२८ मे : हिंदूहृदयसम्राट सावरकर यांना अभिवादन

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
27 May 2011 - 11:37 pm
गाभा: 

.
.
२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ या दिवशी त्यांचा भगूर, जि. नाशिक येथे जन्म झाला.

सावरकरांनी त्यांच्याजवळ असलेल्या वाणी, लेखणी अशा सर्व गोष्टी देशासाठी खर्ची घातल्या.

त्यांच्या वाणीचा धाक असा की इंग्रज सरकारने त्यांच्या राजकीय भाषणांवर बंदी घातली.

त्यांच्या लेखणीचाही धाक असा की इंग्रज सरकारने त्यांच्या 'जोसेफ मॅझिनी' या पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनावर बंदी घातली.
तरीही सावरकरभक्तांनी ते पुस्तक जर्मनीमधून प्रसिद्ध केले, त्यातील विचार भारतात पोचल्याशिवाय राहीले नाहीत.
अनेक क्रांतिकारकांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना मुखोद्गत केली, त्यातून प्रेरणा घेतली.

मदनलाल धिंग्रा, नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्तही सावरकरांना मानत असत, सावरकरांचा सल्ला त्यांना मोलाचा वाटे

परकी सत्तेविरुद्ध लढताना शस्त्रांचा आधार घेणेही सावरकरांनी वर्ज्य मानले नाही.
इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी इतर देशातील शक्तींच्या मदतीने इंग्रजी सता उलथवून टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली.
परंतु नेपोलियनच्या फ्रान्समधे त्यांच्या सहकार्‍यांना थोडा उशीर झाला आणि योजना अयशस्वी झाली. पण इंग्रज सरकार इतके हादरले
की त्यांनी सावरकरांना अंदमानच्या कोठडीत टाकले.
योजना अयशस्वी झाली तर इतक हादरा, यशस्वी झाली असती तर इंग्रज सरकारचे काय झाले असते.

एक आठवण:
चिंतामणराव कोल्हटकर हे मराठीतील एक नाट्यकलावंत आणि नाटक कंपनीचे मालक. सावरकर त्यांच्यासाठी 'संन्यस्त खड्ग' हे नाटक लिहीत होते.
त्यावेळी सावरकर आणि चिंतामणराव यांच्या अनेक भेटी होत असत, चिंतामणराव आपल्या मोटारीने सावरकरांकडे येत असत.
एकदा सावरकरांनी चिंतामणरावांना विनंती केली की "तुमच्या गाडीतून मला
समुद्राच्या कडेने चक्कर मारून आणाल का" ? ही विनंती चिंतामणरावांनी आनंदाने मान्य केली.
चिंतामणराव म्हणतात ज्यानी खरे म्हणजे आज्ञा करायची तो माणूस आम्हाला विनंती करीत होता. जर या माणसाने वकीलीची प्रॅक्टिस केली असती तर
आपल्या दारासमोर मोटारींच्या रांगा लावल्या असत्या.

हिंदूहृदयसम्राट
सावरकारांना हिंदूहृदयसम्राट असे एक बिरुद लोकांनी बहाल केले होते,

आज हिंदूहृदयसम्राट ही पदवी स्वत:ला चिकटवून घेण्याचा प्रकार काही लोक करताना दिसत आहेत

त्यामुळे काही फरकाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत
सावरकरांनी घरादाराची, संसाराची पर्वा केली नाही पण देशाचा संसार मात्र फुलवला.

सावरकरांनी आपली शक्ती, बुद्धि, संपदा देशासाठी खर्च केली, कुटुम्बाच्या कोटकल्याणासाठी नाही.
आपली बुद्धिमत्ता त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी वापरली, कुटुंबीयांच्या अपराधांवर पांघरूण घालण्यासाठी नव्हे

यामुळे
हिंदूहृदयसम्राट म्हटले की आम्हाला तात्याराव सावरकरच आठवतात दुसरे तिसरे कुणी नाही.

