यू आर थर्ड क्लास पीपल - अभिनंदन विक्रम गोखले!

यकु's picture
यकु in काथ्याकूट
6 Aug 2011 - 7:19 am
गाभा: 


वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून काय द्यायचे हे त्यातील लोकांना कधी कळणार? माझ्यावर बंदी घातली तरी चालेल, पण 'यू आर थर्ड क्लास पीपल' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वृत्तवाहिन्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्तमानपत्र राजकारण्यांना विकले जाते तर, दूरचित्रवाहिन्यांतील बक्षिसेही 'प्लॅण्ट' केली जातात असेही ते म्हणाले.
पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे उद्घाटन गोखले यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने आयोजीत केलेल्या "प्रसार माध्यमांचे चक्रव्यूह - नवी आव्हाने" या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेत्री व दिग्दर्शिका स्मिता तळवलकर, अभिनेत्री रेणूका शहाणे व अभिनेता उपेंद्र लिमये या मान्यवरांसह स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते.

बातमी सौजन्यः लोकसत्ता

विक्रम गोखले यांनी अभिनेते असूनही वाहिन्या व वृत्तपत्रांच्या रोषाची भीती न बाळगता विशेषतः वाहिन्यांकडून होत असलेल्या बावळट्पणाबद्दल हे खडे बोल सुनावले आहेत - त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. असे फटके देऊन वाहिन्यांचा माथेफिरूपणा सतत त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवा.
काय म्हणता?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

6 Aug 2011 - 8:21 am | अर्धवटराव

गोखल्यांच्या अभिनंदन प्रस्तावाला आपलं फुल्ल अनुमोदन

अर्धवटराव

प्रशांत's picture

6 Aug 2011 - 9:42 pm | प्रशांत

+१

अवांतर: गोखलेकाकांचा फोटो छान आहे

सहज's picture

6 Aug 2011 - 8:34 am | सहज

मिभोकाका आठवले. ड्वोळे पाणावले..

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2011 - 11:07 am | पिवळा डांबिस

सहज्या! कशाला रं मिभोकाकांची आढवन काहाढली?
आता आमचे बी ड्वोळे पानावले ना!!!
आसो, ईश्वर मृताडीस सद्गती देवो!!!!!!
;)

सहजराव आणि पिडाकाका,

तुम्ही दोघंही सर्किटरावांबद्दल बोलताय का ? ;)

बबलु's picture

7 Aug 2011 - 4:23 am | बबलु

हायली क्लासिफाईड इंफॉर्मेशन !!!

आताच महेंद्रकाकांचा लेख वाचला.

गोखलेंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करतो.

- पिंगू

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2011 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार

विक्रम गोखलेंशी सहमत.

ह्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन ह्यांचे मिडियावर अघोषित बहिष्कार टाकणे आठवले.

विनंती :- प्रसार माध्यमांचे एक प्रतिनिधी म्हणून स्वतः यशवंत कुलकर्णी ह्यांचे ह्यावर मत वाचायला आवडेल.

प्रसार माध्यमांचे एक प्रतिनिधी म्हणून ****** ह्यांचे ह्यावर मत वाचायला आवडेल.

इतर कुठल्याही नोकरीपेशा माणसासारखाच मीही कुठ्चा तरी नोकरदार आहे... प्रतिनिधी वगैरे म्हणता येणार नाही हे नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो.
आणि तसंही आमच्या धंद्यात स्वतः च्या मतापेक्षा इतरांकडून मत काढून घेण्यावर भर असतो हे जाहीर आहे.
त्यामुळं जास्त काही लिहीत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2011 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार

ज्जे बात !

शानबा५१२'s picture

6 Aug 2011 - 11:26 am | शानबा५१२

स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते.

मागे एकदा एका राजकीय पार्टीच्या प्रवक्त्याला 'तुम्ही आम्हाला शिकवु नये' असे बोलला होता.ईथे कुठले तीर मारले तेही लिहले पाहीजे होते.

