स्पीक एशिया : संधी की सापळा?

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in काथ्याकूट
28 Apr 2011 - 12:36 pm
गाभा: 

नमस्कार,
सध्या 'स्पीक एशिया डॉट कॉम' ची बरीच चलती आहे असे दिसते.
उपलब्ध माहितीनुसार ही एक सिंगापूरस्थित सर्व्हे कंपनी आहे, जी लोकांमार्फत ऑनलाईन सर्व्हे कंडक्ट करते. कंपनीत नावनोंदणी करण्यासाठी ग्राहकाला आधी एका वर्षासाठी ११,०००/- रू. भरावे लागतात. त्याबदल्यात त्याला आठवड्याला दोन सर्व्हे करायला देतात. एक सर्व्हे केल्यावर ५०० रू. मिळतात. याप्रमाणे दर महिन्याला चार हजार रुपये कमावता येतात. म्हणजे ११ हजार भरायचे आणि वर्षभरात ४८ हजार कमवायचे अशी एकंदर स्कीम आहे.
याशिवाय आपल्यासारखेच ११००० भरणारे दोन नग शोधून आणल्यास त्यांचेही कमिशन आपल्याला मिळणार. त्यांनी त्यांची चेन पुढे वाढवली की आपल्याला आणखी कमिशन आणि आपण घरबसल्या मालामाल वगैरे आहेच.

सध्या माझे दोन-तीन मित्र याचे मेंबर्स आहेत आणि अपेक्षेप्रमाणे मला गळ घालत आहेत. "आधी अकरा हजार भरा" म्हटल्यावर माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे हे नक्की. पण एकंदर प्रकाराने उत्सुकता चाळवल्याने थोडी माहिती मिळवली. (जी मेंबर झालेल्या मित्राने आनंदाने पुरवली. ;)) 'स्पीक एशिआ' ला म्हणे हा सर्व पैसा ज्या प्रॉडक्टचा सर्व्हे केला जातो, त्या कंपन्या पुरवतात. साईटवर जाऊन एक सॅम्पल सर्व्हे पाहिला- जो अगदीच बाळबोध वाटला. (एक सर्व्हे फॉर्म भरायला साधारण दहा मिनिटे खूप होतात.) इतक्या पाचकळ प्रश्नांना कुणी पाचशे रू. देऊ करेल असे वाटत नाही. शिवाय ग्राहकानेच सर्व्हे भरायचा आणि पैसे मिळवयाचे असे असेल तर आधी अकरा हजार कशाबद्दल घेतात याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
असे असले तरी याच माध्यमातून सहा-सात महिन्यात गडगंज पैसा कमावणारे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे. सदर गृहस्थाने आपली बॅन्केची नोकरी सोडून पूर्णवेळ या कार्याला वाहून घेतले आहे. :) एकंदर या प्रकारच्या योजनांचे अर्थकारण कसे चालते, हा संशोधनाचा विषय आहे. अशा योजनांमधे साधारण चेनमधले वरचे लोक श्रीमंत होतात आणि खालचे लुबाडले जातात. पण आपण वर आहोत की खाली हे चेनमधल्या माणसाला शेवटपर्यंत समजत नाही. त्यामुळे अशा योजनांपासून दूर राहणेच इष्ट आहे, असे वाटते.

आतापर्यंत मल्टि लेव्हल मार्केटिंगच्या अनेक स्कीम्स (जपान लाईफ, एम्वे, ट्युलिप इ.इ.) लोकांना चुना लाऊन गेल्या आहेत. तरीही या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता 'ईझी मनी' चे आकर्षण कमी झालेले दिसत नाही.

मिपाकरांना याबद्दल काय वाटते? इथल्यापैकी कुणी याचे मेंबर आहे का? काय अनुभव आहेत?
चर्चा व्हावी !

प्रतिक्रिया

साबु's picture

28 Apr 2011 - 1:37 pm | साबु

मला नाहि वाट्त कि ह्या प्रकारचे बिझिनेस इझी मनी देतात....जे लोक काम करतात ते श्रीमन्त होतात... जे लोक करत नाहित... (ज्याना वाट्ते कि काम न करता पैसे मिळ्तील ) ते असले बिझिनेस करु नाहि शकत... आणि मग त्याचा अपप्रचार करतात... काहि फ्रौड कम्पन्या असतील हि... पण काहि चान्गल्या पण असतात... एम्वे अजुनहि चालु आहे..आणि काहि लोक यशस्वीरित्या करताहेत...

