परदेशात घर विकत घ्यावे का? असल्यास काय काळजी घ्यावी?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
5 Aug 2011 - 2:07 am
गाभा: 

अमेरिकेत काही वर्षांपासून रहात असलेल्या एका परिचिताने (घरभाड्याएवढा मासिक हप्ता देऊन स्वतःचे घर होईल या विचाराने) घर विकत घेतले, आता त्यांनी दुसर्‍या शहरात नोकरी धरली, तसेच मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहेत, परंतु घेतलेले घर विकले जात नाही, व भाडेही पुरेसे मिळत नाही, अशी पंचाईत झाली आहे.

यावर काय उपाय आहे, एकूणच परदेशात घर विकत घेण्यात काय काय फायदे- तोटे असतात? घ्यायचेच असेल तर काय काय काळजी घ्यावी?

प्रतिक्रिया

फ्लोरीडा मधे शोर्ट टेर्म गुन्तव्नुक ठिक नाही (मिन डाउन २५%)
टोरोन्टॉ, वेनुव्र्र लोन्ग टेर्म साटी ठिक ...(मिन डाउन २५%)
सिन्गपोर वा होन्कोन्ग लोन्ग टेर्म साटी ठिक ... (मिन डाउन ५०%)

अवान्तर : "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे", मुलगा झाला अस्ता तर..?

भारी समर्थ's picture

5 Aug 2011 - 12:16 pm | भारी समर्थ

अवान्तर : "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे", मुलगा झाला अस्ता तर..?

जानम समझा करो ना यार...

भारी

आता त्याना ज्या भागात खाप पंचायत पावरफुल चालते अश्या ठिकाणी स्थाईक व्हा म्हणुन सांगा.

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 3:38 am | पिवळा डांबिस

"मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे"
मलाही हे खटकलं...
याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का? किंवा तो शब्दप्रयोग कृपया वगळाल का?
(धाग्याचं काश्मीर होऊ नये म्हणून नम्रपणे विचारणा करीत आहे)

आता मूळ विषयाबद्दलः
१. ज्या कुठल्या देशात घर घेणार तिथली किमान पर्मनंट रेसिडेन्सी असल्याशिवाय तिथे घर घेऊ नये.
२. घराच्या एकूण किंमतीच्या किमान २०% डाऊन करायची तयारी ठेवावी.
३. उरलेल्या कर्जाची परतफेड आपल्याला करता येण्याजोगे आपले उत्पन्न आहे याची खात्री करून घ्यावी.
४. मासिक खर्चात फक्त कर्जाचा हप्ताच नसतो तर आणखी प्रॉपर्टी वगैरे टॅक्सेससुद्धा असतात हे ध्यानात घ्यावं
५. अपार्टमेंटमधून घरात गेल्यावर इतर सर्व बिले (वीज, पाणी, इत्यादि) वाढतात याची जाणीव असू द्यावी
६. घर घेतल्यानंतरही त्या घरात आपल्याला हवे तसे खर्च (काही डागडुजी, काही फेरफार, फर्निचर इत्यादि) करण्यासाठी किमान २० ते ३० हजार डॉलर्स (अमेरिकेत घर असल्यास) बाजूला काढून ठेवलेले असावेत.
७. या सर्वांव्यतिरिक्त आपल्या दरमहा घरखर्चाच्या (ह्प्ता धरून) किमान ८ ते १० पट रक्कम बॅन्केत असावी. म्हणजे घर घेतलं आणि जर जॉब गेला तर किमान ८ ते १० महिने तरी रस्त्यावर पडायची वेळ येणार नाही.

सारांश काय, तर घर घेण्याइतकी आपली आर्थिक पात्रता आहे याची खात्री करून घेऊनच मग या फंदात पडावं. अमेरिकेतला आजचा रियल इस्टेट क्रायसिस उद्भवण्याचे प्रमुख कारण (तशी बरीच कारणे आहेत पण हे प्रमुख) हे बर्‍याच लोकांनी आपली परतफेड करण्याची पात्रता लक्षात न घेता हावरटपणे घरं घेतली हे आहे.

घर घेण्याचे फायदे बरेच आहेत. इक्विटि बिल्डअप, टॅक्स ब्रेक, फॅमिलीसाठी भरपूर मोकळी जागा, सोशल स्टॅन्डिंग, मुलांसाठी आवडीची शाळा, लाईन ऑफ क्रेडिट इत्यादि इत्यादि. पण ते सर्वांना ठाउक असल्याने इथे लिहित नाही.

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:01 am | पंगा

"मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे"
मलाही हे खटकलं...

ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.

याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का?

मला वाटते स्पष्टीकरण (१) ऑबवियस असावे, आणि (२) विशेषतः सदर लेखकाने स्वतःच्या मुलींच्या संदर्भात स्वतःचा निर्णय अथवा त्याबद्दलचे मत व्यक्त केलेले नसून केवळ दुसर्‍या कोणाचेतरी मत निव्वळ उद्धृत केलेले आहे या कारणास्तव, सदर लेखकाकडून त्याचे स्पष्टीकरण हे अ‍ॅट बेस्ट अंदाजात्मक आणि अनरिलायेबल आणि अ‍ॅट वर्स्ट अशी मागणी अस्थानी असावी. सबब, अशा स्पष्टीकरणाची चर्चा न झालेलीच बरी, असे मला तरी वाटते. चुकीच्या स्रोतावरून मिळालेल्या अविश्वसनीय (अनरिलाएबल अशा अर्थी), अर्धवट आणि तर्कात्मक माहितीच्या आधारावर झालेल्या चर्चेतून निष्पन्न झालेला कोणताही निष्कर्ष हा शंकास्पद ठरावा. (उपरोल्लेखित मित्राकडून त्याचे मत थेट अश्वमुखातून कळल्यास गोष्ट वेगळी.)

मात्र,

किंवा तो शब्दप्रयोग कृपया वगळाल का?

ही अपेक्षा योग्य वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2011 - 4:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.

याच्याशी सहमत.

धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.

धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.

आम्हाला आपलं उगाचंच दोन वकील शब्दांचा कीस पाडत आहेत असं वाटलं वरचे दोन प्रतिसाद वाचून :)

+१
मलाही काही प्रतिसादकर्ते शब्दांचा खिस पाडत आहे असे वाटत आहे.

धागाकर्त्याला 'अपत्य झाल्याकारणाने मित्र भारतात परतण्याचा विचार करत आहे ' असे सांगावयाचे असेल. मुली झाल्या म्हणून तिथे मुली असे लिहीले आणि मुलगे झाले असते तर त्यानी मुले वा मुलगे असे लिहीले असते.
अपत्य असलेली बरीच कुटुंबे माझ्या पहाण्यात आहेत जी मुलांच्या भविष्याचा विचार करून भारतात कायमची परतली आहेत.

मराठी_माणूस's picture

5 Aug 2011 - 9:08 am | मराठी_माणूस

अपत्य असलेली बरीच कुटुंबे माझ्या पहाण्यात आहेत जी मुलांच्या भविष्याचा विचार करून भारतात कायमची परतली आहेत.

सहमत. माझ्याही पहण्यात आहेत. त्यमुळे त्यात काही तरी तथ्य असणारच.

एक प्रकारचा विषाद वाटला ते वाक्य वाचून. त्यावर चर्चा तरी काय करायची आणि मतं तरी कोणाची बदलायची असं वाटून राहीलं. चर्चेनी लोकांची मतं बदलतात पण ते जर खुले असतील नव्या विचारांसाठी तरच.
फक्त विषाद दाटून येतो.
हे मत धागाकर्त्याचे नाही हे माहीत आहे.
चर्चा जरूर व्हावी. सहभाग घेतला जाईल.

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:46 am | पंगा

धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती.

कारण एवढेच की (इथे नसलेल्या) दुसर्‍याच्या (सपोज़ेड) मताबद्दल तिसर्‍याशी वाद घालणे निराधार आहे, म्हणून. (धागालेखकाने 'हे माझे मत आहे आणि या-या कारणांस्तव आहे' असे म्हटले, तर गोष्ट वेगळी. अन्यथा अशी चर्चा ही काही गृहीतकांच्या आधारावर हवेत तीर मारणे ठरेल.)

बाकी कोणी कोठे आणि कोणत्या कारणास्तव रहावे किंवा राहू नये याबद्दलचा निर्णय हा वैयक्तिक आहे, आणि त्रयस्थाने ('असे करू का' असा सल्ला निर्णय घेणार्‍याने स्पेसिफिकली विचारल्याखेरीज) त्यात (व्यक्तिगत पातळीवर) हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला जातो, असे मला तरी वाटत नाही. मग भले माझी या विषयावरील धारणा काहीही असो आणि मला हा (दुसर्‍याचा त्याच्या स्वतःच्या बाबतीतील) निर्णय किंवा त्यामागील कारण कितीही न पटो.

तूर्तास एवढेच.

(अर्थात, हे माझे मत झाले.)