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2011 - 11:41 am | पिवळा डांबिस

यू आर थर्ड क्लास पीपल...
उद्या कुनी त्या विक्रम गोखल्याला "यू आर थर्ड क्लास (अ‍ॅन्ड फॅट!!) आक्टर" आसं बोल्लं तर त्येला कसं लागंल?
पब्लिकला काय विग्लिश येत नाय व्हय?
:)

"यू आर थर्ड क्लास (अ‍ॅन्ड फॅट!!) आक्टर"

मी खुर्चीवर मागे रेलून तुमची प्रतिक्रिया वाचत होतो. अचानक हे शब्द वाचून पोटातून हर्ष् वायूची एक जबरदस्त उबळ आली आणि दम कोंडला.
अशा प्राणघातक प्रतिक्रियांपूर्वी ढुश्क्लेमर टाकावे ही विनंती.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2011 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

उद्या कुनी त्या विक्रम गोखल्याला "यू आर थर्ड क्लास (अ‍ॅन्ड फॅट!!) आक्टर" आसं बोल्लं तर त्येला कसं लागंल?

त्यांना कसे लागेल माहिती नाही पण त्यांचे अभिनय 'क्लोन' अविनाश नारकर अर्थात ज्यु. विगो ह्यांना मात्र भलतेच दु:ख होईल हो. त्या दु:खात मग ते अजुन मोठ्ठा पॉज घेतील आणि अजुन चार कोनात चेहरा वाकडा करतील.

गणपा's picture

6 Aug 2011 - 12:15 pm | गणपा

त्यांना कसे लागेल माहिती नाही पण त्यांचे अभिनय 'क्लोन' अविनाश नारकर अर्थात ज्यु. विगो ह्यांना मात्र भलतेच दु:ख होईल हो. त्या दु:खात मग ते अजुन मोठ्ठा पॉज घेतील आणि अजुन चार कोनात चेहरा वाकडा करतील.

अगदी अगदी.
ज्यु. विगो अगदी ड्वाल्या पुढे हुभेच राह्यले.
=)) =))

प्यारे१'s picture

6 Aug 2011 - 12:56 pm | प्यारे१

यू आर थर्ड क्लास पीपल...! ;)

स्मिता.'s picture

6 Aug 2011 - 2:57 pm | स्मिता.

मुळात अविनाश नारकर हे अभिनय करतात याच्याशी मी सहमत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास बळावलेली कोणतीही व्यक्ती तसले हावभाव आपसूकच करते.

धन्या's picture

7 Aug 2011 - 2:32 am | धन्या

कुणी कसंही असलं तरी आपण कुणाबद्दल इतकं वाईट बोलू नये हो ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2011 - 1:17 pm | बिपिन कार्यकर्ते

मुळात अविनाश नारकर हे अभिनय करतात याच्याशी मी सहमत नाही.

पण मी तुमच्याशी सहमत आहे.

बद्धकोष्ठतेचा त्रास बळावलेली कोणतीही व्यक्ती तसले हावभाव आपसूकच करते.

आम्हाला तो त्रास असला तरी आम्ही नाही कधी असं करत! (दोन्ही) नारकर त्याहूनही वाईट आहेत.

(दोन्ही) नारकर त्याहूनही वाईट आहेत.

मी पण तुमच्याशी सहमत आहे. :)

पंगा's picture

7 Aug 2011 - 5:42 pm | पंगा

आम्हाला तो त्रास असला तरी...

ही बहुमूल्य, उपयुक्त आणि रोचक माहिती सार्वजनिक क्षेत्रात आणून सर्वांबरोबर शेअर करण्याबद्दल जाहीर आभारी आहे.

स्मिता.'s picture

7 Aug 2011 - 8:15 pm | स्मिता.

(दोन्ही) नारकर त्याहूनही वाईट आहेत.

