डल्लासविषयी माहिती हवी आहे

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
27 May 2011 - 11:29 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मागची २ वर्षे आम्ही पोटापाण्याच्या गडबडीत असल्याने मिपावर येउ शकलो नाही. (ऑफशोअरला लई काम असते बुवा).
तर सांगायचा मुद्दा असा की नोकरीनिमित्त आम्हाला डल्लास (टेक्सास) येथे १-२ वर्षाकरता जावे लागणार आहे. मी किंवा माझे कोणी मित्र, परिचित अमेरिकेत गेलेले नसल्याने मल मिपाकरांकडुन थोडी मदत हवी आहे. मी माझे प्रश्न शंका खाली विचारल्या आहेत, जमेल तितके शंका समाधान करावे अशी विनंती.

१. डल्लास शहर राहण्यासाठी कसे आहे.(गुन्हेगारी, वर्णद्वेष आहेत का)

२. डल्लासमध्ये राहण्यासाठी सुयोग्य परिसर कोणता? (कामाचे ठिकाण बहुतेक चेस सेंटर असणार आहे).

३. सार्वजनिक वाहतुक सुविधा कितपत आहेत? डार्ट चांगली आहे का? की स्वत:ची गाडी भाड्याने/ विकत घ्यायला पर्याय नाही.

४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?

५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?

६. घरभाडे साधारण किती असते?

७. ईंटरनेट कनेक्शन तात्काळ मिळते का?

उत्तरांच्या प्रति़क्षेत,
आपला,
गणा मास्तर (भोकरवाडी बुद्रुक)

प्रतिक्रिया

टुकुल's picture

27 May 2011 - 12:50 pm | टुकुल

१. डल्लास शहर राहण्यासाठी कसे आहे.(गुन्हेगारी, वर्णद्वेष आहेत का)

मि गेले अडीच वर्ष राहत आहे डल्लास मधे, खुप चांगल शहर आहे, मला किंवा माझ्या माहितीतल्या कुणाला अजुन त्रास झाला नाही आहे, बिनधास्त या.

२. डल्लासमध्ये राहण्यासाठी सुयोग्य परिसर कोणता? (कामाचे ठिकाण बहुतेक चेस सेंटर असणार आहे).

मि पण चेस मधेच आहे, आता कुठ्ल्या कार्यालयात तुम्ही असणार त्यावर राहण्याचा परीसर सांगेन

३. सार्वजनिक वाहतुक सुविधा कितपत आहेत? डार्ट चांगली आहे का? की स्वत:ची गाडी भाड्याने/ विकत घ्यायला पर्याय नाही.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जवळपास नाहीच, जर लग्न झालेल असेल व बायको बरोबर येत असल्यास लवकरच गाडी घ्यावी लागेल.

४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?
सेंकड हॅंड गाडी विकत घेतलेली बरी सुरवातीला.

५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?
भारतातला साधा परवाना पण चालतो, मि सुरुवातीला त्यावरच गाडी भाड्याने घ्यायचो.

६. घरभाडे साधारण किती असते?
जवळपास ७००-८०० पडेल चांगल्या ठिकाणी १ बीचके साठी

७. ईंटरनेट कनेक्शन तात्काळ मिळते का?
आधी घर घ्याव लागेल मग ईंटरनेट कनेक्शन

तुम्ही एकटे येत आहात की कुटुंबा बरोबर यावर बरच काही अवलंबुन आहे.

अजुन काही माहीती हवी असल्यास जरुर फोन करा, मोबाइल न. व्यनी करत आहे.

--टुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2011 - 1:24 pm | बिपिन कार्यकर्ते

डल्लासचा खरा उच्चार डॅलस अस आहे ही एवढीच माहिती आहे मला. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 2:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्षीण जाहिरात ... कसली, काय, का ते ज्याच्या त्याच्या समज, जाण इत्यादींवर अवलंबून.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 May 2011 - 4:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्या शब्दाचा भारतीय उच्चार "डल्लास" आहे. अमेरिकन उच्चार डॅलस आहे. बाकी आपले आणि त्यांचे बहुतेक सर्व उच्चार वेगवेगळे असतात. काय काय बदलणार?

जाता जाता :- गंगा, हिमालय, अवतार या शब्दांचे अमेरिकन उच्चार आपण चालवून घेतो ना? मग ते पण "डल्लास" चालवून घेतील.

गवि's picture

27 May 2011 - 5:09 pm | गवि

खॅलस..आपलं.. खल्लास प्रतिक्रिया आहे.. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एकदा पाश्चात्यांची नक्कल ... ते उच्चार चुकवतात तर आम्हीपण तसंच करणार. हे देवा, कधी सुधारणार रे आम्ही भारतीय?

धमाल मुलगा's picture

27 May 2011 - 6:22 pm | धमाल मुलगा

बदला!

जोवर ते आमचे शब्द नीट म्हणत नाहीत तोवर आम्ही 'येत असूनही मुद्दाम' शब्द चुकवणार. शिंपल. त्या लोकांना त्याचे उच्चार चुकवले की राग येतो, मग मुद्दामच...आधी आमचे शब्द नीट म्हणायला शिका, मग आम्ही तुमचे शब्द नीट उच्चारु. आम्हाला येतात उच्चारायला. जीभ जड नाही आमची 'बुध्द'ला बुड्यॅ, 'दलाई लामा' ला 'डॅलै लॅमॅ' वगैरे सारखं बोबडतात येडे. =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 7:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असेल बुवा!
समोरची व्यक्ती तोतरी, बोबडी, अंध, कर्णबधीर, पायाने अधू, डोक्याने मंद इ. काही आहे म्हणून मी तशी वागत नाही.

