साहित्यः-दोन पेले लाडू रवा(नेहमीच्या रव्यापेक्शा बारिक असतो).
एक पेला कणिक्.(गव्हाचे पीठ)
साजूक तूप.
पिठिसाखर
वेलची पूड.
कृती:- प्रथम कणिक कोरडीच भाजून घ्यावी.व बाजूला काढून ठेवावी.एका कढईत तूप घेऊन त्यात रवा चांगला
भाजून घ्यावा.त्यातच नंतर भाजलेली कणिक मिसळावी.व आच बंद करावी व मिश्रण थंड करण्यास
ठेवावे. नंतर त्यात वेलची पूड व पिठिसाखर मिसळावी.व लाडू वळावे.मिश्रण कोरडे वाटल्यास जरूर तेव्हढे
तूप मिसळावे. हे लाडू खुप दिवस टीकतात.
प्रतिक्रिया
17 Jun 2011 - 6:02 am | शिल्पा ब
रव्याच्या लाडूत कणिक हे पहिल्यांदाच वाचतेय. असते एकेकाची पद्ध्त.
17 Jun 2011 - 8:28 am | ५० फक्त
अरे किती लाडु करताय संपला नाहि का रवा अजुन, उरला असेल तर उप्पीट, डोसे, शिरा असं वेगळं काहितरि करा की.
अवांतर - हा प्रतिसाद लाडवांवर मनुका लावलेल्या न दिसल्यानं चिडुन दिलेला आहे. बाकी कणिक घालणे हा प्रयोग करुन पाहायला हवा.
17 Jun 2011 - 3:32 pm | ज्योति प्रकाश
अहो काय करणार्,रवा संपला तरी परत आणून लाडू करून ठेवावे लागतात म्हणजे नवरोजींची भूक लागली हि कटकट मागे नसते डबा समोर ठेवला कि झालं.
17 Jun 2011 - 10:03 am | निवेदिता-ताई
छान प्रकार आहे....करुन पाहिला पाहिजे..
17 Jun 2011 - 5:22 pm | आचारी
तुम्हि खवा नाहि घालत का?
18 Jun 2011 - 8:27 pm | सानिकास्वप्निल
वेगळा प्रकार आहे.
टिकत असल्यामुळे प्रवासात घेऊन जायला बरे पडतील.
19 Jun 2011 - 12:28 pm | भारी समर्थ
आपल्याला नाही आवडत राव रव्याचा लाडू. कितीही काहीही करा, पण २ दिवसांत रव्याला वास लागायला सुरूवात होते.
असला ड्राय शिरा खाण्यापेक्षा दरवेळी थोडी मेहनत करून (फारशी नाही कारण, शिर्यासाठी कापाकापी करावी लागत नाही) मस्त तुपाळ शिरा खाणं कधीही पसंत आहे आपल्याला.
भारी समर्थ