याला +१

विक्रमा,
अरे फक्त इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच नाहीत, तर एकूण प्रसारमाध्यमे, राजकारण, समाजाची मानसिकता, राहणीमान सगळं सगळंच थर्ड क्लास झालंय रे. तू ज्या क्षेत्रात आहेस तिथेही हीच स्थिती आहे. कुणी कुणाला दोष द्यायचा?

- (प्रेतात लपलेला) वेताळ -

श्रावण मोडक's picture

7 Aug 2011 - 12:59 am | श्रावण मोडक

चालायचेच. शेपूट तुटलेल्या माकडांचा मेळावा शेवटी हा! ;)
हा प्रतिसाद व्यक्तींसाठी नाही. प्रवृत्तीसाठी आहे.

प्यारे१'s picture

6 Aug 2011 - 4:26 pm | प्यारे१

दे दणादण नावाच्या अत्यंत 'भोयोंकर' चित्रपटात गोखले काकांनी केलेलं काम फर्स्ट क्लास आहे. ;)

तुम्ही म्हणत असलेला दे दणादण हा कुठलातरी हिंदी चित्रपट दिसतोय.

आम्ही आपले उगाचच आमच्या ऑल टाईम फेव्हरीट मराठी दे दणादण मध्ये विक्रम गोखले कुठून आले म्हणून विचार करत बसलो.

दे दणादण.. आहा..

धनाजीराव.. काय आठवण काढलीत. शाळा चुकवून पाहिलेला पहिला सिनेमा तो. (तिथून सुरुवात झाली.)

भिंत फोडून पलिकडच्या घरात डोकं घुसलेला लक्ष्या तोंडावर उडवलेलं पिठलं चाटत "पिठलं आहे वाट्टं.." म्हणतो..

महेशरावांची डॅम इटची ताजी ताजी सवय..

लाल रंग पाहताच गाँय गाँय गाँय आवाज करत निघून जाणारी लक्ष्याची पॉवर..

जाऊया डबलसीट रं लांब लांब लांब. अशी झक्कास गाणी.

वाह.. धन्यु हो धनाजी वाकडेसाहेब.. बाकी तुम्हाला मुर्दाबाद करणारा कोणता हो तो सिनेमा? तुम्ही पार्श्वात लाथ मारुन हाकललेला झुंजार कामगार महेश कोठारे तुमच्या बंगल्यासमोरच तंबू ठोकतो आणि पाहता पाहता तुमची पोरगी खुल्ला पटवतो तो? नावच आठवेना.

स्वानन्द's picture

8 Aug 2011 - 12:56 pm | स्वानन्द

बहुदा तो 'धूमधडाका' होता.

आत्मशून्य's picture

6 Aug 2011 - 4:29 pm | आत्मशून्य

जि गोश्ट मी-तूम्ही हजारदा बोलतो ती विक्रम गोखलेनी बोलली की त्यात महान शोध लागल्याचा आंनद झाल्याप्रमाणे अभिनंदनाचा धागा काढण्याइतके नावीन्य उरले आहे काय ? हा तर विक्रम गोखलेंच्या आडून इतरांच्या बूध्दीचा केलेला धडधडीत अपमान आहे.....

धन्या's picture

7 Aug 2011 - 2:37 am | धन्या

असं कसं, असं कसं?

विक्रम गोखले शेलेब्रिटी आहेत. त्यांच्या शब्दाला वजन आहे. (इथे "शब्दाला वजन" हा शब्दप्रयोग त्यांच्या मताला मान, किंमत आहे असा घ्यावा. उगाचच वजन शब्दावर कोटी करु नये.)

शेलेब्रिटी आणि आपल्यात काही फरक आहे की नाही. :)

Nile's picture

7 Aug 2011 - 2:54 am | Nile

तुमच्यात असेल, पण त्यांच्यात नाहीए. असे ते समजतात असे दिसते.

