भ्रष्टाचारी कलमाडी अखेर अटकेत

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
26 Apr 2011 - 4:53 am
गाभा: 

अखंड भ्रष्टाचाराचे व्रत घेतलेले खिलाडियों के खिलाडी सुरेश कलमाडी अखेर जेरबंद झाले. राष्ट्रमाता सोनियांवरील अलोट निष्ठाही त्यांना तारु शकली नाही.

आता ह्याला शिक्षा होते का नाही, अजून काही मोठे मासे हा अधम मनुष्य पकडून देतो का वगैरे माता सोनियाच (युवराज राहुलजींच्या संमतीने) ठरवेल. पण निदान पुढच्या विलेक्शनला पुणेकर ह्या नालायक इसमाला निवडून देणार नाहीत अशी एक अंधुक आशा!

जाता जाता, १९९८ च्या इलेक्शनच्या वेळी भाजपा व शिवसेनेने ह्या इसमाला पाठिंबा देऊन म्हणे एक "धूर्त, मुरब्बी" खेळी खेळली होती. त्याची आठवण करुन देणे भाग आहे. कुणाला गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले ह्या म्हणीचे उत्तम उदाहरण हवे असेल तर ह्या घटनेचा उपयोग करा. असो.

बघू आता सुमारकाका ह्यावर एखादा फर्मास अग्रलेख लिहितात का काणाडोळा करतात ते.

जाता जाता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होणारे पहिलेच नेते असा "मान" मिळवून त्यांनी आपल्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152392:...

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Apr 2011 - 12:47 pm | प्रचेतस

दिवस भरले. कलमाडी गेले तुरुंगात, बरे झाले.

बघू आता सुमारकाका ह्यावर एखादा फर्मास अग्रलेख लिहितात का काणाडोळा करतात ते.

अहो लोकसत्ता सोडलाय त्यांनी आता. दै. भास्कर समूहातल्या मराठवाड्यातल्या दिव्य भारत चे संपादक आहेत म्हणे ते आता.
लोकसत्ता आता गिरीश कुबेर संभाळताहेत. तेव्हा सुमारकाकांचे अतीसुमार अग्रलेख वाचायची वेळ यायची नाही.

चिरोटा's picture

26 Apr 2011 - 3:54 pm | चिरोटा

अरे वा. म्हणजे आता लोकसत्ता परत वाचायला हरकत नाही!!. असो,९९च्या निवडणूकीच्यावेळीच सुमारांनी कलमाडींनी काँग्रेस सोडल्यावर 'सूर्याजी पिसाळ' नावाचा अग्रलेख लिहिला होता म्.टा.मध्ये. त्यात त्यांची साई सर्विस आणि काय काय मालमत्ता बाहेर काढली होती . आता त्यांच्याविषयी काय लिहितात बघुया दिव्य भारत मध्ये.
दिव्य भारत नाही.दिव्य मराठी. भास्करवाल्यांची स्टार्ट अप आहे.
http://www.afaqs.com/news/story.html?sid=30012_Divya+Marathi+to+debut+fr...
पत्रकारांचे जॉब मार्केटपण हॉट दिस्तेय.

भारतीय हवाई दलात
उत्तुंग कामगिरी करणारा झुंझार वैमानिक
देशाला जगाच्या क्रिडानकाशावर नेणारा
दुरदृष्टी क्रिडासंघटक आणि
नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रिडास्पर्धांना
छुपा व उघड विरोध करणार्‍यांवर
यशस्वीपणे मात करुन
या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत
देशाची मान उंचावणारे
खासदार
सुरेश कलमाडी
प्राप्त परिस्थितीतुन बाहेर पडुन
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेतील ,

आज त्यांचा वाढदिवस , त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

- दैनिकदादा सकाळकर

मृत्युन्जय's picture

26 Apr 2011 - 1:21 pm | मृत्युन्जय

पप्पु कलानी, भाई ठाकूर, अरुण गवळी हे जर तुरुंगातुन निवडणुक लढवुन जिंकुन येउ शकतात तर कलमाडीने काय घोडे मारले आहे?

भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यासाठी अटक होउनही कलमाडीचा उल्लेख सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आदरार्थी आहे. याचा अर्थ काय घ्यावा?

मागच्या निवडणुकीतच कलमाडी निवडुन येणे शक्यच नाही असे छातीठोकपणे सांगणार्‍या लोकांच्या नाकावर टिच्चुन जर कलमाडी जिंकु शकतो तर तो आता का नाही जिंकु शकणार?

सुखराम, शिबु सोरेन, लालू प्रसाद यादव, मायावती असे भ्रष्टाचाराचे शेकडो आरोप असणारे राजकारणी निवडणुक लढवतात आणि परत निवडुनही येतात तर कलमाडी का नाही निवडुन येणार. उपरोक्त राजकारण्यांपैकी किती जणांना आजवर शिक्षा झाली आहे म्हणुन कलमाडीला होइल अश्या खोट्या आशेत आपण राहणार आहोत?

हेच म्हणतो. जन पळभर म्हणतील हाय! हाय! ह्या कवितेची आठवण झाली.

अनामिका's picture

26 Apr 2011 - 1:53 pm | अनामिका

"जो बुंद से गई वो हौद से नही आती"काँग्रेसच्या राष्ट्रमातेला हे कुणी सांगेल का?....

स्पंदना's picture

27 Apr 2011 - 10:18 am | स्पंदना

सह्ही! हेच म्हणायच होत.

तसा पण अटक केलेल्या कलमाडींचा चेहरा काही फार धास्तावलेला दिसत नाही. जणु एखाद नाटक करायला निघाव तसे दिसताहेत ते. चुकुन बळीचा बकरा झाला तर मग बघु कस हसु फुटत ते.
तश्या पण माताजी स्वतः खाण्यात फार तरबेज आहेत , पण कोणतही अधिकारी पद त्यांच्या कडे नसल्यान कुणीही बोट दाखवु शकत नाही एव्हढच. बाळराजे परवा अण्णा हजारेंना शह द्यायच्या तोर्‍यात , मला जमेल तेव्हढा भ्रष्टाचार कमी करायचा आहे अस म्हणाले, कुणी सांगेल का त्यांना , जरा घरात डोकावुन बघा स्वतःच्या म्हणुन?

मराठी_माणूस's picture

26 Apr 2011 - 3:22 pm | मराठी_माणूस

जाता जाता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होणारे पहिलेच नेते असा "मान" मिळवून त्यांनी आपल्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे.

हा ह्क्क बारामतीकरांचा होता

रेवती's picture

26 Apr 2011 - 6:57 pm | रेवती

काय फरक पडतो?
एक गेला की दुसरा आणखी उपाशी येणार्.......तो जास्तच रक्त पिणार.
बरीच वर्षे गैरप्रकार केल्यावर एखाद्यावेळेस असे होणारच ही मानसिकता असते.
तुरुंगात तरी हालअपेष्टांचे जिणे पदरी येणार आहे का?
थोडी सुट्टी मिळेल नेहमीच्या दगदगीतून.;)
कोणाची भिती आहे या सगळ्या लोकांना?

मुक्तसुनीत's picture

26 Apr 2011 - 8:11 pm | मुक्तसुनीत

घाशीराम आत गेले. नाना जातील का कधी ? :)

नितिन थत्ते's picture

27 Apr 2011 - 10:30 am | नितिन थत्ते

आम्ही या चिल्लर कीटकांना काही महत्त्व देत नाही.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक होत नाही तोपर्यंत हा सगळा दिखावा आहे असेच आम्ही म्हणणार.

पंगा's picture

1 May 2011 - 2:06 am | पंगा

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक होत नाही तोपर्यंत

कशाबद्दल?

