अधुनिक लोकशाहीची आई...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
13 Aug 2011 - 4:03 am
गाभा: 

ब्रिटन या राष्ट्रास बर्‍याचदा "mother of all democracies" अर्थात "अधुनिक लोकशाहीची आई" असे सार्थपणे संबोधिले जाते. ब्रिटनच्या लोकशाही मुल्यांविषयी कधी कोणाला शंका आल्याचे सहसा दिसत नाही. अर्थात येथे ध्यानात घेतले पाहीजे की "लोकशाही" ही आपल्या (स्वतंत्र) देशातील लोकांसाठी असते...तरी देखील असे म्हणावे लागेल की या "आईने" भारत-अमेरीकेसहीत अनेक राष्ट्रांमध्ये जरी पारतंत्र्य आणले असले तरी अनेक देशांनी तीच्या पावलावरपाऊल ठेवत नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये लोकशाही आणली आणि स्वतःच्या जनतेला/सत्ताधार्‍यांना पचेल अशी रुजवली. असो. तो आता इतिहास झाला.

पण व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या आयुष्यात ही परीक्षेचा काळ येतो, ज्यामध्ये हरीश्चंद्राप्रमाणे अशा व्यक्ती/राष्ट्राची मुल्ये तपासली जातात. आज असाच काळ ब्रिटनमधे आला आहे असे वाटते. आज संपलेल्या आठवड्यात ब्रिटनमधे जी काही एरवी फुटकळ वाटू शकेल अशा कारणाने दंगल चालू झाली आणि पसरली, ती बघता, साहेबाच्या राज्यात देखील जनता जर भुकेली असेल, आर्थिक दरीने गांजलेली असेल तर रस्त्यावर येऊ शकते आणि सौंदर्यप्रसाधनांपासून ते चित्रवाणी-संचा पर्यंत कशाचीही लुबाडणूक करू शकते हे दिसले. तशी लुबाडणूक चालू असताना, जे सुरतेच्या वखारीत ब्रिटीश करू शकले ते राणीच्या राज्यात करू शकले नाहीत असे दृश्य जगासमोर आले.

अर्थात आता ४-५ दिवसात सगळे काबूत आले खरे... पण २०००+ लोकांना अटकेत देखील टाकले गेले आहे. त्यात काही गैर नाही, कायदा-सुव्यवस्था पाळताना हे करावे लागले तर समजण्यासारखेच आहे. पण ते होत असताना स्वतः पंतप्रधान कॅमेरॉनच म्हणू लागले की, "Picture by picture, these criminals are being identified and arrested, and we will not let any phony concerns about human rights get in the way of the publication of these pictures and the arrest of these individuals." थोडक्यात आधीच्य त्यांनी मानवी हक्क संघटनांना अप्रत्यक्ष दम दिला की आमच्या मधे येऊ नका म्हणून. आता अजून एक पायरी खाली उतरत पंतप्रधान कॅमेरॉन यांनी ट्वीटर, फेसबूक या सार्वजनिक वापराच्या सामाजीक संस्थळांच्या वापरावर देखील मर्यादा आणायचा विचार चालू केला आहे. (David Cameron has told parliament that in the wake of this week's riots the government is looking at banning people from using social networking sites such as Twitter and Facebook if they are thought to be plotting criminal activity. - गार्डीयन).

असे मध्यपुर्वेतच काय अगदी भारतासारख्या लोकशाही देशात सुद्धा खुट्ट झाले की ही विकसीत राष्ट्रे लगेच ट्वीट नाही तर कावकाव करतात. जे काही इजिप्तपासून मध्यपुर्वेत सुरू झाले ते योग्यच होते. त्यामधले सोशल नेटवर्कींगचे योगदान सगळ्यांनी कौतुकाने चघळले गेले. पण आता तेच बुमरँग होऊ लागले तेंव्हा तात्काळ बंदीची भाषा...

हे असे का होत असावे? ब्रिटनच्या दंगलींना अनेक रंग देत विश्लेषण होत आहे. त्यात वर्णांपासून ते वर्गांपर्यंत मुद्दे आले आहेत. आता जे काही दिसत आहे त्याप्रमाणे सामाजीक विषमता हे एक प्रमुख कारण दिसत आहे. सामान्य माणसे पिचली जात आहेत. आणि बदलणार्‍या आर्थिक घडामोडींप्रमाणे राज्ये कशी चालवावी या कल्पनेने हे सत्ताधीश पण पिचले जात आहेत.