अर्धवटराव's picture

6 Aug 2011 - 1:20 am | अर्धवटराव

बाकि ते "मुली असल्याचे" मुद्दे बाजुला राहु देत.
ज्या वकिली भाषेत तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याला दाद दिल्यावाचुन राहावत नाहि. भाषासौंदर्याचा असाहि नमुना.
त्यात इंग्रजी शब्द फार आलेत, पण त्याला पर्यायी मराठी शब्द वापरले असते तर मला कळलं असतं का हिच शंका :(

(मराठी प्रेमी) अर्धवटराव

धन्या's picture

6 Aug 2011 - 7:13 pm | धन्या

या लेखावरील पंगाशेठच्या प्रतिक्रिया वाचताना मला मी बाबा कदमांच्या कादंबरीतील एखाद्या वकील पात्राचे लांबलचक संवाद तर वाचत नाहीये ना असं वाटत होतं...

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2011 - 11:22 am | पिवळा डांबिस

श्री. चित्रगुप्त हे आमचे जुने स्नेही आहेत. तेंव्हा त्यांच्या धाग्याचा काश्मीर होऊ नये केवळ याकरताच आत्तापर्यंत गप्प होतो...
पण आता श्री. चित्रगुप्त यांनीच स्वतःच्या धाग्याचा काश्मीर करायचा असे ठरवेलेले दिसते..
http://www.misalpav.com/node/18714#comment-327916

मग आता आम्हाला गप्प रहायचे काही कारण नाही...
अशी मागणी अस्थानी असावी.
तीव्र असहमत!
मिपावर जो लेखक लिहितो त्याच्यावर ते त्याचे स्वतःच मत असो अथवा हियरसे असो, ते शब्द लिहिण्याची अंतिम जबाबदारी रहातेच. मला वाटत नाही की चित्रगुप्त यांच्या मित्राने त्यांच्यावर "बाबा, हे जरा शब्दशः असंच मिपावर लिही आणि काय प्रतिक्रिया येतात ते मला कळव" अशी जबरदस्ती केली असेल. आणि तसं जरी म्हंटलं असलं तरी शेवटी काय लिहायचं आणि काय नाही याचं तारतम्य स्वतः लेखकानं बाळगायलाच हवं. वरील धाग्यातील "मुलगी झाल्याने" हा शब्दप्रयोग दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेच. लेखकाला जर तसे खरोखर वाटत असेल तर तो त्यांच्या मित्राने जरी वापरला तरी लेखकाने तो टाळायला हवा होता. जर लेखकाला खरोखरी तसे वाटत नसेल तर मग लेखकाचा निषेध करण्यात काहीही गैर नाही!!!!!!!!!
त्या शब्दप्रयोगाबद्दल अधिक स्पष्टीकरण मागण्याचे कारण हेच की निव्वळ त्या दोन शब्दांखातर निषेध व्य्क्त करण्याआधी लेखकाला त्याचे जर काही स्पष्टीकरण असेल तर ते व्यक्त करण्याची संधी मिळावी. त्यात काहीही गैर आहे असे मला वाटत नाही.

ही अपेक्षा योग्य वाटते.
मला काहीही फिकीर पडलेली नाही.....
श्री पंगा यांनी उगाचच स्वतःला संपादक समजून काय योग्य आणि काय अयोग्य याचा उहापोह चालवला आहे. करू दे त्यांना बिचार्‍यांना! पण आय डोन्ट केअर!!!
श्री. पंगा यांची या धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिक्रिया द्यायची क्षमता ही अतिशय मर्यादित आहे हे त्यांच्या खालील "ऐकीव माहितीवरून' या प्रतिसादावरून स्पष्ट होतंच आहे....
उगाच एखादी प्रतिक्रिया पकडायची आणि आपण स्वतः त्या धाग्यातील मूळ चर्चेत काहीही भर न टाकता उगाच त्या प्रतिक्रियेतील एखाद्या शब्दप्रयोगाचा कीस काढत आपली विद्वत्ता दाखवण्याचा आभास व्यक्त करायचा ही शैली आम्हा मिपाकरांना काही नवीन नाही. ज्यांना त्यामुळे प्रभावित व्हायचं असे त्यांना होऊदेत बिचारे, पण मी वरती म्हटल्याप्रमाणे 'आय डोन्ट केअर!!!!'
-पंडित पिवळा डांबिस
पंडा

पंगा's picture

6 Aug 2011 - 11:52 pm | पंगा

...आपल्याबद्दल अतीव आदर आहे.

प्रशंसेबद्दल आभारी आहे. :)

बाकी चालू द्या.

पिवळा डांबिस's picture

8 Aug 2011 - 7:12 am | पिवळा डांबिस

...आपल्याबद्दल अतीव आदर आहे.

सेम हियर...
:)

अपार्टमेंटचे भाडे भरावे लागतात शिवाय घर आपलं होत नाही ते नाहीच.
वरील सविस्तर प्रतिसाद आवडला.

देशात दीर्घकाळाकरिता रहावयाचे नसेल, तर अर्थात भाड्यानेच अपार्टमेंट घेणे इष्ट आहे. तसेच वारंवार बदलीची नोकरी असल्यास बहुधा घर विकत घेणे कठीण जावे.

एक घर विकून दुसरे विकत घेणे (किंवा किमानपक्षी असलेले घर विकणे) हे (विशेषतः आजच्या इकॉनॉमीत) तितके सोपे नाही, आणि त्यात आर्थिक नुकसानाची शक्यताही आहे.

>>परतफेड करण्याची पात्रता लक्षात न घेता हावरटपणे घरं घेतली हे आहे.

कमाल आहे.
बँकांनी अशा लोकांना कर्ज कसे दिले ? अशा लोकांची पत तपासली गेली नाही का ?

परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे.

या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल.

या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही. सर्व मोठ्या कंपन्या आणी बँका सुद्धा त्यांचा वाईट गुंतवणुकीचे हेच करत असतात.

> "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे"
> मलाही हे खटकलं... याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का

मुली १५ / १६ वर्षांच्या झाल्यावर ईकडच्या रुढीनुसार वेगळ्या / बॉयफ्रेंड बरोबर (लग्न न करता) राहु लागतील या भीतीने कित्येक लोक मुली ८ - १० वर्षांच्या झाल्यावर परत येतात. मुलीचे लग्न होईपर्यंत तीची जबाबदारी पालकांची हे मनावर बिंबले असल्यामुळे असेल कदाचित.

परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे.

या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल.

हे बरं आहे राव... परिस्थिती किंवा सिस्टीममधील लुपहोल्सचा असा गैरफायदा घ्यायचा का? त्यापेक्षा आपणच आपली औकात पाहून पाय पसरले तर?

या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही.

अशी आपणच आपली समजूत घालायची का?

सर्व मोठ्या कंपन्या आणी बँका सुद्धा त्यांचा वाईट गुंतवणुकीचे हेच करत असतात.

त्या मोठया कंपन्या आणि बँकांना काय काशी घालायची ती घालू दया. आपण जेव्हा घर घेतो ती आपली वाईट गुंतवणुक असते का?

असं कुणी परदेशात घर घेण्यासाठी/घर घेतल्यावर करत असेल तर तो (अनिवासी*) भारतीय आपल्या देशाचं नाव रोशन वगैरे करतोय असे म्हणायला हरकत नाही :)

*सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे.

सदर व्यक्तीच्या भारतात राहणार्‍या पालकांकडून असे कळले की नेत्रेश यांनी लिहिल्याप्रमाणे:

"मुली १५ / १६ वर्षांच्या झाल्यावर ईकडच्या रुढीनुसार वेगळ्या / बॉयफ्रेंड बरोबर (लग्न न करता) राहु लागतील या भीतीने कित्येक लोक मुली ८ - १० वर्षांच्या झाल्यावर परत येतात...
......हेच त्यांचे कारण आहे.

त्यांचेच एक भाऊ सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले, त्यांच्या दोन मुलींची लग्ने अद्याप होऊ शकली नाहीत, (आता त्यांना तशी शक्यताही फार कमी वाटते) तिकडल्या पद्ध्तीप्रमाणे मुलींना स्वातंत्र्य दिले नसावे (सातच्या आत घरात)
(अर्थात हा भारतात राहणार्‍या त्यांच्या भावाचा अंदाज आहे)
तसेच भारतातून अमेरिकेत जाणारे उपवर तरूण भारतातच वाढलेल्या मुलींशी लग्न करणे पसंत करतात, असा त्यांचा वर- संशोधनाचे बाबतीतला अनुभव आहे.
..... घरचेच असे उदाहरण असल्याने त्यांना असे वाटणे साहजिक वाटते.

...... मुलीचे लग्न होईपर्यंत तिची जबाबदारी पालकांची .... ही भारतीय लोकांतील रूढी गैर आहे, असे मानता येत नाही.

"मुली झाल्याने" हे शब्द धाग्यातून काढून टाकण्यास मला काहीच अडचण नाही, तरी हा मुद्दा ही हल्लीची एक वस्तुस्थिती आहे, त्यावर चर्चा होणे अप्रशस्त नाही, असे वाटते.

धन्या's picture

5 Aug 2011 - 4:37 am | धन्या

चुकीच्या जागी दिलेला प्रकाटाआ.

