आहे का कोणी ?

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
14 Jun 2011 - 10:47 am
गाभा: 

अमरजीतसींग हा आर्थिक क्षेत्रात फार मागे, मात्र बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत केलेला आणि नव्या शिखरांची स्वप्ने रंगवणारा विद्यार्थी. ह्या वेळच्या बारावीच्या परीक्षेत ह्या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५७८ गुण मिळवले. येवढेच करून न थांबता आज लागलेल्या CET च्या परीक्षेत त्याने २०० पैकी १९२ गुण पटकावून घवघवीत यश संपादन केले.

पण आता पुढील शैक्षणिक खर्चाचे काय? घरच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून तो पुढे शिकू शकेल ? का हि बुद्धिमत्ता झाकोळून जाणार ? हे प्रश्न मनात उभे राहतं असतानाच तुमच्या आमच्यातूनच एक मदतीचा हात पुढे येतो आणि त्याच्या पुढील चार वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो. हा हात असतो त्याच्या गुरुचा, आजवर ज्यांनी मार्गदर्शन केले, वेळोवेळी आधार दिला त्या गुरुचा... आपल्या प्रभूगुर्जी अर्थात विनायक प्रभू ह्यांचा.

ह्या अमरजीत प्रमाणेच तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक अमरजीत अशा हाताची वाट बघत असतील. हा हात त्यांच्यापर्यंत पोचवा. सध्या हा हात फक्त मुंबई पुरताच मर्यादित आहे, पण लवकरच तो सगळ्या भारतात उपलब्ध होईल हे निश्चित. प्रभू गुर्जींची तुमच्या आमच्या कडून ह्या कार्यासाठी एकाही पैशाची अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त येवढीच आहे की असे एखादे बुद्धिवान रोपटे तुमच्या आजूबाजूला असेल तर ते सुकू देऊ नका.

ज्या विद्यार्थ्याने बारावीच्या यशा बरोबरच CET मध्ये १६५+ मार्क मिळवले असतील आणि ज्याच्या घरचे उत्पन्न वार्षिक २,४०,००० पेक्षा कमी असेल (आणि खरेच असेल, अन्यथा घरी मार्बल टाईल्स असताना देखील असे उत्पन्न कमी असल्याचे दाखले देणारे देखील काही महाभाग आहेतच) आणि ज्याला शासकीय महाविद्यालयात इंजिनीअरिंग अथवा मेडिकल, डेंटल साठी ऍडमिशन मिळत असेल त्या मुंबईच्या गरजू विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलायला हा हात समर्थ आहे.

गुर्जींच्या कार्यात तुमचा देखील थोडाफार हातभार ह्या निमित्ताने लागावा येवढीच ह्या लेखनाची अपेक्षा. अजूनही काही माहिती हवी असल्यास प्रभू गुर्जी ह्या धाग्यावर ती देतीलच. तसेच लेखनात अजून काही कमी असल्यास ते गुर्जींच्या प्रतिक्रियेत वाचायला मिळेलच.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

14 Jun 2011 - 11:05 am | शिल्पा ब

अरे वा!!! प्रभुगुर्जी प्रेरणादायक काम केलेत.

नरेशकुमार's picture

14 Jun 2011 - 11:06 am | नरेशकुमार

खुप चांगले कार्य सुरुवात केले आहे.
.
.
.
मनापासुन आशिर्वाद लागतील बघा लोकांचे !
कार्याचा विस्तृत आढावा येउद्यात.

प्रचेतस's picture

14 Jun 2011 - 11:10 am | प्रचेतस

असेच म्हणतो.

शानबा५१२'s picture

14 Jun 2011 - 11:18 am | शानबा५१२

अशी माणुसकी व असे लोक आहेत म्हणुन जग आहे,नाहीतर दलिदंर विचार व भिकार आचार ह्याचीच रेलचेल आज जास्त दीसते.

लेख वाचुन झाल्यावर आपण स्वःता काही करु शकत नाही ही भावना कमीपणा देउन गेली.