पण म्हणून ज्या पायावर हे राष्ट्र उभे आहे त्यावरच घाला घालावा का? जर अशीच सत्ताधिशांच्या मताप्रमाणे लोकशाहची मुल्ये बदलणार असतील तर, या "सर्व लोकशाहींच्या आईस", "माता न तू वैरीणी" असे म्हणावे का?

अजून एक प्रश्न पडतो, याचे तरंग भारतात पण उठू शकतात का? मग भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणारे देशद्रोही नाही, पण त्यांना सामाजीक असंतोषास कारणीभूत ठरवत असेच मानवी हक्कांपासून वंचीत करणे अथवा त्यांचे सोशल नेटवर्कींग अथवा अधुनिक टेलीकम्युनिकेशनचे हक्क गोठवायाला लागले तर योग्य ठरेल का? असे होऊ शकेल का?

एकीकडे रक्षाबंधन म्हणजे फक्त भाऊ-बहीणच कशाला, एकमेकांना सांभाळण्याचे वचन देण्याचा हा दिवस, तर दुसरी कडे भारतीय स्वातंत्र्याची पूर्वसंध्या... शुभेच्छा देण्याऐवजी केवळ प्रश्नांनी भेडसावले आहे... तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

13 Aug 2011 - 4:54 am | अर्धवटराव

सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद द्यावेसे वाटतात... एक सिरियस मुद्दा तुम्ही विवेचनाला घेतलात आणि योग्य शब्दात भुमीका मांडुन चर्चेला सुरुवात केली त्या बद्दल. अन्यथा मागचे काहि दिवस एकमेकांच्या "पत्रिका आणि ग्रहयोगांवरुन" मिपावर जे काहि "संसद अनुभव" बघितले त्यावरुन "हेच का ते मिपा??" असा प्रश्न पडला होता... असो.

मला नाहि वाटत कि फेसबूक वा तत्सम ब्लॉग्सवर नजर ठेवण्याने लोकशाहिच्या मुळावर घाला बसेल. "जसा रोग तसा इलाज वा तसे प्रिव्हेन्शन" या न्यायाने कॅमरुन जे करताहेत ते योग्यच आहे. ज्या आर्थीक, सामाजीक, राजकीय स्थित्यंतरातुन जग चालले आहे, आणि त्यामुळे जे सामाजीक उद्रेक होताहेत त्याला प्रशासकीय पातळीवर उत्तर देण्याची सुरुवात अशीच काहिशी अपेक्षीत आहे. (आपल्याकडे तर हे नेहमीच होत आले आहे.) पण त्यामुळे ब्रिटीश राजकारणाचा, लोकमानसाचा लोकशाहिवरील निष्ठेला बाधा पोचेल असे वाटत नाहि.

अर्धवटराव

मन१'s picture

13 Aug 2011 - 12:49 pm | मन१

पॉइंटात मुद्दा आहे. ;-)
सध्या विद्यमान राजघराण्यांपैकी सर्वात जुने राजघराणेही(सुमारे हजारेक वर्षे जुने) ह्याच "लोकशाहीवादी" देशाचे आहे; हा एक जरा गंमतीचा भाग वाटतो. ब्रिटनची लोकशाही आपल्याकडे बर्‍याच जणांना प्रगल्भ्/आदर्श वाटते.
मला वाटते गांधीजींनी ह्याच लोकशाहीला prostitue का काहितरी म्हटलं होतं.असो.
भारतात भारतातल्या समस्यांचे तरंग उठणे मुश्किल हो. बाहेरचे तरंग कशाला उठतील?
सध्या भारतात चित्रपटावर तरी सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिप सुरुच आहे. सोशल नेटवर्किंग स्थलांचा प्रभाव ध्यानात येउ लागताच त्यावरही सहजच घटनात्मक्/घटनाबाह्य बंदी/मर्यादा येणार हे निश्चित. पण हे "तिथले" तरंग म्हणुन येतील असं नाही.

सहज's picture

13 Aug 2011 - 1:13 pm | सहज

ब्रिटन मधील दंगलीच्या नावाखाली होणारी अशीच लुटालूट आधी एका आपत्तीच्या प्रसंगात लोकशाहीच्या आद्य सेनापती देशात दिसली होतीच. (आठवा : हरीकेन कट्रीना) दंगलीची मानसीकता ही वेगळीच असावी.

सोशल मिडीयाचा उलट अश्या प्रसंगात पुरावे मिळायला चांगला फायदा होउ शकतो त्यामुळे जरी त्याचा जरी कोणी गैरवापर होत असला तरी सरकारी यंत्रणांना फायदाच आहे असे वाटते. पण एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा योग्य आदर होत नसेल तर त्याकरता उपाययोजना करायला सरकारी यंत्रणेला पाठींबा दिला पाहीजे त्यात वर उल्लेख केलेले काही निर्बंध.