धमाल मुलगा's picture

27 May 2011 - 8:14 pm | धमाल मुलगा

असणं आणि प्रयत्न न करता 'आम्ही म्हणू तेच खरं' हा माजुरडा अभिनिवेश बाळगणं निराळं. आम्ही त्याच अभिनिवेशाच्या विरोधात वागतो हे अर्थातच सुज्ञास सांगणे न लगे.

कोणाच्या शारिरीक व्यंगावरुन तसे वागण्याचा संबंध/संदर्भ पुर्णतः अस्थानी आणि चुकीचाच. कसें?

मुक्तसुनीत's picture

27 May 2011 - 8:25 pm | मुक्तसुनीत

ही सगळी चर्चा थोडी अस्थानी वाटायला लागलेली आहे.

सूड's picture

27 May 2011 - 8:38 pm | सूड

>>ही सगळी चर्चा थोडी अस्थानी वाटायला लागलेली आहे.
इथं तशी परंपराऽऽऽय !! :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही तसे मला दोन नंबरांनी सिनियर शिवाय जास्त अनुभवी! पण हिरवा रंग आला की वेगवेगळ्या रंगांचा माज येतोच, आणि अवांतर चर्चा होतात हे काय मी सांगायला पाहिजे काय मुसुशेट?

जाता जाता :- गंगा, हिमालय, अवतार या शब्दांचे अमेरिकन उच्चार आपण चालवून घेतो ना? मग ते पण "डल्लास" चालवून घेतील.

भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक पाहिले की ह्या "आपल्या" भारतीय लोकांची लाजही वाटते अन दयाही येते.

विकास's picture

27 May 2011 - 8:20 pm | विकास

भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक पाहिले की ह्या "आपल्या" भारतीय लोकांची लाजही वाटते अन दयाही येते.

फक्त भारतीय असे असतात असे वाटणे हे देखील पूर्ण माहिती नसल्याने, लाज वाटण्याचे लक्षण होऊ शकते.... ;)

माझा स्वत:चा अनुभव आहे - माझ्या नावाचा उच्चार अनेकदा पूर्ण चुकीचा केला जातो, ते देखील बरोबर कसा आहे हे सांगितल्यावर. हा केवळ एका ठिकाणचा अनुभव नाही तर अनेक ठिकाणचा. स्पेलींग पण चुकतात आणि आडनावातील शेवटच्या "एन डी इ" या अक्षरांमुळे तर काही जण "डी" (इटालीयन नावातील शेवट) तर काही जण "डॉं" (फ्रेंच नावातील शेवट) उच्चार करतात... तेच आमच्या लेकीच्या बाबतीत बर्‍याचदा होताना पाहीले आहे.

बाकी भारतीयांना आपले नाव, अमेरीकन लोकांना म्हणायला सोयीचे जावे म्हणून आंग्लाळलेले करण्याची सवय आहे (डॅन, सॅम, वगैरे). थोडक्यात आपण आपले नाव बदलताना काही वाटून घेत नाही कारण त्यांना म्हणणे सोपे जावे म्हणून... आणि तसे जर केले नाही तर प्रत्येक अमेरीकन खरे नाव बरोबर उच्चर शिकतो आणि विचारूनही वापरतो अशातला देखील भाग नसतो.

माझ्या बाबतीत तर अजून एक गंमत (?) काही काळ होत आहे. आमच्याकडच्या अजून एका नव्या भारतीयाच्या नावाने मला हाक मारली जाते आणि त्याला माझ्या नावाने... वास्तवीक आम्ही दोघेही दिसायला सारखे नाही, प्रोफेशन्स वेगळी आणि नावेपण पूर्ण वेगळी तरी देखील. अगदी टेलीफोन ऑपरेटर पण त्याचे नाव विचारून जर कोणी एक्स्टेंशन मागितले अथवा त्याच्या क्षेत्रातील कामासाठी फोन केला तरी माझ्या एक्स्टेंशनला, जे पूर्ण (चारी आकड्यांनी) वेगळे आहे, त्याला ट्रान्स्फर करते! जेंव्हा माझ्या एका गोर्‍या कलीगला (ती पण माझे नाव चुकीचेच उच्चारते ;) ) जेंव्हा हा प्रकार सांगितला तेंव्हा तीच्या दृष्टीने हे (इतर गोर्‍यांनी आमच्याकडे) रेशिअली पहाणे ठरले होते...

बाकी ब्रिटीशांनी गंगेला गँजीस म्हणले म्हणून भारतीय देखील ते बोलताना सुधारण्याऐवजी, इंग्रजीत गँजीसच म्हणताना पाहीले आहेत आणि ते बघितल्यावर, त्यांची मात्र खरेच लाज वाटते. नाही म्हणायला बाँबे ऐवजी "मुंबाई/मुंबाय" (कधी कधी "मुंबई") बाकी म्हणायला हे शिकले आहेत हे देखील कमी नाही. आणि गंमत म्हणजे काही उदाहरणे पाहीली आहेत, जेथे भारतीय माणूस "बाँबे" म्हणाला तर ते त्याला करेक्ट करत. "मुंबाई/मुंबाय" अथवा "मुंबई" म्हणतात!

राहता राहीला डल्लास आणि डॅलस चा प्रश्नः अनेकदा अमेरीकन्स (म्हणजे येथे एका पिढीपेक्षा जास्त राहीलेले कोणिही त्यातही येथील काळे-गोरे) अनेकदा अनेक ठिकाणचा उच्चार हा स्पेलींगप्रमाणे करतात जो चुकीचा ठरू शकतो. आत्ता तात्काळ आठवणारे उदाहरण म्हणजे मॅसॅच्युसेट्स मधील वुस्टर या शहराचा बाहेरील (म्हणजे मॅसॅच्युसेट्स बाहेरील) व्यक्ती उच्चार "वुर्सेस्टर" असा करताना पाहीले आहे आणि उच्चार काय हे सांगितल्यावर स्थानिकांना हसताना पाहीले आहे.

