हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???

ईश आपटे's picture
ईश आपटे in काथ्याकूट
9 Apr 2011 - 10:46 am
गाभा: 

नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे
मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे...
कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी..........

प्रतिक्रिया

वेताळ's picture

9 Apr 2011 - 11:57 am | वेताळ

तरी देखिल तुम्ही अजुन थोडे थांबा. २३ डि.२०१२ ला तुम्हाला स्वःताला त्याचा अनुभव येईल.

सुधीर१३७'s picture

11 Apr 2011 - 7:16 pm | सुधीर१३७

आणि थांबला नाहीत, तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील, हे सांगायला विसरलात का काय ??????????? :wink:

पुणे मराठी ग्रंथालयात मिळेल असे वाटते...

अरुण मनोहर's picture

10 Apr 2011 - 5:40 am | अरुण मनोहर

हे पुस्तक कशासंबंधी आहे, आणि सविस्तर माहिती असल्यास ती देखील द्यावी, म्हणजे शोध घ्यायला सोपे होईल.

आनंदयात्री's picture

11 Apr 2011 - 9:37 pm | आनंदयात्री

>>माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे...

सोप्पे आहे पुस्तक शोधण्याएवजी नतद्रष्ट शोधा, पुस्तक आपोआप मिळेल.

पक्का इडियट's picture

15 Apr 2011 - 12:47 pm | पक्का इडियट

म्हणूनच ते आधी उपक्रमावर गेले (ऋषिकेशांच्या प्रतिसादातून कळले)

नंतर काही उपक्रमी.. माफ करा .. नतद्रष्ट इथे असतील असे वाटून इथे आले

ऋषिकेश's picture

11 Apr 2011 - 9:45 pm | ऋषिकेश

अरेच्या तुम्ही इथेही आहात का?
आत मिपावर अजून करमणूक होणार तर!

तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील? का पुस्तकाची जाहिरात चालु आहे?

पक्का इडियट's picture

15 Apr 2011 - 12:49 pm | पक्का इडियट

>>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील?

सहमत आहे. पण मग अनेक जण एकच लेख दोन्ही ठिकाणी का टाकतात?

धमाल मुलगा's picture

15 Apr 2011 - 5:46 pm | धमाल मुलगा

>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील?
म्हणजे?
मुळात उपक्रमावर ठामपणे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलंच नाहीए ऋष्या! ( विकीवर अनुपलब्धता हे कारण असावे काय अशी शोधमोहिम हाती घ्यावी म्हणतोय. ;) )
आणि उपक्रमावर काय सर्वज्ञ आहेत काय? की तिथं विचारलं तर बाकी कुठे विचारुच नये, दिलेलं उत्तर बरोब्बरच असणार असं काही? कायतरी आपलं तुझं! मध्यंतरी काहीतरी वाचत होतो, तर 'सांडणीस्वार' ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही असाही प्रतिसाद पाहिला होता. नोबडी इज पर्फेक्ट सर.
काय राव, तुमच्यासारखी भल्ली मान्संच असं म्हनाय लागली तं आमी अडान्यांनी कुनाकडं बगायचं? ;)

पक्का इडियट's picture

15 Apr 2011 - 6:52 pm | पक्का इडियट

उंटावरच्या शहाण्यांना .. माफ करा... स्वाराला सांडणीस्वार म्हणतात ना? मी उपक्रमी नसल्याने माहित नाही.

आनंदयात्री's picture

15 Apr 2011 - 9:35 pm | आनंदयात्री

गैरसमज. ऋषिकेशरावांचा पहिलाच बीएस आहे हा, आजवर त्यांना घाउक द्वेष करतांना पाहिले नव्हते.

पक्का इडियट's picture

16 Apr 2011 - 12:07 pm | पक्का इडियट

शक्यता नाकारता येत नाही.

अलख निरंजन's picture

15 Apr 2011 - 4:52 pm | अलख निरंजन

मुंबईला मिळेल बहुतेक. विचारुन पाहा.