खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच.
मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?
नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.
ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.
असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
प्रतिक्रिया
11 Aug 2011 - 12:11 pm | स्पा
11 Aug 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
11 Aug 2011 - 1:26 pm | सूड
ह. घ्या. ;)
11 Aug 2011 - 2:48 pm | धमाल मुलगा
वेल चा फोटू आलाय, आता गविंनी 'सूनेचा' फोटो देऊन (त्यांच्याच खवमधला. ;) ) मंडळाला उपकृत करावे. :D
11 Aug 2011 - 3:51 pm | गणपा
विहिर आहे त्यावर बादली आणि दोरीपण दिसतेय म्हणजे पाणी असेलच.
गविंची ललनाही येतेच आहे.
तेव्हा ही घ्या
आणि ओता पाणी त्यावर आता. ;)
11 Aug 2011 - 3:56 pm | धमाल मुलगा
एव्हढी मडकी?
काय जितेंद्र - श्रीदेवीचा ड्यान्स होणारै काय इथं?
11 Aug 2011 - 4:48 pm | इरसाल
हे विसरलात काय ?
11 Aug 2011 - 5:02 pm | धमाल मुलगा
गेट राहिलंच होतं की राव!
बरं झालं, भगदाड बुजवून घ्येतलंसा त्ये. :)
11 Aug 2011 - 12:34 pm | वपाडाव
भडावचोत....
काय प्रतिसाद दिलाय.....
ज्याम भारी....
11 Aug 2011 - 12:42 pm | रामदास
दडपणाला तोंड द्यायची तयारी ठेवायला हवी. तुम्ही आव्हान स्विकारण्याचा मेहनताना मागीतला .माझ्यासकट बर्याच जणांनी ती तयारी दर्शवली. अटी फक्त तुम्हीच टाकाव्या आणि पैसे देणार्यांनी टाकू नयेत असे काही नाही.
यानंतर एक महत्वाचा मुद्दा .तुमच्या आधीच्या लेखात तुम्ही आव्हाने देणार्यांच्या अक्कलेचा उल्लेख केला आहे. एका रितीने तुम्ही कारण नसताना त्यांचा उपमर्द केला आहे .अर्थात तुमच्या कडून दिलगीरी अपेक्षीत आहे. तुमच्या प्रत्येक लेखात अर्धे लिखाण करून पुढील वाचनासाठी ब्लॉगचा हवाला टाकीत आहात. (हे निदान माझ्या वाचनात आलेल्या लेखांविषयी मी म्हणतो आहे). हे जत्रेत तंबूबाहेर उभे राहून ओरडणारा माणूस गर्दी/प्रेक्षक आत खेचतो त्यासारखेच आहे.असे असताना तुम्ही जाहीरात करता असा आरोप तुमच्यावर झाल्यानंतर नाराज होण्यात काय अर्थ आहे ? हे आमचे नशीब आहे की पती-पत्नी संबंधाबाबतीत तुमचे जे फुटकळ धागे अधूनमधून येत असतात त्यावर तुम्ही मनोरंजनाचा कर मागत नाही.माझ्यासारखे अनेक जण ज्योतीषास्त्राचा अभ्यास पडताळणी करून करू इच्छीतात.आता ऐनवेळी दडपणासारखे कारण सांगून त्यांना तुम्ही गैरसमजात टाकीत आहात. प्राचीन काळापासून अभ्यासात असलेल्या शास्त्राचा स्वतःच्या 'स्व' साठी वापर आणि दुरुपयोग करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? अभ्यासकाचा नम्रपणा तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून अभावानेच दिसतो. काही प्रतिसादक वयाने आणि अनुभवाने सान असतील. पण मी-गवी-सुनील यांनी तुमचे दडपण समजून सरळ मार्गाने पडताळणीची मागणी केली होती .त्यातही नविन खुसपट काढून तुम्ही शहाजोगपणे हा नविन धागा टाकला आहे. मग तुमचे हे लिखाण अधिकाधीक प्रसिध्दी मिळवण्यासाठी आहे असेच म्हणावे लागेल. मंच फुकट वापरायला मिळाला म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका असे माझे नम्र निवेदन आहे.जाहीरात करायचीच आहे तर त्यासाठी असे धागे काडून सवंग प्रसिध्दी मिळवू नका.
मी -सुनील आणि गवि आणि इतरांनी तयारी दाखवली आहे .मी अजूनही ते पैसे राखून ठेवले आहेत. या पुढे येऊन एका प्रयोगाला सामोरे जा. ही प्रतिक्रिया लिहीताना मला फार वाईट वाटते आहे पण आपण सगळेचजण सत्याला सामोरे जाऊ या .
11 Aug 2011 - 1:07 pm | युयुत्सु
सत्य काय आहे ते अगोदरच वर मांडले आहे. आपण सर्वच त्याला सामोरे आहोत.
12 Aug 2011 - 9:26 am | पिलीयन रायडर
प्लिज... एकदा तरी.... मनाला येईल त्या वाक्याला अधोरेखित करुन, तेवढ्या वरच '"जिलेबी" प्रतिक्रिया न देता.... त्याच प्रतिसादात बाकीची ५० वाक्य लिहिलि आहेत त्या वर पण काही तरी बोला की...
तुमच्या बहुतांशी प्रतिक्रिया अशाच असतात...
वर रामदास ह्यांनी इतकी सुंदर प्रतिक्रिया दिलिये त्याचा तरी मान ठेवा....
खुप वाचलं राव ह्या विषयावर... पण मला खात्री झालिये अता की तुम्हला बस्स पैसा छापायचाय...
म्हणुन तर...
"कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल."
आणि मग त्या काहीतरी साठी श्रेय घेउन ते पैसे आपण लाटु.... सोप्पय...
12 Aug 2011 - 9:39 am | पिलीयन रायडर
प्लिज... एकदा तरी.... मनाला येईल त्या वाक्याला अधोरेखित करुन, तेवढ्या वरच '"जिलेबी" प्रतिक्रिया न देता.... त्याच प्रतिसादात बाकीची ५० वाक्य लिहिलि आहेत त्या वर पण काही तरी बोला की...
तुमच्या बहुतांशी प्रतिक्रिया अशाच असतात...
