अण्णांच्या मागे राहुल गांधी ??

ईश आपटे's picture
ईश आपटे in काथ्याकूट
11 Aug 2011 - 10:21 am
गाभा: 

अण्णांच्या मागे कोण आहे ह्यावर बरीच चर्चा प्रसारमाध्यमात ही झाली आहे. काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत.
माझी स्वतःची अशी थेअरी आहे की अण्णांच्या मागे राहुल गांधी आहेत.
१६ ऑगस्टला राहुल गांधी अण्णांची मागणी मान्य करुन पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणतील. व स्ट्राँग लोकपाल विधेयकाला मंजुरी देतील आणि भारतात भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे हिरो म्हणून पुढे येतील. (सरकारराज आठवतोय ?)संकेत असे आहेत की ममोंची घरी जायची वेळ झाली आहे. राहुल ह्यांना पीएम म्हणून पक्के करायची व एक यशस्वी नेता म्हणून डोक्यावर बसवायची काँग्रेसची ही चाल दिसत आहे.
आपल्याला काय वाटते ???

बाकी एनडीटीव्ही व आयबीएन ह्या काँग्रेसप्रणीत चॅनेल्सनी ही गेल्या ३-४ दिवसापांसून पंतप्रधान ममोंच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा इशारा पुरेसा आहे...

प्रतिक्रिया

हे पण गुपित तुम्हाला माहित असेल कि?

कॅन्सरचे. त्यात गुपित काय ??? :)

मराठी_माणूस's picture

11 Aug 2011 - 10:31 am | मराठी_माणूस

१६ ऑगस्टला राहुल गांधी अण्णांची मागणी मान्य करुन पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणतील.

राहुल ह्यांना पीएम म्हणून पक्के करायची व एक यशस्वी नेता म्हणून डोक्यावर बसवायची काँग्रेसची ही चाल दिसत आहे.

हे परस्पर विरोधी वाटते.

बाकी अण्णांचा आता पर्यंतचा प्रवास पाहता कोणीतरी मागे आहे म्हणून ते आंदोलन करत आहेत असे वाटत नाही.

पिवळा डांबिस's picture

11 Aug 2011 - 10:43 am | पिवळा डांबिस

आपल्याला काय वाटते ???

या थियरीच्या मूर्खपणाची कीव वाटते!!!
(नथिंग पर्सनल!!)
जर राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते लोकपालाच्या कार्यकक्षेत विद्यमान (अधिकारावरच्या) पंतप्रधानाला कधीच येऊ देणार नाहीत!!!
१६ ऑगस्टला राहुल गांधी अण्णांची मागणी मान्य करुन पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणतील. व स्ट्राँग लोकपाल विधेयकाला मंजुरी देतील
मनमोहन सिंगना बाजूला करायला राहुल गांधीना अण्णांची काहीही गरज नाही. राहुलने मनमोहन सिंगना नुसतं 'जाव' म्हंटलं तरी मनमोहन सिंग स्वखुशीने घरी जातील!!!!!
काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत.
हां,नाऊ धिस इज इंट्रेश्टिंग!!!! याबद्दल तुमचं मत काय ते आधी सांगा ना!!!!
;)
.

आपण सरकारराज हा चित्रपट जरा नीट बघावा. भारतीय राजकारणी अत्यंत पाताळयंत्री आहेत.
जर राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते लोकपालाच्या कार्यकक्षेत विद्यमान (अधिकारावरच्या) पंतप्रधानाला कधीच येऊ देणार नाहीत!!!
का नाही?? पंतप्रधान बनल्यावर त्यांना थोडाच भ्रष्टाचार करावा लागणार आहे. उलट आपण पूर्ण भ्रष्टाचार विरोधी आहोत हे सिध्द करण्याची त्यांना ही सुवर्णसंधी आहे...
अजुन एक. अफझलगुरुला फाशी ही राहुलच्याच नेतृत्वाखाली दिली जाईल.

काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत.
हां,नाऊ धिस इज इंट्रेश्टिंग!!!! याबद्दल तुमचं मत काय ते आधी सांगा ना!!!!

अण्णांच्या मागे संघ नाही. भाजपाचा त्यांना विरोध आहे. व भाजपा अण्णांनी तापवलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचा संधीसाधूपणा करीत आहे...

