पहिल्या पाहुण्या संपादकाचे स्वागत...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
29 Jun 2008 - 11:39 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या या आवाहनाला साद देऊन आपल्या मिपा परिवाराचे एक सन्माननीय सभासद मुक्तसुनीत यांनी मिपाचा सर्वप्रथम पाहुणा सांपादक होण्याचे मान्य केले आहे. सोमवार दि ७ जुलै रोजी मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना वाचायला मिळणार आहे.

आम्हाला खात्री आहे की मिपाकरांना निश्चितच काही चांगले विचार वाचावयास मिळतील.

अग्रलेख हा लेखनप्रकार निश्चितच एका आव्हानात्मक व अतिशय जबाबदारी असलेला प्रकार आहे अशी आमची धारणा आहे. तो केवळ नुसता एक लेख नव्हे! अग्रलेख लिहिणार्‍या लेखकाची दृष्टी अतिशय व्यापक असली पाहिजे व एखाद्या प्रकरणाचा सर्वतोपरी व सांगोपांग विचार करण्याची व ते विचार मांडण्याची हातोटी त्याच्याकडे असली पाहिजे.

लोकमान्यांच्या,

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"

या अवघ्या एका अग्रलेखाने अक्षरश: खळबळ माजवली होती ही अग्रलेखाची ताकद आहे!

असो...

मुक्तसुनीत यांनी सुरवात केलीच आहे परंतु त्यानंतरही स्वत:हून काही मंडळी पुढे येतील व मिपाच्या संपादकीय अग्रलेखाची ही कल्पना अशीच चांगल्या प्रकारे राबवली जाईल असा विश्वास आम्ही बाळगतो. या निमित्ताने मिपाने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्यासारख्या मायबाप मिपाप्रेमींच्या पाठबळ आणि भरवश्यावरच!

आम्ही समस्त मिपाकरांतर्फे मुक्तसुनीत यांचे आभार मानतो व त्यांना मनापासून शुभेच्छा देतो....

शुभं भवतु!

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.

आता जाता जाता थोडं ह घ्या - :)

मुक्तसुनीत यांना एकच जाहीर परंतु नम्र विनंती -

त्यांच्या पहिल्याच अग्रलेखाचे शीर्षक,

"तात्याचे डोके ठिकाणावर आहे काय?"

असे असू नये असे मनपासून वाटते! :)

आपला,
(टिळकभक्त!) तात्या.

प्रतिक्रिया

मानस's picture

30 Jun 2008 - 4:21 am | मानस

फारच चांगली बातमी. पहिल्या लेखनास 'मुक्तसुनीत' ह्यांना शुभेच्छा.

वाट पहात आहे.

तात्या हा उपक्रम खूपच चांगला आहे. मनापासुन धन्यवाद.

एडिसन's picture

29 Jun 2008 - 11:56 pm | एडिसन

माझ्याही शुभेच्छा! आता काहीतरी सकस वाचायला मिळणार नक्की..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

वरदा's picture

30 Jun 2008 - 1:03 am | वरदा

माझ्याही शुभेच्छा!

फटू's picture

30 Jun 2008 - 2:14 am | फटू

मिपाचे पहिले पाहूणे संपादक मुक्तसुनीत यांना शुभेच्छा !!!

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

नंदन's picture

30 Jun 2008 - 2:15 am | नंदन

सुरुवात जोरदार होणार, तर. उत्तम वाचायला मिळणार याची खात्री आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

30 Jun 2008 - 8:54 am | चित्रा

अगदी असेच! पहिल्या लेखाची वाट पाहत आहे..

मेघना भुस्कुटे's picture

30 Jun 2008 - 6:52 am | मेघना भुस्कुटे

लेखाची वाट पाहते आहे.

चतुरंग's picture

30 Jun 2008 - 8:22 am | चतुरंग

प्रथम पाहुणे संपादक मुक्तसुनीत यांना शुभेच्छा! आतापासूनच काय वाचायला मिळते ह्याची उत्सुकता आहे पण ती ७ जुलै पर्यंत ताणून ठेवावी लागणार :W !
मिपा च्या ह्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ एका सकस लेखनाने होईल हे नक्की.
पुन्हा एकदा तात्या ह्यांना प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि मुक्तसुनीत यांना त्यात तातडीने सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद!

चतुरंग

प्राजु's picture

30 Jun 2008 - 2:11 pm | प्राजु

तात्या आणी मुक्तसुनित यांना शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

30 Jun 2008 - 8:28 am | विकास

मुक्तसुनीत यांना शुभेच्छा!

वाचायला उत्सुक आहे.