वर रामदास ह्यांनी इतकी सुंदर प्रतिक्रिया दिलिये त्याचा तरी मान ठेवा....
खुप वाचलं राव ह्या विषयावर... पण मला खात्री झालिये अता की तुम्हला बस्स पैसा छापायचाय...
म्हणुन तर...
"कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल."
आणि मग त्या काहीतरी साठी श्रेय घेउन ते पैसे आपण लाटु.... सोप्पय...
11 Aug 2011 - 1:17 pm | श्रावण मोडक
१६ आणे दुरूस्त!
युयुत्सुंनी पाचशे रुपयांत आपली प्रतिष्ठा विकायला काढली. पाचशे रुपये तर मिळाले नाहीत, पण प्रतिष्ठा मात्र हकनाक गेली.
हे लिहिताना मलाही वाईट वाटते आहे, पण रामदास म्हणतात तसे सत्य कटू असतेच.
11 Aug 2011 - 2:39 pm | छोटा डॉन
असहमत होण्यासारखे काही नाही :)
- छोटा डॉन
11 Aug 2011 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते
हो ना... उलट सहमत होण्यासारखेच आहे!
मात्र यानिमित्ताने युयुत्सुंनी मात्र खूपच अपेक्षाभंग केला आहे हे सांगावेसे वाटते.
11 Aug 2011 - 3:30 pm | Nile
म्हणजे तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या? आम्हाला तर पहिले पासून खात्री होती ब्वॉ, तुम्हाला सांगितले पण होते. पण तुम्ही 'मोठे' लोक... :p
11 Aug 2011 - 3:34 pm | स्पा
+१
11 Aug 2011 - 4:44 pm | आत्मशून्य
अगदी, पहील्या पासून खात्री होती हा माणूस काहीतरी कारण हूडकेलच माघार घ्यायचे आणी ते जमले नाही तर अशा चाचणीतून काही सिध्द होत नसते असे ठेकून देऊन हीच गोश्ट सिध्द करायला मी आव्हान स्विकारण्याचा प्रपंच केला होता असे नक्किच बोलेल हे १०००००००% माहीत होतं. बाकी अभ्यासातून नीर्माण होणारा आत्मविश्वास व नम्रता सोडा तर अत्यंत तीरसट्पणा, भडकपणा व परस्परविरोधी विधानांचा अविष्कार जो इथे अनूभवाला आला ते बघता मनापासून वाइट वाटले. इतका गाढा अभ्यास असताना अशी जेष्ठ व्यक्ती नवोदीताप्रमाणे दडपणाखाली येत असेल तर ही प्रवृत्ती अभ्यासातील मंदता वा शात्रातील फोलपणा अधोरेखीत करते. हे जर डॉक्टर अथवा खेळाडूच्या बाबतीत घडले तर त्यांच्यावर बंदीची कायदेशीर कारवाइ होण्याची तरतूद आहे पण ज्योतीशांच काय... ?
11 Aug 2011 - 3:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
असो, इथे आम्ही काहीतरी नवीन बघायला, शिकायला मिळेल म्हणून सरसावून बसलो, तर युयुत्सुंनी डंकर्क ची यशस्वी माघारच घेतली की.
11 Aug 2011 - 3:42 pm | Nile
गाढवाबाबत खात्री नाही, पण ब्रह्मचर्य गेल्यामुळेच ते इतके मिसोजायनिस्ट झाले असावेत काय हो मेहेंदळे काका? ;-)
11 Aug 2011 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा
अहो गाढवालाही काही मान असतोहो....:wink:
11 Aug 2011 - 12:50 pm | गणपा
मला स्वतःला जोतिष्यशास्त्राचा बराच चांगला अनुभव आला आहे (भुतकाळ सांगणारे बरेच भेटले... पण एकान भविष्य वर्तवल होत जे ९५% खर ठरलय.) पण तरी सांगतो की आता हे सगळ (जाहिरातबाजी, मुदाम वाद उकरुन काढणे वगैरे) थांबवा.
अती झाल अता हसुही येईनास झालय.
11 Aug 2011 - 1:11 pm | सोत्रि
गणपाशी सहमत!
-(भविष्यात डोकावण्याची हौस असलेला) सोकाजी
11 Aug 2011 - 3:47 pm | Nile
तिकडं गणपासेट युयुत्सुंना जोकर म्हणून राह्यलेत त्याबद्दल का? (आता त्यांना युयुत्सुंचं हसु येत नाही पण पुर्वी येत होतं, म्हणजे जोकरच ना?) ;-)
11 Aug 2011 - 1:09 pm | नितिन थत्ते
युयुत्सुंनी चाचणीची तयारी दाखवली होती हे पूर्ण खरे आहे.
आणि मिपाकरांनी माघार घेतली हे थोडेसे खरे आहे.
परंतु "विज्ञानाची कास धरणार्यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले" याच्याशी असहमत.
>>प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?
दावे प्रत्येक तंत्रानुसार वेगळे असतील हे मान्य करू शकतो. पण मग दावे काय आहेत हे तरी क्लिअर करावे. युयुत्सूंचे ठोस दावे काय आहेत त्यांच्या त्या तंत्राचे दावे काय आहेत? हे नक्की सांगावे म्हणजे "त्या दाव्यांनुसार" चाचणी डिझाईन करता येईल.
ते दावेच निश्चित नसले तर चाचणी काय करणार?
उदाहरण म्हणून येथे आणि उपक्रमावर नाडी विषयांत घडलेल्या चर्चांचे घेता येईल,
नाडीपट्टीत भविष्य असते असा दावा आहे अशी समजूत होण्याइतपत लेख शशिकांत ओकांनी लिहिले आहेत. त्याला दुजोरा देणारे लेख/प्रतिसाद** हैयो हैययो यांनी लिहिले. नंतर हैयो यांनी नाडीपट्टीतल्या भाषेविषयी काहीतरी प्रात्यक्षिक केले. त्यातून नाडीपट्टीत जुन्या तामीळ भाषेत लिखाण असते असे काहीतरी सिद्ध झाले म्हणे.