सावरकरांच्या जन्मदिनी आमचा सावरकरांना
मानाचा मुजरा.

प्रतिक्रिया

असे प्रखर देशाभिमानी, ऋषीतुल्य, अष्टपैलु व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही.

गोगोल's picture

28 May 2011 - 5:57 am | गोगोल

सावरकर लिंका एकत्र ठेवल्या पाहिजेत.
नवीन सावरकर लेख लिहिणार्यांनी त्या सर्व एकदा डोळ्याखालून घातल्या पाहीजेत.

स्वातंत्र्यवीरांना सावरकरांना सादर प्रणाम.
पण त्यांना स्वातंत्र्यवीरच राहू द्या. या महान व्यक्तीमत्वाला हिंदूहृदयसम्राट म्हणून अशा जातीपातीच्या बंधनात बांधू नका.

नतमस्तक.

नितिन थत्ते's picture

28 May 2011 - 8:24 am | नितिन थत्ते

देशभक्त आणि आधुनिकतावादी सावरकरांना अभिवादन.

।असे प्रखर देशाभिमानी, ऋषीतुल्य, अष्टपैलु व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही.
सहमत

।असे प्रखर देशाभिमानी, ऋषीतुल्य, अष्टपैलु व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही.
सहमत

शशिकांत ओक's picture

28 May 2011 - 10:52 am | शशिकांत ओक

मित्र हो,
आजची राजकीय अवस्था पाहता कसाब आणि गुरु अफजल यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात होत असलेली अक्षम्य दिरंगाई पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संवादातून, लेखणीतून भावी राष्ट्रीय परिस्थितीचे मुल्यमापन स्वातंत्र्यपुर्वकाळात किती सुयोग्य होते याची कल्पना येते.
धार्मिक आवरणात गुंडाळलेल्या काही परंपरांकडे सध्याच्या काळातील सामाजिक गरजांच्या संदर्भात त्या विचारपुर्वक पडताळून त्यांच्या उपयुक्ततेचे मुल्यमापन करण्यास लागणारी विचार व आचार क्षमता तात्यांच्या कणखर व्यक्तीमत्वाची साक्ष देते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन.

अमोल देशमुख's picture

28 May 2011 - 10:56 am | अमोल देशमुख

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १२८ व्या जयंतीनिमीत्त या राष्ट्रशिल्पकारास कोटी कोटी प्रणाम...!!!

रणजित चितळे's picture

28 May 2011 - 11:02 am | रणजित चितळे

स्वातंत्र्यविरांना नम्र प्रणाम.

नारयन लेले's picture

28 May 2011 - 4:18 pm | नारयन लेले

स्वातंत्र्यवीर सावरकरांना सादर प्रणाम.

आशा थोर देशभक्त स्वातंत्र्यवीरा॑च्या चरणी आभीवादन !

विनित

अप्पा जोगळेकर's picture

29 May 2011 - 3:09 pm | अप्पा जोगळेकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन.

आद्य स्वातंत्र्यवीराला मानाचा मुजरा. असा स्वातंत्र्यवीर पुन्हा होणे नाही..

- पिंगू

JAGOMOHANPYARE's picture

30 May 2011 - 8:59 pm | JAGOMOHANPYARE

नमस्कार

सर्वसाक्षी's picture

31 May 2011 - 2:04 pm | सर्वसाक्षी

ज्याला अंदमानच्या तुरुंगात ठेवल्यानंतरही इंग्रजांना धास्ती वाटत होती, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर या महान व्यक्तिमत्वास सादर वंदन

यनावाला's picture

31 May 2011 - 10:19 pm | यनावाला

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्ज्वल्य देशाभिमान सर्वश्रुत आहे.त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका पैलूकडे फारसे लक्ष वेधले जात नाही असे दिसते.स्वा.सावरकर खर्‍या अर्थाने आधुनिकतावादी होते.ते विज्ञाननिष्ठ आणि पूर्णतया बुद्धिप्रामाण्यवादी होते. सर्व सावरकरप्रेमींनी त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध अवश्य वाचावे