मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
26 Aug 2011 - 9:32 am
गाभा: 

मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी.

एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अ‍ॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अ‍ॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो.

परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता.

आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अ‍ॅव्हरेज वाढ होणार होती. अ‍ॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अ‍ॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्‍या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला.
त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी.

लागोपाठ तिन वेळा अ‍ॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०)

प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अ‍ॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अ‍ॅव्हरेज मिळाला होता.

प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2011 - 9:41 am | चेतन सुभाष गुगळे

मोटरसायकलची टाकी समोर असते. जेव्हा आपण वाहन उन्हात उभे करतो तेव्हा बरेच इंधन वाफ रुपाने बाहेर पडते. सरासरी धाव अजूनच कमी होते.

पाषाणभेद's picture

26 Aug 2011 - 10:11 am | पाषाणभेद

ते तर खरेच आहे. पण काल पेट्रोल कंटेनर मध्ये होते. नुकताच पाऊस पडून गेलेला होता. अन मिळालेला ९० किमी चा अ‍ॅव्हरेज ७५ किमी पर्यंत कमी करण्यासाठी 'तांत्रिक तॄटी' गृहीत घेतल्या गेलेल्या आहेत.

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2011 - 11:37 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही डबल सीट की सिंगल सीट प्रवास करता यावरही हे अवलंबून असते. १०० सीसी मोटरसायकलचा प्रिस्क्राइब्ड पेलोड साधारण १३० किग्रॅ असतो. तेवढा लादून मग काढलेली सरासरी धाव नोंद करावी.

उदय के'सागर's picture

26 Aug 2011 - 10:05 am | उदय के'सागर

माझं नाशिक ... वॉव!!!! :)

निनाद's picture

26 Aug 2011 - 11:25 am | निनाद

सर फोटो कुठे आहेत त्रंबकेश्वर रस्त्याचे?

फोटो? फोटो?? फोटो???
पाहिजे! पाहिजे!! पाहिजे!!!

मराठी_माणूस's picture

27 Aug 2011 - 12:29 pm | मराठी_माणूस

सहमत. पाभेजी खरेच तिकडचे निसर्ग सुंदर फोटो टाका.

शाहिर's picture

26 Aug 2011 - 11:29 am | शाहिर

माझी सी बी झेड फक्त ४० सरासरी देते..

जळली माझी

सीबीझेड आणि पल्सर वगैरे बाईक्स या अ‍ॅव्हरेजसाठी थोड्याच असतात साहेब?

१०० सीसी बॉक्सर घेऊन फिरणे आणि १५० / १८० /२२० सीसी सीबीझी / पल्सर घेऊन फिरणे..फरक नाही का त्यात?

काहीतरी प्रीमियम म्हणून पण चीज असते ना हो ?

(संसारी १०० सीसीवाला) - गवि.

वपाडाव's picture

29 Aug 2011 - 11:23 am | वपाडाव

(संसारी १०० सीसीवाला) - गवि.

ही गाडी गविंना खेचते यातच तिचे अ‍ॅव्हरेज आले....

सुनील's picture

26 Aug 2011 - 11:31 am | सुनील

फारच किचकट पद्धत आहे बॉ तुमची!

आमची पद्धत अशी -
१) टाकी फुल्ल करायची आणि मीटरचे रीडींग घ्यायचे.
२) सुमारे शे-दिडशे किलोमीटर गेल्यावर पुन्हा टाकी फुल्ल करायची. फुल्ल करताना किती पेट्रोल टाकले गेले याची नोंद करायची.
३) क्रमांक १ आणि २ मधीर रीडींगवरून सरासरी काढायची.
४) असे तीन्-चार वेळा करायचे आणि अंतीम सरासरी काढायची.

प्रत्येक वेळी शे-दिडशे किमी नंतर सरासरी काढली जाते यांत सर्व प्रकारच्या वाहतुकीचा समावेश होतो - शहरातील गर्दी, मोकळा रस्ता, हाय वे इ. त्यामुळे येणारे उत्तर हे वास्तवाला अधिक जवळ जाणारे असते.

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2011 - 11:41 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही सूचविलेली पद्धत चारचाकी वाहना करिता अत्यंत योग्य आहे. दुचाकी वाहनाची टाकी पूर्ण भरली तर प्रवास करताना इंधन कधी कधी बाहेर येऊन वाया जाऊ शकते. त्याकरिता वाहन रिजर्व वर आले असता ५ लिटर इंधन भरून पुन्हा रिजर्व वर येई पर्यंतचा प्रवास किमी मध्ये मोजावा व त्यास ५ ने भागावे ही अत्यंत सोपी सुटसुटीत पद्धत. हल्ली अनेक वाहनांच्या टाक्या बर्‍याच मोठ्या असतात त्यामुळे ५ ऐवजी ८ / १० / १२ लिटर इंधन ही भरू शकता. फक्त टाकी संपूर्ण भरल्यास इंधन बाहेर येणार नाही ही काळजी घ्यायला हवी.

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 2:58 pm | शैलेन्द्र

इंधन पुर्ण भरायच म्हणजे पेट्रोलच्या नळीच्या फर्स्ट लॉकपर्यंत भरायचं..

माझी नवीन यामाहा sz
शहरात साधारण ४५ आणि महामार्गावर ५०देतेय

माझी नवीन यामाहा sz

स्पा's picture

26 Aug 2011 - 3:06 pm | स्पा

;)

ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक विषय आला, खुप छान वाटलं, माझी पहिली गाडी सुझुकी हिट १२५ सिसि, पुणे सिटिमध्ये ६५ किमिप्रलि पर्यंत द्यायची टँक फुल मेथडने, नंतर मिंटी ( पॅलिओ -१.१) सिटित १५ किमिप्रलि तर हायवेला १७.५ किमिप्रलि देते, सन्माननीय अपवाद - मागच्या वर्षीची गोवा ट्रिप १८.५ किमिप्रलि.

सध्या नवि रेड मर्क्युरी २२० सिसि बजाज अ‍ॅव्हेंजर पहिल्या सर्विसिंग नंतर ४० किमिप्रली देते आहे.

माझं कोणतीही गाडी चालवणं अतिशय सभ्यपणाचं आहे, त्यामुळं हे असे हेवा वाटावा अस्या अ‍ॅव्हरेजनं गाडी चालवणं शक्य होतं.

याबाबत वल्ली, मालोजीराव, धमु, सुर्यपुत्र यांचे विचार ऐकण्यास उत्सुक.

पाषाणभेद's picture

26 Aug 2011 - 12:38 pm | पाषाणभेद

आपली व सुनिल यांची अ‍ॅव्हरेजची काढण्याची पद्धत सारखीच आहे. चेतन गुगळे म्हणतात त्या प्रमाणे हवामान (उन, उष्णता, पेट्रोल उडून जाणे) आदी. गोष्टींमुळे समाधानकारक/ आदर्श (idle) स्थिती प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही.
म्हणून इंजीनचे पर्यायाने गाडीचे अ‍ॅव्हरेज काढण्यासाठी कोठेतरी एकमत करावे लागेल. त्यामुळे १००ml पेट्रोल घेवून अ‍ॅव्हरेज काढणे योग्य आहे. अर्थात यातही रस्त्याची स्थिती, रहदारी, चालवण्याचा स्पिड, पद्धत, वाहकाचे वजन आदी गोष्टी गृहीत धराव्याच लागतील.

याचमुळे कालच्या चाचणीत मी खालील गोष्टी केल्या:
१. मी स्व:ता माझीच गाडी चालवली.
२. सरासरी ४०KMPL स्पिड ठेवला.
३. कमी रहदारीच्या रस्त्याने गाडी चालवली.
४. काल उन्ह, वारा जास्त नव्हता.
५. रस्ता समाधानकारक, खड्डे विरहीत होता. (१० चा १२ होता.)
६. तिसर्‍या चाचणीच्या वेळी अ‍ॅव्हरेज १००किमी झाला (वाढला) कारण मी उताराला इंजीन बंद करत होतो. (जुन्या बॉक्सरला हे स्विच आहे.). यामुळे इंजीन योग्य प्रकारे कार्य करत आहे हेही सिद्ध झाले.