नायल्या माझ्या प्रतिक्रियेत उपहास होता रे... :D

तो पोहोचला असता का अशी शंका आली म्हणून क्लीअर करून टाकलं! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Aug 2011 - 1:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आपण मीडिया वर टीका करणे आणि एखाद्या कलाकाराने करणे यात फरक आहे. कलाकारांना मीडिया ची गरज असते. अमिताभ बच्चन आणि मीडिया मध्ये साधारण १५ वर्षे शीतयुद्ध चालले होते, शेवटी पडता काळ आला तेव्हा अमिताभने पुढाकार घेऊन तो वाद मिटवला. जिथे बच्चन सारख्या महानायकाला मीडिया ची गरज वाटते तिथे इतरांची काय कथा.

ज्या क्षेत्रात मीडिया शी संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे, तिथे असूनही गोखले यांनी हे मत मांडले म्हणून त्याला महत्त्व आहे. तुम्ही आणि मी म्हटले आहे त्याला महत्त्व नाही असे नाही, पण मीडिया असेही आपले काही बरेवाईट करू शकत नाही*.

(*इथे काही रिसेंट संदर्भ देण्याचा मोह खूप कष्टाने आवरला आहे याची संबंधितांनी दाखल घ्यावी ;-) )

विकाल's picture

6 Aug 2011 - 5:05 pm | विकाल

विगो.....,
आपल्या मताचा आदर आहे...!
ओघात आपण असंही बोललात की गेल्या २८ वर्शात आपण टी व्ही पाहीला नाहीत, कारण त्यात घेण्यासारखे काही नसते.

सर, ये बात कुछ जमी नै सर...! ज्या दिवशी हे कळालं त्याच दिवशी का काम नाही थांबवल सर..? या सुखांनो या वगैरे...!

त्या रसिकांना का फसवलंत मग? खास तुमच्यासाठी 'थर्ड क्लास' टी व्ही पाहणार्या प्रेक्षकांची संख्या कमी नव्हती कारण ते कदाचित तुम्हाला 'फर्स्ट क्लासच' समजत आलेत.

त्यांनी तर मागे एकदा नाटकाला आलेल्या समस्त पब्लिकलाच( चक्क पब्लिकमधे) धरुन झाडलं होतं.
औ.बाद मध्ये का कुठेतरी "तुम्चा मुलगा करतो काय" का कुठल्याशा नाटकाचा प्रयोग रंगात होता, गंभीर प्रसंग हा पहिल्या अंकाचा शेवट होता, त्या सीन मध्ये मोठी सोलिलुकी(दीर्घ एकतर्फी संवाद/स्वगत?? ) देत असताना नेमका कुणाचा तरी मोबाइल वाजला. झालं. इंटारवल झाल्यावर पडदा वर गेला तेव्हा रंगमंचावर काहिच नव्हतं, एका खुर्चीवर रागावलेले साहेब बसले होते.(तसे मला ते नेहमीच रागावलेले वाटतात.)
आणि तापलेल्या आवाजात त्यांनी मस्त खरडापट्टी काढली सगळ्या पब्लिकची. मोबाइल आणि मुले घरी ठेउन या नाहितर स्विच ऑफ करा असं सांगितल. हे नाट्य बरच रंगलं. नंतर वृत्तपत्रात बरीचशी पत्रापत्रीही चालली. ज्याला कॉल आला तो म्हणे व्यवसायने डोक्टर होता आणि अर्जंट केसेससाठी त्याला तो रिसीव्ह करावाच लागतो,वगैरे.
असो.
मधे एसटी तोट्यातून बाहेर काढायचा प्रयत्न म्हणुन त्यांना ब्रँड आंबॅसिडर नेमलं होतं एस टी म्हामंडळाचा.(राज्य परिवहन च्या चारचाकी वाहतुकीचा).दोनेक महिने तिथे थांबल्यावर ह्यांनी ती जबाबदारी सोडली व एसटी बद्दल तिथल्या संचालकांनाच आस्था नाही असं काहिसं अस्वस्थ होउन म्हणु लागले.
तर सांगायचं म्हणजे गोखले सर, (विजय) तेंडुलकर ह्यांना सामाजिक बेशिस्त, नृशंस हत्याकांड, खड्ड्यात जाणारा देश्/समाज्/परिस्थिती असल्या क्षुल्लक गोष्टींचा बाउ करुन घ्यायची सवय आहे. दुर्लक्ष करा/करायला शिका.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2011 - 8:49 pm | मराठी_माणूस

