आज भारताच्या स्वातंत्र्यदीना निमित्त तसेच रविन्द्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने पुढाकार घेऊन केलेले आपल्या राष्ट्रगीताच्या पाचही कडव्यांचे सुंदर सादरीकरण ऐकायला मिळाले. आपण जर पाहीले नसेल तर ते अवश्य पहावेत! घटनेप्रमाणे केवळ पहीली दोन कडवीच राष्ट्रगीत आहे.
यातील प्रत्येक शब्द नीट ऐकता येत नाही अथवा बंगालीला जास्त जवळ असल्यास कळत नसला तरी त्याचे इंग्रजी भाषांतर देखील दिलेले आहे. ते ऐकताना, नेहमीचा प्रश्न परत डोकावला. टागोर, "भारतभाग्य विधाता" असे नक्की कुणाला म्हणत असावेत? विशेष करून त्यातील शेवटच्या कडव्यातील खालील ओळी आणि त्याचा अर्थ पहा:
Raatri Prabhatilo Udilo Rabichhabi, Purbo Udayo Giri Bhaaley
Gaahey Bihangamo Punyo Samirano, Nabo Jibano Rasho Dhaley
Tabo Karunaaruno Ragey,Nidrito Bhaarato Jagey
Tabo Chorone Noto Maatha
Jayo Jayo Jayo Hey, Jayo Rajeshwaro, Bhaarato Bhaagyo Bidhaataa
Jayo Hey, Jayo Hey, Jayo Hey,Jayo Jayo Jayo, Jayo Hey
इंग्रजीतील अर्थः
The night is over, and the Sun has risen over the hills of the eastern horizon.
The birds are singing, and a gentle auspicious breeze is pouring the elixir of new life.
By the halo of Your compassion India that was asleep is now waking
On your feet we lay our heads
Victory, Victory, Victory be to You, the Supreme King, the dispenser of the destiny of India!
मग अजूनच वाटू लागले. कुठल्या राजासंदर्भात टागोर म्हणत असावेत? मग जरा शोध घेतल्यावर काही उत्तरे मिळाली:
हे गाणे डिसेंबर १९११ साली पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेक च्या सुमारास रचले गेले होते. त्यात भर म्हणून त्याच वेळी भरलेल्या कलकत्ता काँग्रेस मध्ये ते दुसर्या दिवशी म्हणले देखील गेले होते, ज्या दिवशी काँग्रेसने अधिकृतपणे पाचव्या जॉर्जचे स्वागत केले होते (तसा ठराव केला होता). त्यामुळे ते गाणे पाचव्या जॉर्जसाठीच आहे असा समज होण्यास वाव नक्कीच राहीला. त्यात भर म्हणून (भारतातील) ब्रिटीश वर्तमानपत्र स्टेट्समनने "The Bengali poet Rabindranath Tagore sang a song composed by him specially to welcome the Emperor." असे लिहीले. तेच इतर वृत्तपत्रांनी केले... त्यामुळे "भारतभाग्य विधाता राजेश्वर" हा नक्कीच पाचवा जॉर्ज ठरला.
काँग्रेसने मात्र त्यांच्या १९११ च्या वृत्तांतात म्हणले की पहील्या दिवशी वंदे मातरम म्हणले, दुसर्या दिवशी प्रथम रविन्द्रनाथांचे देशभक्तीपर गीत. नंतर राजाच्या स्वागताचा ठराव आणि मग स्वागतपर गीते म्हणली गेली....
स्वतः रविन्द्रनाथांनी मात्र १९३७ साली आणि १९३९ साली पत्रव्यवहारात, अनुक्रमे खालील प्रमाणे म्हणले होते:
"A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense." (१९३७)
"I should only insult myself if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind." (Purvasa, Phalgun, 1354, p738.)
