"शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नामक पुस्तकातील काही संदर्भ काही वेळापूर्वी वाचनात आला , सदरचे पुस्तक पुरुषोत्तम खेडेकर नामक व्यक्तीने लिहिले आहे असे कळले ..... पुस्तकातील संदर्भ वाचून धक्का बसला .... आणि चीड हि आली म्हणून ठरवले कि हे मि पा च्या माध्यमातून सर्वांना कळवावे ......
सदरच्या पुस्तकावर बंदी आणावी , तसेच असे आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यावर कारवाई व्हावी ह्या साठी : chiefminister@maharashtra.gov.in आणि deputychiefminister@maharashtra.gov.in अशा विरोप पत्त्यांवर " जातीयवादाची विषवल्ली पसरवणारी माहिती ........********* अत्यंत महत्वाचे !!!!!!! "
ह्या शीर्षकासह माहिती दिली आहे ..... माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे कि जर आपणास हे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर आपण देखील ह्याच शीर्षकासह ह्याच विरोप पत्त्यांवर बंदी ची विनंती करा ......
मि पा ला विनंती कि सदरचा लेख काढून टाकू नये ..... . आपणा सर्वांच्या माहितीसाठी खाली लिन्क देत आहे ....
"शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"
गाभा:
प्रतिक्रिया
6 May 2011 - 8:23 pm | शुचि
कारवाई करून काय होणार? मानसिकता बदलणार आहे का? अंगी भिनलेला गचाळपणा तसाच रहाणार.
या अशा प्रकारच्या लोकांनी "I don't hate in plural" अशा प्रकारची वाक्यदेखील कधी वाचलेली नसतात. दुसर्याचा तिरस्कार करण्याच्या नादात स्वतःची प्रगती खुंटली आहे हे अशा बिनडोक लोकांच्या डोक्यात शिरतच नसतं.
दु-र्ल-क्ष!!!! अशा तुच्छ जीवांकडे दुर्लक्ष करावे ज्यांनी आपल्या लेखना-वाचनाचा उपयोग हे असलं लिहीण्याकरता करून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.
6 May 2011 - 8:33 pm | ज्ञानेश...
हा खेडेकर अत्यंत विकृत बुद्धीचा माणूस आहे. याची मुक्ताफळे एवढीच नाहीत. यापलिकडे जाऊन अत्यंत घृणास्पद वक्तव्ये/लिखाण त्याने केले आहे. सातरला जाहिर सभेत "इथून घरी गेल्यावर कोण कोण बामणांच्या घरावर एक तरी दगड फेकणार त्यांनी हात वर करा" असे जाहीर चिथावणीयुक्त आवाहन केले होते. सुदैवाने एकानेही हात वर केला नाही.
(तुम्ही ज्या ब्लॉगची लिंक दिलेली आहे, ते रामटेकेही फार वेगळे नाहीत. त्यांचेही जातीयवादी विचार तेवढेच जहाल आहेत. फक्त त्यांच्या झेंड्याचा रंग वेगळा आहे.)
अगदी आजच्या काळातही उच्चशिक्षित, नव्या युगाचा तरूण या अशा लोकांच्या पताका खांद्यावर घेऊन हिरीरीने भांडतांना दिसतो (नेटवर आणि प्रत्यक्ष) तेव्हा अस्वस्थ व्हायला होते.
'एकविसाव्या शतकात महाराष्ट्रात वाढीस लागलेला जातीयवाद" हा खरंच संशोधनाचा विषय आहे.
6 May 2011 - 8:55 pm | धमाल मुलगा
कुलकर्णी@जयदिप कुलकर्णी : सरकारात पत्रं पाठवून कामं होत असती तर आज देश कुठल्या कुठं गेला असता राव. त्यात पुन्हा, सरकार कुणाचं? ह्या असल्या तद्दन मुर्खपणाच्या अर्थाअर्थी संबंध नसलेल्या, स्वतःच्याच विधानांच्या विरोधात बोलणारे आणि किळसवाण्या पध्दतीनं गरळ ओकणार्यांच्या पाठीशी कुणाचे आशिर्वाद आहेत? अहो, सोप्पंय राव.
@ज्ञानेश...
"'एकविसाव्या शतकात महाराष्ट्रात वाढीस लागलेला जातीयवाद" हा खरंच संशोधनाचा विषय आहे."