नितिन थत्ते's picture

1 May 2011 - 9:49 pm | नितिन थत्ते

कशाही बद्दल..... आम्हाला ते आवडत नाहीत म्हणून

मराठी_माणूस's picture

27 Apr 2011 - 12:22 pm | मराठी_माणूस

काल स्टार माझा वर , ह्या विषयावर ... सांस्कृतीक राजधानी, नैतीकता वगैरे अशा विनोदी गप्पा दाखवत होते

नारयन लेले's picture

27 Apr 2011 - 3:52 pm | नारयन लेले

किति मे॑दुला ताण आसतो त्या॑च्या त्यामुळे आता १५ दिवस आराम करुन पुन्हा नविन उद्योग करण्या साठि नव्या दमाने कामाला लागतिल. आपण लोक उगीच चरच्या करत बसतो . आपल्यारोजच्या जिवनात का॑हि फरक पड्णार नसतो.

विनित

हरामखोर, बेशरम, ४२० कलमाडी अटकेत असल्याचा फायदा घेऊन त्याचा खासदारपदाचा राजीनामा घेऊन त्याच्या नांग्या ठेचल्या तर निदान तो पुन्हा डोके वर काढायचा नाही. नाहीतर कधीतरी जामिनावर सुटुन मोठा पराक्रम केल्याच्या ऐटीत, वाजतगाजत, हार तुरे घेऊन पुन्हा डोसक्यावर बसेल. लोहा गरम है मार दो हथोडा!

वास्तविक शुंगलु कमिटीच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार कलमाडीचा "खुराक" किरकोळ आहे (फकस्त अमुक एक शेकडो कोटी). शीला दिक्शित आणि लठ्ठ मासे लाखो कोटी का कोटीच्या कोटी खिशात सारुन राजेरोस चारित्र्यावर भाषणे देत आहेत. (च्यायला ह्या काय रकमा म्हणायच्या का चेष्टा?). राजजमाई राजे रॉबर्ट वडेराही ह्यात आहेत म्हणे. पण नको. राजघराण्यातील लोक तर त्यागाचे कंकण हाताला बांधून एखाद्या तपस्व्यासारखे पवित्र आचरण करत आहेत. उनके नेकीकी तो मिसाले दी जाती है! आखिर ये वतन तो उन्ही के खानदान की देन है. आपण फक्त शीलावर शिंतोडे उडवून थाम्बू! पण कुणीतरी म्हटलेच आहे शीला की हैवानी तेरे हाथ ना आनी!

असो.

कलमाडीच्या अटकेचे टायमिंग असे का? तर एक शक्यता अशी की करूणानिधीच्या बाळीवर जे बालट आले आहे त्याने तो खवळला आणि आपला पाठिंबा काढून घेतला तर काँग्रेस गोत्यात येईल. ते होऊ नये म्हणून बघ आम्ही आमच्याही माणसाला आत घातले. आता तरी बोबलू नगंस. थोडक्यात कलमाडी हा बळीचा बोकड आहे. चांगला मुहुर्त मिळाला की कसाई तयार!

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2011 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा

LAYEE KHS, KAY KADAK SIXAR MARTO RE TU.1 NUMBR,APLYALA LY AAVDLA.JYA MANSACHA KL MADI BANDHNYA KADE AHE,TYALA 36 CHYA RUN RET NI MARAYLA PAHIJE...ASA LIHILYA BADDAL PUNNHA 1 VAR ABHINANDAN...LAGE RAHO...THOKAT RAHA...PPD.

चिंतामणी's picture

5 May 2011 - 5:58 pm | चिंतामणी

या संदर्भात नुकताच एक SMS आला होता.

कलमाडींची मुलगी: देवा माझ्या बाबांचे चुकले तरी काय ??

देवः विषेश काही नाही. पण पवारसाहेबांची शिकवणी त्यांनी अशी मधेच सोडायला नको होती.