

ब्राटिस्लावा मधे आहात का?

असल्यास हा दुवा पहा . वरुन दुसरी डीश आहे. Braised pomfret fish in soy sauce

त्या रेस्तॉरंटकडे चौकशी करा की ते कोठून आणतात पापलेट.

Mrunalini's picture

31 Aug 2011 - 3:59 pm | Mrunalini

मी Bratislava मधे नाही आहे. मी Kosice मधे आहे.

नितिन, मृणालिनी, विशाखा धन्स.

मृणालीनी माझ्याकडे चक्कर टाक मग एकदा. मी देते तुला.

सानिकास्वप्निल's picture

30 Aug 2011 - 2:26 pm | सानिकास्वप्निल

पापलेट सगळ्यात आवडता मासा...तोंपासू
लवकरचं आणून बनवावा लागेल ;)

इरसाल's picture

30 Aug 2011 - 6:15 pm | इरसाल

पापलेट म्हणजे .....बोलण्यासारखे काहीच उरले नाही.आणि जागुताई ने बनवलेले तर अतिशय भारी दिसतायेत.
बाकी खालील बाबतीत विचार करा.

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B_8zs...

इरसाल तुम्ही कोणते चित्र टाकले आहे मला दिसत नाही.

इरसाल's picture

30 Aug 2011 - 4:20 pm | इरसाल

अरे देवा....................................
सगला मुसल केरात.

गणपा's picture

30 Aug 2011 - 6:06 pm | गणपा

जागु's picture

30 Aug 2011 - 4:59 pm | जागु

इरसाल म्हणजे काय ?

मी इतकी मेहनत घेवून जे वर बनवले ते सगळे पाण्यात गेले म्हणून बोललो कि " सगला मुसल केरात".
ती मेल बघ तुला मग समजेल सगळं.

पल्लवी's picture

2 Sep 2011 - 9:46 pm | पल्लवी

जरा आठवडाभर नव्हते तर काँट्रॅक्ट रेडी !
आणि "company will think to bear charges" ??!!
पण ठीके..बराबर वसुली की जायेगी.
उद्घाटन कधी करायचं म्हणे ?

सुहास झेले's picture

30 Aug 2011 - 5:10 pm | सुहास झेले

वाह वाह... तोंपासु :) :)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Aug 2011 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

हे मत्स्यकन्ये,
श्रावण संपला आहे. तरी आता एखादा शाकाहारी पदार्थ दिलास तरी हरकत नाही ;)

गणपा's picture

30 Aug 2011 - 6:10 pm | गणपा

=)) =))

रेवती's picture

30 Aug 2011 - 10:22 pm | रेवती

हा हा हा

प्राजु's picture

30 Aug 2011 - 6:21 pm | प्राजु

मस्तच!!!

@ परा : मी तुझ्या अशाप्रकारच्या कॉमेंटची वाटच बघत होते. :)

राजकुमार मला परीसारखे पंख आलेत आणि पाण्यातो पोहतेय असा भास झाला. श्रावण संपल्यावर आम्ही बोकड कोंबड्यांची सुरवात करतो. तेंव्हा आता त्याच्यासाठी तयार रहा.

गणपा पार्टनरशिप मंजुर.

सुहास, प्राजू धन्यवाद.

इरसाल, गणपा आत्ता निट पाहील अ‍ॅग्रिमेंट. धन्य आहात.

सानिकास्वप्निल's picture

30 Aug 2011 - 9:54 pm | सानिकास्वप्निल

हा हा हा अ‍ॅग्रीमेंटची कल्पना सॉलिड आहे...भारी आवडली...
खरचं धन्य आहात :)

शुचि's picture

31 Aug 2011 - 5:54 am | शुचि

:)

मी मत्स्याहारी नाही तरी असं वाटतय की पापलेट आणि सुरमई हे मत्स्यप्रेमींचे अशक्त बिंदू असावेत.
खरं तर फोटू बघून मलाही ही प्रकार ट्राय करावासा वाटतो आहे.

रेवती मत्स्यहार्‍यांमध्ये तुझ स्वागत आहे.

जाई.'s picture

30 Aug 2011 - 11:40 pm | जाई.

मी कुठलेच फोटो बघितले नाहीत
फक्त वर्णन वाचले

आणि अशाप्रकारे मी सर्व विकारावर जय मिळवून उद्याच्या उपासाची सिध्दता केली आहे.

आशिष सुर्वे's picture

30 Aug 2011 - 11:46 pm | आशिष सुर्वे

जल्ला ह्यो पाप्लेट कालजाक चीरुन गेला बगा..
स्रावनात काय ओ जीवाक घोर लावताय!
भरला पापलेट ह्यापरुस येगळा अस्तो काय?

शुचि's picture

31 Aug 2011 - 5:04 am | शुचि

ए काय ग जागु असे खमंग चुरचुरीत तुकड्यांचे फोटो टाकतेस :(

सहज's picture

31 Aug 2011 - 6:27 am | सहज

मुळ धागा, सुनीलरावांची टीप, गणपाचे अग्रीमेंट, पराची कॉमेंट सगळेच...

संदीप चित्रे's picture

31 Aug 2011 - 8:05 pm | संदीप चित्रे

पापलेटच्या अनेक रेसिपींपैकी भरलं पापलेट म्हणजे .. भरलं पापलेट!
आता पुढचा मासा कुठला असेल बरं? :)

संदीप कालच केले होत भरल पापलेट. आता थोड्याच दिवसांत टाकते रेसिपी.

सहज, शुची धन्यवाद.

पल्लवी's picture

2 Sep 2011 - 9:51 pm | पल्लवी

तू डबा पाठवत नैस. मी येते म्हटलं तर पत्ता देत नैस. :(
जौंदे..बिज्जनेश चालु झाला की बघुन घीन.
पापलेटं भारी न दिसून सांगतायेत कुणाला..तुझ्या हाती कुठलीही डिश भारीच दिसणार !

btw, उद्या उकडीचे मोदक ट्राय करणारे.. आशीर्वाद असावा ! :)

पल्ले पहीला साष्टांग नमस्कार घाल.

आणि तू घरी आल्याशिवाय मी काही देणार नाही.

पण आज राहवले नाही.

तोंपासू

नुसते बघून समाधान मानलेला मत्स्यप्रेमी- चिंतामणी

चिंतातुर जंतू's picture

5 Sep 2011 - 10:37 am | चिंतातुर जंतू

युरोपमध्ये सोल म्हणून जो मासा मिळतो तो पापलेटाऐवजी वापरता येतो. पापलेटसारखाच जरी लागत नसला तरी आकारानं सपाट, पांढर्‍या रंगाचं नाजुक चवीचं मांस असलेला हा मासा एक पर्याय म्हणून परदेशातल्या मंडळींना विचारात घेता यावा असं वाटतं. विशेषतः कॉमन सोल किंवा डोव्हर सोल हा इंग्रजांच्या देशी कुठेही मिळतो. त्यावर विकीपीडिआत हे म्हटलं आहे:

Chefs prize Dover sole for its mild, buttery sweet flavour and versatility and for its ease of filleting. The fish yields fillets that hold together well in a variety of recipes.