पाषाणभेद's picture

14 Jun 2011 - 12:53 pm | पाषाणभेद

प्रभू की माया अपरंपार है !

(माया - ममता या अर्थाने, अर्थातच कुलकर्णी नाही.) (येथेही अर्थ हा पैसा या अर्थाने नव्हे तर तर्‍हेने. तर्‍हेवाईक तर्‍हेने नव्हे.)

{समजलं तर सांगा}

चांगला उपक्रम!
जरुर सामील होवु.
मी ही जमेल तशी मदत (मिळवता झाल्यावर परत देण्याच्या बोलीवर ) करत असतोच.
६०० पैकी ५७८ गुण आणि २०० पैकी १९२ गुण म्हणजे बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत करणे हे नविनच कळ्ले, मी आपल मार्कांचा आणि खर हुषार असण्याचा फारसा संबध नाही अस समजत होतो. चुकीच असाव ते.

श्रावण मोडक's picture

14 Jun 2011 - 5:14 pm | श्रावण मोडक

वेल, ते मार्क म्हणजे केवळ निर्देशांक आहेत. ही मुलं हुशार असतातच. पण आपल्या मार्क्सवादी व्यवस्थेत त्यांच्याकडे हे मार्क नसल्यानं मागं पडतात. मग, माझ्या माहितीप्रमाणे, असे मार्क अजिबात नसणाऱ्यांना हा मास्तर सावरून, शिकवून, कष्ट करून घेत त्या मार्कांपर्यंत नेत असतो. म्हणून मास्तरच्या या कामाचे मोल अधिक (कदाचित, हे तुम्हालाही माहिती असेल).
मास्तर आणि परा, बरोबर आहे ना?

अभिज्ञ's picture

14 Jun 2011 - 1:47 pm | अभिज्ञ

उत्तम उपक्रम.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

अभिज्ञ.

विनायक प्रभू's picture

14 Jun 2011 - 4:53 pm | विनायक प्रभू

@ अभिज्ञ
मेडीकल्,डेंटल, इंजिनियरींग क्षेत्राचा खर्च पालकांना झेपत नाही म्हणुन.

टारझन's picture

14 Jun 2011 - 5:53 pm | टारझन

हुषार विद्यार्थांनी फक्त मेडिकल किंवा इंजिनियरींगलाच जावे असे काहीसे दिसते आहे. त्यात खर्च तर जास्त आहेच.
परंतु मेडिकल मध्ये कमवते किंवा करियर सुरु होण्यासाठी किमान ६-७ वर्षं (नंतर पिजी + ) लागतात. इंजिनियरींग ला तर उठसुठ अ‍ॅडमिशन घेतले जाते, सिटंही खुप वाढली आहेत.
तेंव्हा नुसतंच मेडीकल-इंजिनियरींग न करता बाकीच्या करियर अपॉर्च्युनिटीज विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं तर खुप फायदा होउ शकेल ( उदा . मर्चंट नेव्ही , नेव्ही , एयरमन , एनडीए, इत्यादी ) बरेच फेमस नसलेले कोर्स करियर साठी उत्तम असु शकतील असे उंटावरुन शेळ्या हाकता हाकता णमुद करावेसे वाटते

- (नेव्हीत जाता जाता राहिलेला) आय एन एस संक्रांत

माझ्या अतिशय जवळच्या माहितीत एक व्यक्तीने मुलाला बी कॉम ला जायला उद्युक्त केले. आता एम सी एस (मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स) करु घातला आहे. एमसी एस ला देखील आय टी मध्ये करियरच्या उत्तम संधी आहेत. कॉमर्स ब्याकग्राऊंड मुळे वेगळा फायदा होतो.

आणखी एक उदाहरण - अतिशय चांगल्या ओळखीतली एक मुलगी जर्मन भाषा उत्तम शिकून भाषांतराचे काम करते. अनेक कंपन्या तिच्याकडून काम करुन घेतात. अक्षरशः प्रत्येक शब्दाचे पैसे मोजून घेते. कंपन्या वेटिंग लिस्ट्वर असतात काम करुन घ्यायला!

