आज मी तुम्हाला एक अशा बिर्याणिची पाकृ सा॑गणार आहे ...... जी तुम्ही कुणीही घरी करु शकता आणि खाऊ शकता ( जे शाकाहारी आहेत ते सुद्धा!!!) ;;)
साहीत्य : १ मध्यम आकाराचा कच्चा फणस(भाजीचा) , १ वाटी बस्मती ता॑दुळ्, सुका मसाला(लव॑ग्,दालचीनी,तमालपत्र्,मसाला वेलदोडे(सगळे ३-४)) ,काजु, कोथी॑॓बीर्,पुदिना ,१/२ वाटी दही ,हीरवी मीर्ची-२ ,१-२ लसुण पाकळ्या,१/४ वाटी ओला नारळ , तळलेला का॑दा १/२ वाटी, तेल , मीठ चवीनुसार
कृती : १) प्रथम फणस चीरुन त्याचे बारीक तुकडे करुन त्यात थोडे मीठ व खाण्याचा लाल र॑ग घालुन ते कुकर मधे शीजवुन घ्यावेत(तुकडे जरा मोठे करावेत्,भाजीप्रमाणे बारीक चीरु नये)
२) १ वाटी ता॑दुळामध्ये २ वाट्या पाणी ,१ चमचा तेल्,मीठ व ली॑॓बू घालुन कुकरमध्ये २ शीट्या करुन घ्याव्यात.
३) मिक्सरमध्ये कोथी॑॓बीर्,पुदिना ,हीरवी मीर्ची-२ ,१-२ लसुण पाकळ्या,१/४ वाटी ओला नारळ व थोडे पाणी घालुन वाटुन घ्यावे.
४) एका कढईत तेल गरम करुन वरील सर्व सुक मसाला घालावा,त्यातच काजु घालुन परतावे,न॑तर त्यात केलेले वाटण व दही घालावे
तेल वेगळे होइपर्य॑त परतावे,त्यात शीजवलेले फणसाचे तुकडे घालावेत थोडावेळ परतून त्यात शीजवलेला भात मोकळा करुन घालावा व परतुन २-४ मी. झकण ठेवावे.... एका प्लेट्मध्ये काढणे आणि वरुन तळलेला का॑दा घालणे.
बिर्याणि तय्यार!!!!.......
आणि आता ही बिर्याणि कुणालाही द्या आणि विचारा....कशी झाली आहे चिकन बिर्याणि? :)
प्रिती
प्रतिक्रिया
2 Jul 2008 - 10:41 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
आईशप्पथ , जाम मजा येईल.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
2 Jul 2008 - 10:52 am | गिरिजा
मस्तच लागत असणार.. पाककृतीसाठी धन्यवाद!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
2 Jul 2008 - 2:06 pm | विसोबा खेचर
आणि आता ही बिर्याणि कुणालाही द्या आणि विचारा....कशी झाली आहे चिकन बिर्याणि?
हा हा हा! प्रिती, तुझी चिकन बिर्याणी आवडली बरं का! :)
अजूनही अश्याच छान छान पाकृ येऊ द्यात...
आपला,
(बिर्याणीप्रेमी) तात्या.
2 Jul 2008 - 6:59 pm | ऍडीजोशी (not verified)
बँगलोर महिला वर्गातलं कुणी ही बिर्याणी बनवून मला जेवायला बोलावेल का? सद्ध्या मॅगी पॅनला खाली न चिकटता कसं नीट बनवावं हे शिकतोय मी. बिर्याणी लय लांब रहिली.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
2 Jul 2008 - 7:02 pm | वरदा
बरं का प्रिती...ते फक्त अमेरिकेत भाजीचा फणस जरा शोधावा लागेल्..पण सापडेल्....लग्गेच करुन पाहिन्..आणि एखाद्या गोरीलाच खाऊ घालेन्...मग तुला खर्री खर्री प्रतिक्रीया देईन.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
2 Jul 2008 - 7:45 pm | प्रिती करन्दिकर
बरका वरदा ताई.......ही बिर्याणि अस्सल मराठी मणसा॑सठी आहे....(ते ही जे पूर्ण शाकहारी आहेत),
तिकङे पल्ल्याड जाउन असले पदर्थ मिळवण्याची हौस बाळगुच नये........आणि ज्याना ती असते ते इकडे येऊन हौस पूर्ण करतात बरका..........................
आणि आपल्यात एक म्हण आहे....माहीत आहे का?....... ला गुळाची चव काय?.....