नेत्रेश's picture

5 Aug 2011 - 4:45 am | नेत्रेश

> परिस्थिती किंवा सिस्टीममधील लुपहोल्सचा असा गैरफायदा घ्यायचा का?
अहो गैरफायदा कसला, हा उपाय फायद्यासाठी नसुन नुकसान कमी करण्यासाठी आहे. आणी करारानुसार बॅंकेला घर ताब्यात घ्यायचा अधीकार आहेच की. हप्ता देणे बंद करणे = नुकसान कमी करणे = हा निव्वळ बिझनेस डीसीजन झाला.
आता सरकारने व्याजाचा दर वाढवला तर बँक कर्जाचा हप्ता वाढवतेच ना? ईथे मुळात बँकेने जास्त व्याजाच्या लोभाने अवास्तव कर्ज देउन चुक केली आहे.

> त्यापेक्षा आपणच आपली औकात पाहून पाय पसरले तर?
कर्ज देण्या आधी औकात जोखण्याचे काम बँकेचे असते. बँकेने कर्ज दीले म्हणुन तर त्याने घ घेतले.

> असं कुणी परदेशात घर घेण्यासाठी/घर घेतल्यावर करत असेल तर तो (अनिवासी*) भारतीय आपल्या देशाचं नाव रोशन वगैरे करतोय असे म्हणायला हरकत नाही

असे करण्याचे प्रमाण अमेरीकन लोकांलध्येच जास्त आहे. भारतीय लोक परवडत नसतानाही कर्ज फेडीत बसतात - बिझनेस सेंन्स कमी आणी चुकीच्या समजुतींचा पगडा.

> *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे.

गृहीतक चुकीचे आहे. ५-६ वर्षांच्या वास्तव्यानंतर (स्टेब जॉब आणी ग्रीनकार्ड मिळाल्यावर) बहुतेक लोक घर घेतात.

धन्या's picture

5 Aug 2011 - 5:06 am | धन्या

अहो गैरफायदा कसला, हा उपाय फायद्यासाठी नसुन नुकसान कमी करण्यासाठी आहे. आणी करारानुसार बॅंकेला घर ताब्यात घ्यायचा अधीकार आहेच की. हप्ता देणे बंद करणे = नुकसान कमी करणे = हा निव्वळ बिझनेस डीसीजन झाला.

आधी न झेपणार्‍या हप्त्यांचे घर घ्यायचे नंतर बँकेचे हप्ते देणे बंद करायचे. मार्केटच्या स्थितीमुळे घर ताब्यात घेणे बँकेला परवडणारे नसते त्यामुळे मग बँक झक मारुन तडजोडीला तयार होते. आणि घराचे हप्ते कमी करते... या सगळ्याला बिझनेस डीसीजन म्हणायचं... अवघड आहे :)

कर्ज देण्या आधी औकात जोखण्याचे काम बँकेचे असते. बँकेने कर्ज दीले म्हणुन तर त्याने घ घेतले.

पुन्हा चेंडू बँकेच्याच कोर्टात :)

असे करण्याचे प्रमाण अमेरीकन लोकांलध्येच जास्त आहे. भारतीय लोक परवडत नसतानाही कर्ज फेडीत बसतात - बिझनेस सेंन्स कमी आणी चुकीच्या समजुतींचा पगडा.

अरेरे... आम्हा भारतियांना बिझनेस करण्याची अक्कल कधी येणार...

> *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे.
गृहीतक चुकीचे आहे. ५-६ वर्षांच्या वास्तव्यानंतर (स्टेब जॉब आणी ग्रीनकार्ड मिळाल्यावर) बहुतेक लोक घर घेतात.

माहितीसाठी धन्यवाद... तुम्ही दिलेली माहिती पडताळण्याचा प्रयत्न करेन. :)

नेत्रेश's picture

5 Aug 2011 - 5:32 am | नेत्रेश

१. ज्या घराची खरी किंमत साधारण २ लाख डॉलर आहे, ते घ्यायला बँक ४ लाख कर्ज देते
२. बँक ज्याला कर्ज देते त्याचे उत्पन्न आणी क्रॅडीटवर जास्त विचार न करता कर्ज देते
यामध्ये बँकेचे काय चुकले?
- घराच्या खर्‍या किंमतीपेक्षा जास्त कर्ज देउन बँक रीस्क घेत असते. भविश्यात घरांच्या किंमती वाढल्या तर बँकेला फायदाच होणार असतो.

- आपल्या कर्जाचे रक्षण करण्यासाठी भारतातील बँका कर्ज्दाराला २०% रक्कम स्वत: उभी करायला सांगतात. अमेरीकेतील बँक सुद्धा हे सांगु शकली असती. पण कदाचित ग्राहक दुसर्‍या बॅंकेकडे जाईल आणी आपले कमीशन बुडेल या भीतीने फेडायची औकात नसलेल्यांनाही शुन्य डाउनपेमेंट्वर कर्ज दीले.

-म्हणजे बँकेसाठी कर्ज देणे हे एक बिझनेस डील असते. मग ते कर्ज घेणार्‍यासाठी सुद्धा बिझनेस डीलच असते. आणी ज्या बिझनेस मधुन फायदा होणार नाही तो का चालु ठेवावा? कट-द्-लॉस.

-शीवाय बँकेने अवास्तव कर्ज देउन त्या घराचा आणी पर्यायाने त्या भागातील ईतर घरांचा दर वाढवुन ठेवलेला आहे.

या सगळ्यात कर्ज घेणार्‍या कर्ज पेक्षा देणारा जास्त बेजबाबदार आणी दोषी असतो. मग होणारे नुकसान दोघांनी भरायला नको का? बँकेला आर्थीक नुकसान होईल. कर्ज बुडवणार्‍याचे क्रेडीट ७ वर्षांसाठी खराब होईल. शीवाय त्याचेही आर्थीक नुकसान होणार आहेच.

या सगळ्यात, अनैतीक, बेकायदेशीर, न पटण्यासारखे काय आहे?

धन्या's picture

5 Aug 2011 - 10:42 am | धन्या

या सगळ्यात, अनैतीक, बेकायदेशीर, न पटण्यासारखे काय आहे?

तुमच्या या प्रतिसादातून काहीसं मत व्यक्त होतं की बँक जर "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा बघते. तर मग आपणही "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा का करुन घेऊ नये... भले मग त्यासाठी आपली पत (क्रेडीट) पणाला लागलं तरी हरकत नाही.

असो. हा ज्याच्या त्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे.

मात्र तुमच्या प्रतिसादांच्या रुपाने खुपच रोचक माहिती पुढे आली जी अमेरिकेच्या रीयल ईस्टेट मार्केटमधलं वास्तव असू शकते. :)

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 4:37 am | पिवळा डांबिस

परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे.
या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल. या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही.
यात मला दोन धोके दिसतात...
१. बॅन्क घर ताब्यात घेईल किंवा कर्ज रि-निगोशियेट करेल पण या सर्व व्यवहारात त्या माणसाच्या पर्सनल क्रेडिट रेटिंगची वाट लागेल. आणि मग पुन्हा जेंव्हा काही बेसिक गरजांसाठी आवश्यकता असेल (सध्याची गाडी मोडल्यावर दुसरी गाडी घेतेवेळी, नवीन अपार्टमेंट रेन्ट करतांना, नवीन जॉब घेतेवळी) तेंव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
२. जर बॅन्केचा हप्ता न भरता फक्त भाडं घेत राहिलं आणि जर बॅन्केने घर ताब्यात घेण्यासाठी त्या भाडेकरूवर एव्हिक्शन नोटिस लावली तर तो भाडेकरू लीज पूर्ण व्हायच्या आत घर सोडावं लागलं म्हणून मालकाला कोर्टात खेचू शकतो. मग त्या अडचणीला तोंड द्यावे लागेल.
तेंव्हा हे धाडसी उपाय करण्याअगोदर वकिलाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं...

धन्या's picture

5 Aug 2011 - 4:42 am | धन्या

तेंव्हा हे धाडसी उपाय करण्याअगोदर वकिलाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं...

नेत्रेशरावांनी आपल्या प्रतिसादात जे काही सुचवलं आहे ते तुम्हाला धाडसी वाटतं? म्हणजे प्रतिसादात जे काही म्हटलंय ते आपली जोखिम घ्यायची तयारी असेल तर करायला हरकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 4:46 am | पिवळा डांबिस

आपली जोखिम घ्यायची तयारी असेल तर करायला हरकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?
मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही. पण जर कुणाला करावंसं वाटलं तर मी काय करणार? किमान वकिलाचा सल्ला तरी घ्या हे सुचवलं...

धन्या's picture

5 Aug 2011 - 4:52 am | धन्या

मला तुमच्या प्रतिसादाचा जो अर्थ लागला त्याने मी बुचकळयात पडलो होतो... पिडाकाकांसारखी व्यक्ती अशा मताला कशी काय दुजोरा देऊ शकते...

मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही.

हे आपल्याला आवडलं :)

नेत्रेश's picture

5 Aug 2011 - 5:02 am | नेत्रेश

> मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही हे ठीक आहे हो.

पण ज्याचा लॉस होतोय, कमावलेले सगळे पैसे बॅड अ‍ॅसेट सांभाळण्यात जात असतील तर मग दुसरा काय ईलाज?
परत यात काही बेकायदेशीर नाही. बँक री निगोशीयेट करायचे चान्सेस आहेत.
शीवाय कर्जदार थकबाकीदार झाल्यावर काय करायचे ते करारार लीहीलेले असतेच.

