गाभा:
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे.
आपणा सर्वांना आवडतील अशी आशा आहे.
घर बांधकाम चालू असताना
सौ. रॉबिन घरट्यामधील अंडी उबवत आहेत आणि रॉबिनकाका सौं.ना काय "हवे नको" पहाताना :)
चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर
पावसापासून पिल्लाचं संरक्षण करत आहेत आई बाबा
प्रतिक्रिया
30 Jun 2008 - 9:59 pm | प्रमोद देव
सुंदर आहेत छायाचित्रं.
ते झाड कोणते आहे? फुलेही सुंदर आहेत.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
30 Jun 2008 - 10:07 pm | यशोधरा
आवडली प्रकाश चित्रं.
30 Jun 2008 - 10:18 pm | फुलपाखरु
धन्यवाद! झाड कोणते आहे ते नाही माहिती मला :/
1 Jul 2008 - 12:02 am | विसोबा खेचर
वा! काय सुरेख फोटू आहेत! :)
1 Jul 2008 - 1:30 am | धनंजय
फॅमिली आल्बम छान झाला आहे.
(पक्षी फ्लॅश्ला घाबरत असत का?)
1 Jul 2008 - 4:07 am | फुलपाखरु
पक्षी फ्लॅश्ला नाही घाबरले. पण, जेव्हा पिल्लू जन्माला आले त्या नंतर मात्र मला घराचे पुढचे दार सुद्धा उघडू देत नव्हते...एकदम डोक्यावर जोरात झेप घ्यायचे :S पिल्लाच्या काळजीमुळे. दाराला कुलूप सुद्धा लावू द्यायचे नाहीत! त्यामुळे नंतरचे फोटो घरातून खिडकीमधून काढावे लागले आणि मग मागच्या दाराने office ला जायला पळ काढावा लागायचा. :D
धन्यवाद! आणि हो..कुठ्ल्यातरी प्रकारच्या बेरींचेच झाड आहे हा ते...छोट्या छोट्या बेरी लागल्या होत्या खरे त्याला.
1 Jul 2008 - 1:55 am | चतुरंग
हे ब्लूबेरी/क्रॅनबेरी असे कोणते तरी बेरीवर्गीय झाड असावे असे वाटते. हिरवागार रंग मस्तच आलाय. पक्षीही न भिता पोझ देतायत. मस्तच.
चतुरंग
1 Jul 2008 - 3:44 am | अरुण मनोहर
मजा आली पहायला.
1 Jul 2008 - 7:59 am | श्रीकृष्ण सामंत
येथे फोरक्लोजर नाही
येथे इंन्स्टॉलमेंट नाही
येथे इंटरेस्ट नाही
येथे फक्त आहे
सुखी संसार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
1 Jul 2008 - 8:14 am | सहज
अहो पण प्रायव्हसीचे काय? पापाराझीने काढुन इंटरनेटवर टाकलेच ना?
कृ. ह. घ्या. ;-)
फुलपाखरु फोटो बघायला आवडले.
1 Jul 2008 - 8:19 am | मुक्तसुनीत
फोटो आवडले ! :-)
1 Jul 2008 - 9:05 am | सूर्य
फोटो छान आले आहेत. आवडले.
- सूर्य.
1 Jul 2008 - 12:44 pm | आनंदयात्री
आलेत फोटो.
1 Jul 2008 - 2:08 pm | मदनबाण
अरे व्वा.. फुलपाखरा मस्त फोटो आहेत.
चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर
हा फोटो फार आवडला..
मदनबाण.....
1 Jul 2008 - 5:06 pm | वेताळ
अमेरिकेतील पक्षी पण इकडच्या पक्ष्यासारखे घरटं बांधतात, एकसारखा विकास आहे दोन्ही कडे.भेदभाव नाही.
वेताळ.
1 Jul 2008 - 5:17 pm | लिखाळ
फोटो छानच.
शेवटचा तर फारच आवडला.
-- लिखाळ.
1 Jul 2008 - 7:30 pm | फुलपाखरु
धन्यवाद! :)
1 Jul 2008 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रॊबीन फॅमीलीचे फोटो मस्त आले आहेत, आवडले.