ह्यापेक्षा मतासाठी किळसवाणा खेळ कसा खेळावा ह्यावर पी.एच.डी.साठी चांगला विषय आहे. :(
4 Sep 2023 - 2:17 pm | आशु जोग
काय हरकत आहे पण
6 May 2011 - 8:56 pm | इष्टुर फाकडा
बहुजन समाज कायम विसरतो कि गुणधर्म हे व्यक्तीला असतात व्याक्तीसमुहाला नाही. म्हणूनच आजच्या काळात बहुजन समाजाच्या पिचेहातीसाठी संपूर्ण ब्राम्हण समाजाला दोषी ठरवणे योग्य नाही. महात्मा फुलेंना जेव्हा राहायला जगही देण्यास ब्राम्हण तयार नव्हते तेव्हा, त्यांना राहायला वाडा खाली करून देणाराही एक ब्राम्हणाच होता. संपूर्ण भारतात पहिले मंदिर बहुजानान्न्साठी बांधणारे वीर सावरकर हेही ब्राम्हणच होते. आणि आंबेडकर ज्यांना आपले गुरु मनात असत ते गाडगे बाबाही ब्राह्मणाच होते. आपण हे कृपा करून लक्षात घ्या कि ब्राम्हण समाज हा लवचिक मानसिकतेचा आहे. काळाप्रमाणे ते बदलतात. शिवाय आता ब्राम्हण वर्गाकडे सत्ताही नाहीये. त्यामुळे ह्या लेखाचा लेखक जसा म्हणतो कि ब्राम्हणांच्या नावाने खडे फोडून पोळी भाजून घ्यायचे दिवस गेले आता. आणि गोष्ट दालीद्री ब्रीगएड आणि सेवा संघाची आहे ती म्हणजे, हे फोड आणि झोड चे जुने राजकारण हल्ली कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी कोन्ग्रेस खेळत आहे. यांना पैसा प्रसिद्धी अजित पवार आणि शरद पवारांची आहे. यांना खाली खेचा आधी. म्हणूनच बहुजनांनी एकजूट हि बावळट नेत्यांच्या मागे न उभी करता जरा शहाणपणाने वागले पाहिजे (मतदानाच्या drushtikonatun) नाहीतर पुन्हा आहेतच आठवले आणि मंडळी !!
6 May 2011 - 8:57 pm | अप्पा जोगळेकर
एखादी क्लिपसुद्धा टाकली असेल अशी अपेक्षा होती पण निराशाच झाली.
6 May 2011 - 9:01 pm | अप्पा जोगळेकर
अजातशत्रू यांनीदेखील यासंदर्भात अगदी भरभरुन लिहावे असे वाटते.
6 May 2011 - 9:46 pm | अजातशत्रु
"खास" सुचविल्याबद्दल.....
तत्पुर्वी तिकडे माझ्या धाग्यावर तुम्हि माझे आक्षेप/मुद्दे खोडू शकला नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.:)
बाकी वाचुन प्रतीसाद देईनच..
काळजी नसावी..!
7 May 2011 - 3:38 pm | अप्पा जोगळेकर
तत्पुर्वी तिकडे माझ्या धाग्यावर तुम्हि माझे आक्षेप/मुद्दे खोडू शकला नाहीत याची कृपया नोंद घ्यावी
तुम्ही संजय सोनावणी यांचे लिखाण चोरले आणि ते प्रतिसाद देताना जसेच्या तसे स्वतःच्या नावाने खपवले. श्री. परा यांनी चोरी उघड केल्यावर ती तुम्ही मान्यसुद्धा केली होती. हे सगळे होईपर्यंत मी तुमचे आक्षेप खोडून काढतच होतो. जेंव्हा तुम्ही लेखनचौर्य करत आहात असे सिद्ध झाले तेंव्हा 'ढापून कॉपी पेस्ट केलेले मुद्दे मी खोडून काढत बसणार नाही' अशा आशयाचा प्रतिसाद दिला होता. तो तुमच्या सोयीचा नव्हता त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते असे आठवते.
पण माझी अशी इच्छा आहे की सदर धाग्यासंदर्भात तुम्ही स्वतःहून, स्वयंस्फूर्तीने काहीतरी लिहावे. चोरुन लिहू नये.
9 May 2011 - 8:36 pm | अजातशत्रु
@तुम्ही संजय सोनावणी यांचे लिखाण चोरले आणि ते प्रतिसाद देताना जसेच्या तसे स्वतःच्या नावाने खपवले.
संजय सोनावणी यांचा उल्लेख अनावधाने राहिला गेला होता, तसं मी लगेच स्पष्टिकरण दिल होतं
मग ते माझ्या नावाने कसे काय खपले??
@'ढापून कॉपी पेस्ट केलेले मुद्दे मी खोडून काढत बसणार नाही' अशा आशयाचा प्रतिसाद दिला होता. तो तुमच्या सोयीचा नव्हता त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते असे आठवते.
मी त्यास प्रतिसाद दिला होता तो तुम्हीहि वाचला नाहि,
किंवा तो तुमच्याहि सोयीचा नव्हता त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत, असो
सांगितल्या प्रमाणे फक्त २ उतारे इथे महत्वाचे वाटले म्हणुन ते उदा.दाखल घ्यावे लागले
ते सोडुन बाकी सगळे आक्षेप /मुद्दे माझे आहेत तसे आपण इतर पुस्तक किंवा वर्तमानपत्रां मधून वानगी दाखल घेतच असतो कि..मग ती पण चोरीच का?