> वकिलाचा सल्ला तरी घ्या हे सुचवलं

हो, वकील सर्व अ‍ॅनॅलाईझ करुन हा उपाय कमीत कमी धोका पत्करुन कसा करावा ते सांगेल.

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:50 am | पंगा

आजच्या मार्केटच्या परिस्थितीत अनेकदा बँकांनाही अशी शेकड्याने घरे ताब्यात घेऊन ती नंतर विकत बसणे फायद्याचे नसते, म्हणून बँकच अनेकदा अशा काही तडजोडीवर येण्याची शक्यता असते, असे ऐकलेले आहे. (प्रत्यक्ष अनुभव नाही.)

धन्या's picture

5 Aug 2011 - 4:57 am | धन्या

आजच्या मार्केटच्या परिस्थितीत अनेकदा बँकांनाही अशी शेकड्याने घरे ताब्यात घेऊन ती नंतर विकत बसणे फायद्याचे नसते, म्हणून बँकच अनेकदा अशा काही तडजोडीवर येण्याची शक्यता असते, असे ऐकलेले आहे.

मार्केटच्या परिस्थितीमुळे बँक अशी काही तडजोड करायला तयार होते म्हणून आपण त्याचा फायदा उचलायचा, हे मनाला पटत नाही.

पंगाराव, हे चर्चेच्या ओघात मांडलेलं मत आहे. तुमच्या प्रतिसादाला हा उपप्रतिसाद नाही.

नेत्रेश's picture

5 Aug 2011 - 5:07 am | नेत्रेश

भाडेकरु मालकाला कोर्टात खेचायची शक्यता नाही, कारणः
१. मालक लोन वर डिफॉल्ट झाला आणी बँक फोरक्लोज करणार हे समजल्या बरोबर भाडेकरु भाडे देणे बंद करतो.
२. रहात असलेल्या भाडेकरुला लीज पुरे व्हायच्या आधी बाहेर काढणे फार कठीण असते. बहुतेक बँका भाडेकरुला घर खाली करायला पैदे देतात (कॅश फॉर कीज).
३. या सगळ्यात भाडेकरुला ३ ते ६ महीने बीन भाड्याचे रहायला मिळते, शीवाय घर खाली करायला पैसे मि़ळतात ते वेगळे.

अमेरीकेत लाखो घरमालकांनी हेच केले आहे (म्हणुनच सब्-प्राईमचा घोळ झाला आहे).
नवीन गाडी, अपार्ट्मेंट लीज हे सगळे क्रेडीट खराब व्हायच्या आधी करावे.

----------

पण बहुतेक बँक लोन कमी करेल आणी घर सोडुन देण्याची वेळच येणार नाही.

धन्या's picture

5 Aug 2011 - 5:17 am | धन्या

सदसद बुद्धी का काय म्हणतात ती थोडा वेळ बाजूला तुमचे सगळे प्रतिसाद पुन्हा वाचून काढले... राव पॉईंट आहे तुमच्या बोलण्यात...

तुम्ही दिलेली अमुल्य माहिती वापरुन मलाही आता सॅन फ्रान्सिस्कोच्या डाऊन टाऊन मध्ये घर घ्यावंसं वाटू लागलं आहे :)

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 5:21 am | पिवळा डांबिस

मलाही आता सॅन फ्रान्सिस्कोच्या डाऊन टाऊन मध्ये घर घ्यावंसं वाटू लागलं आहे
अभिनंदन!!!
हाऊस वार्मिंग पार्टीला कधी येऊ?
:)

धन्या's picture

5 Aug 2011 - 5:27 am | धन्या

हाऊस वार्मिंग पार्टीला कधी येऊ?

लवकरच निमंत्रण देईन काका.
आता जरा नेत्रेश रावांच्या युक्त्या वापरून सहजासहजी गंडवता येईल अशी बँक कुठली आहे ते आधी शोधून काढतो :)

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 5:34 am | पिवळा डांबिस

आता जरा .... युक्त्या वापरून सहजासहजी गंडवता येईल अशी बँक कुठली आहे ते आधी शोधून काढतो
म्हणुनच मी मघाशी म्हंटलं होतं की वकिलाचा सल्ला घ्या...
तर तुम्हाला ते काहीतरीच वाटलं!!!!
;)

नेत्रेश's picture

5 Aug 2011 - 5:37 am | नेत्रेश

सदसद बुद्धी ... हाच शब्द शोधत होतो.

बरोबर शब्द वापरलात तुम्ही.
ही चुकीच्या ठीकाणी वापरलेली सदसद बुद्धीच आपल्याला (मराठी माणसाला) धंद्या, उद्योगात मागे ठेबते :)

- आणी खरोखर घर घेणार असाल तर अजुनही अमुल्य माहीती पुरवेन ... :)

नितिन थत्ते's picture

5 Aug 2011 - 1:34 pm | नितिन थत्ते

>>ही चुकीच्या ठीकाणी वापरलेली सदसद बुद्धीच आपल्याला (मराठी माणसाला) धंद्या, उद्योगात मागे ठेबते

नेत्रेश या आयडीधारी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करायचा नाही अशी खूणगाठ बांधली आहे. ;)

५० फक्त's picture

5 Aug 2011 - 8:13 am | ५० फक्त

कांग्रेसवाले का ओ तुम्ही, सदसदविवेकबुद्धी म्हणतात त्याला, विवेक बरोबर विसरलात तुम्ही.

कांग्रेसवाले का ओ तुम्ही, सदसदविवेकबुद्धी म्हणतात त्याला, विवेक बरोबर विसरलात तुम्ही.

नाय वो. आम्ही कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही. सगळे लेकाचे सारखेच. एकाच माळेचे मणी. प्रत्येकाला आपली बँक खाती कशी भरतील याची पडलेली असते. जनसेवा वगैरे उगाचच आपली तोंडी लावायला वगैरे असते.

आमचा पक्ष, उपवर मुलींवर ल़क्ष :P

तो प्रतिसाद लिहिला तेव्हा सदसदविवेकबुद्धी हा शब्द नेमका आठवत नव्हता. मग जसा आठवला तसा टंकला. शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

बुकमार्क करते आहे हा धागा. कधीतरी उपयोगी पडेल.

कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर घ्यायला, बँका बुडवायला का धाग्याचा खफ करायला,

मला तर काय वाटतं परदेशात घर घेणं हे प्रत्येकाच्या शुन्यलब्धी परांचन गतिवर अवलंबुन असावं कारण एकदा परांचन गति कमी होउ लागली की आसाभोवती फिरण्याचा वेग कर्जदार आणि बँक आणि भाडेकरु यांच्या एकमेकांपासुन असणा-या अंतरावर व त्यांच्या परस्पर व्यास व त्यांच्या विक्षिप्त विचलन गतीच्या डिफर्नशियल इक्वेशन च्या महत्त्म भाजकावर अवलंबुन असतो.

आणि कर्ज घेणारा ते कर्ज फेडेल का नाही ते बँकेनं त्याचा आणि आपला ऑरा एकमेकांना छेदतो का टँजेशिअल जातो हे चेक करुन ठरवावं,

वर धनंजयने दिलेली आयडिया ध्रुविय प्रदेशात घर घेण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेकडुन कर्ज घेण्यासाठी वापरता येईल, तेवढाच अजुन एक अक्ष आणि त्याचं ध्रुविय अंतर व ध्रुविय प्रदेशातल्या घरातला गोठलेला भाडेकरु व गोठवेलेले कर्ज खाते, सगळं एकदम जुळुन येईल.

धनाजीराव, जायचं का रविवारी धुवावार, साइड बिजनेस करायला..

कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर घ्यायला, बँका बुडवायला का धाग्याचा खफ करायला

बेक्कार हसतोय राव तुमचा हा प्रश्न ऐकून.

एखादा गुन्हा होतो आणि मग वृत्तपत्रांमध्ये येते की हा गुन्हा करताना गुन्हेगारांनी अमुक अमुक चित्रपटात दाखवलेली मोडस ऑपरेंडी वापरली आहे.

य धाग्यावर सुद्धा परदेशात घर घेऊन, घराचे हप्ते थकवून बँकेला कसं गंडवायचं याचं मुद्देसुद वर्णन प्रतिसादांच्या रुपात आलंय. न जाणो कुणी हे सारं वाचून प्रेरणा घेतली तर :)

उदय's picture

5 Aug 2011 - 9:54 am | उदय

घर घेण्याचे फायदे-तोटे याबद्दल. अपार्टमेंट मध्ये भाडे भरत राहण्यापेक्षा स्वत:चे घर घेऊन तितक्याच पैशात कर्जाचा हप्ता भरता येईल आणि काही वर्षानंतर स्वत:च्या मालकीचे घर होईल या हेतूने घर विकत घेतले जाते. घर घेण्यापूर्वी काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. मुख्य म्हणजे तुम्ही किती वर्षे त्या घरात रहाणार, तुमच्या घराची किंमत तुमच्या उत्पन्नाच्या कितीपट आहे, घराच्या हप्त्याव्यतिरिक्त खर्च काय आहेत आणी किती आहेत (property tax, home insurance, maintenance etc) याचा विचार करणे पण आवश्यक आहे. माझे Thumb rule म्हणजे किमान ५ वर्षे त्याच घरात राहिले पाहिजे, वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट किंवा कमी घराची किंमत हवी, घराच्या किमतीच्या १% किंवा कमी किमतीत भाड्याने घर मिळत असेल तर घर विकत घेऊ नये. (या Thumb rule बद्दल स्पष्टीकरण हवे असेल तर मी सांगू शकेन, पण मूळ प्रश्न तो नाहीये, म्हणून आत्ताच काही लिहित नाही. मी हा विचार फक्त अमेरिकेतच नाही, तर भारतात पण करीन. जर ५० लाखाचे घर २५,००० रुपये महिना भाडयाने मिळत असेल तर मग विकत कशाला घ्या? )

घर घेण्याचे फायदे जसे जसे कर्ज कमी होत जाईल तसे तसे हळूहळू घराची मालकी आपल्याला मिळते. काही वर्षानी कर्जमुक्त स्वत:च्या घरात राहता येते. (अपार्टमेंट मध्ये भाडे वाढत जाते आणी मालकी मिळत नाही). अजून एक फायदा म्हणजे अपार्टमेंट पेक्षा मोठ्या जागेत स्वत:ला हवे तसे राहता येते. (घराला आतून भडक लाल किंवा निळा रंग देता येतो.) बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या इथे लिहित नाही जसे सामाजिक स्थेर्य, बागकाम करता येणे इ.