हे असले बिझिनेस direct selling./network marketing/referral commission/time leveraging ह्या तत्वान्वर काम करतात.

व्यवस्थित विचार आणि सन्शोधन करुन कोणिहि हे करु शकत.

पण काहि चान्गल्या पण असतात... एम्वे अजुनहि चालु आहे..आणि काहि लोक यशस्वीरित्या करताहेत...
२५ ते ३० रुपयांची वस्तु ३०० रुपयंच्या आसपास विकून मिळालेल्या फायद्यातून एजन्टाना कमिशन देणारे अ‍ॅमवे ही ग्राहकांची ( पर्यायाने एजन्ट ग्राहक) किती लुबाडणूक करते हे जोवर ध्यानात येत नाही तोवर अ‍ॅम्वे च्या नादात लोक आपले व्यवसाय धंदे गुंडाळून साबण विकत बसतात.
अ‍ॅम्वे जॉईन करणारांच्या प्रमाणात त्यात यशस्वी होणारे किती जण आहेत याचे प्रमाण पहा म्हणजे अ‍ॅमवे किती चाम्गली आहे ते कळेल.
अ‍ॅम्वे मध्ये यशस्वी होण्याची व्याख्या त्यांच्या मते तुम्ही इतरांच्या गळ्यात ही अव्वाच्यासव्वा किमतीतली प्रॉडक्ट मारता आहात आणि किती लोकाना अ‍ॅमवे च्या तथाकथीत ब्रीट्स सिस्टीम च्या द्वारे स्वप्ने दाखवून अ‍ॅम्वे च्या भजनी लावताय यावर तुमचे यश ठरत असते.

sagarparadkar's picture

30 Apr 2011 - 2:16 pm | sagarparadkar

एक जगप्रसिद्ध उद्योगपतीचे उद्गार हे इन्ग्लिशमधूनच वाचावेसे आहेतः

Some marketing people tell you to go to hell in such a way that you start looking forward to the trip ... :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Apr 2011 - 3:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बटाट्याच्या चाळीत उपास नावाचे प्रकरण आहे. त्यात एक वाक्य आहे. पंतांना लोकं वजन कमी करण्याचे विविध मार्ग सुचवत असतात आणि आपल्या ओळखीतले उदाहरण देऊन सांगतात की अमुक अमुक व्यक्तीचे वजन या मार्गाने कमी झाले. त्या संदर्भात पंत म्हणतात "मजेची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्याचे उदाहरण देत होता. स्वतःचे उदाहरण देणारे कुणीही नव्हते".

MLM चे पण तसेच आहे. आपल्याला जी लोकं गळ घालतात ती स्वतः कधीच या मार्गाने श्रीमंत झालेली नसतात. ते उदाहरणे देतात ती दुसऱ्यांची. कुणी स्वतःचे उदाहरण द्यायला लागले तर इतके कमिशन मिळाले त्याची बँक statements दाखव असे सांगायचे. मग ही लोकं अत्यंत बिझी होऊन परत आपल्या वाटेला फिरकत नाहीत. माझ्या एका मित्राने am-way ची membership घेतली होती. माझ्या घरी आला तेव्हा वडीलांनी एकच प्रश्न विचारला, "तुला यातून किती उत्पन्न मिळाले आहे आजवर". तो म्हणाला, "काहीही नाही". विषय संपला.

इथे निदान सर्वे भरणे तरी अपेक्षित आहे. या पेक्षा मूर्खपणाच्या योजना घेऊन लोकं येतात. माझ्या एका सहकाऱ्याने ५०००० रु टाकले एका ठिकाणी. ६-१० महिन्यात सगळे पैसे सुलभ हप्त्यात परत मिळणार आणि मग फायदा चालू. अजून बकरे पकडले तर आणि कमिशन मिळणार म्हणे. मी त्याला विचारले की ही कंपनी नक्की काय धंदा करते की इतके पैसे परतावा देते. उत्तर आले की "They invest the money in market". म्हटले, मित्रा, जगातला कुठलाही धंदा इतका परतावा ग्यारंटीपूर्वक देत नाही. मग तो माझ्या वाटेला आला नाही.

पैशाची लालूच दिसली की आपली सारासार विचार करण्याची शक्ती बंद पडते असा माझा अनुभव आहे. जे पटकन ताळ्यावर येतात ते वाचतात. जे नाही येत ते अशा सापळ्यात सापडतात. काहीजण दुसऱ्याचे बघून शहाणे होतात, काही स्वतः अनुभव घेऊन शहाणे होतात आणि काहीजण कधीही होत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2011 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

माऊली तुला काय कमी आहे का दादा ? तुझे आणि माझे दोघांचे भरुन टाक पैसे.

