गाभा:
पुरुषोत्त्म लक्ष्मण देशपांडे नावचा पुरुषोत्तम लेखक १२ जुन २००० रोजी वरती स्वर्गात देवाला हसवण्यासाठी आपल्यातुन कायमचा निघुन गेला. जातीयवाद, ध्रर्म यांच्या चर्चांमध्ये या महान लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, गायकाला मानवंदना द्यायचे राहुन जाउ नये यासाठी हा वेगळा धागा.
२० हून आधिक पुस्तके, १५ पेक्षा अधिक नाटके, काही अविस्वरणीय व्यक्तिरेखा आणि २५ एक चित्रपटांना अजरामर बनविणार्या या महान व्यक्तिमत्वाला माझा सलाम.
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 6:18 pm | धमाल मुलगा
ज्या माणसानं आम्हाला हसायला शिकवलं, न पाहिलेलं जग दाखवलं, नारायण, रावसाहेब, हरीतात्या असे एकेक नग भेटवले...तो आमचा सहृद गेलाच नाही. आजही हाक मारली तरी आमच्या मनाच्या गाभार्यातून ओ देतो.
13 Jun 2011 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
ऑ ?
जन्माल आलेल्या देशातच राहून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र हसवेल असे लिखाण करणारा माणूस महान कसा काय ? बर ते चपला वैग्रे पण घालुन फिरायचे म्हणे, आणि वेळच्या वेळी केस वैग्रे पण कापायचे डॉक्यावरचे.
असो..
तुमची महान व्यक्तिमत्वाची व्याख्या वेगळी दिसते.
13 Jun 2011 - 8:10 pm | अप्पा जोगळेकर
पु.ल. देशपांडे म्हणजे एकदम ग्रेट माणूस. अभिवादन.
जातीयवाद, ध्रर्म यांच्या चर्चांमध्ये या महान लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, गायकाला मानवंदना द्यायचे राहुन जाउ नये यासाठी हा वेगळा धागा.
यासाठी तुमचे खास अभिनंदन.
13 Jun 2011 - 8:37 pm | शिल्पा ब
पु. ल. ना अशा मानवंदनेची काहीच आवश्यकता नाही. कोणत्याही मराठी माणसाच्या मनातुन त्यांचे नाव पुसले जाणे अशक्य आहे. रोज कोणत्या ना कोणत्या प्रसंगात त्यांच्या एखाद्यातरी वाक्याची आठवण येतेच.
13 Jun 2011 - 11:47 pm | अग्रजा
+ १
13 Jun 2011 - 11:47 pm | श्रीरंग
हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन
14 Jun 2011 - 3:36 pm | अजातशत्रु
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन......./\........
काहि माणसं आपल्या कला,गुणांनी, कर्तुत्वानी जाती- धर्माच्याहि पलिकडे गेलेली असतात...
काहि लहान व्यक्तींना कितीहि मोठे केले आणी काहि महान व्यक्तींना कितीहि लहान केले
तरी त्यांची लोक मानसात असेलेली आहे ती प्रतिमा पुसली जात नाहि,,
त्यातलेच एक उत्तुंग व्यक्तीमत्व पुरुषोत्त्म लक्ष्मण देशपांडे..
हे टंकून मखराला कार्डबोर्ड लावल्या सारखे वाटले...
अवांतरः बाकि जातीयवाद, ध्रर्म यांच्यावरिल रोचक चर्चां काहिंच्या खरडवहित मुबलक प्रमाणात आढळून येतील,( व्यनी दिसण्याची सोय नाहि नाहि तर... ;))
त्या जाहिरपणे धाग्यावर होत नाहित या वरुन मुख में राम बगल में छुरी असं काहिसं आठवलं.. :)
काहि आक्षेप/शंका घेणार्यांचे वाईट वाटले हेच आमच्या कडुन झाले असते तर, आम्हाला द्वेष्टे म्हणून बाकिचे मोकळे झाले असते :)
15 Jun 2011 - 10:58 am | मृत्युन्जय
कृपया काळा चष्मा काढुन प्रतिक्रिया द्यावी ही विनंती. हा धागा पु लं ना आदरांजली वाहण्यासाठी आहे. आपण आपली मतमतांतरे बाजूला ठेवुन एका महान व्यक्तीला आदरांजली वहावी या उद्देशाने जाती आणि धर्माचा उल्लेख होता अणि तसे करतानाही कोणावरही टीका केलेली नाही किंवा कोणीही चुकीचे वागते आहे असेही लिहिलेले नाहे आहे.
