साहित्य :
पाव किलो गव्हाचे पिठ
पाव किलो तांदळाचे पिठ
गुळ अंदाजे
ओल खोबर
वेलची पुड
जायफळ पुड
चिमुटभर मिठ
खायचा सोडा किंवा पापड खार अर्धा चमचा (ऑप्शनल)
तेल
पाककृती:
रात्री गव्हाचे पिठ व तांदळाचे पिठ डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ भिजवुन ठेवावे. साकाळी त्यामध्ये गुळ (पाव किलोपेक्षा जास्तच लागेल. ढवळताना गुळाचा चांगला वास आला पाहीजे)वेलची पुड, जायफळ पुड व ओल खोबर, चिमुटभर मिठ स्पंजी होण्यासाठी हवा असल्यास खायचा सोडा किंवा पापड खार घालाव. हे मिश्रण एकजिव कराव.
आता पुर्वी हे भानवले करण्यासाठी काईल वापरायचे. ह्ल्ली काईल नामशेष झाल्याने आपण नॉनस्टीक तव्यात करु शकतो. हे मिश्रण नॉनस्टीक तव्यावर थोडस तेल लावुन डोश्याप्रमाणे पसरवायच. href="https://picasaweb.google.com/lh/photo/8XCKWYjGbslxZQ1YZ9gbFsMM2PFlhrYpf6...">
मग तव्यावर ताट ठेवुन चुर्रर... आवाज येई पर्यंत वाफवायचे भानवले. (ताटावर साचलेली वाफ तव्यात पडते तेंव्हा चर्ररर आवाज येतो. शिट्टी नाही देत ताट किंवा तवा :हाहा:) आता ताट काढुन १० एक सेकंद थांबायच म्हणजे वाफ जाउन भानवल्यांच्या कडा सुटतात व तो सहज पलटता येतो.
हा बघा पलटला.
पलटलल्यावर २-३ मिनीटे ठेउन त्याची चपाती प्रमाणे घडी घालुन भानवले ठेवावेत.
हे हे झाले तयार.
अधिक टिपा :
भानवले व चवळीची भाजी, भानवले व मटण तसेच चहा भानवले अगदी पारंपारीक टेस्टी टेस्टी कॉम्बीनेशन आहे.
गोड असुनही ते मटण व चवळी च्या भाजीबरोबर छान लागतात.
मी सोडा किंवा पापडखार न वापरता केले.
गव्हाचे पिठ थोडे जास्त घेतले तरी चालते.
प्रतिक्रिया
25 Jul 2011 - 4:30 pm | पियुशा
मस्त ग :)
25 Jul 2011 - 5:13 pm | गवि
आज धिरडे आंबोळी स्पेशल दिवस आहे..
अजून एक मस्त वेगळा प्रकार..
धन्स जागुतै.. :)
25 Jul 2011 - 5:57 pm | पिंगू
काइलीवरचे भानोले मिस करतोय.. बघू मावशीला सांगतो. ती नक्की करुन खायला घालेल मला.
- पिंगू
25 Jul 2011 - 6:12 pm | कच्चा पापड पक्क...
काय मस्त जाळी पडली आहे.
+१
25 Jul 2011 - 6:49 pm | ज्योति प्रकाश
मस्तच्,असे कधी केले नव्हते.नक्की करुन पाहीन्.साहित्यात खोबरं,गुळ पाहिल्यावर सात कापे घावन असावे असे वाटले.छानच.
25 Jul 2011 - 7:51 pm | निवेदिता-ताई
मस्तच............नाव सुंदर आहे
25 Jul 2011 - 8:17 pm | कच्ची कैरी
वा मस्त आहे रेसेपी ,माझाही हा आवडता प्रकार आहे ,छानच!
25 Jul 2011 - 11:05 pm | प्राजु
गोडाचे धिरडे.!!!
मस्त फोटो!
25 Jul 2011 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते
आपला नम्र,
26 Jul 2011 - 2:10 am | बहुगुणी
मस्त फोटो आणि सोपी कृती.
(आयला नुसतं पाहूनच भूक लागली, तरी बरं जेवून दोनच तास झालेत!)
26 Jul 2011 - 5:01 pm | इरसाल
लै भारी.
घावणाच्या जवळपास जाणारा प्रकार.
(जागुने दिलेल्या सगळ्या पाकृ चाखलेला आणि सध्या बोंबाबोंब असलेला) जागरसाल पाकृटा
26 Jul 2011 - 11:41 pm | जागु
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.