गाभा:
शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात.
आम्ही काहीही करू शकतो! तुम्ही कोण विचारणारे? पैसे,ताकद्,सत्ता यांची मस्ती आणी गुर्मी!
शंका होतीच. सरकारला आत्ता जाग आली. अण्णा या दिवसाची मनात तयारी करूनच होते.
सरकारचे अभिनंदन!! असेच आंदोलन चिरडीत रहा.
भारतीय लोकशाही झिंदाबाद!
भारतीय राज्याघटनेचा विजय असो!
केंद्र सरकार झिंदाबाद!
ममो सिंग सरकार आगे बढो!
सर्व देशाचा तुरुंग बनवा.
ज्या लोकांना आणिबाणी ची इतिहासाची प्रत्यक्ष माहीती नाही, त्यांना तर ही इतिहासाची साक्ष होण्याची पर्वणीच.
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 9:45 am | अर्धवटराव
असे काहि होणार नाहि. सत्ताधारी जमात आपल्या भात्यात काय काय अस्त्र ठेवते याचा थांगपत्ता नसतो आपल्याला. मागच्या उपोषणाच्यावेळी सरकार गाफील होते. यंदा त्यांना तयारीला भरपूर वेळ मिळाला होता. सरकारने साम-दाम-भेद वापरून बघितलाय. दंड अण्णांसाठी उपयोगी पडणार नाहि... बाबा रामदेवांची बात और होती.
आता सरकार "ठंडा करके खाओ" हे नित्योपयोगी अस्त्र वापरते कि आणखी काहि ठेवणीतलं अस्त्र काढते याची वाट बघतोय. गुजरात मध्ये गोमांसावरुन सकाळने एक बातमी दिलीय... तेथे धार्मीक गट अस्तन्या सावरुन तयार आहेत म्हणे... बहुतेक काहि लिंक असावी.
(सरकारी) अर्धवटराव
16 Aug 2011 - 10:03 am | कापूसकोन्ड्या
ही घ्या लिन्क
पण या विषयाचे प्रयोजन समजले नाही. कदाचित आपला काही गोंध़ळ झाला आहे का?
16 Aug 2011 - 1:10 pm | गणपा
अर्धवटरावांशी सहमत.
बा कापुसकोंड्या आता बहुतेक सरकार एखादा दुसर्या वादाला कडे लक्ष खेचुन सध्याच्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करेल.
पब्लीक मेमेरी इज व्हेरी शॉर्ट.
अर्थात पुन्हा एकदा आपला गजनी होणार. :)
16 Aug 2011 - 9:58 am | मन१
.
16 Aug 2011 - 10:00 am | चिंतामणी
सरकारचे अभिनंदन!!
16 Aug 2011 - 10:05 am | प्रचेतस
सरकार अधिकाधिक खोल गर्तेत बुडत आहे.
16 Aug 2011 - 10:06 am | प.पु.
आता आमच्या देशात लोकशाही सरकार आहे हे सांगायलाही लाज वाटायला लागली आहे..........
निर्लज्ज आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या सरकारने आणखी एक लोकशाही मार्गाने होऊ घातलेले आंदोलन सुरु होण्याआधीच चिरडण्यात यश मिळवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!!
16 Aug 2011 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
चिरडा चिरडा पूर्ण जोर लावून आंदोलन चिरडा म्हणजेच देश पेटेल. तरच आताशा कुठे कुठे दिसू लागलेल्या मशाली सर्वत्र दिसतील. नाहीतर उगाच पाश्चात्य देशात मेणबत्त्या लावतात म्हणून चालले गाढवासारखे मेणबत्त्या लावायला. खुळे कुठले.
16 Aug 2011 - 11:31 am | प.पु.
पवनेचं आंदोलन पूर्ण जोर लावून चिरडलं, काय झालं?
२ दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घातला,
दोन चार अधिकार्यांच्या निलंबनाच गाजर दाखवलं,
आणि आता सगळ शांत...........
