' चहा '

विदेश's picture
विदेश in काथ्याकूट
15 May 2011 - 12:18 am
गाभा: 

एक वर्ग ' चहा प्या ' म्हणणारा आहे. चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते, असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते , असे त्या वर्गाकडून म्हटले जाते !
दुसरा वर्ग ' चहा कधीही पिऊ नये ' म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले (-काही नुकसान झाले नसल्याचा , अनुभव पाठीशी असला तरीही ! ) ' , असे सांगतात !
.सामान्य माणूस जास्त खोलात न जाता , ' कुणी काहीही म्हणो, मी चहा पिणार '- म्हणत ; जमेल तितक्या वेळा चहा पितो . त्याला आरोग्याच्या दृष्टीने अपाय झालेलाही दिसून येत नाही , ही वस्तुस्थिती !
' चहा प्यावा ' किंवा ' चहा पिऊ नये ' , अशा संभ्रमावस्थेत काय करावे ?

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

15 May 2011 - 12:48 am | माझीही शॅम्पेन

' चहा प्यावा ' किंवा ' चहा पिऊ नये ' , अशा संभ्रमावस्थेत काय करावे ?

एकदम फक्कड आल इत्यादी टाकून तयार केलेला चहा टाका , मग हाच प्रश्न स्वता:ला विचारून पहा ! कदाचित उत्तर सापडेल नाहीतर कॉफी पिऊन पहा , शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती

अवांतर :- एकदंदारीत भारतीय लोकाना चहा मुळे प्रेशर येत असावे तर पाश्यात्य देश लोकाना कॉफीमुळे प्रेशर येत असावे (नुसताच अंदाज निरीक्षण नाही)

इंटरनेटस्नेही's picture

15 May 2011 - 3:57 am | इंटरनेटस्नेही

चहा प्यायल्यामुळे प्रेशर येते हे खरे आहे.

-
(दबावतंत्राचा अंमल करणरा) इंट्या!

निवेदिता-ताई's picture

15 May 2011 - 4:49 am | निवेदिता-ताई

कुणी काहीही म्हणा चहा हा हवाच...

अशोक पतिल's picture

15 May 2011 - 7:32 am | अशोक पतिल

चहा हा माझा वीक पॉइट !

प्रचेतस's picture

15 May 2011 - 8:56 am | प्रचेतस

चहा प्यावा का न प्यावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न, पण दिवसभर थकून भागून घरी आल्यावर चहा मिळणे म्हणजे सुख. कुठे भटकायला गेल्यावर मसाला चहा भुरके मारत पिणे म्हणजे तर आनंदच, तर ऐन पावसात एखाद्या दुर्गम ठिकाणी चहाची टपरी दिसल्यावर गप्पा हाणत प्यायलेला चहा म्हणाजे तर स्वर्गसुखच.

अवांतरः पुणे मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे हॉटेल अशोकचा मसाला चहा लै म्हणजे लैच भारी. तर पुणे क्यांपातल्या इराण्याचा घट्ट मुट्ट चहा म्हणजे पण एकदम टक्कास.

चहाटळ

पांथस्थ's picture

15 May 2011 - 12:00 pm | पांथस्थ

पुणे मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे हॉटेल अशोकचा मसाला चहा लै म्हणजे लैच भारी. तर पुणे क्यांपातल्या इराण्याचा घट्ट मुट्ट चहा म्हणजे पण एकदम टक्कास.

अशोकचा चहा पिउन खुप वर्षे झाली. अजुन चव तशीच आहे का?

कँम्पातल्या ईराण्यांकडे सामोसे/भुर्जी/खिमा खाउन चहा प्यायची मजा काहि औरच. पण हळुहळु तेही नामशेष होत आहेत.

नारयन लेले's picture

16 May 2011 - 11:39 am | नारयन लेले

काय राव हॉटेल अशोकची पध्द्तशीर जहिरात काय हॉटेल तुमचेच वाट्त!

पण मधुन मधुन कटी॑ग चहा घेतला तर बरे आसते/वाटते.
पण आती तेथे .......

विनित

नितिन थत्ते's picture

15 May 2011 - 9:12 am | नितिन थत्ते

चहा घेऊ नये..... च्या प्यावी.

आपुन तर कवाबी आन कसलाबी (रेल्वेस्टेशन ते अमृततुल्य व्हाया इराणी-उडुपी-फायुष्टार-व्हेण्डिंग मशीन; साखरेचा, बिन साखरेचा, दुधाचा, बिन दुधाचा, मसाल्याचा, लिंबू घातलेला) च्या पितो. च्या असल्याशी कारन.

