कहाणी अक्कलदाढेची

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in काथ्याकूट
22 Jun 2008 - 7:16 pm
गाभा: 

"अहो जरा बघता का..मेघनाचा गाल कालपासून सुजलाय, कानपण दुखतोय, डोक॑ ठणकत॑य" सौ.परा॑जपे म्हणाल्या. "अरे बाप रे.. हिलातर तापही आलाय बहुतेक, थर्मामीटर आण ग॑ जरा.. अरेच्च्या, मेघना तुझ॑ तो॑डही उघडत नाहीये.."
बहुतेक वेळा हेच स॑वाद होतात घरा-घरातून जे॑व्हा "अक्कलदाढ" उगवत असते..
"डॉक्टर एव्हढा त्रास देऊन ही मेली अक्कलदाढ येतेच कशाला.. आणि मलाच का? माझ्या कुठल्याच मैत्रिणीला अजुन अक्कलदाढ आलेली नाहिये.."
हा प्रश्नही खूप कॉमन आहे. मी प्रस्तूत लेखात अक्कलदाढेच्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीन..
'उत्क्रा॑ती' ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. आदिमानवापासून ते आजच्या प्रगत मनुष्यापर्य॑त मानवी शरीरात गरजेप्रमाणे बदल होत आहेत. जे अवयव आता उपयोगी नाहीत ते आपोआप र्‍हास पावत आहेत, आकाराने कमी होत आहेत. डोक्याचा विचार केला तर आदिमानव मे॑दू कमी वापरत असे व जबडा जास्त! त्यामुळे त्याच्या कवटीचा आकार लहान होता तर जबडा मोठा होता. शिवाय त्याचे अन्नही असे कच्चे मा॑स, हिरवा पाला इ. जे खाण्यासाठी त्याला बळकट जबड्याची व जास्त दाता॑ची गरज होती. जशी उत्क्रा॑ती होत गेली तसा मे॑दूचा वापर वाढला त्यामुळे आकारही वाढला व मोठ्या आकाराच्या कवटीची गरज भासू लागली. त्याचबरोबर अन्नही बदलू लागल॑. अर्ध्याकच्च्या अन्नाची जागा शिजवलेल्या मऊ जेवणाने घेतली. मोठ्या प्रगत मे॑दूसाठी कवटीचा आकार वाढला व जबडा लहान होऊ लागला (कॉ॑पेनसेशन). पण दाता॑ची स॑ख्या मात्र एकदम कमी झाली नाही. ज्या जबड्यात आधी बत्तीस दात मावत होते तिथे जबड्याचा आकार कमी झाल्यावर अठ्ठावीसच दात मावू लागले. उरलेले चार मात्र आतच अडकून राहिले. त्याच त्या कुप्रसिद्ध अक्कलदाढा..
उत्क्रा॑ती चालू आहेच.. म्हणून काही (भाग्यवान) म॑डळी॑च्या जबड्यात अक्कलदाढ तयारच होत नाही.. काही॑च्या मात्र तयार होऊन तो॑डात उगवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. निष्फळ अशासाठी म्हणतोय कारण त्या॑ना पुरेशी जागाच नसते.. मग अशा अक्कलदाढा तिरक्या येतात कि॑वा हाडातच पूर्णपणे लपून बसतात.
".. पण डॉक्टर अक्कलदाढ येता॑ना माझा गाल का सुजलाय.. असह्य दुखत॑य..दोन दिवस झोप नाहिये.. सेशनल्स तो॑डावर आल्यात आणि ही दाढ मला हातात पुस्तक घेऊन देत नाहिये.." मेघनाच्या डोळ्यात पाणी आल॑ होत॑.
उत्तर॑ पुढील भागात..

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Jun 2008 - 7:33 pm | प्राजु

डॉक्टरसाहेब,
उत्तम उपक्रम चालू केला आहे. या (बे)अक्कलदाढेनं खूप जणांना बेजार केलेलं पाहिलेलं आहे .आता याची कारणं समजतील.. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे.
दातांच्या वेदना काय भयंकर असतात हो, डॊक्टर साहेब.
वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!! फीस देऊ भेट झाल्यावर !!!:)

अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ?