असो.

धमाल मुलगा's picture

27 May 2011 - 8:51 pm | धमाल मुलगा

Wise People Sense it Right ;)

Nile's picture

27 May 2011 - 9:00 pm | Nile

फक्त भारतीय असे असतात असे वाटणे हे देखील पूर्ण माहिती नसल्याने, लाज वाटण्याचे लक्षण होऊ शकते

नाही. परक्याची लाज वाटणे साहजीक नसावे.

भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक पाहिले की ह्या "आपल्या" भारतीय लोकांची लाजही वाटते अन दयाही येते.

वरील अधोरेखित पुरेसे सुचक आहे असे मला वाटते.

माझा स्वत:चा अनुभव आहे - माझ्या नावाचा उच्चार अनेकदा पूर्ण चुकीचा केला जातो, ते देखील बरोबर कसा आहे हे सांगितल्यावर.

हे मुद्दाम केले जाते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? समोरासमोर असे कोणी मुद्दाम करत असेल तर वैयक्तिक कारण असु शकते असे मला वाटते. पण मला, किंवा इथे, ते अस्थानी आहे.

बाकी भारतीयांना आपले नाव, अमेरीकन लोकांना म्हणायला सोयीचे जावे म्हणून आंग्लाळलेले करण्याची सवय आहे

हेच एकमेव कारण असावे असे वाटत नाही. टुसान चा उच्चार अनेक अमेरिकन्स सुद्धा सुरुवातीला चुकिचा करतात. पण बरोबर उच्चार कळल्यावर मात्र आम्ही तोच उच्चार करु, आम्ही कशाला कुठले स्पॅनिश/नेटिव्ह अमेरीकन उच्चार करायचा असा आठमुठेपणा करताना मला तरी दिसलेले नाहीत. असो.

ओपींना, अमेरीकनांकडून चांगल्या गोष्टी मात्र जरूर घ्या इतके सांगतो. इत्यलम्!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नावाचं आंग्लीकरण म्हणत असाल तर माझं (कागदावरचं) नाव अनेक (शिकलेल्या) मराठी लोकांनाही नीट उच्चारता येत नाही. (आमच्या माध्यमिक शाळेतल्या मराठीच्या शिक्षिकाही चुकीचा उच्चार करायच्या!) तर मग मी काय करावं? (जवळजवळ) प्रत्येकाचे उच्चार सुधरवण्यापेक्षा "काय म्हणायचं आहे म्हणा, मला काही फरक पडत नाही" हे म्हणणं मला सोपं पडतं.

निदान आत्तापर्यंत माझ्या नावाचा गोंधळ सुनीता नावाशी झालेला पाहिला आहे (भारतातही आणि बाहेरही). पण गोंधळ होतो आहे हे सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रात त्यानंतर पुनरावृत्ती झालेली नाही.

सरसकट सगळे अमेरिकन किंवा युरोपियन लोकं आपली नावं शक्यतोवर योग्य पद्धतीने उच्चारतात असं नाही, पण दुसरा चुकीचे उच्चार करतो म्हणून आम्हाला स्थानिक उच्चार माहित असतानाही आम्ही मुद्दाम अस्थानिक उच्चार करणार हा आग्रह मला समजत नाही. जिथे मी स्वतःच्या नावाचा उच्चार लोकं काय वाट्टेल तो करतात तो सुधारण्याच्या फार फंदात पडत नाही तिथे 'डालस'*ला 'डॅलस' म्हणा नाहीतर 'डॉल्लस'** म्हणा, मला काय फरक पडतो?

*माझे इंग्लिश उच्चार भारतीय+इंग्रजी/ब्रिटीश असल्यामुळे अमेरिकन इंग्लिशचा 'अ‍ॅ/यॅ'कार मला सहज जमत नाही.

**हिंदी भाषिक (किंवा अमराठी) लोकांनी पूना, थाने/थाना, चाकन, तलेगांव वगैरे उच्चार केले तर मात्र आपण कोणत्या तोंडाने तक्रार करावी?

विकास's picture

28 May 2011 - 12:06 am | विकास

प्रत्येकाचे उच्चार सुधरवण्यापेक्षा "काय म्हणायचं आहे म्हणा, मला काही फरक पडत नाही" हे म्हणणं मला सोपं पडतं.

सहमत. मला देखील बिकाश म्हणणारे अमराठी भारतीय (विशेषकरून बंगाली) आहेतच. मी देखील असाच विचार करतो. शेवटी काय "सत्यदेव" म्हणा अथवा "सत्यनारायण" म्हणा! (आता हे केवळ, जर असेलच तर विनोदाने म्हणत आहे, हे आधीच स्पष्ट करतो! नाहीतर चर्चा हिरव्या माजाबरोबरच भगव्या माजाकडे वळवली असा आरोप होयचा. ;) )

माझे लिहायचे कारण इतकेच होते की, "भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक" असे केवळ अमेरीकनच नसतात. भारतीय अथवा इतरही असू शकतात.

निदान आत्तापर्यंत माझ्या नावाचा गोंधळ सुनीता नावाशी झालेला पाहिला आहे

मी ठाण्याचा असल्याने या संदर्भात ठाण्यावरून विनोद करता येत असूनही टाळतो... :-)

सरसकट सगळे अमेरिकन किंवा युरोपियन लोकं आपली नावं शक्यतोवर योग्य पद्धतीने उच्चारतात असं नाही,

इतकेच म्हणायचे आहे... (अहो आम्ही तर १२ ला ट्वेलू म्हणणारे पण पाहीले आहेत ;) त्यामुळे डल्लास पण चालतं असे म्हणले तर काय बिघडले!)

