चैत्य-भूमीला कसली मरणाची गर्दी होती यार !
अरे भैईया वो चैत्यभुमी मे उतरके चौपटीके चैत्यभुमी कोनसी बस जाती है !
चैत्य-भूमीच्या ब्रीजवर आलोकी गर्दिने धडकी बसते !
----------------------------------------------
अशी वाक्य आता सहज एकू येऊ लागतील , दादर स्थानकाच चैत्य-भुमी नामकरण करण्याचा मानस काही दादा मंडळींनी जाहीर केल्यापासून अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
मराठवाडा विद्यापीठाच नामांतर काय किवा वी-टी ते सी-एस-टी काय प्रत्येक नामांतर कालांतरांनी स्वीकारले गेले , तस कदाचित हे ही स्वीकारले जाईल.
पण राष्ट्र-वदिने टाकलेल्या गुगली वर जवळपास सर्वच पक्षाची पंचाईत झालेली दिसते , राज ठाकरेंनी ह्याला त्वरित विरोध केला तर शिवसेनेनी बारमातीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (की चैत्य-भुमी) असा प्रती टोला दिला !
सध्या तरी राजनी जी भूमिका घेतली आहे ती मला पटते आहे पण जर नामांतर झाले तर जे काही राडा करतील त्याला कदाचित नसेल !
आता ह्या निमित्ताने बरेच प्रश्न उभे राहतात ! (पुढचे काही फक्त निमित्त मात्र अजूनही बरेच असतील , जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा )
१. सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय प्रश्न परत यशस्वी होतील काय ?
२. अस नामांतर जर खरेच झाले तर नक्की कोणाला आनंद किवा कोणाला दु:ख होईल ? म्हणजे कुठले राजकीय पक्ष फायद्यात राहील ?
३. ज्याना कुठल्याच जातीय राजकारणात न पडता देखील दादर ह्या नावाची नाळ तोडण्याची इच्छा नसेल तर त्यानी कुठल्या मार्गाने आपला विरोध दाखवावा ?
४. असल्या विषयाने उडालेल्या धुरल्या मुळे खरे प्रश्न महागाई / भ्रष्टाचार जनता विसरली नाही ह्याची जाणीव राजकीय पॅक्षाना कशी आणि कोण करून देणार ?
प्रतिक्रिया
5 Jun 2011 - 7:35 pm | मुक्तसुनीत
अलिकडे वाचलेला विनोद : "दादरला जर का चैत्यभूमे म्हणायचं तर मग बारामतीला दैत्यभूमी म्हणावे का ?" ( सर्व मा. चंद्ररावजी आणि त्यांच्या समर्थकांनी हलकेच घ्यावे. )
14 Jun 2011 - 7:49 pm | दैत्य
दादरला जर का चैत्यभूमे म्हणायचं तर मग बारामतीला दैत्यभूमी म्हणावे का ?
हरकत नाही! ;)
5 Jun 2011 - 10:47 pm | माझीही शॅम्पेन
:)
6 Jun 2011 - 12:04 am | रेवती
१. सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय प्रश्न परत यशस्वी होतील काय ?
थोडे थोडे दिवस प्रत्येक पक्ष यशस्वी असला तरी बेगमी होऊन जाते. (अर्थात स्वानुभव नाही पण त्यांच्या खरेद्यांमध्ये वाढ झालेली दिसते.)
२. अस नामांतर जर खरेच झाले तर नक्की कोणाला आनंद किवा कोणाला दु:ख होईल ? म्हणजे कुठले राजकीय पक्ष फायद्यात राहील ?
दादर हे नाव आवडणार्यांना आणि त्याची सवय झालेल्यांना दु:ख होइल तर इतर काही करणाने दु:ख झालेल्यांना उगीचच झालेल्या नामांतराने आसुरी आनंद होइल. कोणत्यातरी दोन शक्तींना फायदा होण्याची शक्यता जास्त.
