नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला
१९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल.
१९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या.
त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा)
जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात)
चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे
आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत)
आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा.
१. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ?
सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे
२. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या
३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ?
(सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती)
----------------------
माझीही शॅम्पेन
प्रतिक्रिया
25 Apr 2011 - 9:59 am | शिल्पा ब
या माणसाचा पर्दाफाश करणारे खूप videos youtube वर आहेत तरीही इतके लोक त्याच्या मागे पाहून डोक्याला शॉट बसला.
सेलिब्रिटी वगैरे लोकांचे अशा प्रकारात हितसंबंध गुंतलेले असावेत, नाहीतर ४० करोड कसे आले? आणि हि फक्त वृत्तपत्रांना सांगितलेली रक्कम आहे असं वाटतंय.
25 Apr 2011 - 12:46 pm | चिरोटा
४० कोटी नाही तर ४०,००० कोटी. शिवाय फक्त सेलिब्रिटीज नाहीत तर आदरणिय माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, कडक मास्तर शंकरराव चव्हाण, माजी लोकसभा अध्यक्ष आदरणिय शिवराज पाटील, (जवळपास भारतरत्न) सचिन्,मैदानावर धावांचा पाउस पाडणारा सुनिल गावस्कर ही आदरणिय मंडळीपण आहेत.
अमेरिकेतपण शेकड्यांवर भक्तगण आहेत्.अनेक गोरे तर अनेक भारतिय वंशाचे.
राव्/चव्हाण तर गेले.ह्या बाकीच्यांची सी.बी.आय.चौकशी व्हावी असे वाटते.
25 Apr 2011 - 10:11 am | जयंत कुलकर्णी
येथे वाचा भाग १
भाग - २
28 Apr 2011 - 12:02 pm | मनिष
याच संदर्भात नरेंद्र दाभोळकरांचा लेख इथे वाचता येईल -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152...
मला त्यातले हे महत्वाचे वाटले -
प्रकाशकाका म्हणतात, त्या प्रमाणे काळ्या पैशाची सोय किंवा Portfolio Management System अशा ठिकाणी अतिशय सबळ असावी!
25 Apr 2011 - 10:13 am | ५० फक्त
ब-याच ढोंगी आणि लफडेबाज माणसांपैकी एक कमी झाला याचा अतिशय जास्त आनंद झाला मला ही यादी अशीच लवकर लवकर आणि वेगाने वाढत जावी ही सदिच्छा.
काल जर याच्या मरण्यामुळे वैग्रे तेंड्ल्या खेळला नसता ना (इति प्रसारमाध्यमातील व्रुत्तानुसार) पार उतरला असता मनातुन, बरं झालं खेळ्ला ते.
27 Apr 2011 - 3:45 pm | वपाडाव
तेंडल्या खेळला नाही तरीही उतरला हो मनातुन.... शप्पथ कद्धी कद्धी असा विचार मनाला शिवला सुद्धा नव्हता की आपला तेंडल्या साईच्या पाया पडाया जाईल अन धाय मोकलुन रडेल...
अवांतर : नांदेडपासुन जवळ एक साई उद्यान, चाकुर (हो... हो... शिवराज पाटलाच ) येथे बांधलंय. त्यात वॉटर पार्कही आहे. तिथे या बाबांच मंदिरही आहे. काही वर्षांपुर्वी ३-४ मित्र मिळुन फिरायला म्हणुन गेलो होतो. आमच्या एका मित्राने उद्यानात शिरल्या बरोब्बर एका चावडीवरुन बाबांचा फोटो घेतला अन कात्रीने त्या फोटोचे केशकर्तन केले. ज्याम आणंद झाला म्हणुन.
अरे, तेंडल्या, आम्ही तुला देव मानतो ना रे... मग हे असले झटके का देतोस...
25 Apr 2011 - 10:14 am | किसन शिंदे
शिल्पा यांच्याशी सहमत.
त्यांनी केलेले चमत्कार हे दैवी नसून हातचलाखीचाच एक प्रकार आहे हे खूप वेळा पाहिलंय. खूप आश्चर्य वाटते मोठे मोठे राजकारणी आणि खेळाडू(आपला सचिनसुद्धा) यांचे भक्त होते.
25 Apr 2011 - 10:17 am | प्रकाश घाटपांडे
इथे चित्रफीत पहा
आपल्या प्रश्नातच उत्तरे दडलेली आहेत. धार्मिक ट्रस्ट देवस्थान ही श्रीमंत का असतात. इथे काळ्या पैशाच पांढर्या पैशात रुपांतर होत असते. अनेक राजकारणी, फिल्म वाले यांचे भक्त असतात ते काही केवळ चमत्कारामुळे नाही. या उपयुक्तता मूल्या मुळे.
25 Apr 2011 - 10:32 am | किसन शिंदे
घाटपांडे साहेब,
हा.हा.हा...चित्रफित पाहून खूप हसू येत होतं पण बळेच दाबून धरलं. :D :D :D
25 Apr 2011 - 10:38 am | शिल्पा ब
ज्याला ती चेन देताना नीट हातचलाखी करता आली नाही त्याचा नंतर खुन झाला. गुगलुन पहा.
25 Apr 2011 - 11:04 am | ५० फक्त
ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन असती तर फकत किड्नी घेउन सोडला असता, रत्नहार होता म्हणे तो म्हणुन तर खुन केला,
हां आपल्याकडे पण आयेसो ३.१४ इस्ट्मन्कलर बेल्ट अल्फा ५ ग्रेड अॅअॅअॅ सिस्टिम आहे आशरमात.
लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं.
25 Apr 2011 - 11:09 am | किसन शिंदे
लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं.
ऐकावं ते नवलच म्हणायचं कि...;)
25 Apr 2011 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रफित डकवल्याबद्दल धन्यु. :)
-दिलीप बिरुटे
25 Apr 2011 - 10:27 am | नितिन थत्ते
त्या काळातील "नीरा राडिया" असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रास्वामी हेही असेच मीडिएटर असल्याचे ऐकले होते.
अवांतर: सचिन तेंडुलकर (आणि इतर यशस्वी लोक) त्यांच्या आशीर्वादाने/कृपेने/शक्तीमुळे यशस्वी झाला असेल तर भारतरत्न सचिनला द्यायच्या ऐवजी सत्यसाईबाबांनाच का देऊ नये?
25 Apr 2011 - 11:10 am | यकु
हं!
25 Apr 2011 - 11:17 am | मराठमोळा
ह्या सगळ्या बाबांच्या अन त्याच्या चाहत्यांच्या.. &%$%#$#*&(*
भारतात किती मुर्ख लोकं राहतात याचे साक्षात उदाहरण आहे हे. सुशिक्षित आंधळे अडाणी सगळे..
25 Apr 2011 - 11:27 am | सविता००१
यान्च्याशी १००% सहमत
25 Apr 2011 - 11:30 am | आनंद
बाकी काही असो,
त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,
25 Apr 2011 - 12:00 pm | चिरोटा
हेच म्हणायचे होते.परिस्थितीने गांजलेल्यांना आधार देणे, त्यांना संकटात मदत करणे अशी अनेक कामे त्यांच्या ट्रस्टने केली.
भिकार दर्जाची सरकारी रुग्णालये,पडिक शाळा,गलिच्छ पाणी ह्यांना दाभोळकर आणि कंपनी पर्याय देवू शकतात का? २.५ लाखाच्या ह्रुदयाच्या सर्जरी किती संस्था २५/३० हजारात करतील? सत्य साई ट्रस्टने ते काम केले.
त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांवर अर्थातच कोणीच विश्वास ठेवणार नाही. काही गैरव्यवहार झालेही असतील.वर ईतरांनी म्हंटल्याप्रमाणे काळा पैसाही त्यात गुंतला असू शकतो(म्हणजे असेलच्).पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत.
25 Apr 2011 - 12:16 pm | योगी९००
त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही
सहमत..असे ऐकले आहे की त्यांच्या मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ बरेच गरीब लोक घेतात. मिळालेल्या पैशाचा थोडाफार सदुपयोग होत असल्याने चमत्कारांकडे थोडा काणा डोळा करायला हरकत नाही.