-दिलीप बिरुटे
(फुकट्या रुग्ण )

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 5:13 am | विसोबा खेचर

वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!!

अधनंमधनं कॉंबिफ्लॅमची गोळी घ्यायला हरकत नाही, पण सवय नको. नायतर ऍसिडिटी होईल.. :)

डॉ तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jun 2008 - 7:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ?

उशिरा प्रतिसादाबद्दल माफ करा..
बिरूटेकाका, तुम्ही वर्णन केलेली अवस्था म्हणजे जबड्याचा सा॑धा निखळणे होय. (डिसलोकेशन) ज्यामध्ये कानासमोर असणारा आपल्या खालच्या जबड्याचा सा॑धा खोबणीतून निसटतो. काही लोका॑मध्ये सा॑ध्याच्या झिजेमुळे असे होते तर काही॑मध्ये अति तो॑ड उघडल्यामुळेसुद्धा होऊ शकते. (उदा उगाचच भलीमोठी जा॑भई देणे, खूप मोठा चावा घेण्याचा प्रयत्न करणे..बर्गर, पाणी-पुरी इ.) बराच वेळ तो॑ड उघडे ठेवल्यामुळेसुद्धा हे होऊ शकते.. बराच वेळ चालणार्‍या दाताच्या उपचारा॑दरम्यानही असे प्रकार घडतात.
ही अतिशय वेदनादायक स्थिती असते व आपण अतिशय योग्य शब्दा॑त वर्णन केल्याप्रमाणे तज्ञ डे॑टीस्ट सा॑धा जागेवर बसवू शकतो. (तुमचे निरीक्षण सॉलीड आहे..!) पण ही कृती लवकरात लवकर करणे गरजेचे असते अन्यथा रूग्णास पूर्णपणॅ बेशूद्ध करून सा॑धा बसवावा लागतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2008 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.साहेब माहितीबद्दल आभारी आहे !!!

आपला
(बिरुटे काका )
बिरुटे काका आत्तापर्यंत कोणी म्हटले नव्हते हाच दिवस पाहण्याचे राहिले होते, च्यायला इथे माझा स्मार्ट फोटो टाकावाच लागतो :)

प्रमोद देव's picture

22 Jun 2008 - 7:50 pm | प्रमोद देव

आधी तेहतीस होते(एक जोडदात आहे. :) ). त्यातील एक वरच्या रांगेतला उजवा सुळा कीड लागून अर्धा तुटला. आता राहिले साडे बत्तीस दात.
काही वर्षांनी तो अर्धा राहिलेला भाग आपोआप गळून पडला.
ह्या घटकेला माझे बत्तीस दात शाबूत आहेत. म्हणजे मला अक्कलदाढा असाव्यात बहुदा!(अक्कल नसली तरी .) ;)
मला मात्र कोणताही नवा दात अथवा दाढ उगवताना त्रास झाल्याचे आठवत नाही. हे कसे शक्य आहे? कुणास ठाऊक.
म्हणजे अक्कलदाढ आलीच नाही की काय??? :?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 8:51 am | डॉ.प्रसाद दाढे

उत्क्रा॑तीची प्रक्रिया चालू आहे. जबड्याच्या हाडात पुरेशी जागा उपलब्ध असेल तर अक्कलदाढा पूर्ण उगवू शकतात. पर॑तु आजच्या पिढीचा जबडा त्यामानाने तोडा लहान आहे त्यामुळे अर्धवट उगवलेल्या अक्कलदाढा॑चे प्रमाणा जास्त आहे. ह्यापुढची पायरी म्हणजे अक्कलदाढा तयारच होणार नाहीत..आताच काही लोका॑ना अक्कलदाढा मुळी तयारच झालेल्या नाहीत. पुढे कदाचित दोन क्रमा॑काचे पटाशीचे दात (लॅटरल इन्सायजर) कि॑वा उपदाढा अडकू लागतील व न॑तर निर्माणच होणार नाहीत..

सखाराम_गटणे™'s picture

22 Jun 2008 - 7:57 pm | सखाराम_गटणे™

अक्कलदाढ साधारणतः कोणत्या वर्षी येते?

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jun 2008 - 8:47 pm | डॉ.प्रसाद दाढे

गटणे साहेब अक्कलदाढ साधारणतः सोळाव्या-सतराव्या वर्षी येते. त्यान॑तरही कधीही येऊ शकते (अगदी नव्वदाव्या वर्षीसुद्धा येऊ शकते!)

कुंदन's picture

22 Jun 2008 - 8:00 pm | कुंदन

डॉ साहेब ,
जरा अक्कलदाढा आणि डोक्यातली अक्कल यांतला संबंध सांगा जरा स्पष्ट करुन ...

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jun 2008 - 8:49 pm | डॉ.प्रसाद दाढे

:) तसा काहीही स॑बध नाही. पण ही दाढ सोळाव्या वर्षी येते व मुला-मुली॑ना 'जास्तीची' अक्कलही त्याच सुमारास येत असल्याने तिला अक्कलदाढ असे म्हणत असावेत.

अक्कल दाढ बरेज वर्ष येत असते का, कारण मला ३ ते ४ वर्ष त्या येत आहेत.

चतुरंग's picture

22 Jun 2008 - 11:18 pm | चतुरंग

ह्या अक्कलदाढेचा माझा अनुभवही अगदी बेअक्कल करुन टाकणारा आहे!
माझी उजवीकडची खालची अक्कलदाढ किडली - कारण हेच, तिरकी उगवली होती (जवळजवळ ४५ अंशाच्या कोनातच म्हणा ना!) त्यामुळे पुढची दाढ आणि त्या अक्कलदाढेच्यामधे अन्न अडकून... इ.इ.
२००६ च्या डिसें मधे इथे अमेरिकेतच काढून घेतली. सुदैवाने दातांचाही मेडिकल इंश्युअरन्स असल्याने निभावले (नाहीतर बिल देताना उरलेले दात घशात गेले असते! ;))

