काल कर्वे रस्त्यात भरपूर ट्राफिक जाम होते. मोठ्या डेकवर गाणे चालू होते.
उनके नशे मे, उनके नशे मे
उनके नशे मे $$$ जलते रहे,
लडखडाये, लडखडाये कभी कभी संभलते रहे
त्या डेकसमोर छान नृत्यप्रकार चालू होते.
विविध अवयव किती प्रकारे हलवता येऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत होते.आणि शिट्ट्या मारणे, ओरडणे हे लहान मुलांचे खेळसुध्दा मधून मधून होतेच जोडीला.
एकापाठोपाठ सलग ३ वाहनांवर ३ डेक होते. एकीकडे मुन्नी बदनाम होत होती, दुसरीकडे शिलाला तिची जवानीची काळजी पडली होती. आणि पहिल्या ठिकाणी तर उनके नशे मे
सगळेजण जळत होते.आणि त्यांच्या सभोवताली आपले बिचारे जनतेचे रक्षणकर्ते पोलीस लोकांना त्यांची वाहने हाकण्यासाठी मार्गदर्शन करत होते.
तिथून थोडे पुढे गेलो तर २५-३० मुलांचा घोळका गॉगल वगैरे लावून दबांग स्टाइलमध्ये फिरत होती.
नक्की काय प्रकार आहे हे तर सगळ्यांना लगेच कळेल. काल आंबेडकर जयंती.५ मिनिटे विचारात पडलो. पूर्ण आयुष्य आंबेडकरांनी खर्च केले, त्यात त्यांनी कधी अशी मौज मजा
केली असेल काय? नसेल तर कधी करावी वाटली असेल? नक्कीच! पण अश्या प्रकारे नक्कीच केली नसती. ज्या माणसाची जयंती होती त्याचे तत्व, त्याचे गुण यांच्याशी आपला
काडीमात्र संबंध नाही असेच सगळ्यांना बहुतेक दाखवायचे असेल.जयंती साजरी करण्यासाठी इतर उपाय नाहीतच बहुतेक या जगात.कदाचित आंबेडकर आता पृथ्वीतलावर परत आले असतील तर
ते देखील असेच नाचतील का? आपण ज्या समाजासाठी लढलो त्या समाजातल्या लोकांची प्रगती पाहून त्यांना आनंदाश्रू आले असते. उर भरून आला असता.
आंबेडकर जयंतीला आंबेडकरांचे स्मरण होण्यापेक्षा शीलाच्या जवानीवर नृत्य करणे आम्हाला आवडते.आमच्या सारखी ताकद आहे का तुमच्या कडे असाच प्रश्न बहुधा त्या प्रगत तरुणांना विचारायचा असावा.
असो.आंबेडकर हे एक महामानव होते हे सत्य आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांची आठवण होतेच. पण ती विसरू नये म्हणून आता जे प्रकार चालतात त्यापेक्षा इतर मार्गांनी ती जयंती अविस्मरणीय व्हावी ,
यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.कदाचित त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि परत जन्म घेण्याविषयी निर्णय करू शकतील.
आंबेडकर जयंतीनिमित्त..
गाभा:
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 11:54 am | वेताळ
इतर वेळी गणेश चतुर्थीला किंवा इतर लोकांच्या दैवताच्या मिरवणुकीत लोक मादक पेय घेवुन अगदी बेफामपणे बिभत्स नाच करतात त्यावेळी तुम्हाला हे दिसत नाही का?
त्यानी एक दिवस स्वातंत्र्याचा उपभोग घेतला कि पोटदुखी सुरु झालीच म्हणा.
15 Apr 2011 - 12:01 pm | utkarsh shah
स्वातंत्र्याचा उपभोग कि विकॄत भोग?
आणि इतर वेळेला आम्ही इतर लोकांच्या जाहिर सत्कार करत नाही.
