मागे हटू नका!

हैयो हैयैयो's picture
हैयो हैयैयो in काथ्याकूट
11 Aug 2011 - 9:26 pm
गाभा: 

मागे हटू नका!

अनेक दिवसांनंतर मिसळपावावर आगमनाची नोंद केली आणि प्रथमदर्शनीच एका धाग्यावर श्री. थत्ते ह्यांनी नोंदविलेली खालील प्रतिक्रिया वाचनात आली.

http://www.misalpav.com/node/18775#comment-329696

उदाहरण म्हणून येथे आणि उपक्रमावर नाडी विषयांत घडलेल्या चर्चांचे घेता येईल,

नाडीपट्टीत भविष्य असते असा दावा आहे अशी समजूत होण्याइतपत लेख शशिकांत ओकांनी लिहिले आहेत. त्याला दुजोरा देणारे लेख/प्रतिसाद** हैयो हैययो यांनी लिहिले. नंतर हैयो यांनी नाडीपट्टीतल्या भाषेविषयी काहीतरी प्रात्यक्षिक केले. त्यातून नाडीपट्टीत जुन्या तामीळ भाषेत लिखाण असते असे काहीतरी सिद्ध झाले म्हणे.

**ओकांच्या लेखाला घेतलेल्या आक्षेपांना वकिली प्रत्युत्तरे देणारे प्रतिसाद.
खालील दुवे उपयुक्त ठरतील.
http://mr.upakram.org/node/2962#comment-49620
http://mr.upakram.org/node/2962#comment-49620
http://mr.upakram.org/node/2962#comment-54074
शेवटच्या दुव्यात विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे मिळाली हे त्याच पानावर खाली दिसेल.

नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता. परंतु नाडीपट्टीविषयक दावा सिद्ध झाला असे सुचवणारे लेख-प्रतिसाद ओक/हैयो लिहू लागले. त्यांना जेव्हा नाडीपट्टीतील लिपी हा आक्षेपाचा दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा आहे असे सांगितले तेव्हा हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला.

आता हे उदाहरण युयुत्सुंचे नाही, पण त्या अनुभवामुळे आणि आव्हान धाग्यावरील युयुत्सुंच्या विधानांमुळे लोक मागे हटले असल्याची शक्यता आहे.

ह्या प्रतिक्रियेवर माझे भाष्य येणेप्रमाणे:-

१. श्री. धनंजय ह्यांनी विलक्षण प्रामाणिक भावनेने लिहिलेला लेख कशाप्रकारे फसला आहे हे मी त्याच लेखास प्रतिसाद लिहून दाखवून दिलेले आहे. http://mr.upakram.org/node/2962#comment-53703

२. श्री. धनंजय ह्यांचा विडंबनात्मक लेख मुळांत जरी फसला आहे, तरीही ह्या विषयासंदर्भात विचार करतां एका विशिष्ट विचारपद्धतीवर श्री. धनंजय आणि माझे दोघांचेही एकमत झालेले आहे असे मला वाटते. ही विचारपद्धती श्री. धनंजय ह्यांच्याच शब्दांत येणेप्रमाणे :- "अधिक विश्लेषण उपलब्ध असताना तुटपुंज्या विश्लेषणात अडकणे ही कार्यक्षम पद्धत नव्हे."

३. 'नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता.' हे विधान धादांत असत्य आहे. आपले प्रिय नाडीचिकित्सक श्री. घाटपांडे ह्यांनी 'पट्टीमध्ये काहीही लिहिलेले नसते, वाचक वाचण्याचे नाटक करतो' अशा अर्थाची विधाने केलेली आहेत. एका हैयोंनी त्याची सत्यासत्यता पडताळून त्यानिमित्त त्यांचे विचार काय ते मांडले, आणि चिकित्सकांच्या दृष्टीने त्या विधानांतील आव्हानांचा विषय लगेच संपला! ह्या संगतीतूनच मोठी विलक्षण विसंगती दृष्यमान होते आहे.

४. भविष्यकाळात नाडीपट्टीतील 'लिपी' हा चिकित्साभ्यासातील दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा जरी ठरला, तरीही सद्यस्थितीमध्ये लिपीशास्त्राची काही विशेष तत्त्वें 'अधिक विश्लेषणा'साठी उपलब्ध असताना, तुटपुंज्या ठोकताळ्यांच्या आधारे सारा विषय मुळातूनच मोडीत काढणे ही चिकित्सेतील कार्यक्षम पद्धत निश्चितच नव्हे. हे म्हणजे नाडीग्रंथवाचकाने विज्ञानासच मोडीत काढण्यासम आहे असे मी समजतो.

५. श्री. थत्ते पुढे म्हणतात :- "हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला." एकूणांत, हैयोंच्या विधानांतील अभिप्रेत अर्थ खोडसाळपणे लपवून स्वतःच्या वितर्कास सोयीचा जाईल असा अर्थ मुद्दामहून काढला जातो आहे हे स्पष्ट आहे.