16 Aug 2011 - 11:36 am | श्रीरंग
या अण्णांना अजिबात सोडू नका...
> सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या अतिरेक्यांच्या मित्राला मोकाट हिंडू द्या, जगभर. चित्रपट, जाहिराती, वाट्टेल ते करू द्या.
> अबु सालेम ला बेड्यांशिवाय, ताठ मानेने पोलिसांच्या गराड्यात हिंडतानाची द्रुश्ये पाहून आमचा ऊर अभिमानाने अजूनच भरु दे.
> अफजल, कसाब, यांचा यथेच्छ पाहुणचार करा.
त्या अण्णा किंवा रामदेवला मात्र अजिबात सोडू नका...
16 Aug 2011 - 5:08 pm | मराठी_माणूस
सरकारचे अभिनंदन!
कशासाठी , शेपटी घातल्या बद्दल का?
आख्या देशावर ह्यांची सत्ता आणि मुठभर लोकाना आवरु शकत नाहीत
16 Aug 2011 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात.
सरकार लोकभावनेला टरकले आहे. कोणत्याही अटींशिवाय श्री अण्णा आणि टीमची आज सुटका होण्याची चिन्ह आहेत.
-दिलीप बिरुटे
16 Aug 2011 - 8:44 pm | आत्मशून्य
अण्णा हजारे यांच्यावरील आरोप मागे । दिल्ली पोलिसांनी दिले सुटकेचे आदेश । तासाभरात सुटका होण्याची शक्यता । अण्णांच्या समर्थकांमध्ये देशभरात जल्लोश । सरकार नमले, अण्णा सुटले !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9625601.cms
16 Aug 2011 - 10:42 pm | विकास
अण्णांनी अजून तिहार तुरूंगातून बाहेर येण्यास नकार दिला आहे. कारण ही सुटका कंडीशनल आहे - ३ दिवस उपोषण करा नाही तर दिल्लीतून बाहेर जा.
16 Aug 2011 - 9:58 pm | चिरोटा
अण्णांना अटक करण्याचा निर्णय् नक्की कोणत्या महाभागाने घेतला? आणि २४ तासांच्या आत सोडायचा निर्णय कोणी घेतला? ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांना साष्टांग नमस्कार!! मगाशी कुमार केतकर CNBC१८ वर कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्ता असल्यासारखे घसा फोडून सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते.
16 Aug 2011 - 10:43 pm | विकास
मगाशी कुमार केतकर CNBC१८ वर कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्ता असल्यासारखे घसा फोडून सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते.
असल्यासारखे?
17 Aug 2011 - 9:22 am | कापूसकोन्ड्या
कुमार केतकर आणि निखिल वागळे!
काय बोलणार कप्पाळ!
निखिलजीना भिती वाटते आर एस एस ची आंदोलन भरकटले तर या लोकांच्या हातात जाईल अशी भिती (?) या महाभागांना वाटते.
कुके बद्दल बोलावे तेवढे थोडेच.
16 Aug 2011 - 10:48 pm | जागु
काय होणार आहे पुढे ?
16 Aug 2011 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निलकांत .......... लोकपाल विधेयक, श्री अण्णा हजारे आणि टीम, कॉग्रेस, केद्र सरकार, सिब्बल आणि टीम यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरु करावा की काय असे वाटावे इतके धागे येत असतात तेव्हा एकाच धाग्यात हे सर्व विषय यावेत असे काही करता येईल काय ?
सामान्य माणसाने एकाच विषयावरील आपल्या भावना कुठे कुठे व्यक्त कराव्यात काही कळत नाही.
-दिलीप बिरुटे
(गोंधळलेला मिपाकर )
17 Aug 2011 - 10:12 am | श्रावण मोडक
ही टिप्पणी फक्त धाग्यांपुरती मर्यादित आहे की एकूणच आंदोलनाच्या भरकटलेपणाविषयी असा प्रश्न पडला.