मी हे जाणतो की शहरात असल्या अ‍ॅव्हरेजला व असल्या चाचणीला वाव नसतो. शहरात तो कमी मिळेलच. म्हणूनच मी सरासरी मिळालेला ९०KMPL चा अ‍ॅव्हरेज ७५KMPL धरला आहे.

मी सुद्धा जाणकारांचे मते जाणून घ्यायला उत्सूक आहे. त्याचप्रमाणे नविन मोटरसायकल आता घ्यावी का? असाही प्रश्न पडला आहे.

वपाडाव's picture

29 Aug 2011 - 11:27 am | वपाडाव

पण काही चुकांची दुरुस्ती करु इच्छितो
>>>गोष्टींमुळे समाधानकारक/ आदर्श (idle) स्थिती प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही.>>> IDEAL
>>>२. सरासरी ४०KMPL स्पिड ठेवला.>>> kmph

प्रचेतस's picture

26 Aug 2011 - 2:22 pm | प्रचेतस

माझी पल्सर साधारण ५५ किमी पर्यंत सरासरी देते. अर्थात हल्ली पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, झालेला चिखल, निसरडे रस्ते यामुळे हल्ली गियर्स आणि ब्रेक्सचा वापर जास्त करावा लागतोय त्यामुळे ह्या सीझन पुरता तरी ५० पर्यंत खाली आलोय.

पेट्रोल जर सकाळी भरले तर थोडेसे जास्त पेट्रोल येते असे आमचे मत जे चुकीचेहीअसू शकेल(पेट्रोलची घनता पहाटे/सकाळी सर्वाधिक असते). १ लिटरमागे एका किलोमीटरचा तरी फरक पडावा. अर्थात अजून सरासरी काढून पाहिली नाहीये.

नवि रेड मर्क्युरी २२० सिसि बजाज अ‍ॅव्हेंजर

विनायक प्रभू's picture

26 Aug 2011 - 2:36 pm | विनायक प्रभू

गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा.

daredevils99's picture

26 Aug 2011 - 3:23 pm | daredevils99

गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा.

कोणाला?

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 3:27 pm | शैलेन्द्र

मास्तर, रस्त्यावर चालणार्‍या गाडीचाच ना? नाहीतर व्यनी करायचो नी पोपट व्हायचा..

विनायक प्रभू's picture

26 Aug 2011 - 4:14 pm | विनायक प्रभू

सर्व गाड्या रस्त्यावरच धावतात.
व्य.नि. केल्यागेल्या आहे.

विजुभाऊ's picture

26 Aug 2011 - 4:45 pm | विजुभाऊ

मास्तर एक शंका आहे गाडीला स्टेपनी असेल तर अ‍ॅव्हरेज वाढते की स्टेपनी नसल्यास अ‍ॅव्हरेज वाढते ?
तुमचा मौलीक अनुभव उपयोगी पडेल

विनायक प्रभू's picture

26 Aug 2011 - 5:05 pm | विनायक प्रभू

काय विजुभौ?
स्टेपनी आणि अ‍ॅवरेज चा संदर्भ जोडताय.

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 5:38 pm | शैलेन्द्र

विजुभौना असं विचारायचय की स्टेपनी वापरताना अ‍ॅव्हरेज चांगला मिळतो की रेग्युलर टायरवर चांगला मीळतो.. मला वाटत रेग्युलर टायरवर चांगला मिळावा.. तो रुळलेला असतो ना.. तरी आपली कमेंट ऐकायला आवडेलच..

पिवळा डांबिस's picture

27 Aug 2011 - 12:21 am | पिवळा डांबिस

गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा.
मास्तर, गाडीला ओव्हर ऑयलिंग करून चालवल्यास अ‍ॅव्हरेज वाढेल का हो?
तुमचे मत व्यनि करा

(बाकी फटफटीला काही लोक गाडी का म्हणतात हे मला अजिबात कळलेलं नाही!!!:))

शैलेन्द्र's picture

27 Aug 2011 - 1:17 am | शैलेन्द्र

रस्त्यालाच ओवर ऑइलींग केल तर?

विनायक प्रभू's picture

27 Aug 2011 - 9:38 am | विनायक प्रभू

ओव्हर ऑयलिंग करुन चालवली की अ‍ॅवरेज वाढते हे 'वैश्विक सत्य' आहे.
अवांतरः वै.स. ही आजकाल्ची मिपावरची फॅशन आहे.

पिवळा डांबिस's picture

27 Aug 2011 - 11:06 am | पिवळा डांबिस

ओव्हर ऑयलिंग करुन चालवली की अ‍ॅवरेज वाढते हे 'वैश्विक सत्य' आहे.
आता फटफटीला काही लोक गाडी का म्हणतात तेही सांगाल का गुरुवर्य?
:)

विनायक प्रभू's picture

27 Aug 2011 - 2:55 pm | विनायक प्रभू

नवी असते तेंव्हा गाडीच म्हणतात.
अगदी ५० सी सी मोपेड सुद्धा गाडी म्हटली जाते.
एकदा जुनी झाली ती गाडी आवाज करु लागते.
तेल पाणी वंगण न झाल्यामुळे (आणखीन एक वैश्विक सत्य)
मग तीला फटफटी म्हणतात.

पिवळा डांबिस's picture

28 Aug 2011 - 9:58 am | पिवळा डांबिस

:)

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 2:46 pm | शैलेन्द्र

मस्त धागा..

१०० मिली पद्धतीपेक्षा वर उल्लेख आलेली रीझर्व्ह ते रीझर्व्ह ही योग्य पद्धत आहे, कारण यात सगळ्या प्रकारच्या परीस्थीतीचा अ‍ॅव्हरेज मिळतो.

अजुन एक, जर दुचाकीला चांगला अव्हरेज हवा असेल तर टाकी शक्यतो भरलेली ठेवावी म्हणजे पेट्रोल उडत नाही.

चारचाकीसाठी, हायवेवर (मुंबै- पुणे किंवा पुणे- बंगलोर सारखा) गाडीने १००-१२० चा स्पीड घेतला की न्युट्रल टाकावा (गाडी बंद करु नये, पॉवर ब्रेक असतील तर फेल होतात,) गाडी हळु हळु स्पीड कमी होत ३-४ की मी चालते, ) अस करत गाडी ८० पर्यंत येवु द्यावी, परत पाचव्या गियरमधे उचलावी. पुन्हा हळु हळु १२० वर नेवुन न्युट्रल करावी. २-३ किमीने अ‍ॅव्हरेज वाढतो.

गणेशा's picture

26 Aug 2011 - 3:00 pm | गणेशा

रीझर्व्ह ला आली गाडी की पेट्रोल भरायचे.. पुन्हा रिझर्व ला आली की ती किती किलोमिटर पळाली ते कळते आणि कीती पेट्रोल भरले होते हे माहित असल्याने अ‍ॅवरेझ काधतो...

तरीही माझी गाडी कमी अ‍ॅवरेझ देते का आजकाल असा प्रश्न उपस्थीत होण्याआधीच, मी येथील पेट्रोल भेसळयुक्त आहे , म्हणुन पेट्रोलपंपच बदलतो.

apache 150 cc : पुण्यात ५० ते ५५ किमी अ‍ॅवरेज
मुंबईत ४२-४८ अ‍ॅवरेज ..
स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर

गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर जर ठेवलास न तर कधीच चांगला अवरेज मिळणार नाही.
४०/५० किमी/तास ह्यावर अतिशय योग्य किंवा जास्त अवरेज मिळतो. स्पीडोमीटरवर पण ४० ते ५० अशी हिरवी रेघ मारलेली असते.