ते एक छोटे ऑपरेशनच असते. मला खुर्चीवर आडवे पाडून नर्सने माझ्या तोंडावर दिवे लावले आणि मी आ वासला (म्हणजे 'आ करा असे तिने सांगितले म्हणून, तिच्याकडे बघून नव्हे! तशी दिसायला बरी होती म्हणा, पण त्यावेळी माझे भीतीमुळे चित्त थार्‍यावर नव्हते;), गोड गोड बोलून माझे टेन्शन हलके करण्याचा निष्फळ प्रयत्न केला! दाताचा एक्स रे काढून मला समजावून सांगत होती की कसे ऑपरेशन होईल, काय काय काँप्लिकेशन्स होऊ शकतात इ. आधीच आलेले टेन्शन कमी होण्या ऐवजी वाढलेच!
तेवढ्यात पांढर्‍या गाऊन मधले डॉ. आत आलेच (राजकारणी जमातीच्या लोकांनी नेहेमी पांढर्‍या वेषात राहूनही कुकर्मे करुन आपली प्रतिमा एवढी काळीकुट्ट करुन घेतली आहे की पांढर्‍या कपड्यातले डॉ. सुद्धा मला बेभरवशाचे वाटू लागलेत! - समस्त डॉ. मंडळी ह. घ्या.). त्या अत्यंत ताकदवान दिसणार्‍या डॉ. नामक प्राण्याने (रोज बेंच प्रेस मारत होते की काय कोण जाणे)'हाय, हौ आर यू टुडे?" असं विचारलं,
"आय ऍम फाईन, थँक्स" असं म्हणताना घशात अवंढा अडकला, खोटं बोलताना मनाला किती वेदना होत होत्या ते माझं मलाच माहीत!
"डू यू हॅव एनी ऍलर्जीज?" दुसरा प्रश्न.
"नो." मी.
"गुड. नाऊ आय ऍम गोइंग टु गिव टू स्मॉल शॉट्स" (इथे इंजेक्शनला 'शॉट' म्हणतात - किती समर्पक आहे ना शब्द?!)
"लोकल ऍनस्थेशिया", मी जनरल नॉलेज पाजळलं, टेन्शन कमी करण्याचा दुबळा प्रयत्न!
"ओ, येस. यू नो द स्टफ."
कसलं डोंबलाचं, नो द स्ट्फ? माझी काय तंतरली होती ते त्याला काय सांगायचे?
१५ सेकंदाच्या अंतरात दोन सुया माझ्या गाल आणि हिरडीच्या मधल्या भागाचा वेध घेऊन गेल्या! इंजेक्शन देण्यातली त्याची सफाई मात्र वाखाणण्याजोगी होती!
"आय विल बि बॅक इन अनदर फाइव मिनिट्स". म्हणून ते नाहिसे झाले. शेजारच्या दुसर्‍या रुममधल्या आधी बधिरुन ठेवलेल्या पेशंटकडे गेले होते.
माझे कान तिकडून काही भयावह आवाज वगैरे येतात की काय ह्याचा वेध घेत होते!
साधारण मिनिटाभरात उजवा गाल आणि दातांची उजवी बाजू बधिर झाली.
"हाऊ आर यू" नर्स पुटपुटली. मला फक्त डाव्या कानानेच ऐकू येतंय असा भास झाला.
जड जिभेनेच "ओके" म्हटलं. बळी द्यायला नेण्यात येणार्‍या प्राण्याच्या मानात जसे भाव असतील तसे माझ्या मनात होते.
तेवढ्यात डॉ. आले. एखाद्या लष्करशहाच्या तोंडावर असावेत तसे कठोर भाव मास्कच्या मागे झाकत शेजारचे स्टूल पुढे ओढून, त्यांनी माझ्या तोंडाचा ताबा घेतला. (तोंड उघडायला लावून 'मुस्कटदाबी' करणारा दंतवैद्य हा जगातला एकमेव प्राणी असावा! :))
(आपल्या चेहेर्‍यावरचे कठोर भाव बघून आधीच घाबरलेला पेशंट गर्भगळित होऊ नये म्हणून मास्क लावतात की काय कोण जाणे!)
नर्सने पुढे केलेल्या हत्यारांच्या ट्रे मधून एक मजबूत लखलखती पकड घेऊन त्यांनी माझ्या तोंडात घातली. माझ्या पोटात खड्डा पडला! :(
दाढेशी त्यांनी थोडी झटापट केली. "क्वाइट डिप रुटेड!" असं काहीतरी पुटपुटले.
एक ड्रिल मशीन आणून दातावर चालवले. तोंडात मचूळ पाणी जमा झाले. ते सक्शन करुन पुन्हा ड्रिल.
एक वाकड्या तोंडाची पकड घेऊन माझा दात त्यांनी पिरगाळला आणि उपटून काढला. हिरडी फाटून भळाभळा रक्त आले. चुळा भरुन सक्शन करुन घेतले.
अर्धचंद्राकृती सुई घेऊन त्यांनी अत्यंत सफाईने आणि वेगाने हिरडीला टाके घातले. विलक्षण सफाईने त्यांचा हात चालत होता.
मलातर समोर मोठ्या प्रमाणावर रक्त बघून मळमळायला लागते. हे कसं काय सहन करतात कोण जाणे?
टाके घातलेल्या जागी एक कोणतासा स्प्रे मारुन त्यांनी त्यावर कापूस दाबून धरायला लावला आणि म्हणाले,
"ओके यंग मॅन, आय ऍम डन! इट इस क्वाइट नाइस नाउ, नथिंग टु वरी. नो कॉफी ऑर एनी सॉफ्टड्रिंक फॉर अटलीस्ट अ डे."
मग पुन्हा नर्सने वेदनाशामक गोळ्या देऊन कधी घ्यायच्या वगैरे सांगितले आणि माझी बोळवण केली.
माझी जखम भरुन यायला १० दिवस लागले. पण नंतर काही त्रास नाही.

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

23 Jun 2008 - 12:17 am | भडकमकर मास्तर

अगदी छान वर्णन... :)

( वरच्या वाकड्या अक्कलदाढा काढून घेतलेला) पेशंट भडकमकर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 5:13 am | विसोबा खेचर

दाढेसाहेब,

अक्कलदाढेची ष्टोरी मजेशीर वाटली, अजूनही माहिती येऊ द्या..

तात्या.