18 Aug 2011 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंदोलनाचे भरकटलेपण आणि आंदोलनासंबधी येणा-या एकामागून एक येणार्या विषयांवरही आहे. स्पेशल काको यांच्या धाग्याबद्दल माझ मत नाही. आपल्याला विविध धाग्यांवर मत मांडायला मिळतं हेच खूप झालं. :)
श्रामो सर, लोकांनी 'संसद की गरिमा' चा विचार आणि घटनेचा आदर केला पाहिजे असं जे लोकसभेतील सदस्यांचं मत आहे त्या मताबद्दल काही वावगं नाही. लोक रस्त्यावर येऊन प्रभावी लोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचार संपेल अशी भाबडी आशा घेऊन श्री अण्णा आणि टीम साठी रस्त्यावर येत आहेत अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहेत, तेव्हा लोकांना हेही कळलं पाहिजे की, आपापल्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी विधेयकाबाबत काय भूमिका घेतली. लोकप्रतिनिधींनी त्या त्या भागातील लोकभावनेचा विचार करुन वि्धेयकाबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपापल्या पक्षावर दबाव टाकला पाहिजे, त्यासाठी काय प्रयत्न केले. लोकप्रतिनिधींना आंदोलनाची धडकी भरली पाहिजे. (अहिंसक मार्गाने) ”जनक्षोभाचा प्रचंड रेटा असल्यामुळे माझ्या मतदार संघात मला जाणं मुश्कील आहे ” अशी अवस्था झाली पाहिजे. असं काही होऊ शकतं काय ? अर्थात गेंड्याची कातडी पांघरुन वावरणा-यांना अशा गोष्टी टोचणारही नाहीत. लोकप्रतिनिधींवर लोकांच्या रेट्यांचा काहीच परिणाम होणार नसतो असे ज्यांना वाटत असेल त्याला भविष्यात आपण कधीच निवडून येणार नाही असं वाटलं पाहिजे तरच जनेतेच्या मनातही ’संसद की गरिमाचा’ आणि लोकशाहीबद्दल जो अविश्वास वाटत आहे त्याबद्दल आदर वाढायला लागेल. काय म्हणता ?
बाकी, पीएम म्हणत आहेत सदरील आंदोलनामागे विदेशी शक्तीचा हात आहे, हे तर लैच झाले राव. सालं या काँग्रेसला दहा-पंधरा वर्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसवलं पाहिजे हो.....!
-दिलीप बिरुटे
19 Aug 2011 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला काही लोकप्रतिनिधींना श्री अण्णांच्या आंदोलनाइतकेच लोकभावनेची नोंद घ्यावी वाटतेय आहे ही खूप चांगली गोष्ट वाट्त आहे. काही पक्षांनी श्री अण्णा आणि टीमचे विधेयक लोकसभेत मांडण्याची तयारी दर्शवली आहे.
-दिलीप बिरुटे
17 Aug 2011 - 8:53 am | कापूसकोन्ड्या
आता मात्र हद्द झाली. लोण्याच्या अपेक्षेने एखादा बोका लहान तोंडाच्या तपेलीत तोंड घालतो आणि ते अडकल्यावर सैरा वैरा धावत सुटतो. तशी सरकारची अवस्था झाली आहे ---.दिसत तर काही नाही. कॉन्फिड्न्स पुर्ण हरवलेला--.मरणाची भिती.! सर्व काही एकदम!
----------
दाती तॄण धरणे म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभवा!
प्रथम साधी अटक १५१ खाली.
नंतर न्यायलयीन कोठडी
मग सशर्त सुटका!
अण्णांची महती काय गावी?
तुरूंगातील बर्याच कैद्यांनी काल रात्री अण्णांच्या सन्मानार्थ एक दिवस संध्याकाळी उपोषण केले.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती हेच खरे.
माननीय अण्णांना विनम्र अभिवादान!!!!!
17 Aug 2011 - 9:05 am | चिंतामणी
तुरूंगातील बर्याच कैद्यांनी काल रात्री अण्णांच्या सन्मानार्थ एक दिवस संध्याकाळी उपोषण केले.