तरी देखील हा प्रश्न त्यातील शब्दांमुळे आणि वेळेमुळे (किंग जॉर्जचा राज्याभिषेक) कायमच वादग्रस्त राहीला. माझ्या लेखी जर टागोरांनी इतके सुस्पष्ट लिहीले असेल तर त्यांचे मत खरे मानले गेले पाहीजे. तरी देखील मला जाता जाता एक प्रश्न पडतो. "वंदे मातरम" गीताच्या संदर्भात नंतरच्या ओळींमध्ये मुर्तीपूजा आली म्हणून आक्षेप घेतला गेला, पण, "...Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, ..." अथवा, "...Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind ...", असे थोडेफार धार्मिक/अध्यात्मिक विश्लेषण स्वत: टागोरांनीच केलेले असताना हे गीत राष्ट्रगीत म्हणून कसे चालले?
ही माहिती मी विकीवरून घेतलेली आहे. हा वाद अनेकदा येतो, म्हणून आत्ता सांगावेसे वाटले इतकेच. पण येथील जाणकारांना जर अधिक काही माहिती असेल तर येथे अवश्य सांगावीत.
टागोरांनी का लिहीले, कुणाला उद्देशून लिहीले वगैरे मुद्दे जरी इतर संदर्भांनी आणावेसे वाटले, तरी त्यावर योग्य ती अभ्यासू टिपण्णी करताना, "जन गण मन" हे आपले अधिकृत राष्ट्रगीत आहे आणि त्याचा तसा मान ठेवला जावा ही विनंती.
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 2:13 am | अर्धवटराव
>> "जन गण मन" हे आपले अधिकृत राष्ट्रगीत आहे आणि त्याचा तसा मान ठेवला जावा
-- दॅट्स इट
(भारतीय) अर्धवटराव
16 Aug 2011 - 2:45 am | गणपा
विकासराव तुमचे मुद्दे पटले पण....
सध्यातरी हेच अंतिम सत्य आहे. विषय संपला.
मगी कितीही काथ्या कुटला तरी जे आहे ते बदलता येणार आहे का?
16 Aug 2011 - 4:55 am | विकास
मगी कितीही काथ्या कुटला तरी जे आहे ते बदलता येणार आहे का?
हे मी बदलासाठी वगैरे म्हणलेले नव्हते, म्हणूनच, "हा वाद अनेकदा येतो, म्हणून आत्ता सांगावेसे वाटले इतकेच. पण येथील जाणकारांना जर अधिक काही माहिती असेल तर येथे अवश्य सांगावीत." असे म्हणले होते. या निमित्ताने अधिक माहिती मिळाली तर उत्तम इतकाच चर्चा विषय आहे.
16 Aug 2011 - 4:26 am | पंगा
कदाचित त्याऐवजी 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' हे राष्ट्रगीत म्हणून चालू / ग्राह्य होऊ शकले असते का? त्यात कसे छानपैकी 'मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम वतन है हिंदोस्ताँ हमारा' असे म्हटले आहे. धर्मबिर्म कुछ भी नहीं!
की 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' हे सर्वात उत्तम? राष्ट्रभक्तिपर आहे!
आहे ना? मामला खतम.
(पु.लं.च्या मला वाटते 'वंगचित्रे'मध्ये ''जनगणमन' हे 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून कसे नाही' यावर बर्यापैकी विवेचन आहे. फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ.
बाकी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि 'जनगणमन' हे राष्ट्रगीत म्हणून अधिकृतरीत्या स्वीकाररूनसुद्धा इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर, आणि मधल्या काळात इतकी वर्षे 'जनगणमन' हे राष्ट्रगीत म्हणून वाजवल्याने देशाचे काहीही बिघडले नसता, 'जनगणमन' हे मुळात कोणाला उद्देशून होते आणि राष्ट्रगीत म्हणून उचित आहे का, या वादात निदान मला तरी स्वारस्य नाही. रवीन्द्रनाथांनी ते कोणालाही उद्देशून लिहिलेले असो, स्वतंत्र भारताने ते कोणत्या भावनेने आणि कोणाला उद्देशून म्हणून स्वीकारलेले आहे हे महत्त्वाचे. आणि म्हणूनच 'जनगणमन' हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारताना मूळ कवीने ते नेमके कोणाला उद्देशून लिहिले होते, किंवा 'तराना-ए-हिन्दी' हे अनौपचारिक राष्ट्रीय गान किंवा भारतीय लष्कराची 'क्विक-मार्च'ची अधिकृत धून (संदर्भ: विकी.) म्हणून स्वीकारताना मूळ कवी हा नंतरच्या आयुष्यात पाकिस्तान-संकल्पनेचा पुरस्कर्ता झाला होता, या बाबींना माझ्या लेखी काडीचेही महत्त्व नाही.