चहा घेतल्याने अ‍ॅसिडिटी होते असे काही लोक म्हणतात. मला तर तसा अनुभव नाही. पण दूध घातलेला चहा ठेऊन दिलेला (२-३ तास) असेल आणि तो पुन्हा गरम करून घेतला तर त्रास होत असावा असे वाटते.

बिन दुधाच्या चहाने अजिबात त्रास होत नाही.

५० फक्त's picture

15 May 2011 - 9:35 am | ५० फक्त

संभ्रमावस्था शक्यतो मादक पदार्थांचे सेवन केल्यावर येते, त्यावर पहिला उपाय म्हणजे पेरुच्या झाडाची पानं चावुन खावीत, म्हणजे संभ्रमावस्था नाहीशी होईल, मग नंतर कोरी कॉफि प्यावी लिंबु पिळुन. मग नंतर मस्त चहा प्यावा /वी.

एकदा वेळ काढुन माझ्याबरोबर सोलापुरला चला, ७-८ वेगवेगळे चहा पाजतो, आयुष्यभर संभ्रमावस्था येणार नाही मग तुम्हाला.

दिवसा दोन ते तीन कप चहा ठीक आहे. शक्यतो रिकाम्या पोटी चहा टाळावा.
बाकी चहा म्हणजे अमृत! :-)

योगी९००'s picture

15 May 2011 - 11:15 am | योगी९००

चहाच काय सकाळी सकाळी गरम पाणी पिल्यानेही प्रेशर येते.

चहा पिण्याऐवजी "चहा केल्याने" प्रेशर कमी होते.

ब्रिटिश टिंग्या's picture

15 May 2011 - 11:42 am | ब्रिटिश टिंग्या

च्या नव्हे....."पिणे" महत्वाचे! :)

अभिज्ञ's picture

15 May 2011 - 2:26 pm | अभिज्ञ

सहमत.

अभिज्ञ.

नरेशकुमार's picture

15 May 2011 - 11:58 am | नरेशकुमार

दिवसातुन मी दोन वेळा च्या मारतो (पितो).
बरे वाटते.
दोन पेक्शा जास्त मार्ला कि अ‍ॅसिडीटी होते.

मूकवाचक's picture

15 May 2011 - 12:49 pm | मूकवाचक

एकहार्ट नामक एक पाश्चात्य विचारक चलाखीने प्रश्न उभे करणे, शिताफीने सुटका करून घेण्याचा मार्ग दाखवणे, तुम्हाला तिथल्या तिथे तणावमुक्त करणे आणि चाहते मिळवणे यात दादा माणूस आहे.

चहाचाच काय कुठलाही प्रश्न सुटेल. हे अवश्य पहा:
http://www.youtube.com/watch?v=eJrveFV0MmY

स्मिता.'s picture

15 May 2011 - 2:00 pm | स्मिता.

चहा प्यावा की नाही हा प्रश्न कधी पडलाच नाही. मला दिवसातून एकदा तरी चहा हवाच असतो, तेसुद्धा तल्लफ म्हणून नाही तर मला आवडतो म्हणून मी चहा करून पिते. (लहानपणी आईने चहा न दिल्याचा वचपा काढते ;))

तरी कोणताही चहा मला आवडतोच असं नाही. पण त्यात योग्य प्रमाणात आले, वेलची असल्यास एखाद्या निवांत संध्याकाळी पाऊस पडत असताना बाल्कनीत बसून असा चहा पीत बसणे म्हणजे स्वर्गसुख!!

मला वाटते दिवसातून एक-दोन कप चहा प्यायला काही हरकत नसावी. मात्र काहीही अति झाले की त्याची मातीच होते.

>> काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले.

छ्या छ्या.. काय कोणा बुवाच्या सल्ल्याने चहा पिणे बंद केलतं.. घोर पाप केलं. चहा पाहिजेच... बाकी असले सल्ले देणारा बाबा गेला उडत..

- पिंगू चहावाला

शोधा म्हन्जे सापडेल's picture

15 May 2011 - 2:45 pm | शोधा म्हन्जे सापडेल

चहा पाहिजेच असे काही नाही पण कॉफी जास्त आवडते. ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, लेमन टी हे फेवरीट आहेत.

पुण्यात के एन पी च्या बाजुला बासुंदी चहा प्यायला आहे का? तिथे पाटीवर बासुंदी चहा रु. ६/- असेच लिहिले आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त गोड चहा, ५-६ वेळा ऊकळलेला, काही अम्रुततुल्यमधुन प्यायला आहे.