आपण त्यातल्याच एक दिसता....."तिकडे जाऊन इकडच्या पदार्था॑ची चव काय?"
असो...
बकी तुमच्या कडचे गोरीला आणि तुमची घट्ट मैत्री आहे हे बघुन फारच आन॑द झाला,
कळवा मग त्याची प्रतीक्रिया...
प्रिती
2 Jul 2008 - 7:55 pm | वरदा
मला म्हणायचय की पर्फेक्ट चिकन सारखी वाटून गोरी पण फसेल आणि मग तुला खरा रिपोर्ट देईन...
देवा काय म्हणावं आता जो उठतो तो अमेरिकेला शिव्या घालतोय....
आणि मी आहे कोकणी तेव्हा फणसाची चव खूप घेतलेय गं लहान पणापासून आणि दरवर्षी तिथे येऊन घेतच असते सगळ्या अस्सल पदार्थांची चव.....
बरं तू गैर्समज झाल्याने मला गाढव म्हणालेय्स आता काय बोलू मी ...एवढं सांगते तू बरोब्बर उलटा अर्थ घेतलास आणि खरंच वाईट वाटलं मला मनापासून....
असो...मी नाही देणार परत तुझ्या रेसिपीला प्रतिक्रीया..
हा विषय माझ्यापुरता संपला.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
2 Jul 2008 - 9:48 pm | प्रिती करन्दिकर
वरदा ताई,
तुम्हाला फारच राग आलेला दिसतो,
मला अमेरिकेचा राग आहे ही गोष्ट खरी आहे...पण म्हनुन तो राग तुमच्यावर नक्किच नाहि कढणार मी....
मझा गैरसमज झाला ही गोष्ट खरी आहे,...तुम्ही लिहीलेल॑ वाक्य ..."मी गोरीलाच देइन आणि सा॑गेन्..प्रतिक्रीया"
पण मला वाट्ल॑..."मी गोरीलालाच देइन आणि सा॑गेन्..प्रतिक्रीया"
त्यामुळे मला पण वाइटच वाटल॑,
तुमच॑ मन दुखवल्याबद्दल sorry,
प्रिती
2 Jul 2008 - 11:01 pm | वरदा
मी आधीच लिहिलय मला वाईट वाटलं राग नाही आला म्हणून....
अगं वर इतकं पाक्रु छान आहे लिहिलय तरी 'गोरीला'(माकड ह्या अर्थी) वगैरे काय वाचतेस? बरं असो...आपण दोघीही रागावलो नाहीयोत ना मग झालं तर....
आणि सॉरी वगैरे नको म्हणूस्.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
3 Jul 2008 - 12:16 am | प्रिती करन्दिकर
धन्यवाद....
आता पुढच्या रेसिपी लिहु ना मग?...आणि मला प्रतिक्रीया पाठवाल ना?
आता जरा काळजी पुर्वक वाचत जाईन.
आणि माझा राग अमेरिकेवर आहे आणि अशा भरतिया॑वर पण आहे जे तिकडचेच बनुन गेलेत्......ज्या॑च मन इथेच आहे अशा॑वर कसला राग्?....पुन्हा एकदा sorry... & thanks for reply
प्रिती
3 Jul 2008 - 12:29 am | वरदा
पु ले शु
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
2 Jul 2008 - 9:45 pm | भाग्यश्री
या का चिडल्या म्हणे एकदम? :O
प्रितीताई तुम्ही इथे नविन दिसताय.. या आधी तुम्ही काही लिहीलं नाही, हा पहीलाच लेख्,रेसिपी.. लोकांना काय म्हणायचं आहे हे न कळताच तुम्ही गाढव म्हणून मोकळ्या झाल्या!?? हे बरं नव्हे.. आणि जरी प्रतिकुल प्रतिक्रीया आली तरी अशी कमेंट तुम्ही टाकणं चुकीचं आहे असं मला वाटतं..
अमेरिकेबद्द्ल जळजळ्च दाखवायची असेल (कारण तीच तेव्हढी दिसतिय..) तर सरळ लेख लिहा नं दुसरा.. इथे काय संबंध? काहीही...!
2 Jul 2008 - 10:50 pm | एक
आमच्या सासुबाईनी एकदा केली होती फणसाची भाजी..
