भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करावा ही चर्चा येथे व्हावी ही अपेक्षा. खालील माहिती मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडेल असे वाटते.
१. पॅन नंबर - कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पर्मनंट अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर युनिट ऑनलाईन अप्लाय करता येतो. मात्र कागदपत्रे छाननीसाठी प्रत्यक्ष जावेच लागते. यासाठी बहुदा युनिट ट्रस्टच्या शाखेत जाता येते. कंपनी रजिस्टर करणार असाल तर ४९ए हा फॉर्म आवश्यक आहे. शिवाय कंपनी नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी, कंपनीचे ऍड्रेस प्रूफ आणि तुमचा आयडी लागेल. याची फी रुपये ९४ आहे. (फॉर्म आंतरजालावरून उतरवून घेतला असल्यास फुकट, नाहीतर रुपये ५ अधिक)
२. प्रा. लि. कंपनी च्या सुरुवातीसाठी टॅक्स अकाऊंट नंबर (टॅन) आवश्यक राहील. यासाठी ४९ बी हा फॉर्म भरून जेथे टीडीएस भरता येतो अशा ठिकाणी देणे आवश्यक आहे. योग्य ती छाननी झाल्या नंतर हा क्रमांक दिला जातो. यासाठी बहुदा रुपये ६० फी लागते.
३. कोणत्याही व्यवसायासाठी शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आवश्यक असते. याची फी मात्र तुमच्या कंपनीत किती लोक कामावर आहेत यावर ठरते. १ माणसासाठी रुपये १००, १ ते ५ माणसे नोकरीवर असल्यास रु. ३०० लागतात.
४. प्रा. लि. कंपनी साठी व्हॅट रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ही नोंदणी सेल्स टॅक्स साठी असते. यासाठी
- कंपनीच्या घटनेची प्रत
- नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी
- कंपनीचे ऍड्रेस प्रूफ
- तुमचे पासपोर्ट आणि लायसन असे किमान दोन आयडी
- विहित नमुन्यातील फोटो
- पॅन कार्डाची प्रत
ही कागदपत्रे लागतील.
या नोंदणीसाठी रु. ५०० फी आहे.
५. प्रा. लि. कंपनी साठी प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
यासाठी - कंपनीच्या घटनेची प्रत
- नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी
- कंपनीचे ऍड्रेस प्रूफ
- पॅन कार्डाची प्रत
यासाठी कोणतीही फी नाही.
६. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधीची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.
७. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी तर मेडिकल इंशुरंन्स रजिस्टरमध्ये नोंदणी आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.
ही माहिती चांगल्या हेतुने देत आहे. भारताबाहेरील व्यक्तींना भारतात व्यवसाय सुरू करतांना काय काय आवश्यक असू शकेल याचा अंदाज देण्यासाठी २०१०-११ या सालात संकलित केलेली आहे. वर देलेल्या रकमांचे आकडे, फिया भारतातील निरनिरा़ळ्या कायदेशीर तरतूदींनुसार बदलत असतात. योग्य त्या कायदेशीर माहितीसाठी योग्य त्या वकिलाची मदत घ्यावी.
या शिवाय अजून कोणत्या नोंदण्या आवश्यक असतात?
प्रतिक्रिया
19 May 2011 - 4:03 am | अन्या दातार
व्यवसाय नक्की कोणता करावा हे आधी ठरवावे लागत असेल ना?? ;)
चेष्टा सोडा, पण माहितीपूर्ण लेख. :)
19 May 2011 - 4:19 am | निनाद
ते मात्र आपले आपल्यालाच करावे लागेल ना?
तरीही काही कल्पना असल्यास येथे मांडायला हरकत नाही.
व्यवसाय करतांना दर वेळी नवीनच कल्पना असली पाहिजे असे नसतेच. उलट जुनाट व्यवसाय काही नव्या कल्पना लावून केला तर यशाची शक्यता अधिक असे मला वाटते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
19 May 2011 - 4:10 am | टारझन
काही धंदे सुरु करायला या पैकी कशाचीच आवश्यकता भासत नाही ! त्यात पैसा ही खुप मिळतो .