इतिहास + लंडन मधील दंगल + लंडन मधील वक्तव्ये + सोशल मिडीया + भारतातील आंदोलने, सामाजीक असंतोष + मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य + रक्षाबंधन, स्वातंत्रदिन + भेडसवणार्‍या समस्या....... बापरे!!! काही कमी जास्ती बोलून गेलो असेन तर पंडीत लोकांनी माफ करावे!

विकास's picture

13 Aug 2011 - 5:32 pm | विकास

ब्रिटन मधील दंगलीच्या नावाखाली होणारी अशीच लुटालूट आधी एका आपत्तीच्या प्रसंगात लोकशाहीच्या आद्य सेनापती देशात दिसली होतीच. (आठवा : हरीकेन कट्रीना) दंगलीची मानसीकता ही वेगळीच असावी.

कट्रीनाच कशाला, अहो त्याही आधी १९९१-९२ च्या सुमारास ऑलमोस्ट तसेच अमेरीकेत घडले होते. एलए भागात रॉडनी किंग नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीस पोलीसांनी पकडले आणि चोप दिला. आणि तो त्या सार्वजनिक भागातील व्हिडीओ कॅमेराने टिपला. नंतर माध्यमात दाखवला गेला. अर्थातच गोर्‍या पोलीसांनी कायदा हातात घेऊन कृष्णवर्णीयास मारताना पाहीले आणि दंगल झाली. अर्थातच लुटालूट झाली, जाळपोळ झाली. पोलीसयंत्रणेनेच ती काबूत आणली, अपराध्यांना पकडले वगैरे. पण नागरी हक्क गोठवले गेले नाहीत. जे ब्रिटन करू पहात आहे.अमेरीकेने नागरी हक्क गोठवण्याचा प्रकार मला वाटते केवळ ९/११ नंतर केला, ज्यात अनेक मुस्लीमांना आणि कदाचीत इतरही कुणाला त्रास झाला असेल.

सोशल मिडीयाचा उलट अश्या प्रसंगात पुरावे मिळायला चांगला फायदा होउ शकतो ...त्यात वर उल्लेख केलेले काही निर्बंध.

सहमत.

...... बापरे!!! काही कमी जास्ती बोलून गेलो असेन तर पंडीत लोकांनी माफ करावे!

हा हा ! स्वतःच स्वत:ला माफी कसली मागता! ;)

बाकी असे लिहायचे कारण त्याचा असलेला परस्पर संबंध. शिवाय जेंव्हा स्वतःच्या बुडा खाली जळू लागते तेंव्हा मग जगभर नाक खुपसणार्‍यांचे कसे होते (या प्रसंगात ब्रिटन) हे दिसते. एक साधी गंमत सांगतो, कॅमेरॉनचे "मानवी हक्कां" वरील वाक्य हे अमेरीकेत माध्यमांनी अप्रत्यक्ष सेन्सॉर केले असे देखील म्हणले गेले.... पण तो वेगळाच मुद्दा आहे. आता वाचल्याप्रमाणे ब्रिटीश सरकार (पक्षी: डेव्हीड कॅमेरॉन, हे अल्पवयीन मुलांना पण जर लुटालुटीत सहभागी झाला असाल तर तुरूंगात टाकू वगैरेची भाषा करू लागले आहेत.)

माझी काळजी अथवा कन्सर्न हे शेवटच्या मुद्यापाशी येऊनच थांबते. तो म्हणजे, "ब्रिटन ने केले म्हणून..." असे म्हणत आपण त्यांच्या चार पावले पुढे. अण्णा हजार्‍यांच्या भाषेत "स्वातंत्र्याची दुसरी लढाई" चालू आहे. त्यांचे अथवा रामदेवबाबांचे अथवा अजूनही कोणी असेच आंदोलन केले तर त्यांचे सगळे मुद्दे पटोत अथवा न पटोत, पण त्यासाठी लोकशाहीतील हक्क गोठवणे योग्य ठरणार नाही, पण आत्ताच्या सरकारने तसे केले तर आश्चर्य वाटणार नाही.

बुद्धीवादी लेख

हे appreciation मधून लिहीले आहे की criticism मधून? ;)

सहज's picture

14 Aug 2011 - 8:11 am | सहज

जपान मधे इतके भयानक संकट येउनही तिथे मोठ्या प्रमाणावर लुटालुटीचे प्रकार ऐकले नाहीत. हे ही अभ्यास करण्यासारखे.