मला एक माहिती हवी आहे. या उपोषण करणा-यांच्यात तुरुंगात असलेल्या अनेक "माननीयांचा" समावेश होता का??
17 Aug 2011 - 9:11 am | कापूसकोन्ड्या
त्याना अगोदरच काही लाख कोटी खाउन अजीर्ण झालेले आहे.
17 Aug 2011 - 9:06 am | चिरोटा
सरकार चांगलेच गोंधळलेले आहे. तुरुंगात टाकले तरी प्रॉब्लेम ,सोडले तरी प्रॉब्लेम. !! त्यात मनिष तिवारी नामक चम्या प्रवक्ता म्हणून बसवलाय. चिदंबरम, सिब्बल चॅनेल्सवर तरी नीट बोलत होते.
बाकी आजचे संपादकीय लेख, म.टा./लोकसत्ता,दिव्यमराठी अगदी अपेक्षेप्रमाणे!!
17 Aug 2011 - 10:34 am | विकास
अण्णांना अटक दिल्ली पोलीसांनी केले. दिल्ली पोलीस हे दिल्ली राज्य सरकारच्या अख्त्यारीत येतात. अटक झाल्यावर, अटकेचे समर्थन करणारे हे केंद्रीय मंत्री होते. नंतर मंत्रीमंडळात नसलेले राहूल गांधी हे पंतप्रधानांना जाऊन भेटतात. त्यानंतर आधी जे सारे अटकेचे केंद्र सरकार तर्फे समर्थन चाललेले असते ते बंद होते आणि त्यांना सोडण्याचे आदेश दिले जातात. आता मुद्दा असा आहे की पंतप्रधानांच्या वर एक राष्ट्रपती सोडल्यास अशी सत्ता कुणाची असू शकते का? शिवाय दिल्लीमधे राष्ट्रपती राजवट आहे का ज्यामुळे केंद्र सरकारने दिल्ली पोलीसांना अण्णांना सोडण्यासाठीचे आदेश दिले (किमान असे बातम्या वाचताना/ऐकताना वाटते)? जर तसे नसेल तर ही लोकशाही पद्धती आहे का?
हे प्रश्न खरेच पडले आहेत. त्याला कदाचीत लॉजिकल आणि योग्य उत्तरे असतील तशी मिळावीत ही विनंती.
18 Aug 2011 - 9:25 am | चिरोटा
१४ दिवसांच्या उपोषणाची मागणी पोलिसांनी(म्हणजे चिदंबरम्,सिब्बल,पंतप्रधान!) मान्य केली.अजूनही काही 'ज्येष्ठ' मराठी पत्रकार 'संसद सार्वभौम,नियमांचे अधिष्ठान' वगैरे फंडे मारत आहेत्!!.संसद सार्वभौम वगैरे सर्वानाच माहित आहे पण गेल्या दोन दिवसांत जो उद्रेक देशभर दिसला त्यामागे सरकारने केलेल्या घोटाळ्यांची पार्श्वभूमी होती. कलमाडीं,राजांना पकडायला अनेक महिने तर अण्णांना पकडायला फक्त काही तास असा संदेश देशभर गेला.मजा म्हणजे मेणबत्तीवाले अशी हेटाळ्णी केली जायची ते लोक रस्त्यावर उतरले होते. आणि सरकारची तात्पुरती का होईना ह्या मेणबत्तीवाल्यांमुळे दातखिळी बसली.
(मराठी) हिंदुहृदयसम्राटांना काय झाले आहे कळत नाही .(http://www.saamana.com) आजचा अग्रलेख वाचून तर सम्राट आणि कंपनी काँग्रेससाठी काम करते की काय अशी शंका यावी.
18 Aug 2011 - 7:49 pm | विकास
(मराठी) हिंदुहृदयसम्राटांना काय झाले आहे कळत नाही .(http://www.saamana.com) आजचा अग्रलेख वाचून तर सम्राट आणि कंपनी काँग्रेससाठी काम करते की काय अशी शंका यावी.
