नमस्कार मिपाकर मंडळी,
मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे.
जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल?
जर मी भारतात असताना लोन घेतलं तर मला माझ्या भारतीय पगारानुसार महीना ३०००० EMI पर्यंतचे लोन मिळाले असते जे आता NRI to Resident बदलल्यामुळे ४५००० होत आहे (मान्य की भारतात Tenure वाढल्याने EMI कमी होईल पण मुळातच भारतातील पगार कमी असल्याने टेण्युअर वाढ्वुन मिळाले तरीही जास्त काही फरक पडणार नाहिये :-)). मी अजुनही माझे बाकीचे खर्च कमी करुन ही अमाऊंट कवर करु शकेन, पण इथे बँकेचा बेसिक eligibility चा नियम (हातात येणार्या पगाराच्या ५०-६०%) मोडला जात असल्यामुळे पुढे काय होइल ते समजत नाहिये.
आश्चर्याची गोष्ट अशी की कस्ट्मर केअर ला फोन केल्यावर त्यांच्याकडे या situation वर काहीच उत्तर नव्हते. माझी क्वेरी लिहुन घेउन we will get back to you असे सांगण्यात आले आहे.
तेव्हा अशा एखाद्या केसला कुणी मिपाकर सामोरे गेले आहेत काय किंवा अशी situation कुणाच्या नजरेसमोर घडली असल्यास कुणी थोडाफार प्रकाश टाकु शकाल का?
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 12:40 pm | पप्पुपेजर
मी घेतले होते तेंव्हा विचारले होते आता कसे आहे माहित नाही पण माझ्या माहिती प्रमाणे NRE लोन ६ महिन्या नंतर रेसिडेंट मध्ये बदलता येते.(भारतात परतल्यावर).
ELGIBILITY criteria वर काही फरक पडत नाही तुम्ही refinance पण करून घेऊ शकता, अधिक माहितीसाठी व्यनी करा.
17 Aug 2011 - 6:35 am | अंतु बर्वा
व्यनी केला आहे...
16 Aug 2011 - 2:32 pm | कुंदन
इतका विचार करु नका , ओन साईटला मजबुत छापा आणि परत आलत की लोन फेडुन टाका. ;-)
16 Aug 2011 - 3:48 pm | स्पा
परत आलत की लोन फेडुन टाका
३ टक्क्याने का ? :D