६. http://mr.upakram.org/node/2962#comment-54074 येथे मी म्हटल्याप्रमाणे, नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यांत कोणाचे काय दावे आहेत, दावे आहेत की नाहीत किंवा कसे ह्याचीच श्री. थत्ते ह्यांस माहिती नसल्याने त्यांस निष्कारण चित्तभ्रांती उत्पन्न होत आहे. त्याहीपुढे जावून ते इतरांस चित्तभ्रांती निर्माण करीत आहेत. ही तर अवैज्ञानिक कार्यपद्धतीच म्हणावी लागेल.

असो. खरेखोटे वाचकांस लक्षांत यावे म्हणून, अर्थ सुलभ करून सांगावे लागेल.

<पूर्वी म्हटल्याप्रमाणे, माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही.>

हे विधान समजण्यासाठी :-

अ. नाडिग्रंथप्रेमी कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय
आ. नाडिग्रंथविरोधक कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय
इ. तटस्थाभ्यासक कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय

हे प्रथमतः लक्षांत घेणे आवश्यक ठरेल. एवढे जरी कोणा कळले, तरी उत्तम.

असो. वाचकांनो, श्री. थत्त्यांच्या समजूतीप्रमाणे आपण खरेच मागे हटला नसाल असे वाटते. खरेतर आपण 'मागे हटू नका' एवढेच सांगणेसाठी हा प्रपंच केला.

-

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

11 Aug 2011 - 10:08 pm | नितिन थत्ते

५. श्री. थत्ते पुढे म्हणतात :- "हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला." एकूणांत, हैयोंच्या विधानांतील अभिप्रेत अर्थ खोडसाळपणे लपवून स्वतःच्या वितर्कास सोयीचा जाईल असा अर्थ मुद्दामहून काढला जातो आहे हे स्पष्ट आहे.

माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही. असे विधान आपण या ठिकाणी तिसर्‍या परिच्छेदात केले आहे.

हैयोंच्या विधानात अभिप्रेत अर्थ मी लावलेल्या अर्थापेक्षा वेगळा असू शकेल असे दर्शवणारा केवळ "अभ्यासांती" हा एकच शब्द आहे. [कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे हे शब्द सुद्धा हैयोंच्या प्रतिसादात नाहीत जे मी लिहिले आहेत]. हे शब्द आत्यंतिक महत्त्वाचे आहेत असा हैयोंचा (वकिली) युक्तिवाद असेल तर

कल्पांतापर्यंत नसेल पण काही व्यक्तींचे भविष्य नाडीपट्टीत असते असा तरी दावा हैयोंचा आहे का?

नसेल तर क्लिअर करावे म्हणजे हैयोंचे नाडीपट्टीत असलेली लिपी तमीळ/ब्राह्मी/खरोष्टी/मोडी आहे याबाबतचे लेख आम्ही दुर्लक्षित करू आणि आमचे वाद शशिकांत ओक यांच्याशी चालवू.

आम्ही तुमच्या विधानांचे विपर्यस्त अर्थ लावतो असे तुमचे म्हणणे असल्याने तुमचे म्हणणे काय हे येथे स्पष्ट करावे. तुमचे काय म्हणणे आहे हे आम्हीच अभ्यासांती शोधून काढावे असे म्हणणे असेल तर तुम्ही या विषयात पळपुटेपणा* करता आहात असा स्पष्ट आरोप मी करतो.

*दावे काय आहेत हेच सांगायचे नाही, मग चिकित्सा न करताच थोतांड म्हणू नका असे सांगत रहायचे याला मी पळपुटेपणाच म्हणतो.

अवांतर : "आज बर्‍याच दिवसांनी आलो" ही कॉमन फ्रेज कशी वापरली जाते बुवा?

भाकरी's picture

11 Aug 2011 - 10:45 pm | भाकरी

त्याना म्हणायचं आहे की "अनेक दिवसांनंतर (आज हैयो हैयैयो म्हणून) मिसळपावावर आगमनाची नोंद केली आणि प्रथमदर्शनीच (आधी वाचून ठेवलेल्या ) एका धाग्यावर (परत क्लिक केल्यामुळे) श्री. थत्ते ह्यांनी नोंदविलेली खालील प्रतिक्रिया वाचनात आली." !!

मुलानो, जरा दम धरा. निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगानी नटलेलं लेखन दिसेलंच आता. जSSSरा दम धरा... :-)

आत्मशून्य's picture

12 Aug 2011 - 5:21 am | आत्मशून्य

आज क्या है कल क्या है दिन तो है वही|
सूब क्या है शाम क्या है फर्क नही कोही||

भूल जाये गम साअरे भूल जाये गम|
गूस्सा आये तो थोडा रोकले सनम||

आरे गेटप अँड डँन्स यही तेरा चॅन्स|
तेरेही हाथोमे सबकूछ है रे||

चिप पखाक चिपपाख डफली बजा |
पेहेला कौन पेहेला कौन..... पेहेला पेहेला पेहेला पेहेला पट्टी रॅप ||

पुर्वी नैमिषारण्य नावाचा एक प्रकार होता हो!
आजकाल फार आठवण येतेय त्याची.
इथल्या सगळ्या शास्त्री -पंडित - ज्योतिषांसाठी फार उपयोगी पडला असता.

