गाभा:
जय हींद,
देहरुपी मंदीराच्या कळसावर केस कमी झलेत्,त्यात मागे डोक्यावर फराच कमी झालेत्,त्यांना मुलामा चढवावा म्हणुन तात्पुरते बायोफायबर हेअर इंप्लांट(म्हणजे जेवढा काळ टीकेल ते टीकेल) करवयाचे आहे,आता ते पहील्यापेक्षा सुरक्षित आहेत(इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स कमी).
पण चमकणारे सोने नसते,पण नसतेच असेही नाही,म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काधायचा उद्देश्/हेतु आहे.
ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया मदत करावी.आपली खुप मदत होईल.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
21 May 2011 - 6:10 am | नाना बेरके
तुम्हाला पण 'जयहिंद'.
बायोफायबर हेअर इंप्लांट म्हणजे काय असते ? त्याला कुठले मटेरीयल वापरतात? कि ते औषधाने करता येते? ह्याबद्दल माहीती नाही पण उत्सुकता आहे. डोक्याला चाई पडली तर त्याचा उपयोग होतो कां ? हाही एक प्रश्न आहे.
21 May 2011 - 6:17 am | सन्दीप
वीरु हो आपला शेहवाग त्याने केलय म्हणे. त्यालाच विचारा.
21 May 2011 - 6:18 am | परिकथेतील राजकुमार
सेहवाग, सलमान अथवा हर्षा भोगलेला भेटा.
अवांतर मी आधी चुकुन 'बायकोबरोबर हेअर इंप्लांट? कोणी केलंय का? माहीती?' असे वाचले.
21 May 2011 - 6:22 am | नितिन थत्ते
हर्षा भोगले यांच्याशी संपर्क करा.
21 May 2011 - 6:35 am | आनंद
सहजच विचारतो, लग्न झालय का तुमच?
नसेल झाल तर ते काय हेअर इंप्लांट का काय ते करुन घ्या.
झाल असेल तर काय फरक पडतोय आहे ते राहु द्या
21 May 2011 - 6:38 am | विजुभाऊ
डानरावाना विचारा
21 May 2011 - 3:04 pm | प्यारे१
१) स्वतःला माहिती आहे केस नाहीत, लावणार ते कसेही असले तरी खोटे असणार.
२) जवळच्या सगळ्यांना ठाऊक असणार की ह्याचे केस गेले आहेत. नंतर इम्प्लान्ट केल्यावर खोटे असलेले केस समजणार आहेच.
३) जे जवळचे नाहीत त्यांना तुम्ही केसाळ आहात की टकले याच्याशी काहीही घेणे देणे असणार नाहीये.
४) लग्न झालेले नसेल तर होणार्या बायकोला तुम्ही फक्त केस असल्यामुळे आवडणार असाल तर तिची मानसिकता किती उथळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यापेक्षा अशी बायको निवडणे अधिक हितकारक जी तुम्हाला आहात तसे स्विकारेल.( डोक्यावरल्या केसांबाबत मर्यादित)
या उप्पर आपली मर्जी.
21 May 2011 - 8:56 pm | pramanik
१) अगदी खरे दीसतात्,तुम्ही सांगितले की हेअर ट्रान्सप्लांट केलय तरी खोटे वाटणार नाही,हे केस खोटे असले तरी 'विग' पेक्षा १०० टक्के चांगले,विग हे वरती ठेवले जाती,हे केस मुळात पेरले जातात.फक्त हेअर ट्रान्सप्लांट सारखे वाढत नाहीत.
२)समजेल पण आपल्या डोक्यावर केस तर दीसतील ना,त्यात खरे सुख!
३)साफ चुक तुम्हाला प्रत्येक ठीकाणी ह्याची जाणीव करुन दीली जाते,म्हणुन तुमची लुक खुप महत्वाची.
४)हे एकदम मनातले बोललात्,लग्न झाले नाहीये पण होईल छान सर्व्,मी दुस-यासारखे हे स्विकारनार नाही,बदलेन्,हेअर ट्रान्सप्लाट इतक्यात नाही करायचे म्हणुन ह्या बद्दल विचारत होतो.मी अपेक्षा कशी ठेवणार की एखाद्या मुलीने मला स्विकारावे? जर मला सर्व केस असते(जे आहेतही पण नाहीयेत असे समजा) तर मीही सुंदर मुलगीच पहीली असती ना? रंग ही माझ्यासारखा असावा असे म्हणालो असतो ना?
अवो मर्जी नाही काय्,मजबुरी,पण आपण हे बदलणार हे नक्की
:-)
21 May 2011 - 3:12 pm | स्पा
हॅ हॅ हॅ
21 May 2011 - 3:24 pm | pramanik
सेहवाग - डायरेक्ट हेअर ईंप्लांट
भोगले - हेअर ट्रान्सप्लान्ट
पहील्यात आपलेच केस डोक्या मागची स्कीन न कापता लावतात्,ह्याने टाके यत नाहीत.
दुस-यात मागे टाके येतात.
पण दोन्ही मधे केस हे आपलेच असतात्,एका जगीचे दुस-या जागेत लावलेले.दोन्ही परमानन्ट उपाय आहेत.