शिवाय, अगदी समजा की 'जनगणमन' हे रवीन्द्रनाथांनी 'भो-पंचम-जॉर्ज-भूपा'स उद्देशूनच लिहिले होते हे पुराव्याने शाबित वगैरे झाले. पण तरी म्हणून या कारणासाठी आपण आज हे गीत राष्ट्रगीत म्हणून रद्दबातल ठरवून नवे राष्ट्रगीत निवडणार आहोत का?
याच ब्याकड्रापावर, पाकिस्तानचे पहिलेवहिले राष्ट्रगीत हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम तीन दिवस अगोदर श्री. जगन्नाथ आझाद या लाहोरस्थित हिंदू कवीने खास कायदेआझम जीनांच्या वैयक्तिक विनंतीस मान देऊन रचले होते, मात्र जीनांच्या मृत्यूनंतर ते नवीन राष्ट्रगीतासाठी खास स्पर्धा आयोजित करून बदलण्यात आले, या बाबीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या बाबीचा पाकिस्तानात फारसा उल्लेख होत नाही, फार थोड्या लोकांना ही बाब माहीत असते आणि या पहिल्यावहिल्या राष्ट्रगीताचे आज कोणतेही ध्वनिमुद्रण उपलब्ध नाही, असे वाचले आहे. या संदर्भात एक रोचक दुवा: इथे.
प्रश्न हा आहे, की भारतासही इतक्या वर्षांनंतर या बाबतीत पाकिस्तानचा कित्ता गिरवावयाचा आहे का? अन्यथा, या चर्वितचर्वणास कितीसा अर्थ आहे?)
अवांतर: राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा म्हणून राष्ट्रध्वज कसा हाताळावा, कोणी आणि कसा उभारावा वगैरे बाबींचे नियमन करण्याकरिता जशी नियमावली आहे, तद्वत राष्ट्रगीताच्या संदर्भात काही नियमावली आहे काय?
16 Aug 2011 - 5:06 am | विकास
आहे ना? मामला खतम.
कुठल्या मामल्याबद्दल बोलत आहात? जरा सांगाल का परत एकदा वाचून?
चर्चेत म्हणल्याप्रमाणे या निमित्ताने अधिक माहिती एकत्रीत व्हावी हा उद्देश होता आणि आहे. त्यात असले तिरकस प्रतिसाद देण्याची काय गरज आहे हे समजले नाही. पण तो ज्याचा त्याचा मुद्दा. मला हे आवडले नाही इतकेच म्हणतो. आणि हो, जनगणमनच्या विरोधात मधु दंडवत्यांसारखे अभ्यासू, मान्यवर संसदपटू देखील होते... पण तो येथे मुद्दा नव्हता आणि नाही. असो.
पुलंचे मुद्दे पटण्यासारखेच आहेत. ते येथे दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण गोष्टींची अपेक्षा होती. मला विकीवरील माहिती वाचताना लक्षात काय आले तर अनेकदा अनेक दिग्गजांनी (येथे पुलंनी) जनगणमन योग्य पद्धतीनेच डिफेन्ड केले आहे. त्यातील प्रत्येकच पटण्यासारखे आहे. पण स्वतः रविन्द्रनाथांचे वक्तव्य कधी माझ्या तरी वाचनात आले नव्हते. जे मला महत्वाचे वाटले होते. हे लिहीताना पुलंचे अथवा तत्सम कमी करण्याचा हेतू नाही.