मुलूखावेगळी's picture

15 May 2011 - 2:53 pm | मुलूखावेगळी

पुण्यात के एन पी च्या बाजुला बासुंदी चहा प्यायला आहे का? तिथे पाटीवर बासुंदी चहा रु. ६/- असेच लिहिले आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त गोड चहा, ५-६ वेळा ऊकळलेला, काही अम्रुततुल्यमधुन प्यायला आहे.

तिथे २ आहेत .
के एन पी च्या राइट वाला जास्त चांगला आहे.
तुमचावाला कोनता आहे?

शोधा म्हन्जे सापडेल's picture

16 May 2011 - 9:42 pm | शोधा म्हन्जे सापडेल

के एन पी च्या समोर थांबले की डाव्या हाताचा होता तो. मला दुसरा माहित नाही. पुढच्या वेळी गेलो की बघीन दुसरा.

पांथस्थ's picture

18 May 2011 - 8:57 am | पांथस्थ

>> के एन पी च्या राइट वाला जास्त चांगला आहे

तिथे उभे बंधु यांचा चहाचा स्टॉल आहे. मस्त चहा मिळायचा!

मुलूखावेगळी's picture

18 May 2011 - 10:46 am | मुलूखावेगळी

तिथे उभे बंधु यांचा चहाचा स्टॉल आहे. मस्त चहा मिळायचा!

अजुनही मस्तच चहा मिळतो :)

मुलूखावेगळी's picture

15 May 2011 - 3:29 pm | मुलूखावेगळी

इतके दिवस संध्याकाळी ५ ला १दाच चहा घेत होते.
पन मधे गॅस संपल्याने सकाळी चहाची सवय लागली.
मी १ घास नाश्टा सोबत १ घोट चहा (कमी साखरेचा) असे घेते. उपाशी पोटी घेउ नये म्हनुन :)
कोनी काहीही सल्ला दिला तरी चहा बंद होणे अशक्य, मन प्रसन्न होते चहा पिला कि

धमाल मुलगा's picture

15 May 2011 - 3:50 pm | धमाल मुलगा

सुवासिनीनं कुकवाच्या बोटाला अन् मर्दानं च्या च्या घ्वॉटाला कदी नाई म्हनु नये. :D

-(चहाबाज) ध.

स्वानन्द's picture

18 May 2011 - 5:00 am | स्वानन्द

डायलॉग धम्या डायलॉग!! :D

मुमुक्षु's picture

19 May 2011 - 10:32 am | मुमुक्षु

बाप्या माणसाने चहाच्या घोटाला आणि बाईच्या ओठाला नाही म्हणूनये.

धमाल मुलगा's picture

19 May 2011 - 10:40 am | धमाल मुलगा

आम्ही स्वतःवर किती कंट्रोल करु करुन वाक्य सभ्य टाकलं होतं तर...... :D

जगात अशी कोणती गोष्ट आहे त्यावर दोन / अधिक मतं नाहीत ?
दारुचंच उदाहरण घ्या. काही लोकांना दारुत अखंड बुडण्यात जिवन वाटते तर काहींना दारुचा स्पर्ष ही आवडत नाही. कारणे ज्याची त्याची :) :)
आमच्यासाठी चहा असला काय , नसला काय .. फरक पडत नाही ..
चहा बरोबर ब्रेड आणि अमुल बटर मात्र आवडते :)

रामदास's picture

15 May 2011 - 11:50 pm | रामदास

अमूलचं नाही .बटर म्हणजे कुरकुरीत -चहात बुडवल्यावर स्पंजासारखा चहा शोषून घेणारं बटर -कधीतरी आपली साथ सोडून कपाच्या तळाशी जाणारं बटर.ते बटर अजूनही आवडतं . त्याची बहीण खारी पण आवडते. फोर्टात याझदानी बेकरीत लाकडाच्या भट्टीत बनणारी खारी -ब्रुन मस्का -बनपाव म्हणजे अ‍ॅडीक्शन लावणारे आयटम. तसा चहा हे पेय नव्हे तर खास करून मुंबईच्या लाईफ स्टाईलचा भाग आहे.
भटाचा चहा(डुंगरपूर -लिलवासा भट ) -इराण्याचा चहा -उडप्याचा चहा - मपला चहा -चिलीया चहा(पानबाजार ते पायधुणी) -शिकारपूरी चहा -(राजस्थानी) )टमटम चहा -रजवाडी चहा . आणि सगळ्यात महत्वाचा मिळेल तो चहा .