अमेरिकेत घर घेण्याचा आणी ग्रीनकार्डचा काही संबंध नाही. मी स्वत: ग्रीनकार्ड होण्यापूर्वी घर घेतले आहे. २०% down payment हे सुद्धा खरे नाही. मी ५% देऊन घर घेतले. सध्याच्या Fannie Mae guidelines प्रमाणे २०% down payment लागते, पण जर क्रेडीट रेटिंग उत्तम असेल तर त्यालाही मार्ग आहे. पण महत्वाचे म्हणजे घर बाळगणे परवडणार आहे का ते बघणे महत्वाचे आहे.

>> परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे.
वरील विधान जरा धाडसी आहे, असे म्हणेन मी. बँक धंदा करायला बसली आहे. मालकाने कर्जाचा हप्ता भरला नाही, तर बँक अर्धे लोन माफ करणार नाही. Bank would rather foreclose a house and then sell it in the market for pennies for a dollar, in the process they will ruin the credit rating of the borrower. (In reality, bank probably would have sold the loan to Fannie Mae, Freddie Mac and they will do the foreclosure.)

माझ्या मते तर सध्या real estate investment करायची सुवर्ण संधी आहे. फक्त तुम्ही कुठे घर विकत घेता आणी तुम्हाला घराच्या किमतीच्या १% इतके भाडे दर महिन्याला मिळते की नाही ते बघणे महत्वाचे.

धन्या's picture

5 Aug 2011 - 10:30 am | धन्या

चित्रगुप्तांना धागा काढताना ज्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या प्रतिसादात मिळतात.

प्रियाली's picture

5 Aug 2011 - 5:14 pm | प्रियाली

वरच्या प्रतिसादाशी +१.

सामान्य मराठी माणसाची सतत धडपड आपल्या मालकीचं एक घर असावं अशी असते. ही त्याची मानसिकता आहे. घर घेताना आपले उत्पन्न, घराचे दृश्य खर्च आणि अदृश्य खर्च (अदृश्य म्हणजे हिडन या अर्थी - जे पटकन ध्यानात येत नाहीत. जसे, फर्नीचर, लॉन मोवर, स्नो ब्लोअर, स्प्रिंकलर्स, सिक्युरिटी सिस्टम इ.इ.) नक्कीच लक्षात घ्यावेत. त्यामुळे लोकांनी हावरटपणे घरे घेतली, आपली लायकी नसताना घरे घेतली वगैरे गोष्टी दुय्यम आहेत. घर घेताना कदाचित परिस्थिती चांगली होती पण नंतर मंदीच्या काळात ती पालटली अशी अनेक उदाहरणे दिसतात. मला वाटते कुटुंब म्हणून आयुष्यातील चढ-उतारांना तोंड द्यायला हवे. पैसा येतो आणि जातो. जी वर्षे त्यांनी मोकळेपणी त्या घरात काढली त्याला ही क्रेडिट देता येईल.

घराच्या किंमती उतरल्या आहेत, कदाचित नुकसान सोसून तुमच्या मित्राला परत यावे लागेल हे सर्व खरे असले तरी सद्य बँक बॅलन्स काय आहे याचाही विचार करावा. भर तारुण्यात अपघातात किंवा कॅन्सर वगैरे सारख्या रोगांना बळी पडल्याने नोकरी गेली आणि खर्चही भरमसाठ झाला वगैरे सारखी उदाहरणे दिसतात. त्यापेक्षा अगदी नाहीच गेले घर तर जेवढे हातात मिळेल, परत येईल त्यावर सुख मानून त्यांनी परत यावे.

शेवटी माणूस धडधाकट असेल तर पैसे मिळवायचे आणि घालवायचे अनेक उपाय शोधता येतात.

धन्या's picture

6 Aug 2011 - 7:18 pm | धन्या

मुळच्या माहितीपुर्ण प्रतिसादाला व्यवहार आणि भावनिक गुंतागुंत (अ‍ॅटॅचमेंट) यांचा समतोल साधत दिलेला उपप्रतिसाद !!!

हुच्चानी हुच्चांसाठी काढलेला हुच्च धागा

--डोम्बीव्लीतही घर न परवडणारा ( निच्चभृकथेतील स्पाकुमार)

मी ऋचा's picture

5 Aug 2011 - 12:22 pm | मी ऋचा

:)

धाग्यातलं परत जाण्याविषयीचं वाक्य वाचून माझ्या सर्व परदेशस्थ मित्रांची आठवण झाली.

आपण कधीतरी परत जाणार आहोत किंवा (काही वर्षांनी) परत भारतात जायचं यासाठी एक कारण सतत जागृत ठेवावं लागतं.
प्रत्यक्ष परत भारतात कधी न येता... पण मनाच्या समजुती (?) साठी "पुढे कधीतरी" आपण नक्की परत जाऊ यासाठी सॉलिड कारण सतत मनात गणितातल्या "हातच्या"सारखे धरुन ठेवून.

ते लोक खरंच सुखी की जे मोकळेपणाने स्वतःशी मान्य करतात की आपण इथेच रहायचे. आणि घरबीर घेण्याच्या योजना करुन यथावकाश घेऊन सेटल होऊनही टाकतात.

नपेक्षा मग, ........ पोरांचा विचार, आईबाबांचा विचार, आपल्या संस्कृतीचा विचार, इथे परदेशात शिल्लक टाकलीच पाहिजे तरच भारतात जाऊन बस्तान बसवता येईल तस्मात सध्या कष्ट करुन कमवू आणि नंतर काही वर्षांनी परत जाऊ..

अशा असंख्य एक्स+१ "प्लॅनिंग्ज" पेक्षा सरळसरळ तिथेच डिक्लेअर करुन सेटल होणं चांगलं आणि स्पष्ट आहे.

अर्थात ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्या आसपासचे. काही जणांनी असे लोक खरंच परत आल्याचं म्हटलं आहे. परत येण्यामागचं कारण "तिथून जावं लागलं" असं नसून खरंच परत येण्याच्या ओढीने आले असतील तर मग मात्र मान्य करायलाच लागेल की असेही लोक असतात.

धन्या's picture

5 Aug 2011 - 11:15 am | धन्या

अर्थात ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्या आसपासचे. काही जणांनी असे लोक खरंच परत आल्याचं म्हटलं आहे. परत येण्यामागचं कारण "तिथून जावं लागलं" असं नसून खरंच परत येण्याच्या ओढीने आले असतील तर मग मात्र मान्य करायलाच लागेल की असेही लोक असतात.

अगदी अगदी.

हा हुच्च प्रतिसाद अतिशय आवडला.

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 12:30 pm | नगरीनिरंजन

बिझिनेस सेन्स, भाड्याचे प्रमाण, कमाई वगैरे गोष्टी वाचून ड्वाळे पाणावले. मला वाटलं प्रश्न परदेशात घर घेण्यासंबंधी आहे, पण प्रत्यक्षात प्रश्न मात्र परदेशात प्रॉपर्टी घेण्यासंबंधी आहे असं दिसतंय.

नितिन थत्ते's picture

5 Aug 2011 - 1:15 pm | नितिन थत्ते

बॅंकेचे कर्ज-हप्ते थकवणे- बँकेची अडचण- कर्ज रिनिगोशिएशन विषयावरची सुशिक्षित मराठी लोकांची (कदाचित इतर ठकांप्रमाणेच) अशी विचारसरणी बनली आहे/बनू लागली आहे हे पाहून मनापासून वाईट वाटले. :(

स्वत: चुकीचा निर्णय घेतला याची जवाबदारी स्वत: घ्यायला नको? ती बॆंकेची अडचण जाणून बॆंकेवर लोटायची हे पटले नाही.