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 4:06 pm | शैलेन्द्र

८०-९० वर जे मिळत ते ४०-५० वर कधीच मिळत नाही हो.. खरं तर या सगळ्या गाड्यांना आता एक अजुन वरचा गियर हवाय..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Aug 2011 - 6:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मुंबईत ४२-४८ अ‍ॅवरेज ..
>>स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर

तुम्ही नक्की मी राहतो त्याच मुंबईत वाहन चालवता ना ? इथे 3० चा स्पीड घेता आला तर आनंदाने नाचतात म्हणे लोकं, तुम्ही कायम रात्री ११ नंतरच चालवता की काय बाईक ?

दुसरा मुद्दा म्हणजे, मुंबईत कुठल्याच रस्त्यावर ८०-९० हा ग्राह्य वेग नाही. म्हणजे तुम्ही कायमच नियम मोडता ? मग पोलिसांनी पकडले तर नियमानुसार दंड भारता की तोडपाणी करता ? ;-)

माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६० अ‍ॅव्हरेज देत असावी.
आठवड्याला साधारणतः २ लिटर पेट्रोल लागते.
मात्र मागचे ६ महिने पेट्रोल भरायचे वेळच आलेली नाही

daredevils99's picture

26 Aug 2011 - 3:21 pm | daredevils99

मागचे ६ महिने पेट्रोल भरायचे वेळच आलेली नाही
मे मागचे ६ वर्षे पेट्रोल भरलेले नाही कारण माझ्याकडे बाईकच नाही.

शाहिर's picture

26 Aug 2011 - 7:40 pm | शाहिर

माझी ( खर तर वडिलांची ) हीरो होंडा सी डी १०० ...आज वर किमि : १,४०,००० ( फार नाही हो ..झाली तीला सुद्धा १२ वर्षे ) अजुन ६०-६५ अ‍ॅव्हरेज देते ..

(आणि ( माझी ) सी बी झी ४० ला मेटा कुटी ने टेकते )

पण पोरि सी डी १०० .म्हणला कि नाक मुरडतात :(

जुने ते सोने !!

मी-सौरभ's picture

27 Aug 2011 - 12:02 am | मी-सौरभ

माझ्याकडे पण ह्याच दोन गाड्या आहेत. पण या दोन्ही गाड्यांची तुलना करण चुकीच आहे....
सीबीझी चालवल्यावर सीडी १०० एकदम लहान वाटायला लागते :)

मला पण रेसेर्वे ते रेसेर्वे पद्धतच सोपी वाटते.

विनायक प्रभू's picture

27 Aug 2011 - 10:59 am | विनायक प्रभू

दोन वेगवेगळ्या पॉवर च्या गाड्या चालवल्यानंतर हे फील येणारच.

मी-सौरभ's picture

27 Aug 2011 - 11:17 pm | मी-सौरभ

आपल्या सारख्या अणुभवी लोकांनी अनुमोदन दिल्यावर तर खात्रीच पटली की

'दोन वेगवेगळ्या पॉवर च्या गाड्या चालवल्यानंतर हे फील येणारच.'

शाहिर's picture

30 Aug 2011 - 7:34 am | शाहिर

गाडी नुसार मुलिंचे प्रमाण कमी जास्त होत असल्याचा अनुभव ....

५० फक्त's picture

26 Aug 2011 - 9:02 pm | ५० फक्त

''चारचाकीसाठी, हायवेवर (मुंबै- पुणे किंवा पुणे- बंगलोर सारखा) गाडीने १००-१२० चा स्पीड घेतला की न्युट्रल टाकावा (गाडी बंद करु नये, पॉवर ब्रेक असतील तर फेल होतात,) गाडी हळु हळु स्पीड कमी होत ३-४ की मी चालते, ) अस करत गाडी ८० पर्यंत येवु द्यावी, परत पाचव्या गियरमधे उचलावी. पुन्हा हळु हळु १२० वर नेवुन न्युट्रल करावी. २-३ किमीने अ‍ॅव्हरेज वाढतो.''

- का उगा नवख्या डायवरना आत्महत्या करायला लावताय २-३ किमिच्या अ‍ॅवरेज साठी, कोणत्याही स्पिडला गाडी अचानक न्युट्रल करणे म्हणजे, ६० फुटावर दिसत असलेल्या शताब्दि समोर रुळ ओलांडणे. गाडि चालत असताना, बंद करणे हे एक कारण सोडुन कधीहि न्युट्रल करु नये, इंजिन ब्रेकिंग हा एक मोठा फायदा घालवुन बसतो, आणि बहुतेक नव्या गाड्यांना ४-५ (पेट्रोल, व्हिस्टा, फिगो, पोलो, व्हेरिटो - पेटरिटो) व बहुतेक सगळ्या डिझेल गाड्यांना ५ गिअर हा ओवरड्राइव्ह असतो, म्हणजे बाकी गिअर १ : १.२ / १.३ असे असतील तर हे गिअर १ : ०.९५ असे असतात, त्यामुळे या गिअर मध्ये साधारण ५-१० सेकंद गाडी एकाच स्पिडला चालत असेल तर मायक्रोप्रोसेसर इंजिन आर्पिएम कमि करुन वापरले जाणारे इंधन कमी करतात, हा प्रयोग पुर्ण मोकळ्या रस्त्यावर करुन पाहता येईल, पण गाडीला टॅकोमिटर हवे त्यासाठी.

बाकी उपाय परत..

शैलेन्द्र's picture

26 Aug 2011 - 9:39 pm | शैलेन्द्र

तुम्ही सांगीतलेली गोष्ट माझ्या गाडीत तरी होत नाही.. जसे १०० च्या स्पीडला साधारण २७००-२८०० आर पी एमलाच गाडी चालत राहते. मी न्युट्रल केली की १००० आर पी एमला येते व इंजीन ब्रेकऐवजी गाडीच्या घर्षनाने वेग कमी होत जातोच. तसही ब्रेक दाबताना क्लच दाबला की इंजीन फ्री होते.
तुम्ही सांगीतलेला धोका मला तरी कधी जाणवलेला नाही, पण नवीन ड्रायव्हरने हे आपल्याला जमत का ते एकदा आजमावुन बघाव हे चांगल.

खेडूत's picture

26 Aug 2011 - 9:06 pm | खेडूत

'त्या' कंपनी चे वाहन घ्यायचे नाही असे फार आधीपासून ठरवले होते. मग हीरो होंडा सी डी शंभर घेतली आणि ती चौदा वर्षे मस्त चालू आहे. मेंटेनन्स जवळ जवळ नाही पण मायलेज मोजले तर ६५/ लि मिळते. (जगात सगळे लिटर्स पर १०० कि मी का बघतात कोण जाणे!)
मायलेज मोजायची शास्त्रीय पद्धत आपल्याला घरी वापरणे शक्य नाही, प्रत्यक्षात exhaust पण अभ्यासावा लागतो त्यामुळे गाडीची कार्यक्षमता कळते. मग रिज़र्व ते रिज़र्व ही त्यातल्या त्यात चांगली पद्धत आहे. सर्व प्रकारचे रस्ते आले पाहिजेत आणि घाट चढ़ उतार पण. शिवाय दोन्ही चाकाताल्या हवेचा दाब योग्य हवा. गाडी वरचे वजन पण सारखे हवे. शिवाय पेट्रोल चा दर्जा पण महत्वाचा आहे. नाहीतर दर वेळी वेगळे मायलेज!

अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा आणखी गमतीदार प्रकार आहे. भल्या भल्या उत्पादकांना आजही प्रॉब्लेम आहे. (टाकी चा आकार अनियमित असल्याने) त्यामुळे मोटारींच्या मायलेज वर तर थेट परिणाम होतो!