@ 'ढापून कॉपी पेस्ट केलेले मुद्दे मी खोडून काढत बसणार नाही.
ठिकच,
पण मुळात माझे मुळ मुद्दे वेगळे आणी 'ढापून कॉपी पेस्ट केलेले मुद्दे ' वेगळेच आहेत,
ते सोडून खंडन करावे,
आणी तशी लिंक दिलेली आहे तेव्हा जरा तिथे जाण्याची तसदी घेतली असतीत तर फार बरे,
http://www.misalpav.com/node/17682?page=1
अवांतर :संपादक/ संपादकमंडळ यांनी "ते" (कॉपी-पेस्ट)लिखाण उडविले नाहि आणी ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी पण याची दखल घ्यावी.आक्षेप टिकला नाही.:)
9 May 2011 - 10:01 pm | अप्पा जोगळेकर
संजय सोनावणी यांचा उल्लेख अनावधाने राहिला गेला होता, तसं मी लगेच स्पष्टिकरण दिल होतं
मग ते माझ्या नावाने कसे काय खपले??
तुम्ही पकडले गेलात. त्यामुळे मान्य करण्याशिवाय दुसरं गत्यंतर होतं काय ? उतारेच्या उतारे कॉपी पेस्ट करणे आणि संदर्भ म्हणून एखादे लिखाण वापरणे यात फरक केला पाहिजे. कोणाचेही लिखाण जसेच्या तसे उतरवून काढणे हा गुन्हा नाहीच. मूळ लेखकाचा नामोल्लेख करण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे इतकीच अपेक्षा आहे.
पण मुळात माझे मुळ मुद्दे वेगळे आणी 'ढापून कॉपी पेस्ट केलेले मुद्दे ' वेगळेच आहेत,
कोणते तुमचे आणि कोणते कॉपी पेस्ट केलेले मुद्दे आहेत हे ओळखण्यासाठी काय निकष लावणार ?
संपादक/ संपादकमंडळ यांनी "ते" (कॉपी-पेस्ट)लिखाण उडविले नाहि आणी ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी पण.
बरं मग. त्यांनी आक्षेप घेतला नाही म्हणून इतर कोणीच तो घेऊ नये असा नियम नाही.
मी त्यास प्रतिसाद दिला होता तो तुम्हीहि वाचला नाहि
तुम्ही आणखीन २ वर्षांनी प्रतिसाद दिला तर मी तिथे तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहात बसावे अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. संस्थळाच्या टेक्निकल प्रॉब्लेम्सचा त्रास तुम्हालाच तेवढा होतो हा गैरसमज सोडून द्या.
12 May 2011 - 6:28 pm | अजातशत्रु
@कोणते तुमचे आणि कोणते कॉपी पेस्ट केलेले मुद्दे आहेत हे ओळखण्यासाठी काय निकष लावणार?
ते मी सांगतले आहे, पण तुम्हाला ते गैरसोयीचे असल्यामुळे तुम्हि माहित असून माहित नसल्या सारखे करत आहात.. असो
@त्यांनी आक्षेप घेतला नाही म्हणून इतर कोणीच तो घेऊ नये असा नियम नाही
याचा अर्थ इथेही समांतर Censorship आहे असे मानावे का?:)
12 May 2011 - 7:19 pm | अप्पा जोगळेकर
याचा अर्थ इथेही समांतर Censorship आहे असे मानावे का?
आक्षेप नोंदवणे आणि सेन्सॉर्शिप हे समानार्थी आहेत हे नव्याने समजले.
ते मी सांगतले आहे, पण तुम्हाला ते गैरसोयीचे असल्यामुळे तुम्हि माहित असून माहित नसल्या सारखे करत आहात.. असो
आता मूळ मुद्द्याला कोण बगल देत आहे हे मी संगण्याची गरज नाही.
तुम्ही लहान मुलासारखे तंडत आहात. याकरता मी संवाद थांबवत आहे.
11 May 2011 - 5:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पण माझी अशी इच्छा आहे की सदर धाग्यासंदर्भात तुम्ही स्वतःहून, स्वयंस्फूर्तीने काहीतरी लिहावे. चोरुन लिहू नये.
ब्रिगेडी विचारावर चर्चा म्हणजे शेणात हात घालण्यासारखे आहे. शेण कुणाचेही असो, असते शेणच. त्यांनी स्वयंस्फूर्तीने लिहिले काय किंवा चोरून लिहिले काय, काहीही फरक पडत नाही.
6 May 2011 - 9:41 pm | चन्द्रशेखर सातव
राजकारणातील तत्कालीन फायद्यासाठी हे ध्रुवीकरण करण्याचे काम चालू आहे.अत्यंत लघु पण तितक्याच धूर्त दृष्टीच्या राजकारण्यांचे असे करण्यामागे सुस्पष्ट नियोजन आहे.सुदैवाने बहुसंख्य लोकांना या प्रकारचे राजकरण मंजूर नाही हे मागच्या विधानसभेच्या निकालावरून दिसून आले.पाकिस्तानने अफगाणिस्तान मध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या इस्लामी मूलतत्ववाद्यांना मोकळे रान दिले होते आणि आहे त्याच प्रकारच्या प्रवृत्तीशी साधर्म्य असणारी हि लक्षणे आहेत,आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ची काय अवस्था आहे हे सगळ्यांना माहित आहे.तशी आपली अवस्था होऊ नये म्हणून हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत.
अवांतर
या ब्रिगेडस चे पीक गेल्या काही वर्षा मधीलच,त्यातही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जरा जास्तच जोर आहे.IT आणि Automobile Industries मुळे पुणे परिसरातील जमिनींना सोन्यापेक्षा जास्त भाव आले आहेत.बापजाद्यांनी कष्टाने मिळविलेली जमीन विकून त्या आयत्या पैश्यावर हे नको तसले उद्योग चालू आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे.१५-२० वर्षांपूर्वी हे असले रिकामेपणाचे उद्योग नव्हते.
7 May 2011 - 12:00 am | सचिनमिसलप्रेमी
@सागर..... श्री. गाडगे बाबा जातीने ब्राम्हण नव्हे तर परिट होते.
8 May 2011 - 8:08 am | पंगा
गाडगेबाबांच्या जातीबद्दल कल्पना नव्हती. म्हणजे, काहीतरी चांगले समाजकार्य, समाजप्रबोधन वगैरे करून राहिलेत एवढे ठाऊक होते, पण कोणत्या जातरकान्यात बसतात हे माहीतही नव्हते आणि माहीत नाही हे लक्षातही आलेले नव्हते. का कोण जाणे. कदाचित आमचे नैसर्गिक कुतूहल कमी पडले असावे.
तरी, या वर्गीकृत माहितीची दखल घेणारे आणि रीतसर नोंद ठेवणारे माहीतगार समाजात आहेत हे पाहून गंमत वाटली, आणि तितकेच खूप छानही वाटले. समाजातील अज्ञान दूर झालेच पाहिजे, आणि हा तर सामान्यज्ञानाचा भाग आहे. समाजातील प्रत्येकाला निदान एवढे तरी माहीत असणे अपेक्षित आहे, आणि नसल्यास किमान गाडगेबाबांच्या प्रबोधनकार्याच्या पवित्र स्मृतीस जागून त्याचे प्रबोधन करण्यासाठी तरी सुज्ञांनी या बाबीची नोंद सतत ठेवून समाजास अज्ञानतिमिराच्या गहनगर्तेत पतित होण्यापासून रोखणे आवश्यक आहे. या इष्टकर्तव्याची धुरा पेलू शकणारे समर्थ खांदे ज्या समाजात आहेत, त्या समाजाच्या भवितव्याबद्दल कोणत्याही चिंतेचे काही कारण नसावे.
असो. गाडगेबाबांची नेमकी जात कोणती, इतक्या मूलभूत विषयाबद्दल आजवरचे आमचे केवळ अज्ञानच नव्हे, तर कुतूहलाचा अक्षम्य अभाव आम्ही प्रांजळपणे मान्य करतो. पण आता हे ज्ञान आम्हास उपलब्ध करून दिले गेल्याने यापुढे आम्हास त्याबद्दल लाज बाळगण्याचे कारण दूर झाले. प्रबोधनाबद्दल शतशः ऋणी आहोत.
8 May 2011 - 10:13 am | टारझन
काय पंगु , आलं का अज्ञान उघडकीस ? ;) ;) ;)
- परिट गाडगेभक्त
8 May 2011 - 6:46 pm | पंगा
पण आता कायद्याने (बोले तो, बाकायदा) सज्ञान झालो यात धन्यता मानतो. ;)
9 May 2011 - 7:11 pm | इष्टुर फाकडा
माफी असावि, वहावत गेलो...भावनाओको समझो :)
9 May 2011 - 7:13 pm | इष्टुर फाकडा
माफी असावि, वहावत गेलो...भावनाओको समझो :)
7 May 2011 - 12:01 am | अविनाशकुलकर्णी
आजका सवाल मधे वागळे..व स्टार वर जोशि खान्डेकर यांनी चर्चा घडवावी
7 May 2011 - 12:36 am | प्राजु
फालतु!! दुसरी अपेक्षाही नाही या माणसाकडून!
कूपमंडूक आहे हा माणूस .. इतकंच म्हणेन!
7 May 2011 - 6:14 am | गवि
रामटेके हे "ब्लॉग माझा" स्पर्धेचे विजेते आहेत.त्यांचे काही लिखाण,मला वाटते बहुधा "भामरागडचे दिवस", वेगळ्या प्रकारचे असून चांगले आहे.
7 May 2011 - 6:39 am | प्रियाली
खेडकर असला फालतूपणा करण्यात प्रसिद्ध होतेच. आता तर ताळतंत्रच सोडलेले दिसते. ब्रिगेडच्या नादाने तरुण पिढी वाहवत असेल तर कठीण आहे.