ज्याला कॉल आला तो म्हणे व्यवसायने डोक्टर होता आणि अर्जंट केसेससाठी त्याला तो रिसीव्ह करावाच लागतो,वगैरे.

आठवतय.

अर्थात ह्यात गोखलेंची काहीच चुक नव्हती. दिलगिरि व्यक्त करावयाच्या ऐवजी स्पष्टीकरण देणे योग्य वाटत नाही.
व्हायब्रेशन वर ठेवण्याचा पर्याय का नाही वापरला.

पंगा's picture

8 Aug 2011 - 4:13 am | पंगा

व्हायब्रेशन वर ठेवण्याचा पर्याय का नाही वापरला.

अगदी सहमत. नाट्यगृहात असताना मोबाइल एक तर बंद ठेवावा, नाहीतर व्हायब्रेटवर ठेवावा, आणि मोबाईलवर संभाषणे तर अजिबात करू नयेच, हे अगदी पटण्यासारखे.

पण दुसर्‍या पक्षी, सभागृहात एखाद्याचा मोबाईल वाजला, तर त्याबद्दल आख्ख्या सभागृहाला झाडणे, धारेवर धरणे, लेक्चर देणे, तेही नाटक तोपर्यंत सस्पेंड करून, हे कोणत्या पद्धतीत बसते? एक साधी, थोडक्यात, जाहीर विनंती / अनाउन्समेंट नसती करता आली? की लोकहो, नाटक चालू असताना प्रेक्षागृहात जर एखादा मोबाईल वाजला, तर सर्वच प्रेक्षकांचा रसभंग होतो, सबब कृपया आपले मोबाइल बंद ठेवावेत किंवा व्हायब्रेटवर ठेवावेत, आणि मोबाइलवर संभाषण कृपा करून करू नये, म्हणून? असले अघोरी प्रकार कशासाठी? आणि ज्याचा मोबाईल वाजला, तो सोडून बाकीचे तमाम प्रेक्षक काय फुकटपासातले, साहेबांच्या उपकारांनी नाटक बघणारे? त्यांना काय म्हणून धारेवर धरायचे? दमड्या मोजल्या होत्या ना त्यांनी? त्यांचा काय रसभंग झाला नसेल? आणि वर पुन्हा साहेबांचे लेक्चर ऐकायचे?

ते महात्मा गांधींनी काहीतरी म्हटले होते ना? की दुकान चालवून तुम्ही गिर्‍हाइकावर उपकार करत नसता, उलट गिर्‍हाइक तुम्हाला सेवेची संधी देऊन तुमच्यावर उपकार करत असते, म्हणून? मग हे या 'मोठ्या लोकां'ना कोण सांगणार?