**ओकांच्या लेखाला घेतलेल्या आक्षेपांना वकिली प्रत्युत्तरे देणारे प्रतिसाद.
खालील दुवे उपयुक्त ठरतील.
http://mr.upakram.org/node/2962#comment-49620
http://mr.upakram.org/node/2962#comment-49620
http://mr.upakram.org/node/2962#comment-54074
शेवटच्या दुव्यात विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे मिळाली हे त्याच पानावर खाली दिसेल.
नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता. परंतु नाडीपट्टीविषयक दावा सिद्ध झाला असे सुचवणारे लेख-प्रतिसाद ओक/हैयो लिहू लागले. त्यांना जेव्हा नाडीपट्टीतील लिपी हा आक्षेपाचा दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा आहे असे सांगितले तेव्हा हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला.
आता हे उदाहरण युयुत्सुंचे नाही, पण त्या अनुभवामुळे आणि आव्हान धाग्यावरील युयुत्सुंच्या विधानांमुळे लोक मागे हटले असल्याची शक्यता आहे.
तेव्हा उपाध्ये यांच्या तंत्राचे काय दावे* आहेत हे त्यांनी सांगितले तर आपण त्यात बसणारी चाचणी डिझाईन करू शकतो.
*दावे निश्चित स्वरूपाचे आणि व्हेरिफाएबल असावेत ही तर पूर्व अट आहेच.
चाचणीच्या निकालाने उपाध्ये यांच्यावर प्रश्नचिह्न निर्माण होऊ नये, ते वापरत असलेल्या तंत्रावर व्हावे.
11 Aug 2011 - 1:18 pm | ईश आपटे
असहमत.
चाचणीचे निकष स्वतःच्या वेडसरपणातुन ठरवण्याचा दाभोळकरवाद्यांचा दावा मान्य होऊ शकत नाही.
खरे ज्योतिषी असल्या रोगट व प्रसिध्दीलोलुप मनोवृत्तीला केराची टोपली दाखवतात. मग ते शास्त्र म्हणून सिध्द झाले नाही तरी बेहतर. ज्यांना भविष्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी ज्योतिषाकडे यावे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ***** जावे
11 Aug 2011 - 4:53 pm | आत्मशून्य
(कोणाचेही) ज्योतीष बघणे म्हणजे सैतानाची उपासना होय. याची सूरूवात उपासकच्या अपकीर्तीपासून होते.
11 Aug 2011 - 1:33 pm | युयुत्सु
थत्ते,
सध्या माझा एकच दावा आहे - "सर्व पौर्णिमा शुभ नसतात आणि सर्व अमावस्या अशुभ नसतात". हा दावा सभ्यतेच्या चौकटीत तपासायचा असल्यास संपूर्ण प्रस्ताव आणि कार्यवाहीची पद्धती हे तपासून सहकार्य करायचे की नाही हे मी ठरवेन.
11 Aug 2011 - 1:55 pm | गणपा
सर्व पौर्णिमा शुभ असतात आणि सर्व अमावस्या अशुभ असतात. असा दावा कुणी केलाय ते आधी सांगा?
तुम्ही फारच जनरलाईझ विधान केल आहे. यात भविष्य/ जोतिष्य ते काय?
11 Aug 2011 - 1:58 pm | युयुत्सु
अमावस्येला शुभ गोष्टी टाळण्याकडे आणी पौर्णिमेला शुभ गोष्टी करण्याचा भाविक/श्रद्धाळु लोकांचा कल असतो. तुम्ही म्हणता तसा लिखित दावा माझ्या वाचनात नाही.
11 Aug 2011 - 2:01 pm | युयुत्सु
अमावस्या व पौर्णिमाचे शुभाभुभत्व ग्रह योंगांवर ठरते. हा त्यातला ज्योतिषाचा भाग.
11 Aug 2011 - 2:06 pm | नगरीनिरंजन
"सगळे दिवस सारखे नसतात" हा दावा मी कोणत्याही यंत्रतंत्राशिवाय करतो.
हा दावा कोणीही खोटा ठरवू शकत नाही.
म्हणून मी एक महान भविष्यवेत्ता आहे.
गरजूंनी अधिक माहितीसाठी माझ्याशी फोनवर संपर्क साधावा. (अटी व शुल्क लागू).
फोन नंबरः +91 URABIGFOOL
11 Aug 2011 - 2:25 pm | धमाल मुलगा
>>फोन नंबरः +91 URABIGFOOL
नंबर असा द्यायचा नसतो. नीट द्यावा. ग्राहको देवो भव हे शिकवलं नाही का?
+91 URA-BIG-FOOL असा द्यावा. नीट वजन येतं. शिवाय एखादा टोल फ्री नंबरही घ्या. जास्त चांगलं पडेल ते.
11 Aug 2011 - 4:01 pm | नगरीनिरंजन
1800-PLS-CON-ME
>>ग्राहको देवो भव शिकवलं नाही का?
नाय बा! आम्ही फक्त 'मूर्खो ग्राहको भव' असं शिकलोय.
11 Aug 2011 - 4:09 pm | धमाल मुलगा
मी कुंपनी काढली तर तुला मार्केटिंग डिपार्टमेंटचा डायरेक्टर करणार. ठरलं एकदम :)
11 Aug 2011 - 2:20 pm | धमाल मुलगा
>>सर्व पौर्णिमा शुभ नसतात आणि सर्व अमावस्या अशुभ नसतात
ह्यात नविन ते काय?
आमचं राजं बहुतांश मोहिमा ह्या अमावस्येच्या आसपासच्या काळात राबवत. अमावस्या अशुभ असती तर राजं, पेंढारी म्हणवले गेले असते..छत्रपती झाले नसते. असो.
जोतिष्य ह्या बाबतीत माझा स्वतःचा विश्वास आहे, कित्येकदा मला स्वत:ला अनुभव आले आहेत. ते अनुभव इतके स्पष्ट आहेत की आमचे एक मित्र जे ज्योतिष्यविद्येचा अभ्यास करतात, त्यांनी स्वतः फोन करुन "तुझ्याकडून पुढच्या महिन्यात एक बातमी मिळण्याची वाट पाहतोय" वगैरे सांगून, मला काहीही ठाऊक नसताना अचानक पुढच्या महिन्यात खरोखर ती घटना घडून गेल्याचाही अनुभव गाठीशी आहे.