त्यांची भुमिका पटली नाही तरी इतके नक्की म्हणावेसे वाटते की ते बर्याचदा प्रामाणिकपणे बोलतात. :-)
१९९८ साली जेंव्हा अण्णांनी युतीच्या सरकारविरुद्ध शंख फुंकला होता तेंव्हा देखील ते विरोधातच होते आणि विरोधी पक्षातील कॉंग्रेस अण्णांना पाठींबा देत होती. आता केवळ विरोधी पक्षात असल्याने त्यांनी उलट पवित्रा घेतलेला नाही...
याचा अजूनही एक अर्थ होऊ शकतो, त्यांना पुढच्या निवडणूकीत त्यांचा पक्ष जिंकून येईल याची कुठेतरी खात्री आहे. (आणि मग त्यांचेच संत्री-मंत्री लोकपालाच्या कक्षेत आले तर? ;) )
18 Aug 2011 - 7:59 pm | विकास
आत्ताच सामनाचा हा अग्रलेख वाचला. अर्थातच हहपुवा...
अण्णा आणि आंदोलनासंदर्भातील पोकळ टिका जरी पटली नसली तरी, त्यातील एक वाक्य कुठेतरी पटले: आमच्या देशात पीकपाणी कमी व स्वयंसेवी संस्थानामक छत्र्यांचे उत्पादन जास्त वाढले आहे. हे स्वयंसेवी संस्थावाले आंदोलनाचा ‘इव्हेन्ट’ करतात.
असो.
18 Aug 2011 - 10:50 am | नितिन थत्ते
>>अजूनही काही 'ज्येष्ठ' मराठी पत्रकार 'संसद सार्वभौम,नियमांचे अधिष्ठान' वगैरे फंडे मारत आहेत्!!
सध्या तुम्ही अण्णांचे बरोबरच असे म्हटले नाहीत तर तुम्ही भ्रष्टाचार्यांचे साथी ठरणार. :)
18 Aug 2011 - 11:14 am | मराठी_माणूस
सध्या तुम्ही अण्णांचे बरोबरच असे म्हटले नाहीत तर तुम्ही भ्रष्टाचार्यांचे साथी ठरणार
सामान्य जनता ज्या उस्फुर्तते आंदोलनात उतरली आहे , पाठींबा देत आहेत , हे सर्व भ्रष्टाचारी ठरवली जाउ नयेत म्हणुन आहे का ?
18 Aug 2011 - 11:54 am | नितिन थत्ते
नाही. जनता भ्रष्टाचाराला विटली आहे हे खरे. तिला अण्णांचे म्हणणे बरोबर 'वाटत आहे' पण कोणी ते बरोबर नाही असे म्हणताच कामा नये नाहीतर "फंडे मारणे" वगैरे शेलक्या शब्दांचा उपयोग केला जातो.
18 Aug 2011 - 2:29 pm | कापूसकोन्ड्या
सध्या विषय काय चालू आहे? आणि तुम्ही बोलताय काय?
फोकस पहा!
अण्णांनी इतिहास घडवला आहे. ते मान्य करा. छिद्रान्वेशी होउ नका रे बाबा !
काँग्रेस पक्षाचे चुक असताना कायम त्यांचीच बाजू घेतली पाहीजे का?
प्रत्येकाने मनीष तिवारीच व्हायला पाहीजे असा अट्टाहास का?
18 Aug 2011 - 2:50 pm | नितिन थत्ते
>>छिद्रान्वेशी होउ नका रे बाबा !
ही सुद्धा एक प्रकारची मुस्कटदाबीच आहे. :)
>>सध्या विषय काय चालू आहे?
सध्या विषय अण्णांचे आंदोलन आणि जन विरुद्ध सरकारी लोकपाल विधेयक हाच आहे आणि मी त्याविषयीच बोलतो आहे.
19 Aug 2011 - 1:50 am | कापूसकोन्ड्या
>>छिद्रान्वेशी होउ नका रे बाबा !
ही सुद्धा एक प्रकारची मुस्कटदाबीच आहे.