बरे, 'प्रेक्षक हे एकजात बाय डिफॉल्ट बेशिस्तच असतात, यांना वठणीवर आणलेच पाहिजे' हीच जर भावना असेल, तर मग करू नयेत ना नाटके! साहेब उद्या जर नाटकांतून कामे करायचे बंद जर झाले, नव्हे साहेब उद्या अगदी मरून जरी पडले, तरी सृष्टीत अशी कोणतीच उलथापालथ होणार नाही आहे, की मराठी नाट्यसृष्टीचेही असे कोणते 'अपरिमित, कधीही न भरून येणारे' की काय म्हणतात तसे नुकसान होणार नाही आहे. मराठी नाट्यसृष्टीला जोपर्यंत मागणी आहे, तोपर्यंत साहेबांची जागा घ्यायला कोणी ना कोणी तरुण रक्त येईलच. आणि नाहीच आले आणि पडलीच मराठी नाट्यसृष्टी बंद, तर ती मराठी नाट्यसृष्टीला एकंदर भाव न राहिल्याने पडेल, साहेबांच्या अभावाने नव्हे.

बाकी, (मजबूरी के नाम?) 'माहेरची साडी', झालेच तर 'हम दिल दे चुके सनम'सारख्या टुकार पिच्चरांतून काम करणार्‍या साहेबांनी एवढा भाव खावा (आणि लोकांनीही ते चूपचाप ऐकून घ्यावे, दमड्या मोजलेल्या असूनसुद्धा) याची गंमत वाटते.

(डिस्क्लेमर: प्रेक्षागारामध्ये मोबाइल चालू ठेवण्याचे अथवा मोबाइलवर संभाषण करण्याचे हे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही.)

मन१'s picture

8 Aug 2011 - 9:27 am | मन१

पण नाटकाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता तशी अनाउंसमेंट करण्यात येते मागील५-७ वर्षापासुन. ती तशी करुनसुद्धा जर फाट्यावर मारण्यात येत असेल तर एखाद्याचा त्रागा होउ शकतो. स्वतःच्या तब्येतीसाठी, नाटकाच्या (आणि स्वतःच्या )आर्थिक गणिते लक्षात घेउन कुणी तसा त्रागा करु नये हे खरं.

मराठी_माणूस's picture

8 Aug 2011 - 11:13 am | मराठी_माणूस

अगदि बरोबर. सुरुवातीलाच घोषणा करण्यात येते.

आम्हाला मध्ये जर फोन आला तर आम्ही बोलु, शेजार्र्‍यांचा रसभंग करु , कलकाराचे बेरींग तोडू , पण तुम्ही तुमचे काम करत रहा. हा शुध्द उद्दामपणा झाला.
हे म्हणजे होटेल मधल्या ऑर्केस्ट्रा सारखे झाले. आपण आपले गप्पा मारत खात बसायचे , ते आपले वाजवतायत. अशा प्रेक्षकानी मनोरंजनासाठी अशा ठीकाणी जावे.

(अवांतरः एका टीव्ही कार्यक्रमात , रसिका जोशीने सांगीतलेली आठवण. तीचे नाटक चालु असताना , पुढील रांगेतल्या एका प्रेक्षकाला फोन आला आणि तो सरळ बोलायला लागला. रसिकाने जेंव्हा नापसंती दर्शवली तेंव्हा त्याने , २ मिनीट अशी हाताने खुण केली आणि फोन संपल्यावर रसिकाकडे बघुन "आता चालु द्या " अशी खूण केली. अशा वेळि, कलाकाराने उर्वरीत प्रेक्षकांचा विचार करुन परत त्या पात्राच्या बेरींग मधे शिरुन काहीच घडले नाही असे समजुन प्रयोग पुढे चालु करणे ही गोष्ट सोपी आहे का?)
(अति अवांतर : त्या प्रेक्षकाचा निर्लज्जपणा वादातीत)

पंगा's picture

8 Aug 2011 - 2:58 am | पंगा

मोबाइल आणि मुले घरी ठेउन या नाहितर स्विच ऑफ करा असं सांगितल.

मोबाईलचे समजू शकतो, पण मुले स्विचऑफ कशी बरे करावी?