पिवळा डांबिस's picture

11 Aug 2011 - 11:11 am | पिवळा डांबिस

आपण सरकारराज हा चित्रपट जरा नीट बघावा.
अहो बघितलाय!!!!
खरं राजकारण हे हिन्दी चित्रपटांपेक्षा खूप डीप असतं हो!!!! नायतर बाळासायबांनी तो पिच्चर चालू दिला असता का?

का नाही?? पंतप्रधान बनल्यावर त्यांना थोडाच भ्रष्टाचार करावा लागणार आहे?
तुमचा रोख असा दिसतो की राहुलना स्वतःला भ्रष्टाचार करावा लागणार नाही, इतर लोक तो त्यांच्यासाठी करतील, राईट?
पण त्या इतर लोकांना आपल्या पंखाखाली घेतलं नाही तर ती लोकं राहुलना त्या पदावर राहू देतील का? जरा विचार करा....

अजुन एक. अफझलगुरुला फाशी ही राहुलच्याच नेतृत्वाखाली दिली जाईल.
विषयांतर!! यातून फक्त तुमचा राहुलविषयी बायस दिसतो आहे...

अण्णांच्या मागे संघ नाही. भाजपाचा त्यांना विरोध आहे.
संघाने अण्णांचा जाहीर निषेध केलाय का? असल्यास इथे लिंक द्या म्हणजे मी माझे म्हणणे दुरुस्त करीन...
आणि भाजपाचं काही सांगू नका, त्यांचे चार नेते चार वेगवेगळं बडबडत असतात.....
सत्ता गेल्यापासून (आणि नजिकच्या काळात ती मिळण्याची शक्यता नसल्याने) त्यांच्यात वैफल्य आलेलं आहे....
:)

ईश आपटे's picture

11 Aug 2011 - 5:29 pm | ईश आपटे

अफझलगुरुच्या फाशीला कालच गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे. पुढील एका महिन्यात तो फासावर जाईल.. तेव्हा राहुलजर पीएम असेल तर मोठ्याप्रमाणात हिन्दुंची मते काँग्रेसकडे येतील..

दुसर संघ अण्णांचा विरोध खुलेपणाने करत नाही कारण त्यांना फुकटचे मुद्दे मिळत आहेत केंद्राविरोधात. पण समर्थन ही टोटल करत नाही कारण अण्णांमागे कोण आहे हे त्यांना ही नीट स्पष्ट नाही.

देणारच. अचूक टायमींग साधणे हा तर "त्यांचा" हातचा मळ आहे.

रोज ढिगभर घोटाळे बाहेर येत आहेत....

महागाईने जनता त्रस्त आहे.

अश्या अनेक गोष्टींवरून लक्ष वळवण्यासाठी हा मुद्दा चांगलाच आहे.

एकदा फाइल पुढे सरकवली असे म्हणले की पुन्हा टाइमपास करायला मोकळे.

अफझलगुरुच्या फाशीला कालच गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे. पुढील एका महिन्यात तो फासावर जाईल..

भलतेच आशावादी बॉ तुम्ही. राष्ट्रपतींची सही होई पर्यंत अजुन २-४ नवे राष्ट्रपतीं आपला कार्यकाल संपवुन जातील.

वेताळ's picture

11 Aug 2011 - 10:59 am | वेताळ

परंतु तुम्ही जर २०१२ सिनेमा नीट बघितला असता तर अशी थिअरी मांडलीच नसती.

आत्मशून्य's picture

11 Aug 2011 - 5:01 pm | आत्मशून्य

.

आत्मशून्य's picture

11 Aug 2011 - 5:01 pm | आत्मशून्य

.

हाहाहाहाहाहाहाहाहा! एक नंबर प्रत्युत्तर!

सुनील's picture

11 Aug 2011 - 11:02 am | सुनील

खुशखुशीत आणि नर्मविनोदी लेख आवडला!

बाकी मिपावरील युयुत्सु व इतर उत्सुक ज्योतिषांना एक विनंती...

सिंघम राजीनामा देतील का व कधी ?? व राहुल पंतप्रधान बनतील का व कधी ??? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे त्यांनी अभ्यासाने येथे (वेगळा धागा काढून )जाहीर करावीत. उत्तरे बरोबर आल्यास आपोआप ज्योतिष हे शास्त्र आहे अशी सर्वांची खात्री पटेल. उगीच निरर्थक जो राडा चालू आहे तो तरी थांबेल.