16 Aug 2011 - 9:35 am | अर्धवटराव
विकास,
तुमचा हा धागा काढण्यामागचा हेतु माहिती आदान-प्रदान एव्हढाच आहे यात मला तरी शंका नाहि. मी एका वाक्यात चर्चा माझ्यापुरती थांबवली कारण ही चर्चा संवेदनशील बनेल आणि त्यात जाणता-अजाणता राष्ट्रगीताचा अपमान होईल अशी मला शंका होती.
बाकी धनंजय आदिंनी छान माहिती दिलीच आहे.
अर्धवटराव
16 Aug 2011 - 4:17 am | धनंजय
गाण्याचे "राष्ट्रीय" म्हणून महत्त्व केवळ ऐतिहासिक आहे, असे असावे.
मराठा आणि उत्कलाच्या दक्षिणेचा उल्लेख फक्त "द्राविड" असा आहे, सिंध प्रदेशाचा उल्लेख, आसामाचा उल्लेख नाही, वगैरे. एक जुने स्फूर्तिगीत म्हणून त्यास ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताच्या राज्यघटनेतल्या अगदी मूलभूत तपशिलांशी ते जुळलेच पाहिजे असा अट्टाहास कामाचा नव्हे.
म्हणजे गीताचे तपशील घटनेशी किंवा त्यानंतरच्या कायद्यांशी जुळले नाहीत, तर घटनेतील तपशील कायम राहातात : आसाम हा भारताचाच भाग राहातो, सिंध हा कायद्याच्या दृष्टीने भारताच्या बाहेरचाच भाग राहातो, आणि भारताचे कायदे हे आध्यात्मिक नव्हे तर ऐहिक पातळीवरच कार्यरत राहातात.
पाच पैकी दोनच कडवी राष्ट्रगीत म्हणून निवडण्याबाबत...
घटनाविधायक मंडळाने अखेरची टिप्पणी केली, ती अशी :
The composition consisting of the words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations in the words as the Government may authorise as occasion arises; and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honoured equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause). I hope this will satisfy the Members.
(दुवा, अधोरेखने माझी)
आदली आणखी विस्तृत चर्चा (दुवा) त्यातील एक परिच्छेद :
Mr. President : ... There is one other matter which has not been discussed up to now, but I do not know, probably the Members may feel interest in that and that is the question of the National Anthem. The National Flag was adopted by the Constituent Assembly; it was not part of the Constitution but it was adopted by the Constituent Assembly. Similarly probably the National Anthem, also will have to be adopted by the Constitution Assembly, but by a Resolution; but we have not yet taken steps in that direction. The government have already adopted a particular song as the National Anthem, but the Constituent Assembly has not yet accepted that.
(अधोरेखन माझे.) घटनेला परिशिष्टवजा असलेली ही चिह्ने आहेत, असे दिसते.
सेठ गोविंददास (घटना परिषदेचे सदस्य) यांनी "राजेश्वर"चा मुद्दा चर्चेत आणला (दुवा) :
Theverse "Jana mana Gana" was composed on the occasion of the visit of the late Emperor George the V to India in 1911. Thepoem offers greetings, not to Mother India, but to the late King Emperor. Every sentiment in it is in relation to the"Bharat Bhagia Vidhata" and who is meant is clear from theexpression "victory to the Emperor" (Jai Rajeshwar). It isevident that in a Republic we cannot in our National Anthem offer any greetings to any 'Rajeshwar'.
अर्थात भारत सरकार गाण्याच्या शब्दांत वाटेल ते फेरबदल करू शकते, हा मुद्दा (पहिल्या उद्धृत परिच्छेदातला) या बाबतीत समेट करण्यास उपयोगी पडतो - पहिली दोन कडवीच स्वीकारली आहेत, त्यामुळे राजेश्वराचा उल्लेख बाजूला पडतो. हा संपादनाचा प्रकार त्या परिषदेच्या अंतर्गत राजकारण-देवघेवीशी संबंधित असावा.