आम्हाला स्थानिक उच्चार माहित असतानाही आम्ही मुद्दाम अस्थानिक उच्चार करणार हा आग्रह मला समजत नाही.

पण तेच तर गंगेच्या बाबतीत होतं ना! पण त्याची त्यांना नाधड लाज वाटते, ना आपल्याला तसेच इंग्रजी उच्चार बरोबर म्हणत, चूक दुरूस्त न करता गँजीस म्हणताना काही वाटते...

वर म्हणल्याप्रमाणे आमच्या नावाचेच नाही तर अगदी अंतर्गत देखील उच्चारपद्धतीतील फरकामुळे देखील होते. म्हणजे न्यू इंग्लंडमधील लोकांची, न्यूयॉर्कमधील, युएसए मधेच पण दक्षिणेकडील (सदर्न), पश्चिमेकडील - असे एक ना धड अनेक प्रकार होतात आणि ते मान्य केले जातात. शिवाय, जर्मन अ‍ॅक्सेंट म्हणत वेगळे बोलणारा, चायनीजचे तर विचारूच नका (थिसिस म्हणजे सिसिस), मेक्सिकन्स मुळे आपल्या नावात देखील "जे" अक्षर असले तरी त्याचा उच्चार "ह" असाच आता केला जातो आणि दुरूस्ती सुचवावी लागते... पण त्यांचे सगळ्यांचे खपवून घेतले जाते असे म्हणण्यापेक्षा असे वेगळे अ‍ॅक्सेंट आहेत असे म्हणत त्यांना समजून घेतले जाते. मग आपण कशाला "लाज" वाटण्याचा न्यूनगंड ठेवायचा?

माझे इंग्लिश उच्चार भारतीय+इंग्रजी/ब्रिटीश असल्यामुळे अमेरिकन इंग्लिशचा 'अ‍ॅ/यॅ'कार मला सहज जमत नाही.
इंग्रजी बोलल्याशी कारण! तुम्हाला इथल्या उच्चारांची हळूहळू सवय होईल आणि त्यांना देखील तुमच्या उच्चारांची सवय होईल! :-) याबाबतीत एक अतिशय मजेशीर प्रसंग/अनुभवः एकदा आमच्या लेकीने शाळेच्या बाहेर मी तीच्या एका गोर्‍या मैत्रिणीच्या आईशी बोलत असताना, मधेच येऊन विचारले, "बाबा किती वाजले?" मी काही बोलायच्या आत या गोर्‍या आईने पटकन किती वाजलेत ते सांगितले. मग तिला विचारले की तू कसे काय सांगितलेस? ती म्हणाली की तीने किती वाजलेत ते विचारले म्हणून सांगितले. म्हणलं, "बरोबर आहे, पण तीने मराठीत विचारले होते!" :-)

**हिंदी भाषिक (किंवा अमराठी) लोकांनी पूना, थाने/थाना, चाकन, तलेगांव वगैरे उच्चार केले तर मात्र आपण कोणत्या तोंडाने तक्रार करावी?

"डॅलास" वाल्यांना करूंदेत ना तक्रार आणि त्यांच्या भावनांचा आदर करत बदलायला देखील हरकत नाही! आणि तसे देखील आपण ज्या भागात रहातो तिथल्या इंग्रजी लकबी आपण हळूहळू आत्मसात करतो असाच अनुभव आहे. मी काही बोस्टन म्हणत नाही! फक्त तसा प्रयत्न करत असताना आणि जमण्याच्या आधी आपण काही कमी लेखायची गरज नाही. पण तसे हिंदी अथवा इतर जे काही अमराठी भाषिक मुंबई-पुण्यात करत नसतील आणि मराठी भाषिक इतरत्र इंग्रजी खपते म्हणत, त्यांच्या भाषा कामचालू देखील शिकत नसतील तर ते अयोग्यच आहे, असे मला वाटते.

भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक" असे केवळ अमेरीकनच नसतात. भारतीय अथवा इतरही असू शकतात.

इथे आलेले सरसकट सर्व अमेरीकनांना उद्देशुन प्रतिसाद, आणि वर अधोरेखित केलेल्या शब्दांमुळे हा मुद्दा निकालात निघतो. मी ही एक भारतीयच आहे, हा पॅरॉडॉक्स आहे असे कोठे निर्देशित झाले आहे का?

पण त्यांचे सगळ्यांचे खपवून घेतले जाते असे म्हणण्यापेक्षा असे वेगळे अ‍ॅक्सेंट आहेत असे म्हणत त्यांना समजून घेतले जाते. मग आपण कशाला "लाज" वाटण्याचा न्यूनगंड ठेवायचा?

हेच समजुन घेण्याची वृत्ती वरती दिसली नाही. उलट हेच समजुन घेउन बरोबर काय आहे हे जाणून घेण्यार्‍या प्रवृत्तीचे(नॅशनिलीटीचे नव्हे)कौतुक करण्याला वरती विरोधी प्रतिसाद तुम्ही दिलात.

फक्त तसा प्रयत्न करत असताना आणि जमण्याच्या आधी आपण काही कमी लेखायची गरज ना

असा प्रयत्न करत असतानाचेच कौतुक केले आहे. तसा प्रयत्न करणे सोडाच तसे करणारही नाही अश्या प्रवृत्तीचा निषेध केला होता. अश्या प्रवृत्तीला कमी न लेखण्याचे कारण मला दिसत नाही.