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 1:16 pm | नितिन थत्ते

तुम्हीच असामान्य योगबलाने उत्तरे सांगा ना !!!!

ईश आपटे's picture

11 Aug 2011 - 1:25 pm | ईश आपटे

थत्ते

तुमची **** जरी ज्योतिषात चालत नसली तरी इतरांची चालण्यात सक्षम आहे.

कृपया योग्य भाषा वापरावी. - संपादक मंडळ

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 1:30 pm | नितिन थत्ते

आम्ही मंदबुद्धी असूद्या हो... पण तुम्ही योगबलाने उत्तर सांगितले तर ज्योतिषांच्या उत्तराशी ताडून पाहता येईल तसेच योगबलाने बरोबर उत्तर मिळते की ज्योतिषांचे हे समजेल ना !!!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Aug 2011 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

@ ईश आपटे साहेब

थत्ते बोगसगिरी बंद करा म्हणणारा हा प्रतिसाद असो किंवा आत्ताचा 'तुमची मंदबुध्दि जरी ज्योतिषात चालत नसली तरी इतरांची चालण्यात सक्षम आहे.' हे दोन्ही प्रतिसाद तुमच्यासारख्या समंजस सदस्याकडून खरेच अपेक्षित नव्हते.

प्रकरण थोडे वैयक्तिक पातळीवर चालले आहे काय ?

अवांतर :- थत्ते चाचांना वाट्टेल ते बोलायचा आणि वैयक्तिक टिका करायचा हक्क फक्त माझ्याकडे राखीव आहे ;)

ईश आपटे's picture

11 Aug 2011 - 2:30 pm | ईश आपटे

नाही हो. वैयक्तिक कसले......ही तत्वनिष्ठ चर्चा आहे... :)
नेहमी प्रमाणे जिथे ज्योतिषाला विरोध तिथे हे आपले हजर काहीतरी जुने चाचणींचे दाखले घेऊन...असो...

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2011 - 9:58 pm | राजेश घासकडवी

तुम्हीच का? तसं असल्यास कृपया तक्रार करू नये. उपक्रमवर लेखन करणाऱ्या ईश आपटेंनी, अत्यंत सभ्य शब्दांत प्रतिसाद देणाऱ्यांवर अतिशय अर्वाच्य शिवीगाळ केल्याचं उदाहरण माझ्या लक्षात आहे.

http://mr.upakram.org/node/3207#comment-54741

वरील प्रतिसादात लेखकाला व तमाम प्रतिसादकांना जे 'फ'कारी शब्द वापरले होते ते संपादकांनी सूज्ञपणे काढून टाकून तिथल्या ईश आपटेंना तंबी दिली होती.

तुम्ही जर उपक्रमावरचे ईश आपटे नसाल तर अर्थातच हा प्रतिसाद तुम्हाला लागू होत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Aug 2011 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

घासु गुर्जी ?

'पलिकडचा' रेफरंस इकडे देण्याचे कारण खरेच कळाले नाही.

सदर सदस्य (ईश आपटे) इतर संस्थळावर काय करतात ह्याचा इथे काय संबंध? त्यांच्या इतर संस्थळावरील वागणूकीवरून त्यांचे मिपावर मूल्यमापन होउ नये असे वाटते. कदाचीत पल्याड जी भाषा समजली जाते त्याच भाषेत त्यांनी उत्तर दिले असण्याची देखील शक्यता आहे :)

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. गुर्जींच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी आदर आहेच.

आणि हो, निळ्या हलकट आहे हे नमूद करायचे राहिलेच. निळ्या हलकटा आमची सदाशिव पेठ येवढी का रे डोळ्यात खूपते मेल्या तुझ्या ?

चिंतामणी's picture

13 Aug 2011 - 3:11 pm | चिंतामणी

सदाशीव पेठ घुसल्याने सर्वांगात वेदना होत असतील कदाचीत. ;)

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2011 - 7:07 pm | राजेश घासकडवी

सदर सदस्य (ईश आपटे) इतर संस्थळावर काय करतात ह्याचा इथे काय संबंध?

