शीला का करप्शन

विकास's picture
विकास in काथ्याकूट
5 Aug 2011 - 7:17 pm
गाभा: 

आजच प्रकाशीत झालेल्या "काँप्ट्रोलर अँड ऑडीट जनरल" (कॅग) च्या अहवालाप्रमाणे सुरेश कलमाडींना राष्ट्रकूल स्पर्धांचे प्रमुख करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास दोषी धरण्यात आले आहे. २००४ साली तत्कालीन क्रिडा मंत्री, कै. सुनील दत्त यांनी या संदर्भात लेखी विनंती करून कलमाडींना बाजूस ठेवायला सांगितले होते. तरी देखील दुर्लक्ष केले गेले.

त्याव्यतिरीक्त दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना ३१ कोटी रुपयांच्या कंत्राटामधील गैरव्यवहारासंदर्भात दोष देण्यात आला आहे. थोडक्यात, "पोपट मेला नाही" असे म्हणायचे असेल म्हणून "करप्शन" केले असे म्हणलेले नसावे...

आता टाईम्स मधील बातमी वाचताना दोन मुद्दे:

१. कॅग रिपोर्ट हा कलमाडी दोषी आहेत असे गृहीत धरूनच केला आहे का? (डिसक्लेमरः ते दोषी नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही)

२. शीला दिक्षितांचा ३१ कोटी रुपयांचा तोटा, अर्थात गैरव्यवहार म्हणजे काँग्रेस सरकारसाठीच नाही तर तमाम सर्वपक्षिय राजकीय पुढार्‍यांसाठी नामुष्कीची गोष्ट आहे. म्हणजे भ्रष्टाचार केला म्हणून नाही, पण इंग्रजीत म्हणतात ना, "not failure but low aim is a crime" तसे काहीसे वाटले. कुठे २००० कोटी आणि कुठे ३१ कोटी!

तर या दुसर्‍या मुद्याचा विचार केला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात: आता जनतेच्या राजकारण्यांच्या कडून भ्रष्टाचाराच्या अपेक्षा कमी होणार का? शीलाजींमुळे इतर राजकारणी देखील peer pressure मध्ये येऊन कमी पैसेच खातील का? शीलाजींचा राजीनामा "low aim" ठेवल्याबद्दल मागणे अथवा त्यांनी आपणहून देणे हे योग्य ठरेल का करप्शन केले म्हणून देणे योग्य ठरेल?

प्रतिक्रिया

विकासराव,
रुमाल टाकून ठेवतोय.

कौन बनेगा करोडपती हा खेळ भ्रष्टाचारी नेत्यानी फारच मनावर घेतला आहे ! म्हणुनच करोडोंचे घोटाळे करण्यात ही मंडळी जुंपलेली दिसत आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा हव्यास इतका झाला आहे की त्याची कुठली सीमाच उरली नाहीये. :(
देशात इतकी अराजकता माजली आहे की कोणाचाच पायपोस कोणाच्या पायाखाली राहिला नाहीये.रोज भ्रष्टाचाराच्या गाथा उलघडत आहेत आणि भ्रष्टाचार्‍यांची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहुन डोळे आता विटले आहेत.
CWG scam: How crores were squandered for vanity
http://timesofindia.indiatimes.com/india/CWG-scam-How-crores-were-squand...

जाता जाता :--- हिंदुस्थानी भ्रष्ट नेत्यांनी देशाला आणि देशातल्या जनतेला वार्‍यावर सोडले आहे, देशाची सुरक्षा यंत्रणा कोलमडुन गेली आहे ! कशावरुन ? अहो मुंबईच्या किनार्‍यावर जहाजं च्या जहाजं येऊन रुततात आणि कोणाला त्याचा सुगावा लागतं नाही !
आमच्या राजकारण्यांना फक्त पैसा खाण्यात रस आहे. कसली आली देशाची सुरक्षा ? सुरक्षेतेला फाट्यावर मारुन ते मोकळे झाले आहेत. :(
http://alturl.com/b33vy

विकास's picture

9 Aug 2011 - 10:05 pm | विकास

हॅपी "चलेजाव चळवळ" दिवस! :-)

ऋषिकेश's picture

10 Aug 2011 - 9:24 am | ऋषिकेश

शीलाच काय पण मनमोहन देखील यापासून दूर राहु शकणार नाहिसे दिसतेय.
भाजप प्याद्यावर (पक्षी: माकन) हल्ला करून थेट मनमोहन, शीला या हत्ती-घोड्यांवर वचक ठेऊन थेट राजाला (पक्षी सोनिया) शह देण्याची एक दमदार चाल खेळली आहे. आता प्रतिचाल काय असेल याची वाट बघतोय

विकास's picture

10 Aug 2011 - 9:35 am | विकास

अहो भाजपा झाले मनमोहन आणि तमाम काँग्रेस आदी पक्ष झाले, नक्की सुशील कोण आहेत असे वाटते? (शिंद्यांचे नाव सोडून).

आता प्रतिचाल काय असेल याची वाट बघतोय

चालीच्याच बाबतीत म्हणाल तर, भाजपाने येडुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडून "तात्विक" चाल जास्त चांगली खेळली आहे असे वाटते. त्यामुळे सरकारवर दबाव आणू शकतात. तरी देखील, आपल्या सर्वांनाच (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वांनाच) अशा चालींमधे कोण जिंकते यावरून राजकारणी मुरब्बी आहेत असे न कळत ठरवत रहाण्याची वेळ आली आहे असे वाटते... :(

ऋषिकेश's picture

10 Aug 2011 - 9:43 am | ऋषिकेश

राजकारण हे कालातीत आहे. राजकारणी जेव्हा असे राजकारण करतात (ते केलेच पाहिजे) ते बघायला मजा येते :)
(त्यात नुकतीच 'सिंहासन' ही कादंबरी वाचली आहे ;) )

म्हणूनच म्याडम अमेरिकत तर नाही गेल्या ना ?
आताश्या आंटीजी भाजपच्या धारेखाली येतायेत पण कॉंग्रेस त्यांना पाठिंबा देवून राजीनामा घेणार नाही असे म्हणतेय.