धन्या's picture

11 Aug 2011 - 11:11 pm | धन्या

ओ... यकुराव... तुम्ही केव्हापासून क्रिप्टीक लिहायला लागलात?

हा पोर्णिमेचा तर परिणाम नाही ना?
(वरील ओळ लिहिताना अधिक उणे सात दिवसांचा टॉलरन्स विचारात घेतला आहे. उगाच पोर्णिमा तर १३ ऑगस्टला आहे असले फाटे फोडू नयेत.)

प्रियाली's picture

11 Aug 2011 - 11:14 pm | प्रियाली

पुर्वी नैमिषारण्य नावाचा एक प्रकार होता हो!
आजकाल फार आठवण येतेय त्याची.
इथल्या सगळ्या शास्त्री -पंडित - ज्योतिषांसाठी फार उपयोगी पडला असता.

त्यांना वनवासी करताय का नैमिषारण्यात जाऊन आणखी महाभारत घडवायला सांगताय? ;)

धन्या's picture

11 Aug 2011 - 11:24 pm | धन्या

अच्छा असं आहे होय,.. मग आताच्या परिस्थितीचा विचार करता तुमची दुसरी शंकाच रास्त वाटते :)

@ प्रियालीताई,

त्यांना वनवासी करताय का नैमिषारण्यात जाऊन आणखी महाभारत घडवायला सांगताय?

तिकडं जे व्हायचं ते होऊन जाऊ द्या..
इथल्या बोर्डाचे खफ होणे तरी वाचेल.

@ धनाजीराव

ओ... यकुराव... तुम्ही केव्हापासून क्रिप्टीक लिहायला लागलात?
हा पोर्णिमेचा तर परिणाम नाही ना?
(वरील ओळ लिहिताना अधिक उणे सात दिवसांचा टॉलरन्स विचारात घेतला आहे. उगाच पोर्णिमा तर १३ ऑगस्टला आहे असले फाटे फोडू नयेत.)

आंय! याला क्रिप्टीक म्हणतात काय?
बहुतेक पौर्णिमेचाच परिणाम असावा.

मित्र हो,
अशोककुमार असलेल्या पुर्वीच्या सिनेमा नामश्रेयावलीत
"आणि प्राण...." असे दिसे. तेंव्हा प्रेक्षकांच्या मनात धडकी भरे...

तसेच काहीसे हैयोंच्या धाग्यावर ओकांची रंगीबेरंगी इंद्रधनुच्या छटांची पखरण पाहून .......नाडीविरोधकांचे ... आता वाजले की बारा....

तू रे तू तू रे तू सतरंगी रे , तू रे तू तू रे तू मनरंगी रे
नाडीची माया हीच खरी माया सतरंगी रे मनरंगी रे
असेल नाडीची साथ, कराल सार्‍या अडचणींवर मात
फक्त रुपये दे अन तुझा तू अनुभव घे सतरंगी रे

शशिकांत ओक's picture

12 Aug 2011 - 12:48 am | शशिकांत ओक

द्या टाळी....

धन्या's picture

12 Aug 2011 - 12:57 am | धन्या

फक्त रुपये दे अन तुझा तू अनुभव घे सतरंगी रे

माझं हे म्हणणं पटलेलं दिसतंय तुम्हाला ;)

माझं हे म्हणणं पटलेलं दिसतंय तुम्हाला

आता उगं अर्ध्या रातचा टैंब है म्हणून ओक साहेब टाळ्या देतायत..
सक्काळच्याला बघा कसे पट्टीचे बोलणारे होतात ते..

हे ईतकं ठामपणे तुम्ही कशावरुन म्हणू शकता? ओक साहेबांची नाडी तुम्ही वाचलीत का?

हे ईतकं ठामपणे तुम्ही कशावरुन म्हणू शकता? ओक साहेबांची नाडी तुम्ही वाचलीत का?

मी हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगात प्रतिसाद दिलेत का?
मग?
जाऊ द्या.. लोकांनाही जागा शिल्लक रहायला पाहिजे उद्या सकाळी..

Nile's picture

12 Aug 2011 - 4:02 am | Nile

द्या टाळी....

शमस्व!! टाळी द्यायला हात वर केले अन खाली नाडी सूटली तर?

शशिकांत ओक's picture

12 Aug 2011 - 3:05 pm | शशिकांत ओक

मित्रा,
... आधी घट्ट बांधा नाडीविषयाची गाठ मग हात वर करा अन टाळी द्या....
.....इथे घाई कुणाला आहे...
... नाडीग्रंथांच्या अभ्यासासाठी मागे हटू नका असे सुचवले गेले आहे....

सहज's picture

12 Aug 2011 - 5:52 am | सहज

नाडी एजन्सी कितीला मिळते? काही प्रेसेंटेशन असेल तर कृपया द्यावे.

सहजराव, फ्रँच्यायसी म्हणा हो... एजन्सी शब्द खुप डाऊन मार्केट वाटतो...