दादा कोंडके यांनी त्यांच्या "एकटा जीव" या पुस्तकात सत्य साईबाबांचा उल्लेख केला होता. एकदा आशा भोसले त्यांच्या कडे दर्शनाला गेल्या असताना स.सा. बाबांनी हवेतून सोन्याचा दागिना काढला आणि आशाताईंना भेट दिला. त्यांच वेळी आशाताईच्या ड्रायव्हरला मात्र असाच काही चमत्कार करून मात्र साधीशी गोष्ट भेट दिली. भक्तांची आर्थिक कुवत, सामजिक स्थान जाणून भेट देणे म्हणजे चमत्कारच नाही का? असेच माझ्या एका मद्रासच्या कलिगला शंका होती की रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन करू का? त्या वेळी स.सा. बाबांनी हवेतून एक रेनॉल्ट पेन काढून त्यांना भेट दिले होते.
पण हे सर्व प्रकार केल्याने त्यांना देवत्व मिळाले आणि म्हणूनच त्यांना लोकांकडून पैसा जमवून अशी हॉस्पिटले चालवत आली. थोड्याफार गरिब लोकांना मोफत उपचार घेता आले. नाहीतर हे इतक्या सहज शक्य होते का?
27 Apr 2011 - 9:09 am | शहराजाद
ही तर 'गरीबों का मसीहा' गिरीच झाली. अर्थात त्यांनी हा दानधर्म अगदी थोडक्यात भागवला असावा. कारण हिमनगाचं टोक जाऊन ४०००० कोटीचा हिमनग तसाच शिल्लक आहे. पण ससाबा पश्चातही उरलेल्या गरीबांचीही चिंता नको, प्रेम साई अवतरणार आहेच.
*म्हटलंच आहे,
शिंग फुंकता रॉबिनसाठी
शरवुडचे जंगल भंगेल
गडी उठतील रंगेल
*-भा. रा. भागवत
27 Apr 2011 - 11:58 pm | आनंदयात्री
>>शिंग फुंकता रॉबिनसाठी
वा वा .. काय मस्त आठवण जागवलीत. लहान पणी अगदी भारावलो होतो भागवतांचा रॉबिन हुड वाचुन !! शेरवुडचे जंगल, मोठा जॉन, लिटल जॉन, मरियम, कोणतरी लठ्ठ्या, हरणं, उमदार दिलदार राजा रिचर्ड, त्याची हरणं आणि रॉबिनची पुंडाई.
भागवतांची भाषांतरीत पुस्तकं वाचणं हा फारच आनंददायी अनुभव होता, आता तसा निखळ निर्भेळ आनंद पटकन मिळवता येत नाही. इतकं छान नवं काही राहिलं नाही किंवा जाणीवा बोथट झाल्यात. बादवे ते पाणबुडीवालं एच. जी. वेल्सचं कोणतं हो भाषांतरीत पुस्तक ?
पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकात अदितीने एक नितांतसुंदर लेख लिहिलाय 'सांगावेसे वाटले म्हणुन', त्यात तिने लिहलेय ती भागवत आजोबांना भेटली तेव्हा ते तिला कसे वाटले याबद्दल.
अवांतराबद्दल क्षमस्व.
28 Apr 2011 - 12:28 am | पंगा
पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'.
त्याच्या भागवतांच्या अनुवादाबद्दल कल्पना नाही. फारा वर्षांपूर्वी 'किशोर' मासिकात 'सागरकैद' नावाने त्याचा एक मराठी अनुवाद क्रमशः प्रसिद्ध झाला होता. अनुवादक कोण होते ते आठवत नाही. (बहुधा भागवत नसावेत.)
28 Apr 2011 - 12:49 am | आनंदयात्री
>>पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'.
करेक्ट. ज्यूल्स व्हर्नचेच. हेच मराठीत वाचले आहे पण किशोरमध्ये नाही हे नक्की.
28 Apr 2011 - 12:50 am | गणपा
बहुतेक "साता समुद्राचा सुलतान" असावं.
28 Apr 2011 - 2:07 am | शहराजाद
भा. रा. भागवतांचा पुस्तकरूप अनुवाद 'समुद्र सैतान' , भाग १ आणि२ नावाने प्रसिद्ध झाला होता.
28 Apr 2011 - 9:12 am | शहराजाद
रॉबिन हुड आणि त्याच्या रंगेल गड्यांनी एके काळी मलाही झपाटून टाकलं होतं. (भा. रा. भागवत झिन्दाबाद) खरं तर तशीच टोळीदेखील काढायचा आमचा मनसुबा होता; पण एक तर आसपास जंगल नव्हतं. शिवाय, आमचे पाद्रीबाबा, धाकला जॉन इ मंडळीची टोळीशी बांधिलकी तकलादू आणि पार्ट टाइम होती. टोळी अस्तित्वात येऊ शकली नाही हे वेगळं सांगायला नको.
@ अदितीतै
भागवत आजोबांच्या भेटीचा लेख मिपावरही टाका.
असो. फार अवांतर होत चाललय. खरड टाकीन.
27 Apr 2011 - 4:16 pm | वपाडाव
नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने.....
28 Apr 2011 - 9:52 am | योगी९००
नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने.....
आमचे तेच म्हणणे होते त्यावेळी की एखाद्या कार कंपनीत जॉईन करू का विचारायला पाहिजे होते म्हणजे स.सा. बाबांनी कारच काढून दिली असती.
25 Apr 2011 - 1:55 pm | महेश_कुलकर्णी
गरजूंचे प्राण वाचताना जर अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली असतील अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्यांचे काय?
महेश कुलकर्णी
25 Apr 2011 - 3:27 pm | llपुण्याचे पेशवेll
लोकांची घरे कशी बरे उध्वस्त झाली? त्यांनी गुंड पाठवून पैसे जमवून आणले का?
का लोक त्यांच्या कडे पैसे नसताना कर्जे काढून त्यांना पैसे देत होते? काही उदाहरणे देऊ शकाल काय?
26 Apr 2011 - 1:54 am | Nile
आनंद यांच्यासारखे अंधश्रद्धाळू लोक असल्यानेच असल्या बाबांचे फावते. आनंद यांच्यासारखे लोक नुसते बाबांची अनुयायी बनत नाहीत तर त्या बाबांचा प्रसारही करतात.
26 Apr 2011 - 12:52 pm | आनंद
मी अंधश्रद्धाळू आहे हे नवीनच कळल.
मला ओळ्खणारे लोक मला कश्यावरही श्रद्धा नसलेला म्हणतात.
बाकी ते बांबाचा प्रसार वाचुन (आधी कॉफी सांड्ली ना भाउ!) सांगावस वाटत की कुठ्ल्या बाबाचा प्रसार करण्या पेक्षा स्वतः च
एखादा बाबा बनण्याचा प्रयत्न करीन.
25 Apr 2011 - 12:04 pm | ५० फक्त
''त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,''
अजिबात नाही, उद्या दाउदनं त्याच्या बापाच्या नावानं दवाखाना काढला आणि त्यात एका गरजुचे प्राण वाचवले तरी हेच म्हणणार का ?
ज्या गरजुचे प्राण फुकट वाचले त्याच्या प्राणाची किंमत बाकीच्यांनी ब-याच मार्गांनी दिली असेल, कुणी किडन्या देउन तर कुणी अजुन काही देउन.
25 Apr 2011 - 12:05 pm | स्पा
टाकुनिया बाबा गेला
25 Apr 2011 - 12:20 pm | टारझन
मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. बरी सुटका झाली .. त्याचं तोंड पाहिलं की मेंढराची आठवण यायची =))
25 Apr 2011 - 12:37 pm | आनंद
इतक्या सहजा सहजी सुटका कसली होतेय. आत्मा अमर आहे शरीर बदलुन येइलच लवकर.(जालावरही जसे पुनर्जन्म होतात तसे)
25 Apr 2011 - 12:57 pm | ५० फक्त
मेला चार दिवसापुर्वीच असेल, सगळ्या कागदावर अंगठे वगैरे घेउन झाल्यावर सांगितलं असेल.