- ( काळे धंदे करणारा ) छोटा टार्जन
19 May 2011 - 4:28 am | कुंदन
+१
धंदा करायचा तर भांडवल लागेल , ते कसे उभारावे ?कर्ज कसे मिळवता येईल धंदा करण्यासाठी ?
जाणकारांनी मदत करावी.
19 May 2011 - 4:57 am | नरेशकुमार
भागीदारी करन्याबद्दल काय विचार आहे ?
बादवे : माझ्याकडे पालथे धंदे करन्याचा भर्पुर नि ताजाताजा एक्स्पेरियन्स आहे.
19 May 2011 - 4:40 am | दत्ता काळे
व्यवसाय / धंद्यापरत्वे अजून नोंदण्या कराव्या लागतात. त्यात मग, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, प्रदूषण नियंत्रण खाते, लघु / मध्यम उद्योग ( एसएसआय / एमएसआय ) ह्या नोंदण्या येतात. अजून कितीतरी .. हे नंतर म्हणजे उद्योगधंदा सुरू केल्यावर कळते.
तुम्ही वर दिलेला सेल्स टॅक्स ( त्याला हल्ली व्हॅट म्हणतात ) रजिस्ट्रेशनचा खर्च एवढा कमी नाही. तुम्ही दिलेल्या आकड्याच्या ७० पट ( म्हणजे साधारणपणे रु. ३५,०००/-) इतका टेबलवरचा खर्च येतो ( टेबलाखालचा वेगळा).
19 May 2011 - 6:43 am | निनाद
व्हॅल्यु अॅडेड टॅक्स नोंदणीसाठीइतका खर्च येतो?
बापरे! फी मध्ये भलतीच व्हॅल्यु अॅड झालेली दिसते :(
अपडेट केल्या बद्दल धन्यवाद!
धंदा सुरू केल्यावर नोंदण्या समजतात हे त्रासदायक वाटते. हे आधी कळले पाहिजे कारण मग त्यातूनच लाचेचे प्रकार घडतात. बरेचदा संबंधित सरकारी अधिकार्यांना हे माहिती असते आणि मगच ते मागणी करतात असा माझा अनुभव होता.
20 May 2011 - 4:15 am | प्रमोद्_पुणे
ची रक्कम जवळजवळ रु. ३०,००० आहे.
20 May 2011 - 11:55 am | शैलेन्द्र
पण पहीला वॅट भरताना ति वजा करता येते.
19 May 2011 - 4:57 am | नितिन थत्ते
उत्तम माहितीपूर्ण धागा.
१. >>प्रा. लि. कंपनी साठी प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
या खेरीज स्वतःचे प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. आपण आधी नोकरी करत असतो तेव्हा पगारातून प्रोफेशन टॅक्स भरतो. नोकरी सोडल्यावर वेगळे रजिस्ट्रेशन घ्यावे लागते.
२. जर सेवा पुरवण्याचा व्यवसाय करणार असू तर (काही अपवाद वगळता) सर्व सेवादात्यांना सेवाकराचे (service tax) रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. विशिष्ट टर्नओव्हरपर्यंत सेवाकर माफ असतो. तरी रजिस्ट्रेशन मात्र करावे लागते.
३. तुम्ही काही धोकादायक व्यवसाय (उत्पादन, साठा, विक्री) वगैरे करत असाल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची + प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी लागत असावी. काही बाबतीत एक्स्प्लोझिव्ह लायसन्सही लागते.
४. जर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा असेल तर एफ पी ओ चे लायसन्स लागते. हॉटेल/उपहारगृहाचा व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या आरोग्य विभागाची परवानगी लागते.
(अवांतरः धागाप्रस्तावकाचा उद्देश माहितीपूर्ण चर्चेचा दिसतो आहे. त्यात थट्टामस्करी होऊ नये अशी इच्छा).
19 May 2011 - 6:57 am | निनाद
सेवाकराची भानगड वेगळीच म्हणायची. आता किती बसतो हा कर?
फार फार पूर्वी नव्हताच नंतर हा रु.१५०० होता असे आठवते.
कोणत्याही कराचे रजिस्ट्रेशन करावे की वेळ आल्यावर मग पाहू असे म्हणून शक्य तोवर पुढे ढकलावे?