३. ज्याना कुठल्याच जातीय राजकारणात न पडता देखील दादर ह्या नावाची नाळ तोडण्याची इच्छा नसेल तर त्यानी कुठल्या मार्गाने आपला विरोध दाखवावा ?
अशा लोकांनी दादर म्हणत रहावे.....दुसर्यांकडे लक्ष देवू नये. काही वर्षांनी पुन्हा नाव बदलणार आहे हे ध्यानात ठेवल्यास सोपे जाईल. विरोधाचा उपयोग नाही. रात्री झोपेत असताना मार मिळतो.
४. असल्या विषयाने उडालेल्या धुरल्या मुळे खरे प्रश्न महागाई / भ्रष्टाचार जनता विसरली नाही ह्याची जाणीव राजकीय पॅक्षाना कशी आणि कोण करून देणार ?
जाणीव करून देण्याची गरज नाही. त्यांना माहितच आहे. तरीही लोक जगू शकतात ना? हेच सध्या तपासत आहेत. जनतेनेही बेशिस्त होण्याचा आग्रहच धरल्याने राजकीय पक्षांचा नाईलाज आहे.
6 Jun 2011 - 9:53 am | स्पा
सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय प्रश्न परत यशस्वी होतील काय
मी तर असे म्हणेन कि सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे धागे परत यशस्वी होतील काय
6 Jun 2011 - 10:11 am | माझीही शॅम्पेन
यशस्वी धागा हा काय प्रकार आहे बुवा ! अशी कुठलो रेसेपी मला तरी माहीत नाही , जे जाणवल ते लिहिल !
सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय प्रश्न परत यशस्वी होतील काय !
कृपया हे असे वाचावे
सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय पक्ष परत यशस्वी होतील काय
6 Jun 2011 - 11:20 am | भारी समर्थ
जांदो यार शॅम्पेन....
जसं तुम्हाला कोणाचं तरी काहीतरी नाही खपलं, तसंच तुमच्या वरच्या प्रतिक्रियाकर्त्यालाही तुमचं हे लिखाण नसेल खपलं. यशस्वी धागा वगैरे फसव्या गोष्टी आहेत हे तुम्हाला एव्हाना समजले असेलच. नसेल समजले तर परत एकदा जांदो यार!
भारी समर्थ
6 Jun 2011 - 1:09 pm | माझीही शॅम्पेन
छे ! स्पा ची प्रतिक्रिया मला आवडली नाही अस मी म्हटलाच नाही !
आपण स्पाच्या लेखनाचा पंखा आहोत !
यशस्वी "धागे" म्हणल्या मुळे जरा उत्सुकता वाढली :)
6 Jun 2011 - 10:04 am | माझीही शॅम्पेन
हे तितकास कळल नाही ?
एकदा दादरच नाव बदलून चैत्य-भुमी झाल की मला नाही वाटत ते पुन्हा कधी दादर होऊ शकेल. तितकी राजकीय धमक कुठलाच पक्ष दाखवू शकत नाही !
काच्या कै !
6 Jun 2011 - 10:40 am | तिमा
फेरीवालेभूमी
विठ्ठलभेळभूमी
साहित्यसंघभूमी
फोरासभूमी
यातायातभूमी
अश्वभूमी
मलनिस्सारणभूमी
इस्पितळभूमी
चैत्यभूमी
मद्रभूमी
खाडीभूमी
सुवासभूमी
लिंकिंगभूमी
विमानभूमी
ग्लुकोजभूमी
मनुष्यसागरभूमी
ही चर्चगेट ते अंधेरी यातील स्थानकांची नवीन नांवे समजावीत.
8 Jun 2011 - 12:28 pm | अमोल केळकर
हा हा हा . मस्त प्रतिसाद :)
अमोल केळकर
6 Jun 2011 - 10:45 am | नितिन थत्ते
कुर्ला टर्मिनसचे नाव लोकमान्य टिळक (की तिलक?) टर्मिनस झाले असले तरी लोक अजून त्याला कुर्ला टर्मिनसच म्हणतात.