तुम्ही एक अतिशय गंभीर मुद्दा मांडलेला आहे. जालीय विश्वात आयडी ही एक व्यक्ती मानली जावी का? एकच आयडी दोन संस्थळांवर वावरत असेल तर ती दोन व्यक्तिमत्वं समान असावी अशी अपेक्षा करावी का? समजा आयडी अ आणि आयडी ब हे त्याच आयडींनी दोन संस्थळांवर वावरत असतील तर अ-ब हे संस्थळ १ व अ-ब हे संस्थळ २ वरचं नातं समान असण्याची अपेक्षा ठेवावी का? भौतिक जगाचं उदाहरण द्यायचं झालं तर एका देशात खून करणाऱ्या माणसाला दुसऱ्या देशात साधूसंत म्हणून मान्यता मिळावी का?

प्रश्न, प्रश्न आणि केवळ प्रश्न... असे मूलभूत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तुमची आम्ही 'विचारजंती ऑफ द इयर' या सन्मानासाठी शिफारस करतो. पण ते झालं तर काही सडक्या प्रतिसादांना तोंड द्यायची तयारी ठेवा....

Nile's picture

15 Aug 2011 - 12:34 pm | Nile

.

Nile's picture

15 Aug 2011 - 12:36 pm | Nile

@कूजकट परा,

निळ्या हलकट आहे हे नमूद करायचे राहिलेच.

च्यायला, हे म्हणजे दरोडेखोराने चोराला नावं ठेवण्यासारखं आहे. कूजकट निवाश्या, का उगाच अनिवाश्यांना छळतोस रे?

Nile's picture

15 Aug 2011 - 12:33 pm | Nile

नेहमी प्रमाणे जिथे ज्योतिषाला विरोध तिथे हे आपले हजर काहीतरी जुने चाचणींचे दाखले घेऊन

वरील वाक्याला आम्ही दिलेला प्रतिसाद, बहुतेक त्याच्या सरळ आणि स्पष्ट भाषेमुळे, पचावयास जड गेलेला दिसतो, हरकत नाही. पुन्हा जरा वेगळ्या आणी हलक्या पोटालाही पचेल अशा भाषेत लिहावा म्हणतो.
++++++++++
त्रिकोणी आपट्यांस,
का, थत्ते आल्यास त्यांच्या प्रतिसादांनी तुमच्या जठरात निर्माण झालेल्या वेदनेच्या लोळाला शमवण्यास तुम्हास स्वछतागृहाकडे धावावे लागते काय?
+++++++++++
हा पचतोय की नाही ते कळवावे, धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

13 Aug 2011 - 11:01 pm | श्रावण मोडक

मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा!

अवांतर : अण्णांच्या मागे कोण आहे ह्याबद्दलची तुमची थिअरी छान आहे. आता माझी ह्या धाग्याबाद्दलाची थिअरी अशी आहे की हा धागा हळूच ज्योतिष विषयक गोष्टीना पुन्हा पिन मारण्यासाठी काढला आहे. आपल्याला काय वाटते ??? :)

वेताळ's picture

11 Aug 2011 - 12:40 pm | वेताळ

मग प्रश्न विचारा.

चिंतामणी's picture

11 Aug 2011 - 5:34 pm | चिंतामणी

शक्यता नाकारता येत नाही.

(हे मिपाछाप उत्तर अजून पर्यन्त न आल्याने आश्चर्य वाटले.)

प्रियाली's picture

11 Aug 2011 - 5:39 pm | प्रियाली

त्रिकोणी पृथ्वीच्या टोकावर बसून योगबलाने योजलेला कल्पनाविलास सॉल्लिड आहे.

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 6:12 pm | नितिन थत्ते

तेही जांभळ्या रंगाच्या सोन्याची अंगठी घालून.

Nile's picture

11 Aug 2011 - 6:24 pm | Nile

वेळ जात नसेल तर तुमच्या त्रिकोणी पृथ्वीचे क्षेत्रफळ वगैरे मोजत बसा की. हे काय शेळीच्या लेंड्या टाकल्यासारखे लेख टाकताय?

ह्या संकेतस्थळावर लिहायला आता तुझ्या सारख्याची परवानगी हवी का ??? हा पुन्हा मर्यादा सोडून बोलत आहे हे मी व्यवस्थापकांच्या व संपादक मंडळाच्या नजरेस आणून देऊ इच्छितो................