बरं एक शंका, मरण्यापुर्वी या भोंदुनं आपलं शरीर,किडनी, लिव्हर गेला बाजार डोळे तरी दान केले होते का ? किंवा किमान लिलावात विकायची वगैरे आयडिया आहे का कुणाची इबेला वगैरे, जाम पैसे मिळतील त्यातुन ?
26 Apr 2011 - 1:12 pm | तिमा
फक्त टारझनच देऊ शकतात. अनेकजण या प्रतिक्रियेने मनांत सुखावले असले तरी सगळ्यांचं डेअरिंग नाही होणार असं लिहायला.
एकूण सर्व प्रतिक्रिया वाचून मिपावर असल्याचा अभिमान वाटला.
बुवांच्या माध्यमातून काळ्या पैशाचे पांढरे करणे, पोलिटिकल कामे करुन घेणे यासाठीच सर्व बडे बुवाभक्त होतात या मताशी १००% सहमत.
दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये.
28 Apr 2011 - 10:18 am | मनिष
सहमत!
25 Apr 2011 - 12:24 pm | विसुनाना
'माझीही शॅम्पेन', तुम्हाला जी चर्चा करण्याची इच्छा आहे ती स्तुत्य आहे.
पण तुम्ही 'वगैरे' हा शब्द 'वैइगरे' हा शब्द चुकीचा लिहू नये असे वाटले.
'वगैरे' हा शब्द मुळात उर्दु (फारसी?) आहे. त्याचा अर्थ 'व + गैरे' म्हणजे मराठीत 'आणि + इतर' (संस्कृतात 'इति + आदि' = इत्यादि ) असा आहे.
बरेच लोक हा शब्द "वैग्रे" , "वैगरे" असा लिहू आणि उच्चारू लागले आहेत त्याचा खेद वाटतो.
26 Apr 2011 - 5:49 am | माझीही शॅम्पेन
धन्यवाद विसुनाना ! पुढील खेपेस "इत्यादी" हा शब्द वापरीन :)
अवांतर - इत्यादी आणि एक्सेटरा (ईग्रजी) शब्द जरा जवळचे वाटतात का ?
25 Apr 2011 - 12:42 pm | प्रकाश घाटपांडे
लातुर मधील एका तरुण मुलाची किडनी पुट्टीपुर्तीच्या हॉस्पिटल मध्ये काढली होती. हे मी सदर मुलाच्या तोंडातुन पत्रकारांसमोर ऐकलेली कथा आहे. ती चित्रलेखा मध्ये ही आली होती. बापाच्या किडनीच्या आजारात मुलाला किडनी द्यावी लागली .मुलाने आश्रमात सेवा केली.
बाप नंतर वारला. मुलाने नंतर जेव्हा एक्स रे काढला त्यावेळी बापाची एक किडनि गायब व याची एक गायब. हे प्रेत उकरुन काढुन काढलेल्या पोस्टमार्टेम वरुन सिद्ध झाले. मुलगा कोर्टात लढला. हारला. जजच सत्यसाईबाबाचे भक्त निघाले. ७-८ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे.
अगदी साधा मुलगा होता. प्रकरण बंद.
कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात. चिरोटा यांचे "पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत." हे मत मान्यच आहे. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे मोठे वाहक असतात. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो हे वास्तव नाकारुनही चालणार नाही
25 Apr 2011 - 12:50 pm | मराठमोळा
>>कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात
पका काकांशी प्रचंड सहमत आहे.
मला तर वाटतं की बाबांच्या भक्तांचा सगळा काळा पैसा यांच्या ट्रस्ट च्या नावाखाली पांढरा करुन घेतला गेला आहे.
25 Apr 2011 - 1:14 pm | चिरोटा
बर्याच प्रमाणात शक्यता आहे. पण वर उल्लेखलेल्या सेलिब्रिटीज म्हणजे कोणी पेज थ्रीवाल्या उडाणटप्पु व्यक्ती नाहीत. ती आहेत समाजातली दैवते. त्यांची चौकशीची मागणी करायची म्हणजे तुम्ही-आम्ही संपण्याचीच शक्यता जास्त.
25 Apr 2011 - 1:41 pm | महेश_कुलकर्णी
फार छान विषय चर्चेला घेतल्या बद्दल लेखकाचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन...
मी जेव्हा सत्य साई बाबांच्या भोंदूगिरी बद्दल मित्रांमधे बोलतो तेव्हा भाविक मला सांगतात "त्यांनी अनेक कॉलेज आणि हॉस्पिटल(पूर्णत: मोफत सेवा) काढली आहेत आणि ते त्यांचे मोठेपण आहे..."
पण मी या गोष्टीने समाधानी होत नाही कारण त्या ट्रस्टकडे जमा झालेला पैसा हा भोंदुगिरी करून लोकांना फसवून गोळा केला आहे.
फकिर साईबाबांचा अवतार एवढ श्रीमंत आणि आरामदायी आयुष्य कसे काढतो?
उदा. २००५ पासून बाबा फुल्ली ऑटोमॅटिक व्हिलचेअर वापरत होते.
या सर्व मुद्यामध्ये एक अजून एक प्रश्न मला काल पासून त्रास देतो आहे तो म्हणजे ४ दिवस शासकीय दुखवटा कशासाठी?
महेश कुलकर्णी
25 Apr 2011 - 1:56 pm | यकु
पूर्वी मिसळपाववर नेमक्या याच गुरूगिरीच्या धंद्यावर अगदी अचूक भाष्य असणारी मुलाखत अनुवादीत झालेली आहे... यासंदर्भात अगदी वाचनीय
http://www.misalpav.com/node/16401
25 Apr 2011 - 2:02 pm | नाना बेरके
केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे. कुठलीही प्रसिद्ध व्यक्ती ही देखील इतर माणसासारखा विचार करतच असते. तिचे देखील गुरू, श्रद्धास्थाने असू शकतात. ते योग्य कि अयोग्य हा भाग वेगळा. बरं, ते ठरवणार कोण ? त्यालासुध्दा पात्रता लागते.
सेलीब्रिटीजचच्या कामगिरीची उगाचच चेष्टा करून थोड्याफार ओळखीच्या लोकांमध्ये स्वतःच्या मताची टिमकी वाजवणे हे जरा अतीच.
25 Apr 2011 - 2:50 pm | नितिन थत्ते
>>केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे.
सेलिब्रिटीजची त्यांच्या क्षेत्रातली कामगिरी गौण ठरते असे मी म्हणत नाही तर श्रद्धाळू लोक अश्या अर्थाने बोलतात. "सत्यसाईबाबांचा आशीर्वाद नसता तर सचिन तेंडुलकर कुठला इतक्या धावा करता !!!" असा टोन दिसतो. म्हणून "मग सत्यसाईबाबांनाच भारतरत्न द्यावे" असे म्हणावे लागते.
25 Apr 2011 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार
सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, अवतार होते, मानव होते, देव होते ह्या सगळ्याशी काही घेणे देणे नाही. त्या माणसाच्या हॉस्पिटल मध्ये एका कोणा गरिबाची आई, बहिण , लहानगे लेकरु वाचले असेल तरी मला त्या माणसाविषयी आदरच आहे :)
बाकी बाँबब्लास्ट करुन लाखो लोकांचे जीव घेणार्या दाऊदशी बाबांची केलेली तुलना पाहून गंमत वाटली :)
असो...
आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा.
अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते :)
25 Apr 2011 - 6:40 pm | पंगा
माझ्या समजुतीकरिता विचारतो. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ 'वैग्रे' उघडे पाडणारे जे आहेत, ते (बाबांच्या हयातीत किंवा अन्यथा) स्वतःसुद्धा (कमीअधिक प्रमाणात) हातचलाखीचा धंदा करीत होते, असा काही आपला दावा आहे काय? असल्यास, त्याकरिता आधार काय असावा बरे?
26 Apr 2011 - 12:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ?
हे सर्व आरोप जुने आहेत. मी स्वतः यातील काही गोष्टी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यकर्त्यांकडून खूप जुन्या काळी ऐकलेल्या आठवतात. ज्या काळी आंतरजाल अस्तित्वात नव्हते तेव्हापासून चालू आहे. "बोंबा" ठोकणारे जुन्या काळापासून ठोकत आहेत, काही जणांनी त्या ऐकल्या नसतील तर त्याला "बोंबा" ठोकणारे काय करणार?