बाकी गाडगेबाबा ब्राह्मण नव्हते, परिट होते याच्याशी सहमत.
7 May 2011 - 12:16 pm | jaydip.kulkarni
+ १ ..............
8 May 2011 - 10:41 pm | सुहास..
बाकी गाडगेबाबा ब्राह्मण नव्हते, परिट होते याच्याशी सहमत. >>>
ही ही ही !! नक्की का ? वाचुन मौज वाचली, पण उगाच मिपावर काहीतरी 'उपक्रम' करायचे नाहीत म्हणुन शांत बसलो आणि बसतो आहे ...
असो ...
बाकी खेडकरांविषयी ...शुन्य मत ..त्यांना दुसरी कामे नसावीत बहुधा
7 May 2011 - 1:43 pm | योगप्रभू
खेडेकरची बायको ब्राह्मण असल्याचे वाचनात आले. (किर्लोस्कर एप्रिल २०११ च्या अंकातील लेख) हे जर खरे असेल तर नवर्याची आपल्या समाजावरील गलिच्छ टीका तिला कशी चालते, कुणास ठाऊक? दुसरे म्हणजे हे स्वतः ब्राह्मणाच्या पोरीशी लग्न करणार आणि दुसरीकडे मराठा/बहुजन समाजाला ब्राह्मणद्वेषाचे डोस पाजत हिंडणार. हे ढोंगी आणि दुटप्पी वागणे आहे.
खेडेकरसारखी माणसे मराठा आणि अन्य जातींच्या तरुणांची एक पिढी बरबाद करत आहेत, एवढे निश्चित.
7 May 2011 - 3:55 pm | नारयन लेले
खेडेकरसारखी माणसे मराठा आणि अन्य जातींच्या तरुणांची एक पिढी बरबाद करत आहेत याचा त्या समाज्यानी ही आभ्यास करण्याची गरज आहे.
याच बरोबर कोणीही उठ्तो आणी ब्राम्हणा ना शिव्या देत सुट्तो ही एक फ्याशनच झाली आहे.
आता याच्या मुळाशी जाउन ब्राम्हणानी विचार करावयाची वेळ आली आहे.
विनित
9 May 2011 - 12:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>खेडेकरची बायको ब्राह्मण असल्याचे वाचनात आले.
आत्ता ध्यानात आले त्याच्या ब्राह्मण द्वेषाचे कारण....
12 May 2011 - 6:47 pm | अजातशत्रु
>>>खेडेकरची बायको ब्राह्मण असल्याचे वाचनात आले.
आत्ता ध्यानात आले त्याच्या ब्राह्मण द्वेषाचे कारण....
म्हणजे काय त्यांची बायको ब्राह्मण असल्यामुळे ते समस्त ब्राह्मण समाजा विरुध्द गरळ ओकत आहेत??
असे ( पत्नी ) त्यांनी काय केले असावे बरे..;)
अवांतर: उगा त्यांच्या पत्नीं ना कशाला दोष, फक्त खेडेकरां बद्दल बोलावे..
12 May 2011 - 7:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>अवांतर: उगा त्यांच्या पत्नीं ना कशाला दोष, फक्त खेडेकरां बद्दल बोलावे.
असे कसे चालेल? पत्नी ब्राह्मण आहे ना, मग तिलाच नको का दोष द्यायला?? खेडेकर बिचारा साधा सुधा ब्रिगेडी, त्याला का म्हणून बोल लावायचा आम्ही? काहीही बोलता यार तुम्ही !!!
12 May 2011 - 8:16 pm | अजातशत्रु
@असे कसे चालेल? पत्नी ब्राह्मण आहे ना, मग तिलाच नको का दोष द्यायला?? खेडेकर बिचारा साधा सुधा ब्रिगेडी, त्याला का म्हणून बोल लावायचा आम्ही? काहीही बोलता यार तुम्ही !!!
पत्नी ब्राह्मण आहे ना, मग तिलाच नको का दोष द्यायला,
काय बोलताय? याचा अर्थ एक ब्राह्मण स्त्रि बायको म्हणून केल्याने इतर किंवा तिच्या समाजा बद्दल द्वेष/आकस/ सुडबुध्दि निर्माण होते? माणूस होत्याचा न्हवता होतो?
आपल्या प्रतिसादां वरुन तरी तसे वाटतेय..:)
अवांतर: खेडेकर वरील विषयावर जोगळेकरांचा मान राखून सविस्तर चर्चेसाठी एक नवीन धागा टाकत आहे.
13 May 2011 - 12:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्हाला विनोद, उपरोध यातील काहीच कळत नाही असे लक्षात आल्याने "खेडेकरांची ब्राह्मण पत्नी" हा विषय माझ्यावतीने इथेच संपवत आहे. तुमचे चालु द्या...
13 May 2011 - 8:01 pm | अजातशत्रु
यात फरक असावा.