खेडूत

अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा आणखी गमतीदार प्रकार आहे. भल्या भल्या उत्पादकांना आजही प्रॉब्लेम आहे. (टाकी चा आकार अनियमित असल्याने) त्यामुळे मोटारींच्या मायलेज वर तर थेट परिणाम होतो!

फुल टु सहमत. सध्या माझ्या गाडीत हाच लोचा आहे. टाकी फुल केली की दुसर्‍या दिवशी टाकी ३/४ रिकामी दिसते तर कधी अर्धीच दिसते.
(आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोत. लेकाचा नक्कीच नळी टाकुन स्वतःच्या बाईकसाठी इंधन काढत असणार.)
म्हणुन सध्या टाकी फुल करुन मायलेज काढणे चालु आहे.

माझीही शॅम्पेन's picture

27 Aug 2011 - 12:52 pm | माझीही शॅम्पेन

आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोत

बाब्बो ! ड्रायव्हर मूळे तुमच्या "गाडीचा" मायलेज कमी होतोय ! सांभाळा !!! :)
(कृ ह घ्या)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Aug 2011 - 2:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आणि अशा प्रकारे शॅम्पेन भाऊ यांनी सिक्सर मारला आहे.

''मायलेज मोजायची शास्त्रीय पद्धत आपल्याला घरी वापरणे शक्य नाही,'' दोन वेगळ्या गोष्टी आहेत, fuel economy and fuel efficiency, तुम्ही म्हणताय ते fuel efficiency दुसरं आणि जनरली आपण मायलेज किंवा अ‍ॅवरेज म्हणतो ते fuel economy,

fuel efficiency - हि फक्त इंजिनची टेस्ट असते जी फॅक्टरी मध्ये आणि भारतात एआरएआय / डिआर्डिओ करतात, ह्याचा संबंध प्रदुषण रेटिंगशी असतो, बिएस ३/ ४ वैग्रे.

@ वल्लि, इंधनाची घनता डायरेक्ट मायलेजवर परिणाम करत नाही तर, आपल्याला मि़ळणा-या इंधनाच्या क्वांटीटिमध्ये फरक पडतो, पण हा लक्षात घेण्याजोगा नसतो, पण याचा थेट परिणाम पेट्रोलपंपाच्या उत्पनावर होतो, वर्षाचा हिशोब केला तर, या फरकानं ते सगळ्या कर्मचा-याचा एक महिन्यांचा पगार वरच्यावर काढतात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2011 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेट्रोल उडालं (evaporate) तरी ते टाकीतच रहाणार ना? स्कूटर उन्हात लावल्याने काय फरक पडणारे?

सुनीलशेटची पद्धत, टाकी फुल करुन मायलेज काढणे, सोपी आणि (जास्त सांपलिंग असल्यामुळे जास्त) अचूक वाटते.

शैलेन्द्र's picture

27 Aug 2011 - 12:12 am | शैलेन्द्र

गाडी चालवलीय कधी? मला वाटल तुम्ही फक्त राकेट उडवता( ह घ्या शक्यतो)

गाडीच्या(बाइक) पेट्रोल टाकीवर, झाकनाला एक बारीक होल असत, त्यातुन हवा आत जाते.. ही हवा पेट्रोल इंजीनमधे जाण्यासाठी आवश्यक असते, जर ते होल नसेल तर पेट्रोल टाकीत पोकळी निर्माण होवुन इंधन खाली जाणार नाही. पण याच होलमधुन इव्हपोरेट झालेले पेट्रोल बाहेर उडुन जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2011 - 1:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गाडी चालवलीय कधी? मला वाटल तुम्ही फक्त राकेट उडवता( ह घ्या शक्यतो)

"गाडी" चालवण्याचा आणि मला पडलेला प्रश्न पडण्याचा फार काही संबंध नसावा, थोऽडी बुद्धी चालवली तरी प्रश्न पडू शकतात. पण अगदीच विचारलंत म्हणून सांगते, सोळाव्या वर्षी "गाडी" चालवण्याचा परवाना मिळत नाही, म्हणून नाही चालवलेली.

गाडीच्या(बाइक) पेट्रोल टाकीवर, झाकनाला एक बारीक होल असत, त्यातुन हवा आत जाते.. ही हवा पेट्रोल इंजीनमधे जाण्यासाठी आवश्यक असते, जर ते होल नसेल तर पेट्रोल टाकीत पोकळी निर्माण होवुन इंधन खाली जाणार नाही. पण याच होलमधुन इव्हपोरेट झालेले पेट्रोल बाहेर उडुन जाते.

स्पष्टीकरण नीटसं कळलं/पटलेलं नाही.
स्कूटरच्या पेट्रोलटाकीच्या झाकणावर मलातरी आत्तापर्यंत भोक दिसलेलं नाही (पण इथे माझं दुर्लक्ष झालेलं असण्याची आणि/किंवा हे भोक नजरेस पडण्यासाठी सूक्ष्म असण्याची शक्यता गृहीत धरली तरी) आणि उन्हात अधूनमधून स्कूटर उभी करूनही लक्षात येण्याइतपत सरासरी कमी झाल्यासारखं दिसलं नाही. पुन्हा तुम्ही म्हणता ते मान्य केल्यास, हे उडणारं पेट्रोल एवढं कमी असेल की स्कूटरची सरासरी कमी झाल्याचं फार काटेकोर मोजल्याशिवाय हे दिसणार नाही.
जर हे भोक अस्तित्वात असेल तर या भोकात सेमी-परमिएबल व्हॉल्व्ह बसवणं शक्य आहे काय?
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार, तर तिथून पेट्रोलटाकीत हवा जात नाही काय?
चारचाक्यांमधेही हीच प्रणाली असते का वेगळी प्रणाली असते?

डान्रावांकडे काही 'आतली' बातमी असल्यास त्यांनी कृपया मदत करावी.

आणि एक थोडासा अवांतर प्रश्नः पेट्रोलटाकी पूर्ण भरली की पेट्रोल भरणं आपोआप थांबतं हे भारतातही सर्रास दिसतं का?

इंटरनेटस्नेही's picture

27 Aug 2011 - 1:41 am | इंटरनेटस्नेही

डान्रावांकडे काही 'आतली' बातमी असल्यास त्यांनी कृपया मदत करावी.

हेच म्हणतो.

शैलेन्द्र's picture

27 Aug 2011 - 2:01 am | शैलेन्द्र

आता उगीच कळुन न कळल्यासारख..

जर गाडी चालवत असाल तर एक गम्मत करुन बघा.. एखादी प्लॅस्टीकची पिशवी पेट्रोल टाकीवर ठेवुन मग तीच्यावर झाकन लावा (आपण प्लॅस्टीक टाकुन बाटलीचे झाकन लावतो तसे).. काय होतं ते मला नक्कि सांगा..

"उन्हात अधूनमधून स्कूटर उभी करूनही लक्षात येण्याइतपत सरासरी कमी झाल्यासारखं दिसलं नाही. पुन्हा तुम्ही म्हणता ते मान्य केल्यास, हे उडणारं पेट्रोल एवढं कमी असेल की स्कूटरची सरासरी कमी झाल्याचं फार काटेकोर मोजल्याशिवाय हे दिसणार नाही"
आता कीती पेट्रोल उडते ते पेट्रोल उडण्यासाठी किती जागा आहे त्यावर अवलंबुन असते. जितकी टाकी रीकामी तितके उडणार.. कधी खुप गाडी चालवुन तिच झाकण उघडलयं? फस्स असा आवाज येतो.. ती पेट्रोलची वाफ असते. गाडीची पेट्रोल पातळी बघायला कधीही मेनबत्ती किंवा काडेपेटी वापरु नये.. ते यासाठीच.
फोर व्हीलरसाठीसुद्धा हीच पद्धत वापरतात. फोर व्हीलरमधे पेट्रोल डीलेव्हरीसाठी फ्युएल पंप असतो तर दुचाकीत ते काम साधे गुरुत्वाकर्षन करते.

"इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार, तर तिथून पेट्रोलटाकीत हवा जात नाही काय?"
कशी जाईल? अशी जर हवा जायला लागली तर कॉम्ब्युशन व ईंजीन प्रेशर कमी नाही का होणार? गाडीला ताकद कशी मिळेल? मी इंजीनीअर नाही पण इंजीन हे एका अर्थी "सिलड" सीस्टीम असते इतके सांगु शकतो.

"आणि एक थोडासा अवांतर प्रश्नः पेट्रोलटाकी पूर्ण भरली की पेट्रोल भरणं आपोआप थांबतं हे भारतातही सर्रास दिसतं का?"
पेट्रोल पंप नवा असेल तर दिसतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2011 - 3:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरोखरच समजत नाहीये. गाडी चालवण्याच्या आणि एकंदरच आळसामुळे आत्तापर्यंत वाचनही केलेलं नाही.

एखादी प्लॅस्टीकची पिशवी पेट्रोल टाकीवर ठेवुन मग तीच्यावर झाकन लावा (आपण प्लॅस्टीक टाकुन बाटलीचे झाकन लावतो तसे).

सध्या फक्त रिकाम्या पार्किंगमधे गाडी* "उडवते" ;-) पण प्रयोग करून बघायला हरकत नाही.

आता कीती पेट्रोल उडते ते पेट्रोल उडण्यासाठी किती जागा आहे त्यावर अवलंबुन असते. जितकी टाकी रीकामी तितके उडणार.. कधी खुप गाडी चालवुन तिच झाकण उघडलयं? फस्स असा आवाज येतो.. ती पेट्रोलची वाफ असते.

गाडी खूप चालवून पेट्रोल कोणत्या कारणांमुळे जास्त इव्हॅपरेट (मराठी शब्द?) होईल:
१. जसजशी जास्त हवा पेट्रोलटाकीत जाईल तसंतसं त्या हवेतली पेट्रोलची संपृक्तता कमी होईल.
२. पेट्रोलटाकीचा आकार पर्यायाने पेट्रोलचं पृष्ठीय क्षेत्रफळ. पेट्रोलटाकीचा आकार वर निमुळता, खाली पसरट असा असेल तर जसजसं पेट्रोल कमी होत जाईल तसतसं इंधनाचं पृष्ठीय क्षेत्रफळ वाढेल आणि म्हणून इव्हॅपरेशनचा वेग वाढेल.
३. तापमान वाढलं तर इंधनाच्या रेणूंची गतिज ऊर्जा जास्त असल्यामुळे इव्हॅपरेशन वाढेल.
आत्तापर्यंत मी बर्‍यापैकी चालवलेल्या वाहनाची इंधनक्षमता साधारण पाच लिटर होती आणि एका वेळेस जास्तीतजास्त १५ किमी चालवली असेल. ही कारणं आणि स्कूटरीत बर्‍यापैकी पेट्रोल असावं या सवयीमुळे मला इव्हॅपरेशन फारसं जाणवलं नसावं. त्यातूनही १ किमीच्या खाली गणित करण्याच्या भानगडीत मी पडले नाही.

स्कूटर खूप चालवून पेट्रोलटाकीचं झाकण उघडलेलं नाही. उघडलं असतं तरी आजूबाजूच्या ध्वनीप्रदूषणामुळे वाफेचा फस्स आवाज ऐकू येण्याची शक्यता नगण्यच असावी.
पण जर पेट्रोलचा फस्स आवाज येतो, याचा अर्थ वायूरूप पेट्रोल कोंडलं गेलं आहे. पण एवढंच नाही, फक्त तापमान वाढल्यामुळेही साध्या हवेच्या रेणूंची गतीज ऊर्जा वाढल्यामुळेही कोंडल्या गेलेल्या हवेचा आवाज येऊ शकतो. उदा: प्रेशर कुकर.

गाडीची पेट्रोल पातळी बघायला कधीही मेनबत्ती किंवा काडेपेटी वापरु नये.. ते यासाठीच.

माझ्यासारखे घाबरट्ट लोकं पेट्रोलटाकी रिकामी असेल तरी तिथे आगीचा वापर करणार नाहीत. ;-)

इंजीन हे एका अर्थी "सिलड" सीस्टीम असते

मग इंधनाचं ऑक्सिडेशन होण्यासाठी हवा/ऑक्सिजन मिळणार कुठून?

*ही चारचाकीच आहे.

तुमच्या पैकी एक जण इंधन बाष्पीभवन उडून जाइल त्यामुळे सरासरी इंधनक्षमतेवर फरक पडेल असं सूचित करीत आहेत, तर दुसरे यामुळे फारसा फरक पडणार नाही असं सांगताहेत.

दोनो अपनी अपनी जगह पे (अपनी अपनी टूव्हीलर पे) सही हो।

ज्या वाहनाची टाकी हॅंडल ते आसन या दरम्यान उंचावर बसविलेली असते, त्या गाड्या उन्हात उभ्या केल्यास इंधनाचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. या गाड्यांच्या इंधन टाकीवर वेगळे आवरण नसते. टाक्या धातूच्या असतात. धातू उष्णतेचे सुवाहक असल्याने ही उष्णता इंधनापर्यंत पोचते. टाक्या सूर्यप्रकाशाला जास्त प्रमाणात सामोर्‍या (एक्स्पोज होतात) जातात व हे वाहन उन्हात फिरत असतानाही होतेच.

ज्या वाहनाची टाकी आसनाखाली असते, त्या गाड्या उन्हात उभ्या केल्यातरी इंधनाचे बाष्पीभवन फारसे होत नाही. धातूची टाकी आसनाने झाकलेली असते. आसन फायबर, फोम अशा अधातूंचे असल्याने व ते उष्णतेचे दुर्वाहक असल्याने फारशी उष्णतेची झळ इंधनाला बसत नाही. शिवाय उन्हात फिरतानाही अशा वाहनांची टाकी सूर्यप्रकाशाला सामोरी जात नाही. आसनावर बसलेल्या व्यक्तिमुळे इंधनाला बसणारी इंधनाची झळ अजुनच कमी होते. जसे की टोपी घातल्याने आपल्या डोक्याला उष्णता कमी प्रमाणात जाणवते.

त्यामुळेच आदर्श पद्धतीत मोटरसायकल (टाकी उंचावर असणारे) हे वाहन जास्त इंधन क्षम असले तरी व्यावहारिक पद्धतीत स्कुटर (आसनाखाली टाकी असणारे) वाहनही तूलनेने फारसे मागे पडत नाही.

वपाडाव's picture

29 Aug 2011 - 11:56 am | वपाडाव

इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार, तर तिथून पेट्रोलटाकीत हवा जात नाही काय?

ओ बै, टाकी कुठं, कार्बुरेटर कुठं अन इंजिन कुठं....
कायबी लावलंय उगाच....
टाकीतुन पेट्रोल कार्ब्युरेटर मध्ये येते...
तिथे पेट्रोल अन हवा यांचे मिश्रण (यथायोग्य प्रमाणात) केल्या जाते....
अन ते मिश्रण नंतर इंजिनमध्ये ढकलले जाते अन स्पार्क प्लग त्यामध्ये आग लावुन ते जाळतो
व त्या उर्जेने पिस्टन ढकलल्या जाते....
टाकी अन इंजिन यांत साधारणत: १ ते १.५ फुटाचे अंतर असते....
बाकी चर्चा खवत.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2011 - 6:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार

बरं बरं, तुम्ही म्हणता तर इंजिनात पेट्रोल जळताना तिथे हवेशी अजिबात संपर्क न येता पेट्रोल जळतं, तुम्ही म्हणता तर ते बरोबरच असणार.