एकूण मला वाटते, की गेल्या काही दशकांत घटनापरिषदेतला राष्ट्रगीताबाबतचा वाद बिगरमहत्त्वाचा म्हणून समजून आलेला आहे. आणखी काही दशकांत पुरता क्षुल्लक मानला गेला तरी चालेल. (संदर्भपुस्तकांत राहायला पाहिजेच!) खरे कार्यरत ते कायदे, आणि कार्यक्रमांत स्फूर्तिसाठी ते गाणे, हे लक्षात ठेवले, तर तपशिलांची जुळवाजुळव करण्यासाठी पुन्हा-पुन्हा संपादन करण्याची गरज राहात नाही.
16 Aug 2011 - 5:09 am | विकास
प्रतिसाद या चर्चेसाठी सुयोग्य आहे. अशीच अधिक माहिती यावी असे वाटले. बर्याचदा लोकांना सगळी माहिती नसते त्यामुळे गैरसमज वाढतात. ते अशा माहितीतून/चर्चेतून कमी व्हावेत अशी अपेक्षा होती आणि राहील.
धन्यवाद
अधिक प्रतिसाद/टिपण्णी नंतर देईन.
16 Aug 2011 - 8:03 am | हुप्प्या
जे झाले ते झाले. पण केवळ मुस्लिम अनुनयाकरता वंदे मातरमसारखे गीत जे अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे स्फूर्तीस्थान होते ते राष्ट्रगीत न बनवता जन गण मन सारखे सुमार गाणे त्याजागी नेमले हे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेषतः धर्माला कवटाळणार्या मुस्लिमांकरता देशाचा लचका तोडून वेगळा देश बनवून दिलेला असतानाही असे बेंडिंग ब्याकवर्डची सर्कस करायची काय गरज होती?
कितीही मखलाशी केली तरी जन गण मन च्या अर्थात पाचव्या जॉर्जची स्तुती केल्यासारखे वाटतेच वाटते. आणि तेच ह्या गीतामागचे स्फूर्तिस्थान आहे असे मला ठाम वाटते. वंदे मातरमला नॅशनल साँगचा दर्जा देऊन ह्या मूर्ख कृत्यावर मलमपट्टी करायचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसी सरकारने केला खरा पण त्यातून त्यांचाच ढोंगीपणा दिसून येतो.
बाकी अनेक देशात कायदा करुन राष्ट्रगीते बदलली आहेत. (इराक, अफगाणिस्तान) तसे भारतातही होऊ शकेल. पुरेशा लोकांना अशी खंत वाटत असेल तर. आणि हो, आपल्या देशापुढे ह्यापेक्षा कितीतरी मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्या समस्या आहेत वगैरे टँण टॅण टँण करता येईलच.
महाराष्ट्राला मराठा म्हणणे (मराठा हा भूभाग का एक जात?), दक्षिणेतील राज्यांचा द्राविड असा उल्लेख (आर्य आणि द्रविड हा एक वादग्रस्त मुद्दा आहे), सिंधचा उल्लेख अशा अनेक खटकणार्या गोष्टी जनगण मधे आहेत. एक गीत म्हणून ते सुमारच आहे. स्वातंत्र्य लढा जो ह्या देशाच्या निर्मितीमागची प्रेरणा आहे त्यात ह्या गीताने कोणतीही भूमिका निभावलेली नसताना ह्याचे प्यादे पुढे ढकलण्याचा नस्ता उपद्व्याप काँग्रेसने करून जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा केसाने गळा कापला आहे.
राष्ट्रगीत बदलले नाही तरी हा इतिहास, हे शल्य विसरू नये ही इच्छा.
16 Aug 2011 - 9:21 am | मिहिर
असहमत.
केवळ मुस्लीम अनुनयासाठी 'जन गण मन' नेमले हे अजिबात पटले नाही. मला स्वतःला 'जन गण मन' हे आपले राष्ट्रगीत खूप आवडते आणि ते ऐकताना भारतीय असल्याचा अभिमान उचंबळून येतो. त्याला सुमार म्हणणे पटले नाही.