मुलांना स्विच ऑफ करायची गरज नाही. ती मुळातच व्हायब्रेटर वर असतात.
या निमित्ताने ग्रेट भेट मधे निखिल वागळे या महान पत्रकाराने विक्रम गोखले या महान अभिनेत्याची मुलाखत घेतलेली आठवली. विक्रम गोखलेंच्या तोंडाचा पट्टा वैचारिकपणे वाजत होता. एका कार्यक्रमात काम मिळण्याआगोदर चॅनलच्या नियमानुसार गोखलेंना ऑडिशन देण्यास सांगितले होते, त्याचा भयंकर राग होता साहेबांना. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "मी बरच वर्षे काम करत आहे. जे करायचं ते सगळं केलं आहे. त्यामुळे मला ऑडिशन द्यायची गरज नाही"
गोखले सरांच्या तोंडून प्रत्येक शब्दागणिक गर्व गळत होता. सर्व चॅनलच्या टाय घालून फिरणार्‍या सिईओंना त्यानी मुलाखतीत जाहीरपणे विचारलं होत."What do you know about camera? What do you know about lense?"
"माझ्या या बोलण्यावर माझ्यावर समस्त चॅनलच्या सिईओ नि माझ्यावर बहिष्कार टाकला तरी बेहत्तर" असं सुद्धा ठोकून दिलं होतं :)

पटापटा बोलणारे निखील वागळे पोलीसांसमोर बसलेल्या चोरा सारखे घाबरट चेहरा करून बसले होते.
मुलाखत संपली आणि निखिल वागळेंनी विक्रम गोखलेंच्या समोरच " ही एका अस्वस्थ माणसाची मुलाखत होती" असं ठोकून दिलं. :)

अगदी विनोदी मुलाखत होती :)

आनंदयात्री's picture

6 Aug 2011 - 7:53 pm | आनंदयात्री

त्यांच्या कोणाबरोबरच्यातरी वादासंदर्भात मध्ये बराच धुराळा उडाला होता, मला वाटले त्या संदर्भात काही असावे. हे नवीन दिसतेय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2011 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> विक्रम गोखले यांनी अभिनेते असूनही वाहिन्या व वृत्तपत्रांच्या रोषाची भीती न बाळगता...

एकतर विक्रम गोखले हे महाराष्ट्रभर मराठी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. राहिलं साहिलं हिंदी मालिकांमधून चित्रपटांमधून विक्रम गोखलेंची ओळख आहेच. आता वाहिन्यांनी प्रसिद्धी दिली काय आणि नाही दिली काय विक्रम गोखले आपल्या अभिनयाच्या जोरावर आहे त्या जागेवर ठीक आहेत. . बाकी, ''वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून काय द्यायचे'' हा तर पीएच.डीचा विषय आहे. त्यामुळे त्यावर काहीही न बोललेले बरे. बाकी, विक्रम गोखलेंच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे यात काही वाद नाही.

यकु यार हे वाहिन्यावाले आणि पेप्रातले पत्रकार (यकु सोडून) कधी सुधारणार यार........!

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

6 Aug 2011 - 11:51 pm | नगरीनिरंजन

महान क्रांतीकारक श्री. विक्रम गोखले यांचे अभिनंदन करायला आमची हरकत नाही.
अवांतरः एका हापिसात एक साहेब पट्टेवाल्याला म्हणाला,"यू थर्ड क्लास इडियट.". पट्टेवाला म्हणाला,"नो सर. आय अ‍ॅम क्लास फोर.".

चिरोटा's picture

7 Aug 2011 - 10:45 am | चिरोटा

"नैतिक बंधने ठेवून वृत्तपत्रांनी काम केले पाहिजे" विक्रम गोखले
विवाहसंस्थेवर विश्वास नाही असे पूर्वी म्हणणारे गोखले ईतरांना नैतिकता शिकवतात हे वाचून मजा वाटली.

चक्रम चिरोटा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2011 - 7:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विवाहसंस्थेवर विश्वास नसण्याचा आणि वृत्तपत्रीय नैतिकतेचा संबंध समजला नाही.