टाकीतुन पेट्रोल कार्ब्युरेटर मध्ये येते... तिथे पेट्रोल अन हवा यांचे मिश्रण (यथायोग्य प्रमाणात) केल्या जाते....

तिथे हवेशी संपर्क येतो तर तिथून हवा पेट्रोल टाकीच्या आत जाण्याची सोय का असत नाही? या डिसाईन*मधे काय गडबड होते?

अन ते मिश्रण नंतर इंजिनमध्ये ढकलले जाते अन स्पार्क प्लग त्यामध्ये आग लावुन ते जाळतो

आमच्या ट्रकचा स्पार्क प्लग चोरला असणार कुणीतरी, काल शोधला पण मिळाला नाही. कोणा आगलाव्यांच्या कृपेनेच आता ट्रक चालत असणार.

टाकी अन इंजिन यांत साधारणत: १ ते १.५ फुटाचे अंतर असते....

कोणत्या वहानात? टाकीच्या तळापासून दीड फूटात माझी स्कूटर संपायची आणि चारचाकीचं इंजिन पेट्रोल टाकीपासून एक-दीड फूटावर असेल तर मग माझीच टेप गंडली असणार.

(शास्त्रीय लिखाण उत्तम भाषेत कसे करावे, लोकांना समज़ावून कसे सांगावे, प्रश्नांची यथायोग्य उत्तरं कशी द्यावीत यासाठी वरच्या प्रतिसादाला पुलित्झर प्रतिसाद मिळावा अशी मागणी मी रामलीला मैदानावर, उपोषणासहित करणार आहे.)

*श्रेय अव्हेर - छोटा डॉन.

इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार

बरं बरं, तुम्ही म्हणता तर इंजिनात पेट्रोल जळताना तिथे हवेशी अजिबात संपर्क न येता पेट्रोल जळतं, तुम्ही म्हणता तर ते बरोबरच असणार.

दोन्हीही वाक्ये आपलीच आहेत. तरीही - जेव्हा कार्ब्युरेटर मधुन हवा अन पेट्रोल जर मिसळल्यानंतर ते इंजिनात जाते असे सांगितले, याचाच अर्थ ते हवेसोबत (आणी सोबतच (संदर्भ : ज्वलनासाठी O2 ची गरज असते) ) जळते....

तिथे हवेशी संपर्क येतो तर तिथून हवा पेट्रोल टाकीच्या आत जाण्याची सोय का असत नाही?

हा प्रवास बराचसा एकमार्गी असतो. कारण एकदा फ्लो सुरु झाला तर त्यात बाधा येत नाही. (हवेचे बुडबुडे उलटमार्गी जाउ शकणार नाहीत.)

आमच्या ट्रकचा स्पार्क प्लग चोरला असणार कुणीतरी, काल शोधला पण मिळाला नाही. कोणा आगलाव्यांच्या कृपेनेच आता ट्रक चालत असणार.

अगदीच असंबद्ध....
मी जाणीवपुर्वक उत्तरे देत आहे अन हा खट्याळ/अवखळपणा, फक्त आपल्याकडुनच अपेक्षित....
मी उत्तरे इतर मिपाकरांचे निरसन व्हावे या हेतुने देत आहे. यात रस्सीखेच करु नये असे वाट्टे...

टाकीच्या तळापासून दीड फूटात माझी स्कूटर संपायची आणि चारचाकीचं इंजिन पेट्रोल टाकीपासून एक-दीड फूटावर असेल तर मग माझीच टेप गंडली असणार.

हे अंतर मी फक्त त्या २ स्थानातील फरक दर्शविण्यासाठी वापरले आहे....
ते व्हर्टिकलच असावे असे नाही, हॉरिझाँटलही असु शकते.....

शैलेन्द्र's picture

30 Aug 2011 - 12:47 am | शैलेन्द्र

चार चाकी व दुचाकीत फरक असतो.. दुचाकीत अजुनही कार्बोरेटर वापरतात, नव्या चार चाक्या मात्र एम पी एफ आय व व्हेपोरायझरसह येतात.. डीझेल इंजीन बहुदा स्प्रिन्कलर पद्धतीने काम करते, नक्कि माहीत नाही.

बाकी जीथुन पेट्रोल येत तिथुनच हवा का जात नाही हे कळण्यासाठी, एक बारिक बुचाची बाटली पुर्ण पाण्याने भरुन मग उलटी करावी.. पाणी थांबुन थांबुन पडते.. का?

"का" चे उत्तर देण्याइतके ज्ञान आदितीतैना नक्किच आहे.. क फुकाचि शाइ नासवा कॉम्प्युटरची..

(इंजीनीयर नसलेला) शैलेन्द्र.

आशु जोग's picture

26 Aug 2011 - 10:28 pm | आशु जोग

हु श्श्श्श

आशु जोग's picture

26 Aug 2011 - 10:30 pm | आशु जोग

आमच्या अमरावतीला या एवरेज चांगले मिळेल कदाचित

न्युटनचे नियम जरा बदलतात

आशु जोग's picture

26 Aug 2011 - 10:42 pm | आशु जोग

तुमची बाई कमला आवडली

छोटा डॉन's picture

27 Aug 2011 - 11:04 am | छोटा डॉन

पाभे, तुमचा प्रयोग आवडला.
साध्यासोप्या पद्धतीने गाडीचे मायलेज काढायची ही पद्धत नेटकी आणि कमी वेळ खाऊ आहे हे मान्य.

पण गाडीच्या मायलेजमध्ये अजुन बर्‍याच गोष्टी येतात.
मी शक्य तितक्या सोप्या पद्धतीने हे सांगायचा प्रयत्न करतो.

समजा तुम्ही १ किलो वस्तुमानाचे इंधन वापरुन प्रति किलोग्रॅम १०० किलोज्युल्स एवढी उर्जा मिळणारे इंधन वापरत आहात. तर त्या इंधनाच्या ज्वलनातुन तुम्ही इंजिनातुन साधारणता ९०-९५ किलोज्युल्स उर्जा निर्माण करत आहात ( साधारणाता १ किलो इंधन जळाल्यावर किती उर्जा मिळते ह्यावर ते इंध्न किती श्रेष्ठ आहे ते ठरत असते, अर्थात कुठलेच इंधन हे १००% जळत नसल्याने ( कंबशन इफिशियंसी < १ ) आपल्याला जेवढी अपेक्षीत असते त्यापेक्षा कमीच उर्जा ह्या ज्वलनातुन मिळते ).
आता आपलाल्या मिळालेल्या ह्या ९५ किलोज्युल्सचे विभाजन ३ भागात होते
१. ब्रेक पावर ( आपल्याला जी अ‍ॅक्च्युअल पावर मिळते ती, एचपी वगैरे) : ३५%
२. एक्झॉस्ट लॉसेस ( एक्झॉस्ट मधुन बाहेर पडणार्‍या गरम वायुबरोबर वाया जाणारी उर्जा ) : ३०-३५%
३. कुलन्ट, फ्रिक्शन, पॅरेसायटिक लोड्स (एसी आणि तत्सम उपकरणे ) & इतर लॉसेस : ३०-३५%

म्हणजे तुम्हाला ह्या १ किलो इंधनाच्या ज्वलनातुन जी १०० किलोज्युल उर्जा मिळ्णार आहे त्यातली फक्त ३५% म्हणजे ३५ किलोज्युल उर्जा तुम्हाला ब्रेक पावर म्हणजे गाडी चालवण्यासाठी मिळणार आहे.
त्यातही तुम्ही ही ३५% उर्जा कशी वापरता ह्यावर तुमच्या गाडीचे मायलेज तुम्ही मोजणार हीच गंमत आहे.