आणि मादक पेय घेणारे किती दिसतात तुम्हाला ? उपभोग घेणारे मात्र मला खुपजण दिसले काल!!!!
15 Apr 2011 - 12:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:(
15 Apr 2011 - 1:43 pm | ajay wankhede
तुम्हि कुठल्या कर्वे रस्त्यावर बघितल माहित नाहि. नागपुरात येउन बघा ..टु .अन्ड फ्रो.तिकिट देतो तुम्हाला...
एकटा कर्वे रस्ता मह्न्जे जग नाहि राव्...जरा विहिरितुन बाहेर येउन जग बघा.....मग काथ्या कुट करा.
जय भिम
15 Apr 2011 - 2:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुमचा मुद्दा नक्की काय आहे??
15 Apr 2011 - 3:45 pm | पिलीयन रायडर
म्हणायचय काय तुम्हाला? जे पहिल ते लिहिलं त्यंनी.. तुम्ही जे पाहिल ते लिहा ना.... नाग्पुरतल..आणि विडिओ पण जोडा..
15 Apr 2011 - 5:09 pm | मी ऋचा
मी इथे नागपूरलाच काल घेतलेला सेम अनुभव लिहायला आलेली होती, तुम्ही नागपूरच्या कुठल्या भागात आंबेडकरांच्या तत्वांवर
विचार करत आणि तसेच आचरण करण्याचा निर्णय घेत त्यांची जयंती साजरी झालेली बघितली?अॅटलिस्ट तरूणांनी केलेली? मलाही सांगा बघेन म्हणते एक्दा तिथे जाउन? आणि असेलही झाली कुठे अशी साजरी तरी लेखात म्हटलेली परिस्थिती नागपूरलाही होतीच हे अमान्य करणे म्हणजे.....जाउ द्या.
15 Apr 2011 - 1:51 pm | ajay wankhede
शहा जी .. कर्वे रस्त्याचा कालचा विडिओ सोबत जोडला अस्ता तर बरं वाट्लं असतं..
15 Apr 2011 - 5:26 pm | प्यारे१
अरे इतकी वर्षे आमच्यावर अण्याय केलात, आम्हाला वाळूत टाकलंत, जणावरापेक्षा बत्तर सुलूख केलात आमच्याबरोबर.
आता जरा आम्हाला आदरनीय बाबासाहेबांमुळं सोतंत्र्य मिळालं आनि त्यांच्या जयंतीला नाचलो तर लगेच तुमाला पोट्दुखी सुरु झाली का ?
इतर दिवशी काय त्रास आसतो का आपला कुणाला?
आपण नाचणार. काय करायचं ते करुन घ्या. नीट सांगतोय.
आपल्या पोरांना म्हाइती नाय आजून आनि आपल्याला पन राडा नकोय आजच्या पवित्र दिवशी. काय?
- आयु. प्यारेश गायकवाड.
सरचिटणीस आय पी आर (सुरई गट)
15 Apr 2011 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार
तिलक तराजु और तलवार इनको मारो जुते चार...
15 Apr 2011 - 7:25 pm | ramjya
नांदेड च्या लोकल पेपर मध्ये वाचनात आले होते..शालेय विद्यार्थी ते तरुण, वयस्कर मडंळी (सर्व समाजातील) काल सलग १८ तास अभ्यास करुन बाबासाहेबांना अभिवादन केले ...
18 Apr 2011 - 9:21 pm | शाहरुख
हाण !!
15 Apr 2011 - 9:24 pm | अजातशत्रु
<<काल कर्वे रस्त्यात भरपूर ट्राफिक जाम होते. मोठ्या डेकवर गाणे चालू होते.
का बुवा मग जेव्हा गणेश चतुर्थी (१० दिवस/ नवरात्र (९ दिवस) असते तेव्हा तुमचे कान बहिरे आणि डोळे आन्धळे झालेले असतात???