कोण खरडवहीत काय लिहिते, व्यनि मधुन काय विचार व्यक्त करते, कोण सडके धागे काढते कोण कुजक्या प्रतिक्रिया देते याचे या धाग्याशी काही घेणे देणे नाही. आपण इतर कुठलातरी योग्य तो धागा बघुन आपल्या मनातली गरळ ओकावीत ही विनंती.
हा माझा आपल्याला या धाग्यावर शेवटचा प्रतिसाद. अजुन काही लिहायचे असल्यास व्यनि अथवा खरड करु शकता. या धाग्याचे पावित्र्य राखावे ही नम्र विनंती.
15 Jun 2011 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
"आपण इतर कुठलातरी योग्य तो धागा बघुन आपल्या मनातली गरळ चोप्य पस्ते करावीत ही विनंती." असा बदल सुचवतो.
धन्यवाद.
14 Jun 2011 - 3:48 pm | दिपक
पु.लंचं एक उत्स्फूर्त भाषण.त्यानंतर वसंतरावांचं गाणं आणि त्याला पुलंच्या पेटीची तोडीची साथ!
Get this widget | Track details | eSnips Social DNA
http://www.esnips.com/doc/f4df28e6-63b7-4eb7-a112-06e108c2d658/Pula-aani...
15 Jun 2011 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा
दोन दिग्गजांची खय्रा अर्थानी लाईव्ह भेट,तीही अश्या स्थळी,घालुन दिलित याबद्दल मनापासुन धन्यवाद
15 Jun 2011 - 12:09 am | आत्मशून्य
आवडते लेखक पु.ल. देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
15 Jun 2011 - 2:22 pm | ऋषिकेश
मागे पुस्तकविश्ववर लिहिले होते तेच लिहितो (चोप्य्-पस्ते करायला पुवि उपलब्ध नाही तेव्हा आठवणीतून लिहितो.)
पु.ल. रोज भेटतात. सतत दिसतात.. कोकणातल्या प्रवासात हटकून अंतु बर्वा, मधु मलुष्टे, झंप्या दामले दिसतात, आम्हाल यस्टी अजूनही 'होय होय होय - नाही नाही नाही' करणारी जन्ता दिसते, आमच्या लेखी अजूनही कितीही सुंदर फुल पाहिलं तरी 'आमच्या पेशवे पार्कातील फुलं कुरूप नाहीत' हे आठवतं, अनेक वर्षे आम्ही 'चालती-बोलती प्रेक्षणीय स्थळे' बघण्यात घालवली आहेत/होती, शेपटा उडवण्यार्या/कुरमुरे उडवल्यासारखे हसणार्या पोरी कमी झाल्या असल्या तरी दिसल्या की सरोज खरे (आपली) आठवल्यावाचून राहत नाही, दर लग्नात नारायण अजूनही दर्शन देतो, गटण्यांची संख्या तर वाढतेच आहे, तेव्हा अपवादाने दिसणारी गुळगुळीत साबणाच्या सुंदर वड्यांसारखी चौकोनी कुटुंबे आता सर्वत्र दिसताहेत, "तो" चा प्रभाव तर जाणवेल इतका वाढला आहे,.......
थोडक्यात काय असा दिवस जात नाही जेव्हा पुलंनी केलेले चपखल वर्णन आठवत नाही.. तेव्हा पुलं या दुनियेत नाहीत हे मी मान्य करत नाही तेव्हा मानवंदना देतो मात्र श्रद्धांजलीचा प्रश्नच येत नाही
15 Jun 2011 - 2:49 pm | मृत्युन्जय
सुरेख प्रतिसाद.
15 Jun 2011 - 2:31 pm | गवि
कधी गेले पुलं ?
काही गेलेबिले नाहीत..
काहीतरी बोलायचं उगाच.
15 Jun 2011 - 8:50 pm | अर्धवट
अगदी असंच
15 Jun 2011 - 6:07 pm | नगरीनिरंजन
सर्व प्रकारच्या सौंदर्याचा उपासक असलेल्या, कुरुपतेवर निर्भयपणे प्रहार करणार्या, कित्येक रडक्या चेहर्यांना क्षणात हसरं करणार्या, नम्रतेच्या गबाळ्या वेशात नाना कळा बाळगणार्या, सरस्वतीचा पुत्रच असलेल्या त्या मराठी संस्कृतीच्या कोटिसूर्य खेळीयास माझे सादर अभिवादन.