स्टफ्ड बन्स

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
19 May 2011 - 6:35 pm

ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :)
अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे.

.

साहित्य बन्ससाठी:

११/२ कप मैदा
१/४ कप पाणी
१/४ कप दुध
३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट
१ टेस्पून साखर
३/४ टीस्पून मीठ
३ टेस्पून ऑल्हिव ऑईल

.

बन मधे भरण्यासाठी तुमच्या आवडीची कुठली ही सुकी भाजी, उदा; उकड्लेल्या बटाटयाची, बटाटा-मटार सुकी भाजी .इ.

पाकृ:

दुध कोमट गरम करावे व त्यात साखर आणी ड्राईड यीस्ट नीट मिक्स करुन बाजुला ठेवावे.
दुसर्‍या भांड्यात मैदा घ्यावा व मधे खळगा करुन त्यात मीठ, पाणी, तेल व यीस्ट्+दुधाचे मिश्रण घालावे.

.

सगळं नीट एकत्र करुन सैलसर पीठ मळून घ्यावे.सुरुवातीला थोडे चिकट पीठ वाटेल पण नीट मळले की छान मऊसुत पीठ तयार होईल.
तेल लावलेल्या भांड्यात पीठाचा गोळा ठेवून , वरून क्लिंग फॉईल लावून उबदार ठिकाणी १ तासभर ठेवावे .

.

एका तासानंतर पीठ फुगून दुप्पट झालेले असेल.

.

फुगलेले पीठ चांगले मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून परत १० मिनिटे उबदार ठिकाणी ठेवणे.

.

पुन्हा गोळे फुगतील.

.

फुगलेल्या गोळ्यांना चांगले मळून त्याचे वाटी /पारी तयार करुन त्यात तुमच्या आवडीचे सारण भरून नीट बंद करणे.

.

वरून तयार बन्संना मिल्क वॉश / एग वॉश देणे (दुध / अंड कुकिंग ब्रश ने लावणे).

.

प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटीग्रेड वर १५-२० मिनिटे भाजणे.

.

गरमा-गरम स्टफ्ड बन्स तयार...वरून थोडे बटर लावावे...मस्तपैकी चहासोबत खाण्याचा आनंद लुटा :)

.

प्रतिक्रिया

Mrunalini's picture

19 May 2011 - 7:26 pm | Mrunalini

मस्त गं..... एकदम tasty लागणार हे... आता एकदा करुन बघते.. फक्त काय आहे ना, नवरा veg खात नाही... तो pure nonvegiterian आहे.. ;) त्यामुळे चिकन टाकुन try करते. :)

पंगा's picture

25 May 2011 - 1:39 am | पंगा

फक्त काय आहे ना, नवरा veg खात नाही... तो pure nonvegiterian आहे.. ;) त्यामुळे चिकन टाकुन try करते. :)

का म्हणे? कधीमधी चुकून नरड्याखाली भाज्या उतरल्या, तर नेमके काय बुडते, धर्म की जात?

('जास्तच आहे!' हे पुढचे शब्द आवरते घेतलेले आहेत.)

(बायदवे 'नॉनव्हेजिटेरियन' या शब्दाचे स्पेलिंग - म्हणजे हा चुकूनमाकून इंग्रजी शब्द असलाच, तर - non-vegetarian असे नको का?)

सानिकाबाईंनी मस्त कृती व फोटू देवून आमच्या लाळग्रंथींचे काम वाढवलेले आहे.

पिंगू's picture

19 May 2011 - 9:16 pm | पिंगू

झक्कास बरं का सानिकाताय...

बाकी अंड्याचं ब्रशिंग काय मला चालणार नाय.. दुधाचं ठीक आहे..

- पिंगू

प्राजु's picture

19 May 2011 - 11:26 pm | प्राजु

मस्त! करेन प्रयोग हा.
फोटो एकदम मस्त!

स्वानन्द's picture

20 May 2011 - 12:03 am | स्वानन्द

झक्कास!! वस्तुन्ची मांडणी पण एकदम मस्त.

ते सारण कसे बनवायचे हे पण सांगितले असते तर बरे झाले असते. :)

पावं करायची सुरुवात यापासुनच करतो आता, झालं नीट तर टाकतो इथं नाहीतर पावभाजी बरोबरच खावं लागेल मला.

पण लई भारी आयडिया. धन्यवाद.

विशाखा राऊत's picture

20 May 2011 - 5:41 am | विशाखा राऊत

सानिका नेहमीप्रमाणे मस्त, सुरेख, अप्रतिम आणी बाकी जे असते ते सगळेच :)

सविता००१'s picture

20 May 2011 - 8:05 am | सविता००१

खरच मस्त दिसते आहे पाक्रु.
लगेच करणारच.
बेस्टच आहे.

खादाड अमिता's picture

24 May 2011 - 11:33 am | खादाड अमिता

करुन बघणार!

टारझन's picture

24 May 2011 - 5:08 pm | टारझन

खाऊन बघणार

- मोफतलाल