>>>एकीकडे मुन्नी बदनाम होत होती, दुसरीकडे शिलाला तिची जवानीची काळजी पडली होती
लाइन छान आहे....:)...........मग आता हि रेकार्ड गणेश चतुर्थी/नवरात्रित वाजनार नाहि याचि हमि द्या...
>>>>. काल आंबेडकर जयंती.५ मिनिटे विचारात पडलो. पूर्ण आयुष्य आंबेडकरांनी खर्च केले,
नुस्ते विचारात पडू नका हो.. क्रुति करा..... कारण आंबेडकर जयंती फक्त "त्यान्निच" का साजरि करावी? आंबेडकरानि या देशाचि लोकशाहि घटना लिहुन तमाम भारतियान्ना व्यक्ति स्वातत्र्य लिहायचे/ बोलायचे स्वातत्र्य दिले आहे..मग तुम्हाला त्याचि जाण आहे क??
16 Apr 2011 - 2:08 am | चंद्रू
ह्ये खरा की डॉ.बाबासायबांची जयंती हल्ली लय वाइट पद्धतीनी साजरी होते. पन ह्याच्या विरोदात म्हणून काही लोक चांगल्या प्रकारे जयंती पन साजरी करायला लागलेत. हळू हळू कायतरी चांगला बदल होइलच.
पन सगल्याच सार्वजनिक सनांची सद्या अशाच पद्दतीने साजरे करायची चढावोढ लागलीय. “ते करतात मग आमी का नाय?”
याचं कारन सगले सन हल्ली प्रायोजित केले जातात. मॉप पैसा ओतला जातो. सनांचा धंदा आनी बाजार झाल्यावर मंग त्याच काय होनार? मग मुण्णी, शिला आनी दारूला उत येनारचं.
16 Apr 2011 - 6:40 am | नगरीनिरंजन
काही का असेना, कधीकाळी लोटा आणि केरसुणी कमरेला बांधून आख्ख्या जन्माची लाज बाळगत फिरणार्या लोकांना सवर्णांसमोरच आणि सवर्णांसारखाच हैदोस घालण्याचे बळ त्या महामानवाने दिले याचा मला आनंदच आहे.
16 Apr 2011 - 6:53 am | शिल्पा ब
विचित्र प्रतिक्रिया.
त्यांनी केलं म्हणून आम्ही पण करणार याला काय अर्थ आहे? आणि आताच्या पिढीला "त्यांनी " जे केलं त्याबद्दल खेद वाटतोच आणि हे असे पुन्हा कोणाही बाबतीत होऊ नये अशीच विचारधारा आहे.
राहता राहिला मुद्दा सणांचा आणि बीभत्स नाचगाण्यांचा तर कोणत्याही सणासुदीला असे प्रकार होऊ नयेत यासाठी तुम्ही काय करता ? तुमची मुलं जातात का असं नाचायला? जात असतील तर तुम्ही त्यांना समजावता का? एक एक करूनच सुधारणा होणार. हा करतो म्हणून तो पण करतो असं झालं तर जे चालू आहे तेच चालू राहील.
वरती सलग १८ तास अभ्यास करुन बाबासाहेबांना अभिवादन केल्याचा प्रतिसाद आहे तसे वागणे उत्तम उदा. आहे. सुरुवात तर केलीच पाहिजे ना!! खेळ घेणे, झाडे लाउन त्यांची काळजी घेणे, अपंग इ. संस्थेत जाउन त्यांना मदत करणे असे उपक्रम राबऊ शकतो आपण. धांगडधिंगा करायचे कारण काय. सणासुदीला लोकांच्या शिव्या खायचं काम.
बाकी चालु द्या.
18 Apr 2011 - 6:35 pm | श्रीरंग
येरवड्यात तर सलग 3 दिवस धुमाकूळ घालत होते मेन इन ब्लू. या वर्षी बाबासाहेबांचा फोटु दाखवून "प्रेमाने" मागितलेली वर्गणी भरपूर जमलेली दिसत्ये.