थोडक्यात, मिस्ड माय पाँईट बट मीन द सेम थिंग. पीस!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Jun 2011 - 12:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>पण त्यांचे सगळ्यांचे खपवून घेतले जाते असे म्हणण्यापेक्षा असे वेगळे अ‍ॅक्सेंट आहेत असे म्हणत त्यांना समजून घेतले जाते. मग आपण कशाला "लाज" वाटण्याचा न्यूनगंड ठेवायचा?

मला अगदी हेच म्हणायचे होते. विकास यांनी नेमक्या शद्बात ते मांडले आहे. ही चर्चा अगदीच अस्थानी नाही वाटत मला. तिकडे १-२ वर्षे राहायचे असेल तर हा न्यूनगंड पहिल्या दिवसापासून टाळलेला बरा.

सिद्धार्थ ४'s picture

27 May 2011 - 1:54 pm | सिद्धार्थ ४

मी सुद्धा जुलै मद्धे डल्लास ला येतो आहे. माझ्या ऑफिस चे बरेच जण तिथे आहेत त्या मुळे काही प्रोब्लेम नाही. तुम्हाला अजून काही मदत पाहिजे असेल तर मी त्याने contact no देऊ शकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 2:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?

व्यक्तीगत मत, आल्याआल्या परवडत असेल तर नवीन गाडीच घ्या. चारचाक्या अमेरिकेत भारतापेक्षा स्वस्त आहेत. अशा किती चारचाक्या विकत घेणार आहात? घ्यायची तर नवीनच घ्या की! भारतात बसून या संस्थेतर्फे चारचाकीसाठी कर्ज मिळाले आहे. अमेरिकेत क्रेडीट हिस्टरी नसल्यास अशा संस्थांचा फायदा होतो. व्याजदर थोडा जास्त पडतो, पण कर्ज मिळतं.

५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?

टेक्सस ड्रायव्हिंग मॅन्युअलमधे लिहील्याप्रमाणे (किंवा आठवणीप्रमाणे) तीन महिने चालतो.

भारतीय परवाना इंग्लिशमधे असल्यामुळे(?) गाडी भाड्याने घेण्यासाठी वेगळा आंतरराष्ट्रीय परवाना काढण्याची गरज पडली नाही. पण स्वत:ची गाडी विकत घेण्यासाठी टेक्ससमधल्या परवान्याची गरज पडली.

(काऊगर्ल) अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

27 May 2011 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार

(काऊगर्ल) अदिती

खरच सांगतो... भडभडून आले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कालची उतरली नसेल तर लिंबू पाठवू का?

पंगा's picture

27 May 2011 - 5:18 pm | पंगा

भारतीय परवाना इंग्लिशमधे असल्यामुळे(?)

प्रश्नचिन्ह कशाबद्दल?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2011 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खात्री* नाही म्हणून!

*भारतीय वाहनचालक परवाना इंग्लिशमधे असण्याची खात्री आहे, पण याच कारणामुळे, या परवान्यावर टेक्ससमधे तीन महिने गाडी चालवता येते याची खात्री नाही.

शाहरुख's picture

27 May 2011 - 10:25 pm | शाहरुख

>>व्यक्तीगत मत, आल्याआल्या परवडत असेल तर नवीन गाडीच घ्या. चारचाक्या अमेरिकेत भारतापेक्षा स्वस्त आहेत. अशा किती चारचाक्या विकत घेणार आहात? घ्यायची तर नवीनच घ्या की!

उलटे म्हणतो..परवडत असले तरी मिरवायचे नसेल तर सामान्य एच-१ देसी घेतो तशी जुनी करोला, अल्टिमा वगैरे घ्या. तशीही तुम्ही वर्षा-दोन वर्षात विकणारच आहात..कशाला उगाच विम्याचा खर्च !

आनंदयात्री's picture

27 May 2011 - 10:36 pm | आनंदयात्री

>>नसेल तर सामान्य एच-१ देसी घेतो तशी जुनी करोला, अल्टिमा वगैरे घ्या.

सहमत आहे. अधिक माहितीसाठी प्रभोला भेटा ;)

खानसाहेब, अशी जुनी गाडी घेतल्यावर स्वस्तातला स्वस्त विमा कितीला येइल ? तो घे असा सल्ला तुम्ही 'जपुन गाडी' चालवणार्‍या तुमच्या मित्राला देणार का ? (डिसक्लेमर वैगेरे सगळे सल्लागाराच्या बाजुने धरुन)

गाडी: तुमच्या गावातील craigslist.com वर शोधून पहा.

लायबिलिटी इंश्युरंस तर घ्यावाच लागेल. पण संपूर्ण इंश्युरंस घेणे इज अ वाईज चॉईस, इन माय ओपीनीअन*. डिफेंसीव्ह ड्राईव्हर टेस्ट घेतलीत तर विमा स्वस्तात मिळू शकतो. विमे अमेरीकेत पर्सनलाईज्ड असतात. स्पोर्टस गाड्या घेतल्यात (बीएमडब्लू इ.) तर विमा जास्त पडेल. लाल रंगाच्या गाडीला विमा जास्त पडेल. लग्न झालेलं असेल तर, मुलं असतील तर विमा कमी पडेल इ.

*पुढे कुठे रोडट्रीपला वगैरे जाणे झाले तर स्वतःचा संपूर्ण इंश्युरंस असेल तर भाड्याची गाडी स्वस्तातही पडते, वगैरे.

गोगोल's picture

27 May 2011 - 11:45 pm | गोगोल

घेतला तर साधारणपणे महीना $७० इतका पडेल.
यात बॉडी इन्ज्युरी लायाबिलिटी, प्रॉपर्टी डॅमेज लायाबिलिटी, मेडिकल पेमेंट समाविष्ट आहे.