माझ्या दोन मित्रांचे वेगवेगळे म्हणणे आहे. ज्याने पुढे (जमतील ते सर्व कर आणि नोंदण्या) ढकलले, त्याचा धंदा उत्तम चालतो आहे. आणि त्याला कोणताही सरकारी त्रास नाही. इतकेच काय योग्य त्या रकमेचा पुरवठा असल्याने त्याला बरेचदा 'आवश्यक ती माहिती' वेळेआधीच मिळालेली पाहिली आहे. पण हे योग्य नाही असे वाटते. त्याला विचारले असता, 'म्हणूनच तुमी लोक धंद्यात नाही' म्हणतो. तेव्हा त्याचा मिठाईचा व्यवसाय होता.
मात्र जो सगळे कर भरतो, नोंदण्या करतो त्याचा व्यवसायही बराच चालला आहे. पण तो व्यवसायापेक्षा या कामातच बरेचदा गुंतलेला आढळला आहे.
येथे व इतरांचे अनुभव काय आहेत?
अवांतराच्या खुलाश्या बद्दल धन्यवाद!
माहिती म्हणाल तर या विषयावर व्यवस्थित चर्चा व्हावी, अनुभव कळावेत असे वाटते. त्यातून ज्यांना काही करायचे आहे त्यांच्यासाठी काही 'बेसिक्स' तरी स्पष्ट होतील म्हणून हा विषय आणला.
19 May 2011 - 7:18 am | सहज
खरे तर भारत सरकार, राज्य सरकार यांच्या संबधीत संकेतस्थळावर अद्ययावत माहीती हवी.
एक दुवा दिसतो आहे खरा पण ही माहीती नवी-जुनी किती कल्पना नाही.
19 May 2011 - 7:33 am | निनाद
चांगला दुवा. येथे सगळी माहिती संकलित आहे. त्यामुळे नक्की काय काय करायचे (आणि कशासाठी) हे एकत्रित कळते आहे. त्यात व्हॅटचा खर्च रु.५००० म्हंटले आहे, त्या अर्थी ही माहितीही जुनी असावी. पण माहिती एकत्रित आहे हेच कमी नाही :)
19 May 2011 - 7:48 am | निनाद
बिझनेस डॉट गोव्ह डॉट इन असे एक पोर्टल आहे असे दिसले. याचा उपयोग व्हायला हवा. पण त्यात छोट्या व्यवसायांसंबंधी काही फारसे वरवर तरी दिसले नाही.
19 May 2011 - 7:57 am | निनाद
एम आय डी सी च्या साईटवर रोड टू इन्व्हेस्टमेंट नावाची पुस्तिका आहे. त्यात महाराष्ट्राची चांगली माहितीही आहे. ही पुस्तिका २०१० मध्ये केलेली आहे.
19 May 2011 - 11:58 am | शाहरुख
माहिती चांगली आहे.
'एक खिडकी परवाना' (सिंगल विंडो परमिशन) चा मधे गाजावाजा होत होता त्याचे काय झाले ?
चला, आता फक्त कसला व्यवसाय करायचा ते समजले की आमची गुलामगिरी संपेल :)
19 May 2011 - 8:38 pm | निनाद
तुम्ही ज्या क्षेत्रात सध्या काम करत आहात त्याची आवृत्ती सुरू करण्यासाठी काय करता येईल ते पाहा. त्यासाठी जेथे काम करता तेथे व्यवसाय मिळवण्यासाठी काय केले जाते त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. त्याच्या सविस्तर नोंदी घ्या. त्याचा नक्की उपयोग होईल.
किंवा हा व्यवसाय फार आवाक्याबाहेरील असेल (उदा. हेवी इलेक्ट्रिकल्स, रसायने वगैरे) तर त्यासाठी लागणारे पूरक व्यवसाय पाहा त्यात काही संधी असू शकतील.
माझ्या मते तरी नवीनच व्यवसायात येतांना 'रिइन्व्हेंटींग द व्हील' करू नये. त्यापेक्षा कुणी तरी चाक वापरतेच आहे, तेच तुमच्या प्रकारे वापरून पाहावे. यामुळे बरीच मेहनत वाचते.
अर्थात नवीन चाक शोधल्यावर काही वेळा प्रचंड नफाही होतो हे खरे.