असो. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बिलेटेड शुभेच्छा.
ब्लीड ब्लू
18 Apr 2011 - 9:40 pm | टारझन
च्यायचा घो ह्या ट्रॉफिक जॅम करुन रोडवर धिंगाणा करणार्यांच्या ? मग तो भगवा असो , हिरवा असो .. वा असो निळा ...
शुक्रवारी ऑफिस वरुन येताना टेल्को रोड वर भोसरी एमेसिबी च्या ऑफिस मागच्या "त्य" एरियातुन येत होतो . मस्त डेक बिक लावले होते . ८-१० वर्षाची पोरं फुल रोड मधेच धिंगाणा करत होती. गाडी जवळ येताच ती बाजुला सरकतील असे वाटले होते . पण ते उलट गाडीकडे बघुनंच डँस करायला लागले बुवा :) आपल्याला तर जाम आवडलं त्यांच शेलेब्रेशन :)
15 Sep 2011 - 8:25 pm | अजातशत्रु
http://www.misalpav.com/node/19100
वाचा आपल्या आब्रुची लक्तरे
सदर धागा काढणारा utkarsh shah नावाचा इसमाने आता आपले तोंड लाजेने काळे केले असेल..
खाली सन्माननिय सदस्यांचे प्रतिसाद -
स्वातंत्र्याचा उपभोग ??
Submitted by utkarsh shah on Fri, 15/04/2011 - 12:01.
स्वातंत्र्याचा उपभोग कि विकॄत भोग?
आणि इतर वेळेला आम्ही इतर लोकांच्या जाहिर सत्कार करत नाही.
आणि मादक पेय घेणारे किती दिसतात तुम्हाला ? उपभोग घेणारे मात्र मला खुपजण दिसले काल!!!!
उत्तर = आता हा कोणत्या प्रकारचा विकृत भोग आहे ? मि.शहा
Submitted by पिलीयन रायडर on Fri, 15/04/2011 - 15:45.
म्हणायचय काय तुम्हाला? जे पहिल ते लिहिलं त्यंनी.. तुम्ही जे पाहिल ते लिहा ना.... नाग्पुरतल..आणि विडिओ पण जोडा..
उत्तर = एक भन्नाट विडीयो जो पाहून तुम्ही थूंकाल स्वतःच्याच तोंडावर, सध्या तो रीमुव्ह झाला आहे हरकत नाही त्याची बातमी आहे दैनीक भास्कर मध्ये - गणेश चतुर्थी पर यहां बार गर्ल्स ने जमकर किया था अश्लील डांस..!
या नावाची. आता बोला
तसेही विडीयो असतातर फार मजा आली असती त्या सुंदर ललनांचानाच पहायला.
Submitted by मी ऋचा on Fri, 15/04/2011 - 17:09.
मी इथे नागपूरलाच काल घेतलेला सेम अनुभव लिहायला आलेली होती, तुम्ही नागपूरच्या कुठल्या भागात आंबेडकरांच्या तत्वांवर
विचार करत आणि तसेच आचरण करण्याचा निर्णय घेत त्यांची जयंती साजरी झालेली बघितली?अॅटलिस्ट तरूणांनी केलेली? मलाही सांगा बघेन म्हणते एक्दा तिथे जाउन? आणि असेलही झाली कुठे अशी साजरी तरी लेखात म्हटलेली परिस्थिती नागपूरलाही होतीच हे अमान्य करणे म्हणजे.....जाउ द्या
उत्तर = आता यात कोणती तत्वे आहेत कोणत्या तत्वांवर गणेश उत्सव सध्या चालू आहे?
आणि मुख्य म्हणजे हे पहायला नागपुर किंवा कुठे जायला नको अगदी गल्लीबोळात हे विदारक सत्य पहायला मिळेल.