17 Aug 2011 - 10:18 am | विकास
(विकासराव, वाचताय ना? ...विचाराल, विचाराल पुन्हा, "कुठला मामला" म्हणून?)
मला अजून मूळ प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण तुम्ही ते मला आणि चर्चाप्रस्तावाला उद्देशून म्हणाला होता आणि त्यासंदर्भात नक्की कुठला मामला दिसला म्हणून विचारले. इतरांच्या प्रतिसादासंदर्भात नाही..
बाकी आपला वरील उर्वरीत प्रतिसाद हा आपणच म्हणत असल्याप्रमाणे उपहासात्मक असल्याने आणि त्यातील मते आपली नसल्याने, वाचण्यात आणि त्यावर प्रतिसाद देण्यात वेळ घालवलेला नाही.
17 Aug 2011 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll
हुप्प्याशेठशी सहमत आहे. वंदे मातरम सारख्या ज्या मोठ्या गीताने तेव्हा लोकांना स्फूर्ती दिली व आजही देत आहे त्या गीता सारखे गीत डावलून जन गण मन चे प्यादे पुढे सरकवण्याचे कारण समजत नाही.
16 Aug 2011 - 12:35 pm | बद्दु
खरे तर मला हे गीत बाळबोध वळणाचे वाटते; त्याला धरुन बांधुन राष्ट्रगीत करुन टाकले..आता पर्याय नाही; त्यामुळे "राष्ट्रगीतावर" . टिका करणे योग्य नाही हे मला माहिती आहे पण विषय निघालाच आहे तर दोन शब्द माझेपण म्ह्णुन..
राष्ट्रगीत म्हणत असतांना जरा आजुबाजुला नजर टाकली तर लक्षात येते की बहुसंख्य जनता कधी एकदा राष्ट्रगीत संपते याची वाट पाहत असते. त्यातल्या त्यात राष्ट्रगीताची धुन फक्त ऐकायला बरी वाटते. मी तरी ती धुन ऐकण्यासाठी केवळ चुळबुळ न करता शांत उभा राहतो. राष्ट्रभावना वगैरे सहजपणे मला त्यावेळेलातरी स्पर्षून जात नाही ( खोटे कशाला सांगु..) त्या पुढार्यांच्या भाषणात तर काडीचाही रस नसतो. केवळ पोरगं बाजुला बसलं असतं त्याला सोबत म्हणुन हे सर्व सुरु असतं..
बाकी चालु द्या..
सर्व देशभक्तांना सलाम.
16 Aug 2011 - 11:34 pm | मन१
अस्साच वाद/गैरसमज्/अनधिकृत अन्वयार्थ भारताच्या तिरंग्याबद्दलही दबक्या आवाजात पूर्वी बोलला जाई.
तिरंग्याचा अधिकृत अर्थ :- भगवा/केशरी त्यागाचे प्रतीक; पांढरा शांततेचे तर हिरवा (कृषी?)समृद्धीचे प्रतीक.
कुठलाही धार्मिक अर्थ त्यात इतरप्रकारे अभिप्रेत नाही.
असो. राष्ट्रगीताबद्दल आधीच बरीच चर्चा वाचलेली आहे.
17 Aug 2011 - 12:07 am | कानडाऊ योगेशु
वंदे मातरम बँडवर वाजवायला अवघड आहे ह्या कारणासाठी पंडीत नेहरुंनी त्याला राष्ट्रगीत म्हणुन नाकारले होते असे पूर्वी कधीतरी वाचनात आले होते.
बाकी "वंदे मातरम" ह्या दोन शब्दांतच स्वातंत्र्यपूर्व कालखंड/क्रांतिकारकांचे बलिदान इ. अनुभुति देण्याचे सामर्थ्य नक्कीच आहे.
17 Aug 2011 - 9:29 am | पंगा
...त्या 'जनगणमन'च्या विडियोक्लिपच्या अगोदर चित्रविचित्र जाहिराती येतात. एकदा तर टॉयलेटपेपरचीसुद्धा आली.