तात्पर्य :- एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा ती अस्तित्वात नसते असे नाही.
>>हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा.
अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते
कुणी सांगावे, आरोप करणाऱ्यातले काही जण तरी त्यांच्या परीने आणि कुठेही गाजावाजा न करता करत असतीलही अशी मदत. ते करत नाहीत असे गृहीत का धरावे ? (तुमच्या अवांतर वाक्यातून तसे प्रतीत होते आहे.)
तात्पर्य :- वरचेच ;-)
27 Apr 2011 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ?

तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे.
येवढे बिनकामाचे अगाध ज्ञान, त्यातील अंधश्रद्धा निर्मुलनचे कार्यकर्ते वैग्रे फालतु तपशील टंकण्याच्या आधी पक्त :-
हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते :) पण काय आहे ना, जुने स्कोर सेटल करायची इतकी घाई झालेली असते की काय लिहिले आहे ते निट न वाचताच त्याच्या विरुद्ध लिहिण्याची घाई...
असो...
ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही (फालतु वेळ असेल तर आणि सविता भाभी अपडेट झाले नसेल तर धागा उघडीन पुन्हा कदाचित). त्यामुळे उगाच रागारागाने, संतापाने अजुन हातभर ज्ञान टंकु नका. उगाच टंकनाचे कष्ट वाया. ;) सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =))
28 Apr 2011 - 12:03 am | आनंदयात्री
हा हा हा !!! हलकट आहेस ..
बाकी पराशी सहमत आहे. अगदी योग्य दृष्टिकोण आहे.
28 Apr 2011 - 4:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ?
नाही. नाठाळांची शेपटी दिसली की तिला अडकवण्याची सवय आहे. तुम्हाला अनुभव आला आहेच. विसरला असाल तर स्वतःची शेपटी निरखून बघा.
>>तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे.
अरेच्या !!! वृत्तांतात तर आमच्या अगाध ज्ञानाविषयी काही आले नव्हते. हेरखाते आहे तुमचे की नुसताच कल्पनाविलास ?? बाकी लोकमान्य टिळक म्हणून गेलेच आहेत की दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तितक्या कल्पना सुचतात. तेव्हा, तुमचे चालू द्या...
>>हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते
>>गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ?
कूपकथेतील मंडूककुमार साहेब, तुम्ही वाचता तितकेच जाल नाही आहे हो. थोडा शोध घ्या, बुवाबाजी या विषयावर ५०-१०० धागे येऊन गेले आहेत. तुमच्या कडे रिकामा वेळ बराच असतो असे दिसते. तेव्हा त्याचा सदुपयोग करून ते धागे वाचा आणि "अभ्यास वाढवा". इथले कमी पडले तर उपक्रमावर पण बरेच आहेत.
आता इथे ५-१० ओळींचा प्रतिसाद लिहिणाऱ्यानेच आधी सत्यसाईबाबावरच लिहिले पाहिजे असा तुमचा आग्रह असेल तर गोष्ट वेगळी. तरीही ज्यांनी ज्यांनी अशा "बोंबा ठोकल्या", त्यातल्या कुणीच आधी काही लिहिले नव्हते असा तर्क नाही काढता येत. (माफ करा, चुकलो, तुम्हाला चक्क तर्कशुद्ध विचार करायला सांगतो आहे. सॉरी हं.) बाकी, जमले तर खाली Nile यांनी दिलेला प्रतिसाद पण वाचा.
स्कोर "वैग्रे" बद्दल उत्तर मागे दिले होते. ते "पक्त" पुन्हा वाचा.
>>ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही.
नका घेऊ, झेपत नाही तुम्हाला.
>>सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =))
ओरिजिनल देवाने मला दिली तेवढी बुद्धी पुरेशी आहे. सत्य साईने दिलेल्या बुद्धीचा स्पेसिमेन तुम्ही असाल तर.... बापरे... मुळीच नको.
आजचा श्लोक :- आधीच मर्कट तशातची मद्य प्याला.....
26 Apr 2011 - 1:48 am | Nile
बाबांच्या हयातीत अनेकदा टिका वगैरे झाली आहे हे वरती मेहेंदळ्यांनी लिहले आहेच. पण ह्या मुद्द्याचे इथे कारण काय? पुर्वी समजा इथे बोंब ठोकणार्यांपैकी एखाद्याने काही केले नसेल म्हणून इथे करु नये असे कुठल्या धर्मग्रंथात लिहले आहे काय?
मुळात धाग्याचा अन लेखकाचा उद्देशच चर्चा करणे हा आहे हे असताना, तसे व्यासपीठ उभे केले असताना पुर्वी काय केले हे विचारणे अस्थायी आहे. शिवाय आंतरजालावर एखादा लेख लिहणे म्हणजेच काहीतरी करणे नाही. अश्या भोंदु बाबांबाबत आपल्या घरातल्यांनाही सावध करणे म्हणजे कामगीरीच आहे. आणि रुग्णसेवाच केली पाहिजे असे नाही. अश्या भोंदूंपासून लोकांना सावध करणे हे ही महत्त्वाचे कार्य आहे.
26 Apr 2011 - 2:12 am | पंगा
'अस्थायी' नव्हे. 'अस्थानी'.
'अस्थानी' बोले तो, out of place.
'अस्थायी' बोले तो, unstable.
अर्थाचा अनर्थ होतो, म्हणून ही सुचवण.
बाकी चालू द्या.
26 Apr 2011 - 2:17 am | Nile
गलती से मिश्टेक हो गया. चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद.
स्वगतः च्यायला शाळेत नीट मराठी शिकलो असतो तर.. ;-)
26 Apr 2011 - 2:26 am | पाषाणभेद
पंगा, चांगलेच मराठी बोलायला लागला रे बाबा तू आता. अचूक दुरूस्ती करायलाही लागला आताशा. प्रगती उत्तम आहे. कोणत्या मास्तरांची शिकवणी लावली?
बाकी चालू दे. चर्चा भन्नाट चालली आहे.
25 Apr 2011 - 3:32 pm | अमोल केळकर
चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे
यातील चेपु म्हणजे काय ? :(
अमोल केळकर
25 Apr 2011 - 3:35 pm | गवि
असावी बहुतेक.
25 Apr 2011 - 3:44 pm | अमोल केळकर
:)
25 Apr 2011 - 4:00 pm | गणपा
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
25 Apr 2011 - 4:02 pm | टारझन
आपण आपल्या देवाला फक्त क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवले आणि त्याच्या वैयक्तिक जिवनात माणुस म्हणुन पाहिल्यास यातना कमी होऊ शकतात. :)
बास , अजुन काही बोलणे नाही :)
- सत्यसाई हेयर कटिंग सैलुन
आमचे कडे विविध प्रकारचे केस पिंजुन मिळतील. मुंज व दहाव्याच्या ऑर्डरी स्विकारतो .
पत्ता : पिंपळाच्या झाडाखाली , गटरीच्यावर ,
झिपरे चाळ , अस्वलगल्ली , मेंढरपाल (पश्चिम)
25 Apr 2011 - 4:47 pm | गणपा
खरयं टार्या तुझं.
पण काये ना या नावा भवतीच वलयंच अस आहे की त्याला क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवणं जड जातं. :)
25 Apr 2011 - 6:44 pm | पंगा
मुंजीला आणि दहाव्याला केस पिंजू कधीपासून लागले? की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?
26 Apr 2011 - 5:56 am | माझीही शॅम्पेन
पार खपलो ! :)
28 Apr 2011 - 12:09 am | आनंदयात्री
>>की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?
जर (हा विनोद असेल तर)
{
प्रतिसाद.टंका ("हा हा हा ... पंगाशेठशी नाईलाजाने सहमत.");
}
(वरचा स्युडो कोड कंपाईल होईल याची ग्यारंटी नाही, कृपया त्यावरुन हात धुवुन मागे लागु नये.)
25 Apr 2011 - 4:37 pm | गणेशा
तुमचा देव .. सचिन ?