तात्यांनी अग्रलेखाचे मथळे कसे असावेत हे सुचवले आहेच - त्याचा कौशल्याने वापर कराल अशी आशा करतो ;)

आनंदयात्री's picture

30 Jun 2008 - 11:08 am | आनंदयात्री

अग्रलेखाची वाट पहात आहे :)

>>"तात्याचे डोके ठिकाणावर आहे काय?"

=)) =))

रामदास's picture

30 Jun 2008 - 8:40 am | रामदास

स्वागत करू या नविन कल्पनेचे आणि पहिल्या अतीथी संपादकाचे.
ओपनींग बॅट्समन छान निवडला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत यांना शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळा_पहाड's picture

30 Jun 2008 - 12:33 pm | काळा_पहाड

पहिल्या पाहुण्या संपादकांना शुभेच्छा.
वाचनोत्सुक काळा पहाड

बेसनलाडू's picture

30 Jun 2008 - 12:42 pm | बेसनलाडू

लेखाबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत.
(उत्सुक)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

30 Jun 2008 - 1:04 pm | धोंडोपंत

मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाच्या प्रतिक्षेत.

धोंडोपंत

आमचे मास्तर कुठे गेले? मास्तर म्हणजे प्रा. डॉ. बिरुटे मास्तर.

मास्तर....... तुम्ही पण संपादक व्हा आणि व्याकरणावर लिहा.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अजिंक्य's picture

30 Jun 2008 - 4:18 pm | अजिंक्य

नवीन (पाहुण्या) संपादकांस अग्रलेखासाठी शुभेच्छा!

मदनबाण's picture

30 Jun 2008 - 4:29 pm | मदनबाण

मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाची वाट पाहतोय.....

मदनबाण.....

II राजे II's picture

30 Jun 2008 - 4:52 pm | II राजे II (not verified)

मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाची वाट पाहतोय.....

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता !!

ऋषिकेश's picture

1 Jul 2008 - 9:41 pm | ऋषिकेश

मुक्तसुनीतरावांनी मान पटकावला तर! लै बेस झालं.. एकदम झ्याक वाचाया मिळणार ह्याची ग्यारंटी :)
मुक्तसुनीतराव,
अनेकोत्तम शुभेच्छा आणि अभिनंदन

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवराव's picture

2 Jul 2008 - 6:15 am | केशवराव

मुक्त सुनित यांच्या प्रथम अग्रलेखाची आतुरतेने वाट पहात आहोत. हार्दिक शुभेछ्या.

धमाल नावाचा बैल's picture

2 Jul 2008 - 9:44 am | धमाल नावाचा बैल

है शाब्बास!
पहिल्या अग्रलेखाची हा बैलोबापण पाहतो आहे! तात्या म्हणतो तसा एकदम जळजळीत अग्रलेख येउ दे!!
जय मिसळपाव !!!!!

-बैलोबा

मुक्तसुनीत's picture

2 Jul 2008 - 7:12 pm | मुक्तसुनीत

तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून , स्टेजवर काम करणार्‍या एका होतकरू , एक्स्ट्रॉ मधल्या नटाला, हाउसफुल्ल प्रयोगामधे , अचानक आपल्या वाट्याची दीड ओळ विसरल्यामुळे जे वाटेल तसे झाले आहे ! अहो कसला जळजळीत आणि कसले धीरगंभीर घेऊन बसलाय ! आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या , त्यातली आमची गत.

माझ्या चार ओळी लिहून मी तात्याना पाठवल्या आहेतच. योग्य वेळी त्या प्रकाशित होतील. पण त्याबद्दल भलत्यासलत्या अपेक्षा नकोत अशी विनंती करतो. मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे !

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 12:32 am | विसोबा खेचर

मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे !

ओहोहो, खल्लास! काय सालं वाक्य आहे राव! लै भारी, खूप आवडलं!

मुक्तराव, संपादक शोभता खरे! :)

आपला,
तात्या ऍन्ड कोलोमन कंपनी;
मिसळपाव टाईम्स. :)

शेणगोळा's picture

3 Jul 2008 - 1:12 am | शेणगोळा

त्यापेक्षा तात्या तुम्हीच का नाही लिहीत पहिला अग्रलेख तुमच्या अनुष्कावर? ;)

ह.घ्या.

असो. मुक्तसुनीतच्या अग्रलेखाची वाट पाहतो. मुक्तसुनीतला शुभेच्छा.

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jul 2008 - 7:39 am | श्रीकृष्ण सामंत

पाहुणा संपादकांचे मनापासून स्वागत.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

कलंत्री's picture

3 Jul 2008 - 7:35 pm | कलंत्री

मिपाने अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले आहे आणि त्यातला हा उपक्रम नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही.