साहित्यः
पालकाची जुडी स्वछ केलेली
१०-१२ पनीरचे तुकडे
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला
१-२ टोमॅटो गरम पाण्यात उकळून, सालं काढुन, मॅश केलेले
दीड टेस्पून आले+लसुण्+हिरवी मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून तेल+१ टेस्पून साजुक तुप
२ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून जीरे
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
उकळत्या पाण्यात पालक ५ मिनिटे घालून मिक्सर मधून फिरवून घेणे.
१ टेस्पून तेल किंवा तुपावर पनीर चे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेणे.
जाड बुडाच्या पातेल्यात १ टेस्पून तेल+१ टेस्पून साजुक तुप घालून गरम करणे. (दोन्ही घातल्याने चव खुप छान येते)
त्यात जीरे घालून ते तडतडु देणे.
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यत परतणे.
त्यात आले+लसुण्+हिरवी मिरची पेस्ट घालून परतणे.
कांदा चांगला परतला गेला की त्यात मॅश केलेले टोमॅटो घालावे व सगळे एकत्र करावे.
त्यात आता गरम मसाला आणी मीठ घालून तुप सुटेपर्यत परतावे.
आता त्यात पालकाची पेस्ट घालून ७-८ मिनिटे शिजु द्यावे.
त्यात पनीरचे तळलेले तुकडे घालून ,गॅस बारीक करून २-३ मिनिटे शिजु द्यावे.
गरम-गरम पालक्-पनीर रोटी, चपाती बरोबर सर्व्ह करणे.
प्रतिक्रिया
5 May 2011 - 2:30 am | Mrunalini
वा... एकदम सही.... पण नवरा पालक खात नाही ना... :)
तरी एकदा try करते..
5 May 2011 - 2:32 am | प्राजु
खल्लास!! लेकाची अतिशय आवडती भाजी आहे ही. मस्तच.
5 May 2011 - 2:41 am | गणपा
फोटु मस्त.
पण पनीर जास्त आवडत नसल्याने आमची आवडती कोलंबी टाकुन प्राँस पालक बनवु. :)
5 May 2011 - 7:47 am | स्पंदना
मस्त! मला पनीर तळायला नाही आव्डत . मी रोस्ट करते. छान लागत तसही.
5 May 2011 - 8:00 am | ५० फक्त
बाकी पाक्रु वैग्रे सोडा ओ, पहिले दोन फोटोच खल्लास, एकदम मलिंगा स्टाईल डायरेक्ट मिडल स्टंपच्या बुडातच, च्यायला, मला तर साजुक तुपावर तळलेले नुसते पनीर दिले असत तरी चाललं असत. मला तर पनीर बारीक करुन साजुक तुपावर परतायचे आणि त्यावर साखर टाकुन ती थोडी जळु द्यायची असं खायला आवडतं. जाम भारी लागतं.
दुसरा फोटो उतरवुन घेउन डेस्कटॉपला लावायचा आहे, ओरिजन्ल साईझ मध्ये देता का ओ, सस्व.
5 May 2011 - 8:53 am | पक्या
माझी आवडती भाजी. फोटो छान आहेत.
पनीर तळायची काही गरज नाही असे मला वाटते. नको त्या कॅलरीज वाढणार शिवाय कष्ट ही.
तसेही ज्या ज्या ठिकाणी मी ही डिश खाल्ली आहे तिथे ते तळलेले नव्हते... भाजीत.
पालकाची पेस्ट घातली की लगेच पनीर चे तुकडे घातले की ते पण शिजतात. पण गाळ होईल एवढे नाही शिजू द्यायचे.
शिवाय उकळत्या पाण्यातील पालक परत ७-८ मि. शिजवायची गरज नाही असे वाटते. ४-५ मि. खूप झाली.
