पालक-छोले

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
29 Jun 2011 - 4:12 am

साहित्यः
३ कप बारीक चिरलेला पालक
२ कप काबुली चणे रात्रभर भिजवून, सकाळी बोटचेपे उकडून घेणे.(कॅनमधले काबुली चणे देखील वापरू शकता)
२ टोमॅटो+ ३-४ लसुण पाकळ्या+ १ इंच आले+ २-३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणे.
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ टेस्पून छोले मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनीच्या काड्या
तेल

.

पाकृ:

जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून जीरे, तमालपत्र आणी दालचिनीच्या काड्या घालून परतावे.

.

कांदा, मीठ व टोमॅटोची प्युरे घालून चांगले परतावे. वरील मसाले (गरम-मसाला सोडून) घालून सगळे नीट एकजीव करावे.

.

त्यात चिरलेला पालक घालून एकत्र करणे व झाकून पालक शिजवणे.शिजलेल्या पालकात उकडलेले काबूली चणे घालावे व शिजवावे. .

शिजल्यावर वरून गरम-मसाला भुरभुरावा.

.

लिंबु पिळून गरमा-गरम पालक-छोले रोटी, चपाती सोबत सर्व्ह करा.

.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

29 Jun 2011 - 6:49 am | शिल्पा ब

वा!!! छानच दिसतेय पाक्रु. करुन बघते. बाकी तुमचं ते नाव चित्राच्या अगदी मध्यभागी घालण्यापेक्शा खालच्या बाजुला एका कडेला लहान अक्षरात जास्त चांगले.

कच्ची कैरी's picture

29 Jun 2011 - 7:26 am | कच्ची कैरी

व्वा ! मस्तच दिसतेय रेसेपी ,करुन बघायला काही हरकत नाही.

वा... एकदम सही.... एकदा नक्की करुन बघितले पाहिजे. :)

इरसाल's picture

29 Jun 2011 - 5:24 pm | इरसाल

बायकोला सान्गावे लागेल.

जब भी मै पालक देखु मेरा दिल दिवाना बोले छोले छोले.............

आनंद's picture

29 Jun 2011 - 6:40 pm | आनंद

मस्त!

बाकी तुम्ही टाकलेल्या फोटो मधले चमचे आणि भांडी आणी तुमच प्रेसेंटेशन इतक सही असत की तुम्ही त्यात कागद शिजवुन प्रेसेंट केला तरी छानच दिसेल.

यकु's picture

29 Jun 2011 - 9:31 pm | यकु

+१

निवेदिता-ताई's picture

29 Jun 2011 - 7:57 pm | निवेदिता-ताई

अहाहा............मस्त ग...

विशाखा राऊत's picture

29 Jun 2011 - 8:45 pm | विशाखा राऊत

:)

पल्लवी's picture

29 Jun 2011 - 9:02 pm | पल्लवी

आवडेश. :)

कौशी's picture

29 Jun 2011 - 9:34 pm | कौशी

आनन्दला १००% अनुमोदन...

रेवती's picture

30 Jun 2011 - 12:28 am | रेवती

ही पाकृ चांगली असणार असे वाटते आहे.
पहिल्यांदा एका मैत्रिणीने पाठवली होती तेंव्हा इतकी आवडली नव्हती.
फोटो चांगला आलाय.

सानिकास्वप्निल's picture

30 Jun 2011 - 2:47 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यांना धन्स :)

छोटा डॉन's picture

30 Jun 2011 - 3:01 pm | छोटा डॉन

पाकृ छान असेलच.
पण मला कौतुक ह्या गोष्टीचे वाटते की ह्यासाठी उपकरण म्हणुन वापरलेली भांडी (स्पेशली चमचे) इतकी सुंदर आहेत आणि त्यातले वैविध्य पाहुन खरच फोटो छान वाटतात.

पहिल्या फोटोतल्या 'मापात' मसाला वगैरे ठेवलेल्या चमच्यांचे काय कौतुक करावे ?
असे वाटते की जणु एखाद्या कंपनीच्या क्वालिटी रुममधुन स्टँडर्ड वोल्युमचे फ्लास्क आणले आहेत काय.
मस्त...

- छोटा डॉन