का?
सुशिक्षित मराठी माणुस मराठी माणसाला ठकवु शकत नाही असा काही नियम आहे का चाचा ? ;-)

आनंदयात्री's picture

6 Aug 2011 - 1:28 am | आनंदयात्री

माझ्या मते काकांचा मुळ विरोध ब्यांकांना बुडवण्याला आहे, त्याला तसे ठोस कारणही आहे. जे मला पटतेही आहे. त्याचे कारण म्हणजे बर्‍याच ब्यांका कस्टम सिस्टीम्स वरुन ईआरपीवर शिफ्ट होणार अशी काकांना खबर लागलेलीआहे ;)

पंगा's picture

6 Aug 2011 - 1:31 am | पंगा

...म्हणजे मराठी माणसाने मराठी माणसाला न बुडवण्याचा प्रकार आहे तर.

नितिन थत्ते's picture

6 Aug 2011 - 11:19 am | नितिन थत्ते

ब्यांका ईआरपी वर शिफ्ट होणार किंवा कसे याचे महत्त्व माझ्यापेक्षा बिकांना जास्त असावी. ;)

माझी नाराजी जेन्युइन म्हणजे सुशिक्षित मराठी* लोक असा विचार करतात हे पाहून होती. मी Naive होतो असे म्हणण्याची सर्वांना मोकळीक आहेच. :)

*सुशिक्षित मराठी लोक सज्जन/पापभीरू असतात असा माझा समज होता. तो नाहीसा झाला. माझा एवढातरी फायदा या धाग्यामुळे नक्कीच झाला.

सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्ये गल्लत होते आहे का चाचा?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2011 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

अनिवासी वा अनिवासी हितचिंतकांनी अनिवासी सदस्यांसाठी काढलेला धागा !

अनिवासी भारतियांच्या अनिवासी समस्यांवर निवासी सदस्यांनी मतप्रदर्श करावे काय ?

किंवा "मंद *काही अनिवासी हे सॅमकाका माफ कर...' अशी कविता करावी काय ?

जुने स्कोर सेटल करण्याची इच्छा असणारे 'काही' च्या जागी 'सारे' असा शब्द वापरु शकतात.

अनिवासी भारतियांच्या अनिवासी समस्यांवर निवासी सदस्यांनी मतप्रदर्श करावे काय ?

आम्ही तर निवासी सदस्य असूनही भरभरुन प्रतिसाद दिलेत धाग्यावर.
अर्थात कधी काळी आम्हीही अनिवासी भारतीय होतो हा भाग वेगळा ;)

"मंद *काही अनिवासी हे सॅमकाका माफ कर...' अशी कविता करावी काय ?

कवितेच्या प्रतिक्षेत ;-)

चित्रगुप्त's picture

5 Aug 2011 - 4:33 pm | चित्रगुप्त

अरे काय हे अनिवासी अनिवासी...
हा घ्या आगामी हुच्च धागा:

निवासी भारतीयांनी निवासाची समस्या सोडवण्यासाठी स्वदेशात निवास न करणार्‍या मुलांकडून पैसे मागवून निवास स्थान खरेदी करण्यातील संभाव्य अडचणी, धोके, फायदे व तोटे.....

पंगा's picture

5 Aug 2011 - 4:58 pm | पंगा

.

विसुनाना's picture

5 Aug 2011 - 5:41 pm | विसुनाना

मी तरी बुवा एक स्वतंत्र बेटच विकत घेण्याचा विचार करत आहे. माझा हा चॉईस कसा वाटतो? :)

प्रियाली's picture

5 Aug 2011 - 5:43 pm | प्रियाली

घ्या घ्या बेट घ्या. त्यावर एक घर बांधा, डेक बांधा, टेनिस कोर्ट, स्विमिंगपूल, जकुझी वगैरे सर्व सुखसोयी उपलब्ध करून घ्या आणि आम्हाला बोलवा - कट्टा करायला. ;)

विसुनाना's picture

5 Aug 2011 - 5:46 pm | विसुनाना

जरूर. तुमचं प्रायव्हेट जेट उतरण्यासाठी एक विमानतळही बांधतो. तेवढं जरा फायनान्सचं बघता का? ;)

प्रियाली's picture

5 Aug 2011 - 5:51 pm | प्रियाली

अहो बँका आहेत ना! त्यांना ठकवायचे उपायही वर दिले आहेत. आम्ही गरीब माणसं कुठे पुरे पडणार?

बाकी, विमानतळाची ऐडिया मस्तच आहे. अंमलात आणाच. :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2011 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

आणि आम्हाला बोलवा - कट्टा करायला.

म्हणजे 'झपाटलेले बेट' तयार होईल तिथे ;)

प्रियाली's picture

5 Aug 2011 - 5:52 pm | प्रियाली

विसुनानांना बेटाचे नावच झोम्बीलँड ठेवायला सांगूया.

विसुनाना's picture

5 Aug 2011 - 6:04 pm | विसुनाना

एकाच नावाची दोन बेटं जगात चालणार नाहीत असं वाटतंय.
आठवणीप्रमाणं तुमच्या बेटाचं नावही झॉम्बीलँडच आहे ना? की बदललं आता?;)

विजुभाऊ's picture

7 Aug 2011 - 10:51 am | विजुभाऊ

एकाच नावाची दोन बेटं जगात चालणार नाहीत असं वाटतंय.महाराष्ट्रात बावीस वडगावे आहेत असे कुठेतरी वाचले होते.
एका नावाची दोन बेटे असतील तर त्याला खुर्द आणि बुद्रुक अशी कंसात नावे द्याना.

महाराष्ट्रात बावीस वडगावे आहेत असे कुठेतरी वाचले होते.
एका नावाची दोन बेटे असतील तर त्याला खुर्द आणि बुद्रुक अशी कंसात नावे द्याना.

आमचेही वडगांव यात आले.

आमचा गावाकडचा पत्ता: मु. वडगांव कोंड पो. गोरेगांव (वडगांव हे गाव आमच्या गावापासून फक्त दोन किमी वर आहे). त्यामुळे दुसर्‍या बेटाच्या नावापुढे कोंड असा शब्दही लावता येईल.

आणि आमचे दुसरे वडगांवः आम्ही ज्या सिंहगड रोडवर राहतो, तिथेही दोन किमीवर एक वडगांव आहे.

त्यामुळे बावीसातले तीन वडगांव तर आमचेच गांव आहेत :)

विसुनाना's picture

9 Aug 2011 - 10:32 am | विसुनाना

तसे असेल तर आमचे झाँम्बीलँड(खु||). बुद्रुक म्हणवण्याची आमची पात्रता नाही.

जागा घेउन घ्रर बान्घायचे अस्यास येथे :)

जागा घेउन घ्रर बान्घायचे अस्यास येथे :)

गजा गाजरे's picture

6 Aug 2011 - 1:08 am | गजा गाजरे

डोक्याची पार मन्डई करुन टाकली ......
त्याला साण्गा आपल्या मन्डईतच घर घॅ की.......

अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........

धन्या's picture

6 Aug 2011 - 6:03 pm | धन्या

अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........

मालक, तुमचा हा सव्वा तीन ओळींचा ("आइला" ही पाव ओळ + पुढच्या तीन ओळी) प्रतिसाद पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. शब्दांवर जाऊ नका, भावना समजून घ्या असं स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू राहवलं नाही म्हणून पुढच्या ओळी टंकतोय.

या सव्वा तीन ओळीत मराठीच्या शुद्धलेखनाची पार वाट लावून टाकली आहे तुम्ही. मराठीतच बोला असा अट्टाहास करणार्‍याने निदान स्वतः शुद्ध मराठी लिहावं असं अपेक्षित आहे. नाही तर मग ते "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" असे होईल.

बघा पटतंय का? :)

नेत्रेश's picture

6 Aug 2011 - 4:05 am | नेत्रेश

मी वर दिलेला सल्ला आणी त्या अनुशंगाने मांडलेलेली मते वाचुन बर्‍याच जणांचा गैरसमज झाला आहे. बहुतेकांची व्यवहार आणी तत्वे यांची गल्लत झाल्यामुळे मी मांडलेली मते चुकीची वाटत असावीत.

१. बँक ही बिझनेस करण्यासाठीच बसली आहे. बिझनेस करण्याचा मुख्य उद्येश नफा कमावणे हा असतो. कर्ज देणे हा बॅकेचा नफा कमावण्याचा मार्ग आहे. कोणताही बिझनेस करताना त्यातील रीस्क अ‍ॅनॅलाईझ करणे आणी त्या नुसार निर्णय घेणे हे बिझनेस करणार्‍याचे काम आहे, ग्राहकांचे नव्हे.

२. जेव्हा आपण बँकेकडुन कर्ज घेतो तेव्हा ते बुडविण्यासाठी नक्कीच घेत नाही. आपला फायदा होणार असेल तरच आपण कर्ज घेतो. घर घेण्यासाठी कर्ज घेतले म्हणजे आपल्याला रहायला आपल्या मालकीचे घर मीळाले हा आपला फायदा झाला. आपण ब्यँकेला व्याज दीले हा बँकेचा फायदा झाला.

बँकेने कर्ज देउन व आपण व्याज देउन कुणावर उपकार केलेले नसतात. कर्ज देणे आणी घेणे हा दोन्ही पक्षांसाठी निव्वळ व्यवहार झाला. यशस्वी होण्यासाठी व्यवहारात आपला फायदा बघणे हे दोन्ही पक्षांचे काम आहे. आपला फायदा होण्यासाठी आपली गुंतवणुक सुरक्षीत ठीकाणी करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे.