काही प्रश्न पडलेत मला ..
मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर ..
पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल .
म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते ....
असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...
25 Apr 2011 - 4:37 pm | गणेशा
तुमचा देव .. सचिन ?
काही प्रश्न पडलेत मला ..
मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर ..
पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल .
म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते ....
असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...
25 Apr 2011 - 5:04 pm | गणपा
बा गणेशा,
खाली स्पावड्याला दिलेलं उत्तर वाच.
बाकी सचिन ने कसलेसे चमत्कार करुन कुणाला लुबाडल्याच ऐकिवात नाही. उलट अधुन मधुन त्याचा मदतीचा हात कसा सुटतो ह्या बातम्या ऐकल्या आहेत.
असो, जर नकळत कुणाच्या बाबाच्या लंगोटी/धोतराच्या कासोट्याला हात घातला असेल तर क्षमस्व.
या धाग्यावर उगाच आवांतर नको.
खवत स्वागत आहे.
25 Apr 2011 - 4:50 pm | गणेशा
प्र.का.टा.आ.
25 Apr 2011 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
गणपाशी सहमत आहे. मला तर उगाच मानसिक त्रास झाला. बाकी, सचिन एक हाडामासाचा माणूस आहे आणि त्याच्या स्वत:च्या अशा काही श्रद्धा- भावना आहेत याच्याशी सहमत होता येईल. पण कालच्या घटनेने सचिनने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, नाष्टा केला नाही, आणि आज सच्याला रडतांना पाहून [सच्यानं रडू नये असे म्हणायचं नाही. पण, हवेत हात फिरवून सोन्याची लॉकेटं काढणार्या माणसासाठी इतकं भाविनक व्हावं. ] सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम आवरलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे. :(
भविष्यात सच्या असा म्हणाला की, माझा स्क्वेअर कट, पुल,स्ट्रेट ड्राईव्ह, थर्डमॅनच्या खेळाडूच्या डोक्यावरुन मारलेला सिक्स, पॅडल स्वीप, आणि क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले फटक्यांची प्रेरणा 'बाबा'च आहेत असे म्हटले तर मी काहीही वाटून घेणार नाही. :(
अवांतर : पुट्टापर्थीच्या या राजूबाबानं जाता-जाता लै प्रॉब्लेम वाढवून ठेवले आहेत.
-दिलीप बिरुटे
27 Apr 2011 - 4:20 pm | वपाडाव
अगदी बरोब्बर..
मैदानाबाहेर तो एक व्यक्तिमत्व म्हणुन त्याच्या विचारांना स्थान देण्याची गरज आहे असे वाट्टे..
25 Apr 2011 - 4:05 pm | स्पा
बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
25 Apr 2011 - 4:11 pm | टारझन
अमेरिकेट शरिरभर टॅटू काढुन हार्ले डेव्हिडसन वर आर्धे कलिंगड घालुन फिरणारांना गोंदवलेकर महाराज म्हणतात , ते कधी पासुन नॉन भोंदु झाले ? :) अधिक प्रकाश संपादिकेने टाकावा ;)
बाकी गजानन म्हाराज म्हणजे तेच का , दिगंबर अवस्थेत चिलीम ओढणारे ? त्यांनी त्यांच्या वर्तनातुन व्यसनं करण्याचा संदेश दिल्यामुळे मला ते आवडत नाहीत. बाकी स्वामीसमर्थ लोकांना शिवीगाळ करायचे , उद्धट बोलायचे असे ऐकुन आहे . अर्थात कोणाच्या भावना दुखवने हा हेतु नसला तरी काही ऐकीव फॅक्ट्स उघड कराव्याश्या वाटल्या :)
आणि मुद्दान सत्यसाईबाबाच्या धाग्यावर बाकी श्रद्धास्थाने घुसवणार्या मोन आगाशेचे कौतिक वाटले :)
25 Apr 2011 - 5:05 pm | किसन शिंदे
टारझन राव,
तुमच्या प्रतिक्रियेमुळे नुकत्याच ढकलपत्रातून आलेल्या एका खळबळजनक लेखाची आठवण झाली.
हवा असल्यास पाठवतो.
27 Apr 2011 - 11:44 pm | शैलेन्द्र
मलाही पाठवुन सोडा की...
25 Apr 2011 - 5:21 pm | मृत्युन्जय
तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस ते महाराज नाहीत आणि स्पावड्या म्हणतो ते भोंदु नाहीत. बाकी तुमचे चालु द्यात.
26 Apr 2011 - 6:53 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. इतकंच म्हणतो.
25 Apr 2011 - 4:31 pm | गणपा
स्पावड्या माझं वाक्य पुन्हा एकदा नीट वाच बरं.
बाकी आपला * शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
*इथे हा शब्द स्वतःबद्दल आदरार्थी बहुवचन म्हणुन वापरलाय. (आता इतर कुणी आदर देत नसला म्हणुन स्वतः पण देउ नये की काय ? ;) )
25 Apr 2011 - 4:58 pm | Dr Santosh Jalukar
आपले तेह्तीस कोटि देव काय कमी अहेत? नवे नवे बाबा मन्ड्ली कशाला हवेत? श्रद्धेने देव भक्ति करा, तेच खूप अहे. सन्त ज्ञानेश्वर, तुकाराम अहेत ना. उद्या मी पण असेच कहितरि बाबा म्हणून प्रसिद्धि च्या मगे लागू शकतो. ह्याला अन्त नाही....कुठे तरि शेवट झालाच पहिजे.
25 Apr 2011 - 7:48 pm | वेताळ
सत्य साई स्वःता देव होते असे त्यानी जाहिर केले असताना देखिल त्यांचे हरामखोर भक्त त्याना बर वाटावे म्हणुन इतर देवांची प्रार्थना करत होते,त्यामुळे सत्यसाइबाबानी देह त्याग केला.ही अंतर्गत गोट्यातील बातमी आहे.
स्वामी समर्थ हे शिवराळ होते हे सत्य आहे कारण विनाकारण लोक त्याच्या भोवती जमा होवुन त्याना उगाचच पिडत असत. समर्थानी पैसे जमा करुन कधीच कोठे आश्रम किंवा वाडा बांधला नाही. एक लंगोट सोडली तरी त्यानी काहीच जवळ बाळगले नाही.त्याच्याशी तुलना पाहुन वाईट वाटले.
26 Apr 2011 - 6:02 am | माझीही शॅम्पेन
हरे राम ! राम राम हरे हरे !
कोण कुठूनप्राण-त्याग करेल ते काही सांगता येत नाही !
26 Apr 2011 - 6:15 am | गणपा
=)) फुटलो
26 Apr 2011 - 1:01 pm | टारझन
चुकुन "फुटल्या " असे वाचले =)) =))
- सट्टा साईबाबा
वर्गणी देण्यासाठी खरडवहीचा वापर करावा.
25 Apr 2011 - 9:02 pm | रमताराम
ढिस्क्लेमरः आपण सत्यसाईबाबाच काय कोणत्याच बाबाचा वा देवाचा भक्त नाही.
इथे एक सूर असा दिसतो आहे की चमत्कार हे खोटे असल्याने बाबाही खोटा आहे. हा तर्क थोडा फसतो आहे असे आमचे मत आहे. चमत्कार ही हातचलाखी असेल म्हणून सोडून देऊ. पण केवळ त्यांच्या चमत्कारांना भुलून एवढी प्रचंड भक्तगणांची संख्या त्यांच्यामागे जाईल हे म्हणणे धाडसाचे आहे. ती हातचलाखी कदाचित मार्केटिंग गिमिक असू शकेल पण केवळ तेवढ्यानेच माणूस एवढा बडा अध्यात्मिक गुरू होते म्हणणे अंमळ अतिशयोक्ती करणारे ठरेल आणि बहुसंख्य सेलेब्रिटी भगतगण डोक्याने एखाद्या अशिक्षित माणसाच्या पातळीवर आहेत असे म्हटल्यासारखे होईल. हा त्यांच्यावर अन्याय आहे असे मला वाटते.