विश्वानाथ चे म्हणने पटते एकदम ..
असेच असते ...

वरती बर्याच जणांनी योग्य लिहिले आहे त्यामुळॅ आनखिन याबद्दल काय लिहु तेच तेच होते आहे म्हणुन लिहित नाही.

तरी
काही किस्से :

१.
बारामतीत माझ्या मित्राने एका कंपणीत अशीच पैश्याची गुंतवनुक केली
४००० भरायचे आपल्या खाली ४ जन तयार करायचे .. त्या पप्रत्येकाने जेंव्हा ४ -४ माणसे जोडली की एक हिरोहोंडा त्याला

म्हणजे हा धरुन जेंव्हा २१ जणांचे ८४ हजार त्या कंपणीला जाणार तेंव्हा ते एक गाडी देणार ...
ह्या पठ्याला वाटले आपल्याला बाईक मिळेल म्हणुन त्याने त्याच्याखालील ४ जणांचे पैसे भरुन टाकले आणि त्यांना सांगितले तुम्ही तर काही भरले नाहित ना मग करा की माणसे गोळा ..
माणसे गोळा झाली येव्हडी ..
पण बिच्चार्या ला गाडी काही मिळाली नाही .. याचे २०००० तर गेलेच पण यानी ज्यांचे पैसे भरले होते त्यांनी जमलेले बाकीचे पण त्यांना बोंबलत होती .. त्यांचे ४००० हजार होते हे खपल होत २०००० ला अआणि मग धनकवडी ला मल घेवुन चकरामारु म्हणत होते मुळ ऑफिस ला [:)]

नंतर त्या स्किम वाल्याला बारामतीत अटक झाली ..


माझ्या चुलत भावानेच am-way agentship घेतली होती .. खुप मागे लागलेला ..
काय तर ९२ रुपयाची टुथपेस्ट तो ग्लास वर बोटाने घासायचा आणि आपल्या टुथपेस्ट मधुन खरखर आवाज आला की ही नॅचरल आहे काही मिश्रीत नाही असे सांगायचा... गपचुप हसुन घ्यायचो आम्ही.. घरात am-way च्या सामनाचा ढिग ..

am-way चे काहे प्रोडक्ट मात्र भारी होते .. पण एजंटशिप बरोबर वाटत नाही ..माझा भावुच नंतर फसल्या गेला त्यात . तरी त्याची खोड गेली नाही.. नंतर कल्पतरु आले त्याने ही काही तरी घोळ घातला पण यावेळेस तर काहीच लक्ष दिले नव्हते मी.

३. उरुळी कांचन ला म्हणे, एक स्किम घेतली होती ओळखीच्या दुकानदाराने, त्याने एक गादी ९०,००० ला घेतली (खुप भारी असे त्याचे म्हणणे) नंतर असेच तीन ग्राहक करायचे .. मग याला बक्कळ पैसा मिळणार होता २ लाखाच्या आसपास .. आनि असेच पुढे ..
आख्या गावात त्याने एकजन कसा तरी तयार केला.. आणि अश्या त्या २ गाद्या त्यांच्याकडेच होत्य १,८०,००० च्या [:)]
----------

असो मल्टीलेवल मार्केटींग ही जरी एक पद्धत असली तरी आधी पैसे देता येत नसतील कंपणीला तर निदान आधी पैसे घेवुन तरी काम नाही सांगितले पाहिजे ..

सुधीर१३७'s picture

28 Apr 2011 - 5:31 pm | सुधीर१३७

माऊली,

सापळ्यात पण संधी मिळते का बघा............... :wink:

मी स्वत:ची थोरवी सांगतोय असा गैरसमज करून घेऊ नये, शुद्ध अनुभवच सांगतोय फक्त.