सहज's picture

12 Aug 2011 - 10:51 am | सहज

फ्रँच्यायसी शब्द हुच्चभ्रु शब्दकोशात असतो, मी जरा 'थर्ड क्लास' शब्दकोश वापरला

सहज गोखले

अच्छा... म्हणजे व्यवसायाला साजेसाच शब्दकोष वापरला तर ;)

निशिकांत वोक

विनायक प्रभू's picture

12 Aug 2011 - 10:59 am | विनायक प्रभू

अहो सहजराव,
फ्रँचायसी नव्हे फ्रेंचायसी असते ते.
आले का लक्षात?
निदान तुम्हाला तरी लक्षात यायला हरकत नसावी.

शशिकांत ओक's picture

12 Aug 2011 - 3:18 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
ओकांची व्यक्तिगत निंदा करून काय साधले ... फक्त आसुरी आनंद....
आपण सारे नाडी महर्षींच्या कार्याची माहिती जाणून घेऊन आता ओकांशी चर्चा करू असे म्हणाल तेंव्हा नविन विषयाला सामोरे गेल्याचे आपणाला समाधान मिळेल......
मला कळलेली नाडीग्रंथांची माहिती मी सादर करीत आलो आहे. आपण ही इच्छा असेल तर शोधावी.
म्हणूनच...
... नाडीग्रंथांच्या अभ्यासासाठी मागे हटू नका असे सुचवले गेले आहे....

जरुर... चर्चा अशी नाही. परंतू तुमच्या नाडी महर्षींविषयी मला जाणून घ्यायला आवडेल... तुमच्या अशा एखादया लेखाचा दुवा देऊ शकाल का?

शशिकांत ओक's picture

12 Aug 2011 - 11:04 pm | शशिकांत ओक

मित्रा धनाजी,
नाडी महर्षी माझे नाहीत आपले सर्वांचे आहेत.
त्यांच्या वाणीचा आपल्याला अनुभव घ्यावा असे वाटत असेल तर नाडी ग्रंथांतून त्यांचा परिचय करून घेतला तर चांगले.
माझे पुस्तक आपणांस त्यांची बाह्यांगाची माहिती देईल.
आपण जाणता. इथे त्यातील माहिती दिली तर त्यावर जाहिरात बाजीचा आक्षेप घेणारे आहेत.
आपणांस महर्षी अत्री आणि माता अनुसूया जीव नाडी कथन हा धागा आवडेल.

मला व्यनि करु शकता किंवा खरड टाकू शकता.

आमच्या माहितीत एकच महर्षी आहेत, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम मधले महर्षी व्यास. आता हे "आपले सर्वांचे" महर्षी कोण हे जाणून घ्यायची खुप इच्छा आहे.

अर्थात लेखन ऑनलाईन असले तरच सांगा. पुस्तके विकत वगैरे घेण्याच्या भानगडीत आपण पडणार नाही :)

शशिकांत ओक's picture

13 Aug 2011 - 12:08 am | शशिकांत ओक

धागा उलगडून पाहावा.

उलगडला होता.

ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.

ईथपर्यंतच वाचलं. पुढे वाचू शकणार नाही याची जाणिव होऊन पुन्हा घडी घालून ठेऊन दिला. :)

नितिन थत्ते's picture

13 Aug 2011 - 7:42 am | नितिन थत्ते

ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.

ओकसाहेबांच्या वरील परिच्छेदात स्पष्टपणे दावे करत आहेत आणि हैयो म्हणतात कोणीही अभ्यासांती असा दावा केला नाही. याचा एकच अर्थ लागू शकतो तो म्हणजे ओकसाहेब अभ्यास न करताच हा दावा करत आहेत.

माझा उपरोल्लेखित लेख विडंबन आहे, हे विधान मला अमान्य आहे.

त्या लेखात लिपीशास्त्राबाबत किंवा भूगोलाबाबत दिलेली कुठलीही माहिती कपोलकल्पित नाही. संदर्भसिद्ध आहे. मग फसलेले काय आहे?

त्या ठिकाणी लेखाखालील प्रतिसादांतसुद्धा त्या लेखास श्री. हैयो हैयैयो यांनी "विडंबन" म्हटलेले होते. "विडंबन कसे" म्हणून मी त्यांना तेथे विचारले होते. परंतु त्यांनी तेथे मला समजावून सांगितलेले नाही. म्हणून येथे पुन्हा विचारतो. मुदलात विडंबन कसे तेच समजले नाही, तर व्याजात फसलेले विडंबन कसे हे मला कसे कळणार?

तो लेख श्री. हैयो हैयैयो यांनी लिहिलेल्या दोन लेखांच्या चौकटीवर बेतलेला आहे हे खरे आहे. पण "चौकटीवर बेतले असणे" म्हणजे विडंबन होत नाही. नाहीतर प्रत्येक गझल ही आद्य गझलेचे विडंबन होऊ लागेल.

हैयो हैयैयो's picture

13 Aug 2011 - 9:11 pm | हैयो हैयैयो

प्रतिसाद.