पण, ह्याच विश्वासाच्या आधारे मी म्हणेन, की तुम्ही ज्या पध्दतीने आडमुठेपणाची भाषा करित आहात, ज्या पध्दतीनं इतरांनाच केवळ गरज आहे की हे सिध्द करायचंय किंवा खोटं पाडायचंय आणि तुम्ही त्यात आपली भूमिका बजाऊन इतरांवर उपकार करता आहात असं वाटण्याजोगा पवित्रा घेऊन आहात ते पुर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रकारे स्विकारार्ह नाही.
इतकंच नव्हे, तर तुमच्या ह्या प्रकारच्या पवित्र्यांमुळे ज्योतिषविद्येतल्या गोष्टी सिध्द होण्याऐवजी त्याची बदनामी आणि टवाळीच जास्त होते आहे हे तुमच्या लक्षात येत नाहीए का?
असो. मी लहान माणूस. फार काय बोलणार?
जे करताय ते योग्य नाही. इतकंच स्पष्ट मत नोंदवतो.
11 Aug 2011 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
धम्स बरोबर सहमत आहे.
अतिशय संयमित प्रतिक्रिया.
बहुदा आक्रमक व्हायच्या नादात युयुत्सुंकडून गडबडीत काही विचित्र (मनात वेगळे-लिखाणात उतरले वेगळे) लिहिले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
युयुत्सु स्वतःच पुन्हा एकदा त्यांना आलेले प्रतिसाद व त्यावर त्यांनी दिलेले उपप्रतिसाद वाचतील व योग्य भुमीका घेतील अशी आशा आहे. एकाच विषयावर भारंभार धागे येणे व दोन्ही बाजू वैयक्तिक पात़ळीवर उतरुन विज्ञान व ज्योतीष ह्या दोन्हीचा उपमर्द होणे दोन्ही बाजूंकडून टाळले जाईल अशी अपेक्षा.
विज्ञानवादी ज्योतीषी
परुत्सु बत्ते
11 Aug 2011 - 2:29 pm | जयंत कुलकर्णी
मी यांच्यावर आजपासून माझ्यापुरता बहिष्कार टाकला आहे. !
मी अशी ठरवले आहे की रणछोडदास युयुत्सु यांचे कोठलेही लेखन मी आजपासून वाचणार नाही.
हे लिहितांना मला वाईट वाटते व त्यांनी एक चांगली संधी गमावली याची खात्री वाटते. ( अर्थात तसे काही करायचे त्यांच्या मनात नव्हते हेच खरे आहे ) म्हणून पहिले वाक्य !
11 Aug 2011 - 2:35 pm | युयुत्सु
तुमच्या कडे उत्तरे नाहित म्हणून मी गप्प बसेन असं नाही. :)
11 Aug 2011 - 4:54 pm | शाहिर
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
कोणत्यातरी माणसाची पत्रिका घ्यावी ..ति कोणत्या तरी सोफ्ट्वेयर मधे टाकवी..काहीतरी सां>गावे ..कुणाला तरी नक्की पटेल
11 Aug 2011 - 5:00 pm | वपाडाव
दोन्ही हाताची बोटे तोंडात घालुन शिट्ट्या वाजवतोय अशी स्मायली कल्पावी......
11 Aug 2011 - 2:28 pm | युयुत्सु
धमाल मुलगा ,
तुम्ही त्यांचे दावे हव असेल तर तपासा. मला माझा दावा काय आहे तो विचारला तो मी सांगितला. सभ्य पद्धतीने तो रिफाईन करायला माझी तयारी आहे.
11 Aug 2011 - 2:45 pm | धमाल मुलगा
झक्क मारली आन धाग्यावर आलो असं झालं बा आता!
>तुम्ही त्यांचे दावे हव असेल तर तपासा.
ते मी काय करायचं ते पाहतो. माझा प्रतिसाद नीट वाचायची तसदी घेतली..किंबहुना तो समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला तर बहुधा कळावे मला नक्की काय म्हणायचंय!
>>सभ्य पद्धतीने तो रिफाईन करायला माझी तयारी आहे.
म्हणजे स्वतःच्या सोयीच्या अटी घालून?
स्वतःच्या क्षुल्लक गर्वाला गोंजारण्यासाठी ज्योतिषविद्येची बदनामीही झाली तरी चालेल असा पवित्रा घेऊन?
सरळ सरळ मैदानात न येता, आडून आडून माघार घेण्याची खेळी खेळून?
काय? सभ्य म्हणजे नक्की काय? नक्की काय व्याख्या आहे सभ्य पध्दतीची?
तुमच्यापुरती सभ्य पध्दतीची व्याख्या वेगळी असेल तर ती इतरांना कशी लागू पडेल?
सर्वसामान्य सभ्य लोकांपैकी एकानं तरी तुमच्या अडेलतट्टू मुद्द्याला पाठिंबा दिलेला दाखवा... ५०० काय, मी स्वतः ५०००/- हरायला तयार आहे.
असो!
चालु द्या गोंधळ.
फुकटची चिलीम मिळालीये तर बसतो मारत झुरके तिच्यायला! हौन जौंद्या...निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा!!
11 Aug 2011 - 4:06 pm | युयुत्सु
एक्मेकाना योग्य मान देऊन म्युचुअली अॅग्रिएबल अशी पद्धत
11 Aug 2011 - 4:14 pm | धमाल मुलगा
आता आणखी स्वत:च्याच शब्दात अडकून आणखी गोची करुन घेऊ नका.
म्हणजे आव्हान देणार्याची अक्कल काढून?
आव्हानासाठी तयार असणार्यांना वाट्टेल तशी उत्तरं देऊन?
नक्की?
'म्युचुअली' हा शब्द कोंडी करतोय तुमची. नीट तपासा तुमचीच विधानं!
लोक तुमच्या अटींना तयार झाले असले तरी तुम्ही लोकांच्या अटी फाट्यावर मारता आहात. ह्यात 'म्युचुअली' कुठून आलं ते दाखवलंत तर आम्हालाही कळेल तरी.