Nile's picture

11 Aug 2011 - 6:55 pm | Nile

आँ? मी कधी म्हणलं लिहू नका ते? मी फक्त कारण विचारलं.

व्यवस्थापकांच्या व संपादक मंडळाच्या नजरेस आणून देऊ इच्छितो

बाकी हेच ते तुमचं असामान्य योगबल वगैरे आहे का? इथे असं "नजरेस आणून देऊ इच्छितो" लिहलं की तिकडे रामानंद सागरच्या शिरीयलमध्ये दाखवतात तसं लगेच संपादकांना 'टीssडींssग' होऊन वर्दी मिळते??

ईश आपटेजी नाईल साहेब मर्यादा सोडून प्रतिसाद देत आहेत हे खरे पण आपणदेखील काही धुतल्या तांदळासारखे सात्वीक प्रतिसाद दिलेले नाहीत.
असो.
हम करे रास इतर कोणी करे तो तो कॅरेक्टर ढीला है....... असाच न्याय झाला ना हा

नगरीनिरंजन's picture

11 Aug 2011 - 7:59 pm | नगरीनिरंजन

राहुल गांधीकडे पाहून वाटत नाही तो कोणाच्या मागे असू शकेल.

वेताळ's picture

11 Aug 2011 - 8:21 pm | वेताळ

राहुलला तर तरुण व युवक आवडतात. ते एका वृध्द व्यक्तीच्या मागे कसे काय लागतील.

शाहिर's picture

24 Aug 2011 - 5:20 pm | शाहिर

भयंकर आरोप !!

राहुलला तर तरुण व युवक आवडतात

भयंकर आरोप !!

मनीषा's picture

11 Aug 2011 - 9:34 pm | मनीषा

..... काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत.
माझी स्वतःची अशी थेअरी आहे की अण्णांच्या मागे राहुल गांधी आहेत.

कोणाला, कधी आणि काय वाटेल याचा नेम नाही ...
कटीण आहे !

ईश आपटे's picture

13 Aug 2011 - 1:40 pm | ईश आपटे

हे बघा... हाफ ब्लड प्रिन्स च्या राज्यभिषेकाची तयारी ही सुरु झाली..............

http://ibnlive.in.com/news/manmohan-out-of-favour-rahul-top-choice-for-p...

पेड बातम्या हो सगळ्या..
त्या बातमीच्या खालील वाचकांचे प्रतिसाद पहा.
WHAT'S YOUR REACTION?
Like 142 :: Dislike 505

पण सर्वसामान्य जनतेच्या मनावर अश्या बातम्यांचा भडिमार करुन त्या बिंबवल्या जातात हे ही खोटं नाही म्हणा.

आत्मशून्य's picture

22 Aug 2011 - 11:48 pm | आत्मशून्य

आज जनमत अण्णांच्या बाजूने आहे. त्यांना विरोध करणारा सत्तेवर टेकणार नाहीच म्हणून या घटनेचा राजकीय फायदा जशी परीस्थीती असेल त्याप्रमाणे नक्कीच घेतला जाणार. कदाचीत राहूलला वर आणायला सूध्दा, पण हा राहूलला वर आणायचा कट आहे म्हणने म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणे हा पकिस्तानच्या नीर्मीतीचा खरा कट होता समजणे होय.

ह्याच सिद्धांताला अनुसरून "रामदेवबाबांच्या मागे सोनिया गांधी" असाही दावा करता येइल

(बा)लीश दुपटे

अविनाशकुलकर्णी's picture

14 Aug 2011 - 1:31 am | अविनाशकुलकर्णी

वरुण गांधि..मनेका पुत्राने अण्णंस जागा देवु केल्याने सोनिया पुत्र हि चाल खेळणे शक्य आहे..
श्क्यता नकारता येत नाहि..आपटे सायबाम्चे डोके मस्त चालते....
कांग्रेस वाले राहुल बाबा साथी काहि हि करतिल....