Submitted by श्रीरंग on Mon, 18/04/2011 - 18:35.
येरवड्यात तर सलग 3 दिवस धुमाकूळ घालत होते मेन इन ब्लू. या वर्षी बाबासाहेबांचा फोटु दाखवून "प्रेमाने" मागितलेली वर्गणी भरपूर जमलेली दिसत्ये.
असो. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बिलेटेड शुभेच्छा.
ब्लीड ब्लू
उत्तर = खोचक आणि कुत्सितपणे केलेले वक्तव्ये .. मि. श्रीरंग त्या धाग्यात तुमच्या प्रेमाने मागीतलेल्या वर्गणीचे भरपुर मासलेवाईक उदा. आहेत. पहा हं
Submitted by नगरीनिरंजन on Sat, 16/04/2011 - 06:40.
काही का असेना, कधीकाळी लोटा आणि केरसुणी कमरेला बांधून आख्ख्या जन्माची लाज बाळगत फिरणार्या लोकांना सवर्णांसमोरच आणि सवर्णांसारखाच हैदोस घालण्याचे बळ त्या महामानवाने दिले याचा मला आनंदच आहे.
उत्तर = विकृतपणाचा कहर आणि स्वतःच्या तथाकथीत उच्चतेचा अभिनिवेष बाळगून केलेले वक्तव्य.
आता काय बोलणार आहात ? तुम्ही तर जिवच घेतलात एका मनुष्याचा.
Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 15/04/2011 - 18:26.
तिलक तराजु और तलवार इनको मारो जुते चार...
उत्तर = आता तुमचे पायतान काढून तुमच्याच मुस्काटात मारुन घ्यावे बरें..
शेवटी सांगायचे आहे, कि चुका या सगळ्याच समाज बांधवांकडून होत असतात पण म्हणून आपले झाकून दुसर्याचे वाकून पाहण्याचा प्रयत्न करु नये .
आपणच शहाणे ग्रेट आहोत या फुसक्या अभिनिवेषात राहू नये .
इतरांना नावे ठेवणे बंद करा आपल्या खालीही तीतकाच अंधार आहे हे विसरु नये.
गणेश चतुर्थी पर यहां बार गर्ल्स ने जमकर किया था अश्लील डांस..
http://www.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.bhaskar.com%2Farticle%2...
६६ टक्के गणेशोत्सव मंडळे वीजचोर! - Maharashtra Times
maharashtratimes.indiatimes.com
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9873273.cms
http://www.facebook.com/note.php?note_id=174879325920878
by Mugdha Karnik on Sunday, September 11, 2011 at 7:11pm
गणपतविसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ए गणपत चल दारू ला... गाणे वाजते आहे.
गणपतविसर्जनाच्या मिरवणुकीमधे डीजेच्या ट्रकमागे सारे तुफान तुफान नाचत आहेत
गणपतविसर्जनाच्या मिरवणुकीमधे आवाज, खाणे, पिणे, नाचणे, लाइनी मारणे यांची रेलचेल आहे
गणपतविसर्जनाच्या मिरवणुकीमधे भान विसरले आहेत लोक
कारण त्यांना भान नकोसं आहे.
यात भक्तीभावाचा काहीही भाग नाही (हे काही दुःखदायक नाही).
लोकांना एक हल्लागुल्ला हवा आहे...
गणपतविसर्जनाच्या मिरवणुकीत तो त्यांना अमाप मिळतो आहे.
म्हाताऱ्या माणसांना आवाजाचा अतोनात त्रास होतो आहे... पण ती बोलत नाहीत.
तान्ह्या बाळांचा जीव घाबरा होतो आहे पण ती बोलू शकत नाहीत.
विवेकी माणसांना या प्रकाराचा शीण होतो आहे पण त्यांचा आवाज कुणी ऐकत नाही.
गणपत च्यल, दारू ला...
धन्यवाद !!