थोडक्यात, तुमच्याच व्याख्येनुसार असलेली सभ्य पध्दत तुम्ही स्वतःच वापरत नाही असं सिध्द होतंय का? पहा बरं एकदा.
11 Aug 2011 - 4:24 pm | गणपा
कित्ती वे़ळा बजावलं तुला की कुर्हाडीशी खेळु नकोस. शेवटी दिलासच ना पाय त्यावर.
मोठ्यांच ऐकेल तो (ध)मुलगा कसला?
भोग आता आपल्या कर्माची फळं. नंतर पोर्णिमेच्या नावाने गळा नको काढुस.
11 Aug 2011 - 4:32 pm | धमाल मुलगा
सॉर्री काका! :(
- मुलगा ढ.
अवांतरः बर्याच दिवसात शिल्पाताई नाही दिसल्या रे ऑनलाईन!
11 Aug 2011 - 4:29 pm | युयुत्सु
माझ्या व्याख्येनुसार आपल अॅग्रिमेंट होत नाही एवढ्च म्हणता येईल ( सभ्यपणे)! ;)
11 Aug 2011 - 4:33 pm | धमाल मुलगा
;)
11 Aug 2011 - 4:55 pm | गणेशा
रिप्लाय द्यायचा नाही असे ठरवले होते.
पण धमु यांचा पहिला रिप्लाय योगग्य असल्या कारणाने, अआणि तरीही योग्य बोध न घेता पुन्हा तोच तोच पणा रिप्लाय मध्ये येत असताना हा रिप्लाय देतो ..
------
म्युचुअली अॅग्रिबल म्हणजे
तुम्ही ५०० रुपये मला द्या अआणि जर योग्य पुर्तता झाली नाही तर ते पैसे मी पुन्हा रीटण करीन
हा मला तरी वाटतो..
त्या हि पुढे जावुन जर डोकेफोड झाली कष्ट पडले असे असेन तर
निदान असे म्हणायला पाहिजे होते की ५०० रुपये परत देइन पण ज्या लोकांची पुर्तता केली गेली आहे त्यांनी मला विनाकारण दोकेफोड.त्रास दिला असल्याने आगावु पैसे देण्याची (किती ते ठरवुन) तयारी दाखावावी.
मला वाटते असे असते तर कोणीच जास्त प्रश्न.. गोष्टी मध्ये घुसवल्या नसत्या.
अजुनही पुढे जावुन .. मला स्वताला ज्योतिषाचे ज्ञान नाही म्हणुन मी कोणाची परिक्षा घेणार नाही असे मी आधीच म्ह्ण्टले होते.. त्याप्रमाणेच ज्यांना आपण काय म्हणत अहओत हे कळत नसेल तर सारखी तीच तीच गोष्ट का दिली जात आहे.
बस्स आता.
-------------------------------
@ ऑल
कुणाला जर भविष्य/राशी रिलेटेड चाचणी घ्यायची असेल तर सरळ
जन्मनाव, जन्मस्थळ, आणि जन्मवेळ मला द्या. मी फुकट तुम्हाला त्याबद्दल सांगेन
(जर माहिती खरी असेल तर भेटुन पार्टी द्यावी लागेल/ज्यआंना ५०० रुपयेच द्यायचे आहेत त्यांनी ते जमा करावेत आपण मस्त सगळे जण एका ट्रेक साठी जावु)
आणि एक .. मी ज्योतिषावर जास्त आधारीत नसल्याने आणि मला ज्योतिष येत नसल्याने ज्योतिष मात्र मी माझ्या मित्राकडुन आणुन देइन)
11 Aug 2011 - 5:03 pm | वपाडाव
लष्कराच्या भाकर्या भाजण्याची लैच हौस आहे का आणंद येतो या सगळ्या गोष्टींमध्ये....
11 Aug 2011 - 5:07 pm | गणेशा
वपाडाव
याला माझ्या मित्राप्रती असलेला विश्वास बोलतात ... ( होप या व्याक्यातुन तरी संधर्भ -अर्थ काय असेल ते झिरपेल)
सुलेमानी किडे फक्त लिहिण्यातुन नाही तर कोणी कधी काय रिप्लाय दिला आहे हे पाहण्यात ही असु शकतात
[:)].
अवांतर : चर्चा वेगळ्या मुद्द्यांकडे वळवण्याचा तुमचा हात कोणीच धरु शकणार नाही....
11 Aug 2011 - 5:41 pm | वपाडाव
मी तुम्हाला तुमच्या मित्राविषयी वाईट्ट काय, काहीच बोललेलो नाहिये......
इथे लष्कर म्हण्जे तुमच्या-आमच्यासारखी (सदासर्वकाळ मिपावर) पडिक जनता आणी
त्यांचे भविष्य बघण्याचा किडा म्हंजे भाकर्या भाजण्याचा उपद्व्याप.....
यात कुठेही आपल्या ज्योतिषशास्त्रीय ज्ञान असलेल्या मित्राचा यत्किंचितही उल्लेख नाही.....
असो...
अवांतर :: इतक्यावर आपले समाधान झाले असल्यास ठिक अन्यथा धाग्याचा खफतर आधीच झालेला आहे...
आपण संदर्भसहित / संदर्भरहित कुठलिही चर्चा करायला मोकळे आहोत....
11 Aug 2011 - 6:00 pm | गणेशा
वप्या गप्प आता महाशय बिएशय काय उगाच.
आणि तो झिरपणरा अर्थ तुझ्यासाठी नाय बे ...
11 Aug 2011 - 5:12 pm | धमाल मुलगा
तसं केलं तर बेसिकमध्येच घोळ नाही होणार?
11 Aug 2011 - 2:42 pm | स्पा
ज्योतिषा सारख्या पवित्र विद्येचा "युयुत्सु" सारख्या लोकांनी बाजार मांडल्याने नवीन पिढीचा यावरचा विश्वास उडत चालला आहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते
बाकी कोणी कसे वागावे, निरीक्षण वेग्रे आहेच..
हॅ हॅ हॅ
चालू द्या
11 Aug 2011 - 2:43 pm | प्रचेतस
का हो, अनुल्लेखाने मारणार होतात ना?
11 Aug 2011 - 2:46 pm | सूड
अगदी हेच विचारणार होतो.