अशा वेगवेगळ्या करिअर्सना उत्तम संधी आहेत, फक्त त्या गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत ही दु:खाची बाब आहे.

मास्तरांच्या कामाला कुठेही कमी लेखण्याचा उद्देश नाही. ते करत असलेले काम हे अत्युच्च दर्जाचे सामाजिक काम आहे हे निर्विवाद! त्यात इंजिनिअरिंग आणि मेडीसिन व्यतिरिक्त नवीन करिअर्स सुद्धा चाचपता आल्या तर उत्तम. जमेल तसा सहभाग नेहेमीच घ्यायला आवडेल हे मागेही नमूद केले आहे ते पुन्हा उधृत करतो. शुभेच्छा!

-रंगा

धन्या's picture

16 Jun 2011 - 12:53 am | धन्या

माझ्या अतिशय जवळच्या माहितीत एक व्यक्तीने मुलाला बी कॉम ला जायला उद्युक्त केले. आता एम सी एस (मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स) करु घातला आहे. एमसी एस ला देखील आय टी मध्ये करियरच्या उत्तम संधी आहेत.

शिक्षण कोणत्याही विदयाशाखेत घेतलं असलं तरी जर आपल्यात कुवत असेल तर आयटी कंपन्यांची दारे उघडी असतातच.

असाच कधीतरी बिकॉम वगैरे झालेला सहाध्यायी सो कॉल्ड प्रोसेस एक्स्पर्ट किंवा डोमेन एक्स्पर्ट असलं फॅन्सी लेबल स्वतःला चिकटवून बाजूला लावून बसला आणि आपली सिस्टीम डिझाईनची भाषा त्याला कळली नाही, की "कुठून आला वायझेड तिच्यायला" असं निदान तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या शिवाय राहवत नाही.

- धनाजीराव वाकडे

आनंदयात्री's picture

14 Jun 2011 - 7:15 pm | आनंदयात्री

टारझनशी सहमत

आम्हाला प्रिय भारतिय आर्मी !

त्याबाबत माहीती येथे देत आहे

Indian Military Academy is the Premier Training Institute for the officers of the Indian Army.
Admission in IMA is through CDS(Civil Defence Services) Exam conducted by UPSC.
Eligibility for giving CDS is graduation in any stream.
Written paper for CDS is conducted twice a year in February and September, notifications for which are released in September for February exam and April for September exam in Employment news of the major newspapers and UPSC website http://www.upsc.gov.in
The candidates who clear the written test are called for Physical and Medical test clearing which they get admitted to IMA.

इतर विंग (नेव्ही, एअर फोर्स ) बाबत माहीती मिळाली तर नक्कीच देइन

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jun 2011 - 11:20 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. आर्मी इंजिनियरिंग सर्व्हीसेस हा देखील एक उत्तम पर्याय आहे. पुण्यातल्या CME मधे याचा कोर्स असतो. १२वीला कमीतकमी ७० टक्के मार्क आवश्यक असतात. लेखी परीक्षा नसते डायरेक्ट SSB. चांगला पर्याय आहे हा देखील.
-(आर्मीत न जाऊ शकलेला) पुण्याचे रणगाडे

सुहास..'s picture

16 Jun 2011 - 4:07 pm | सुहास..

पुण्यातल्या CME मधे याचा कोर्स असतो. १२वीला कमीतकमी ७० टक्के मार्क आवश्यक असतात. लेखी परीक्षा नसते डायरेक्ट SSB. चांगला पर्याय आहे हा देखील. >>>

रणगाड्या शी सहमत !

नक्कीच!
पूर्वी गुर्जींचे लेख १०वी १२वी च्या निकालानंतर यायचे ते आठवले.