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2011 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा

संभ्रम कशाविषयी पडलाय?पिण्याविषयी कि न पिण्याविषयी?(---चहा हो...)अमच्या मते न पिल्यानी संभ्रम होत नाही,पिल्यानी होतो.(---चहा हो---)कसा होतो संभ्रम?...हा...हा...असल फ्रेश वाटत...झोप ऊडल्यासारख...अगदी साफ झाल्यासारख वाटत...पोट आणि डोक दोनिहि...चहा पिल्यानि हो...जाऊ दे...अहो आयुष्य हाच १ भ्रम आहे.अस काहि जणांना वाटत असत कि नाहि?मग आपण त्यात आणि १ भ्रम वाढवायचा...त्यामुळे माधुर्य चहात थोड कमि असल,तरी जीवनात बरच वाढेल की...कशाला एवढा ईचार करताय?...मारा १ कडक.....चहा हो....

पराग

दत्ता काळे's picture

18 May 2011 - 2:18 am | दत्ता काळे

चहा प्यावाच.

श्रमपरिहारकत्वाची जबाबदारी लगेचच स्विकारणारे पेय म्हणून चहा प्रसिध्द आहे. त्यामुळे कष्टाची कामे, मोठी जबाबदारीची कामे पूर्ण केल्यानंतर, कंटाळा, शिणवटा घालवण्यासाठी लगेचच 'झालं. चला आता मस्तपैकी चहा मारु' असं सहजपणे वाटण ह्यातंच चहाची महती कळते.

कट्ट्यावर गप्पा रंगण्यासाठी चहा हे एक सस्त्यातलं मोटिव्हेशनल ड्रिंक आहे. बर्‍याचवेळा 'आज खूप चहा झाला' चा मतितार्थ; खूप संपर्क साधले गेले किंवा फिरून, हिंडून खूप कामे झाली किंवा निवांत गप्पा झाल्या असा होतो.

अवांतर : धागा वाचल्यावर एकदम 'तिसरी कसम' मधला " मै चाह नही पिता" असं म्हणणारा हिरामण डोळ्यासमोर आला.

धमाल मुलगा's picture

18 May 2011 - 10:00 am | धमाल मुलगा

१०१% पटलं.

चहा पित नाही म्हणल्यावर अशा माणसाला, "हाय कंबख्त, तू ने पी ही नहीं" वगैरे ऐकवायचा मोह आवरता आवरत नाही. :D

चहाची मजा विचारायची तर ती 'हाय टी' वगैरे भानगडी करणार्‍यांना नाहीच, चहावर भरभरुन बोलण्याचा हक्क 'अमृततुल्य'च्या किंवा इराण्याच्या लाईफ टाईम मेंबरांचा. :)
एकेका घोटाबरोबर घोळत-घोळवत गप्पांतून गप्पा निघत, वाढत्या गप्पांच्या नादात कपातला गाळ तोंडात आला की, थ्थू: थ्थू: करत पुन्हा चहाचा पुढचा राऊंड 'आरडर' करायचा..... असा सुखनैव काळ व्यतित करायचा. ही खरी मजा. :)

चहा सोडल्यामुळे काय होते ते समजले तर चहा प्याल्यामुळे काय मिळते हे नक्कीच समजते.
मी दोन महीने चहा पूर्ण सोडला होता.
त्या काळात चहा ही लीस्ट कर्टसी आहे याचा साक्षात्कार झाला. तुम्ही चहा पीत नसाल तर सर्वात जास्त कुचंबणा यजमानाची होते. तुम्ही जर यजमान असाल तर आलेल्या पाहुण्याला चहा एकट्याने पिण्यात कधीच इन्टरेस्ट नसतो.
चहा पिताना गप्पांमधला फॉर्मलपणा लवकर कमी होतो.
चहा हे निव्वळ पेय नसून ते दोन व्यक्तींमधील संभाषणाला चालना देणारे कॅटालिस्ट म्हणून काम करते.
बाकी अनूभव स्वतन्त्र लेखात देईन

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2011 - 5:39 am | परिकथेतील राजकुमार

छान छान.

आज काथ्याकुटाचे अंडे का ? वा वा वा...

पंगा's picture

18 May 2011 - 9:10 am | पंगा

हिरवा लिप्टन, लोपचू वगैरे मंडळी भेटली नाही बर्‍याच दिवसांत - दिसत नाहीत आजकाल. निदान अमेरिकेत तरी. भानगड काय आहे?

भारतात काय परिस्थिती आहे?

आणी तो हीवाळ्यात सर्वांनी प्यावाच या मताचा मी आग्रही आहे.

शरभ's picture

23 May 2011 - 3:58 pm | शरभ

लहानपणी टुटी फ्रुटी बन बरोबर भरपूर चहा वायचा ....जबरदस्त कॉंबिनेशन आहे....