2 Jul 2008 - 11:03 pm | वरदा
मी न्यु जर्सीत आहे..इथेही बरेच साऊथ इंडियन असल्यानी मला खात्री आहे इथे मिळत असणार्....पण कधी शोधला नाहिये मी.. तिथे नॉर्मल इंडियन ग्रोसरी स्टोअर मधे मिळतो का?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
3 Jul 2008 - 1:02 am | चकली
मी Indian Grocery Store च्या Frozen सेक्शन मध्ये फणस बघून आहे. स्वाद चा आहे बहुतेक. आणि मोठे तुकडे करूनच असतात.
आणि एक, तू एशियन मार्केट (चाइनीज, कोरीयन इ.) मध्ये बघ. तिकडे फणस असतो. पण मी अजून वापरला नहिये!
चकली
http://chakali.blogspot.com
3 Jul 2008 - 5:11 am | एक
नॉर्मल इंडियन ग्रोसरी स्टोरमधे मिळतो.
एकदोनदा मेक्सिकन दुकानात पण बघितला आहे..
एशियन मार्केटमधे तो "फणस" असल्याची खात्री करून घे.. दुरियान बराचसा फणसा सारखाच दिसतो..(पण वास भयानक असतो )
2 Jul 2008 - 8:16 pm | बारक्या
वरदाताई म्हणतात तसं ..."देवा काय म्हणावं आता जो उठतो तो अमेरिकेला शिव्या घालतोय..."..ह्याच मुळे मराठी असून आपल्याच माणसांपासून न मागता दुरावत चाल्लो आहोत...
खरं म्हणजे भारताविषयी आणि भारतातल्या आपल्या माणसांविषयी आम्ही खुप हळवे असतो ते कधी कळणारं तिथल्या लोकांना कोण जाणे...
बाकी चालू द्द्या...
2 Jul 2008 - 9:46 pm | भाग्यश्री
खरं म्हणजे भारताविषयी आणि भारतातल्या आपल्या माणसांविषयी आम्ही खुप हळवे असतो ते कधी कळणारं तिथल्या लोकांना कोण जाणे...
याला सहमत..!
http://bhagyashreee.blogspot.com/
2 Jul 2008 - 8:22 pm | मुक्तसुनीत
यावरून आमचे एक सीकेपी स्नेही आहेत त्यांची आठवण झाली. एके दिवशी , मित्रांच्या मैफलीत ते म्हणाले, " दिवस फिरलेत खरे ! ऐकावं ते विपरितच !" आम्ही म्हण्टलं, "का हो ? झालं तरी काय ?" तर ते म्हणतात : " अरे, अलिकडे आम्ही ऐकलंय की तुम्ही सगळ्या कोब्रांनी चिकन बिकन खाणं सोडून दिलंय ! " पब्लिक ठो ठो हसतंय !
2 Jul 2008 - 8:25 pm | मदनबाण
पाकृ छान आहे...
आणि
अगं तुला समजलं नाही मला काय म्हणायचय...
हेच मलाही वाटत...
(माणसानं फणसासारख असाव) असे म्हणणारा
मदनबाण.....
2 Jul 2008 - 9:46 pm | फुलपाखरु
पाककृती चांगली आहे ही, करुन पहायला हवी नकक्की.
बाकी, मी सुद्धा सहमत आहे वरदाताईं जे म्हणल्या त्याबद्दल.
उगाच का नावे ठेवावी अमेरिकेत राहतो कोणी म्हणून? मी तर आपले
कितीतरी मराठी पदार्थ बनवून खायला घातले इकडे खूप जणांना, अमराठी आणि
काही अमेरिकन मंडळींना सुद्धा :) आणि त्यांनी खूप कौतुकाने खाल्ले आहेत आणि
प्रशंसा पण केली दिलखुलास.
2 Jul 2008 - 10:21 pm | खादाड_बोका
I just want to tell Preeti that what ever she is writing on net is invented by America. So think before this first.
Now I wish to tell her that Maharashtra hi maazi Janmabhoomi mhanun ti mala swarga peksha mahan aahe, aani America hi mazi karma bhumi mhanun ti suddha titkich changali aahe. He lok konalahi naav thevat naahi. Aani aaple lok, jyani ayushat America pahili suddha nahi te, ugachach konakadun kahi tari aikun fukatch Americe la naav thevtat . Ekda ikde yevun paha, aani mag bola.
Nahi tar vihirit rahanarya bedkamadhe and hyancha sarkhya lokanmadhe far kaay ?