6 Jun 2011 - 11:28 am | भारी समर्थ
साधारण किती टक्के लोक कुर्ला टर्मिनसला कुर्ला टर्मिनसच म्हणत असतील? मला आणि माझ्या परिचयातल्यांना 'ते' टर्मिनस 'एल टी टी' म्हणूनच माहिती आहे म्हणून विचारलं.
स्वत:चा मुद्दा रेटण्यासाठी 'लोक असे म्हणतात' किंवा 'लोकांचं असं मत आहे' असे आमचे 'दाढीवाले मामा' म्हणतात... तुम्ही नक्कीच त्यांच्यासारखे नसणार, हो ना थत्ते?
भारी समर्थ
6 Jun 2011 - 3:31 pm | नितिन थत्ते
लोक म्हणजे मी :)
14 Jun 2011 - 1:54 pm | भारी समर्थ
एकट्यानेच गर्दी करू शकण्याच्या आपल्या क्षमतेस त्रिवार अभिवादन!!!
भारी समर्थ
6 Jun 2011 - 11:48 am | गवि
नाव बदलले तरी वापरणार कोण.. ?
6 Jun 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
'मिसळपावचे नाव बदलुन बासुंदी पुरी' करावे ह्या 'दुर्लक्षित ब्राम्हण सेवा संघाच्या' जुन्या मागणीची ह्या निमित्ताने आठवण झाली.
असो...
परादास आठवले
संस्थापक अध्यक्ष
दुर्लक्षित पँथर संघ (मिसळपाव संस्थळ)
8 Jun 2011 - 12:30 pm | अमोल केळकर
:)
8 Jun 2011 - 12:30 pm | अमोल केळकर
:)
14 Jun 2011 - 7:54 pm | विजुभाऊ
बोरीबंदर ला छ शिवाजी टर्मिनस असे नामांतर करुनही मध्य रेल्वे त्याला सी एस टी असेच संबोधते.
चैत्यभूमीला "सी बी टी " असे संबोधेल.
काय साधनार आहे अशा नामांतराने?
14 Jun 2011 - 9:37 pm | अविनाशकुलकर्णी
पुण्याचे जिजापुर कधि होतय याची उत्सुकता आहे......
6 Dec 2017 - 6:50 pm | माझीही शॅम्पेन
खात्रीलायक सूत्रांकडून आलेल्या बातमीनुसार दादर स्थानकाचे नाव नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस ठेवा अशा आशयाचे पोस्टर फलाट भर भीम आर्मी या संघटनेने केली आणि पुन्हा ह्या धाग्याची आठवण झाली :)
..
तसही आता पुलाखालून बरच पाणी निघून गेल आहे , मागेच राज ठाकरेंनी बिनधास्त ह्याला विरोध केला होता त्याची सुद्धा आठवण झाली !!!
6 Dec 2017 - 7:13 pm | कपिलमुनी
नवी बातमी
7 Dec 2017 - 11:40 am | माझीही शॅम्पेन
नक्की कोण आहेत कोण हे भीम आर्मीवाले ? मागे यूपी मध्ये एक दोन घटने मागे ह्यांच नाव वाचालयचे स्मरते
7 Dec 2017 - 5:11 pm | कंजूस
इंदू मिलच्या जागेत एक मोठे स्मारक जाहिर झाले आहेच. जवळचे करी रोड स्टेशन होऊ शकेल नाव बदलून.
संजय गांधी उद्यान बोरिवलीत खरेतर गुंफा अगोदरपासून आहेत त्याचे बुद्धविहार नामकरण करावे. कॅान्ग्रेसनेच पुढाकार घ्यावा,काकाचं नाव काढावं,दुआ घ्यावा.