तात्पर्य, त्या चमत्कारापलिकडे असे काय होते की ज्यामुळे हा माणूस एवढा मोठा झाला याचे उत्तर प्रथम द्यावे लागेल, मग ते योग्य/अयोग्य, नैतिक/अनैतिक आहे याबाबत चर्चा करता येईल. थोडक्यात त्यांची शिकवण काय होती, तिचा गाभा काय होता, ते अध्यात्मिक अनुभूती कोणत्या मार्गाने साध्य करू पहात होते, त्यांचे मार्ग कोणते होते हे प्रथम पहावे लागेल. त्याचे मूल्यमापन करूनच त्यांच्या मोठेपणाबद्दल अथवा खोटेपणाबद्दल निश्चित विधान करणे योग्य ठरेल.
त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सवलती वगैरेंबद्दल परस्परविरोधी विधाने ऐकण्यात आली आहेत. वर एका हत्येचा आरोपही आला आहे. (असाच आरोप एका शंकराचार्यांवर आहे अशी आमची माहिती आहे.) त्यावरून कदाचित एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह नक्कीच लावता येईल. परंतु त्यांचे अध्यात्मिक गुरू म्हणून असलेले स्थान त्यामुळे बाधित होत नाही, शंकराचार्यांचेही नाही वा सत्यसाईबाबांचेही. त्यासाठी त्यांच्या शिकवणीतील विसंगती, घातक मूल्ये इ. बाबत सप्रमाण विधाने यायला हवीत. तरच ते स्थान डळमळीत होईल. आणि आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात अशा प्रकारचे मूल्यमापन मला दिसले नाही.
ढिस्क्लेमर २: मला स्वत:ला सत्यसाईबाबांच्या शिकवणुकीबाबत काडीचीही माहिती नसल्याने त्याबाबत काहीही विधान करण्यास मी 'इलिजिबल' आहे असे मला वाटत नाही. परंतु त्यांचे तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रकार होते यावर - समोर आलेले पुरावे पुरेसे वाटल्याने - माझा विश्वास आहे.
26 Apr 2011 - 1:43 am | Nile
सुरुवात अशा हातचलाखीने झालेली असु शकते. सुरुवात करताना लोकांना चमत्काराने भुलवुन एकदा पंथ गोळा झाला की मग तो वाढवणे म्हणजे व्यवस्थापन स्कील. त्यामुळे चमत्कार करण्याचे दावे महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. (घासू गुर्जींनी यावर मागे लेखात सविस्तर चर्चा केली होती.)
अर्थात ते चमत्कार जाहीररीत्या करतात हे माहितच असेल, म्हणजे चमत्कार हे शस्त्र ते प्रसार प्रचाराकरता वापरतात हे नाकारता येणार नाही. त्यांचा इंटरनेटवर शोध घेतला असता ४-५ 'ओळखींमध्ये' पहिल्या तीनात त्यांच्या चमत्काराचा उल्लेख आहे. म्हणजे ते चमत्कारा करता (मुळे सुद्धा) ओळखले जातात हे नाकारता येणार नाही.
मुळात बाबा जर मोठे अध्यात्मिक (की फिद्यात्मिक) असतील तर त्यांना अशा खालच्या दर्जाची हातचलाखी करण्याचे कारण काय असा प्रश्न का विचारु नये? एखादी व्यक्ती फ्रॉड करत असेल तर तिच्या इतर कृत्यांवर संशय येणे सहाजिकच आहे.
त्याशिवाय बाबांवर फार पूर्वीपासुन आरोप आहेत. यु ट्युबवर त्याची बहुतेक तासाभराची डॉक्यु मिळेल, त्याशिवायही अनेक लेख/आर्टिकल्स शोध घेउन मिळतील. बाबांनी लहानमुलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर आहेत. वरती किडनी वगैरे आरोपही झाले आहेत. इतकी संपत्ती असलेल्या बाबा लोकांना भारतात सदर प्रकरणे दडपणे अवघड नाही.
(यावरुन आठवले, नित्यानंद स्वामींची दाक्षिणात्य नटीबरोबर त्याच्या शयनगृहात केलेल्या शृंगाराच्या कहाणीचे पुढे काय झाले? सहजच शोध घेता असे दिसते की नित्यानंद ज्ञानपीठाच्या लोकांनी त्या व्हिडीओचे कॉपीराईट सांगून जवळजवळ संपूर्ण इंटरनेटावरुन तो व्हिडीओ काढून टाकला आहे. युट्युब प्लेअरचा एकही व्हिडीओ दिसत नाही.
असे असता, सचिन इतर राजकिय नेत्यांनी पब्लिकली तरी त्यांचे भक्त असल्याचे दाखवू सूद्धा नये, अशाने त्यांचे महत्त्वच वाढते. सचिन वैयक्तिक जीवनात अंधश्रद्धाळू आहे हे सर्वांना माहित आहे, त्याच्या आणी खेळाचा काही संबंध नाही, पण "इफ यु आर अ पब्लिक पर्सन यु डोन्ट हॅव अ प्राईव्हेट लाईफ".
26 Apr 2011 - 4:05 pm | पंगा
कल्पना नाही. येशूच्या खात्यावरदेखील लोकांना हस्तस्पर्श करून बरे करणे, बुधल्यातील पाण्याची हस्तस्पर्शाने दारू* करणे, वगैरे 'चमत्कार' दर्ज आहेत.
* मागे पुण्यात 'पेट्रोलमधील एथॅनोलमुळे टाकीत पाणी साचते' वगैरे दावे झाल्याचे ऐकले होते, त्या एथॅनोलचे मूळ 'असले' काही असावे काय, अशी शंका येऊ लागते.
(प्रतिसादाच्या उर्वरित भागाशी सहमत.)
26 Apr 2011 - 1:56 am | Nile
आमची प्रतिक्रीया अशीच आहे. खरं फार लवकर मरायला हवा होता पण मेला एकदाचा. आम्हीतर तो सुदिन साजरा केला.
26 Apr 2011 - 2:07 am | पाषाणभेद
९०% मते सत्यसाईबाबा देव नव्हते असे आहेत.
आज मला अशा मतांचा आग्रह असणार्या मिपाचा सभासद असण्याचा आनंद होतो आहे.
त्यांना मिळणार्या दानातून त्यांनी हॉस्पीटल्स काढली, हे केले, ते केले. अरे ते सारे मोठ्या लोकांनी दिलेल्या पैशातून केले ना?
हे सारे करतांना एवढी संप्पती मागे कशी राहीली? तिचा विनीयोग कसा केला नाही?
वर गणपा म्हटला तेच खरे.
सत्यसाईबाबा गेल्यानंतर रडणार्यांचे मगरीचे अशृ आहेत असे वाटते.
26 Apr 2011 - 2:14 am | आत्मशून्य
प्रतीक्रीया पण वास्तववादी.
26 Apr 2011 - 3:36 am | निनाद मुक्काम प...
आमचा क्रिकेट चा देव सुद्धा रडला .
अवांतर
आम्ही कधीपासून कल्की अवताराची वाट पाहत आहोत .
आमचे साई भक्तांच्या हाकेला ओ देऊन मृत्युच्या दाढेतून परत आले होते .
हा साई फकीर म्हणून प्रसिद्ध होता .
असो
ते
४०००० कोटी सरकार च्या तिजोरीत जमा करा
सिंधुताई सकपाळ ह्यांना अजून पुरेशी अनाथ मुलांसाठी मदत मिळाली नाही आहे .आणी ह्यांना मात्र एवढे ................
सर्व पैसा सेवाभावी संस्थांना व विधार्भातील व भारतातील शेतकऱ्याला द्या .
26 Apr 2011 - 2:13 pm | चिरोटा
अरे वा. आणि मग आपले सरकारी मंत्री/नोकरशहा तोच पैसा स्विस बँकेत ठेवणार आणि आपल्या पोराबाळांचे कल्याण करणार.
सत्य साई हॉस्पिटल पाहिले आहे का? नसेल तर एकदा तेथील सेवा,सुविधा पाहून या. समाजातला एक उपेक्षित गरीब वर्ग बाबांच्या निधनाने का हळहळला असावा ते कळेल. तिथे दिल्या जाणार्या सुविधांबद्दल अब्दुल कलाम काय म्हणतात पहा-
I can see god's mission being carried out here. The doctors and staff looked to me as angels
अनेक डॉक्टर्स्,तज्ञ तेथे मोफत सुविधा पुरवतात.