2 Jul 2008 - 11:57 pm | प्रिती करन्दिकर
namaskar...
mi maza zalela gairsamaj lihila ahe to na vachata tumhi he lihilel disat..
aso ,tumachya mahitisathi ek gosht sangavishi vatate..mi pahili ahe baraka tumachi amerika..ani maza svatahacha bhau tithech asato..tyamule krupa karun ajun kahi gairsamaj vadhau nayet,
mazi varada taina lihileli dusari pratikriya krupa karun vachavi...
priti
2 Jul 2008 - 10:25 pm | यशोधरा
>>खास कोक्या॑साठी ...
म्हणजे??? #:S
2 Jul 2008 - 11:45 pm | वरदा
बारक्या, फुलपाखरु, खादाड बोका धन्यु रे मला समजुन घेतलं त्याबद्दल....
ह्म्म खरं म्हणजे भारताविषयी आणि भारतातल्या आपल्या माणसांविषयी आम्ही खुप हळवे असतो ते कधी कळणारं तिथल्या लोकांना कोण जाणे...
१००% सहमत्... शेवटी आमचे आई बाबा दादा ताई तिथेच तर असतात की....आमची तर अवस्था अशी आहे जीव तिथे आहे आणि आम्ही इथे....असो.
कितीतरी मराठी पदार्थ बनवून खायला घातले इकडे खूप जणांना, अमराठी आणि
काही अमेरिकन मंडळींना सुद्धा आणि त्यांनी खूप कौतुकाने खाल्ले आहेत आणि
प्रशंसा पण केली दिलखुलास.
अगदी अस्संच म्हणते..
तात्या सॉरी खूप विषयांतर झालं इथे..आता प्रतिक्रीया टाकताना काळजी घेईन
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
3 Jul 2008 - 12:30 am | विसोबा खेचर
तात्या सॉरी खूप विषयांतर झालं इथे..आता प्रतिक्रीया टाकताना काळजी घेईन
वरदा,
तू कशाला सॉरी म्हणतेस? झाला प्रकार मी आत्ताच सगळा वाचला. तुझी काहीच चूक नाही. प्रितीने तुझ्या प्रतिसादाचा चुकीचा अर्थ घेतला आणि अचानक आगपाखड सुरू केली व व्यक्तिगत पातळीवर उतरून गाढव वगैरे म्हणून लगेच चिखलफेकही सुरू केली!
असो..उलटपक्षी तुला विनाकारण झालेल्या त्रासाबद्दल मीच खरंतर दिलगिरी व्यक्त करतो...
तात्या.
3 Jul 2008 - 12:40 am | वरदा
तुम्ही नका हो सॉरी म्हणू...ती नवीन आहे म्हणून झालं .....
असो झालं ते होऊन गेलं..मला फक्त वाईट वाटलं की पाक्रु. च्या खाली चर्चा भलतीच झालेय्..नंतर रेफर करणार्यांना काहीच चांगली माहिती मिळणार नाही.. हे सगळेच पोस्ट उडवून टाकले तर? चांगली चर्चा सेव्ह करुयात....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
3 Jul 2008 - 12:48 am | विसोबा खेचर
हे सगळेच पोस्ट उडवून टाकले तर?
हम्म! तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आता असं नाही करता येणार. इथे भाग्यश्री आणि इतरही काही जणांनी त्यांची मतं मांडली आहेत. तेव्हा आता त्यांचे प्रतिसाद परस्पर उडवून टाकणे योग्य होणार नाही...
असो, प्रितीला नजरचुकीमुळे 'गोरिला' हा शब्द दिसला अन् सगळं रामायण घडलं. आता तिनेही तिची गलती मान्य केली आहे तेव्हा मुलांनो, आता उरलेली चिकन बिर्याणी आपण सर्वजण गुण्यागोविंदाने खाऊ! :)
प्रितीही मिपाचीच आहे अन् मिपाही प्रितीचंच आहे!
आपला,
(समजूतदार मध्यस्थ!) तात्या.
3 Jul 2008 - 2:36 pm | पक्या
ह्म्म्म्...रेसिपी छान आहे. पण खास कोक्यांसाठी म्हणजे कोणासाठी ? कोण हे कोके? नीट काही कळले नाही बॉ.
ध चा मा केल्याप्रमाणे गोरी चा गोरीला केलात की आपण. धन्य धन्य. वरदा ताईंच्या प्रतिसादात अमेरिका शब्द दिसताच तुम्ही भलतच वाचू लागलात.
बाकी आपला राग फक्त अमेरिकेवरच का? भारतीय काय फक्त अमेरिकेलाच जातात की काय? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा , जर्मनी , जपान .....जगाच्या पाठीवरील बहुतेक देशात आपले देशबांधव रहात आहेत . अहो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला राग राग करताय?