पैकी खेडेकरांबद्दल चा तुमचा टोन्ट विडबंन असू शकते
त्यांच्या पत्नि बद्दल अस कुठे दिसत नाहिए,
आणी मला यातील काहीच कळत नाही असे जर तुमच्या लक्षात आले तर आमचे हे अज्ञान तरी दुर करायचे होते, आम्हि तुम्हाला गुरु मानले असते, राव इथेच चुकता तुम्हि,
स्वतः कडील ज्ञान दुसर्यांना देत नाहित..
अवांतर: आता तुम्हि म्हणाल आम्हि असे कुणाचे हि गुरु बनत नसतो त्यास शिष्य हि त्या तोडिचा असावा लागतो अर्जुना सारखा.
अतीअवांतर: "गुरु" बनायची संधी हुकली म्हनायची ;)
(ह. द्या)
9 May 2011 - 8:55 pm | अजातशत्रु
आहे..!
आणी ते R P I चे नेते रामदास आठवले त्यांची पण बायको ब्राह्मणच आहे,:)
समाजाला द्वेषाचे डोस पाजत हिंडणारे ढोंगी आणि दुटप्पी लोक सगळ्याच समाजात आहेत,
बाकी नंतर ते आठवले आणी मंडळी आहेतच असं कुणीतरी म्हणालं =)
अमळ मजाच,काहीनीं आठवलेचा पण धसका घेतलेला दिसतोय तर,
क्रमशा:
7 May 2011 - 2:26 pm | आशु जोग
.
7 May 2011 - 2:09 pm | आशु जोग
खेडकर का खोडकर
7 May 2011 - 6:38 pm | अविनाशकुलकर्णी
ब्राम्हणानी विचार करावयाची वेळ आली आहे.
ब्राह्मण काय करणार? त्याना शिव्या द्या..कोरटात केस होत नाहि..
त्या मुळे जिभ सैल सोडणे शक्य होते..
7 May 2011 - 7:14 pm | वेताळ
किती मराठा समाज आहे हे तपासणे महत्वाचे ठरेल.मराठा समाजात ब्रिगेड किंवा तत्सम संघटना एकदमच नगण्य आहे.त्याच एकही नेता किंवा कार्यकर्ता अजुन निवडुन देखिल येवु शकला नाही.त्यामुळे खेडकराच्या विचाराना किती महत्व द्यायचे हे ठरवले पाहिजे.
8 May 2011 - 8:26 am | पंगा
बहुधा फारसा नसावा.
या म्हणण्यात बहुधा तथ्य असावे. किंबहुना, यात तथ्य नाही असे मानण्याचे काहीच कारण दिसत नाही.
हेही बहुधा मान्य करण्यासारखे आहे.
पण यांपैकी एकाही मुद्द्याला फारसे महत्त्व नाही.
ब्रिगेडजवळ जोपर्यंत तोडफोड करू शकणारी - आणि करणारी - पुरेशी माणसे आहेत (मग ती व्यक्तिशः कोणत्याही समाजात जन्माला आलेली का असेनात), तोपर्यंत ब्रिगेडची आणि खेडकरांच्या विचारांची दखल घेणे प्राप्त आहे. व्यापक मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा नाही या बाबीने काहीही फरक पडू नये. किंबहुना व्यापक मराठा समाजाचा याच्याशी काही संबंधही नसावा.
आणि म्हणूनच,
हे पटत नाही.
खेडकर जे करतात ते समाजाला (कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने) घातक आहे, म्हणून या बाबीला महत्त्व आहे. ते जे काही करतात ते कोणत्या समाजाच्या नावाने करतात, हा अतिशय गौण मुद्दा आहे. ('त्या समाजाची नाहक बदनामी' यापलिकडे त्यास महत्त्व नसावे.)
8 May 2011 - 10:22 am | शाहरुख
सहमत आहे...
च्यायला या खेडेकरच्या !!
पण एक कळाले नाही.."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नावाच्या पुस्तकात हा विषय कसा काय ?
8 May 2011 - 6:16 pm | अशोक पतिल
हे सर्व बघुन ( वाचुन) डोके सुन्न झालेय . अशी मानसिकता असू शकते यावर विश्वास बसत नाही .
ही बाब न्यायालयात न्यावी.
9 May 2011 - 6:53 am | नरेशकुमार
ह्म्म्म
9 May 2011 - 12:24 pm | मालोजीराव
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून काय उपयोग....यांच्या डोक्यावर ज्या लोकांचा हात आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां पेक्षा मोठे आहेत
10 May 2011 - 3:20 pm | जिप्सी
संभाजी/मराठा ब्रिगेड अशा संघटना खरच घातक आहेत. श्रीमंत कोकाटेंसारखी माणसं जर अशा विचारांची पुस्तकं शाळात जाउन फुकट वाटत असतील तर विचार करा हे विष किती खोलवर पोचणार आहे !