आपली गुंतवणुक जपण्यासाठी कर्जदाराची परत फेडीची ऐपत आणी ईच्छा जोखणे हे बँकेच कर्तव्य आहे. त्यासाठी भारतात क्रेडीट रेटींग सिस्टीम नसतानाही भारतातल्या बँका अमेरीकेतील बँकांपेक्षा जास्त काळजीपुर्वक घरकर्ज वाटप करत आहेत.

३. आपण जेव्हा बँकेकडुन कर्ज घेतो तेव्हा बँकेशी केलेल्या करारात काही कारणांमुळे कर्ज फेडता आले नाही तर काय करायचे हे लिहीलेले असते. बहुतेक वेळा आपण घेतेलेले घरच तारण म्हणुन असते. म्हणजे बँके मान्य केलेले असते की थकबाकी वसुल करण्यासाठी बँक ते घ्रर कर्जाच्या उर्वरीत रक्कमेच्या बदल्यात (वीकत) घेणार आहे. म्हणजे बँकेने हे मान्य केलेले असते की त्यांनी कर्ज म्हणुन दीलेली रक्कम घराचा किंमतीपेक्षा कमी आहे आणी घए ताब्यात घेउन बँक आपली रक्कम वसुल करु शकते.

जर घरांच्या किंमती पडल्या आणी बाजुचे घर अर्ध्या किंमतीत / अर्ध्या हप्तामध्ये मिळु लागले तर आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरते. जेव्हा शेअर बासारात कींमती पडु लागतात तेव्हा जास्त नुकसान टाळण्यासाठी लोक शेअर्स विकतात. ईथे तुम्ही बँकेला केलेल्या करारा नुसार घर परत देत अहात. यात कसली फसवा-फसवी नाही. सर्व काही करारा नुसार, कायदेशीर पणे केले जाते.

३. या व्यवहाराकडे असेही पहाता येईल -
- घर बँकेने बिल्डर / मालकाकडुन पुर्ण पैसे देउन विकत घेतले आणी तुम्हाला जास्त किंमतीला (व्याज घेउन) हप्तामध्ये विकले.
- तुम्ही सर्व हप्ते भरल्यावर घर तुमचे होणात, तोपर्यंत बँकेची मालकी रहाणार.
- काही हप्ते भरल्यावर तुम्हाला असे लक्षात आले की आता तसेच घर अर्ध्या कींमतीला मिळत आहे. मग जास्त दराचे घर घेण्यापेक्षा तुम्ही बँकेला सांगता आधीचे हप्ते ठेउन घे, मला तुझ्याकडुन घर विकत घ्यायचे नाही.
- अगदी याच प्रमाणे आपण मोबाईल फोन, केबल वाला, भाजीवाला यांनी दर वाढवले तर दुसरीकडची सर्वीस घेतो, तसेच दुसरीकडुन चांगल्या दरात दुसरे घर घेतले तर काय बिघडले?

-----------------------------------------------------------------------------------------------

आता अर्धे कर्ज माफ करुन घेण्याविशयी-

१. सध्या अमेरीकेत बृयाच ठीकाणी अशी परीस्थीती आहे की जर तुम्ही हप्ता देणे बंद केले आणी बँकेने घर (फोरल्कोज करुन) परत घेतले तरी ते बँकेकडुन पडलेल्या दरातही घ्यायला ग्राहक नाहीत.
२. बँकेने ताब्यात घेतलेल्या घरावरचा प्रोपर्टी टॅक्स आणी मेंतेनन्स बँकेला भरावा लागतो. ही रक्कम खुप असते. बर्‍याच ठीकाणी बँक अशी घरे फुकट द्यायलाही तयार असते पण घ्यायला कुणी तयार नसते.
३. बँक ऑफ अमेरीकाने अशी हजारो घरे पाडुन सपाट जमीन डोनेट केली आहे. सपाट जमीनीवर घरापेक्षा खुप कमी टॅक्स लागतो. घर असलेली जमीन डोनेशन म्हणुन फुकटही घेतली जात नाही. बँक स्वतःचे पैसे टाकुन जमीन सपाट करुन मग डोनेट करते.

दक्षीण कॅलिफोर्नियातला नविन घर पाडतानाचा व्हिडीओ: http://www.youtube.com/watch?v=4Ilayp2ykts

४. या सगळ्या व्यापापेक्षा बहुतेक वेळा ज्याने आधी घर घेतले आहे त्याचे अर्धे कर्ज माफ करुन त्याला त्याच घरात ठेवणे हे बँकेला परवडणारे असते.
५. या सर्व प्रकाराला संपुर्ण्पणे बँकाच जबाबदार आहेत. अनिर्बंध कर्ज वाटप, त्यामुळे अवास्तव प्रमाणात वाढलेल्या घरांच्या किंमती. अयोग्य व्यक्तींना केलेले (कमीशनच्या हव्यासापोटी) केलेले कर्ज वाटप. व्यक्तीगत लाभापोटी वस्तुस्थीती ग्राहकांपासुन लपवुन, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना सुरवातीला कमी रकमेचे हप्ते लाउन घरे घेण्यास प्रोत्साहीत करणारे बँकर्स आणी त्यांचे एजंटस हे जास्त जबाबदार आहेत.

-------------------------------------------------------------------------------

मला वाटते हे सर्व वाचुन तुम्हाला माझी भुमीका थोडीफार पटली असेल.

बाळकराम's picture

6 Aug 2011 - 3:57 pm | बाळकराम

पटेश! १००% सहमत!

हा अगदी व्यवहारी विचार आहे- बँक आपला धंदा बघते आपण आपलं हित बघायचं! बरेच लोक उगाच सज्जनपणाचे च्युइंगम चघळत बसले आहेत किंवा आपल्या अव्यवहारीपणाला सज्जनपणाचे नाव देऊन स्वतःची फसवणूक करत आहेत.

नितिन थत्ते's picture

6 Aug 2011 - 4:15 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

म्हातार्‍यांच्या बरळीकडे फार लक्ष देऊ नये.

म्हातार्‍यांना उगाच व्यवहार म्हणजे फ्रॉड्युलंट इंटेन्शन नव्हे असे वाटत असते.

आमच्या एका मित्राचे खालील विचार आम्हाला पटतात.

We are different.. आमच्याकडे आमचा स्वत:चा ऍटीटयूड आहे. एखाद्या गोष्टीकडे बघायची ताकद आहे, दृष्टी आहे.. मग ती इमॅच्युअर का असेना, पण तरी तो आमच्याकडे आहे.. 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता ..

प्यारे१'s picture

6 Aug 2011 - 4:24 pm | प्यारे१

येस्स वी आर...!!! ;)

हल्ली मिपावर त्यांचे ' वर्च्युअल काका' आल्याचे समजते. :)

धन्या's picture

6 Aug 2011 - 7:41 pm | धन्या

हल्ली मिपावर त्यांचे ' वर्च्युअल काका' आल्याचे समजते.

प्यारेजी "काका" शब्द वापरुन तुम्ही गल्लत करत आहात असे आम्हास खेदाने म्हणावेसे वाटते.
थत्ते चाचांनी गणनायक नातलगांचे विचार इथे उधृत करताना "आमच्या एका मित्राचे खालील विचार आम्हाला पटतात." अशी वाक्यरचना करून त्यांचा मित्र असा उल्लेख केला आहे. तुम्ही मात्र उगाचच त्यांचे काका पुतण्याचे नाते दाखवून जालावरचा काका - पुतण्या असा सनातन वाद पुन्हा एकदा उकरून काढत आहात असे आम्हास वाटते.

(दोन वर्षांपूर्वी एका जालीय काकाचा धसका घेतलेला)
धनाजीराव वाकडे

बाळकराम's picture

8 Aug 2011 - 12:43 am | बाळकराम

सॉरी हं, पण माझा कुणाला म्हातारा वगैरे म्हणण्याचा उद्देश नव्हता हो!

मालक,

तुमचे मुद्दा क्रमांक १ आणि २ पुर्णपणे पटले. तुम्ही जे लिहिले आहे ते गृहकर्जच नाही तर बँकेकडून घेतलेल्या कुठल्याही कर्जाला लागू होते.

परंतू मुद्दा क्रमांक ३ पासून मात्र तुम्ही तुमच्या आधीच्याच प्रतिसादांची री ओढलेली आहे.

जर घरांच्या किंमती पडल्या आणी बाजुचे घर अर्ध्या किंमतीत / अर्ध्या हप्तामध्ये मिळु लागले तर आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरते. जेव्हा शेअर बासारात कींमती पडु लागतात तेव्हा जास्त नुकसान टाळण्यासाठी लोक शेअर्स विकतात. ईथे तुम्ही बँकेला केलेल्या करारा नुसार घर परत देत अहात. यात कसली फसवा-फसवी नाही. सर्व काही करारा नुसार, कायदेशीर पणे केले जाते.

आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरणे हा घर घेणाराचा प्रॉब्लेम आहे, बँकेचा नाही.
तुम्ही म्हणत आहात तसं बँकेशी केलेल्या करारानुसार तुम्ही घर बॅंकेला परत करत आहात हे लॉजिकली अगदी बरोबर आहे. परंतू याच्या अनुषंगाने तुम्ही जे म्हणताय की या सर्व बाबींमूळे यात कसलीही फसवा-फसवी नाही हे मात्र पुर्णपणे चुकीचे आहे. कारण जेव्हा केलेल्या करारानंतर जेव्हा आपण घर बॅंकेला परत करण्याचा निर्णय घेतो, त्यानंतर घडणारा घटनाक्रम लक्षात घेता असं म्हणावंसं वाटतं की ही फसवणूकच आहे. नव्हे, ही "कॅल्क्युलेटेड" फसवणूक आहे.