१. एक लांबचा नातेवाईक एका लग्नात भेटला आणि त्या तथाकथित 'जपानी चुंबकीय गादी' बद्दल पटवायला लागला. त्याचे पहिलच वाक्य होतं कि "जपानी लोकांनी एक नवीन प्रकारचे मॅग्नेट्स शोधले आहेत, त्याला 'डायपोल मॅग्नेटस' म्हणतात" मी पहिल्याच वाक्यावर हसून हसून फुटलो ... बरं हे सांगणारा शहाणा स्वतः सिव्हील इंजिनियरींगचा किमान डिप्लोमा धारक तर होताच, किंवा तसं निदान सांगत तरी होता. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला कि मॅग्नेटस हे नैसर्गिकरित्याच 'डायपोल' असतांत, मोनोपोल मॅग्नेटस हे फक्त थियरीमधेच किंवा हायपोथेटिकलच असू शकतांत .... तर त्याने लगेच दुसरा षटकार मारला कि माझ्या गुरूंनी मला ही गादी घेण्याचा (आणि इतरांना पटवण्याचा) आदेशच दिला आहे त्यामुळे मी डोळे झाकून बिनधास्तपणे हे काम करतोय आता मात्र मी एकाच वेळेला हसून हसून अणि त्या पामराची कीव येऊन अक्षरशः कोसळणे बाकी होतो. खरं तर एक श्रीमुखात भडकावून द्यावीसं वाटत होतं पण तो पडला माझ्या आजोळकडचा नातेवाईक ... त्यांमुळे मातोश्रींपर्यंत काहीतरी अतिरंजित अफवा पोहोचेल मह्णून महत्प्रयासाने शांत बसलो :(

२. भावाचा एक मित्र असाच 'अ‍ॅमवे'चे कौतुक करायला आणि आम्हाला बकरा बनवायला घरी आला. वर म्हणल्याप्रमाणे टूथपेस्ट वगैरेचे प्रात्यक्षिक करू लागल्यावर आम्ही त्याला म्हणालो कि अरे आम्ही तर राखुंडीने किंवा वेळ पडल्यास मिठाने वा मातीनेसुद्धा दांत घासू शकतो, मग ही एव्ह्ढी महागडी टूथपेस्ट कशाला खरेदी कर्रो? आम्ही त्याचा प्रत्येकच दावा खोडून काढायला लागल्यावर त्यानी मला रॉबर्ट कियोसाकी चे 'रिच डॅड पुअर डॅड' हे पुस्तक वाचायला दिले. (त्या मागची त्याची तर्कसंगती नक्की काय होती ते आज अनेक वर्षांनीदेखील मला समजलेलं नाहिये.) पुस्तक छानच होते, त्यांत परत ते फुकट वाचायला मिळालेले म्हटल्यावर काय विचारता ! संपूर्णपणे पुस्तक वाचून झाले तरी तो मित्र काही पुढले ८-१० महिने फिरकलाच नाही. मी पण भावाला सांगितलं की तो आपणहून पुस्तक मागायला येत नाही तोवर त्याला आठवणसुद्धा करू नको. मला स्वतःला हे समजेना कि एव्ह्ढी चांगली पुस्तकं वाचनांत असताना आणि एकूण आर्थिक परिस्थिती उत्तम असतानासुद्धा हा असा चेन मार्केटिंगच्या मागे का लागला? पुढे कधीतरी अचानक त्याला आठवण झाली की ते पुस्तक आमच्याकडे दिलंय ते परत घेतलंच नाहिये, तेव्हा तो पुस्तक मागायला आला. आम्ही विचरलं कि कसा काय चाललाय त्याचा 'अ‍ॅमवे'चा व्यवसाय तर म्हणे केव्हाच बंद करून टाकला ... जास्त काही चौकशी करत बसलो नाही. (कारण अशा फसलेल्या माणसांकडे एक कौशल्य नक्कीच असतं की आपली कशी फसगत झाली ते इतरांना हे लोक सहजासहजी कळू देत नाहीत) मनातच म्हटलं चला एकाचे तरी डोळे उघडले म्हणायचे ... :)

साबु's picture

28 Apr 2011 - 5:59 pm | साबु

वर दिलेल्य बहुतेक उदाहरणामधे...... लोकाना कम्पनीची नीट चौकशी करता आली नाहि. ९९% लोक क्विक मनी मिळावा म्हणुन हे करत असतात. आणि जमले नाहि किन्वा कम्पनी बन्द पडली कि हे असले चालत नहि म्हणातात.
खालील गोश्टी तपासुन पाहणे गरजेचे असते.
१. कम्पनी किती वर्श चालु आहे.
२.कम्पनी किती विश्वासार्ह आहे.
३.कम्पनीची साइझ व वाढ किती आहे.
४. कम्पनीची उत्पादने काय आहेत.
५. कमिशन प्लैन कसा आहे
६.कम्पनी प्रक्शिशन देते का.
७. सर्वात मह्त्वाचे म्हणजे तुम्हि हा बिझिनेस करायला तयार आहात का. उगीचच कोणीतरि सान्गितले कि ह्यात खुप पैसे मिळतात म्हणुन करता आहात.