श्रीमंत कोकाटे असोत किंवा खेडकर, यांची नेहमीची संदर्भ देण्याची पद्धत म्हणजे आपल्याच जुन्या पुस्तकातले /लेखाचे संदर्भ देणे,म्हणजे काही काळानंतर हे सगळ खरच वाटायला लागतं
खेडकरांसारख्या विचारांच्या लोकांमुळचं जयसिंगराव पवार्,नरके अशी माणंसं या चळवळीपासून लांब गेली.
पण त्याचबरोबर अजूनही १ मुद्दा सांगावासा वाटतो,रामदास्यांनी लिहिलेल्या बखरी/काव्यातून असा बरेचदा सूर असतो की,स्वामींमुळे महाराजांना प्रेरणा मिळाली.थोडीफार मिळालीही असेल पण १००% श्रेय देता येणार नाही. महाराजांनी केळशीच्या याकूतबाबांचाही अनुग्रह घेतला होता,मग त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली असं म्हणावं काय? आपल्यापैकी बरेच जणांनी महाराजांनी समर्थाच्या झोळीत स्वराज्याच्या सनदा टाकल्या वगैरे प्रसंग ऐकला/वाचला असेल्,पण याला काहीही पुरावा नाही.अशा गोष्टी टाळल्या पाहीजेत. धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगवेगळ्या आहेत हे महाराजांना पूर्णपणे माहीत होतं,चिन्चवडच्या मोरया गोसावींनाही "तुमची बिरदे आम्हास ध्यावीत्,आमची बिरदे तुम्ही घ्यावी"असे खडसावणार्या महाराजांना आपण ओळखले पाहीजे.
अवांतर :- संभाजी/मराठा ब्रिगेड यांचा धोका फक्त ब्राम्हणांनाच नसून बहुजन समाजालाही तेवढाच आहे. जिवा महाला/शिवा काशिद यांचा उल्लेख देखील इतिहासातून काढायचे प्रयत्न चालूच आहेत.
12 May 2011 - 7:34 pm | अजातशत्रु
@पण त्याचबरोबर अजूनही १ मुद्दा सांगावासा वाटतो,रामदास्यांनी लिहिलेल्या बखरी/काव्यातून असा बरेचदा सूर असतो की,स्वामींमुळे महाराजांना प्रेरणा मिळाली.थोडीफार मिळालीही असेल पण १००% श्रेय देता येणार नाही. महाराजांनी केळशीच्या याकूतबाबांचाही अनुग्रह घेतला होता,मग त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली असं म्हणावं काय? आपल्यापैकी बरेच जणांनी महाराजांनी समर्थाच्या झोळीत स्वराज्याच्या सनदा टाकल्या वगैरे प्रसंग ऐकला/वाचला असेल्,पण याला काहीही पुरावा नाही.अशा गोष्टी टाळल्या पाहीजेत.
+१०५ सहमत.
शिवाजी महाराजांनी मौनी बाबा यांची प्रतक्ष भेट घेतली,त्यांनी महाराजांना पुढिल कार्यासाठी आशिर्वाद दिला.. असे म्हणतात...
मग त्यामुळे प्रेरणा मिळून महाराजांनी हिंदवी ( हिंदू नव्हे) स्वराज्य निर्माण केले असे म्हणायचे का?
मुळात आपण एक लक्षात घेतले पाहिजे की शिवाजी हा लोकप्रिय, आणि ज्वलंत विषय आहे,
त्यांचे बरोबर नाव यावे/ व्हावे असा मोह कुणाला झाला नसेल?
आपणहि एखाद्या व्यक्ती बद्दल बोलतोच की, एखाद्या मोठ्या व्यक्ती ला मी प्रत्यक्ष पाहिले/ भेटलो आहे.
त्याची ओटोग्राफ घेतली इ.इ.
म्हणून काय त्यांच्या यशात आपलेहि योगदान आहे असे म्हणायचे का?
संभाजी/मराठा ब्रिगेड यांचा धोका फक्त ब्राम्हणांनाच नसून बहुजन समाजालाही तेवढाच आहे
अगदि सहमत...
अवांतर: मागे ती मल्लीका शेरावत ही ओबामाला भेटली उद्या ती हि म्हणेल ओबामाच करीयर सक्सेस करण्या साठी मी त्यांना काही टिप्स दिल्या होत्या.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-05-07/news-interviews/2...
13 May 2011 - 12:21 am | श्रीरंग
समर्थ रामदास - शिवाजी महाराज भेट आणी मल्लिका - ओबामा भेट याची तुलना करणे हा टाळ्या मिळवण्यासाठी केलेला अतिशय निंद्य आणी कीव येण्यापलिकडचा केविलवाणा प्रयत्न आहे. क्रुपया भान ठेवून लिहा.
13 May 2011 - 11:14 am | पिलीयन रायडर
१. कारवाइ कारुन काय होणार? हा माणुसच मुर्ख आहे.. इ इ .. बोलुन आपण हे सगळ विसरुन जाणार हे माहीत आहे त्या खेडेकरला म्हणुन्च त्यानी हे लिहिल... ह्याला उत्तर देउ नये???