नमस्कार,

'मागे हटू नका!' ह्या लेखाद्वारे श्री. थत्ते ह्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर माझ्यावतीने भाष्य केले गेले. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांवरून मागे हटले ते कोण, आणि पुढे सरसाविले ते कोण ह्याची माहिती व्हावी. ह्या प्रतिक्रियांमध्ये काही सदस्यांकडून 'चर्चेस योग्य' ठरावेत असे काही मुद्दे उपस्थित केले गेले. ह्या चर्चेस योग्य वाटणार्‍या अशा काही मुद्द्यांवर मी येथे प्रतिक्रिया देतो आहे.

१. श्री. थत्ते :-

...कल्पांतापर्यंत नसेल पण काही व्यक्तींचे भविष्य नाडीपट्टीत असते असा तरी दावा हैयोंचा आहे का?....

मला स्वतःस ज्योतिष विषयाबाबत काडीमात्र स्वारस्य नाही. व्यक्तींचे भविष्य नाडीग्रंथांत असते असा माझा मुळीच दावा नाही. तथापि, 'नाडीग्रंथांत आढळणारे लेखन हे काही अंशी आणि/अथवा संपूर्णतः स्वतःस लागू होते' ह्या प्रकारची विधाने करणारे अनेक जण तुल्यबल प्रमाणांत आधिक्याने अस्तित्त्वांत आहेत असा मात्र एक दावा आहे. (पक्षी: त्यास 'दावा' असे म्हणतां आल्यास.) असे लोक अस्तित्त्वांत असल्याचा दावा करताना, स्वतः हैयो तसे म्हणणार्‍या लोकांस समक्ष भेटून त्यांची विविध प्रकारे तपासणी आणि/अथवा उलटतपासणी करत आलेले आहेत हेही ध्यानीं घ्यावे.

...तुमचे काय म्हणणे आहे हे आम्हीच अभ्यासांती शोधून काढावे असे म्हणणे असेल तर तुम्ही या विषयात पळपुटेपणा* करता आहात असा स्पष्ट आरोप मी करतो...

खरेतर घोड्यासमोर ठेविलेला घास त्यास खाता न येईल, तर घोड्याने खरारा करणार्‍यासच पळपुटा म्हणावे असे काहीसे होते आहे. कोणाचे दावे काय, कोणाचे प्रश्न काय, ह्याची माहिती आपण स्वतः ठेवणे आवश्यक असल्याचे मी पूर्वीही म्हटलेले आहे. तरीही आपणांस आपल्या सार्‍याच प्रश्नांची उत्तरे सिद्ध ('रेडिमेड्') हवी आहेत असे दिसते, ज्यामुळे सदर चर्चेमध्ये आपले स्वतंत्र योगदान ते काय असा प्रश्न निर्माण होतो. पळपुटेपणाचा अथवा इतर कोठलाही आरोप करण्याआधी स्वतःची लोकस स्टाण्डि सिद्ध करा, त्याशिवाय कोणत्याही आरोपास काहीही अर्थ नाही.

२. श्री. धनंजय :-

...माझा उपरोल्लेखित लेख विडंबन आहे, हे विधान मला अमान्य आहे...

श्री. धनंजय, आपला लेख विडंबन असल्याचे नाकारण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. प्रथमतः विडंबनपर लेखामध्ये 'संदर्भ द्यावा' हा नियम आपण पाळलेला आहे, योग्य ठिकाणी त्याची आपण आठवणही करून दिलेली आहे. खरेतर ह्या ठिकाणी श्री. थत्त्यांनी जेंव्हा आपल्या लेखास विडंबन असे संबोधिले, तेंव्हाच आपण आपला लेख विडंबन नसल्याचे प्रतिपादन करू शकला असता. परंतु, बहुधा त्यापूर्वीच आपला लेख कुठे कुठे विडंबनात्मक नाही आणि पर्य्यायाने कुठे कुठे तो विडंबनात्मक आहे हे आपण नमूद करून ठेविले असल्याने ते शक्य झाले नसावे. असो.

...त्या लेखात लिपीशास्त्राबाबत किंवा भूगोलाबाबत दिलेली कुठलीही माहिती कपोलकल्पित नाही. संदर्भसिद्ध आहे. मग फसलेले काय आहे?...

मूलतः, विडंबनापेक्षा आपला लेख गंभीर असल्याचे आपले प्रतिपादन असेल तर, नाडिग्रंथांच्या चर्चेच्या संदर्भाशिवाय पाहतां आपला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मी पूर्वीही मान्य केलेले आहे. आपला लेखांत कोठलीही कपोलकल्पित माहिती नसूनदेखील वाचकास आपला लेख वाचताक्षणी हैयोंच्या लेखाची आठवण व्हावी, हेच खरेतर मोठे विलक्षण विडंबन म्हणावे. हैयोंच्या लेखाची आठवण व्हावी असे आपल्या लेखामध्ये काही नसते, तर आपला लेख स्वतंत्र अस्तित्त्व धरला असता. मला वाटते, नेमके ह्याच ठिकाणी आपला लेख फसला आहे.