ऑल द बेस्ट!
19 May 2011 - 12:19 pm | अमोल केळकर
चांगली माहिती
धन्यवाद
अमोल केळकर
19 May 2011 - 1:46 pm | कौशी
छान माहिती दिलीत..
धन्यवाद
19 May 2011 - 2:13 pm | मराठे
ह्या सगळ्या प्रकाराला वेळ किती लागतो?
मी ऐकलंय की साधारण तीन महिने जातात सगळे सोपस्कार उरकायला...
एक ऐकीव माहीती: सिंगापूरमधे प्रा.लि. काढायची असेल तर एका दिवसात सगळं काम होतं म्हणे.
19 May 2011 - 2:56 pm | वारा
एक नम्बर माहीती.... अगदी मोक्याच्या वेळी चा.न्गली माहीती मिळत आहे.
धागा लेखकाचे आभार..
काही श.का : या महीती बरोबर इन्ग्रजी शॉर्टफॉर्म पण कळाले तर फार बर होईल उ.दा. सि. एस. टी. बि. सटी. नम्बर म्हणजे काय इत्यादी. तसेच आपल्या रेसिडेन्स पत्यावर हे लायसन्स मिळु शकते काय कि.वा कसे.
20 May 2011 - 2:24 am | निनाद
सि. एस. टी. बि. सटी. नम्बर ?
या बद्दल कल्पना नाही. कशासाठी लागतो हा?
सेल्सटॅक्स कंसल्टंटला विचारून पाहा.
इंग्रजी शॉर्टफॉर्म असले तर देईन पण सरकारी कामकाजात नेमके मराठीच नाव लागते असा माझा समज होता. आता कदाचित बदलले असावे.
20 May 2011 - 2:29 am | दत्ता काळे
१. बीएसटी ( BST = बॉम्बे सेल्स टॅक्स, ह्याला एमएसटी असेही म्हणतात) म्हणजे सेल्स टॅक्स आणि सीएसटी (CST) म्हणजे सेन्ट्रल सेल्स टॅक्स. दोन्हीमधला वेगळेपणा असा कि जर व्यापार्याने ( म्हणजे उद्योगधंदा करणार्याने ) महाराष्ट्रातच विक्री केली तर त्याला सेल्सबिलामध्ये बीएसटी लावावा लागतो. आणि जर त्याने आंतरराज्यीय विक्री (म्हणजे महाराष्ट्राबाहेर) केली तर त्याला सेल्सबिलामध्ये सीएसटी लावावा लागतो. पण त्याचे अनेक नियम आहेत. ते इथे विस्तृतपणे लिहिता येणे कठीण आहे. १ एप्रिल २००५ पासून बीएसटी कायदा रद्द होऊन त्याजागी महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा, २००२ आस्तित्वात आला. ज्याला व्हॅट अॅक्ट असे म्हणतात.
२. बीएसटी आणि सीएसटी हे दोन्ही नोंदणी दाखले ( Licenses ) काही नियमांनुसार घरच्या पत्त्यावर मिळू शकतात.
20 May 2011 - 3:53 am | यकु
चांगली माहीती दिलीस रे भावा..
माझी ट्रान्सलेशन एजन्सी सुरु करताना ही माहीती आणि इथे झालेली चर्चाही फार उपयोगी पडेल.
:)
20 May 2011 - 3:57 am | निनाद
ट्रान्सलेशन एजन्सी? इंटरेस्टींग व्यवसाय. त्यासाठी इतक्या नोंदण्या कदाचित लागू नयेत पण अर्थात तुमचा व्याप किती आहे त्यावर अवलंबून असणार ते. नक्की कसे असणार व्यवसायाचे स्वरूप हे पण द्या.
20 May 2011 - 4:29 am | प्रमोद्_पुणे
महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या स्वरुपामधे व्यवसाय करायचा आहे ते ठरविणे. जसे की sole proprietorship, partnership firm, private limited/public limited company, LLP (limited liability partnership) etc. बरिच रजिस्ट्रेशन्स हल्लि ऑनलाईन झाली आहेत. पण साधारणपणे वर नमूद केलेली रजिस्ट्रेशन्स लागतात. काही रजिस्ट्रेशन्स ही कामगार संख्येवर अवलंबून आहेत जसे की, ई एस आय (कामगार संख्या आणि वेतन), पी एफ ई.
फक्त रजिस्ट्रेशन्स घेतली की संपले असे नाही. बरेच सारे कंप्लायन्सेस आहेत प्रत्येक कायद्याखाली.
20 May 2011 - 5:06 am | नारयन लेले
छान माहिती दिलीत..
एखाद्या नविन व्यवसाय सुरु करणार्या माणसास उपयुक्त माहिति आहे.
धन्यवाद
विनित
20 May 2011 - 5:54 am | वारा
"http://companiesinn.com/companyregistrationindia/index.php"
पण हे लोक चार्ज घेतत.
20 May 2011 - 9:05 am | प्रभाकर पेठकर
उपहारगृहासाठी मी खालील परवाने/पॅन नंबर घेतले होते.
१) पॅन नंबर - हा सर्व सरकारी कामांसाठी/टॅक्स भरण्यासाठी लागतो.
२) शॉप अॅक्ट सर्टीफिकेट - हे प्रत्येक शॉपसाठी बंधनकारक आहे.
३) व्यवसायाच्या नावे बँक खाते - क्रेडीट/डेबिट कार्डाने पेमेंट करणार्या गिर्हाईकासाठी कार्ड स्वॅपिंग मशीन ठेवण्यासाठी आवश्यक.
४) व्हॅट चा नंबर - कॉर्पोरेट सेल्स मधे व्हॅट नंबर आवश्यक आहे. ज्यांना सर्विस उपलब्ध करून द्यायची त्यांच्या बिलांवर व्हॅट नंबर लिहावा लागतो.
५) सर्विस टॅक्स नंबर - वरील प्रमाणेच
६) फायर ब्रिगेड चे ना हरकत प्रमाण पत्र
७) पोलिस आयुक्तांच्या कचेरीचे ना हरकत प्रमाण पत्र
८)म्युनिसिपाल्टीच्या आरोग्यखात्याचे ना हरकत प्रमाण पत्र
९)रेसिडेंशिअल सोसायटीच्या तळमजल्यावर उपहारगृह असल्यामुळे त्या सोसायटीचे ना हरकत प्रमाण पत्र.
20 May 2011 - 9:55 am | प्रमोद्_पुणे
८)म्युनिसिपाल्टीच्या आरोग्यखात्याचे ना हरकत प्रमाण पत्र
हे ना हरकत प्रमाण पत्र अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५० खाली दिले आहे का? प्लिज मला ते
प्रमाणपत्र पाहून सांगाल का? त्यावर तसा उल्लेख असेल. धन्यवाद.
21 May 2011 - 3:29 am | नाना बेरके
अबब.. येवढी लायसने आणि रजिस्ट्रेशने, परत कंप्लायन्स, अनेक टॅक्सेस, त्याची रिटर्ने, मग धंदा कधी करायचा. लायसन आणि रजिस्ट्रेशन करताना गवर्मेंट ऑफिसला इतक्या चकरा घालायला लागतात कि, शेवटी "शिंगरू मेलं हेलपाट्यानं" अशी अवस्था होती.
त्यापेक्षा आमची सरकारी नोकरी बरी. बहोत खाया, बहोत पिया और उप्परसे गिलासभी फोडा. कोण बोलणार ?
22 May 2011 - 9:54 am | सुधीर
नोकरी करत असताना एखादा व्यवसाय करणे कायद्याने मंजूर आहे का? सध्या मी "कार रेंटल सर्व्हीसेस" चा व्यवसाय चालू केला आहे. मी शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन खाली नोंदणी केली आहे (ह्याला बोली/फारसी चु. भू. द्या. घ्या. भाषेत गुमास्ता असेही म्हणतात). शिवाय वाहनासाठी "टी परमीट" ही घेतलं आहे. मी पॅन नंबर दोनही (व्यवसाय व नोकरी) ठिकाणी तोच वापरतो. त्यात काही गैर नसावं असा माझा समज आहे. तरीही जाणकारांनी खुलासा केल्यास आभारी राहीन.
