साहित्य दहीभातासाठी:
१ वाटी तांदुळ
१ चमचा दही
३-४ चमचे दुध (आपल्या अंदाजानुसार कमी-जास्त)
चवीप्रमाणे मीठ
१ हिरवी मिरची चिरुन
फोडणीसाठी:
२-३ चमचे तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून हिंग
७-८ कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
पाकृ:
१ वाटी तांदुळ स्वच्छ धुवून त्यात तीप्प्ट पाणी घालून भात शिजवणे.
गार झाला की त्यात आपल्या अंदाजानुसार दुध घालणे (मऊ झाला पाहीजे)
त्यात १ चमचा दही, मीठ व चिरलेली हिरवी मिरची घालणे व झाकून रात्रभर बाहेर ठेवणे.
सकाळी पळीत फोडणी करून भातावर ओतणे व मिक्स करणे.
साहित्य सुरणाची सुकी भाजी:
२ वाट्या सालं काढून बारीक क्युब्स केलेला पांढरा सुरण धुवून, निथळून घेणे (पांढरा सुरण खाजरा नसतो)
३/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१-२ हिरव्या मिरच्या चिरून (आपल्याला हवे तर जास्त ही चालतील )
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग (जरा जास्त घातले तरी चालेल )
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मिरची घालून फोडणी करणे.
त्यात चिरलेली कोथिंबीर व सुरण घालणे.
त्यावर हळद, मीठ घालून परतणे.
झाकण ठेवून गॅस मंद ठेवावा.
सुरण शिजले की दहीभाताबरोबर सर्व्ह करणे.
तयार पाकृ चा फोटो
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 12:41 am | गणपा
वाह खंग्री बेत आवडला. :)
24 Jul 2011 - 1:37 am | चिंतामणी
पण सुरणसुद्धा (आळुप्रमाणे) खाजू शकतो. त्यासाठी सुरणाची भाजी करताना त्यात चिंच अथवा अमसूल वापरावे.
खाजत नाही आणि चवसुद्धा छान येते.
24 Jul 2011 - 2:30 am | सानिकास्वप्निल
अगदी बरोबर आहे पण पांढरा सुरण शक्यतो खाजरा नसतो , असला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिंच अथवा अमसूल वापरावे...किंवा सुरणाच्या तुकड्यांना मिठाच्या पाण्यात काही वेळ घालून ठेवणे.
24 Jul 2011 - 10:27 am | निवेदिता-ताई
सुंदर...फोटो....
मी अजुन सुरण एकदाही खाल्ला नाही...
24 Jul 2011 - 11:01 am | ५० फक्त
+१ टु निवेदिता ताई, मी पण आज पर्यंत सुरण खाल्लेला नाही आणि वर फोटोत तर ते पनीरचे तुकडे आहेत असं वाटतंय.
@सस्व - तुम्ही आणि गुरुवर्य गणपा मिळून रेसिपि प्रेझेंटेशन यावर धागा का नाही काढत हो ?
25 Jul 2011 - 8:03 pm | कच्ची कैरी
मीही आजपर्यत एकदाही सुरण खाल्लेला नाही पण आता खाण्याची हिम्मत करावीच लागेल बहुतेक.
25 Jul 2011 - 6:37 pm | खादाड
:)
25 Jul 2011 - 10:59 pm | प्राजु
वाह! मस्त फोटो!
सुरण अजून कधी खाल्ला नहीये.
सुरणावरून आठवलं. राजेश खन्नाच्या बावर्ची मध्ये त्याने सुरणा सोबत कच्ची केळी वापरून भाजी केलेली दाखवली आहे.
ती भाजी मटनासारखी लागते... असे ए के हंगल म्हणतो. :)
28 Jul 2011 - 12:37 am | चिंतामणी
सुरणावरून आठवलं. राजेश खन्नाच्या बावर्ची मध्ये त्याने सुरणा सोबत कच्ची केळी वापरून भाजी केलेली दाखवली आहे.
ती भाजी मटनासारखी लागते... असे ए के हंगल म्हणतो.
मटण कबाब वाटतात.
(अवांतर- हृषीदांचे "छुपके छुपके", "बार्वची", "गुड्डी" इत्यादी चित्रपटांचे पारायणे झाली आहेत. विषय स्मीत हास्याचा असल्याने "आनंद", "मिली", "अनुपमा", "अनुराधा"इत्यादी क्लासीक चित्रपटांचा उल्लेख टाळलेला आहे.)
27 Jul 2011 - 6:08 pm | प्रभाकर पेठकर
विरजण लावून केलेला दही-भात आणि त्यावर फोडणी.....लाजवाब. (फक्त मला ह्या फोडणीत मोहरी ऐवजी जीरं जास्त आवडतं)
सुरण पौष्टीक आहे. सुरणाने मेंदूतील स्मरणशक्तीचे कार्य सुधारते असे वाचले आहे. मांसाहारात त्यासाठी 'लिव्हर' खावे.