सत्य साईबाबा चमत्कार करतात म्हणून हे सगळे झूट आहे, ही बनवाबनवी आहे असे वाटत असेल तर प्रश्न मिटला.
26 Apr 2011 - 2:22 pm | टारझन
पण तरीबी सरपंच शंकरभाऊच !!
-टोयोटा
30 Apr 2011 - 1:56 am | निनाद मुक्काम प...
@चिरोटा साहेब
लोकांनी दिलेली संपत्ती लोकांसाठी खर्च करणारे साईबाबा मोठे आणी बरेच काही ............
तर स्व कष्टाने मिळवलेले अब्जावधी संपत्ती मधील अर्धी समाजासाठी देणारे बिल गेट्स व वॉरेन साहेबांना काय म्हणायचे .
अगदी भारतातील उदाहरण द्यायचे तर जाणता राजा ह्या महा नाट्यातून मिळालेली संपत्ती शिव सृष्टी निर्माण करण्यासाठी खर्च करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांना काय म्हणायचे .?
अभय बंग किंवा प्रकाश आपटे .व कोणत्याही वी आय पी व श्रींमत देणगीदार नसतांना अनाथांची आई असलेल्या सकपाळ बाईंना काय म्हणायचे ?
व जो गरीब वर्ग त्यांच्या मृत्युनंतर रडला त्यांना अंत्य दर्शन सचिन सारखे व्यवस्थित घेता आले का ?
30 Apr 2011 - 6:31 pm | माझीही शॅम्पेन
+१
26 Apr 2011 - 9:01 pm | अविनाशकुलकर्णी
सत्य साईबाबांच्या निधनाची वार्ता समजल्या वर लक्षावधिंच्या गळ्यातला ताईत सचिन याने वाढ दिवस साजरा केला नाहि..
स्वतास खोलीत कोंडुन घेतले...
तसेच बाबांच्या अंत्यदर्शनाला गेला असता त्यास अश्रु आवरले गेले नाहि..या गोष्टीवर ब~याच ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली....
तसेच मिडियाने पण याला अमाप प्रसिद्धि दिली...खरे तर..अनेक देशविदेशातिल मान्यवर बांबांच्या निधनाने व्यथित झाले हदरले...पण फोकस व चर्चा सचिन बाबत होति..
सचिनची बाबा वर असलेली श्रद्धा लोकांना खटकते असे चित्र आहे का?
27 Apr 2011 - 3:52 pm | चिरोटा
नक्की माहित नाही. पण नेहमी 'समाज प्रबोधना'चे काम करणार्या मराठी वृत्तपत्रांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केलेय. सामना,लोक्सता,मटा कोणीच साईबाबांविषयी अग्रलेख लिहिलेला दिसत नाही आहे.
27 Apr 2011 - 6:23 pm | विकास
मी काही सत्य श्री साईबाबांना भेटलेलो नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलचे सर्वच ऐकीव. म्हणून त्यांचा समर्थकही नाही अथवा विरोधकही नाही. त्यामुळे खालील प्रतिसाद हा देखील समर्थन अथवा विरोधातला नाही... मात्र येथे त्यांच्यावर तोंडसुख घेणार्यांना इतके नक्की विचारावेसे वाटते की त्यांनी अथवा त्यांच्या गणंगांनी तुम्हाला फसवले आहे का की ज्यामुळे आज इतके तावातावाने बोलावेसे वाटते? जर तसे असेल तर अवश्य अनुभव येथे सांगावात...
बाकी त्यांच्या बद्दलच्या चमत्कारांबद्दल आणि सेवांबद्दलच बोलायचे असले तर तसे मदर तेरेसांबद्दलही बोलता येईल, ज्यांना तर जगाने नोबेल पारीतोषिक दिले आणि भारत सरकारने भारतरत्न दिले... इतकेच नाही तर अंत्ययात्रेस जो मान राष्ट्रपिता गांधीजींना दिला होता तो दिला गेला. त्यांच्या चमत्काराला पोपने मान्यता दिली आणि संतपदासाठी पुढे नेले. नशिब! आपल्याकडे पब्लीकच बाजूने अथवा विरोधात ठरवून एखाद्याला संत करते अथवा गुंड ठरवते! पण त्यांच्यावर कधी अशी टिका कोणी केल्याचे आठवत नाही. (हे मी मिपाकरांना उद्देशूण म्हणत नाही. मला माहीत आहे, तेंव्हा मिपा नव्हते. :-) कुठल्याही व्यक्तीस नाही पण ह्या वृत्तीस नक्कीच उद्देशून बोलत आहे).
बाकी. रमताराम यांच्या प्रतिसादाशी सहमत.
प्रकाशरावांनी दिलेले उदाहरण जर एकमेवच असेल आणि ते देखील चित्रलेखेतले असले तर केवळ त्यावर अवलंबून राहून निष्कर्ष काढणे मला योग्य वाटणार नाही. कारण नाईलने भारतात प्रकरणे जशी दाबता येतात असे म्हणले आहे, त्याच्या उलट पण म्हणता येते. (खोटी प्रकरणे तयार करता येतात). असे म्हणताना मी प्रकाशरावांवर अविश्वास दाखवत नाही आहे! :-)
कलामांच्या हिंदूस्थान टाईम्स मधील लेखातील साईबाबांच्या सामाजिक कार्याबद्दलचे ठळक मुद्दे जाणवले ते असे: Value-Based Education, Water Mission, Healthcare, Project Management.
प्रतिभा पाटलांनी देखील त्यांच्या शोकसंदेशात याच गोष्टीवर भर दिला आहे.
आयबीएन वरील माहितीप्रमाणे:
अजून काही माहिती येथे देखील मिळेल.
आता राहीला सचिनचा प्रश्न. तो पब्लीक फिगर असला तरी त्याच्या कर्तुत्वावर आहे. जर त्याला कोणी म्हणाले असते की त्याने स्वतःपेक्षा मोठ्या, गुजराथी मुलीशी लग्न का केले, तर आपण ऐकून घेऊ का? तो त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तेच साईबाबांसंदर्भात मी समजेन. त्याने कधी कुणाला साईबाबांच्या मागे लागा म्हणून सांगितले नाही की पैसे द्या म्हणून सांगितले नाही. बर सचिनचा आदर्शच घेयचा असेल तर त्याने त्याच्यावर अचानक आलेल्या दु:खद प्रसंगाला देखील संयमित तोंड देऊन १९९९ साली परत वर्ल्ड कप खेळायला जायला कमी केले नव्हते आणि कर्तव्यात (कामात नाही) चुकारपणा केला नव्हता, ते का नाही लक्षात ठेवायचे? आजही भले त्याच्या डोळ्यातून पाणी आले असेल आणि खोली बंद केली असेल, पण तो माध्यमांच्या मागे लागला होता का की कसेही करा आणि याला प्रसिद्धी द्या म्हणून? शिवाय त्यावेळेतही त्याचे कर्तव्य करण्यात तो चुकार ठरला आहे का? मग कशाला त्याला नावे ठेवा?
28 Apr 2011 - 12:25 am | आनंदयात्री
सचिनबद्दलच्या मतांशी सहमत आहे.
तसेच सत्यसाईबाबा फ्रॉड होते, तर ते पकडले गेले किंवा त्यांचे पितळ उघडे पडले अश्या गोष्टी झाल्यावर सर्वसामान्य माणसाला आनंद झाला तर एकवेळ समजु शकते, पण ते मेले तर आनंद व्हायचे काय कारण हे कळले नाही. थोडक्यात तुम्ही कंबोडियात रहात असाल आणी पॉल पॉट मेला तर तुमचा आनंद मी समजु शकतो पण इतर कोणी मेल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या सुधारणावादी, निधर्मीवादी, विज्ञानवादी वैगेरे वैगेरे वादी प्रवृत्तीपेक्षा माणुसकीचा अभाव चिंताजनक आहे.
तुमचा नसलेला आमचा असलेला देव तुमचे भले करो.
