ज्यादा आकाराचे पोस्ट कसे करावेत?

विनीत संखे's picture
विनीत संखे in काथ्याकूट
21 Aug 2011 - 12:01 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी.

मी गेल्या काही दिवसांपासून "करण आणि फ्रेण्ड्स" ही कथा जनातलं मनातलं मध्ये पोस्ट करतोय. जेव्हा मी सुरूवातीला पोस्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा मी ह्याचे "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात मांडणी केली होती. पण नंतर कळले की मिपावर एक पोस्ट साठवताना काही शब्दमर्यादेपुढे सर्व्हर एरर देतो. वास्तविक ही सूचना "नवे ले़खन" पोस्ट करतानाच्या एडिटर वरच असायला हवी होती. कारण मिपाच्या एडिटरममध्ये तर सुरूवातीस माझी संपूर्ण कथा सुद्धा समावली होती. त्यामुळे मला वाटते की एका पोस्ट मध्ये कुठल्याही आकाराची कथा जाईल. पण तसे नाही आहे. त्यामुळे दोन वरून माझे पोस्ट बारा वर पोहोचले आणि अजूनही दहा बाकी आहेत.

अनेक पोस्ट झाल्याने मला सांगण्यात आले की दोन भागांमध्ये वेळ जाऊ द्यावा. पण कथा रहस्यप्रधान आणि वेगवान मांडणीची असल्याने तिच्या दोन पोस्ट मधला वेळ तिची गती.घालवतो आणि वाचकाला सलग आस्वाद घेता येत नाही. कृपया मिपा संपादक मंडळींनी ह्या विनंतीकडे लक्ष द्यावे आणि एका पोस्ट मागे साठवण्यालायक आकार वाढवावा ही विनंती.

आता मी गुगल डॉक्स वर संपूर्ण कथा टाकली आहे आणि त्याची लिंक दिली आहे. पण तसं केल्याने मिपावर संपूर्ण कथा टाकता न अल्याची खंत मला लागून राहिलच.

धन्यवाद.
--- विनीत संखे.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मिपावर एक पोस्ट साठवताना काही शब्दमर्यादेपुढे सर्व्हर एरर देतो.

असे तर काही होत नाही.

आपल्या वरील लेखनात आपण स्वसंपादन करुन भरपूर शब्द असलेले लेखन टाकून पाहा बरं...!
आपल्या लेखनाचा करण आणि फ्रे. भाग भाग २१-२३ तर बराच मोठा आहे, म्हणजे त्यापेक्षाही भाग मोठा करायचा असेल तर मोठा भाग करता येईल ना......!

-दिलीप बिरुटे

विनीत संखे's picture

21 Aug 2011 - 12:17 pm | विनीत संखे

हा एरर आहे... पहा बरं....

Fatal error: Allowed memory size of 67108864 bytes exhausted (tried to allocate 4875278 bytes) in /home/misavcom/public_html/modules/filter/filter.module on line 1001

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखनाचा भाग २१ /२३ आपल्या याच धाग्यात टाकून पाहिला असा काही येरर येत नाही.
दाखवू का आपल्याला आपलेच लेखन टाकून ?

-दिलीप बिरुटे

विनीत संखे's picture

21 Aug 2011 - 12:29 pm | विनीत संखे

दिलीप साहेब, माझा "पूर्वार्ध" हा भाग म्हणजे आतापर्यंत केलेले सगळे पोस्ट एकत्र करून होतो. तेवढं पोस्ट करता येईल का? किंवा तुम्ही २१-२३ ह्या भागाला आठ दहा वेळा त्यातच पेस्ट करून प्रिव्ह्यू पाहा बरं. तुम्हाला हा एरर येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करण आणि फ्रे चे सर्व लेखन एकाच पानावर टाकायचे असे म्हणत आहात काय ?
तसे करुन पाहिले नाही पण तसे करता येईल काय ? पाहतो.

नंतर हा धागा अप्रकाशित करेन.

-दिलीप बिरुटे

विनीत संखे's picture

21 Aug 2011 - 12:42 pm | विनीत संखे

दिलीपसाहेब तेवढंही करायची गरज नाहीए. २१-२३ भागालाच एकामागे एक असं आठ दहा वेळा पेस्ट करा आणि प्रिव्ह्यू पाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली लघु कादंबरी एकाच पानात बसणे शक्य दिसत नाही. आपल्या लेखनाचे २१/२३ भाग साताठ वेळा डकवून पाहिले. आपण म्हणता तसा येरर येत आहे, तेव्हा आपण आपले लेखन असेच टप्प्या-ट्प्प्याने चालू द्यावे. धन्यवाद.

नीलकांत (मिपाचे सर्वे सर्वा) पर्यंत आपले म्हणने पोहचवतो. आपली हरकत नसेल तर आता धागा अप्रकाशित करतो.कृपया उपप्रतिसाद देऊन पोच द्यावी. :)

-दिलीप बिरुटे

विनीत संखे's picture

21 Aug 2011 - 1:26 pm | विनीत संखे

ठीक आहे दिलीप भाउ. आपल्या सहकार्याबद्दल सहर्ष धन्यवाद!

:)

आशु जोग's picture

21 Aug 2011 - 12:24 pm | आशु जोग

>> ज्यादा आकाराचे पोस्ट कसे करावेत?

मोठ्या पोस्ट ऑफिसामधे जाउन

--

(आता कितीही गम्भीर माहिती पूर्ण विषय असला तरी
असाच तिरपागडा पोस्ट टाकायचा असतो)

यकु's picture

21 Aug 2011 - 7:03 pm | यकु

सहमत!

विनित संख्येंना एक विनंती -
कथा पोस्ट करताना त्यात एक-दोन दिवसांचे अंतर सोडले तर त्या जास्त वाचल्या जातील.
सटासट कथा टाकत राहिलात तर चार - दोन वाचकांशिवाय कुणीही वाचणार नाहीत, कारण भडाभड लेखन ओतणारे लोक इथे "डायरिया" झालेले समजले जातात.. मग कथा कितीही चांगली असो, ती वाचली जात नाही.

अर्थात हे फक्त मी फक्त एक सदस्य म्हणून आणि पूर्वी इथे लेखन केले असल्याने, करीत असल्याने त्या अनुभवातून सांगतोय.