जेव्हा तुम्हि हा बिझिनेस चालु करता, तेव्हा तुम्ही काहिच कमावलेले नसते... कारण ही तुमची सुरवात असते.. अशा वेळेस ..तो मनुश्य कसा काय सान्गणार कि मी इतके कमावले म्हणून.

बरेच लोक... प्रक्शिशण न घेताच सुरुवात करतात..त्याना नीट समजावुन सान्गता येत नाहि.
In the long term its a very good option if chosen wisely. If you study and realize concepts like time leveraging and residual income/duplication, this can be very effective.

अवान्तरः मी कुठल्याहि म.ल.म. कम्पनीचा सेल्समन नाहि(सध्यातरी), पण अभ्यास केला होता एकदा.

अभ्यास करणे कधी ही चांगले ..
मुळ महत्वाचे म्हणजे मार्केटींग का.. कश्यासाठी..कोणासाठी.. कधी करतोय हे महत्वाचे ...
तुमचे वरील प्रश्न पाहिले कदाचीत किंमत सोडली तर am-way या सगळ्यात उत्तर फिट होते ...
प्रोडक्ट पण काहीतरी नाहियेत ..पणं तरीही माणुस फसलेला आहेच.. अशी लाँग वेळ चाललेले कुठले मार्केटींग महाराष्ट्रात तरी दिसले नाही मला..

आणि मला वाटते स्वताच स्वताचे काही प्रोडक्ट तयार करुन विकले तर जास्त बेनेफिट मिळेन.. जर मार्केटींग करायची असेल तर स्वताच्याच वस्तुंसाठी का नाही असा सवाल पण मी गावाकडे विचारला होता..

उदा.
१. (शेतकर्यांसाठी.. शहरात कोणी ट्राय करु नये [:)])
आपला शेतकरी बांधव होता .. तो ह्या असल्या फंदात पडला.. त्याला सांगितले मी बाबा.. आत्ता २०-२५ लिटर दुध जाते ..म्हणजे डेअरी मध्ये १७५ रुपये रोज मिळतात .. जर २०००० मध्ये एक गाई/म्हैस अजुन घेतली तर निदान ३५ लिटर धर मग रोज जर या वरच्या १० लिटर मध्ये पनीर - लोणी -सम्थिंग दुधाचे पदार्थ तयार करुन आपल्या ओळखीच्या शेजारील हॉटेल्स ना जरी दिले ना तरी असल्या बिझनेस पेक्षा उत्तम हमखास पैसा मिळेल्..शिवाय लाँग टर्म आणि योग्य बिझनेस असेन तो ...

शहरात करण्यासारखे बरेच असते पण भांडवल जागा महत्वाच्या असतात.. पण भांडवल गुंतवले तर व्यव्स्थीत होउ शकते ..पण ज्यांना पार्ट टाईम असे एजंट्शिप करायची आहे त्यांनी करावी.. उगाच मल्टीलेवल मार्केटींग मध्ये कोणीच बुडणार नसेल तर मग आपण हे चांगले नाही कश्यावरुन बोलणार ना , त्यामुळे जावुन द्यावे अश्या लोकांना एकदा बुडी मारायला.. काही लोकांना त्याशिवाय पण कळत नाहिच म्हणा की .. मार्ग कधीच सोपे नसतात .. अवघड मार्गांनाही आपल्या परिश्रमाने सोपे केले तरच ध्येय हातात येते... सोप्या मार्गाने .. परिश्रमाविरहित काही मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे साफ चुकीचा रस्ता आहे ...

इंडस नावाचे प्रि हेल्थ चेक चे पिल्लू आज काल , पुणे व पश्चिम महाराष्ट्रात फार पसरले आहे . ह्यात तुम्ही १४००० भरून सभासद व्हा आणि एक वर्षात शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्या , जर काही आजार असेल तर ज्याच्या नावाने नोंद आहे त्याला उपचार प्रक्रियेत सूट असा प्रकार आहे ...दर वर्षी हे अपडेट करावे लागते ठराविक रक्कम भरून आणि सहयाद्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेता येतात आणि तुम्ही काही ग्राहक जोडले कि तुम्हाला त्याचे पैसे मिळतात ...... मि पा करांकडे काही माहिती असल्यास सांगावी ..............

च्यायला स्पिक एशियाच्या स्किमच्या. मलापण एकजण ही स्किम गळ्यात मारु बघतोय. येत्या रविवारी त्याचा निकालच लावतो..

