हेलिकॉप्टर प्रवास आणि राजकारणी.

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
4 May 2011 - 12:51 pm
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8154744.cms

अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचं काम बहुधा अजूनही सुरुच आहे. काही वेबसाईट्स हेलिकॉप्टर सापडल्याचे सांगत आहेत.

ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव शिंदे, राजेश पायलट, तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार सौंदर्या, आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री असलेले वाय एस्स आर रेड्डी आणि आता दोरजी खांडू(९९% मृत्यूचीच शंका) ही अपघातामध्ये गेलेली प्रमुख नावे. बर्‍याचदा आपण वाचतो की हेलिकॉप्टर भरकटले.

ज्येष्ठ राजकारण्यांच्या अशा मृत्यूमागे खरोखरीचे अपघात, राजकारण्यांनी लोकप्रियतेसाठी केला गेलेला उतावीळपणा ( वाय एस आर बद्दल असे ऐकिवात आहे), व्यवस्थेचा गलथानपणा कारणीभूत असावा? की आणखी काही?

आपले काय मत?

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

4 May 2011 - 12:56 pm | प्यारे१

माधवराव शिंदे हे विमान अपघातात आणि राजेश पायलट हे मोटार अपघातात मारले गेले होते.

विकास's picture

4 May 2011 - 9:01 pm | विकास

जालावर शोधल्यास सापडेलः माधवराव शिंदे आणि राजेश पायलट, या दोघांच्या संदर्भात कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. अर्थात त्या लिहीणारे सुब्रम्हण्यम स्वामी आहेत आणि त्यामुळे बोट दाखवले गेले आहे ते सोनीया गांधींकडे... ;)

चिंतामणी's picture

5 May 2011 - 1:34 am | चिंतामणी

पण यात "जि.एम.सी. बालयोगी" यांचे नाव टाका.ते राहिले होते.

चिंतामणी's picture

5 May 2011 - 11:24 am | चिंतामणी

दोन्ही प्रकारचे अपघात एकाच प्रकारात मोडतात.

ह्या बद्दलचा "हिंदू" वर्तमानपत्रात आलेला एक लेख आत्ताच वाचनात आला. त्यात अश्या अपघातात मरण पावलेल्या अनेक नेत्यांची माहीती दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पासुन दोरजी खांडु यांचे पर्यन्त

हा लेख येथे वाचा.

जगभरातील काही प्रसीध्द व्यत्कीच्या विमान अपघाताबद्दल एक लेख काही काळापुर्वी वाचला होता. Top 10 celebrities who died in airplane crashes हे त्याचे नाव.

हा लेख येथे वाचा.

ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद पवाराना,आनि अजुन काहि नेत्याना बसवुन पाहिले पाहिजे ;)

चिरोटा's picture

4 May 2011 - 5:07 pm | चिरोटा

हेलिकॉप्टरमधे खुर्ची असली म्हणजे झाले.

किशोरअहिरे's picture

5 May 2011 - 3:31 am | किशोरअहिरे

असेच म्हणतो.. ईन फॅक्ट मी म्हणतो की ते वाचावेत पण हात पाय लुळे पांगळे होऊन :)

नितिन थत्ते's picture

5 May 2011 - 8:39 am | नितिन थत्ते

किशोर अहिरे अमर रहे.

सुधीर१३७'s picture

5 May 2011 - 9:07 pm | सुधीर१३७

अशा वजनदार नेत्यांच्या वजनामुळे हेलिकॉप्टर न उडण्याचीच शक्यता जास्त, आणि जर उडलेच नाही तर पुढील अपेक्षित, अनपेक्षित अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही.............................. :wink:

तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार सौंदर्या

--

ती कन्नड होती आणि भाजपा उमेदवार नव्हती

बाकी आपला मुद्दा विचार करण्याजोगा आहे

प्यारे१'s picture

5 May 2011 - 1:20 pm | प्यारे१

http://en.wikipedia.org/wiki/Soundarya

jaree tee janmaane kannad asalee taree tiche bahutek chitrapaT he telugu bhaaShik hote.

tee bhaa ja paa umedavaar navhatee he barobar aahe. maatra tee umedavaaraachyaa prachaaraasaaThee jaat asataanaa haa apaghaat zaalaa.

विनायक बेलापुरे's picture

5 May 2011 - 1:43 am | विनायक बेलापुरे

हरियाणाचे मंत्री आणि उद्योगपती ओ पी जिंदाल

अभिज्ञ's picture

5 May 2011 - 5:31 am | अभिज्ञ

खरे तर लोकांना, या भ्रष्ट राजकारण्यांपासून कायमचि सुटका मिळण्यासाठि विमान अपघातात मरण हाच एकमेव सहारा आहे.
देवाच्या "चॉपरचा" आवाज येत नाहि हेच खरे.
;)

अभिज्ञ.

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो, ते काय पैशाला पासरी मिळतील, खर पायलट आणि हेलिकॉप्टर वाया गेल्याच मात्र खरच वाईट वाटल.

विनायक बेलापुरे's picture

6 May 2011 - 12:50 am | विनायक बेलापुरे

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो, ते काय पैशाला पासरी मिळतील, खर पायलट आणि हेलिकॉप्टर वाया गेल्याच मात्र खरच वाईट वाटल.

+१

ते काय लाईन लावून तयारच असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2011 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारताच्या अणूकार्यक्रमाचे जनक, टाटा मूलभूत संशोधन संस्था उभी करणारे शास्त्रज्ञ होमी भाभा यांचं विमान अपघातात निधन झालं.

तिमा's picture

5 May 2011 - 2:50 pm | तिमा

एका हेलिकॉप्टरमधे किती भ्रष्ट राजकारणी मावतील हो ? जास्तीतजास्त हेलिकॉप्टर्स अशा राजकारण्यांनी भरुन नॉर्थ ईस्ट ला पाठवा.