न्यु जर्सी

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
22 Jul 2011 - 6:14 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो.
नशिबाने आम्हाला डॅलसला जायच्या ऐवजी न्यु जर्सीमधे येउन पडलो आहोत. इथे बर्गेन कांऊंटीमधल्या सॅडल रिवर नावाच्या जंगलात येउन पडलो आहोत. (खरच हॉटेलच्या आजुबाजुला जंगल आहे, हरणे , ससे दिसतात). आपल्या मिपाकरांपैकी इथे कोणी जवळपास रहाते का? मी सध्या पर्सीपेनी, लेक हाअवाथा इथे घर शोधत आहे. कोणी मदत करु शकेल काय?

हाफिसात, हाटेलात आजुबाजुला कोणी मराठी माणुस नसल्याले कंटाळलेला,
गणा मास्तर,
मुळ गांव भोकरवाडी बुद्रुक,
ह.मु. न्यु जर्सी

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Jul 2011 - 8:26 am | विश्वनाथ मेहेंदळे

न्यू जर्सीत मराठी माणूस दिसत नाही ?? अहो नुकतेच गेला आहात म्हणून नाही तर बे एरिया खालोखाल सर्वात जास्त कदाचित तिथेच असतील. तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळाला एकदा भेट द्या. तिथून तुम्हाला काही contacts नक्की मिळतील. माझ्या एका मित्राने शिकागो मध्ये असाच महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षाला cold call करून ग्रुप जमवला होता.

अर्थात मिपा वरून पण ओळखी होतील म्हणा.

गणा मास्तर's picture

23 Jul 2011 - 9:36 am | गणा मास्तर

महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देउन पहातो

मृत्युन्जय's picture

22 Jul 2011 - 10:23 am | मृत्युन्जय

हाफिसात, हाटेलात आजुबाजुला कोणी मराठी माणुस नसल्याले कंटाळलेला,

खरे आहे अगदीच बोर होते हो. इकडेही मराठी माणूस फारसा दिसत नाही त्यामुळे फारच चिडचिड होते.

असो. मिपावर अ‍ॅड्ल्ट फ्रेंड फाइंडर का सुरु करत नाही. खुप मज्जा येइल नाही.

sagarparadkar's picture

22 Jul 2011 - 11:22 am | sagarparadkar

बस स्टॉपवर जाऊन बघा ... अक्षरशः शेकड्यानी मराठी चाकरमानी दिसतील. हॅकेन्सॅक, वॉलिन्ग्टन वगैरे ठिकाणी तर भारतातच असल्याचाच भास होईल .... :)

मुळ गांव पुनवाडी बुद्रुक,
ए.का.मु. वॉलिन्ग्टन, न्यु जर्सी

विलासराव's picture

22 Jul 2011 - 12:07 pm | विलासराव

की पुणेवाडी?
हि पुनवाडी कुठे आहे ओ.
नाही आमच्या बुगेवाडी जवळ पुणेवाडी ही आहे म्हणुन विचारतो.

चिरोटा's picture

22 Jul 2011 - 4:22 pm | चिरोटा

चाकरमानी मराठीच आहेत हे कसे ओळखायचे ? धोतर, कोट, गांधी टोपी ?

sagarparadkar's picture

22 Jul 2011 - 5:44 pm | sagarparadkar

दैनंदिन कामकाजाचे चेहेर्‍यावरील सहज दिसून येणारे टेन्शन, काटकसरी वेष एकूणात आढळून येणारी साधी राहणी - उच्च विचारसरणी वगैरे वगैरे ... :)

अवांतर: इतरांबद्दल मी काही बर्‍यावाईट कॉमेंट्स करू इच्छित नाही

रेवती's picture

22 Jul 2011 - 7:09 pm | रेवती

नवीन जर्सीत राहणारे एक महापुरुष बीएमएमसाठी गेल्याने त्यांचे उत्तर लगेच येणार नाही, सबब वाट पहावी.
भारतीय भेटण्याची काळजी करूच नका. कंटाळा येईपर्यंत लोक्स भेटतील.

जर्सी सिटीमध्ये कुणी मिपाकर आहे का?

येडा अण्णा's picture

22 Jul 2011 - 8:26 pm | येडा अण्णा

जर्सी सिटीमध्ये कुणी मिपाकर आहे का?

मी आहे जर्सी सिटीमध्ये सध्या.

मी सध्या पर्सीपेनी, लेक हाअवाथा इथे घर शोधत आहे. कोणी मदत करु शकेल काय?

माझा एक मित्र सध्या पर्सीपेनी ल राहातो. मी विचारुन पहातो त्याला.

बाकी फारच कंटाळा आला असेल तर जर्सी सिटी ला एक चक्कर मारा. १-१.५ तासचा ड्राइव आहे फारतर.

गणा मास्तर's picture

23 Jul 2011 - 9:37 am | गणा मास्तर

जर्सी सिटीला जाउन आलो. तिथे बरीच जनता आहे.

सूर्याजीपंत's picture

23 Jul 2011 - 4:23 am | सूर्याजीपंत

मी harrison मध्ये २.५ वर्ष राहिलो, सध्या richmond ला आहे पण Jersey City ला महिन्यातून एक चक्कर मारतो..प्लान करा..मिपाकर भेटूयात सगळे.

शिल्पा ब's picture

23 Jul 2011 - 7:40 am | शिल्पा ब

परदेशस्थ कुणीकडचे!!!

गणा मास्तर's picture

23 Jul 2011 - 9:35 am | गणा मास्तर

काय हो, इथे शॉर्ट टर्म लीज नाही का मिळत.
जिथे पाहु तिथे १ वर्षे सांगतात. माझे काम फक्त ८-९ महिने आहे. लीज ब्रेक झाली तर खुप भुर्दंड बसतो

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jul 2011 - 6:43 pm | llपुण्याचे पेशवेll

जर्सी सिटीमधे जा अ‍ॅकेडमी स्ट्रीट ला. तिथे काही घरे होती शॉर्ट लीज वर. परत पाथ स्टेशन पासून एकदम जवळ आहे.

विजुभाऊ's picture

25 Jul 2011 - 2:36 pm | विजुभाऊ

मराठी माणूस ओळखण्याची सोपी खूण राज यानी सांगितली आहे." मार लागल्यावर ज्याच्या तोंडून आई ग हे शब्द बाहेर पडतात तो मराठी माणूस.
तुम्ही हे अमलात आणा. बसस्टॉप वर कोणत्याही व्यक्तीला एखादी टाचणी टोचा. तो आईग म्हणाला तर पक्का मराठी आहे असे समजा.
( हे स्वतःच्या जबाबदारीवर करावे. होणार्‍या क्वान्सीक्वेन्सेस ना प्रतिसादक जबाबदार नाही)

इरसाल's picture

26 Jul 2011 - 4:39 pm | इरसाल

तुम्ही पिन टोचा तर खरं पुढचं पुढं बघून घेवू. मी पुढच्या महिन्यात येतोयेच तिकडं माझं नाव सांगा वाटलं तर.

विजुभो असा पळणं बरे नव्हे ?
टाकुनिया कटाक्ष(काडी) बाबा पळाला.