11 Aug 2011 - 3:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सुड्या, तिथे त्याने लिहिले आहे "अशा लोकांना अनुलेखाने मारण हेच बरोबर..."
"मी अशा लोकांना अनुल्लेखाने मारेन" असे नाही म्हटले किंवा "मी नेहमी बरोबरच करतो" असेही नाही म्हटले.
तुम्हीच तुम्हाला हवी तशी interpretations करता आणि बिचाऱ्या स्पा वर टीका करता.
किंवा, जिलबीचा उल्लेख न करणे म्हणजे अनुल्लेख, अशी नवी व्याख्या असेल अनुल्लेखाची ;-)
11 Aug 2011 - 3:46 pm | प्रचेतस
स्पाला हे विधान टिकात्मक वाटले असल्यास आम्ही दिलगीर आहोत.
बाकी ज्याने त्याने हवी तशी interpretations करावी. आमचे काही म्हणणे नाही. ;)
11 Aug 2011 - 3:54 pm | सूड
आम्हाला आपलं वाटलं ते बोले तैसा चाले वैगरे असेल, ते त्याचं मत होतं निर्णय नव्हता तर !!
स्वगतः बिचारा स्पा वैगरे वाचल्यानंतर, स्पा मनातल्या मनात 'काका मला वाचवा' असं तर म्हणाला नसेल ना असं वाटून गेलं . ;)
11 Aug 2011 - 2:52 pm | अर्धवट
हॅ हॅ हॅ..
ह्या सगळ्याचा निष्कर्श एवढाच की, एवढ्या लोकांनी ५०० रुपये ओवाळून टाकायची तयारी दाखवल्यावर फाटलेली दिसत आहे असे खेदाने म्हणावे लागत आहे
- चड्डीत्शू
11 Aug 2011 - 3:00 pm | विकाल
चला "युयुत्सु",
सगळं जाऊ द्या.... हा दंगा* कोणत्या शुभ दिवशी थांबेल ते सांगा बरे....!
* मिपा वरचा हो... लंडन किंवा मावळचा नव्हे हो....!
11 Aug 2011 - 3:00 pm | डीलर
या वादामूळे मार्केट मधे फंडामेंट्ल आणि टेक्निकल अनालिसीस आणि रेन्ड्म वॉक थिअरीची (Random walk down wall street) आठवण झाली.
11 Aug 2011 - 3:22 pm | विशाखा राऊत
ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी म्हणेन ते योग्य आणि बाकी सगळे खोटे.
पैसे देवुन पैज लावुन त्या शास्त्राचा अपमान करु नका.
अती ताणले की तुटते हे लेखकाने लक्षात ठेवल्यास त्याचा फायदा सगळ्यांना होईल.
कृपया मी हे जे काही लिहिले आहे ते माझे मत आहे. मला यावर कोणासोबत वाद घालयची इच्छा नाही.
11 Aug 2011 - 3:37 pm | Nile
शास्त्राचा अपमान म्हणजे हो काय? अपमान व्हायला शास्त्र म्हणजे काय शिंचा माणूस बिणूस आहे की काय? बाकी ते जोतिष फितिश शास्त्र आहे की नाही हे आधी ठरवावं लागेल अन त्या करता वादविवाद करावे लागतील बरं का.
मत कळले नाही. वाद घालायचा नसेल (म्हणजे दुसर्याचे मत ऐकून घ्यायचे नसेल) तर मग चर्चेत पडावेच कशाला? बाकी आम्हाला वाद घालायला लै मज्जा येते, हे आपलं आमचं एक मत म्हणून सांगून टाकलं.
11 Aug 2011 - 3:59 pm | विशाखा राऊत
ज्योतिषशास्त्र आहे की नाही हे तुम्हांला माहित नाही की पटत नाही हे तुमचे तुम्ही ठरवा.
कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास असणे चांगले पण याचा अर्थ असा नाही कि तुम्हांला सगळे येते वा तुम्ही त्यासाठी पैजा लावाव्या. जे ज्याला जसे पटते ते तसे वागावे.
शास्त्र या शब्दाचा अर्थ पटत नसेल तर मग भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शास्त्र कसे याचा विचार करा.
अपमान याचा अर्थ होता की जे लेखकांना वाटते ते एक मत म्हणुन सगळ्यांनी वाचले पण याचा अर्थ असा नाही की ते सगळ्यांना पटले पाहिजे. पैज लावयची असेल तर बर्याच वेगळ्या चांगल्या गोष्टि आहेत. स्पाच्या दिलेल्या जिलेब्या संपवुन दाखवा आणि घ्या पैसे :) (डॉक्टरांचा तर फायदा होईल कदाचित) नाहीतर मैदानावर आमंत्रण दिलेले आहे.
चर्चा वाद करायला माझी हरकत नाही पण उगाच मी म्हणेन ते खरे असेल तर मी जे लिहिले ती एक प्रतिक्रिया होती जे काही ह्या धाग्यावर वाचले त्याबद्दल. तुम्हांला वाद घालायचा असेल तर लेखकासोबत करावा आमचा तरी मस्त टाईमपास होईल.
11 Aug 2011 - 4:21 pm | Nile
समजा माहित नाही असे समजू. तुम्हाला हे शास्त्र वाटते अन त्याचा अपमान वगैरे होईल असं वाटतं म्हणून तुम्हालाच विचारतो, याचा अभ्यास करण्यासाठी पुस्तकं वगैरे सांगा. त्याच्या मध्ये काही बेसिक प्रॅक्टिकलं वगैरे असतीलच ती करून बघावी म्हणतो. अन त्यात संशोधन करणारे "शास्त्रज्ञ" सुद्धा असतीलच की. त्याचे संशोधन पब्लिश वगैरे पण होत असेल तेही वाचेन म्हणतो. जरा लिंका वगैरे असतील तर डकवा इथे. कसे?
भौतिकशास्त्र अन रसायनशास्त्राचा नुस्ता विचारच काय ते तर आम्ही रोज दोनवेळेला पोळीभाजी बरोबर खातो! पण तरी जोतिषशास्त्र हे कसं पटलं नाही जरा नीट सांगा की.