विनायक प्रभू's picture

14 Jun 2011 - 6:28 pm | विनायक प्रभू

सुचना चांगली आहे.
पुढच्या वर्षी पटावर घ्यायला हरकत नाही.
उंट आणि शेळ्या हॅहॅहॅ

विसोबा खेचर's picture

15 Jun 2011 - 10:34 am | विसोबा खेचर

व्वा..!

स्पा's picture

15 Jun 2011 - 10:40 am | स्पा

मी जेंव्हा अ‍ॅनिमेशन करण्याचा निर्णय घेतला, तेंव्हा अनेक जणांच्या भुवया उंचावल्या , बी कॉम ला ७० % मार्क्स मिळालेला मुलगा MBA किंवा CA ला न जाता, पोराटोरांच कार्टून काय शिकतोय?
पण माझी आवड या सर्वांना पुरून उरली आणि आई बाबांचा पाठींबा तर होताच.
आज मी या क्षेत्रात असल्याचा मला अभिमान आहे, आणि माझ्या आई बाबांना सुद्धा :)

टारझन's picture

15 Jun 2011 - 11:08 am | टारझन

स्पा ह्यांच्या निर्णयाशी सहमत आहे . कारण हा Confidence केवळ स्पा ह्यांच्या पिढीतच आहे. एका चुटकी सरशी थ्रीडी मॉडेल्स ( बायांच्या नव्हे , लागले लगी भुवया उंचवायला) सादर करणे , फोटो मिक्सिंग करणे , एनिमेशन करणे आणि कधीही हार ना माणने हा अ‍ॅटिट्युड केवळ स्पा ह्यांच्या पिढीत आहे. त्यांचं आयडॉलिजिम असणारे गेली १८ वर्षे सतत जिंकलेले बुकर अ‍ॅवॉर्ड विनर , अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड विनर , ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विनर , भारतभुषण विनर आणि एडिटर इन चिफ, (नि)बंधउर्मी.कॉम श्री.श्री. कोदा ह्यांच्यामुळे त्यांच्यात हा अ‍ॅटिट्युट आला असे आयडॉलीजिम दिनी अभिमानाने णमुद करावेसे वाटते. आजच्या तरुण पिढी समोर असे आदर्श फार कमी आहेत,
स्पा आणि कोदा बरोबर आहे ना ?
बिकॉज ..
येस वी आर ...

_____________________________________________

- गावड्या ( मारु'तीचा लोगो )

धन्या's picture

16 Jun 2011 - 1:13 am | धन्या

सोडा बिचार्‍याला :)

आय आय टी जेईई करत तो
सार्‍या गावभर बोंबलत सुटला
मी त्याला पवईला शोधत होतो
पण हा मात्र कोल्हापूरात भेटला

- धनाजीराव वाकडे

स्पा's picture

15 Jun 2011 - 11:06 am | स्पा

कोण टारझन का?

असो .

धनंजय's picture

16 Jun 2011 - 1:42 am | धनंजय

चांगले कार्य आहे.
विद्यार्थ्यांनी अन्य व्यवसायांकडेसुद्धा बघावे, त्याबाबत सुचवण्यासुद्धा चांगल्या आहेत.

कौशी's picture

16 Jun 2011 - 7:17 pm | कौशी

प्रभु सर,

खुप छान कार्य आहे,

पैसा's picture

16 Jun 2011 - 7:39 pm | पैसा

अशा मुलाना सर्वानीच जमेल तशी मदत केली पाहिजे. यानिमित्ताने एक मनात आलं, मध्यम दर्जाची बुद्धिमत्ता आणि परिस्थिती असलेली मुलं आता शैक्षणिक कर्ज घेऊन शिकू शकतात पण जी मुलं अगदी गरीब घरातली आणि बुद्धीने सुमार असतात, त्यानी गैरमार्गाला न लागता काही धंदेशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं रहावं या दृष्टीने प्रयत्न करणार्‍या काही संस्था वगैरे आहेत का? निदान त्याना काय संधी उपलब्ध आहेत याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणं शक्य आहे का?