बाकी वरील नोंदणी करून देण्यासाठी "एजंट" ही असतात. उ. दा. गुमास्तासाठी मला ब्रु. मुं. म. पा. च्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागले. पण, एक प्रक्रिया कळली. (परप्रांतीय) एजंट ५००० रुपये म्हणत होता तेच नोंदणीपत्र मला १२०० रुपयात लाच न देता मिळाले. अधिका-याची तशी इच्छा असावी, पण तो तसं प्रत्यक्ष बोलला नाही. वेळ मात्र स्वत:चा द्यावा लागला. वाहन नोंदणी मग आर. टी. ओ. च्या "एजंट" कडूनंच करवून घेतली. वेळ वाचला, कागदपत्र भरायची कामं त्यानेच केली, पण पैसे अधिक मोजवे लागले.
23 May 2011 - 5:16 am | निनाद
अभिनंदन! उत्तम केलेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
मला तरी काही हरकत दिसत नाही. सरकारी नोकरीसाठी मात्र वेगळे नियम असू शकतात. तसेच खासगी क्षेत्रातही नोकरीच्या अटी निरनिराळ्या असू शकतात.
तुम्ही निवडलेला व्यवसाय उत्तम आहे. खरे म्हणजे गाड्या भाड्याने देण्याच्या व्यवसायात फक्त दलालीच परवडते. स्वतःची गाडी असेल तर सुरुवातीला फायदा वाटला तरी पुढे लॉस होतो असे पाहिले आहे. (येथील एक सदस्य विश्वास कल्याणकर यांनीही अशा स्वरूपाचे अनुभवी मत नोंदवल्याचे आठवते. ते निवृत्त बँक कर्मचारी/मॅनेजर आहेत.) त्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर आहात असे वाटते. (तसे असले तरी आपली एक गाडी कायम राखावीच लागते.)
या धंद्यात सर्व गाडी मालकांशी उत्तम संबंध राखणे महत्त्वाचे ठरते. तसेच वेळा पाळण्यावरून फार घोळ होतात. चुका ड्रायव्हर किंवा मालकांच्या असून शिव्या मात्र ज्याने गाडी पुरवली आहे त्यालाच खाव्या लागतात. किंवा त्यासाठीच पैसे मिळतात :)
अर्थात तुम्हाला या क्षेत्राचे चांगले ज्ञान असेलच!
या व्यवसायात तुम्ही कसे आणि का आलात या विषयी काही सांगू शकाल का?
24 May 2011 - 11:07 pm | सुधीर
तुमच्या उत्तराने उत्साह वाढला! पण, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मी सध्यातरी दलालीच्या व्यवसायात नाही. (हा, पण पुढेमागे विचार आहे. कारण तो "कमी जोखमीचा" आहे). शिवाय माझा अनुभवही फक्त ३ आठवड्याचाच आहे.
"स्वतःची गाडी असेल तर सुरुवातीला फायदा वाटला तरी पुढे लॉस होतो असे पाहिले आहे"
खरं असावं तुमचं म्हणणं! कारण, ह्यात शिरण्यापूर्वी ब-याच जणांनी तोच सबुरीचा सल्ला दिला होता. पण तरीही शिरलोच आहे.
या व्यवसायात तुम्ही कसे आणि का आलात या विषयी काही सांगू शकाल का?
कदाचित अंतरिची ऊर्मी! शिवाय, कमी भांडवलीतून चालू करून पुढे वाढवता येतो. सध्या एकाच गाडीने सुरूवात केली आहे. त्यातही माझी भागीदारी ५०% आहे. उरलेले ५०% मी इतराकडून भाग भांडवल म्हणून घेतले आहेत "नुकसान होऊ शकेल" हा अंदाज देऊनच. (पण पूर्ण कागदोपत्री मालकी आणि व्यवस्थापन माझेच आहे. मुख्य निर्णय घेताना मी संगनमत जरूर करतो.) ह्यात डावी उजवी बाजू आहे.पण महत्त्वाचा फायदा म्हणजे, तोटा सहन करावा लागला तरी तो विभागून जाणार आहे. १ वर्ष फायदा-तोटा न बघता,नेटाने चालू ठेवायचा ह्या इराद्यानेच ह्यात पाऊल टाकलं आहे. सध्याची गुंतवणूक ही ह्या व्यवसायातले खाचखळगे शिकण्यासाठी केलेली आहे. जेणेकरून पुढे मोठी गुंतवणूक करताना आत्मविश्वास असेल. पुढे "कार पूलिंग" किंवा "जी. पी. एस्. बेस् फ्लीट मॅनेजमेंट" किंवा तत्सम व्यवसायात जम बसवण्याचा विचार आहे.