तुम्ही करारानूसार बॅकेला घर परत करायला जाणार, बँकेला घर परत घेणं कुठल्याच दृष्टीने परवडणार नाही. अगदी घर ताब्यात घेऊन सपाट जमीन करण्यासाठी बुलडोझर चालवायचा म्हटला तरी भुर्दंड बँकेलाच बसणार. हे सगळं टाळण्यासाठी बँक झक मारुन घराची किंमत कमी लावून घराचे हप्ते अर्ध्यावर आणणार...

हरिदासाची कथा पुन्हा मुळ पदावर आली ना भाऊ... :)

आता अर्धे कर्ज माफ करुन घेण्याविशयी-

या मथळ्याखालील पहिले चार मुद्दे वरील स्पष्टीकरणाशीच येऊन थांबतात.

पाचव्या मुद्दयात मात्र तुम्ही स्वतःच तुमच्या आधी मांडलेल्या मतांशी फारकत घेत आहात असे वाटते.
आतापर्यंत तुम्ही सर्व वस्तुस्थितीचा अभ्यास करुन बँकेशी केलेला आधीचा करार मोडून घराची किंमत किंवा घराचे हप्ते अर्ध्यावर आणायला मजबूर (हा शब्द मराठी नाही. मराठी शब्द "असहाय्य" असा काहीसा आहे.) कसे करता येते हे विस्ताराने मांडले आहे. आणि पाचव्य मुद्दयात मात्र तुम्ही चक्क पलटी मारली आहे. (इथे मी घूमजाव हा हिंदी शब्द वापरण्याचा मोह टाळला आहे हे अतिशय नम्रपणे सुचित करु ईच्छीतो.)

पाचव्या मुद्दयात आपण चक्क या सार्‍याला बॅंकेलाच जबाबदार धरले आहे. म्हणजे आपण सारी गणितं जुळवून, आपली पत (क्रेडीट) पणाला लावून बँकेला पद्धतशीर गंडवायचं आणि वरुन मग आपणच बँकेने केलेल्या अनिर्बंध कर्ज वाटपामुळे हे सारं झालं अशी बोंब मारायची... वा राव... चांगलंय....

आपलाच,
(एकेकाळी सॅन फ्रान्सिस्को बे एरीयाचा रहीवासी असलेला बँक ऑफ अमेरिकेचा ग्राहक)
धनाजीराव वाकडे

(या प्रतिसादातील मते हे केवळ आपण मांडलेल्या मतांवरचं माझं मत प्रदर्शन आहे. कृपया ही मते वैयक्तिक टीपणी म्हणून घेऊ नये. :) )

बँकांच्या गृहकर्जाविषयी नेमकेपणे सविस्तर माहिती दिलीत हे फार चांगले केले.
हा धागा अनिवासींच्या जास्त कामाचा असला, तरी त्यानिमित्ताने इथे घडून आलेली चर्चा व मिळालेली माहिती पुष्कळांच्या कामास येण्यासारखी आहे.
प्रतिसांदांबद्दल सर्वांचे आभार.

कुंदन's picture

6 Aug 2011 - 5:01 pm | कुंदन

पैसे विविध देशांमधील मित्रांकडुन उधारीवर घ्यावेत , अन अशा देशात घर घ्यावे की जिथे कोणी घेणेकरी पोहोचणार नाही.

धन्या's picture

6 Aug 2011 - 6:53 pm | धन्या

पैसे विविध देशांमधील मित्रांकडुन उधारीवर घ्यावेत , अन अशा देशात घर घ्यावे की जिथे कोणी घेणेकरी पोहोचणार नाही.

नेत्रेशे रचिला पाया | कुंदन झालासे कळस || :D

नेत्रेशभाऊ आणि कुंदनराव, दोघांनीही ह. घे. हे. वे. सां. न. ल.

नेत्रेश's picture

9 Aug 2011 - 12:00 am | नेत्रेश

माझा सल्ला हा मित्र / नातेवाईकांकडुन उधारीवर घेतलेल्या पैशांबाबत कधीच नव्हता. आपल्या अडचणीच्यावेळी त्यांनी आपले स्वतःचे पैसे काढुन देलेले असतात. पैसे कर्जावर देणे व त्यावर व्याज घेउन नफा कमावणे हा त्यांचा उद्येश नसतो. तेव्हा ते पैसे प्रसंगी स्वतः उपाशी राहुनही फेडावेत असे माझे मत आहे.

माझा सल्ला हा कट-द-लॉस हा आहे. तुमचा संपुर्ण कर्ज फेडण्याचा सला हा कीतीही आदर्शवादी असला तरी या परीस्थीतीत तो पाळणे शक्य नाही. घेतलेले कर्ज फेडता न आल्यामुळे संपुर्णपणे दीवाळखोरीत जाउन आपण स्वतः आणी बँकेचे पैसे हे दोन्ही संपुर्ण बुडण्यापेक्षा बँकेबरोबर निगोशीयेट करुन दोघांनीही थोडा-थोडा लॉस सहन करुन मध्यम मार्ग काढावा असा माझा सल्ला आहे.

अडचणीत आलेल्या बिझनेसना मदत करण्यासाठी कर्ज कमी करण्यापासुन व्याज माफ करण्यापर्यंत सवलती जगभरातील बँका देत असतात. परवडत नसताना कर्ज चुकवीता चकवीता बिझनेस बुडणे हे बँकांनाही परवडणार नाही. शेवटी बँकाना पैसा उद्योगांना कर्ज देउनच मिळत असतो. बिझनेस्/उद्योग आणी ग्राहक टीकले तर बँका टीकतील.
तेव्हा बिझनेस मध्ये आदर्शवाद चुकीच्या ठीकाणी वापरुन सर्वांचेच नुकसन करण्यापेक्षा सर्वांना मान्य होईल असा मार्ग काढणे केव्हाही श्रेयस्कर.

जर तुम्हाला असे वाटत असेल की मी कुणाला फसवणुकीचा, गंडवण्याचा सल्ला दीलेला आहे, तर तुम्हाला माझे म्हणणे अजुनही कळलेले नाही. या पेक्षा चांगले समजाऊन सांगणे मला तरी जमणार नाही, पण इथे बर्‍याचजणांना माझे म्हणणे समजलेले आणी पटलेले आहे.

नेत्रेशभाऊ, तुमची मते तुम्ही मांडलीत. माझी मते मी मांडली. आपले या मुद्दयावर एकमत व्हायलाच हवं असं नाही. वरचा प्रतिसाद मी गंमतीत लिहिलेला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, कृपया माझा प्रतिसाद हलकेच घ्या. :)

गजा गाजरे's picture

6 Aug 2011 - 9:08 pm | गजा गाजरे

अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........

@वाकडेराव .....आमचे हे आसेच आस्ते.......वाकड्यात लिहिणे....

मु.पो.वाकडेवाडी - गजा ....

@वाकडेराव .....आमचे हे आसेच आस्ते.......वाकड्यात लिहिणे....

आमच्या नावावर केलेली कोटी आम्हास विशेष आवडली.

आम्ही आपल्या प्रतिसादाला उत्तर देऊन झाल्यावर लिहिलं होतं की पटतंय का बघा म्हणून. तुमच्या प्रतिसादावरून तुम्हाला माझं म्हणणे पटलेले दिसत नाही. हरकत नाही. वी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री :)

तुमच्या प्रतिसादाच्या स्वरुपावरून एक शंका आली, ती लागलीच विचारुन घेतो. तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात काय? ;)

गजा गाजरे's picture

8 Aug 2011 - 3:34 am | गजा गाजरे

कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन आम्ही मराठी च्या बोबा मारत नाही......आमची वा़कडेगिरी ही एकटयाची.........

आपली मैत्री अशीच राहु दे.......

कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन आम्ही मराठी च्या बोबा मारत नाही.

हरकत नाही. पण तो विचारु करु शकता. झिंदाबाद, मुर्दाबाद करायला पक्षांना कार्यकर्ते लागतातच की ;)

आपली मैत्री अशीच राहु दे.......

अगदी माझ्या मनातलं बोललात.. फक्त तेव्हढं मराठी सुधारायचं पाहा... :)

गजा गाजरे's picture

9 Aug 2011 - 2:41 pm | गजा गाजरे

पण तो विचारु करु शकता. झिंदाबाद, मुर्दाबाद करायला पक्षांना कार्यकर्ते लागतातच की

मला वाटते ते तुम्हाला चागले जमेल.....मिपा वर नाव आहे तुमचे राजे.........पाउसा सारख्या प्रतिक्रिया पाड्ता की राव तुम्ही...............

फक्त तेव्हढं मराठी सुधारायचं पाहा...

ते तर होइलच .......इथे लेखक कमी अणि तुमच्यासारखे खेचाखेचीकारा भरपुर आहेत......तेव्हा ते तर हवेच ....नाहि काय.............