5 May 2011 - 9:02 am | सानिकास्वप्निल
मला पनीर तळूनच घातलेले आवडते, असो प्रत्येकाने आप-आपल्या आवडीप्रमाणे करावे काय :)
अहो पालक उकळत्या पाण्यात परत ७-८ मि शिजवला नाहीये...आधीच ५ मिनिटे ब्लांच केला आणी मग मिक्सर मधून वाटून काढला..म्हणून मग भाजीत तो ७-८ मिनिटे शिजवला.
प्रतिसादाबद्दल धन्यु बरं का पक्याराव :)
5 May 2011 - 12:22 pm | पर्नल नेने मराठे
मी पनीर कधिच तळत नाही. तळले कि चामट होते. मी पनीर कुठल्याही भाजित शेवटी घालते. रंग पण शुभ्र पांढरा राहतो व तोन्डात घातले की विरघळते.
5 May 2011 - 6:09 pm | पंगा
'चामट' बोले तो?
6 May 2011 - 10:02 am | चिंतामणी
प.ने.म.- १०० % सहमत.
5 May 2011 - 10:11 am | डावखुरा
प्रथमतः भाजीचा हिरवा रंग टिकुन राहिल्यामुळे अभिनंदन....
माझी आईपण छान करते ही भाजी....
ब्लांच करणे म्हणजे काय?
आणि तेल-तुप एकत्र वापरायचे म्हण्जे?......
6 May 2011 - 9:54 am | चिंतामणी
हा फटु बघ.
ब्लांचबद्दल अधीक माहिती या पाकृमधे वाच.
6 May 2011 - 12:05 pm | डावखुरा
ओ काका लय भारी पाककृती दाखवलीत....
आईची डोकेदुखी आता वाढणारे...
ब्लांच करणे म्हण्जे काय हे नीट समजले...
आईपण असेच करते पण मला शब्द नव्हता माहीत...
धन्यु..
5 May 2011 - 11:14 am | विसोबा खेचर
लै भारी..
5 May 2011 - 12:11 pm | प्यारे१
टारझन, चुचु आणि परा हे सिद्धहस्त आणि उत्स्फुर्त प्रतिक्रियावीर कुठं गेले बरे?
6 May 2011 - 10:05 am | चिंतामणी
पराने स्वपरीचयात भले
"आवडते खाद्यपदार्थ
शाकाहारी काहिही चालते ! गवत सोडुन !"
असे म्हणले असले तरी पनीरशी वाकडे आहे. त्यामुळे पनीर वाचल्यामुळेच तो फिरकला नसावा.
5 May 2011 - 12:39 pm | पियुशा
mast resepi :)
5 May 2011 - 7:22 pm | पुष्करिणी
मला ही भाजी अतिशय आवडते. तळलेले पनीरचे तुकडे तर मी नुसते पण वाटीभर खाउ शकते.
* मी परवाच कुठेतरी वाचलं की लोह आणि कॅल्शियम एकत्र खाउ नयेत, कॅल्शियम लोहाचं शरिरात होणारं अॅब्सोर्बशन थांबवतं आणि काय काय्...म्हणून पालक पनिर खाउ नये इ.इ.
खादाड अमिता यांनी ह्याबद्दल काही सांगावं.
6 May 2011 - 9:34 am | प्रास
:-p
करून बघायलाच हवी पण कांदा-लसुणाशिवाय कशी करावी बरं? :-o
6 May 2011 - 5:29 pm | जय्वन्त
मस्त फोटो, छान पाक़कॄति
8 May 2011 - 2:38 pm | आचारी
साजुक तूप पिवळे कसे काय?
8 May 2011 - 3:08 pm | चिंतामणी
गाईचे तुप पिवळे असते. (आणि येथे कदाचीत बटर वापरले असावे.)
8 May 2011 - 3:25 pm | सानिकास्वप्निल
यु.के मध्ये राहत असल्यामुळे लोणी -तूप नाही बनवता येत म्हणून दुसरा पर्याय म्हण्जे अनसॉल्टेड बटर पासून साजुक तूप घरी बनवते मी...म्हणून तूप पिवळे दिसत आहे...