26 May 2011 - 10:02 am | निनाद
तुमचा उत्साह झकास आहे. ऑल द बेस्ट!
हे आवडले. व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर काहीच रोखू शकत नाही. त्या अडचणीतून फायदेशीर उत्तरे तुम्हाला सापडत जातीलच.
काही सुचवण्या
१. मिपावर तुमच्या सेवांविषयी एक लेख लिहा.
येथे अनेक परदेशी मिपाकर आहेत. ते भारतात येतांना त्यांना एयरपोर्ट ते घर आणि घर ते एयरपोर्ट अशी रिलायबल वाहन सेवा हवी असते. ते संपर्क साधू शकतील.
२. तोच लेख इतरत्रही द्या जसे मायबोली, मनोगत वगैरे.
३. तुमची एक साधी पण संपर्क देणारी वेबसाईट बनवून घ्या. (काही मिपाकर यासाठी मदत करू शकतील असे वाटते.)
४. शक्य असेल तर ऑनलाईन बुकींग करता येईल अशी सोय असेल तर फारच उत्तम. त्यामुळे तुमचा आणि ग्राहकांचाही बुकींगचा वेळ वाचेल.
५. अकाऊंटींग पहिल्यापासून चोख ठेवा, त्यासाठी सीए ची मदत घ्या. (चांगला सीए शोधा!)
महत्त्वाचे म्हणजे मायबोली येथेमराठी उद्योजक या गटात सामील व्हा!
26 May 2011 - 11:20 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>महत्त्वाचे म्हणजे मायबोली येथेमराठी उद्योजक या गटात सामील व्हा!
या वाक्याला +१००. तो गट लई भारी आहे. माबो वरील चांगल्या गटांपैकी एक.
बाकी निनाद यांचा संपूर्ण प्रतिसादच मस्त आहे. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे.
26 May 2011 - 9:21 pm | सुधीर
सुचवण्या सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत.
१. मिपावर तुमच्या सेवांविषयी एक लेख लिहा.
येथे अनेक परदेशी मिपाकर आहेत. ते भारतात येतांना त्यांना एयरपोर्ट ते घर आणि घर ते एयरपोर्ट अशी रिलायबल वाहन सेवा हवी असते. ते संपर्क साधू शकतील.
२. तोच लेख इतरत्रही द्या जसे मायबोली, मनोगत वगैरे.
"रिलायबल"सेवा देण्यास मी नक्कीच उत्सुक आहे. सध्या तितक्या प्रमाणात सेवा देण्यास माझा व्यवसाय असमर्थ आहे. कदाचित, आत्मविश्वास कमी आहे. चुका झाल्यास "ब्रँड बिल्डींग" वर परिणाम होईल अशी भीती वाटते.
३. तुमची एक साधी पण संपर्क देणारी वेबसाईट बनवून घ्या. (काही मिपाकर यासाठी मदत करू शकतील असे वाटते.)
नक्कीच! सध्या मोडका तोडका प्रयत्न मी केला आहे. पण वर सांगितल्या प्रमाणे त्याची जाणून बुजून जाहिरात करत नाही आहे.
४. शक्य असेल तर ऑनलाईन बुकींग करता येईल अशी सोय असेल तर फारच उत्तम. त्यामुळे तुमचा आणि ग्राहकांचाही बुकींगचा वेळ वाचेल.
हो. अगदी १००% खर आहे.
महत्त्वाचे म्हणजे मायबोली येथेमराठी उद्योजक या गटात सामील व्हा!
आनंदाने.
22 May 2011 - 11:07 pm | पैसा
चर्चाही उद्बोधक होत आहे.
27 May 2011 - 1:50 pm | श्रीराजे
माहितीपुर्ण लेख आहे..!
28 May 2011 - 6:11 am | गोगोल
यात युनिक आय डी नंबर आल्यावर काय फायदा होईल?