हे राष्ट्रगीतासंबंधीच्या आचारसंहितेला धरून असावे का?
17 Aug 2011 - 10:13 am | विकास
...त्या 'जनगणमन'च्या विडियोक्लिपच्या अगोदर चित्रविचित्र जाहिराती येतात. एकदा तर टॉयलेटपेपरचीसुद्धा आली. हे राष्ट्रगीतासंबंधीच्या आचारसंहितेला धरून असावे का?
त्या जाहीराती कशा बंद करायच्या ते समजत नाही. :( बाकी ते आचारसंहीतेला धरून आहे का नाही हे एनडीटीव्हीलाच माहीत. पण पाचही कडवी असल्याने ते राष्ट्रगीत आहे असे कदाचीत धरता येणार नाही. अथवा ते देखील आचारसंहीतेत बसते का हा प्रश्न आहेच.
तरी देखील आत्ता शोधताना अजून एक युट्युबवरील फित मिळाली आहे, ती तेथे डकवतो.
18 Aug 2011 - 1:21 am | हुप्प्या
कुठल्याही मुद्द्याला उत्तर न देता आदळाआपट, कांगावा, आकांडतांडव करणे. शिव्या घालणे (वाळवी बाहेर पडली काय नि काय काय). नमस्ते सदा वत्सले चा काहीही आगापिछा नसताना अकारण उल्लेख करणे.
ह्यातून आपण आपला आकस, पूर्वग्रह दाखवत आहात.
हा उपरोध नसून निष्कारण डोक्यात राख घालणे आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची क्लिप द्यायचेही काही कारण नव्हते.
असो. काही लोक लक्ष वेधून घेण्याकरता कपडे फाडतात, गाडगी मडकी फोडतात असा एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण होते. एवढेच.
18 Aug 2011 - 1:32 am | हुप्प्या
संस्कृत श्लोक वगैरे म्हटले तर पुन्हा तुम्हाला नमस्ते सदा म्हणायची तल्लफ यायची.
हे कसे वाटते?
काही लोक लक्ष वेधून घेण्याकरता कपडे फाडतात भांडी फोडतात अशा अर्थाचे खलिल जिब्रानचे एक वचन आठवले असा बदल करतो.
आता ठीक आहे ना?
18 Aug 2011 - 10:54 pm | आनंदयात्री
ख्या ख्या ख्या !! लै हसलो !!
18 Aug 2011 - 1:51 pm | ऋषिकेश
काहि ऐकीव माहिती असली तरी इथे देण्याइतकी खात्रीशीर नाही. तेव्हा चर्चा वाचतो आहे
बाकी जन गण मन मधील (पंजाब-)सिंध(-गुजरात-मराठा) चे सिंधु हा 'अधिकृत' बदल आहे कारण सिंध पाकिस्तानात आहे. आता हा बदल किती जण गातात-लक्षात ठेवतात हा शोधाचा विषय ठरेल.
18 Aug 2011 - 2:16 pm | कापूसकोन्ड्या
काहि ऐकीव माहिती असली तरी इथे देण्याइतकी खात्रीशीर नाही. तेव्हा चर्चा वाचतो आहे
असे कसे? हे पहा!
ही लिन्क पहा
18 Aug 2011 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जन गण मन मधील (पंजाब-)सिंध(-गुजरात-मराठा) चे सिंधु हा 'अधिकृत' बदल आहे कारण सिंध पाकिस्तानात आहे. आता हा बदल किती जण गातात-लक्षात ठेवतात हा शोधाचा विषय ठरेल.
वरील विषयासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
[बातमी संदर्भ दै. सकाळ]
-दिलीप बिरुटे
18 Aug 2011 - 11:07 pm | पैसा
सामान्यपणे माहिती नसलेल्या काही गोष्टी विकास आणि धनंजय यानी सांगितल्या आहेत, त्याबद्दल दोघांनाही धन्यवाद!