हुप्प्या's picture

14 Aug 2011 - 5:27 am | हुप्प्या

देशाकरता तन मन धन वेचण्याचे, लोकशाहीचा आदर करण्याचे बाळकडू ज्या घराण्यात चालत आहे, ज्या घराण्याची त्यागाची परंपरा थक्क करणारी आहे, ज्यांचे कर्तृत्व विवेकानंद, शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, अशोक, अकबर, राम, कृष्ण ह्यांनाही खुजे करुन सोडेल असे आहे असे राहुलजी अण्णा हजारे सारख्या देशद्रोही, समाजकंटक, आत्मकेंद्रित, देशाची शकले करु पहाणार्‍या नराधमाशी हातमिळवणी करतील असे मी तरी स्वप्नातही मानणार नाही.
शेवटी हा देश राहुलजींचा आहे. बाकी कुण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्णाचा नाही. देशाशी बेईमानी करणार्‍याशी गुप्तपणेदेखील ते साटेलोटे ठेवणार नाहीत. कदाचित ह्या अण्णाचा एन्काऊंटर करणार असतील. अब्जावधी रुपयात देखील विकला जाणार नाही पडतील असा थोर माणूस हजाराच्या मागे का लागेल बरे?

स्वर भायदे's picture

14 Aug 2011 - 11:02 am | स्वर भायदे

हा..हा..हा......

विकास's picture

16 Aug 2011 - 10:48 pm | विकास

अण्णांना आत्ताच तिहार मधून सोडण्यात आले जरी ते अण्णांनी अजून मान्य केले नसले तरी. त्या बातमीचा rediff.com मधील रोचक आहे:

'PM ordered Anna's release after consulting Rahul'

अण्णांवर टिका करताना पंतप्रधानांनी त्या आंदोलनाच्या मागे परदेशी हात असल्याचे म्हणले आहे, अमेरीकेस पण अप्रत्यक्ष नावे ठेवली आहेत.

आता "हात" (हाताचा पंजा) ही काँग्रेसची निशाणी, काँग्रेसची सर्वेसर्वा श्रीमती सोनीयाजी गांधी ज्या मुळच्या परदेशी आणि आत्ता देखील परदेशातच, ते ही अमेरीकेत. याचा सरळ अर्थ असा की पंतप्रधानांना त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले आहे याची कल्पना आली असेल. ते स्वत:च्या मुलाल पंतप्रधान होता यावे म्हणून कोणी लावले आहे ते देखील समजले असेल. पण प्रत्यक्षात कसे बोलणार म्हणून त्यांनी तमाम भारतीय जनतेस असे बोलून हिंट तर दिली नसेल की अण्णांच्या मागे राहूल गांधीच आहेत म्हणून? ;)

ईश आपटे's picture

24 Aug 2011 - 3:31 pm | ईश आपटे

काँग्रेसच्या पारंपारिक मुखंडांकडुन दुसरी काय अपेक्षा करणार ??? ते थोडेच मान्य करणार अण्णां काँग्रेसचे पिल्लू आहेत ते...........

ऋषिकेश's picture

24 Aug 2011 - 3:42 pm | ऋषिकेश

विकास आणि काँग्रेसचे पारंपरिक मुखंड!!!!!
आजच्या दिवसातले हे सर्वात विनोदी वाक्य असावे! :ड् :ड :ड

सुनील's picture

24 Aug 2011 - 3:52 pm | सुनील

परवा बाळकराम यांनी तात्याला काँग्रेसचा हस्तक ठरवले होते, आता ईश आपटे विकासरावांना!

अभ्यास कमी पडतोय!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2011 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते

काही तरी कमी पडतंय हे नक्की... अभ्यास की अजून काही ते माते कळत नाहीये! ;)

विकास's picture

24 Aug 2011 - 4:42 pm | विकास

@ ऋषिकेश, सुनील, बिपिन

सर्वांशी सहमत! :-)

मी केलेला पीजे माझ्यावरच उलटलेला पाहून मजा आली. आता कधी कोणी मला काँग्रेसचे विरोधक म्हणले तर वरील संदर्भ, "मी त्यातला नाही", म्हणायला उपयुक्त ठरेल. ;)

अण्णांच्या गारुडान बर्‍याच जणांना टांगापलटी केल आहे...
आता यशवंत सिन्हा हे ही भाजप सोडून अण्णांच्या मागे जायला तयार आहेत........
http://www.hindustantimes.com/Sinha-offers-to-resign-over-BJP-s-soft-Lok...