मान्य एखादी अपेक्षा असणे किंवा विनंती जर मुस्कटदाबी वाटत असेल माफ करा आपली मुस्कटदाबी केल्याबद्दल.
19 Aug 2011 - 8:26 am | अर्धवटराव
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ...
हाच आजचा... नव्हे सर्वकाळचा सर्वात मोठा प्रोब्लेम आहे बाबा. काय करणार...
(सूर्य) अर्धवटराव
18 Aug 2011 - 2:32 pm | कापूसकोन्ड्या
प्र.का.टा. आ.
18 Aug 2011 - 4:53 pm | विकास
आणिबाणीच्या काळाप्रमाणेच आत्ता देखील आधी विद्यमान पंतप्रधानांना यात बाहेरील शक्तींचा डाव दिसला, तर आता काँग्रेसला. (The 'foreign hand' made a return to the Congress's lexicon nearly four decades after the party had dubbed the JP movement as a handiwork of external forces. )
19 Aug 2011 - 9:49 am | सुनील
पंतप्रधान आणि सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश यांना लोकपाल कक्षेतून वगळण्याला टीम अण्णांची तयारी - दुवा
मग आता सरकारी विधेयक आणि टीम अण्ना विधेयक यात काय फरक राहिला?
21 Aug 2011 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संसदेच्या स्थायी समितीने संबंधित विधेयकावर जनतेच्या सूचना व शिफारशी मागविल्या आहेत. आपण आपल्या भावना पंधरा दिवसाच्या आत कळवायच्या आहेत. आता कोणत्या पत्त्यावर पाठवायचे वगैरे शोधावे लागेल.
-दिलीप बिरुटे
19 Aug 2011 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंडळी. आज सकाळपासून अनेकांनी पाहिले असेल की प्रभावी लोकपाल विधयकासाठी श्री अण्णा हजारेंचे आंदोलन उपोषणाच्या माध्यमाने सुरु झाले. भारताच्या स्वातंत्र्यांचे आंदोलनाचे साक्षीदार अनेक असतील परंतु ज्यांनी असे आंदोलन पाहिले नसतील अशासांठी स्वयंस्फुर्तीने आज जी आंदोलनाची क्षणचित्र पाहिले असतील त्यांना अशा आंदोलनाची आठवण नक्कीच व्हावी. पाऊस सुरु आहे आणि हजारो तरुण तरुणी वृद्ध स्त्री-पुरुष असे सर्वच या आंदोलनासाठी सहभागी झालेले दिसले. अशा आंदोलनाच्या निमित्ताने कोणी म्हणेल की आंदोलनाला दिशा नाही, क्रांतीसाठी स्वीकारलेला मार्ग चुकीचा असेल, लोकशाहीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अशा प्रकारे दबाव टाकता येत नसेल परंतु आंदोलनाने लोकांमधे एक जागृती आणली आहे. लोकांना वाटतं भ्रष्टाचार थांबला पाहिजे. पारदर्शक सरकार असलं पाहिजे. व्यवस्थेत काही बदल झाले पाहिजे. आणि त्यासाठी केली गेलेली आजची कृती अनेक दिवस न विसरणारी अशी ठरावी असे वाटते.
बाकी, सरकार आता काय करते हे मात्र पाहण्यासारखे आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2011 - 10:01 pm | कापूसकोन्ड्या
शेवटी जे व्हायचे होते ते झालेच.सरकारचे अभिनंदन! अण्णांचे आंदोलन हॅक झाले.
१) लोकसभेत चर्चा होणार पण मतदान नाही.
२) संतोश हेगडे फुटले!
३) स्वामी अग्निवेश पण फुटले!
४) सरकारने यशस्वी राजकारण केले
५) राहूल गांधी आणि फाटे फोडत आहेत. सेशन साहेब त्यांना पाठिंबा देणार आहेत.
६) अण्णांच्या प्रामाणिक पणाचा विजय व्हावा ही आशा शेवटी भाबडीच ठरली.
खूप वाईट वाटते.