केवळ 'लेख फसला आहे' हे विधान नाकारण्याकरिता 'माझा लेख विडंबनात्मक नव्हेच' असा पावित्रा कृपया घेवू नये, कारण असे केल्याने लेखकाचे प्रामान्यच धोक्यात येते.

-

मूळ लेखाच्या खाली लेखाच्या गांभीर्याबाबत सांगोपांग चर्चा केलेली आहे. तो लेख कुठल्याही महत्त्वाच्या प्रकारे विडंबन नसल्याबाबत भूमिका नीट समजावून सांगितली आहे. त्यात कुठलाही विलंब नव्हता. पुढे त्याचा संदर्भ येत गेला तर माझ्या कामातून वेळ मिळेल, त्या कालावधीतच मी उत्तर देऊ शकेन.

त्या लेखात मजेदार अशी एकच बाब आहे, ती मूळ माहितीच्या प्रामाण्यात नाही : संस्कृतात ठीक, पण मराठीत बोजड असे समास बनवण्याची हैयो हैयैयो यांची जी शैली आहे, ती मजेदारपणे उचललेली आहे. हे शब्द मजेदार वाटते, तरी ते मराठीत अर्थपूर्णच आहेत. त्यातली मजा सोडून देऊन केवळ अर्थ वाचण्यास वाचकास पुरती मुभा आहे.

आपला लेखांत कोठलीही कपोलकल्पित माहिती नसूनदेखील वाचकास आपला लेख वाचताक्षणी हैयोंच्या लेखाची आठवण व्हावी, हेच खरेतर मोठे विलक्षण विडंबन म्हणावे.

ही विडंबनाची सर्वमान्य व्याख्या तर नाहीच, सर्वमान्य व्याख्येच्या जवळही तुमचा हा निकष जात नाही. मेघदूतानंतर संस्कृतात कित्येक शतके अनेक कवींनी दूतकाव्ये लिहिली, ती सर्व वाचता कालिदासाच्या मेघदूताचीच आठवण येते. त्यामुळे काही ही सगळी काव्ये मेघदूताची विडंबने मानली जात नाहीत.

नाडिग्रंथांच्या चर्चेच्या संदर्भाशिवाय पाहतां आपला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मी पूर्वीही मान्य केलेले आहे.

संदर्भामुळे कुठल्या प्रकारे स्तुत्यता/माहितीचे प्रामाण्य कमी होते? आणि तुमच्या मते संदर्भ आहे तरी काय? रेबेका टावबर हिच्या कॅन्सरबद्दलच्या पत्रांची छाननी नाडीग्रंथांइतक्या सहानुभूतीने केली जावी, इतका काय नाडीग्रंथांचा संदर्भ आहे. एखाद्या बिचार्‍या मुलीच्या दुखण्याबाबतच्या पत्रांसाठी सहानुभूती उत्पन्न करणे, यासाठी नाडीग्रंथांच्या अभ्यासाचा संदर्भ देणे, यात निंद्य असे काय आहे?

तुम्ही व अन्य काही वाचकांनी विडंबनाचा धोशा लावला त्या बिचार्‍या मुलीच्या दुखण्याबाबतच्या पत्रांबाबत कुठलीही गंभीर दखल घेतली नाही. संदर्भ देऊन नाडीग्रंथांच्या अभ्यासपद्धतीचा फायदा त्या बिचार्‍या मुलीबद्दलच्या पत्रांच्या अभ्यासाकरिता व्हावा हेच तुम्हाला मान्य नाही काय? याचे कृपया उत्तर द्यावे. मान्य नसेल, तर या बिचार्‍या मुलीबाबतच्या पत्राबाबत तुमचे मन असे कठोर का झाले, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, नाही तर या कठोरपणाचे कोडे आम्हा वाचकांना टोचत राहील. मान्य असेल, तर "संदर्भ म्हणजे विडंबन" हा मुद्दा तुम्ही का म्हणून गिरवत आहात? संदर्भ चुकला असेल, तर त्या बिचार्‍या मुलीच्या पत्रांबाबत अभ्यास मागे हटू नये, त्यासाठी लेखात काय बदल व्हावेत ते सुचवावे. जे फसले आहे, ते सुधारण्याचा यथाशक्ती प्रयत्न मी करेन. तुमच्या अशा मदतीकरिता मी तुमचा ऋणी राहीन.

तुमच्या कुठल्याही प्रतिसादात तुम्ही रेबेका टावबरच्या पत्रांबाबत काय करावे, याबाबत मार्गदर्शन केलेले नाही, मात्र नाडीग्रंथांच्या अभ्यासासाठी तुम्ही दाखवलेली पद्धत वापरू नये, या बाबतीत अडून आहात. अभ्यासपद्धतीबाबत गुरूंकडून अशा एकांगी मर्यादा घालणे म्हणजे मनाचा संकुचितपणा होय. मोठ्या मनाने तुमच्या अभ्यासपद्धतीचा लाभ रेबेका टावबरविषयीच्या पत्रांना होऊ द्यावा, अशी विनंती - जेणेकरून अधिकाधिक लोक त्या पत्रांकडे पूर्वदूषितग्रह सोडून त्यांचा अभ्यास करतील. तुम्ही असे केल्यास तुमची प्रशंसाच होईल. पण प्रशंसेचे सोडा - त्याची तुमच्या इभ्रतीच्या आणि उच्च स्थानाच्या व्यक्तीला प्रशंसेने फरक पडणार नाही. एखाद्या गरीब बिचार्‍या व्यक्तीला किंवा अभ्यासकाला तुमच्या पद्धतीचा फायदा होण्याकरिता - केवळ दया म्हणून - तुमची पद्धत तुम्ही वापरू द्यावी.