'दे दनादन' नामक हिंदी चित्रपट पाहताना विक्रम गोखलेंकडे बघवत नव्हते. पिंपाच्या पोटाला बांधलेला टायर अस्थिर झाल्यामुळे पिंप गडगडतं आहे असं सतत वाटत होतं. कलाकार म्हणून विक्रम गोखले मला फारसे आवडले नाहीत; सतत कोणीतरी लेक्चर देत आहे असंं वाटतं/वाटायचं; मग एखादी मालिका असो वा एकाद बेशिस्त दर्शकामुळे सगळ्याच दर्शकांना विद्यार्थी बनवून हेडमास्तरपणा करणं असो. 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातलं 'अरे मन मोहना' गाणं बघण्याचा योग तसा अलिकडच्याच काळात आला. विक्रम गोखले कधीतरी 'आय कँडी' दिसायचे यावर विश्वास बसला (बाकी किती अत्याचार झाले हे वेगळं काय सांगायचं?)

रसिका जोशी या गुणी अभिनेत्रीने नाटक सुरू असताना मोबाईलवर बोलण्यामुळे झालेला उपद्रव किती खेळकरपणे घेतला हे तिने 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात दाखवलं होतं.

पंगा's picture

8 Aug 2011 - 7:25 am | पंगा

विवाहसंस्थेवर विश्वास नसण्याचा आणि वृत्तपत्रीय नैतिकतेचा संबंध समजला नाही.

विवाहसंस्थेवर विश्वास नसण्याचा आणि वृत्तपत्रीयच काय, पण कोणत्याच प्रकारच्या नैतिकतेचा संबंध समजला नाही.

उर्वरित प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. (तेवढा रसिका जोशींसंबंधीचा भाग वगळून. कारण रसिका जोशी नावाची अभिनेत्री तर सोडाच, पण 'अशा नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वात होती' हेच मुळात आम्हाला जिथे त्यांच्या मृत्यूसंबंधी बातमी आणि लेख माध्यमांतून येऊ लागल्यावर समजले, तेथे त्यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाविषयी आणि संबंधित प्रसंगाविषयी आम्हाला काहीच माहिती असण्याचे कारण नाही. त्रुटी अर्थातच आमची, पण अशा परिस्थितीत आम्ही त्याबद्दल काय बोलावे आणि सहमती तरी कशी दर्शवावी?)

स्मिता.'s picture

8 Aug 2011 - 2:26 pm | स्मिता.

विवाहसंस्थेवर विश्वास नसण्याचा आणि वृत्तपत्रीय नैतिकतेचा संबंध समजला नाही.

सहमत! या दोन्ही अगदी भिन्न गोष्टी आहेत असं वाटतं.

'अरे मन मोहना' चा दुवा देवून खूप चांगलं काम केलंस. ५-६ मिनीट फक्त हसतेय. "विक्रम गोखले कधीतरी 'आय कँडी' दिसायचे यावर विश्वास बसला" यालाही +१.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Aug 2011 - 3:38 pm | अविनाशकुलकर्णी

विक्रम गोखले यांना हस्त सामुद्रिक व शेति मधले हि द्यान आहे......

छोटा डॉन's picture

8 Aug 2011 - 3:44 pm | छोटा डॉन

एवढ्या सगळ्या चर्चेनंतरही मला विक्रम गोखल्यांचे काय चुकले हे समजले नाही.
त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात हे बरेच शिघ्रकोपी, तोर्‍यात राहणारे किंवा सो कॉल्ड शिष्ठ, बंडखोर किंवा इतर काहीही असतील, पण म्हणुन त्यांचे हे 'मत' बाद कसे काय ठरवता येईल ?
जे आहे ते आहे, नै का ?

मला तर गोखल्यांच्या बोलण्यात जास्त काही चुक वाटत नाही.

- छोटा डॉन

आबा's picture

8 Aug 2011 - 4:31 pm | आबा

+१