इंजिन डिझाईनच्या परिभाषेत हे मायलेज 'ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कंन्झंप्शन' ह्या गुणोत्तरात मोजतात
ब्रेक स्पेसिफिक फ्युएल कंझंप्शन = इंधन ज्वलन क्षमता (ग्रॅम्/सेकंद) / इंजिन एचपी

थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्हाला १ किलोवॅट इतकी पावर निर्माण करायला ( अर्थात मी ब्रेक पावर म्हण्जे जी आपल्याला गाडी चालवायला उपयोगाला येते ( सर्व लॉसेस सोडल्यानंतर ) किती इंधन लागते ह्यावर हे मायलेज येते.

कंपन्या जेव्हा जाहिरात करतात तेव्हा त्यांचे तिथले मायलेज नेहमीच लै भारी असते कारण ते ज्या कंडिशनला ही चाचणी घेतात तो त्या इंजिनच्या 'बी एस एफ सी कर्व्ह'चा बेस्ट इफिशियंसी रिजन असतो. कृपया खालील ग्राफ पहा म्हणजे त्यात तुम्हाला बर्‍याच गोष्टी समजतील.

छायाचित्र आंतरजालावरुन साभार ....

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ४०-५० ह्या स्पीडमध्ये सर्वोत्तम मायलेज मिळते ही गोष्ट खरी आहे व म्हणुनच स्पीडोमिटरमध्ये तसे झोन्स दाखवले असतात.

असो, हे फारच टेक्निकल झाले.
चांगले मायलेज मिळवण्याचे सोपे उपाय :
१. सर्वात महत्वाचे म्हणजे गाडी नेहमी उत्तम कंडिशनला ठेवणे ( फ्रिक्शन लॉसेस, एक्झॉस्ट लॉसेस कमी होतात, कमी होतात म्हणजे कंपनीने डिझाईन केलेल्या फिगरपेक्षा पुढे जात नाहीत )
२. चांगल्या दर्जाचे इंधन वापरणे
३. गाडी नेहमी एका 'साधारण बेस्ट इफिशियंसी रिजन'मध्ये चालवणे.
४. जास्त वेळ थांबायचे असल्यास 'आयडल' मध्ये न ठेवता इंजिन बंद करणे ( आयडलिंगमध्ये ठेवल्याने फ्युअल वाचते हा एक मोठ्ठा गैरसमज ).

असो, तुर्तास एवढेच, बाकी अजुन वाटले तर खरडेन ... :)

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2011 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> जास्त वेळ थांबायचे असल्यास 'आयडल' मध्ये न ठेवता इंजिन बंद करणे <<
दुचाकी आणि चारचाक्यांसाठी गाडी किमान किती वेळ असता बंद केली तर optimum efficiency मिळेल? Order of magnitude उत्तर?

चेतन सुभाष गुगळे's picture

28 Aug 2011 - 10:47 am | चेतन सुभाष गुगळे

६० सेकंद किंवा त्याहून अधिक थांबणार असाल तर वाहन बंद ठेवा. त्यापेक्षा कमी वेळ थांबणार असाल तर वाहन बंद करू नका, कारण त्यावेळेत खर्च होणार्‍या इंधनापेक्षा पुन्हा वाहन सुरू करायला जास्त इंधन खर्च होणार हे नक्की. शिवाय पुन्हा वाहन सुरू करताना विद्युत घटावर ताण येतो तो वेगळाच.

काही चारचाकी (व काही नवीन दुचाकी देखील) वाहनांमध्ये याहून जास्त सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यांचे आयडलिंग फ्युअल कंझंप्शन इतके कमी आहे की तुम्ही १२० सेकंद देखील वाहन सुरू ठेवू शकता. अर्थात असा काही बदल असेल तर तो वाहन पुस्तिकेत नमूद केलेला असतो. वाहन पुस्तिके त ही माहिती नसल्यास ६० सेकंदाचा कालावधी ग्राह्य धरण्यात येतो.

अनेक ठिकाणी वाहतूक नियमन दिव्यांपाशी काऊंट डाऊन सेकंद्स दर्शविलेले असतात, त्यामुळे किती काळ वाहन पुढे जाऊ शकणार नाही हा ही अंदाज येतो.

पाषाणभेद's picture

28 Aug 2011 - 11:16 am | पाषाणभेद

साधकबाधक चर्चा होते आहे. आपल्या व इतरही प्रतिसादातून बरीच तांत्रीक माहीती मिळाली.

सुनिल, Nile, शैलेन्द्र आदींच्यानुसार आपल्या वाहन वापरण्याच्या दररोजच्या सवयीनुसार अ‍ॅव्हरेज काढणे (५० फक्त यांच्या भाषेत fuel economy) योग्य आहे.

पण होते काय की, समजा तुम्ही टाकी पुर्ण भरली अन आठवडाभर चालवली. असे तिन चार वेळा करून मग त्या मायलेजची सरासरी काढली, तर तो झाला तुमचा प्रॅक्टिकल अ‍ॅव्हरेज. यात इंजीन किती कार्यक्षमरित्या कार्य करते आहे हे समजणे मुश्किल आहे. यात इंधन योग्य मापात आहे की नाही, ते उडून जाते की नाही, रस्त्याची ट्रॅफीक आदी अन असंख्य शक्यता, अडथळे, तफावती येवू शकतात. समजा पल्सर चा अ‍ॅव्हरेज ५० असेल तर सिडी१०० चा अ‍ॅव्हरेज ५० असेल. असे होवू शकते. आपण सारेच जण इंजीनाची कार्यक्षमता प्रत्येकवेळी प्रयोगशाळेत मोजूच शकतो असे नाही. त्यामुळे केवळ इंजीनाची कार्यक्षमता मोजण्याचा हेतू जर असेल तर सर्वसाधारण गॅरेजेस मध्ये जी पद्धत अवलंबतात ती योग्य आहे असे वाटते.

या प्रयोगामुळे मिळालेले अ‍ॅव्हरेज हे केवळ प्रायोगिक अवस्थेतीलच आहे हे मान्य करावेच लागते. (त्याचमुळे वर मला आलेले ९०kmpl मी ७५kmpl केले आहे.)

आता थोडे विषयांतरः जर कोणतीही गाडी (यात मोटरसायकल, ४ चाकी व इतर) जुनी (जुन्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलेल) झाली तरीही सर्वसाधारणरीत्या चांगला अ‍ॅव्हरेज देत असेल तर ती गाडी बदलावी का?

दिवसेंदिवस भारतातील वाहनउत्पादक जास्त शक्तिची वाहने बनवत आहेत. जरी त्यात वरचे गियर जास्त असले (पाच, सहा इ.) तरी तितक्या वेगाने भारतातील कोणत्याही रस्त्यावर सातत्याने १० किमी सुद्धा वाहन पळवू शकत नाही हे सत्य आहे. इंजीनाची जास्त ताकद म्हणजेच इंधनाचा जास्त वापर व कमी वेग हे सुत्र आहे. म्हणूनच स्पिडोमिटर च्या हिरव्या भागात ४० ते ५० च्या दरम्यान जास्त मायलेज मिळते.

या वाहनबदलाच्या क्रियेत नविन वाहन केवळ फॅशन म्हणून बदलणे, कमी शक्तीचे वाहन विकून जास्त शक्तीचे वाहन घेणे अभिप्रेत नाही. तसेच कमी शक्तिचे वाहन वापरणे म्हणजे जुनाटपणा झाला किंवा तेच ते जुने वाहन वापरणे म्हणजे कंजुषी आहे असेही अभिप्रेत नाही. कारण दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्याचप्रमाणे आहे ते इंधन काळजीपुर्वक वापरणे हे पण पुढल्या पिढीसाठी इंधन राखून ठेवण्यासारखे आहे.