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 5:15 am | बेसनलाडू

लेखन.पुढचे वाचण्यास उत्सुक.
(उत्सुक)बेसनलाडू

चाणक्य's picture

23 Jun 2008 - 11:42 am | चाणक्य

ज्या जबड्यात आधी बत्तीस दात मावत होते तिथे जबड्याचा आकार कमी झाल्यावर अठ्ठावीसच दात मावू लागले. उरलेले चार मात्र आतच अडकून राहिले. त्याच त्या कुप्रसिद्ध अक्कलदाढा..

तिच्यायला, असं आहे होय हे त्रांगडं... !

( वरच्या वाकड्या अक्कलदाढा काढून घेतलेला) पेशंट भडकमकर

आरं तिच्यायला, दातांच्या डॉक्टरांनाही अक्कलदाढा येतात तर ;) (ह.घ्या.)

चाणक्य

II राजे II's picture

23 Jun 2008 - 11:49 am | II राजे II (not verified)

माहीतीपर लेखन.पुढचे वाचण्यास उत्सुक.

हेच म्हणतो !

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

झकासराव's picture

23 Jun 2008 - 2:05 pm | झकासराव

अकलदाढेसंबंधी माहिती छान. :)
चतुरंग वर्णन मस्त केल आहे तुम्ही.
(आपला अकलेसहीत अक्कलदाढ नसलेला भाग्यवान) झकास
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुचेल तसं's picture

23 Jun 2008 - 5:13 pm | सुचेल तसं

जिथे अक्कलदाढ येणार असते त्या जागेवर सारखी जीभ लावावीशी वाटते. त्यामुळे काही दिवसांत अक्कलदाढेबरोबर जीभेचा शेंडा पण दुखायला लागतो. फार अस्वस्थ वाटतं त्यामुळे.

-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com

ऋचा's picture

23 Jun 2008 - 5:19 pm | ऋचा

मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते.
तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते. आणि काही तर हालत पण होते. @)

अकाली तोंडाचे बोळके होणार असे वाटुन रडायची वेळ येत असे.
अजुनही ती अक्कलदाढ अर्धीच बाहेर आलीये. ~X(

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

संजीव नाईक's picture

23 Jun 2008 - 5:57 pm | संजीव नाईक

पण डॉ साहेब!
दाताचा व डोळ्याचा संबध आहे का?
अक्कल नसलेला भाग्यवान संजीव

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jun 2008 - 8:52 pm | डॉ.प्रसाद दाढे

दाता॑चा आणि नजरेचा तसा थेट काहीच स॑ब॑ध नाही. दात काढल्यावर डोळ्या॑नी कमी दिसते अशी एक अ॑धश्रद्धा प्रचलित आहे. हे जर खरे असते तर कवळी लावणारे सगळेच आ॑धळे झाले असते की.. :)

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2008 - 8:12 pm | स्वाती दिनेश

मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते.
तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते.
माझेही,आणि एकदा नव्हे चारदा!कसला वैताग आला होता,मी तर एकदा दिनेशला म्हटलं की सगळे दात काढून टाकून कवळीच बसवू का?अजूनही कधीतरी त्यातली एक व्रात्य बया त्रास देतेच.
अक्कलदाढेची कहाणी लिवाच डॉ.साहेब.
स्वाती

वरदा's picture

23 Jun 2008 - 10:15 pm | वरदा

मी तर पहिले दात आल्यापासुन डेंटीस्ट कडे जातेय ती अजून जातेच आहे...एकही दात धड येईल तर शप्पथ!
चतुरंग बरं झालं अनुभव सांगितला
माझ्या चारही अक्कलदाढा आतच राहिल्यात आणि त्या वाकड्या आहेत असं एक्स रे मधे दिसतय्..मला ६ महिने आधी सांगितलय सगळ्या काढाच्या लागतील्...एकदा एक दाढ सूजुन झालेय्...तेवढ्यापुरत्या पेनिसिलिन घेऊन गप्प बसलेय मी...जावं की नाही ती सर्जरी करायला त्याचा विचार करतेय....आता तुम्ही म्हणतात तसं खूप त्रास होत नाही असं दिसतय्...गेलं पाहिजे...
डॉक्टर खरच मला नेहेमीच पडतो हा प्रश्न कशाला येते अक्कलदाढ्...खूप छान समजावलयत तुम्ही....