२. ह्या वर आपण केस करु शकत नाही का??
23 May 2011 - 11:28 am | पिलीयन रायडर
ह्या साठी एक पेटिशन काढली आहे....
http://www.petitions.in/petition/ban-the-book-shivarayanchya-badnamichi-...
सही करा....
काही मराठा समाजातील लोक सुद्धा सही करण्यास तयार झाले आहेत...
ह्या सगळ्याने काय होइल ह्यावर चर्चा करत बसण्या पेक्षा... ब्राह्मण एखाद्या गोष्टी साठी एकत्र येउ शकतात हे दाखवा...
23 May 2011 - 12:20 pm | मालोजीराव
अभिनंदन !
नक्की सही करू
हो पण जेम्स लेन याच्या पण पुस्तकावर बंदी घालायला पेटिशन काढा.
पुस्तके : Shivaji : Hindu king in Islamic India
The Epic of Shivaji: A Translation and Study of Kavindra
संपर्क : जेम्स डब्लू. लेन (जिम लेन)
अध्यक्ष- महाराष्ट्र अभ्यास मंडळ (आशिया विभाग)
ओल्ड मेन १०३,मकालेस्टर
दूरध्वनी : १ - (६५१) ६९६ ६७८९
इमेल : laine[at]macalester.edu
23 May 2011 - 12:43 pm | पिलीयन रायडर
जेम्स लेन चे पुस्तक मी वाचले नाहीये... वाचुन जर काही वावगे दिसले तर जरुर पेटिशन काढु....
15 Jun 2011 - 2:08 pm | jaydip.kulkarni
काल दै. लोकमत मध्ये ह्या संबंधीत दाखल केलेल्या तक्रारीची बातमी आली होती ........
बंडगार्ड्न पोलिस चॉकीत तक्रार दा़खल झाली आहे ............
13 Nov 2014 - 9:03 am | आयुर्हित
साभारः श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
November 11
खेड़ेकरने मागितली ब्राह्मणांची माफी..
जय शिवराय,
मित्रांनो सर्वांना कळवायला आनंद होत आहे, दि. १४.१०.२०१४ रोजी चिखली न्यायालयात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मण स्त्रियांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य लिखाणाबद्दल माफिनामा सादर केला त्यातील काही ठळक मुद्दे-
३) जिजाऊ प्रकाशनने २००७ व २००८ साली प्रकाशित केलेली 'मराठ्यांचे रामदासीकरण' व '१८५७ ब्राह्मण पुराण' ही पुस्तके मी लिहीली असून सदर पुस्तकातून काल्पनिक कथा, विनोद आणि अफवा मी समाजात पसरवल्या आहेत, ज्यावर महिलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
४) सदर पुस्तकातील ज्या आक्षेपार्ह्य भागाबद्दल तक्रार केली होती तो भाग पुस्तकातून वगळला जाईल व भविष्यात कधीही प्रकाशित केला जाणार नाही.
५) माझ्या मनात सर्व समाजातील महिलांबद्दल प्रचंड आदर असून कोणत्याही जातीच्या स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा माझा हेतू नव्हता. सदर कृत्यामुळे स्त्रियांच्या भावना दुखावल्यामुळे मी त्यांची बिनशर्त माफी मागतो.
७) मी जाहीर करतो की, भविष्यात अशा प्रकारचे लेखन माझ्या पुस्तकातून करणार नाही.
८) सदर प्रकारचे कोणतेही लिखाण माझ्या अन्य पुस्तकात लिहीलेले आढळून आल्यास ते वगळले जाईल.
९) इथून पुढे भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण करेल असे कोणतेही लेखन मी करणार नाही.
१०) सदर प्रतिज्ञापत्र हे मी पूर्ण शुध्दीत लिहून दिलेले असून यासाठी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नाही.
सही
(पुरूषोत्तम खेडेकर)
बघा हा मान्य करत आहे की याने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण केले होते clause 9 पहा ..
मराठा तरुणांनों आता तरी यांचे खरे रूप ओळखा. शिवरायांनी सर्व जातीचा मान राखला . "स्त्री, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो ती आम्हाला मातेसमान आहे" असे मानणारे शिवछत्रपति कुठे आणि आपण आजचे मराठे कुठे ? या ब्रिगेडी लोकांच्या सोबत राहून परस्त्री बद्दल काय बोलत आहोत, वाचत आहोत याचे भान ठेवा .
आज खेडेकरने माफ़ी मागितली हे बरेच झाले. तो स्वतः करत असलेले पाप आपल्या मराठा समाजाच्या नावावर खपवत होता . यापुढे आपण नक्कीच राजमाता जिजाऊसाहेब आणि शिवरायांच्या नावाला जपू त्यांचे नाव घेउन हे असले लांडे धंदे करणार नाही याची आपण जाण ठेवू !!
जय भवानी ॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