गोगोल's picture

28 May 2011 - 12:04 am | गोगोल

१-२ वर्षा साठी जुनीच गाडी घ्या. हे माझे दोन पैसे:

१. क्रेग्सलिस्ट वर ज्या गाडी ची जाहीरात वारंवार येत आहे तिच्याकडे दुर्लक्ष करा. याचा अर्थ ती खपत नाहीये.
२. शक्यतो जापानीज मेक च्या गाड्या (होंडा, निस्सान, टोयोटा) घ्या. पिदडवायला बर्या पडतात.
३. गाडी शक्यतो १००,००० माईल्स पेक्षा कमी धवलेली असेल असे बघा.
४. गाडीची जाहीरातीतील माहीती वाचून केलीज ब्लू बूक मध्ये जाऊन साधारण पणे तिची किती किंमत असली पाहीजे ते चेक करा.
५. गाडीचा विन नंबर घेऊन कारफॅक्स मधून अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट चेक करा. जर का स्ट्रक्चरल डॅमेज असेल तर घेऊ नका.
६. गाडीचे ९०,००० माईल्स ला सर्व्हिसिंग झाले आहे का ते चेक करा. असे झालेले असलेली गाडीच प्रिफर करा. जर का झाले नसेल तर बार्गेन करून प्राईस कमी करा कारण की गाडी घेतल्या घेतल्या तुम्हाला हे सर्विसिंग करवे लागेल.
७. गाडी घेताना एखाद्या माहीतगाराला (ज्याच्याकडे अमेरिकन लायसन्स आहे) घेऊन जा. गाडीची टेस्ट घ्या. हायवे वर नेऊन ८० माईल्स/अवर वर नेऊन बघा (अर्थात पोलिस नाहीत ना ते बघून). गाडी व्हाय्ब्रेट तर होत नाहे ना ते चेक करा.
(गाडिची टेस्ट घेतल्यावर मालकावर कर्टसी म्हणून गाडीत गॅस टाकायला विसरू नका)
८. गाडी विकत घेण्यापूर्वी मेकॅनिक्ला दाखवून काही प्रॉब्लेम्स तर नाहीत ना ते चेक करा. तुमचे $५० जातील पण गाडी चांगली असल्याचे थोडे फार आश्वासन तर मिळेल.
९. $३०००-$४००० मध्ये बर्यापैकी चांगली गाडी मिळून जाईल (साधारण १०-१२ वर्षे जूनी).
१०. गाडी जर लांबच्या ट्रीप वर नेणार असाल तर सर्विसिंग करून घ्या.
११. गाडी घेतल्यावर्र लायसन्स, रेजिस्ट्रेशन आणि विमा असल्याशिवाय ड्राईव्ह करू नका.

सहमत आहे.... हेच लिहायला आलो होतो..लिहायचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद गोगोल. :)

बर्‍याचश्या (भारतीय) कंपन्या स्वतःच्या नावावर लाँग टर्म प्रती महिना साधारण ५००$ भाड्यावर (यात बहुतेक वेळा महिन्याला लागणार ७०-१२५$ चा विमा ही सामील असतो) नवीन गाड्या भाड्याने घेऊन देतात (हर्ट्झ , एविस अश्या रेंटल एजन्सीज कडून).. वरील सर्व कटकट करायची नसेल आणी तुमची कंपनी ही सोय पुरवत असेल तर मनजोगी गाडी मिळेपर्यंत हा उपायही वापरू शकता.

भाड्याने न घेता स्वतःची गाडी घ्याल तर तीला जपा.वेळोवेळी सर्विसिंग करा. रीसेल करताना चांगली किंमत मिळेल. :)

अवांतर : वरील सर्व स्टेप्स मधून तावून सुलाखून निघालेल्या गाडीने आज नॉन-स्टॉप लाँग ड्राएव्ह मारून मित्राकडे आलोय....मस्त मजा आली. :)

गोगोल's picture

28 May 2011 - 6:54 am | गोगोल

हे $५०० + विमा कंपनी भरते का आपण भरायचा असतो?

हुप्प्या's picture

27 May 2011 - 11:21 pm | हुप्प्या

एखादा अमेरिकन जागेच्या नावांचे चुकीचे उच्चार करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. एक म्हणजे अडाणीपणा. अमेरिकन माणसाला सामान्यतः भूगोल फारसा माहित नसतो. त्यामुळे नुसते स्पेलिंग बघून उच्चार करायला जातात आणि एकाचे बघून दुसरा. इराकचे आयरॅक आणि इराणचे आयरॅन होते ते अशामुळे. अर्थात काही लोक अट्टाहासाने अमेरिकन उच्चार करतात. विशेषतः कॉन्झर्वेटिव्ह लोक हे आपल्या अमेरिकन असण्याचा अहंकार बाळगून असतात. अर्थात असे नमुने धाकल्या बुशने न्यूक्लियरचे न्युक्युलर बनवले म्हणून तेही तसे म्हणतात.
उमेदवार असताना ओबामाने पाकिस्तानचा उच्चार पाकिस्तान केला तेव्हाच मला त्याच्याबद्दल आदर वाटू लागला. जो त्या जागेच्या नावाचा इतका अचूक उच्चार करतो त्याला त्या जागेचा इतिहास आणि भूगोल जरा जास्त समजत असेल असे वाटले आणि ते बहुधा खरे असावे. पण एका राईट विंग रेडियो स्टेशनवर ह्या शुद्ध उच्चाराची टिंगल केलेली ऐकली आहे.
"पॅकिस्टॅन, किंवा आपल्या प्रेसिडेंटच्या शब्दात सांगायचे तर पाकिस्तान एक मोठा प्रॉब्लेम बनलेला आहे." असे काहीसे वाक्य होते. आणि नंतर ओबामाच्या उच्चाराची टर उडवणे, खो खो हसणे वगैरे.

मला वाटते अमेरिकेत गिर्‍हाईक म्हणून जात असाल तर जरूर माज करा पण गिर्‍हाईक पटवायला जात असाल तर त्यांना कळेल, पचेल आणि रुचेल असे बोललेले जास्त योग्य.

गोगोल's picture

28 May 2011 - 6:51 am | गोगोल

असताना इन जनरल घेट्टो किंवा वाईट एरियाज अ‍ॅवॉईड करा. रात्रीच्या वेळी तर जाऊच नका अशा एरियाज मध्ये. अमेरिकेतील पोलिस भारतापेक्षा कार्यक्षम असले तरीही खालील दोन गोष्टींमुळे गुन्हे घडत राहतातः
१. एखादा ड्र्ग्स च्या अंमलाखाली असतो आणि आपली सारासार विचारशक्ती गमावून बसतो आणि वाट्टेल तशी रिस्क घेतो. जसे ईव्हन $१० साठी बंदूक डोक्याला लावणे.
२. मॉब सायकॉलॉजी इज डिफरंट. ६-७ जणांचे टोळके शस्त्र घेऊन अचानक चालून आले तर तुम्ही फारसे काही करू शकत नाही आणि हीच गोष्ट त्यांना अधिक बळ देते. फोरम्स वर असे लुटण्याचे किंवा गँग रेप चे बरेच किस्से वाचलेले आहेत.
त्यामुळे त्यांना जी काही शिक्षा नंतर होईल ती होईल पण त्याक्षणी तरी तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आवश्यक ती सावधानता जरूर पाळा - विशेषतः बरोबर मैत्रीण असल्यास.

गवि's picture

31 May 2011 - 1:50 pm | गवि

म्हणजे अमेरिका भारतापेक्षा जास्त असुरक्षित आहे असे सरळसरळ म्हणता येईल.

इथेही अशा घटना घडतात पण या स्केलवर आणि इतक्या सहज नाहीत.

नुसते पोलीस कार्यक्षम असून काय उपयोग. पोलीस मुख्यत: पोस्टफॅक्टो घटकच आहे तसाही.

शिवाय पासपोर्टचे व्हेरिफिकेशन /सिग्नल तोडणे अशा साध्या बाबींमधे चायपाणी करणारे आपले पोलीस खाते गुन्हा (खून, बलात्कार इ) मधे मात्र आपल्या अचाट खबरी नेटवर्कने काय काय शोधून खणून काढत नाही? त्यामुळे त्यांना कमी कार्यक्षम म्हणणे अशा गुन्ह्यांबाबतीत तरी योग्य वाटत नाही. (क्राईम ब्रांच)

अजून एक मुद्दा. गँग रेप आणि रिलेटेड सावधानगिरी ही सर्व जगात तशीच अ‍ॅप्लिकेबल आहे असं तुमच्या प्रतिक्रियेतल्या वर्णनावरून दिसतं. तुमच्या शेवटच्या वाक्यातील साधी सोपी लॉजिकल सूचना इथे भारतात करुन पहा कशी रिअ‍ॅक्शन येते ती. ;)

इथल्या सनातन समाजाची सडकी जुनाट मनोवृत्ती, "काही झाले" तर जबाबदारी स्त्रीची कशी काय? समाजानेच बदलायला हवे.. अशा काहीशा प्रतिक्रिया येतील. अमेरिकेसारख्या कपडे/स्वातंत्र्य/ स्त्रीस्वातंत्र्य अशा बाबतीत लिबरल झालेल्या समाजातही ही भीती तीव्रच आहे हे नोंदवावेसे वाटते.

शेवटी आपली काळजी आपणच घ्यायला हवी.. समाज बदलणार नाही हेच खरे.

पंगा's picture

31 May 2011 - 10:53 pm | पंगा

अमेरिकेसारख्या कपडे/स्वातंत्र्य/ स्त्रीस्वातंत्र्य अशा बाबतीत लिबरल झालेल्या समाजातही ही भीती तीव्रच आहे हे नोंदवावेसे वाटते.

कपडेस्वातंत्र्य आणि बलात्काराची शक्यता यांत कितपत संबंध असावा, अर्थात बलात्काराच्या बाबतीत कारणीभूत होणार्‍या घटकांत कपड्यांची निवड हा घटक कितपत कामी येत असावा, किंवा कपड्यांच्या निवडीमुळे बलात्कार होण्या-न होण्याच्या शक्यतेत कितपत फरक पडत असावा, याबाबत साशंक आहे.

बलात्कार करणार्‍या मनुष्याची अगतिकता (डेस्परेटपणा), मनोविकृती, बलात्कारास बळी पडणार्‍या व्यक्तीची अपॅरंट व्हल्नरेबिलिटी (मराठी?) आणि बलात्कारास शक्य करणारी संधी (जसे, आजूबाजूस निर्जनता किंवा जागरूकपणे हस्तक्षेप करू शकणार्‍यांचा/इच्छिणार्‍यांचा अभाव) यांसारखे घटक कामी येत असण्याची शक्यता त्या मानाने बरीच अधिक वाटते.

बळी पडणार्‍या व्यक्तीची कपड्यांची निवड हा माझ्या अटकळीप्रमाणे पूर्णपणे गौण आणि/किंवा असंबद्ध मुद्दा असावा.

(अर्थात, अमेरिकेतील मनोविकृतांच्या आणि भारतातील मनोविकृतांच्या मानसिकतांमध्ये काही फरक असणे अगदीच अशक्य नसावे, आणि ही शक्यता लक्षात घ्यावी लागेलच.)

उर्वरित प्रतिसादाबद्दल नो कमेंट्स.