- पिंगू

आदिजोशी's picture

29 Apr 2011 - 1:12 pm | आदिजोशी

रिकामा वेळ असल्यास अशा लोकांची खेचायला जाम मजा येते.

मराठमोळा's picture

29 Apr 2011 - 2:11 pm | मराठमोळा

कुठल्याही एमेलेम स्कीम मधे फसणारे लोक आत्मविश्वास तर गमावतातच पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक सुद्धा गमावतात.
हे एक दुष्टचक्र आहे. पैशाचा मोह हा स्कीमच्या भुलाव्याला पटकन बळी पडतो आणि सारासार बुद्धी झोपी जाते.

असो, स्पीक एशियाचा एक हिरो भेटला होता. ११००० रुपये कशाबद्दल घेतात ते कुणालाच माहित नाही. नुसता सर्वे करायचा असेल तर ११ हजार रुपये कशाबद्दल घेतात? रजिस्ट्रेशन्चे फार फार तर ५००-१००० रुपये ठीक आहेत, पण ११ हजार? आणि ते पण १ वर्षात पुन्हा पैसे भरावे लागतात असं ऐकुन आहे, बरं नुसतं सर्वे करण्यापर्यंत पण ठीक होतं, दोन लोकं आणा आणि कमिशन मिळवा हे कशाला पाहिजे? फालतुपणा.. म्हण्जे या लोकांना मित्र दिसला की नातेवाईक, इतर काही सुचतच नाही, कमिशन दिसायला लागते. मग सगळे लोकं यांना टाळायला लागतात..

उसात पण असे नग सापडले होते.. मॉलमधे, इकडे तिकडे कुनी दिसलं की उगाचच हसुन जवळ येणार, काहीतरी कारण काढुन संवाद वाढवणार आणि मग बोलबच्चन सुरु करणार.. स्वतःला हे महाभाग आँट्रप्रनर असे म्हणतात.. आणि चड्डी फाटलेली..
अरे काय.. कशाला असले धंदे..

पिंगू's picture

29 Apr 2011 - 9:54 pm | पिंगू

>>> स्वतःला हे महाभाग आँट्रप्रनर असे म्हणतात.. आणि चड्डी फाटलेली..

अगदी अगदी खरं.. च्यायला ह्यांना मुळात कसलं बाळकडू पाजलेलं असतं. की लोचटासारखे मागे लागतात.

विनायक बेलापुरे's picture

29 Apr 2011 - 11:58 pm | विनायक बेलापुरे

१) रु.११०००/- आधी भरा मग त्यानंतर टप्प्याटप्याने हप्त्याहप्त्याने रु. ४८०००/- घ्या .

बुडत्या बैंकेवरील हुंडी.

२)तुमच्यासारखेच २ नग जमा करा. ; )

म्हणजे आधी आपल्याच २ मित्रांना खड्ड्यात घाला.

मिपाकरांना याबद्दल काय वाटते? इथल्यापैकी कुणी याचे मेंबर आहे का? काय अनुभव आहेत?
मला फसवणुकीचा प्रकार वाटतो आहे.
मी अश्याप्रकारच्या कोणत्याही गुंतवणुक योजनेची सभासद नाही.
मला अनुभव नाही पण बाकिच्यांना वाईट आला असावा.
तुमच्या ओळखीच्या ब्यांकवाल्यांना तर बरा अनुभव दिसतोय.;)

ज्ञानेश...'s picture

30 Apr 2011 - 2:08 pm | ज्ञानेश...

तुमच्या ओळखीच्या ब्यांकवाल्यांना तर बरा अनुभव दिसतोय.

हो, बरे अनुभववालेही असतात काही. पण असे लोक जाहिरात करणारेही असू शकतात.
संशय आहे त्यामुळेच तर विचारले ना.

सध्या जाहिरातीही सुरू केलेल्या दिसतात त्यांनी-

http://www.youtube.com/watch?v=ARZ8fP1SKeo

प्रशु's picture

30 Apr 2011 - 2:13 am | प्रशु

मला माझ्या मावसभावाने ह्या स्पिक बद्द्ल विचारपुस करायला सांगीतली होती. त्याचा बहुतेक ह्यात गुंतायचा विचार दिसतोय. आधिच सावध करतो त्याला..

RMP नामक टुकार प्लान ला मी पण बळी पडून ६००० भरले होते
चायला अक्कल कुठे गेलेली तेव्हा देव जाणे

http://www.rmpinfotec.biz/