त्या अल्पवयीन मुलांना काय शिक्षा द्यायची ते ब्रिटीश लोकच ठरवतील. पण त्या पोरांच्या आई-वडलांनी याची जबाबदारी स्वीकारायला लावून निदान जबरी आर्थीक दंड सोसला पाहीजे का? मुलांना कम्युनिटी सर्व्हिस? दीर्घ कालीन शिक्षा झालीच पाहीजे हे माझे मत.

जे आपल्याला पटकन समजत नाही ते बुद्धीवादी ;-) त्यामुळे एप्रिसिएअशन हो!! तुम्ही इतिहासापासुन, भेसडवणार्‍या समस्यापर्यंत गुंफत आलात इतकी कलाकुसर माझ्यात नाही म्हणून बुद्धीवादी. असो शिकेन, सुधारेन

बाळकराम's picture

16 Aug 2011 - 5:03 am | बाळकराम

माफ करा विकासजी पण लेखाला कसा डायरेक्ट प्रतिसाद द्यायचा ते मला ठाऊक नसल्याने तुमच्या वरील प्रतिसादाला उत्तर अशा रीतिने प्रतिसाद देत आहे.

ब्रिटन ही लोकशाहीची आई हे बहुधा इंग्रजानीच सोडलेले पिल्लू असावे! कारण तसे बघितले तर ब्रिटनमध्ये अजूनही तांत्रिकदृष्ट्या लोकशाही नाही- उदा. नामधारी का होइना सत्तेवर असलेले राजघराणे, आत्ता-आत्तापर्यंत असलेली वंशपरंपरागत लॉर्डशिप- जी लेबर सरकारच्या काळात पूर्ण बंद करण्यात आली.
ब्रिटनच्याही आधी लोकशाही अस्तित्त्वात असलेले काही देश आहेत जसे की-
- आईसलंड- जिथे अल्थिंग ही त्यांची संसद इ.स.९३० पासून अजूनही चालू आहे.
- भारत- इस १ल्या शतकात वा त्याही पूर्वी आपल्याकडे गणराज्ये होती
- मलाना नल्ला- पंजाबातील मलाना नल्ला हे ठिकाण सुद्धा लोकशाहीचे उगमस्थान मानले जाते काहींच्या मते
- युनिवर्सल सफ्राज हा जर निकष लावला तर कदाचित न्यूझीलंड किंवा आयल ऑफ मॅन हे लोकशाहीचे मूळ असू शकेल.

धन्यवाद,
बाळकराम

हुप्प्या's picture

13 Aug 2011 - 10:41 pm | हुप्प्या

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी असे म्हणायला हवे होते का की आणखी डझनभर दुकाने जळली तरी चालतील, आणखी शंभर लोक मेले तरी चालतील पण आम्ही दंगली काबूत आणण्याकरता लोकशाहीच्या मूळ ढाच्याला धक्का पोचू देणार नाही.

असले बोटचेपे बोलणे विरोधक सहन करतील का? एक राजकारणी म्हणून बोलण्यापुरते का होईना खंबीर धोरण दाखवणे आवश्यक असते. त्या नेत्याच्या खुर्चीचा प्रश्न आहे.

आपल्या "कणखर" बाण्याच्या शिवराज पाटलाचे काय झाले आठवते आहे का? २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस हा इतके पाणचट, निरर्थक भाषण करता झाला की त्याचा परीटघडीचा सूटच लोकांच्या लक्षात राहिला, डोळ्यात खुपला आणि त्याचे पर्यावसान त्याच्या बुडावर लाथ बसण्यात झाले.

अशा प्रसंगीचे बोलणे हे मुख्यतः ब्रिटनच्या नागरिकांना उद्देशून असते. त्यांच्यावर आपण किती कठोर आहोत हे बिंबवणे आवश्यक असते. ऊर्वरित जगाला आपल्या लोकशाही परंपराविषयी काय वाटेल ह्याचा विचार करणे दुय्यम असते.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Aug 2011 - 1:24 am | अविनाशकुलकर्णी

सुंदर लेख..विचार करावयास भाग पाडतो....

परवा फेसबुकवर "रॉबर्ट वाधेरा अल्पावधीत कोट्याधीश कसा झाला" याची एक चित्रफीत पाहीली. त्या चित्रफीतीला म्हणे भारतामध्ये बंदी आहे. म्हणजे आपल्याकडे हा प्रकार नवीन नाही तर? मग कसली लोकशाही म्हणायची?