राजेश घासकडवी's picture

14 Aug 2011 - 7:23 pm | राजेश घासकडवी

लेखनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी त्याची थोतांड म्हणून संभावना करायची पद्धत जुनी आहे. गॅलिलिओचे विचार तत्कालीन धर्मव्यवस्थेला पटले नाहीत म्हणून त्यांनी त्या लिखाणाला येन केन प्रकारेण खोटं पाडलं.

पण वरलिया रंगाला भुलून मलादेखील हे विडंबन वाटलं होतं, हे मी मान्य करतो. आता धनंजय यांचा प्रतिसाद वाचून माझे विचार बदलावे अशा विचाराचा झालो आहे. नुसत्याच माध्यमाच्या स्वरूपाबद्दल निष्कर्ष काढून मी त्यातल्या गर्भितार्थाकडे दुर्लक्ष केलं. जर मी वैचारिक झापडं न वापरता अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवला असता तर किमानपक्षी त्या टोलफ्री नंबरवर कॉल तरी केला असता.

रेबेका टावबर ही अगदी तरुण वयात असाध्य रोगाने आजारी होती. काय झालं असेल त्या बिचाऱ्या मुलीचं? विचाराने मन थरकावून जातं.

हैयो हैयैयो's picture

27 Aug 2011 - 8:05 pm | हैयो हैयैयो

प्रतिक्रियेला प्रतिउत्तर

श्री. धनंजय, नमस्कार,

आपला वितर्क मला कळतो. सद्यस्थितीमध्ये त्याची वैधता मी नाकारत नाही. आपला वितर्क कोठून येतो आहे हेही माझ्या ध्यानांत येते. आपल्या लेखांतील गंभीर विषयाची मी दखल घेतली नाही असे आपणांस वाटत असल्यास कृपया तो असमज दूर करावा. आपल्या लेखांतील गांभीर्याची नोंद घेतल्याचे मी पूर्वीच स्पष्ट केलेही आहे. असो. सध्याच्या वितर्काबाबत ह्या क्षणी मी Let's agree to disagree असे म्हणेन. वरील वितर्काव्यतिरिक्त इतर काही वितर्क असल्यास तो मांडून पहावा. आताच्या आपल्या वितर्काबद्दल योग्य वेळी पुन्हा नव्याने चर्चा करतां येईल. त्या वेळी आपला वितर्क विडंबनाच्या आड न येता सरलतेने आला तर आपला दोघांचाही बहुमूल्य वेळ जाणार नाही, हेही नमूद करू इच्छितो.

धन्यवाद.

-

शशिकांत ओक's picture

17 Aug 2011 - 11:48 am | शशिकांत ओक

मित्र हो,

धनंजय, हैयों आणि इतरांची 'ते' विडंबन आहे किंवा नाही यावर व्यक्त केलेली मते आपण वाचतो.

धनंजय हैयोंना विनंती करणारे लेखन केले आहे. ते म्हणतात,

अधिकाधिक लोक त्या पत्रांकडे पूर्वदूषितग्रह सोडून त्यांचा अभ्यास करतील. तुम्ही असे केल्यास तुमची प्रशंसाच होईल. पण प्रशंसेचे सोडा - त्याची तुमच्या इभ्रतीच्या आणि उच्च स्थानाच्या व्यक्तीला प्रशंसेने फरक पडणार नाही

हैयो त्याबाबत योग्य ते ठरवतील.

हैयो धनंजयांना म्हणतात,

'नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता.' हे विधान धादांत असत्य आहे. आपले प्रिय नाडीचिकित्सक श्री. घाटपांडे ह्यांनी 'पट्टीमध्ये काहीही लिहिलेले नसते, वाचक वाचण्याचे नाटक करतो' अशा अर्थाची विधाने केलेली आहेत. एका हैयोंनी त्याची सत्यासत्यता पडताळून त्यानिमित्त त्यांचे विचार काय ते मांडले, आणि चिकित्सकांच्या दृष्टीने त्या विधानांतील आव्हानांचा विषय लगेच संपला! ह्या संगतीतूनच मोठी विलक्षण विसंगती दृष्यमान होते आहे.