पण बायोफायबर हे आपले केस नसतात दुसरे मटेरीयल असते म्हणुन इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स असतो .
काही माहीती आहे का ख-या एखाद्या पेशन्टबद्द्ल?
21 May 2011 - 9:03 pm | अलख निरंजन
माझ्यामते टक्कलही पर्सनॅलीटीत भर घालू शकते. अब्दुल कलांमासारखी ओंगळवाणी केशरचना असण्यापेक्षा अनुपम खेर सारखे स्मार्ट टक्कल काय वाइट?
21 May 2011 - 11:05 pm | रमताराम
शिवाय शँपूचा/तेलाचा/कंडिशनरचा खर्च किती वाचतो याचा विचार करा.
(काटकसरी)रमताराम
फक्त शेविंग क्रीमचा खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या म्हंजे झालं.
(सावध) रमताराम
22 May 2011 - 1:42 am | Nile
का? हे काय वाईट्ट आहे? ;-)
उलट असा फायदाही करुन घेता येईल.
22 May 2011 - 3:05 am | अलख निरंजन
अहो डोकं शेव करण्याचं म्हणत आहेत ते..
23 May 2011 - 3:14 pm | रमताराम
हा नायल्या बरेच दिवस गायब होतो, मग येतो तेव्हा ट्यूबलाईट अंमळ उशीरा पेटते त्याची. (पण एकदा पेट्ली की मग स्पार्किंग चालू होते हा मुद्दा अलाहिदा.)
24 May 2011 - 12:18 pm | Nile
आम्ही तुमच्या थोडं पुढे जाउन तुळतुळीतपणाच्या ऑब्सेशनवर कमेंट केली हो! आम्हाला पुढे रहायची सवयच आहे काय करणार! ;-)
21 May 2011 - 11:13 pm | नर्मदेतला गोटा
छगन भुजबळना विचरा
22 May 2011 - 7:23 pm | टारझन
हेच म्हणायचे होते .
- ( सकाळी सकाळी नर्मदेत जाणारा ) टारझन
23 May 2011 - 12:07 am | नर्मदेतला गोटा
डोक्याचा झालेला गोटा नर्मदेतला
23 May 2011 - 12:26 am | शिल्पा ब
तुम्ही कुरूप दिसता असं तुम्हाला वाटतंय का? नाही अगदी धागाच काढला म्हणून विचारलं...
टक्कल असलं तरी उठावदार व्यक्तिमत्व असलेले लोकं पहिले आहेत. आता तो प्रिन्स विल्यम नाही का टकला?
सेहवाग अगदीच भयानक दिसत होता म्हणून त्याने सर्जरी केली असेल असं वाटतंय...
बाकी चालू द्या.
23 May 2011 - 8:29 am | माझीही शॅम्पेन
तुम्ही महा-गुरून सारखा विग का लावत नाही !
शपथ सांगतो सचिन जाम डोक्यात जातो , त्यानी फॅंडा द्यायला सुरूवात केली की अस वाटत जिथे कुठेही लाईईव शूटिंग चालू असेल प्रेक्षक म्हणून जाव आणि कॅमेरा समोर त्याचा विग उडवून द्यावा !!!
24 May 2011 - 1:40 pm | सविता
हा प्रतिसाद सुपरलाईक करण्यात येत आहे.
मला वाटायचे फक्त माझ्याच डोक्यात जातो तो सचिन, पण आहेत.... बरेच रांगेत....
नच बलिये जिंकलं आणि ह्याला वाटायला लागलं..आपण लय भारी....
शामक दावर च्या ग्रुप मधलं कोणीही किंवा गेला बाजार... डान्स इंडिया डान्स मधले कोणीही परिक्षक किंवा स्पर्धक या छपरी सचिन पेक्षा १०० पट चांगले नाचतात!
25 May 2011 - 8:46 pm | माझीही शॅम्पेन
अहो धन्यवाद !
लाईन बरीच मोठी आहे :) इथे विषयंतर होत असल्याने कदाचित जास्त लोक प्रतिक्रिया करणार नाहीत !!
अवांतर - संसदीय भाषेत शिव्या घालण्यासाठी आम्ही हल्ली "महा-गुरू" शब्द वापरतो .
23 May 2011 - 9:09 pm | अविनाशकुलकर्णी
केश योग वापरा...
त्याने टकलावर केस उगवतात....असा त्यान्चा दावा व वादा आहे.
त्या बरोबर श्री ल्क्ष्मी यंत्र पण फुकट मिळते..
ट्राय करायला हरकत नाहि..नाहितर केश रोपण आहेच..
रात्री १२ नंतर ह्या जाहिराति..सुरु होतात...
23 May 2011 - 11:45 pm | इंटरनेटस्नेही
.
25 May 2011 - 8:07 am | नरेशकुमार
कोनाला कशाचं तर pramanik रावांना केसांच !
मागे माझा एक मित्र डोक्यावर केस येन्यासाठी एक तेल लावत असे. काही फायदा झाला कि नाही ते विचारुन सांगेन.
बादवे आमचं उलट आहे, केसांची वाढ खुप आहे. त्यामुळे असले काही काम करन्याची वेळ आली नाही.