28 Apr 2011 - 1:11 am | माझीही शॅम्पेन
विकास तुमची प्रतीकिर्या अशांता: पटतेय. चर्चा चांगली चालू आहे , लेख लिहील्यानंतर बर्याच प्रतिक्रिया आल्यात पण काही पश्न अजूनही अनूत्तरीत वाटतात
प्रसार माध्यमांची अनाकलनीय भूमिका
खर तर मुद्दामन मी चंद्रास्वामिंचा उल्लेख टाळला ते एक यशस्वी(?) मध्यस्थ होते किंबहुना सर्व मीडिया मध्ये कुठेना कुठे त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभाग समोर येत राहतो पण सत्य-साईबाबा बद्दल अस खात्रीने म्हणता येत नाही. मिपा , उपक्रम किंवा ई-सकाळ अश्या प्रतिक्रिया देता येणार्या (सोशल मीडिया) माध्यमातून हे तरंग उमटत राहतात. स्वता:ला पुरोगामी म्हणणार्या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत.
सचिन / सुनील आणि सत्य साईबाबा
सचिन किंवा सुनील नुकतच त्यांच अंतिम दर्शन घेतल इत्यादी. त्याना अध्यमीत्क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही.
बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज. म्हणजे कुठेतरी काहीतरी गफलत असावी की त्यांच्या वर टीका करण्याराना ते कळलेच नाही अस म्हणाव?
अध्यमिक रोबिनहुड(?)
श्रीमन्ताना लुटून गरिबाना संपत्ती वाटणारा रोबिनहुड किंवा तस्त्सम व्यक्तिरेखा सामन्याननी नेहमी नायक म्हणून स्वीकाराल्या गेल्या आहेत. हे कदाचित त्याचच उदाहरण असाव ? अश्या नायकानी खून केले तरी ते माफ केले जातात तर जादू-टोणा तर किरकोळ बाब.
थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या !
28 Apr 2011 - 5:54 am | विकास
थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या !
गुंतागुंतीचे आहे हे मान्यच आहे. आणि आपण गूढ म्हणले त्यात काही गैर नाही.
स्वता:ला पुरोगामी म्हणणार्या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत.
अहो स्वतःला पुरोगामी समजणारी माध्यमे राशीभविष्य छापतात, अनेक बुवा-बाबा-बायांच्या कार्यक्रमाबद्दल छापतात अथवा दाखवतात, कारण वाचकवर्गाच विचार असतो. येथे तर अनेक दिग्गज हे साईबाबांचे भक्त अथवा त्यांना मानणारे, त्यांना वेडं कसे ठरवायचे? आणि त्यातील कोणीही त्यांच्या चमत्काराचे कौतूक केलेले नसताना. त्यामुळे चमत्काराचा उल्लेख सोडून साईबाबांची बातमी आली आहे. त्यात काही गैर नाही. मात्रं पुरोगाम्यांना आनंद होण्यासाठी नक्की त्यांनी त्यांचे काय बिघडवले होते हे पण समजले पाहीजे... केवळ पुरोगामी म्हणून आधी उल्लेख केल्याप्रमाणे चमत्कारासाठी संतपद मिळवणार्या मदर तेरेसाबद्द्लही असे का वाटले नव्हते, ज्यांच्या समाजसेवेबद्दल ही सेक्यूलर/विज्ञानवादी पाश्चात्यांनी ताशेरे ओढले पण आपण मात्र गप्प राहीलो?
मला एक मात्र (खरचं) प्रश्न पडला आहे: सत्य श्री साईबाबा शेवटपर्यंत चमत्कार करत होते का? तसेच यातील नक्की कोण कोण चमत्कारामुळे त्यांच्या जवळ गेले?
त्याना अध्यमीत्क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही.
काही गरज नाही... त्यांचे खाजगी जीवन आहे. कुठल्या सायकॅस्ट्रीस्ट कडे गेले/ कौन्सिलरकडे गेले तर सांगायला हवे का? बरं असे सायकॅस्ट्रीट्स (लांबून ;) ) बघितले आहेत ज्यांना समाजात बिथरलेले पाहीले आहे पण तरी लोकांना सुधारू शकता. मग केवळ ते विज्ञानाचा आधार घेतात म्हणून आपण आक्षेप घेतो का?
बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज.
मध्यस्थ नसतात तर कौन्सिलर असू शकतात. रामाला ईश्वरी अवतार समजले तरी वसिष्ठांनी त्याला आलेल्या औदासिन्याच्या क्षणाला उपदेश केला, त्यातून योगवसिष्ठ तयार झाले. कृष्णाला पण सांदीपनी मुनींकडे शिकायला जावेच लागले होते. किंबहूना आपण सर्वेसर्वा नाही ह्याची सचिनला जाणीव आहे असे म्हणेन. (आता साईबाबा हा त्याने शोधलेला मार्ग होता. त्यात वाहवत गेला नसला तर काय बिघडले?)
अध्यात्मिक रॉबिनहूड का ते माहीत नाही तसेच प्रकाशरावांनी मांडलेल्या मुद्याबाबत देखील माहीत नाही. त्याची चौकशी नीट करणे यात काही गैर नाही. मात्र न करताच बोलणे पटणार नाही. केवळ साईबाबांसंदर्भातच नाही तर इतर कुणाच्याही बाबतीत....
28 Apr 2011 - 2:40 pm | वाहीदा
मनुष्य हा सामाजिक प्राणि नक्की आहे आहे पण जशी त्याची वैचारिक गरज आहे तशी तशीचे त्याची भावनिक गरज ही आहे अन अध्यात्मिक गरज ही आहे अन कुठेतरी ती भावनिक गरज हे बाबा / बुवा लोक्स पूर्ण करताना आढळतात. मग बाबाने दिलेली साधी राख असो, डोक्यावर ठेवलेला हात असो किंवा मग त्याचे ते प्रेमळ बोलणे असो हे कुठेतरी त्या क्षणाला अदभूत अनुभुती त्या त्या व्यक्तीला देत असेल.
मानस शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहीले तर प्रत्येकाला त्याची गरज आहे अन कुठेतरी आजच्या टेंन्शन युक्त आयुष्यात fatherly / motherly figure म्हणून हे बाबालोक पुढे येत आहेत.
कदाचित त्याची कारणे आजची ढासळलेली कुंटुब व्यवस्था असेल जिथे संयुक्त कुटुंब पद्धत न राहता ती Nuclear झाली आहे
घरात आजी आजोबांचे स्थान हळू हळू हे बाबा लोक घेत आहेत पण ते समाजाला कुठे तरी कणा नसलेले ही बनवत आहेत
जिथे विचार करण्याची गरज उरत नाही अन फ़क्त चमत्कारानेच काम होते हे कुठेतरी भितीवह आहे
जेव्हा नेते हे Trasnformational न रहाता Transactional होतात अन सर्व काही व्यवहारावर अवलंबून रहाते तेव्हा कुठेतरी ते समाजाला नक्कीच खोल दरित घेऊन जाणारे आहेत.
"तूम्ही मला मते द्या मी तुमच्यासाठी अमुक अमुक करतो" हेच आजच्या नेत्यांचे गुण आहेत मग काहीही न मागता हा बाबा मला देतोय अन माझ्यातील सकारात्मक गुण माझ्या डोक्यावर हात ठेवून ते बाहेर येतात अन मी प्रेरणामय होतो तर मग मी त्या आनंदमय क्षणी वाट्टॆल ते पैसे स्वखुशिने द्यायला तयार होतो कारण बाबांचे गोड बोलणे !! असेच कुठेसे या वलयांकीत लोकांबरोबर झाले असेल कारण त्या क्षणाला ज्या मायेची त्यांना गरज असते ती ही बाबा लोक पुरवतात त्याक्षणाला त्यांच्या किंवा कुणाच्याच विचारांना अन तर्कबुध्दीला काडी मात्र महत्व नाही कारण एक मानवी स्वभाव म्हणून ते वलयांकित माणसे एक भावनिक प्राणी आहेत.
27 Apr 2011 - 11:09 pm | आनंद
अतिशय योग्य आणि विचार करण्या जोगा प्रतिसाद.