या बाबत त्यांनी जी वरील विनंती हैयोंना केली आहे तशीच मी धनंजयांना विनंती करतो की "पूर्वदूषितग्रह सोडून (ते नाडीग्रंथांचा)त्यांचा अभ्यास करतील. तुम्ही असे केल्यास तुमची प्रशंसाच होईल."
नाडी विरोधक व नाडीग्रंथप्रेमी यांच्या कथनांवर विसंबून न राहता नाडीग्रंथांच्या पट्टीतील मजकुराबाबत आपण आपले स्वतंत्र विचार मांडावेत. असे करताना त्यांनी विदेशातील भाषातज्ज्ञांची मदत घेऊन विचार मांडावेत. म्हणजे नाडीग्रंथांची त्रयस्थपणे केली जाणारी चिकित्सा असे त्याला स्वरूप येईल.

राजेश घासकडवींनी जे मत मांडले आहे की

लेखनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी त्याची थोतांड म्हणून संभावना करायची पद्धत जुनी आहे. गॅलिलिओचे विचार तत्कालीन धर्मव्यवस्थेला पटले नाहीत म्हणून त्यांनी त्या लिखाणाला येन केन प्रकारेण खोटं पाडलं.

नेमके तेच मत मी ही पुर्वीपासून नाडीग्रंथांसंदर्भात म्हणत आलो आहे. पण येनतेन प्रकारे नाडीग्रथांना खोटे पाडायचे असे ठरवल्यावर मग ...

ज्यांना विविध पद्म पुरस्कार दिले गेले त्या ऋषितुल्य अण्णा हजांरेवर आजकाल व्यक्तिगत हल्ले होत आहेत... कारण त्यांनी उभ्या केलेल्या मुद्यांना शिवता येत नाही मग ते भष्ट आहेत. असा बोभाटा करून पाहू. ...
... असे असेल तर नाडी ग्रंथावरील सडेतोड लेखनाला खोटे पाडता येत नाही, नावे ठेवायला येत नाहीत म्हणून मग ओकांवर व्यक्तिगत निंदा करून पाहू ..असा काहींचा पवित्रा आहे. ....ठीक आहे... असो.

पिवळा डांबिस व अन्य विदेशस्थ मित्र हो,

विदेशात आपणांसारखे अनेक विचारक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या माहितीतील काही तमिळ चिकित्सकांशी
आपण संपर्क करून नाडी ग्रंथांतील मजकुरची छाननी करायला विनंती करावी. त्यात काय लिहिलेले आहे याची शहानिशा करावी. व्यस्त कार्यक्रमामुळे वा आपल्या वैचारिक बांधिलकीमुळे यासाठी वेळ काढणे शक्य वाटत नसेल तर निदान अशा लोकांशी संपर्क करून द्यायला आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे.

श्री. राजेश जी, धनंजयजी, पिवळा डांबिसजी, आणि अन्य भारता बाहेरील स्थित मिपा मित्र हो,

राजेश घासकडवींनी जे मत मांडले आहे की

लेखनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी त्याची थोतांड म्हणून संभावना करायची पद्धत जुनी आहे. गॅलिलिओचे विचार तत्कालीन धर्मव्यवस्थेला पटले नाहीत म्हणून त्यांनी त्या लिखाणाला येन केन प्रकारेण खोटं पाडलं.
नेमके तेच मत मी ही पुर्वीपासून नाडीग्रंथांसंदर्भात म्हणत आलो आहे. ....ठीक आहे... असो.

झाले गेले सोडून देऊ....

जर महर्षिंनी जगातील भाषा, देश, धर्म आदि बंधनांना पार करून दुजा भाव न मानता लेखन केले आहे तर त्यांच्या कार्याची ओळख करुन घ्यायला आपणदेखील ही बंधने झुगारून "हा काय प्रकार आहे" हे जाणायला तत्पर असावे.असे वाटून ही विनंती करत आहे.
हे काम आपणासर्वांचे आहे.
आपल्यासारख्या अभ्यासू, विचारवंत आणि विविध वैज्ञानिक विचारांना प्राधान्य देणाऱ्यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील तमिळ भाषाजाणकारांच्या निर्देशनाखाली आणि ताडपत्रावरील अभ्यासकाम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने
एखादा नाडीग्रंथ अभ्यास गट किंवा फोरम बनवू या. विविध तज्ज्ञांची मते मतांतरे समजाऊन घेऊ या. आंतरजालामुळे दुरस्थ असून ही अशी कामे एकत्रित करता येणे शक्य आहे.
समजा आपल्याला अजून या कामात सहभागी व्हावे असे वाटत नसेल तर आपल्या परिचयातील संबंधित संस्था व व्यक्तींशी संपर्क साधायला मदत करा.
मागे हटू नका....

काका, हा धागा कशाला वर आणलात? त्याच धाग्यात लिहायचं की :)

शशिकांत ओक's picture

16 Sep 2011 - 6:26 pm | शशिकांत ओक

मित्रा,
आपण विचारलेत म्हणून खुलासा-
ह्या धाग्याचे महत्व वेगळे आहे. त्यातील सहभागी सहसा माझ्या लेखनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात.
तर काहींना हैयोंनी विषय काढलेला चालतो. म्हणून मी वरील उल्लेख या ठिकाणी केला.
गुगळेवर प्रतिक्रिया आत्मशून्यांच्या नंतर द्यावी असे वाटून आहे.