Nile's picture

27 Aug 2011 - 12:15 pm | Nile

अ‍ॅव्हरेज म्हणजे काय? एक प्रकारची सरासरी. त्यामुळे वाफ होऊन उडून जाणारे इंधन असो की भेसळयुक्त इंधन.

तुम्ही रोजच्या आयुष्यात जशी गाडी वापरता (स्टँडर्ड ऑपरेटींग कंडीशन्स फॉर यू) तशीच वापरता काय सरासरी येईल ते काढा. ते सगळ्याच जास्त वास्तव आहे. समजा आयडिल कंडीशनमध्ये तुमची गाडी डब्बल अ‍ॅव्हरेज देत असेल, तरी त्याचा तुम्हाला काही उपयोग आहे का? तुम्ही काही आयडीयल कंडीशनमध्ये गाडी चालवत नाही.

शैलेन्द्र's picture

27 Aug 2011 - 5:11 pm | शैलेन्द्र

+१००

विनायक प्रभू's picture

27 Aug 2011 - 6:50 pm | विनायक प्रभू

आयडीयल कंडीशनमधे गाडी चालवत नाही.
नाईल ने आणखीन एक वैश्विक सत्य उजागर केले.

शैलेन्द्र's picture

27 Aug 2011 - 7:07 pm | शैलेन्द्र

जाउद्या ना सर आता.. अ‍ॅव्हरेजपेक्षा गाडी चालवायचा आणंद महत्वाचा..

कौन्तेय's picture

28 Aug 2011 - 10:37 am | कौन्तेय

चार चाकी:
५ वेळा [ पूर्ण टाकी (नोंद) ते पूर्ण टाकी (नोंद) ] हे करून त्याची सरासरी काढल्यास वास्तव सरासरी धाव मिळते. पण ही तशी तडजोडच आहे. प्रत्येक वेळेस नवीन नोंद करत मागच्या सरासरीसोबत जुळवून एकूण सरासरी काढत राहिलं म्हणजे अधिक वास्तविक मिळते. पण वास्तव नि सत्य यात फरक राहतोच.

दोन चाकी:
३ वेळा [ रिझर्व (नोंद) ते रिझर्व (नोंद) ] करून सरासरी काढली की वास्तव सरासरी धाव मिळते. हे साहजिकच चार चाकीपेक्षा अधिक सोपं नि नेमकं आहे. पण सत्य नि वास्तव यांतला फरक हा आहेच.

सामान्य माणसाला सत्य काय करायचंय म्हणा? आपला सामना असतो वास्तवाशी (नि महागाईच्या विस्तवाशी). तेव्हा त्याच्याशीच जुळवून घ्यावं हेच सत्य!

पाषाणभेद's picture

28 Aug 2011 - 11:21 am | पाषाणभेद

दोन चाकी:- [रिझर्व (नोंद) ते रिझर्व (नोंद)] हा अ‍ॅव्हरेज मोजतांना ज्या क्षणी वाहन रिझर्वला जाते त्याच क्षणी टाकीत नविन इंधन भरले गेले पाहीजे. त्यासाठी कॅनमध्ये/ बाटलीत टाकीत टाकण्यासाठी इंधन बरोबर असले पाहीजे. (असेच तुम्ही करता ना?)

चेतन सुभाष गुगळे's picture

28 Aug 2011 - 12:12 pm | चेतन सुभाष गुगळे

सोबत बाटलीत इंधन बाळगण्याची गरज नाहीय (शिवाय पेट्रोल बाबत ते बेकायदेशीर कृत्य ठरते). फारच सोपी पद्धत आहे. समजा माझे वाहन १०८९७ वर रिजर्व ला आले आणि रिजर्व तील इंधनावर मी अजून काही किमी प्रवास करु शकत असेल तर तो करत राहावा. वाटेत समजा इंधन भरले तेव्हा १०९१८ असे रीडींग असेल तर त्याची नोंद करण्याचे कारण नाही. पुन्हा समजा वाहन १११९७ वर रिजर्वला आले आणि तुम्ही पुन्हा इंधन १११९९ वर भरले तर इंधन केव्हा भरले याची नोंद करू नकाच.

त्याऐवजी वाहन जेव्हा रिजर्व ला आले अशा दोन नोंदींमधला फरक काढा आणि त्याला पहिल्या वेळी वाहन रिजर्वला आल्यावर तेव्हा भरलेल्या इंधनाच्या क्वांटीटीने भागा. हा आला तुमचा मायलेज.

पाषाणभेद,
प्रथम मला जेव्हा ही पद्धत समजली तेव्हतुमच्यासारखाच मलाही हाच प्रश्न पडला. जे चेतनने इथे सांगितलंय ते मित्रांनी समजावूनही जाम पचेच ना. पण आधी अनुभवांती मग स्वस्थपणे विचार केल्यावर नि मग पुन्हा अनुभवान्ती ते पटलं. तुम्हालाही यथावकाश पटेल. एकच अडचण. गाडी चालवता चालवता कधीही `राखीव' वर येते. पण नेमक्या त्याच वेळेस सोबत वही पेन नसल्याने ते लिहून ठेवले जात नाही. मग नेमकेपणाचे वांदे होतात.
मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल. कुठलाही दुचाकी कंपनीवाला हे आपण होऊन देणारच नाही. हे कुणी तिर्हाईतानेच बाजारात आणले पाहिजे.

चेतन सुभाष गुगळे's picture

30 Aug 2011 - 11:48 am | चेतन सुभाष गुगळे

<< एकच अडचण. गाडी चालवता चालवता कधीही `राखीव' वर येते. पण नेमक्या त्याच वेळेस सोबत वही पेन नसल्याने ते लिहून ठेवले जात नाही. >>

मी लक्षात ठेवतो, नंतर लगेचच्या इंधनपंपावर जेव्हा इंधन भरतो तेव्हा बिल घेणे आणि बिलावर हा किमीचा आकडा लिहीणे (किंवा शक्यतो बिल लिहीणीर्‍यालाच तो लिहायला सांगणे) या गोष्टी आठवणीने करतोच करतो.

<< मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल. >>

दुचाकीचं ठाऊक नाही, पण माझे मित्र श्री. रणजीत फरांदे यांनी फियाट पुंटो ही कार घेतली असून त्यात मायलेज थेट दिसते. त्यात अजुन एक सुविधा म्हणजे चालक बदलल्याची नोंद ही करता येत असून प्रत्येक चालकाने चालवल्यावर येणारं मायलेज वेगवेगळं मोजलं जाऊन या सर्वांची नोंद दिसते.

५० फक्त's picture

30 Aug 2011 - 10:08 pm | ५० फक्त

''मोटर-दुचाकींसाठी हे टिपणारं; किती पेट्रोल कधी भरलं गेलं हे नोंदवणारं नि त्यायोगे आपोआप सरासरी धाव देणारं एखादं ग्याजेट कुणी बाजारात आणलं तर तुफान खपेल';, वर चेतननं सांगितल्याप्रमाणे, आता नविन सगळ्या गाड्यांमध्ये एमायडि असतो, मल्टि इन्फो. डिस्ल्पे, त्यात असले बरेच हिशोब कळतात,

मदनबाण's picture

23 Nov 2011 - 12:23 pm | मदनबाण

दफोराव जालावर वाचन करताना नविन माहिती मिळाली ! ती म्हणजे पेट्रोल मधे अगदी थोडेसे अ‍ॅसिटोन टाकले की,अ‍ॅव्हरेज आणि पावर वाढते म्हणे ! जालावर या विषयावर अनेक मते आहेत..म्हणजे फरक पडतो,नाही पडतो...इं
अधिक माहिती इथे मिळेलः--- http://www.pureenergysystems.com/news/2005/03/17/6900069_Acetone/
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा !