ए.एम.सी.

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
23 Aug 2011 - 3:25 pm
गाभा: 

"ए.एम.सी. म्हणजे काय हो"?
अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट.
"दुसरा काही अर्थ"?
कुठे ऐकलास हा शब्द?
"सहाव्या माळ्यावर गेले होते. तीने कालीकत इडलीचा घाणा टाकला होता. पिठाची आमटी झाली होती. त्या साठी मदत करायला गेले होते. तीच्या मैत्रीणिच्या तोंडातुन शब्द कळला. बहुतेक आपल्या नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती"
अस्स का? विचार करायला लागेल. मग पिठ घट्ट झाले का?
"केले कसे तरी. साधी इडली करायला येत नाही चालली कालीकत इडली करायला".
म्हणजे ११वी १२वी चा बेसिक अभ्यास न करता सी.ई.टी. परिक्षेत १८० मार्क मिळ्ण्याची अपेक्षा.
" जे काही थोडा वेळ होते त्यात एक कळाले अनेक बेसिक मधे खुपच प्रॉब्लेम्स आहेत.
हॅहॅहॅ.
"ते राहु दे. ए.एम.सी म्हणजे काय?
नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती म्हणजे......
हां आल लक्षात. ए मेल चुवानिस्ट किंवा शुवानिस्ट.
"हा काय प्रकार असतो? चुवानिस्ट काय करतो? त्याची लक्षणे काय"?
फार मोठा विषय आहे.म्हटले तर बिरुदावली. म्हटले तर शिवी. म्हटले तर जेनेटीक डीझाईन.
"थोडा फार सांगा. हा चुवानिस्ट कसा काय ओळखावा"?
हे काय तुझ्यासमोर बसलाय.
"काय सांगताय? तुम्ही"?
मघाशी ह्हॅहॅ केले ते एक लक्षण.
"हो क्का? आणखी काही सांगा बघु.
आपण आपल्या बद्दल बोलु या. बघ आपल्याकडे गोकुळाष्टमी झाली. एवढे पाहुणे आले. जवळजवळ सगळे काही तुच केलेस.पाहुणे गेल्यावर घराची साफसफाई करण्यामधे सुद्धा माझा सहभाग काहीही नव्हता. भांडी साफ करायला मदत करु का?
कचरा काढु का? असे विचारल्यावर तु नाही म्हटलस.
"शी. ते काही तुमच काम होते का"?
अस तुला वाटते? पण मी हे करत नाही म्हणुन घरातल्या तरूण स्त्री वर्गाच्या नजरेत मी मेल चुवानिस्ट पिग.
"डुक्कर"?
हो तर. तु सर्व आटोपत असताना मी डुकरा सारख लोळत होतो की. तुझ्या बहीणीचा नवरा मशिन लावुन कपडे धुतो. मला ते तु करु देत नाहीस. म्हणजे तुझ्या बहीणीच्या नजरेत मी एम सी पी. सर्व नजरेचा कारभार.
"पण अशी काही कामे तुला सांगायची नाहीत असे मला लग्नाच्या आधीच मोठ्या जावेने सांगितले होते".
त्याला पण एक कारण आहे. मी घरातला राजकुमार होतो. स्पेशल वन. आणि ते तुला सांगितले नसते तर तु मला करायला दिले नसते हा तुझ्या संस्काराचा भाग. आणखी एक कारण असे की तुला डीश वॉशर वर विश्वास नाही. तर माझ्यावर कसा असणार?
" असु दे हां. मला तु आहेस तसाच बरा आहे. बहीणीला तु आणखी काय काय करु शकतोस हे सांगितले तर ती बेशुद्ध पडेल."
खीखीखी.
"आणखी काही"?
हे अगदी वर वर झाले. ह्या एम्सीपी ची व्याप्ती फार मोठी आहे. कारणे पण असतात. आणि कारण दाखवुन जस्टीफिकेशन पण असते.
"म्हणजे"?
मी एम्सीपी आहे हे जाहीर पणे कबुल करणे सुद्धा एम्सीपी चे लक्षण आहे. सर्वात मोठे कारण असे की स्त्री जिच्यावर जन्मापासुन अवलंबुन असतो तीचे काही क्षणापुरता सुद्धा वर्चस्व सहन न झाल्यामुळे जे वैफल्य पुरुषामधे येते त्यातुन ह्या डुकराचा जन्म होतो.
"अय्या, म्हणजे फक्त बायको नाही"
सर्व जण येतात त्यात. आई, बहीण्,मैत्रीण कोणिही सुटत नाही. स्त्री चा वागण्यात बोलण्यात सतत अनादर हा डुक्कर करत असतो.
"पण तु तसा करत नाहीस"
पातळी वेगवेगळी. ती कमी असेल तर फारसा काही ही प्रॉब्लेम नसतो. आजही मी तुला कधी कधी मंगळसुत्र न घालता, कुंकु न लावलेल्या अवस्थेत बघतो तेंव्हा थोडा अस्वस्थ होतोच की.
"अय्या, हे मला माहीतच नव्हते..
"वरच्या पातळीची उदाहरणे"
नको.
"सांगा हो".
नेटवर उप्स मोमेंट नावाचा प्रकार असतो. बादली भर लाळ गाळुन बघतो. पण त्याच्या शतांश प्रकार आपल्या घरात झाला की तुफानी हल्ला बोल होते. कांदीवलीच्या सिग्नल वर एका डुकराने बाईक वर बसलेल्या लो कट जिन्स मुलीच्या पँटीत मागुन जळती सिगारेट टाकली. पोलीसानी पकडल्यावर वरुन "अपनी शरम संभालनेको नाही आता क्या" असा प्रश्न. अर्थात ही विकृती कडे जाणारी पायरी. व्याख्या अनंत आहे. चौकटी प्रमाणे बदलणारी, जस्टीफिकेशन नुसार वाकणारी.....
पण असे का?
आता नको पुन्हा कधी.

जाता जाता: माझ्या लो लेवल चा तुला त्रास झाला तर एक उत्तम उपाय सांगतो. त्या दिवशी तु मला अहो अशी हाक न मारता 'अ‍ॅहो' किंवा 'आहो अशी हाक मारायची. म्हणजे मला लगेच मेसेज मिळेल.
"हीहीही"

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

23 Aug 2011 - 3:57 pm | श्रावण मोडक

मघाशीच आठवण निघाली होती. मास्तर कुठं दिसत नाहीत असं म्हटलं होतं. आणि इथं हजर!!! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Aug 2011 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तर कुठं दिसत नाहीत असं म्हटलं होतं.

नेटवर उप्स मोमेंट नावाचा प्रकार असतो.
आता कळले का ते आजकाल कुठे बिज्जी असतात ते ?

गवि's picture

23 Aug 2011 - 5:25 pm | गवि

ऊप्स मोमेंट म्हणजे काय?

धन्यवाद.

शाहिर's picture

23 Aug 2011 - 5:43 pm | शाहिर

इमेजेस बघा ..पारणे फीटेल !!

अचानक गड्बड झाली ..जस की नाडी तुटली ..इतर काही सुटले कि जो क्षण येतो त्याला ऊप्स म्हण्तात ओ !!

गूगलून पाहणे हा उपाय आधी करुन पाहिला असता आणि विचारावे लागलीच नसते. पण कचेरीतून ऊप्स असे काही गूगलले तर पुढील सर्व सर्फिंग घरबसल्याच करावे लागेल.

तुमच्या कॉमेंटवरुन आता जरा विषयाचा वैषयिक अंदाज आला. धन्यवाद.

सहज's picture

23 Aug 2011 - 4:50 pm | सहज

व्याख्या अनंत आहे. चौकटी प्रमाणे बदलणारी, जस्टीफिकेशन नुसार वाकणारी.....

:-)

समांतर अवांतर - जयवन्त दळवींचे आत्मचरित्राऐवजी पुस्तक वाचले. आई व काकूंना आयुष्यभर मिळालेल्या वागणुकीबद्दल त्यांनी वडील व काकांचा जाहीर हिशोब घेतला. सिद्धहस्त लेखक नसली तरी आजकालची सगळी मुले किमान ब्लॉग, फेसबुक वापरतात... समझदार को इशारा.. वग्रै वग्रै :-)

प्रियाली's picture

23 Aug 2011 - 5:57 pm | प्रियाली

:-)

तिमा's picture

23 Aug 2011 - 6:08 pm | तिमा

तुमच्या लेखामुळे मी पण ए. एम. सी. आहे हे कळले. लहानपणापासून आईने कधी स्वयंपाकघरात येऊच दिले नाही आम्हा पुरुषमंडळींना. त्यानंतर बायकोही सगळे काम विनातक्रार करणारी निघाली. त्यामुळे घरकामात मदत करायची संवयच नाही. आयुष्य संपत आलं. आता काय संवयी बदलणारेत थोड्याच ? फक्त एक आहे ते म्हणजे मनांत अपराधी भावना असते आणि दुसरे म्हणजे बायकांबद्दल वाईटसाईट कधीच बोललो नाही आयुष्यात.
लेख आवडला.

प्रियाली's picture

23 Aug 2011 - 6:18 pm | प्रियाली

घरकामात मदत करायची संवयच नाही. आयुष्य संपत आलं. आता काय संवयी बदलणारेत थोड्याच ?

सवयी बदलण्याशी वयाचा संबंध नसतो. :-) वयोमानानुसार डायबिटीस आणि ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला तर खाण्यापिण्याच्या सवयी बदलतोच ना मनुष्य?

पण सवयी बदलायला त्रास होत असेल तर लहानसहान मदत करून बघा. कधीतरी काही न बोलता धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घाला, ते कपाटात ठेवा, धुतलेली भांडी जागेवर लावा, कपड्यांना इस्त्री करा किंवा ती तुम्हीच करत असाल तर "तुझ्या कपड्यांना करायची आहे का गं इस्त्री?", असा प्रश्न विचारा बायकोला, बाजारात भाजी खरेदी करायला जा, घरात वस्तू, खेळणी, वर्तमानपत्रे इस्तततः पडली असतील तर जागेवर उचलून ठेवा. जेवून झाल्यावर ओटा, डायनिंग टेबल पुसत जा, घरातले सिंक-बेसिन धुवायला मदत करा.*

स्वयंपाक, लादी-कचरा, धुणी-भांडी या खेरीजही घरात लहानसहान खूप कामं असतात. अनेकदा ती पुरुषमंडळींच्या लक्षात येत नाहीत किंवा आली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण अशा लहानसहान कामांत हात लावल्याने बाईला बरीच मदत होते.

* ही सर्व कामे तुम्हीच करा असे सांगायचा हेतू नाही ;) पण जमतील, रुचतील ती अवश्य करा.

रेवती's picture

23 Aug 2011 - 6:27 pm | रेवती

:)

श्रावण मोडक's picture

23 Aug 2011 - 6:34 pm | श्रावण मोडक

संधी मिळाली की लागली याद्या करायला. ;)

अहो वेळीच याद्या करुन ठेवल्या की कामं पटापट हातावेगळी करता येतात! ;)

(यादीप्रेमी) रंगा यादगार

प्रियाली's picture

23 Aug 2011 - 8:07 pm | प्रियाली

याद्या तयार आहेत हो, बरीच वर्षे झाली बनवून. आता फक्त चोप्य्-पस्ते करते एवढेच. ;)

श्रावण मोडक's picture

24 Aug 2011 - 12:11 am | श्रावण मोडक

तेच अपेक्षीत होतं. खुंटी हलवून बळकट करून घेतली. ;)

प्रशांत's picture

23 Aug 2011 - 10:29 pm | प्रशांत

मला वाटते कि याद्या तयारच असतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Aug 2011 - 6:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इतके सगळे करण्यापेक्षा एखाद्या आय-टी वाईफ मिळवा. आपसूकच सगळी कामे तुम्हाला करायला लागतील आणि मग तुम्ही नॉन ए. एम. सी. व्हाल.
(इथून धूम ठोकून पळून गेल्याची स्मायली)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Aug 2011 - 6:24 pm | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ.

स्पंदना's picture

23 Aug 2011 - 6:24 pm | स्पंदना

आवडल.
पण ही सारी काम न करता ही फक्त तुमच्या वागण्या बोलण्यातुनही तुम्ही शोवानिस्ट नाही हे कळु शकत. उगा लोकांसमोर मदत करायची अन घरात अगदी साध्या साध्या गोष्टीतही निर्णय स्वातंत्र्य न देणारेही खुप जण पाहिलेत मी.

अगदी साध्या साध्या गोष्टीतही निर्णय स्वातंत्र्य न देणारेही
ते तर आहेतच पण बायकोला सगळ्या गोष्टीत स्वातंत्र्य देतो म्हणून स्वत: हापिसच्या कामाशिवाय इकडची काडी तिकडं न करणारेही असतातच.;)
विप्र, लेखन आवडले, समजले......आणि हो, माझा डीशवॉशरवर विश्वास आहे.;)

पण मग ते शोवानिस्ट होत नाहीत ना! त्यांची विशेषणे वेगळी रेवती , अर्थात ती अशी बाहेर बोलुन चालणार नाहीत नाही का?

रेवती's picture

23 Aug 2011 - 6:52 pm | रेवती

नक्कीच होत नाहीत!
मास्तरांनी शोवानिस्ट डुकरांची लक्षणे द्यायचा प्रयत्न केलाय्.........मी इकडची काडी तिकडे न करणार्‍या बैलांबद्दल म्हणत होते.;)

स्पंदना's picture

23 Aug 2011 - 6:59 pm | स्पंदना

हा! हा! हा!
ही ही ही !!!!

ख्यॅक ख्यॅक, अग ठसका लागला ना.

__/\__

चतुरंग's picture

23 Aug 2011 - 6:56 pm | चतुरंग

लेख वाचून डोळे पाणावले. ;)

तसा लहानपणापासून आईला बरीच मदत करत आल्याने डुक्करी अवस्थेत फारसा नव्हतोच, बाकी कसर नंतर हळूहळू भरुन निघालीच! :)

प्रगतीपथावरचा पिगिरंग

लेख आवडला, समजला.

बाकी गप्प बसायचे ठरविले आहे.* :D

*वाक्यसौजन्यः थत्तेचच्चा.

दत्ता काळे's picture

23 Aug 2011 - 7:20 pm | दत्ता काळे

लेख आवडला. नवीन माहिती मिळाली.
घरगुती कामांच्या संख्येनुसार आणि ठरवणार्‍या व्यक्तीनुसार एएमसीपी ठरत असल्याने सुटका नाही.

पैसा's picture

23 Aug 2011 - 7:25 pm | पैसा

प्रत्येकाची व्याख्या वेगळी! पण एकूण लेख आणि प्रतिसाद वाचून गंमत वाटली. त्यातही दोन संपादकांचे एकामागोमाग आलेले प्रतिसाद वाचून आणखी मजा आली.. ;)

प्रभो's picture

23 Aug 2011 - 7:30 pm | प्रभो

मास्तर, आमचा एक रूमपार्टनर पण काही कामं करत नाही.. तो ए एम सी इन मेकिंग म्हणावा काय?? ;)

तुला भेटला असा पार्टनर?
ऑ? ..........असो.
कल्जी घेने.
अवांतर: कालिकत इडलीची पाकृ हवीच आहे हो मास्तर!

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2011 - 8:13 pm | नगरीनिरंजन

पुर्वीच्या पुरुषांचं बरं होतं, कसला त्रास नव्हता. आताच्या पुरुषांना एम. सी. असण्याचा त्रास होतो. :-)

विनायक प्रभू's picture

23 Aug 2011 - 8:52 pm | विनायक प्रभू

@ ननि
आधी ही होती पुढे पण असेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 8:31 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म!

चतुरंग's picture

24 Aug 2011 - 8:43 am | चतुरंग

हे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्यासारखं फक्त 'हम्म्म' म्हणणं बघा कार्यकर्त्यांच!! ;)

-रंगा

खुद के साथ बातां : ते निख्या कुठे दिसत नाही हल्ली. त्याची काय कमेंट आहे ह्या लेखावर कोण जाणे? :?

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2011 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

नाही हो रंगोपंत, नाही! तसं नाही... वॉशिंग मशीन बिघडलं म्हणून धुणं धुतलं, बाजारहाट वगैरे तर मीच करतो, पोरांना शाळेत पाठवायला तयार पण मीच करतो. घराची साफसफाई वगैरे पण माझ्याच कडे असते. एवढं सगळं करून दमतो हो... फार बोलवत नाही मग! म्हणून नुस्तंच हम्म म्हणून गप्प बसलो न् काय!!!

बाकी, तुमच्याकडे कसंय सध्या? ;)

रेवती's picture

24 Aug 2011 - 9:34 pm | रेवती

बाकी, तुमच्याकडे कसंय सध्या?
आत्ता उत्तर द्यायला त्यांना वेळ नाहिये.
कोथिंबीर निवडणार कोण?
जर्रा वेळ मिळाला की लागतात गप्पा मारायला!;)
तरीही तुला म्हणून सांगते.
कालिकत इडली शिकायला पाठवणार आहे त्यांना!

मस्त कलंदर's picture

24 Aug 2011 - 11:00 pm | मस्त कलंदर

ते निख्या कुठे दिसत नाही हल्ली. त्याची काय कमेंट आहे ह्या लेखावर कोण जाणे?

तुम्हाला निदान कोथिंबीर निवडण्यातून थोडा वेळ मिळतो इकडे यायला. आमच्या इथे घर आवरण्यापासून सगळी कामं करायला लागतात ना, त्यामुळे मिपावर यायला वेळच मिळत नाही हो त्याला. तुमचा निरोप कळवते, एकदोन आठवड्यांत उत्तर यायला हरकत नाही.

धमाल मुलगा's picture

25 Aug 2011 - 2:40 pm | धमाल मुलगा

>>नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
आता आलं लक्षात, हल्ली दोघंही फारसे ऑनलाईन का नसता ते. ;)

श्रावण मोडक's picture

25 Aug 2011 - 4:01 pm | श्रावण मोडक

ती पसारा करते, तो आवरतो असा दावा करायचा आहे का तुला? सगळे नवरे सारखेच शेवटी. काय मके? बरोबर की नाही?

धमाल मुलगा's picture

25 Aug 2011 - 4:30 pm | धमाल मुलगा

मास्तर मास्तर,
तुमची मनातली मतं माझ्या वाक्यांवर लादून ते मी तसं म्हणल्याचा आभास का निर्माण करताय? ;)

-धमाल डुक्कर.

आशु जोग's picture

23 Aug 2011 - 10:54 pm | आशु जोग

हे हे इडली इडली

हे हे डूक्कर

आणि
हे हे पँट पँट

हे हे सिगरेट

आशु जोग's picture

23 Aug 2011 - 11:00 pm | आशु जोग

छान आहे लेख

शेवट तर चटका लावून गेला

मीही दिल लगा के वाचला

महागायक काही गाणी बिणी म्हणा की

हे हे

हे हे

नंदन's picture

23 Aug 2011 - 11:18 pm | नंदन

:)

बहुतांशी पुरुष/नवरे 'पिग' असतील म्हणुन मग विवाहीतेला आपल्याकडे Sow चा अपभ्रंश होत सौ. म्हणले जाते का?

का कोण जाणे, पण Sow म्हटल्यावर पहिली आठवण एंप्रेस ऑफ़ ब्लँडिंग्ज़*ची आली. ('सौ.' म्हटल्यावर तशी येत नाही. असो.)

अतिअवांतर: यावरून The Lockhorns या (भांडकुदळ नवराबायकोंबद्दलच्या) वृत्तपत्रीय कॉमिकस्ट्रिपमधला एक प्रसंग आठवला. लोरेटाची नवर्‍याबद्दलची तक्रार: "He never called me 'Babe' till the movie was released."**

(बाकी चालू द्या.)

* दुव्यावरील चित्र प्रेक्षणीय आहे.
** उद्धरण स्मरणातून. शब्दयोजना मुळाबरहुकूम असण्याची कोणतीही ग्वाही देण्यात येत नाही.

विनायक प्रभू's picture

24 Aug 2011 - 11:48 am | विनायक प्रभू

सांगा सांगा
काही...
फीमेल शोवानिस्ट सौ ची
लक्षणे सांगा.

गणपा's picture

24 Aug 2011 - 12:58 pm | गणपा

आमच्या Sow आपल सौ. अधुन मधुन मिपावर डोकावत असतात त्यामुळे सध्या गप्प बसायचे ठरवले आहे.
- (गिनीपीग) गणा

Male Chauvinist Pig या उपाधीत वाईट अथवा अपमानास्पद असे काहीतरी आहे, या गैरसमजापोटी सगळी ओरड आहे.

डुक्कर हा अंतिमतः एक पशू आहे, हे लक्षात घेता, तथाकथित मेल शोवानिष्टास तथाकथित पाशवी शक्तींनी 'आपल्यापैकीच एक' हा दर्जा दिल्याचेच हे द्योतक नव्हे काय? तस्मात्, तथाकथित मेल शोवानिष्टाचा हा गौरव आहे.

येऊ घातलेल्या समानतेची ही नांदी समजता येऊ नये काय? अर्थात तिचे स्वागत करणे हे केवळ उचितच नव्हे, तर प्रत्येक तथाकथित मेल शोवानिष्टाचे आद्यकर्तव्य ठरावे.

गर्व से कहो "ऑइंक! ऑइंक!!"

डूक्कर? व्वा!

मलापण डुक्कर व्हायचंय. लै मज्जा येईल राव.
(ह्यामागचं जैवशास्त्रिय कारण जाणून घेण्याची इच्छा असल्यास इच्छूक/गरजूंनी व्यनि करावेत. खरडीत सांगण्यासारखे नाही. ;) )

राजेश घासकडवी's picture

24 Aug 2011 - 10:27 pm | राजेश घासकडवी

काही लोकांना डुक्कर बिलकुल आवडत नाहीत. का कोण जाणे... ती घाणीत खेळतात, दिसायला फार स्मार्ट नसतात, वगैरे कारणं दिली जातात. पण डुक्कर हा माझा अत्यंत आवडता प्राणी आहे.

बेकन, हॅम, सॉसेज म्हणजे आमचा जीव की प्राण. शिवाय बार्बेक्यू केलेल्या बेबी बॅक रिब्ज म्हणजे तर क्या केहेने! आहा! हे जग डुक्करमय होवो अशी जगन्नियंत्याकडे मनापासून प्रार्थना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 2:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही काही डुकरं आवडतात. विशेषत: ज्यांच्या पोटात नाणी असतात ती!

पंगा's picture

25 Aug 2011 - 3:19 am | पंगा

... पैसे खाणारी डुकरे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 3:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बँकावाली, ही असली डुकरं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Aug 2011 - 7:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ते ३० मिनिटांचे काहीसे म्हणतात, ते का हो कारण ??

धमाल मुलगा's picture

25 Aug 2011 - 7:23 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

आशु जोग's picture

24 Aug 2011 - 10:24 pm | आशु जोग

देख मनिमोहन अन्ना आया

भाग मनिमोहन भाग

विजुभाऊ's picture

25 Aug 2011 - 4:13 pm | विजुभाऊ

डुक्कर हा अंतिमतः एक पशू आहे,
मला तर तो परमेश्वराचा तिसरा अवतार म्हणून माहीत होता.

पंगा's picture

25 Aug 2011 - 6:27 pm | पंगा

...परमेश्वर हा एक पशू आहे.

QED. (Quite Easily Done.)

हॅ हॅ हॅ..
पंगाशेट दरवेळी
(अ = ब आणि ब = क म्हणुन )
अ = क नसतय हो..:)

आता उदा. बघा...
तुमच्या प्रेयसीच तुमच्यावर प्रेम आहे.
आमचं तुमच्यावर प्रेम आहे.
तस्मात
तुमच्या प्रेयसीच आणि आमच एकमेकांवर प्रेम आहे. (?)

पळ्ळा तेज्यायला आता पंगाशेट काय सोडत नाय.............

पंगा's picture

27 Aug 2011 - 5:50 am | पंगा

आता उदा. बघा...
तुमच्या प्रेयसीच तुमच्यावर प्रेम आहे.
आमचं तुमच्यावर प्रेम आहे.
तस्मात
तुमच्या प्रेयसीच आणि आमच एकमेकांवर प्रेम आहे. (?)

हॅ हॅ हॅ...

गणपाशेठ,

उदाहरण किंचित गंडलेय.

प्रेमात सिमेट्री लागू नसते. अ चे ब वर प्रेम आहे म्हणजे ब चे अ वर प्रेम असलेच पाहिजे, असे काही नाही. (५०% प्रेमाबद्दल ऐकलेय की नाही कधी?)

तेव्हा, प्रेमाला ट्रान्झिटिविटी लागू करायचीच म्हटली, तरी (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर, आणि (२) तुमचेही माझ्यावरच प्रेम असून उपयोग नाही. क्रम बदलला पाहिजे.

म्हणजे, एक तर (१) माझ्या प्रेयसीवर माझे, आणि माझ्यावर तुमचे, किंवा, (२) नाहीतर मग तुमच्यावर माझे, आणि माझ्यावर माझ्या प्रेयसीचे प्रेम पाहिजे. ते होत नाही, तोपर्यंत फायदा नाही. (म्हणजे, तुमच्या दृष्टीने. मला काहीच फरक पडत नाही.)

ठीक आहे. तुमच्या सोयीसाठी क्रम थोडा बदलून बघू.

शक्यता १: (१) माझे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे, आणि, (२) तुमचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजेच, ट्रान्झिटिविटीने, तुमचे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे.

ठीक आहे, सो व्हॉट? म्हणजे तिचेही तुमच्यावर प्रेम आहे असा अर्थ (प्रेमात सिमेट्री लागू नसल्याने) होत नाही. मला काय फरक पडतो? बसा एकतरफी प्रेम करत.

शक्यता २: (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे, ट्रान्झिटिविटीने, तिचे तुमच्यावर प्रेम असण्याकरिता (२) माझे तुमच्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. (तुमचे माझ्यावर प्रेम असून काहीही उपयोग नाही. प्रेमात सिमेट्री लागू नाही.)

ठीक आहे, नाही करत जा मी तुमच्यावर प्रेम. काय करताय बोला.

शक्यता ३: तुमचे माझ्या प्रेयसीवर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यात ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.)

हरकत नाही. प्रेमात सिमेट्री लागू नसते हे सांगितलेलेच आहे. पुन्हा, तुमच्या एकतरफी प्रेमाने मला काय फरक पडतो?

शक्यता ४: माझ्या प्रेयसीचे तुमच्यावर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यातही ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.)

ठीक आहे. वेळ येईल तेव्हा बघून घेऊ. तोपर्यंत बसा स्वप्ने बघत.

असो. तर ट्रान्झिटिविटीची मला अडचण नाही. पण मीही तुमच्यावर प्रेम करू शकतो, एवढेच लक्षात ठेवा, म्हणजे झाले, कसें? नाही म्हणजे, तुमचेही कोणावर तरी प्रेम असेलच (मांजरीबिंजरीवर नव्हे. ते उदाहरण फाऊल आहे.), आणि नसले तर करालच कधीतरी, तेव्हा करू बरोबर हिशेब चुकता. काय म्हणता? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2011 - 6:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाटच पहात होते याची.

विनायक प्रभू's picture

27 Aug 2011 - 9:42 am | विनायक प्रभू

सेट थिअरी मधील पंगाचे आधिपत्य हे एक 'वैश्विक सत्य' आहे.

पंगा's picture

27 Aug 2011 - 5:40 am | पंगा

प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवला आहे.