याला अपमान म्हणत नाहीत काही, उद्या माझे मते तुम्हाला (फक्त काल्पनिक बरंका) शेपटी आहे अन त्यावर त्याला काखमांजर्या झाल्या आहेत असे असेल आणि ते तुम्हाला पटले नाही तर माझा अपमान होईल? आणि तुम्हाला तसे वाटत असेल तर तुम्ही माझे मत न खोडता ते मान्य कराल?
उदाहरणार्थ कोणत्या? आणि लावू की त्याच्यावरही पैजा, म्हणजे काय इथे लावूच नयेत?
11 Aug 2011 - 5:55 pm | धन्या
नायल्या, हसून हसून मेलो रे तुझे मुद्दे खोडणे पाहून...
बाकी विशाखाताई म्हणतात त्यात काही खोट नाही. तुला वाद घालायचाच असेल तर लेखकाशी घाल... ,मस्त टाईमपास होईल... अरे हे अनुभवाने सांगतोय मी ;)
11 Aug 2011 - 6:08 pm | भीमाईचा पिपळ्या.
हॅहॅहॅ...
शेपटीला "काखमांजर्या"?????????/
विद्वान आहेस्.....हाहाहा =))
11 Aug 2011 - 4:33 pm | विशाखा राऊत
एक काम करा.. ज्यांनी ज्योतिषशास्त्र बद्दल दावा केला आहे त्यांनाच विचारा ना की कुठची पुस्तके वाचु, काय काय अभ्यास करु.. त्यांनापण तेवढेच बरे वाटेल..
अपमान झाला की नाही ते तुमचे मत आहे मग ते मी का खोडुन काढु.
एखाद्याला आपल्या माहिताचा असलेला गर्व चुकिचा आहे. हे माझे मत आहे तुमचे नसेल तर ठीक आहे.
बाकी तुम्ही बसा आपले विचारमंथन करत..
11 Aug 2011 - 4:40 pm | Nile
अर्थातच, जरा इतिहासात खणून पहा कीती वेळा विचारले आहे ते. सोडतो की काय?
लॉजिक तुमचं आहे, म्हणजेच मत तुमचं आहे. एखाद्याचे मत चुकिचे आहे असे म्हणल्यास त्याचा अपमान होतो असे तुमचे म्हणणे आहे, आता तुम्हीच ठरवा काय ते.
अच्छा. पण अस्तिस्त्वात नसलल्या गोष्टीचा दावा करण्यार्या विरोध केला तर तो त्याचा अपमान आहे. वा वा. भारीच की!
तुम्ही पण करा की थोडा विचार, म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल. :P
11 Aug 2011 - 4:45 pm | विशाखा राऊत
मी जे काही लिहिले होते ते या धाग्याबद्दल आणि त्यामध्ये जे काही लिहिले त्याबद्दल होते.
तुम्हांला जे काहि बोलायचे असेल ते या लेखकासोबत बोलावे.
उगाच काहिहि लिहुन वाद घालणे बंद करा.
बाकी काहिहि समजा आणि काहिहि विचार करत बसा.
11 Aug 2011 - 4:53 pm | Nile
तुम्ही जोतिष थोतांडाबद्दल लिहले होते, जरा परत वाचून या बरं.
ते फक्त मारकुट्या बायांबद्दल बोलतात, त्याविषयात आम्हाला रुची अन गती नाही.
म्हणजे आपण वाद घालतो आहोत? पण तुम्ही तर वर म्हणालात की तुम्ही वाद घालणार नाही म्हणून?
अय्या हो!! थांकू हं! पण मी परमिशन कधी मागितली?
11 Aug 2011 - 5:01 pm | विशाखा राऊत
मला तुमच्याशी वाद घालायची काय तुमची ही सगळी मत वाचुन बोलायची पण इच्छा नाही आहे.
तेव्हा याविषयी जे काही मत्/विचार्/वाद करयचे असेल ते संबधित धागालेखका सोबत करावे.
संपादकानी ही निष्फळ चर्चा ह्या धाग्याकरुन उडवली तरी चालेल.
11 Aug 2011 - 6:35 pm | Nile
अरे नका बोलू, आम्ही काय तुम्हाला पर्सनल इन्विटेशन थोडीचं पाठवलं होतं?
परत तेच. वरचे प्रतिसाद वाचावेत.
हे बरंय, आधी वाद घालणार नाही म्हणायचं आणि मग ह्ये प्रतिसाद टंकायचे वर हौस फिटली की संपादकांना उडवा म्हणून सांगायचं. जगू द्या की त्यांना जरा, संपादक असले म्हणून काय झालं, ती पण माणसंच आहेत!
11 Aug 2011 - 4:33 pm | विशाखा राऊत
एक काम करा.. ज्यांनी ज्योतिषशास्त्र बद्दल दावा केला आहे त्यांनाच विचारा ना की कुठची पुस्तके वाचु, काय काय अभ्यास करु.. त्यांनापण तेवढेच बरे वाटेल..
अपमान झाला की नाही ते तुमचे मत आहे मग ते मी का खोडुन काढु.
एखाद्याला आपल्या माहिताचा असलेला गर्व चुकिचा आहे. हे माझे मत आहे तुमचे नसेल तर ठीक आहे.
बाकी तुम्ही बसा आपले विचारमंथन करत..
11 Aug 2011 - 5:26 pm | योगी९००
आत्तापर्यंत सर्व प्रतिक्रिया वाचून मजा घेत होतो...राहवले नाही म्हणून सांगतो..
माझे एक नातेवाईक (बाबांचे काका) यांचा या विषयात प्रगल्भ अभ्यास आहे..त्यांनी मला असे काहीतरी सांगितले होते ..(पुर्णपणे आठवत नाही...)
"खरा ज्योतिषी कधीच कोणाकडून पैसे घेत नाही..नाहीतर या विद्येचा अपमान होतो" ..यावर त्यांनी अजून बरेच काही सांगितले होते पण सर्व आठवत नाही...कदाचित युयूत्सूच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील..
(हे मला सांगणारे एक राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक आहेत आणि त्यांनी त्यांच्या ज्योतिष विद्येचा कधिच धंदा केला नाही..)
11 Aug 2011 - 6:07 pm | गणेशा
माझा ही ज्योतिष या विषयावर विश्वास नव्हता, हौसे खातर नाडीपट्टी बघितली होती बस्स ( आणि अनुभव छान होता) तरीही भविष्य पाहण्याचे .. माणण्याचे काही रुचत नव्हते.
पण कंपणीत एक मित्र झाला .. आणि त्याने यंत्र - रत्न आणि काय काय याच्यात मद्रास च्या युनिवर्सिटीची पिचडी/मास्टरकी मिळवली.
लिहायचा मुद्दा हा आहे की. मी कधीच भविष्य न पाहणारा पण याच्याकडुन बर्याच गोष्टी शिकता आल्या पाहता आल्या.
आणि विशेष म्हणजे मी, माझे मित्र च काय तो कोणाचीही फि घेत नाही.. आणि भविष्याचा उत्तम अभ्यास होउनही तो त्याचा व्यवसाय करत नाहि.
मि बर्याचदा त्याला तसे कर म्हणालो पण तो बघु म्हणतो..
असो भविष्य पाहण्याचा व्यव्साय करण्याबद्दल माझे काही मत नाहि .. पण प्रत्येक गोष्टीची योग्य जागा असते ति तेथेच शोभते.
11 Aug 2011 - 6:28 pm | Nile
याचे कारण त्याच्या स्वतःचा त्यावर पुरेसा विश्वास नाही असे असु शकेल का, याची पडताळणी करता येते का पहा.
12 Aug 2011 - 7:59 pm | यकु
याचे कारण त्याच्या स्वतःचा त्यावर पुरेसा विश्वास नाही असे असु शकेल का, याची पडताळणी करता येते का पहा.
संशयात्मा विनश्यति !
11 Aug 2011 - 6:37 pm | Nile
अरे वा, मग तुम्ही घेताय का चॅलेंज?
11 Aug 2011 - 5:53 pm | प्रकाश घाटपांडे
१९३५ साली रा.ज. गोखले या भुगोल शिक्षकाने केलेले आवाहन मूळ इथे वाचा.
11 Aug 2011 - 6:03 pm | प्रकाश घाटपांडे
नवोदितांनी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद मधील अमावस्या पौर्णिमांविषयी इथे
प्रश्न ७,८,९ वाचावेत
11 Aug 2011 - 6:30 pm | प्रियाली
पकाकाका का का का का एवढं पाणी ओतता पालथ्या घड्यावर?
11 Aug 2011 - 6:54 pm | प्रकाश घाटपांडे
तेवढेच त्या निमित्त स्मृति. कधी कधी स्मृतिपटलावरुन आपण विरळ होउन जाउ याची भीती वाटते. अर्थात काळाच्या ओघात ते होणारच आहे. असो
अवांतर- सध्या बी १२ ची गोळी चालू आहे ती घेताना त्याच्या मूळ स्त्रोताची आठवण येते. :)
11 Aug 2011 - 7:30 pm | धन्या
काका, अशा किती अमावस्या आणि पोर्णिमा येतात आणि जातात... विचार अमर असतात :)
11 Aug 2011 - 7:22 pm | विजुभाऊ
म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.
पत्रीकेच्या आधारे नक्की काय काय करता येते हे संदिग्धच रहातय. पत्रीकेच्या आधारे स्पष्टपणे काय करता येते काय येत नाही या बाबत कोणीच का बोलत नाही.
एखादे शास्त्र कधीच स्वतः परीपूर्णतेचा दावा करीत नाही त्यात नेहमी सुधारणा होतच असतात.
नियम बनत असतात ,मोडत असतात.
हाडाची ऑपरेशन्स करणार्या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?
तुम्ही हाडाच्या डॉक्टरचे उदाहरण दिले. हाडाच्या डॉक्टरला ( ऑर्थोपेडीक सर्जन ला) आपण काय करू शकतो हे नक्की माहीत असते. शिवाय आर्थोपेडेक वैद्यक र्हदयाची शस्त्रक्रीया करण्याचे चॅलेन्ज घेणारच नाही. त्याला आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव असते.
एकूणातच लेखात मांडलेल्या म्हणण्याचा सूर असा दिसतो की लेखकाला कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही. आपले निर्णय चुकू शकतात याचे लेखकाला भान आहे मात्र त्याची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही हा देखील आग्रह आहे.
चिकीत्सा करणाराने पैसे देण्याची तयारी दाखवली मात्र आव्हान स्वीकारणाराने त्या चिकीत्सेच्या निकालांची जबाबदारी घ्यायचीच नाही हे अजब तर्कट आहे.
गिरे तो भी टांग उपर हीच वृत्ती यातून दिसून येते
12 Aug 2011 - 4:14 am | पान्डू हवालदार
युयुत्सु काका कुठे गेलेत..? राग आला का काका?
12 Aug 2011 - 9:46 am | धन्या
ते आता येणार्या अमावस्येचा चार-पाच दिवस आधी उगवतील, येणारी अमावस्या कशी घातक आहे सांगायला ;)
12 Aug 2011 - 9:50 pm | रामजोशी
*आह्वानांची ऐशीतैश**
असे लिहणार्यांचा बैलाला ******
12 Aug 2011 - 10:10 pm | पंगा
अधोरेखित वाक्प्रचार ऐकलेला आहे, अनेकदा वापरलेलाही आहे. मात्र, त्याचा अर्थ कळलेला नाही. कोणी समजावून सांगू शकेल काय?
('घो' म्हणजे 'नवरा' अशी ऐकीव माहिती आहे. मात्र, बैलाचा नवरा म्हणजे कोण, याबद्दल कुतूहल आहे. शिवाय, बैल हा गोप्रजातीतील काही विशिष्ट प्रक्रिया केलेला पुरुष असल्याकारणाने तदानुषंगिक इतरही शंका आहेत, परंतु त्या पुन्हा कधीतरी उपस्थित करेन. तूर्तास एवढी माहिती मिळाली, तरी पुरेशी आहे.
याशिवाय, 'घो'ऐवजी 'ढोल' असाही पाठभेद ऐकलेला आहे. त्याबद्दलही माहिती मिळाल्यास जाणून घ्यायला आवडेल.)