> म्हणजे अमेरिका भारतापेक्षा जास्त असुरक्षित आहे असे सरळसरळ म्हणता येईल.
नाही.
तुमच्या गैरसमजाच कारण तुमचे
> पोलीस मुख्यत: पोस्टफॅक्टो घटकच आहे तसाही.
हे विधान आहे. हे कदाचित भारतात खरे असेलही पण अमेरिकेत नाही.
अमेरिकेत तुम्ही केवळ संशय आला म्हणून ९११ कॉल करून माहीती देऊ शकता. पोलिस बर्यापैकी लवकर हजर होतात. अर्थात येथे ही सर्व आलबेल आहे असे नाही. ईथे पण पोलिसांची दादागिरी असते पण सामान्य माणसांना त्याचा त्रास सहसा कमी होतो.

> शिवाय पासपोर्टचे व्हेरिफिकेशन /सिग्नल तोडणे अशा साध्या बाबींमधे चायपाणी करणारे आपले पोलीस खाते गुन्हा (खून, बलात्कार इ) मधे मात्र आपल्या अचाट खबरी नेटवर्कने काय काय शोधून खणून काढत नाही?

हे विधान मला फार नाईव्ह वाटले. ते कदाचित सर्व काही शोधून काढतील पण समजा बलात्कार करणारा मंत्र्याचा मुलगा असेल तर सोडून नाही देणार?
ईथेच सुहास यांनी प्रकाशित केलेल्या कहाणी(?) कडे लक्ष वेधू ईच्छितो.

बाकी मुद्द्यांशी सहमत.

धूम्केतु's picture

1 Jun 2011 - 12:26 am | धूम्केतु

आल्या बरोबर प्रथम बॅके मध्ये खते उघडा आणी सोशिअल सिक्युरिटी कार्ड करिता अर्ज करा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Jun 2011 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अमेरिकेत ३ सी (C) असणे महत्त्वाचे असते (car, cell and credit card)

त्यातील सेल चे म्हणावे तसे टेन्शन नाही. क्रेडीट कार्ड पण लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करा.

कार साठी .....
तिथे गेल्या गेल्या DMV (तिकडचे RTO) च्या संकेत स्थळावर जाऊन टेक्सास (तुम्ही टॅख्सस ही म्हणू शकता म्हणा ;-) ) चे Driver Handboook /Manual डाऊनलोड करा आणि वाचून परीक्षेची तयारी करायला घ्या. वेळ असेल तर हे वाचन इथूनही करू शकता. तिकडे गेलात की लवकरात लवकर अमेरिकेचे लायसन्स घेऊन टाका. भारताचे चालत असते तरीही तिकडचे करून घेणे बरे. आणि गाडी घेणार असाल तर लवकर घेतलेली बरी. गाडी नसेल तर तिथे आयुष्य *ट आहे राव.

मेहेंदळे साहेबांना बरीच माहिती आहे असे दिसते. उपयोग करून घेता येइल.

पिवळा डांबिस's picture

9 Jun 2011 - 5:41 am | पिवळा डांबिस

साहेबांना बरीच माहिती आहे असे दिसते.
तरी एक c राहिली...
chick!!!!!

उपयोग करून घेता येइल.
त्यासाठी मेल्या तुला टेख्ससला जायला पायजेल!!!
हितें संगमेश्वरात बसून काय करणार?

ह. घ्या हो मेहेंदळे शेठ!
आमचा बबल्या असलाच वात्रट आहे...
:)

Nile's picture

9 Jun 2011 - 6:18 am | Nile

तरी एक c राहिली...
chick!!!!!

एका c ने काय होणार हो काका!! तरी बरं तुम्ही क्यालीफोर्न्याचे! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jun 2011 - 12:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>साहेबांना बरीच माहिती आहे असे दिसते उपयोग करून घेता येइल.
बबलू शेट, तुम्ही काय उपयोग करून घेणार माझ्या माहितीचा? आम्ही कार घेऊ इच्छिणाऱ्या माणसांना फुकटचे सल्ले देतो. तुमच्या कडे बोईंग आहे असे आतल्या गोटातून कळले आहे. तुम्हाला आम्ही काय मदत करणार?

>>तरी एक c राहिली... chick!!!!!
ती राहिली कारण ती मिळणे न मिळणे आपल्या हातात नसते. तशा क्रेगलिस्ट वर मिळतात म्हणे, पण बाकी ३ C नसतील तर मग ही चौथी, क्रेगच काय कुठल्याही यादीतून मिळणार नाही.

>>त्यासाठी मेल्या तुला टेख्ससला जायला पायजेल!!! हितें संगमेश्वरात बसून काय करणार?
टेख्ससपेक्षा त्यांच्या बे विभागात जास्त चांगल्या चिका (चिक चे अनेकवचन) आहेत असे ऐकले आहे. टेख्सस मधल्या एकेक चिका ह्या अशा १०० किलोच्या. कपड्यांच्या दुकानात पण फक्त XXXL+ मापाचेच कपडे मिळतात.

बबलू शेट हे १०१ आणि २३७ च्या संगमावर राहतात म्हणून संगमेश्वर का हो ?

>> तुमच्या कडे बोईंग आहे असे आतल्या गोटातून कळले आहे.

खि खि खि !!!!! :) आम्ही अजून एक बोईंग घेण्याची तयारी करत आहोत.

बबलु's picture

10 Jun 2011 - 7:15 am | बबलु

>>त्यासाठी मेल्या तुला टेख्ससला जायला पायजेल !!!

टेख्सस खरंतर तर आपल्याला आवडतं बॉ.
या क्यालिफोर्नियापेक्षा ३ पट मोठं घर विकत मिळतं म्हणे त्याच पैशात.
एव्हरीथिंग इज बिग इन टेख्सस. :) :)

>>आमचा बबल्या असलाच वात्रट आहे.

आमेन. ;)